असह्य हा उकाडा...

बाप्पू's picture
बाप्पू in काथ्याकूट
25 Mar 2015 - 10:37 pm
गाभा: 

सध्या उकाड्यामुळे खूप हैराण झालो आहे. आणि माझे घर अश्या ठिकाणी आहे जिथे बाहेरून भरपूर हवा येण्यासाठी विशेष अशी योजना नाहीये. खिडकी आणि दरवाजे १५ ते २० मिनिटे जरी लावून घेतले तर आतील तापमान आणि बाहेरील तापमान यामध्ये जवळपास ८-१० सेल्सिअस चा फरक पडतो. कित्येकदा घराला लॉक करून थोडा वेळ बाहेर गेलो आणि आल्यावर दरवाजा उघडला कि जणू काही भट्टी मध्ये शिरलोय असे वाटते... या गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास रात्री झोपताना होतोय. रात्रभर इतके उकडते कि झोप च येत नाही.. फ्रीज खोलून आतमध्ये स्वताला कोंडून घ्यावे असे वाटते.. ( एकदा असा प्रकार चक्क केला देखील) . गेले ४-५ दिवस पंखा लावून झोपण्याचा प्रयत्न केला शांत झोप लागली खरी पण सकाळी उठल्यावर पायामध्ये खुप वेदना सुरु झाल्या.. मग आठवले कि मागे एकदा डॉक्टरांनी पंख्याचा वापर करू नका असे सांगितले होते. त्यामुळे आता पंख्याचा वापरावर देखील मर्यादा आल्या आहेत. तर थोडक्यात सांगायचे झाले तर मी सध्या तोंड दाबून बुक्यांचा मार खातोय. या निमित्ताने घरी नवीन ए सी किंवा कुलर खरेदी करावा म्हणतोय. पण कधीही या दोन्ही गोष्टी मी आजतागायत खरेदी केल्या नाहीत. ए सी दररोज ऑफिस मध्ये वापरतो पण त्याबद्दल काहीहि माहिती नाही. आणि कुलर आत्तापर्यंत फक्त १-२ नातेवाईकांकडे पहिला आहे. पण त्याचा आवाज इतका मोठा होता कि मी विचारलेला प्रश्न त्यांना ऐकू येणार नाही असे समजून मी प्रश्न विचारण्याच्या भानगडीत पडलो नाही. आज या दोन्ही गोष्टीपैकी एकाची निवड करण्याचा प्रसंग आला . त्यानिमित्ताने पडलेले काही प्रश्न -

१ ) VIMP प्रश्न - पंखा आणि पायांचे दुखणे याचा काय सबंध ?
२ ) बेड रूम १४० स्क्वेअर फुट आहे. तर तिथे ए सी घेणे चांगले कि कुलर ?
३ ) कुलर जर खरेदी केला तर त्यापासून चांगले output मिळवण्यासाठी काय काय requirement आहेत ?
४ ) ए सी जर खरेदी केला तर त्यापासून चांगले output मिळवण्यासाठी काय काय requirement आहेत ?
५ ) ए सी चे किंवा कूलर्स चे चांगले मॉडेल कोणते ? आपले अनुभव सांगितले तर फार मदत होईल
६ ) कुलर हवेमध्ये humidity निर्माण करतात म्हणजे नेमके काय ? याचा माझ्यावर किंवा रूम मधील इतर वस्तूंवर काय परिणाम होईल ?

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

31 Mar 2015 - 10:36 pm | श्रीरंग_जोशी

धागाकर्ते पुण्यात राहत असल्याने कुणी डेझर्ट कूलरबाबत सुचवलं नसावं.

डेझर्ट कूलर चा हा फटू जालावरून साभार. माझ्या काकांच्या घरी होता. मागच्या बेडरूमच्या खिडकीबाहेर ठेवला असायचा. घरातली खोल्यांची दारे बंद केली तरी समोरच्या खोलीपर्यंत दारांच्या खालच्या फटीतून थंड हवेचा झोत पायांना जाणवत असे.

डेझर्ट कूलर

चिगो's picture

1 Apr 2015 - 11:42 am | चिगो

विदर्भात, त्यातल्या त्यात, गावांमधे उन्हाळ्यात ह्या धुडाला पर्याय नाही. एका कुलरमध्ये, घराबाहेर उघडणारी दारं-खिडक्या बंद केल्यास ३-४ खोल्या गार होतात. दुपारी आमरस/पन्हं कुरड्यांसोबत चापून, हा कुलर लाऊन ताणून द्यायची.. बाहेरुन रणगाडा गेला तरी आवाज ऐकू येणार नाही.. ;-) फ्रिज नसण्याच्या काळात, कुलरच्या वरच्या ट्रेमध्ये बर्‍याच गोष्टी थंड राहण्यासाठी ठेवल्या जायच्या, हा त्याचा अ‍ॅडेड अ‍ॅड्व्हान्टेज..

मार्मिक गोडसे's picture

31 Mar 2015 - 3:59 pm | मार्मिक गोडसे

आमच्या घरात वायूवीजन व्यवस्थीत होत नव्ह्ते, सोसायटीच्या रचनेमुळे घरात मोठे बदल करण्यास मर्यादा होत्या. त्यामुळे आम्ही हॉलच्या स्लायडिंग विंडोला १०" बाय ३' चे तीन झरोके केले (काचेच्या शटर्सची उंची कमी करून) व त्यास उघडझाप करण्यासाठी लूवर्स लावले. लगतच्याभींतीबहेर 'C.' आकाराची मोकळी जागा होती, तेथे सतत सावली असल्यामुळे ती भिंत थंड असे. त्या भिंतीला १ फूट व्यासाचे होल पाडून त्यावर त्याच व्यासाचा टू वे एक्झॉस्ट फॅन (दोन्ही बाजूस फिरण्याची सोय) लावला. बेडरूमला बाथरूमच्या खिडकीच्या मापाची एक खिडकी काढली व लूवर्स लावले. दिवसा घरातील गरम हवा एक्झॉस्ट फॅनने बाहेर फेकल्याने घरात थंडावा येतो. रात्री एक्झॉस्ट फॅन उलटा फिरवल्याने बाहेरची थंड हवा घरात खेळवली जाते. ठाण्यात असूनही आर्द्रतेचा त्रास होत नाही. मच्छरांच्या अटकावासाठी एक्झॉस्ट फॅन व लूवर्सला जाळ्या लावल्या.
सूचना- एक्झॉस्ट फॅन चालू करण्यापूर्वी (घरातील हवा बाहेर फेकण्यासाठी) बेडरूमचा दरवाज्या अर्धवट बंद असेल तर पुर्ण बंद करावा घरातील हवा खेचली गेल्यामुळे दरवाजा ओढला जावून एखाद्याची बोटे दरवाज्यात सापडली जावू शकतात.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Mar 2015 - 4:10 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

क्झॉस्ट फॅन चालू करण्यापूर्वी (घरातील हवा बाहेर फेकण्यासाठी) बेडरूमचा दरवाज्या अर्धवट बंद असेल तर पुर्ण बंद करावा घरातील हवा खेचली गेल्यामुळे दरवाजा ओढला जावून एखाद्याची बोटे दरवाज्यात सापडली जावू शकतात.

एक्झॉस्ट फॅन आहे का जेट इंजिन?

लॉरी टांगटूंगकर's picture

31 Mar 2015 - 4:23 pm | लॉरी टांगटूंगकर

=))

मार्मिक गोडसे's picture

31 Mar 2015 - 5:08 pm | मार्मिक गोडसे

हाहाहा! एक्झॉस्ट फॅनच आहे. हे असे घडण्याची शक्याता फॅनचा आकार( घरातील अंदाजे एक फूट व्यास) व त्याच्या शक्तीवर अवलंबून आहे व त्याच वेळेस घराच्या सर्व खिडक्या व बाथरूमचे दरवाजे बंद असल्यास फक्त बेडरूमचे लूवर्स पुर्ण उघडे व दरवाज्या अर्धवट बंद असल्यास हे घडू शकते.

बॅटमॅन's picture

31 Mar 2015 - 5:51 pm | बॅटमॅन

ठ्ठो =))

सुबोध खरे's picture

31 Mar 2015 - 7:29 pm | सुबोध खरे

टू वे एक्झॉस्ट फॅन कुठे मिळतो? सर्व साधारण विजेच्या दुकानात मिळतो का? आमच्या स्वयंपाक घरातील बिघडला आहे. मुलुंड ठाण्यात दुकानाचे नाव सांगा.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Mar 2015 - 8:29 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

टु वे एक्झॉस्ट फॅन एक कनेक्शन उलटं करुन बनवता येतो. :)
त्याला क्लॉकवाईज आणि काउंटरक्लॉकवाईजच्या सुविधा उपलब्ध करुन देता येतील.

मार्मिक गोडसे's picture

31 Mar 2015 - 10:22 pm | मार्मिक गोडसे

टू वे एक्झॉस्ट फॅन ठाण्यात प्रभातच्या गल्लीत मिळेल. मुलुंडची कल्पना नाही. मुंबईत लोहार चाळीत मिळतात. युनिक कंपनिचा थोडा महाग परंतू टिकाऊ व दर्जेदार असतो. जितक्या व्यासाचा फॅन तितक्याच व्यासाचे भिंतीला होल असावे व तेही गोलाकार. चौकोनी होल असल्यास एक्झॉस्ट फॅन त्याच्या पुर्ण क्षमतेने काम करत नाही. किचनचे एक्झॉस्ट फॅन बर्‍याचदा विंडोच्या चौकोनी फ्रेममध्ये बसवलेले असतात अशावेळी प्लायवूडला एक्झॉस्ट फॅनच्या मापाइतके गोल होल पाडून त्यावर एक्झॉस्ट फॅन फीट केला तरी चालते.
टू वे एक्झॉस्ट फॅनला इनबिल्ट टू वे स्विच असते एक्स्ट्रा लावावे लागत नाही. फक्त फॅनच्या पात्यांची दिशा बदलताना एक्झॉस्ट फॅन बंद करण्यासाठी ऑन ऑफचे स्विच लावावे लागते.

भिंगरी's picture

31 Mar 2015 - 4:09 pm | भिंगरी

आपण जर हे स्वतःच्या कल्पनेने केले असेल तर तुमचे अभिनंदन!
मलाही आमच्यकडील एका खोलीचे वायूवीजन व्यवस्थित करायचे आहे. आपणांस व्यनी करू का?

मार्मिक गोडसे's picture

31 Mar 2015 - 5:12 pm | मार्मिक गोडसे

तुम्हीच खिडकीत आडव्या/आडवे झोपा ना. लाइटशिवाय काम होत असेल तर कशाला खर्च करता. ह.घ्या.

भिंगरी's picture

1 Apr 2015 - 11:29 am | भिंगरी

तिरडीवर आडवे व्हायचे वय झालयं,खिडकीवर आडवे व्हायला काय सांगताय?

टवाळ कार्टा's picture

1 Apr 2015 - 12:15 pm | टवाळ कार्टा

१ भोचक प्रश्न विचारू का? :D

सस्नेह's picture

1 Apr 2015 - 1:08 pm | सस्नेह

कुणाच्या वयाची उठाठेव कुणी का करावी =))

टवाळ कार्टा's picture

1 Apr 2015 - 1:38 pm | टवाळ कार्टा

तुम्ही भिंगरी तैंच्या ड्वैडी क्काय? ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Apr 2015 - 2:53 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ओ तै...तो काय वय विचारणार नौता कै....तो ओळखीची समवयीन मुलगी आहे का ते विचारणार होता. ;)
तेवढचं एक पुण्ण्ण्ण्याचं काम =))

भिंगरी's picture

1 Apr 2015 - 5:45 am | भिंगरी

'मार्मिक' उपाय सांगितल्या बद्दल.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Apr 2015 - 7:43 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

ज्यांना घराचं वायुविजन करायचं आहे अश्या सर्व मंडळींसाठी एक सल्ला. पुश आणि पुल सेटअप करायचा प्रयत्न करा. पुश अँड पुल सेटअप म्हणजे एका एक्झॉस्ट पंख्याने हवा आत ओढायची तर दुसर्‍या एक्झॉस्ट पंख्याने हवा खोलीबाहेर फेकायची. हा उपाय अतिशय प्रभावी ठरतो.

शिवाय वर श्रीरंग जोशींनी दिलेल्या डेझर्ट कुलरचा वापर करायलाही हरकत नाही पुण्यामधे. पण त्याचा आवाज मोठा असतो असा अनुभव आहे.

य कूलर बद्दल पण विचार केला होता.. पण त्याचा अवाढव्य आवाज ऐकून कॅन्सल केला...

तिमा's picture

1 Apr 2015 - 6:56 pm | तिमा

त्या आवाजामुळेच रणगाड्याचा आवाज येत नाही.

शि बि आय's picture

1 Apr 2015 - 7:57 pm | शि बि आय

कूलर पेक्षा एसी नक्कीच बरा... विंडो पेक्षा हि स्प्लिट चांगला..

खटपट्या's picture

6 Apr 2015 - 7:57 am | खटपट्या

शतक पुर्ण केल्याबद्दल गार पाण्याचा माठ देउन सत्कार करणेत येत आहे.

--आखिल भारतिय मिपा चालू होण्याची वाट पहणारे मंडळ

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Apr 2015 - 7:58 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

साधा आहे का नक्षीदार आहे? =))

नाखु's picture

6 Apr 2015 - 2:48 pm | नाखु

नक्षीदार पण गारगार आहे !!!!

कपिलमुनी's picture

8 Apr 2015 - 4:11 pm | कपिलमुनी

पूर्वी माई आणि नानाच्या काळात महाब़ळेश्वरला अशा रिक्षा असायच्या .

श्रीरंग_जोशी's picture

8 Apr 2015 - 8:45 pm | श्रीरंग_जोशी

पूर्वी माईसाहेब आणि नानासाहेबांच्या काळात महाब़ळेश्वरला अशा रिक्षा असायच्या.

आपल्या वयाचे आहेत का ते? :-)

आपल्या वयाचे आहेत का ते?

खरंच की!! माई म्हणजे ब्रह्मदेवापेक्षा दीड दिवस लहान आणि नाना माईंपेक्षा अगदी दोन घटका मोठे... असं असतानाही एकेरी उल्लेख करतात म्हणजे हद्द झाली. द्रौपदीच्या लग्नात माईच गेल्या होत्या करवली म्हणून!! ;)

टवाळ कार्टा's picture

8 Apr 2015 - 9:46 pm | टवाळ कार्टा

कहर आहेस बाबा =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Apr 2015 - 9:49 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मी तर ऐकलय की ब्रम्हदेवाच्या मुंजीत नाना-माईंचं मेहुण जेवलेलं म्हणुन. खरं खोटं नाना जाणोत.

श्रीरंग_जोशी's picture

8 Apr 2015 - 9:53 pm | श्रीरंग_जोशी

अन सीताहरणाच्या वेळी सुवर्णमुंग सोन्याचा आहे की बेन्टेक्सचा हे बघायला नानासाहेब पुढे सरसावणारच एवढ्यात लक्ष्मणाने घात केला अन नानासाहेबांना हात चोळत बसावं लागलं...

नाखु's picture

10 Apr 2015 - 10:25 am | नाखु

अन नानासाहेबांना हात चोळत बसावं लागलं...

यात स्वतःचा असा शब्द टंकायला विसरलात काय ??
बाकी एकेरी उल्लेखाबद्दल तीव्र निशेध?

टवाळ कार्टा's picture

10 Apr 2015 - 10:52 am | टवाळ कार्टा

हात तरी आहे ना =))

त्याचं काये, द्रौपदीच्या नातीच्या मोठ्या मुलीच्या नातीच्या मुलीच्या लग्नात पंगतीत जेवताना माई त्यांच्या तत्कालीन मैत्रिणीला सांगत होत्या, "अगो, हरिण पाह्यला आणि आमचे 'हे' गेले हुशारी दाखवायला, म्हटलं नेहमीसारखे माती खातील आता परत; म्हणून मग मीच लक्ष्मणाला पिन मारुन पाठवला. नाहीतर "ह्यांचं" हसं झालं असतं, नेहमीसारखंच!! मनचं का सांगत्ये मी!!"

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Apr 2015 - 2:46 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आयडीचं नाव सार्थ केलचं पाहिजे का अगदी नेहेमी ;)

श्रीरंग_जोशी's picture

10 Apr 2015 - 5:34 pm | श्रीरंग_जोशी

आता एवढे नाट्य झाल्यावर एक गीत अन संधीसाधू नृत्य पण हवे...

हात लावणार मुंगाला,
पिन मारली लक्ष्मणाला...

टन टन टन...

अत्रुप्त आत्मा's picture

10 Apr 2015 - 5:46 pm | अत्रुप्त आत्मा

@सुवर्णमुंग सोन्याचा आहे की बेन्टेक्सचा हे बघायला नानासाहेब पुढे सरसावणारच एवढ्यात लक्ष्मणाने घात केला अन नानासाहेबांना हात चोळत बसावं लागलं... >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing002.gif ह्याचाच वचपा काढायला नंतर नानांनी आयोध्येत बाजारपेठेत सुवर्णमृगकांचन छाप चोळी वस्त्रभांडार नावाचं दुकान चालवलं...असं उर्मिला बिभिषण भावजींच्या बायडीला सांगत होती.. असे म्हणतात! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif

श्रीरंग_जोशी's picture

10 Apr 2015 - 7:10 pm | श्रीरंग_जोशी

ओह म्य गोद थिस इस तू मुच =)) .

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Apr 2015 - 7:19 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ओह म्य गोद. अफ्तेर रेअदिन्ग योउर चोम्मेन्त इ चोउद्न्त चोन्त्रोल म्य लौघ्तेर.

योउ पेओप्ले अरे व्रितिन्ग वेर्य फुन्न्य!! =))))

श्रीरंग_जोशी's picture

10 Apr 2015 - 7:46 pm | श्रीरंग_जोशी

अल्ल च्रेदित गोएस तो पूजा अलिअस जेनी... :-)

षे इस थे पिओनीर फोर थिस लन्गुअगे ओन मिपा.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Apr 2015 - 7:50 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

जेनेज मोथर इन लव विल्ल बे अन्ग्र्य रेअदिन्ग थिस जुस्त सो योउ क्नोव

श्रीरंग_जोशी's picture

10 Apr 2015 - 7:55 pm | श्रीरंग_जोशी

दोएस्न'त मत्तेर. व्हो चरेस अन्य्वय. =))

व्हो इस हेर मोथेर इन लव? अन्द होव इ दोन्त क्नोव थत? ;)

श्रीरंग_जोशी's picture

10 Apr 2015 - 8:07 pm | श्रीरंग_जोशी

प्लेअसे इन्च्रेअसे योउर स्तुद्य...

पैसा's picture

21 Apr 2015 - 8:43 pm | पैसा

http://www.misalpav.com/node/1610 हा अजरामर धागा आठवला!

श्रीरंग_जोशी's picture

21 Apr 2015 - 8:45 pm | श्रीरंग_जोशी

जरा उशिराच आठवला :-)

http://www.misalpav.com/comment/681556#comment-681556

पैसा's picture

21 Apr 2015 - 8:49 pm | पैसा

श्रीरंगा, मी सध्या मिपा मिपा खेळण्याऐवजी गावाला जास्त दिवस होते, त्यामुळे सगळे धागे आणि प्रतिक्रिया वाचल्या नव्हत्या! तरी म्हटलं हा धागा कोणाला आठवला नव्हता का!

श्रीरंग_जोशी's picture

21 Apr 2015 - 8:58 pm | श्रीरंग_जोशी

गावाकडे राहून पुण्यातल्या उकाड्याची झळ लागली नसणार :-) .

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Apr 2015 - 9:57 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

काजुच्या बागेत उन लागत नै असं ऐकुन आहे ;)...

(ओल्या काजु उसळीचा प्रेमी) कॅजॅस्पॅ (रेसिपी टाका राव कोणीतरी)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Apr 2015 - 10:01 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

२००.

धाग्याचे २०० झाल्याबद्दलं बाप्पु आणि सर्व प्रतिसादकर्त्यांना डर्मी कुलचे १०० ग्रॅमचे डबे, एक एक पेप्सीकोला आणि ओरिगामीचा पंखा देउन सत्कार करणेत येतं आहे.

(अखिल मिपा मापंकाढे समिती तसेचं धागाहितवर्धिनी संघ ह्यांच्या संयुक्त वर्गणीमधुन)

*वरचे उपाय ऐकुनही उकाड्याचा त्रास होत असेल तर व्यनि करावा, खात्रीशिर विलाज केला जाईल*

(कुलर्हित)

पैसा's picture

24 Apr 2015 - 9:22 am | पैसा

बाप्पूंनी काय केलं म्हैत नै, पण मी परवा दीड टनाचा Lloyd चा एसी घेतला. प्रतिक्रियांसाठी डॉ. खरेंना धन्यवाद!

सुबोध खरे's picture

24 Apr 2015 - 11:35 am | सुबोध खरे

पैसा ताई
स्प्लिट ए सी घेतला हे उत्तम आता विजेचे बिल वाचवायला एक साधा उपाय करा ए सी बरोबर छताचा पंख १ वर लावा म्हणजे थंड हवेच्या झुळूकीचा अनुभव येतो आणि ए सी चे तापमान २७ " सेल्सियस ठेवले तरी चालते. (विंड चिल इफेक्ट http://en.wikipedia.org/wiki/Wind_chill ) http://www.hko.gov.hk/education/edu01met/wxphe/ele_windchill_e.htm
ए सी चे तापमान जितके कमी ठेवाल तितके विजेचे बिल जास्त येते.(पहा न्यूटन चा थंडाव्याचा नियम)
दर महिन्याला ए सी चा फिल्टर एकदा साफ करा. सहा महिन्यांनी बाहेरच्या पंख्याच्या जाळीची पाणी मारून सफाई करा. आपला ए सी वर्षानुवर्षे कमी वीज खाऊन आपल्याला थंडावा देत राहील.
माझ्या घरी २ एसी दिवसात ८ तास चालवून आजतागायत विजेचे बिल ४००० च्या वर गेलेले नाही.

पैसा's picture

24 Apr 2015 - 12:12 pm | पैसा

हे पॉइंट्स लक्षात ठेवीन. आणि वापरेन. गेल्या २ दिवसांत मुलंच काय आमचा बोका सुद्धा बेडरूममधून बाहेर यायला तयार नाही. :D

रुस्तम's picture

7 Feb 2017 - 5:28 pm | रुस्तम

Lloyd चा AC घ्यायचा विचार सुरु आहे. पैसाताई तुमचा आता पर्यंत चा Lloyd बद्दल अनुभव कसा आहे?

रॉजरमूर's picture

8 May 2015 - 2:50 am | रॉजरमूर

पैसा ताई दीड टनाचा lloyd ए सी घेतल्याबद्दल आपले "दीडवार " अभिनंदन …!

पण एक सांगा "बोका" म्हणजे मुलांच्या पपांचे nickname उर्फ कोडवर्ड तर नाही ना ?

h

अत्रुप्त आत्मा's picture

8 May 2015 - 7:16 am | अत्रुप्त आत्मा

=)))))))

पैसा's picture

8 May 2015 - 7:41 am | पैसा

खर्‍या बोक्यासाठी एसी लावून ठेवीन. पण मुलांच्या बाबाला तिथून बाहेर काढण्यासाठी निर्दयपणे एसी बंद करण्यात येईल. =)) =))