अनरीयल इस्टेट

पॉइंट ब्लँक's picture
पॉइंट ब्लँक in काथ्याकूट
9 Mar 2015 - 9:39 pm
गाभा: 

डिस्क्लेमर : इकोनोमिक्स आणि फायनान्सशी क्षेत्रातील कोणतीहि पदवी लेखकाकडे नाहि. काहि चूक झालि असेल तर दुरुस्ती सुचवावी.

मी एक आकडेमोड केली आहे. बेंगलोरच्या जागेची किंमत ठरवण्यासठी.
आकडेमोड सोपी जावी म्हणून थोडे अ‍ॅप्रोक्झिमेशन केले आहे.
क्षेत्रफळ = ७४१ स्केवर किमी = ७४१ *१०००*१००० स्केअर मी. = ७४१*१०००*१०००*१० स्केवर फूट.
हा जुना नंबर असावा. बीडीए वाले १२९१ सांगतात. http://www.bdabangalore.org/townplanning.html. असो आपण जुनाच नंबर वापरू.
जागेची सरासरी किंमत = ५००० रू/स्केवर फूट (ही यशवंतपूर मध्ये आहे. बाकि़कडे अजून जास्त असेल.)
डॉलरची किमत = ६० रुपये ( सध्या ६२ आहे.)
बेंगलोरची किंमत = ६१७.५ बिलियन डॉलर .

भरतातील इतर महानगरे जवळ्पास इतकिच किंवा ह्यापेक्षा मोठि आहेत. उदा दिल्ली दुप्पट मोठी आहे. मुंबई अजून किति पट महाग आहे देव जाणे.
तर महत्त्वाचा मुद्दा असा : जर ह्या सगळ्या शहरांच्या जागेची किंमत केली तर ती भारताच्या जीडीपी किंवा पीपीपी( ६००० बिलीयन डॉलर) पेक्षा किती तरी पटीने जास्त आहे.
एव्हढी जागा विकत घेण्याइतका पैसा देशात नाहि असा ह्याचा अर्थ होतो का?. वर जीडीपी शी केलेली तुलना बरोबर आहे का?
अर्थात एवढी सगळी जागा बाजरात एकाच वेळी विक्रिला येणार नाहि. पण रीयल इस्टेट ही सुरक्षित गुंतवणूक आहे का? किंवा कर्ज काढून घर घेने हे बरोबर आहे का?

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

9 Mar 2015 - 10:01 pm | आदूबाळ

?

हे गणितच गैरलागू आहे, कारण यात डिमांड-सप्लायचा नियम विचारात घेतलेला नाही. यावरून रियल इस्टेट ही सुरक्षित गुंतवणूक आहे की नाही हे कसं ठरवणार?

अर्थात एवढी सगळी जागा बाजरात एकाच वेळी विक्रिला येणार नाहि.

हे सर्वात महत्त्वाचं वाक्य आहे.

पॉइंट ब्लँक's picture

9 Mar 2015 - 10:15 pm | पॉइंट ब्लँक

हो सांगायचा राहून गेल. एक वर्षाहूनची अधिक इन्वेंटरी शिल्लक आहे बर्याच शहारांमध्ये. त्यामुळे, सप्लाय कमी आहे अस म्हणता येणार नाहि.

खंडेराव's picture

10 Mar 2015 - 11:48 am | खंडेराव

घर घेतले पुण्यात, आता EMI साठी नोकरी बदलुन बाहेर पळावे लागले :-(

पॉइंट ब्लँक's picture

12 Mar 2015 - 7:20 am | पॉइंट ब्लँक

हे बर्याच जणांच्या बाबतीत पाहिल आहे.

चौकटराजा's picture

11 Mar 2015 - 5:05 am | चौकटराजा

स्थूलमानाने रिअल इस्टेट मधील गुंतवणूक की सर्वात फायदेशीर हे खरे पण " नो इन्वेस्टमेंट इज गूड फॉर एव्हर ! " हे अर्थ शास्त्रातील मूल वचन आहे. जगाची लोकसंख्या वाढते आहे पण तो वाढण्याचा दर कमी होत जाईल हे नक्की. त्या मानाने बहुमजली इमारतींचे प्रमाण वाढत राहील. सबब अशी एक वेळ येउ शकते ज्यावेळी घरांचा पुरवठा जास्त पण मागणी कमी .अशावेळी रिअल इस्टेट मधून मोठा फायदा मिळविण्याचे स्वप्न भंग पावू शकते. हे पटण्यासाठी एक उदाहरण देतो. १९७० च्या आसपास रिक्षाचा धंदा जोरात होता. आता दुचाकीचा पर्याय सुलभ झाल्याने रिक्षा थांव्यांवर वीस वीस रिक्षा चालक प्रवाशाची वाट पहात असतात. एक दिवस असा येईल की रिक्षात बसणारा माणूस केवळ अतिवृद्ध असेल. सार्वजनिक वहातुक स्वस्त व जलद उपलब्ध झाल्यास दुचाकी कारखान्याना कारभार गुंडाळावा लागेल.पेट्रोलच्या टंचाईने मानवाचा गळा आवळावयास सुरूवात केल्यावर दुचाकी व चारचाकी उत्पादकानाही गाशा गुंडाळावा लागेल.हे लगेच घडणार नाही पण ते अटळ आहे.

पॉइंट ब्लँक's picture

12 Mar 2015 - 7:22 am | पॉइंट ब्लँक

आणि हे करेक्शन जितके लवकर होईल तितके चांगले आहे. नाहीतर फार मोठे आर्थिक नुकसान होईल -विषेशतः कर्ज देणार्या बँकांचे.

पिवळा डांबिस's picture

12 Mar 2015 - 9:17 am | पिवळा डांबिस

" नो इन्वेस्टमेंट इज गूड फॉर एव्हर ! "
सहमत.

नगरीनिरंजन's picture

11 Mar 2015 - 9:21 am | नगरीनिरंजन

वरील सर्व प्रतिसादांशी सहमत पण 'द ओन्ली रियल इस्टेट इज युवर बॉडी'.

पॉइंट ब्लँक's picture

12 Mar 2015 - 7:26 am | पॉइंट ब्लँक

क्या बात है. सॉलिड लॉजिक.

पिवळा डांबिस's picture

12 Mar 2015 - 9:27 am | पिवळा डांबिस

एव्हढी जागा विकत घेण्याइतका पैसा देशात नाहि असा ह्याचा अर्थ होतो का?. वर जीडीपी शी केलेली तुलना बरोबर आहे का?

नाही. नाही.

पण रीयल इस्टेट ही सुरक्षित गुंतवणूक आहे का?

होय/ नाही. इट डिपेंडस....

किंवा कर्ज काढून घर घेने हे बरोबर आहे का?

खरं तर नाही. पण पहिले घर असल्यास कधीकधी माणसाला पर्याय नसतो.
दुसरे घर असल्यास त्याचा काय उपयोग केला आहे (रेन्ट वा व्हेकेशन हाऊस)यावर अवलंबून...
:)
तुम्हाला नक्की काय करायचंय हे सांगितलंत तर अजून पुढे बोलता येईल.