गाभा:
नमस्कार मंडळी,
मी माझी पत्नी आणि मुलाचा U.K. साठी डिपेंडेंट वीसा अप्लाइ केला होता. पुणे येथे 26 मार्च ला vfs ला इंटरव्यू झाला.10 दिवसात वीसा मिळेल असे संगितल्याने आम्ही 27 एप्रिलचे त्यांचे त्यांचे मुंबई-लंडन टिकेत सुद्धा बुक केले. पण बरेच दिवस काहीच उत्तर न आल्याने मी ब्रिटीश हाइ कमिशनला विचारणा केली असता त्यानी सांगितले की पत्नी चे अप्लिकेशन प्रोसेस झालेले आहे पण मुलाच्या साठी त्यानी लिहीले आहे की 'decision on your application has been delayed whilst further enquiries are being conducted'.
तुमच्यापैकी कुणी मला सांगू शकेल का असे का झाले असेल.
दोघांचे मिळून सेम डॉक्युमेंट्स असताना एकाचे अप्लिकेशन प्रोसेस झाले व दुसर्याचे अजुन नाही असे का झाले असेल.
मुलाचा वीसा रिजेक्ट होण्याची शक्यता आहे का?
कृपया मदत करा.
प्रतिक्रिया
17 Apr 2015 - 11:44 am | आदूबाळ
मुलाचा वेगळा पासपोर्ट होता का?
अशी पहिलीच केस ऐकली. उलट झाल्याचं ऐकलं आहे.
17 Apr 2015 - 11:51 am | अभिजीत अवलिया
मुलाचा वेगळा पासपोर्ट होता...
17 Apr 2015 - 11:53 am | अभिजीत अवलिया
जर पत्नी व मुलगा मुंबई ब्रिटीश हाइ कमिशन मधे गेले तर काही होऊ शकेल का?
17 Apr 2015 - 2:38 pm | सानिकास्वप्निल
www.immigrationboards.com
जनरल यु.के इमिग्रेशन फोरम वर तुम्ही बघु शकता अशी काही सिमलर केस/प्राॅब्लेम आहे का ते.
17 Apr 2015 - 4:51 pm | खेडूत
शक्यतो असं होत नाही.
सध्या तिकीट एकदोन आठवडे पुढे ढकलू शकता.
तुमचा स्वतःचा Tier-II (GEN) किंवा ICT प्रकारचा विसा आहे का?
मुंबई ब्रिटीश हाइ कमिशन मध्ये जाण्याची गरज नसावी. फोनवरूनही व्यवस्थित माहिती देतात असा अनुभव आहे.
17 Apr 2015 - 10:05 pm | अभिजीत अवलिया
माझा Tier-II (ICT) प्रकारचा विसा आहे. आपण सांगितल्याप्रमाणे फोन करून बघतो
21 Apr 2015 - 3:45 pm | हाहा
मुंबई ब्रिटीश हाइ कमिशन मधे फोन केल्यास नीट शंकानिरसन होते.
22 Apr 2015 - 2:43 pm | अभिजीत अवलिया
सर्व ठीक झाले. आजच दोघांनाही वीसा मिळाला ...
22 Apr 2015 - 3:00 pm | आदूबाळ
गुड. हाबिनंदन्स.
काम झाल्याचं आवर्जून इथे येऊन लिहिलंत हे फार आवडलं. लोक इथे फक्त समस्या लिहितात आणि समस्या सुटल्याचं लिहीत नाहीत असं इथले एक सर म्हणायचे.
खेडूतकाका म्हणताहेत त्याप्रमाणे समस्या सुटली कशी, नक्की प्रॉब्लेम काय होता वगैरेही लिहा.
22 Apr 2015 - 10:09 pm | डॉ सुहास म्हात्रे
चला छान झाले ! अभिनंदन !
22 Apr 2015 - 2:54 pm | खेडूत
आपोआप झाले की फोन करावा लागला ? काय समस्या होती लिवा की राव!
22 Apr 2015 - 3:14 pm | अभिजीत अवलिया
काहीच केले नाही. सोमवारी अप्लिकेशन प्रोसेस झाले असा मेल आला आणि आज कुरियर ने डॉक्युमेंट आले.
22 Apr 2015 - 10:51 pm | सानिकास्वप्निल
अभिनंदन :) चला आता छान एंजाॅय करा.