आसवांच्या प्रतिबिंबात

शब्दानुज's picture
शब्दानुज in जे न देखे रवी...
9 Apr 2015 - 7:06 pm

चेहयावरचे कापड न हटविण्यास सांगितले
म्हणुन आसवांच्या प्रतिबिंबात त्यास पाहिले

रक्ताळलेला पोराचा हात हाती घेतला
टाहो माझा आभाळ छेदुन गेला

हुतात्मांच्या नावात एकाची भर होती
युद्धाच्या अग्निकुंडाने पोराचीही आहुती घेतली

खांदयावर माझ्या सुनेने हात ठेवला
अभिमानाने चेहरा होता प्रफुल्लित झालेला

"इथे समोर त्यांचे पदक लावेन
आयुष्यभर मी त्यातुन त्यांना पाहेन"

"एका पदकासाठी मी पोराला गमावले
लाखोंच्या बळीतुन कोणी काय साधले?

अव्याहत प्रवास हा का आरंभला
बलिदानाचा सोहळा दोन दिवस चालला"

"व्यक्तिसापेक्षतेची इथे अपेक्ष्ाच नसते
परि पदसापेक्षतेला अनेक मुजरे झडले"

रेखाटन

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Apr 2015 - 1:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हुतात्म्याबद्दलच्या भावना पण कवितेत म्हणुन ते तितकंस भिडणारं उतरलं नाही.
पण लिहित राहा.

-दिलीप बिरुटे