नमस्कार मंडळी,
थोड्या दिवसांपूर्वी (बहुतेक मोदक) यांनी बॅंक आणि इतर वित्तीस संस्था, आर्थिक फसवणूका अशा संदर्भात धागा काढला होता. सध्या मी पण अशीच एक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतोय. वित्तीय व्यवहारांची जास्त खोलात माहिती नसल्याने आणि सध्या स्वतः भारतात नसण्याने मर्यादा येत आहेत तेव्हा जाणकारांच्याकडून मदतीची अपेक्षा.
तर घडले ते असे,
1.गेल्या वर्षी एप्रिलमध्ये, माझ्या वडिलांनी विसासाठी युके विसा ऑफिसला अर्जासाठी केलेले transaction बरोबर होते (online bank transfer), आणि ते रद्द करून रिफंड मागितला. विसा ऑफिसनेही तो मान्य केला आणि रिफंड पाठवला आहे म्हणून मेल पाठवला.
2.त्यानंतर बँकेत पैसे आले नाहीत म्हणून विसा ऑफिसला संपर्क केल्यावर त्यांनी ARN (Acquirer's Reference Number) नंबर दिला आणि बँकेला ट्रेस करायला सांगा म्हणून सांगितले.
3.बँक (एसबीआय) म्हणे त्यांना ARN नंबर काय आहे तेच माहीत नाही (गूगलून मिळालेली माहिती खाली लिहितो), तर विसा ऑफिस म्हणे आम्ही यापेक्षा जास्त काही देऊ शकत नाही. असा आठएक महिने बँक आणि विसा ऑफिस यांच्यामध्ये टोलवाटोलवीचा खेळ सुरू होता ( मध्ये आम्ही दोन्हीकडे इमेलवर! ).
4.विसा ऑफिसने 'worldpay' म्हणून एक पेमेंट गेट्वे सर्विस वापरली आहे. अर्थात मी त्याना काही विचारु शकत नाही कारण माझा त्यांच्याशी("worldpay") थेट व्यवहार झालेला नाही. त्यांनी ('worldpay' ने) विसा ऑफिसला 'refunded' म्हणून स्टेटस पाठवले आहे जे की त्यांनी आम्हाला पाठवले आहे. पण ते विवरण 'पैसे पोचले' एवढेच सांगतेय (आणि त्याव्यतिरिक्त काहीही कन्फर्म करत नाही). या "worldpay" च्या या (पीडीएफ आहे) संस्थळानुसार "पैसे पोचले" म्हणजे ज्या (क्रेडिट्/डेबिट) कार्डवरून पैसे आले त्या कार्डला परत पोचले.
5.आता बँकच्या खात्यावर पैसे आलेले नाहीत म्हणून बँकेच्या मागे लागल्यावर त्यांनी मुंबई तसेच कोलकाता ऑफिसेस ना संपर्क करायला सांगितला, त्यांच्या मुम्बई तसेच कोलकाता ऑफिसपर्यंत इमेल केला पण त्यांचे म्हणणे "पैसे आमच्याकडे आलेले नाहीत तर आम्ही काय सांगणार".
6.त्यानंतर विसा ऑफिसच्या युके हेड-ऑफिसला संपर्क केला, त्यांनी चौकशी करतो म्हणून सांगितले पण शेवटी २० दिवसांनतर त्यांनीही पैसे आमच्याकडून तुमच्या ज्या कार्डवरुन आलेत त्या कार्डवर परत पाठवलेत आणि यापेक्षा आम्ही जास्त काही चौकशी करु शकत नाही म्हणून रिप्लाय दिलाय.
7.मध्यंतरी सातार्यातल्या ग्राहक न्यायालयाच्या ऑफिसात जावून चौकशी केल्यास कळाले की आता पूर्वीसारखे ग्राहक मंच नाहीत आणि दावा दिवाणी खटल्यासारखाच असेल आणि सुनावणीसाठी तुम्हाला (पक्षी: माझ्या वडिलांना) न्यायालयात तारखेस यावे लागेल. माझे वडील सातारा शहरापासून दूर आणि वयस्क असल्याने त्यांनी त्या साडे-आठ हजारावर पाणी सोडायचे ठरवले आहे कारण तारखा करणे त्यांना (आणि घरातल्या कोणालाच) शक्य नाही.
पण मला ही फसवणूकीची जाणीव स्वस्थ बसू देत नाही (आणि पांढर्या पैशाचे नक्की काय झाले ही उत्सुकता आहेच) म्हणून मी इमेलवर शक्य तेवढ्या रस्त्यांनी शोधतो आहे.
एकंदरीत एक वर्ष होत आले तरी या प्रकारात पैसे कोठे आहेत, ते कळत नाहीये आणि याचा पाठपुरावा कसा करावा याची जास्त माहीती माझ्या हातात येत नाहीये.
कोणाला काही माहिती असल्यास मदत करावी, धन्यवाद. अधिक व्यक्तिगत माहितीची गरज असेल तर व्यनि केलात तरी चालेल परंतु सगळ्यांना उपयोग म्हणून इथे चर्चा झालेली आवडेल.
माझ्याकडची अजून माहिती :
(या माहितीची लिंक आत्ता माझ्याजवळ नाहीये.)
ARN :
The ARN is an 'Acquirer's Reference Number'. These are used quite a lot, especially when payments are sent by recrediting a card. If you can get hold of the department at your bank which deals with chargebacks or disputed payments, they should be familiar with ARNs and be aware of how to track your payment using one, and confirm exactly which entry in your account is the payment in question.
त्याचबरोबर, एसबीआय बँकच्या कोणाला याबद्दल काहीच माहिती नाही याचे जरा आश्चर्य वाटतेय.
प्रतिक्रिया
11 Mar 2015 - 5:50 pm | श्रीरंग_जोशी
आजवर बरेच वेळा ऑनलाइन व्यवहार रद्द झाल्याने पैसे क्रेडिट खात्यात किंवा बचत खात्यात जमा झाले आहेत. पण असा प्रकार घडला नाही.
मात्र २००७ साली व्हिसा मनी ट्रान्स्फरद्वारे (शुल्क २५ रुपये) एस बी आय क्रेडीट कार्डाचे बिल आयसीआयसीआय बचत खात्याद्वारे ऑनलाइन भरले होते. तीन दिवसात पैसे पोचतील असे लिहिले होते. बचत खात्यातून पैसे लगेच निघाले परंतु एस बी आय क्रेडिट कार्डकडे पोचले नाही. मग पुढचा आठवडाभर दोन्ही बँकांच्या कस्टमर केअरला अनेक फोन करावे लागले.
दर वेळी दोन्हीकडे व्हिसा मनी ट्रान्स्फर हा काय प्रकार आहे ते मलाच समजावून सांगावे लागत असे. बीलाची रक्कमही ३० हजार रुपयांपेक्षा थोडी अधिक होती. लगेच माझ्या खिशातून (पुन्हा) भरायला माझ्याकडे एवढे पैसे नव्हते.
अखेर नवव्या दिवशी पैसे मिळाल्याचे एस बी आय क्रेडीट कार्डवाल्यांनी कळवले. बहुधा त्या नव्या सुविधेचा वापर करून त्यांचे बिल भरणारा मी पहिलाच ग्राहक होतो अन कदाचित आयसीआयसीआय खात्यातून या सुविधेचा वापर करणारा सुद्धा.
वर्ल्डपे कस्टमर केअरला संपर्क केला का?
11 Mar 2015 - 7:12 pm | अस्वस्थामा
आम्हाला पण सांगा हे काय आहे. जरी इथे थेट संबंध नसेल तरीही काही माहिती मिळेल.
त्यांनी हात वर केलेत. ते म्हणे आम्ही विसा ऑफिसला सगळी माहिती दिलीय आणि पैसे आमच्याकडे नाहीत. आता परत कॉल करून दुसरा माणूस भेटला आणि त्याने अजूनच काही सांगितले तर पाहीन पण त्यांच्याकडून जास्त आशा नाहीये.
11 Mar 2015 - 7:42 pm | श्रीरंग_जोशी
संदर्भासाठी मी नेहमी दुवे देतो. नेमके इथे देणे राहून गेले.
व्हिसा मनी ट्रान्स्फर
सात आठ वर्षांपूर्वी ज्यांना कॅश अथवा चेक द्वारे क्रेडीट कार्ड बिल भरायचे नाही अन क्रेडिट कार्ड कंपनीशी संलग्न बँकेत ज्यांचे बचत खाते नाही त्यांच्यासाठी ही चांगली सुविधा होती. व्हिसा कंपनी जी क्रेडिट कार्ड बनवते अन बॅकग्राउंडमध्ये ट्रान्झॅक्श्न प्रोसेसिंग करते त्यांची ही सशुल्क सुविधा होती.
आज याची फारशी गरज उरली नाही कारण बिलडेस्क सारख्ये स्वस्त अन वेगवान पर्याय उपलब्ध आहेत.
तुमच्या या प्रकरणामध्ये एरर तुमच्या बँकेकडून झाले असण्याची शक्यता सर्वाधिक आहे.
11 Mar 2015 - 7:27 pm | नगरीनिरंजन
यात काहीतरी मोठा घोटाळा असू शकतो. विशेषतः एसबीआयच्या बाजूला. नक्की पाठपुरावा करा. आधी बँकेकडे अधिकृत तक्रार करा.
वाटल्यास बँकिंग ओम्बुड्समनकडे तक्रार करा.
http://www.rbi.org.in/commonman/English/scripts/againstbank.aspx
11 Mar 2015 - 8:18 pm | हाडक्या
एक शंका आहे न.नि., हे ओंबुडसमन (की शेंबुडसमन) काय काय कवर करतात. म्हणजे इथे नक्की चूक कोणाची आहे, पैसे कुठे आहेत हेच स्पष्ट नसेल तर ते काय करणार ? जावून शोधणार ? अजून एक म्हणजे बँका आणि त्यांच्या कार्ड सर्विसेस वेगळ्या असतात काय ? मग ते पण ओंबुडसमनच्या अधिकारक्षेत्रात येतात का ?
11 Mar 2015 - 8:25 pm | श्रीरंग_जोशी
जेवढे मी ऐकले आहे सर्वसामान्य बँकीग ग्राहकांना न्याय मिळवण्यासाठी Banking Ombudsman Scheme हा उपयुक्त पर्याय आहे.
धाग्यात लिहिलेले प्रकरण Ombudsman च्या कार्यक्षेत्रात येईल असा अंदाज आहे.
12 Mar 2015 - 3:56 am | अस्वस्थामा
ओम्बुडसमन ला संपर्क करुन पाहतो. पण त्याचबरोबर इतर मार्ग पण चेक करतोय.
12 Mar 2015 - 4:10 am | नगरीनिरंजन
पैसे क्रेडिट कार्डने भरले असतील तर ते परत केले गेल्यावर क्रेडिट कार्डच्या स्टेटमेंटमध्ये उणे खर्च म्हणून दिसले पाहिजेत.
पण डेबिट कार्डने पैसे भरले असतील तर ते परत केले गेल्यावर खात्यात जमा झाले पाहिजेत. याठिकाणी पैसे डेबिट कार्डाने दिलेत असे वाटतेय वर्णनावरुन.
12 Mar 2015 - 4:32 am | अस्वस्थामा
हो, डेबिट कार्डवरुनच दिले होते म्हणूनच जो कार्ड सर्विसेसचा मुद्दा सांगत आहेत तो पटत नाही. मग आता माहिती घेतोय.
11 Mar 2015 - 8:30 pm | रामपुरी
वर्ल्डपे जर पैसे पाठविले म्हणत असेल तर बँकेने ते कदाचित चुकिच्या खात्यावर जमा केले असण्याची शक्यता आहे. बँकेने नक्की कुठल्या खात्यावर जमा केले याची माहीती काढता येत आसेल तर पहा
12 Mar 2015 - 4:03 am | अस्वस्थामा
कसे चेक करणार ? बँक म्हणे पैसे आलेले नाहीत. आणि वल्डपे म्हणे पैसे पोचलेत (त्यांचा थेट संपर्क नाही पण त्यांनी दिलेली पोचपावती आहे त्यानुसार तरी बरोबर वाटतंय). मधला मार्ग कसा ट्रेस करावा हेच कळत नाहीये.
11 Mar 2015 - 9:52 pm | NiluMP
CNBC आवाज वरील पहरेदार च्या टीमला तुमचा problem mail करा.
12 Mar 2015 - 3:11 am | स्नेहानिकेत
तुम्ही एस.बी.आय. च्या ब्रांच मध्ये लेखी तक्रार केली आहे का ? तुमचे ट्रानजॅकश्न डिटेल्स (from your account to visa office) तसेच रिफंड डिटेल्स मला व्य.नी. करू शकाल का ? I will try to find out the solution.
12 Mar 2015 - 9:12 am | मास्टरमाईन्ड
खाली एक लिंक आहे. त्यात SBI च्या बर्याच अधिकार्यांचे ईमेल आणि फोन नंबर्स आहेत.
तुमची केस सुरुवातीपासून आत्तापर्यंत व्यवस्थित लिहून काढा, including all possible dates of follow up and replied you got from SBI authorities.
हे मात्र खरंय. काही माणसाळलेले आणी कर्तव्यदक्ष कर्मचारी सोडले तर उरलेले सगळे फुक्कट पगार घेणारे XXXX आहेत राष्ट्रीयीकृत बँकांमधे. माझे विविध बँकांमधले अनुभव आहेत.
आणी त्यांच्या higher authority ला ईमेल करा.
माझा आजपर्यंतचा असा अनुभव आहे की "वरून" बांबू बसला की खालचे बरोब्बर लायकीत येतात.
Smt. Anuradha Rao
Chief General Manager
(Personal Banking)
National Banking Group,
Mumbai
(022) 2202 2369
cgm.pb@sbi.co.in
Chief General Manager
(Chief Technology Officer)
(022) 27564148
cgm.cto@sbi.co.in
https://www.sbi.co.in/portal/web/Contact%20Us/corporate-centre
9 Jun 2015 - 2:26 am | अस्वस्थामा
धन्यवाद मित्र हो.. अखेर एका वर्षानंतर का होईना पण पैसे मिळाले.. कसे ते सांगायला लिहितोय पण तर्पूर्वी मदत करण्याचा प्रयत्न केलेल्या सर्वांचे आभार. काही SBI बॅंकेचे कर्मचारी मिपाकर आहेत त्यांनी देखील मदतीचा हात पुढे केला त्यांचेपण आभार.
तर, प्रथम नवीनच लक्षात आलेली बाब म्हणजे प्रत्येक बँकची बँक व्यवस्था आणि कार्ड व्यवस्थापन व्यवस्था हे स्वतंत्र असतात. जेव्हा कोणत्याही कार्डने ट्रांसॅक्शन करतो तेव्हा तो व्यवहार कार्ड व्यवस्थेकडे जातो आणि तिथून बाह्य व्यवस्था जसे की विसा/ मास्टरकार्ड इत्यादि त्यांच्याकडे जातो. तिथून याच पद्धतीने उतरत्या क्रमाने पैसे पोचतात.
(हे मला इकडे तिकडे वाचून कळालेले तेवढे लिहिलेय, बँक व्यवहाराची तंत्रशुद्ध माहीती माझ्याकडे नाही आणि या तपशीलात थोडीफार गडबड असूही शकेल. )
आता आमचे पैसे तिकडून निघालेत असे उके ऑफिसवाले त्यांचे स्टेटमेंट दाखवून सांगत होते.
मग असेच गुगलताना चार्जबॅक बद्दल कळाले. अजून वाचल्यावर आपली समस्या कुठेतरी अशीच आहे हे जाणवलं. एसबीआयच्या कार्ड व्यवस्थेबाबत ब्रांच अथवा कोणत्याही हेड ऑफिसने देखील सांगितले नव्हते परंतु गुगलल्यास https://www.sbicard.com/ ही साईट आणि अशा प्रकारच्या समस्यांमध्ये मदत हवी असेल तर chargeback@sbicard.com हा इमेल पत्ता मिळाला.
त्यांच्या बरोबर संपर्क झाल्यावर contactcentre@sbi.co.in या इथून थोडक्यात माहीती मागवली गेली आणि १५ दिवसात काहीही न सांगता (बघतो/ पैसे पाठवलेत वगैरे काय नाय) डायरेक खात्यावर सगळे पैसे आले.
इत्यलम...!!
लक्षात आलेल्या गोष्टी म्हणजे,
१. एकाही ब्रांचधल्या मॅनेजर अथवा हेड ऑफिसमधल्या इमेलला उत्तर देणार्या जबाबदार अधिकार्यांना कार्ड सर्विस अथवा त्या संदर्भातली एकही गोष्ट माहित नव्हती. जेव्हा कार्ड सर्विसला संपर्क झाला तेव्हाच बर्याच गोष्टी पुढे सरकल्या.
२. ग्राहक न्यायालय हा एक विनोद आहे. "जागो ग्राहक जागो" हीच एक फसवणूक वाटली.
ही मिळालेली ताजी माहिती कोणी खोटी/चूक असल्याचे दाखवून देऊ शकल्यास आनंदच होईल.
असो, सर्वांचे धन्यवाद..!! :)
9 Jun 2015 - 2:33 am | श्रीरंग_जोशी
पैसे परत मिळाल्याबद्दल अभिनंदन.
इथे तपशीलवारपणे माहिती लिहिल्याबद्दल आभार. बरेचदा लोक माहितीरुपी मदत मागायला येतात पण प्रत्यक्ष काम यशस्वी झाल्यावर तसे लिहायला येत नाहीत :-( .
मी वर लिहिलेला अनुभव याच प्रकारचाच होता. दोन्ही बँकामधले कस्टमर केअरवाले अन प्रत्यक्ष कर्मचारी तांत्रिकदृष्ट्या व्हिसा मनी ट्रान्स्फर कसे काम करते याबाबत अनभिज्ञ होते.
काही बँका कर्मचार्यांना या गोष्टींची माहिती देतात पण ती माहिती अभ्यासली जाते की नाही याबाबत काळजी करत नाही. ही बाब माझ्या वर उल्लेखलेल्या समस्येच्या वेळी बँक अधिकार्याकडून कळले होती.
9 Jun 2015 - 8:00 am | अजया
पैसे परत मिळाल्याबद्दल अभिनंदन!आणि बाकीच्या माहितीबद्दल आभार पण!वाखु साठवते आहे.न जाणो कधी वेळ आली तर माहिती उपयोगी पडॆल.
24 Jun 2015 - 4:00 pm | एस
अभिनंदन, धन्यवाद आणि वाचनखूण साठवली आहे.
24 Jun 2015 - 2:20 pm | अस्वस्थामा
सर्वांचे धन्यवाद..! :)
24 Jun 2015 - 2:32 pm | मनिष
चला, तुमचे पैसे परत मिळाले त्याबद्द्ल अभिनंदन! :-)