गोवंशहत्या बंदी

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in काथ्याकूट
3 Mar 2015 - 6:21 pm
गाभा: 

अलीकडच्या काळातील एक मैलाचा दगड ठरावा असा कायदा ...

एकीकडे गाय हि माता तिचे पावित्र्य ..आयुर्वेदिक महत्व ...

दुसरीकडे 'गाय हा पशू ..देव नव्हे' हे आमच्या आदरणीय स्वातंत्र्यवीर सावरकरांची स्पष्टोक्ती ...

तिसरीकडे ते वेन्दांचे दाखले "अनुस्तरणी कर्म ...चर्मण्वती शब्दाची व्युत्पत्ती"

चौथीकडे अन्य धर्मातील त्याज्ज्य प्राणी खाण्याब्द्दल्ची कठोर आचारसंहिता ..

त्यातून शाकाहार मांसाहार वाद ... मुळासकट उपटून खाल्लेल्या भाज्या वगैरे हि सुद्धा हत्त्याच असे मानणारा एक गट ...

आणखीन कुणी म्हणतो "फलाहार हाच काय तो माणसाला शक्य असलेला नैसर्गिक आहार ..कारण फळे माणूस कसलेही कृत्रिम प्रोसेसिंग न करता करू शकतो

...विचार करकरून एक शीण येतो :D

प्रतिक्रिया

बॅटमॅन's picture

4 Mar 2015 - 3:29 pm | बॅटमॅन

खी खी खी =)) =)) =))

>>ब्रह्मदेवाच्या एका दिवसाएवढी शिक्षा द्या, बास झालं. किती वेळ डांबून ठेवायचं त्यांना, नै का?

अगदी!! गायीत देव असतात असं 'म्हणतात'. पण मत्स्य हा तर साक्षात विष्णूचा अवतार, त्यामुळे त्याच्या वधासाठी शक्य तितकी अधिक शिक्षा केली जावी.

बॅटमॅन's picture

4 Mar 2015 - 3:31 pm | बॅटमॅन

याकरिता मत्स्यावतारास जर जलसमाधी देऊन खाल्ले गेले तर दोष नसावा. ;)

किंवा खाण्याआधी सिद्ध करावे की हा प्रकार विष्णूच्या अवतारांपैकी नाही.

समुद्राच्या पाण्यातले मासे हे विष्णूच्या अवतारांपैकी नसून घाटावरले नदीच्या पाण्यातले मासे हे विष्णूच्या अवतारांपैकी असल्याचं 'केतकी पिवळी पडली' मध्ये वाचल्याचं आठवतंय.

अत्रन्गि पाउस's picture

4 Mar 2015 - 3:38 pm | अत्रन्गि पाउस

मध्ये पण असेच म्हटले आहे नं

त्यातली प्रकरणे थोडी विस्तृत आहेत. त्यामुळे विशेष लक्षात नाही.

बॅटमॅन's picture

4 Mar 2015 - 3:39 pm | बॅटमॅन

त्यातही कुठल्यातरी विशिष्ट नदीच्या पाण्यातलेच मासे होते असंही कुडचेडकर म्हणतात. (ख्यातनाम)

hitesh's picture

4 Mar 2015 - 6:03 pm | hitesh

मासा उलटा टांगुन मिर्चीची धुरी दिल्यास छान लागतो.

गटण्याचे मानसपिता मत्साहारी होते.

बाळ सप्रे's picture

4 Mar 2015 - 3:27 pm | बाळ सप्रे

पण जसे म्हैस, रेडा मारण्यावर बंदी नाही तसंच... पापलेट, कोळंबी वगैरे विशेष प्रकार वगळू शकतो.. मत्स्यावतार या प्रकारतला नव्हता असे सोयीस्कररीत्या गृहीत धरु .. :-)

ओ येक वेळ मोठ्या माशांका बंदी करा ओ तुम्ही. तेंका काय चव असता? श्या! मिपाच्या भाषेत व** मेले!
बारक्या आणि काटेरी माशांची चव जर तुमका म्हायत नसात तर कसले तुम्ही माशेखाव! बंदी खयच्या माशार आणूक व्हयी ह्या पण समाजणा नाय तुमका? काय ह्या? :(

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Mar 2015 - 3:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

इथे सगळ्यांनी किती किती घोर अध्यात्मिक अज्ञान प्रकट केले आहे हे पाहून एक मिपाकर म्हणून... वगैरे वगैरे वाटले. *unknw*

अज्ञानी लोकहो,

मासे म्हणजे पर्यायाने मत्स्यावतार खाणे म्हणजे त्यांना आपल्या पोटात घालणे म्हणजे खाणारा आत्मा आणि खाल्लेला परमात्मा यांचा संगमच नाही काय ? म्हणून तर मासे खाल्ल्यावर स्वर्गसूख लाभते ना ?

श्या, तुमा लोकान्ला ना लईच इस्काटू सांगाय्ला लाग्तयं, ह्यां... *dash1*

ताच तर मी म्हणी होतय, पण आपली घालूचीच असात बंदी तर घाला बापडे मोठ्या माशांर, तेंका इतकी काय चव नाय हो बारक्या माशांइतकी. बंदी घालणारेही खुश रवतीत जरा.. कसां? सगळ्यांच्या मनासारक्या थोडाफार झालां म्हंजे कसां बरां, नाऽऽय?

आमच्या कोकणात कसां, मुख्य देवाची पूजा असताच, पण तेच्या गणांकही अनमस्कार करुचो लागता नाय? तसांच ह्याय थोडाफार.. ;)

बाळ सप्रे's picture

4 Mar 2015 - 4:01 pm | बाळ सप्रे

मासे म्हणजे पर्यायाने मत्स्यावतार खाणे म्हणजे त्यांना आपल्या पोटात घालणे म्हणजे खाणारा आत्मा आणि खाल्लेला परमात्मा यांचा संगमच नाही काय ? म्हणून तर मासे खाल्ल्यावर स्वर्गसूख लाभते ना ?

या वचनामुळे तुमचा भक्त !! काय सॉल्लिड अध्यात्म हाय !!
बोला इस्पिक एक्का महाराज की ssssssss ..

बॅटमॅन's picture

4 Mar 2015 - 4:03 pm | बॅटमॅन

अगदी असेच म्हणतो. अद्वैतमतानुयायांनी तर ही खाद्यभक्ती अंगीकारलीच पाहिजे!

>>पोटात घालणे म्हणजे खाणारा आत्मा आणि खाल्लेला परमात्मा यांचा संगमच नाही काय ?

हो तर, आणि त्या परमात्म्याचा 'वास' जो काही घरात; भांड्यांवर उरतो त्यामुळे सदेह वैकुंठी आल्यासारखं वाटत असेल नै? *acute*

त्यांना आपल्या पोटात घालणे म्हणजे खाणारा आत्मा आणि खाल्लेला परमात्मा यांचा संगमच नाही काय ?

मस्त हो एक्कासाहेब, मग याच न्यायाने तेहतीस कोट देव पण जाउ देत की पोटात.. :))))

जाऊ देत की नाय कोण म्हणतंय!! आम्हाला एक विष्णू पोटात धरवेना, तिथे तेहतीस कोटी देवांची काय कथा!! ;)

हाडक्या's picture

4 Mar 2015 - 8:25 pm | हाडक्या

आम्हाला एक विष्णू पोटात धरवेना

काय सूड घेतो काय ? ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Mar 2015 - 3:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

म्हावरा प्राणी नाहीच मुळ्ळी, ती नदीची / समुद्राची फळे आहेत... तवा चिंता इल्ले :)

यशोधरा's picture

4 Mar 2015 - 3:31 pm | यशोधरा

ब्येश्ट, ब्येश्ट!

कोंबड्यादेखिल कापायला नेताना उलट्या टांगून नेतात - म्हणजे फळंच ती.. चला कोंबड्यापण वाचल्या ..

बकरे इ. देखील कापल्यावर उलटेच टांगून ठेवतात, म्हणजे तीही फळंच. तेही वाचले!

सुचिकांत's picture

4 Mar 2015 - 3:12 pm | सुचिकांत

आवडले

पिंपातला उंदीर's picture

4 Mar 2015 - 3:29 pm | पिंपातला उंदीर

गायीत देव आहेत म्हणून पोथ्या सांगतात, तर वराहावतारी देव डुक्कर झाले होते असेही पोथ्या सांगतात; मग गोरक्षणच का करावे? डुक्कर-रक्षण संघ स्थापन करून डुक्कर- पूजा का प्रचलवू नये?
…. मायासृष्टीत जोवर मनुष्य आहे आणि गाय, बैल पशु आहे, तोवर माणसाने त्याच्याहून सर्व गुणात हीन असलेल्या पशुस देव मानणे म्हणजे मनुष्यास पशुहून नीच मानण्यासारखे आहे.… गाढवाने पाहिजे तर त्याहून श्रेष्ठ पशु असलेल्या गायीस देव मानावे; मनुष्याने तसे मानण्याचा गाढवपणा करू नये. ….
कोणत्याही गोष्टीत ती धर्म आहे असे पोथीत सांगितले आहे म्हणूनच तसे डोळे मिटून मानण्याची पोथीनिष्ठ आंधळी भावना आता झपाट्याने मावळत आहे आणि ती मावळत जावी हेच आता मनुष्याच्या प्रगतीस अत्यंत आवश्यक आहे. …
एकवेळ राष्ट्रात थोडी गोहत्या झाली तरी चालेल पण उभ्या राष्ट्राची बुद्धिहत्या होता कामा नये. यास्तव गाय वा बैल हे पशु आपल्या कृषिप्रधान देशात मनुष्यहितास अत्यंत उपकारक आहेत इतकेच सिद्ध करून आणि त्या पशुचा उपयोग राष्ट्रास ज्या प्रमाणात नि ज्या प्रकारे होईल, त्या प्रमाणात नि त्या प्रकारे पशु म्हणूनच जोपासना करू म्हणाल तरच ते राष्ट्राच्या निर्भेळ हिताचे होईल.
पण त्या हेतूने गाय ही देव आहे कारण पोथीत तिची पूजा करणे हा धर्म आहे " इत्यादी थापा माराल , तर त्यावर जरी राष्ट्राने या पुढेही विश्वास ठेवला नि गोरक्षण थोडेसे अधिक झाले, तरीही त्या पोथीजात प्रवृत्तीला उत्तेजन देण्याचे जे अपकार्य त्यायोगे करावे लागते त्याचे परिणाम राष्ट्राची शतपटीने अधिक हानी करील.
म्हशीला देव मानून म्हशीचे रक्षण केवळ तिच्या आर्थिक लाभासाठीच कोणी करत नाही की , काय? ती अमेरिका पाहा . आज ते राष्ट्र एका अर्थी गोभक्षक असताही गोरक्षणाच्या कामी आमच्याहून शतपट पुढारलेले आहे. . कारण त्या प्रश्नात धार्मिक आंधळेपणाचा गडबडगुंडा न चालू देता, निव्वळ आर्थिक नि वैज्ञानिक द्दृष्टीने ते तो सोडवतात.
(संपादित लेख -- "गाय -- एक उपयुक्त पशु" : वि, दा, सावरकर )

संदीप डांगे's picture

4 Mar 2015 - 4:45 pm | संदीप डांगे

१. हिंदूंच्या नेमक्या कुठल्या धर्मग्रंथात गाय पुजनिय व अभक्षणीय आहे असे सांगितले आहे?

२. महाभारत काळात त्या लक्षावधी गायींचं काय करत होते आर्यलोक?

३. म्हैस हा गायीइतकाच उपयोगी प्राणी असतांना पूजनीय का नाही?

४. मुस्लिम लोक म्हैस खात नाही म्हणून म्हशीबद्दल आदर नाही असे आहे का?

५. नपुंसक गोहत्याविरोध नेमक्या कुठल्याप्रकारे राष्ट्रसेवा सिद्ध होतो?

६. वृद्ध आई-वडीलांना, वृद्ध विधवांना रस्त्यावर सोडून देणार्‍या लोकांविरोधात कधी हिंदूपरंपराभिमानी एवढीच कठोर आणि जाज्वल्य भुमिका घेऊन कायदा करवून घेऊन त्याची अंमलबजावणी जातीने लक्ष घालून करून घेणार आहेत?

७. लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवरून देशभक्ती, देशाभिमान ह्या गोष्टी केंव्हापासून ठरवल्या जाऊ लागल्यात या देशात?

८. मी काय खातो ह्यावरून मी या देशात राहायचे की नाही हे मला सांगणारे कोण हे टिकोजीराव?

९. तर याप्रकारे इतर देश त्यांची धार्मिक बंधने लादतात, म्हणून आम्हीपण लादू म्हणणार्‍यांचा स्क्रू ढिला आहे का?

१०. शेवटचा प्रश्नः असे जातीय अहंकार सुखावणारे कायदे बनवत बसायला सरकारकडे बराच वेळ शिल्लक दिसतो, तो जरा गंगेत अर्धवट जळलेली प्रेते सोडून देणार्‍यांविरोधात कायदा बनवण्यासाठी का नाही वापरत?

तुषार काळभोर's picture

4 Mar 2015 - 5:20 pm | तुषार काळभोर

(ह घ्या)
असं डायरेक्ट धोतराला हात घालू नै.. ;)

संदीप डांगे's picture

4 Mar 2015 - 9:06 pm | संदीप डांगे

हम आगेसे खयाल रकेंगे....

तुषार काळभोर's picture

5 Mar 2015 - 10:19 am | तुषार काळभोर

ख्याल..ठुमरी...गजल.. सब रखो!!

hitesh's picture

4 Mar 2015 - 6:07 pm | hitesh

आँ ! मोदीजी कोट विकुन आलेले कोटभर पैसे गंगा शुध्हीकरणालाच देणार आहेत. अच्चे दिन आ गये

खंडेराव's picture

5 Mar 2015 - 11:15 am | खंडेराव

अनुमोदन. +१

कोणी जाणकार योग्य उत्तरे देतील ही अपेक्शा.

साती's picture

4 Mar 2015 - 6:15 pm | साती

गाय पूज्य आहे म्हणून गोवंश हत्या बंदी केलेली नाही.
गायीचा आणि धर्माचा काही संबंध नाही.
देशातले पशूधन वाढावे याकरिता घेतलेला निर्णय आहे आणि त्याची अंमलबजावणी प्रत्येक राज्याच्या सोयीनुसार योग्य ते नियम घालून व्हावी अशी घटना लिहिणार्यांची डायरेक्टीवज आहेत.
अगदी महाराष्ट्रातल्या कायद्यातही गायीच्या हिंदुधर्मातील आदरणीय स्थानाचा काही उल्लेख नाही.
मी या कायद्याची प्रशंसक नाही पण कायद्याचे खरे काय ते स्वरूप वाचून सगळ्यांनी त्या अनुशंगाने चर्चा करावी म्हणून लिहित आहे.

साती's picture

4 Mar 2015 - 6:20 pm | साती

one of the Directive Principles of State Policy contained in Article 48 of the Constitution. It reads, "The State shall endeavour to organise agriculture and animal husbandry on modern and scientific lines and shall, in particular, take steps for preserving and improving the breeds, and prohibiting the slaughter of cows and calves and other milch and draught cattle."

संदीप डांगे's picture

4 Mar 2015 - 9:18 pm | संदीप डांगे

देशी गायीची प्रजाती संरक्षित करता यावी म्हणून हा कायदा आहे. संकरीत गायींमुळे होणारे संभाव्य आजार व दुष्परिणाम अभ्यासणे हा एक मुद्दा आणि देशातल्या विविध मूळ प्रजाती नुसत्या भाकड आहेत म्हणून संपून जाऊ नये म्हणून त्यांचे संवर्धन असा कायद्यामागचा उद्देश आहे.

मग वर ज्याप्रकारे 'पूजनीय, माता, धर्म,' वैगेरे बोम्बाबोम्ब सुरु आहे तीचे काय नेमके प्रयोजन असावे?

बोका-ए-आझम's picture

4 Mar 2015 - 10:06 pm | बोका-ए-आझम

गोहत्याबंदीचा कायदा धार्मिक कारणावरून केलेला आहे असं जरी प्रथमदर्शनी वाटत असलं (कारण भाजप सरकारने आणलाय) तरी तो तसा नसावा असं म्हणायला जागा आहे. त्याची कारणं ही आहेत - १. महाराष्ट्र हे एकमेव राज्य नाहीये जिथे हा कायदा लागू आहे. अगदी जम्मू आणि काश्मीरमध्येही हा कायदा आहे आणि तिकडे भाजपच्या हातात सत्ता येऊन एक आठवडाही झालेला नाही.
२. उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांतही हा कायदा आहे. या दोन्ही राज्यांत भाजप सत्तेवर असताना (बिहारमध्ये जनता दल युनायटेडच्या भागीदारीत)हा कायदा झालाय का याची कल्पना नाही पण कायदा अंमलात आहे.समाजवादी पक्ष, बसपा किंवा आता फक्त जनता दल युनायटेड - या पक्षांनी कायदा तसाच ठेवलेला आहे, रद्दबातल केलेला नाही - जे करणे आणि भाजपला मुस्लिमविरोधी सिद्ध करणे त्यांना सहज शक्य होते पण तसं झालेलं नाही.
३. राष्ट्रपतींंनी या कायद्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे.प्रणव मुखर्जींसारखा मुरब्बी काँग्रेसवाला जर सही करतो तर कायदा नक्कीच धार्मिक कंटेंटने भरलेला नसावा कारण त्यांनाही त्यावर विरोध दर्शवून महाराष्ट्रातल्या भाजप सरकारची कोंडी करणं सहज शक्य होतं.
४. आजच काँग्रेसनेही या कायद्याबद्दल समाधान व्यक्त केलेलं आहे.

मला तरी असं वाटतं की केवळ भाजपचं नाव आल्यामुळे या कायद्यावर धार्मिक, असहिष्णु वगैरे शिक्के मारण्यात येत आहेत.

हाडक्या's picture

4 Mar 2015 - 10:26 pm | हाडक्या

मला तरी असं वाटतं की केवळ भाजपचं नाव आल्यामुळे या कायद्यावर धार्मिक, असहिष्णु वगैरे शिक्के मारण्यात येत आहेत.

पूर्णपणे असं वाटत नाही हो. कारण हा धागा कोणी काढलाय पहा, त्यात त्यांचा रोख पहा, जरी असे मानून चालू की सरकारच्या निर्णयात असा कोणताही हेतू नव्हता तरीही त्यांचा बहुतेक लोकांनी त्याना अपेक्षित असा अर्थ घेतलाय असे दिसतेय.
आता ज्या बातम्या बाहेर आल्यात त्यानुसारच लोक बोलत आहेत आणि या बातम्या प्रो-भाजपा, अँटी-भाजपा दोन्हीही तर्‍हेच्या मंडळींसाठी सोईच्या आहेत असे दिसतेय आणि सरकार "नरो वा कुंजरो वा" या भुमिकेत खुश आहे. :)

बोका-ए-आझम's picture

4 Mar 2015 - 11:38 pm | बोका-ए-आझम

एखाद्या माणसाला एकदा कानफाट्या नाव पडलं की सरसकट सगळ्या गोष्टींसाठी तो जबाबदार धरला जातो तशातला प्रकार आहे. सोशल मिडिया तर पेटलाय. गोबेल्सच्या आत्म्याला गुदगुल्या होत असतील त्याची बिग लाय थिअरी अजूनही कालाबाह्य झालेली नाही हे पाहून.

तुम्हाला नक्की काय म्हणायचंय ते कळालेले नाही. म्हणजे तुमचे हे म्हणणे कळाले की हा कायदा सगळे म्हणतायत तसा धार्मिक वगैरे कारणांनी बनलेला नाही आणि आधीचा १९७६ चा ही कायदा धार्मिक वगैरे कारणांनी बनला नव्हता (मग हा फक्त गोवंशासाठीच का असा प्रश्न डोक्यात येतोय पण तो तूर्त बाजूस ठेवू).

पण जेव्हा उतावळी माध्यमे आणि सोशल मिडिया पण काही (चुकीचा असा) अर्थ काढून दंगा करतेय तर सरकारने पुढे होऊन सांगावे ना, की बरोबर काय आहे ते, उगी सरकार "नरो वा कुंजरो वा" या भुमिकेत कशाला रहावे.

इतर विधायक आणि गरजेच्या कामांपेक्षा यालाच कशी इतकी प्रसिद्धी मिळतेय ?
प्रगो म्हणाले तसे गोवंशबंदीपेक्षा ही इतर महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत हो करायला (करत नाहीत असे म्हणायचे नाही) आणि प्रसिद्ध करायला पण. :)

बोका-ए-आझम's picture

5 Mar 2015 - 10:14 pm | बोका-ए-आझम

१९७६ सालापासून हा कायदा आहे हे खरंच माहित नव्हतं. या कायद्याबद्दल जे छापून येतंय त्यात असं आहे की हा कायदा पूर्वीच्या युती सरकारने १५ वर्षांपूर्वी म्हणजे १९९९ मध्ये मांडला होता पण त्याला राष्ट्रपतींची मंजुरी नव्हती. मध्ये १५ वर्षे आघाडीचं राज्य होतं त्यामुळे हा कायदा बासनात गुंडाळून ठेवला होता.आता परत तो राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आणि त्यावर राष्ट्रपतींनी सही केल्यामुळे अंमलातही आला. कानफाट्या हा शब्द मी भाजपच्या संदर्भात वापरलेला आहे. कुणा एका व्यक्तीबद्दल नाही.

आजच काँग्रेसनेही या कायद्याबद्दल समाधान व्यक्त केलेलं आहे

आताचा कायदा हा खरे म्हणजे १९७६ च्या कायद्याचे विस्तारीकरण दिसते. १९७६ च्या कायद्यात फक्त गायी होत्या तर आताच्या कायद्याने त्यात बैलांची भर पडली आहे, इतकेच!

आता मूळ कायदा जो १९७६ साली पारीत झाला होता तेव्हा (देशात आणिबाणी होती) आणि महाराष्ट्रात काँग्रेसच्या शंकराराव चव्हाणांचे सरकार होते!

मला तरी असं वाटतं की केवळ भाजपचं नाव आल्यामुळे या कायद्यावर धार्मिक, असहिष्णु वगैरे शिक्के मारण्यात येत आहेत.

हे (दोन्ही बाजूने*) खरे दिसते आहे.

मला स्वतःला रस आहे तो फक्त भाकड गायींबाबत कायद्यात काय म्हटले आहे ते जाणून घेण्यात.

* एक बाजू मानसिक समाधानवाल्यांची तर दुसरी बाजू हातात कोलीत मिळालेल्यांची.

hitesh's picture

4 Mar 2015 - 10:52 pm | hitesh

निम्म्यापेक्षा जास्त लोक म्हशीचे दूध पितात.. ती मात्र माता नाही.. तिला कापलं तर चालतं

आणि दोन चार लोकाना दूध पाजुन गाय मात्र गोमाता !

हिंदुत्वीय लबाडी !

मुळात , कोणत्याही प्राण्याचं दूध पिणं हेही पापच ना?

hitesh's picture

4 Mar 2015 - 11:01 pm | hitesh

देशातील पहिल्या ६ क्रमांकाच्या मांस निर्यातदारांमध्ये ४ हिंदु आहेत.

1) Al-Kabeer Exports Pvt. Ltd.
Its owner name: Mr. Shatish &Mr. Atul Sabharwal
Add: 92, Jolly makers, Chembur Mumbai 400021

2) Arabian Exports Pvt.Ltd.
Owner’s name: Mr.Sunil Kapoor
Add: Russian Mansions, Overseas, Mumbai 400001

3) M.K.R Frozen Food Exports Pvt. Ltd.
Owner’s name Mr. Madan Abott.
Add : MG road, Janpath, New Delhi 110001

4) P.M.L Industries Pvt. Ltd.
Owner’s name: Mr. A.S Bindra
Add : S.C.O 62-63 Sector -34-A, Chandigarh 160022

त्यापैकी एक्जण जैन आहेत म्हणे... पण दुकानाची नावे मात्र मुस्सलमानी का अहेत. ?

विकास's picture

4 Mar 2015 - 11:11 pm | विकास

(लॉजिक विचारू नका, अर्थ समजून घ्या!)

एका कॉन्व्हेन्ट शाळेतील नन शिक्षिका बरोबर उत्तर दिल्यास $१० बक्षिस मिळतील असे सांगून खालील प्रश्न ३ धर्मिय विद्यार्थ्यांना विचारते: सगळ्यात श्रेष्ठ देव/प्रेषित कोण?

ज्यू मुलगा म्हणतो: मोझेस. (शिक्षिका म्हणते: चूक!)
मुसलमान मुलगा म्हणतो: पैगंबर (शिक्षिका म्हणते: चूक!)
पटेल आडनावाचा मुलगा म्हणतो: जिझस ख्राईस्ट...

शिक्षिका खूष होते आणि म्हणते बरोब्बर! पटेल ला $१० देत ती विचारते, की तू तर हिंदू आहेस. मग असे कसे म्हणालास?

पटेल म्हणतो: माझ्या मनात सर्वश्रेष्ठ देव हा (जय श्री) कृष्णच आहे. पण "you know, business is business"! ;)

बोका-ए-आझम's picture

4 Mar 2015 - 11:44 pm | बोका-ए-आझम

हितेशभाऊ, याच्यात एक नाव विसरलात - अरिहंत एन्टरप्रायझेस - तुमच्या कपिल सिब्बलांची कंपनी. त्यांची बायको याची मालक आहे. अरिहंत नावामुळे जैन धर्मीयांनी आक्षेप घेतला म्हणून नाव बदललं आणि लोकसभा निवडणुकीत सिब्बलांनी आपल्या मालमत्तेत या कंपनीचा उल्लेख केला नव्हता, त्यामुळे त्यांना नोटिसही आली होती. पुढे त्यांनी माफी मागून प्रकरण वाढवलं नाही.

मृत्युन्जय's picture

5 Mar 2015 - 10:32 am | मृत्युन्जय

मला एक कळत नाही आहे गायीला मारण्यासंदर्भात सावरकरांचे मत इतके महत्वाचे का आहे? इतर बाबतीत तर बिग्रेडी आणि सिमीयन जनता सावरकरांवर आगपाखड करत असते की. गोहत्या आली की त्यांना एकाएकी सावरकर इतके पुज्यनीय का वाटायला लागतात म्हणे?

खंडेराव's picture

5 Mar 2015 - 11:13 am | खंडेराव

बरोबर आहे. मलाही हाच प्रश्न पड्लाय. योग्य अयोग्य ठरवायला त्यांची का साक्श काढली जाते.

आज हजारो भाकड जनावरे मोकाट फिरुन वाईट आयुश्य जगताय. सरकारने भारतीय गोवंश विकसीत करायचे सोडुन हा एक सोपा निर्णय घेतलाय. त्यावर चर्चा व्हावी,

पैसा's picture

5 Mar 2015 - 11:48 am | पैसा

भाकडच नव्हे, लहान वासरे आणि त्यांच्या गायी अर्धा रस्ता व्यापून बसलेले असतात. काळ्या रंगाचे असेल तर संध्याकाळच्या वेळी स्वतः तरी ट्रकांखाली मरतात, नाहीतर मोटारसायकलवाल्यांना अपघात घडवून आणतात. तेच भटक्या कुत्र्यांबाबत. ५/६ जण मिळून टोळकी करून सापडतील ती मांजरे मारत फिरतात आणि गाड्यांवर भुंकतात. तसेच मथुरेला भयानक प्रमाणात रस्त्यात डुकरे पाहिली होती.

या सगळ्याच भटक्या प्राण्यांना आळा घातला पाहिजे. ज्यांची गुरे/डुकरे रस्ता अडवून बसलेली सापडतील त्यांना जबर दंड ठोकला पाहिजे.

काळा पहाड's picture

5 Mar 2015 - 6:45 pm | काळा पहाड

यांची गुरे/डुकरे रस्ता अडवून बसलेली सापडतील त्यांना जबर दंड ठोकला पाहिजे.

हां म्हणजे पोलिसमामा आता गुरांच्या मालकांचा पत्ता शोधत फिरतील. दुपारच्या वेळेला टिंग टाँग करून झोपमोड करत तुमच्या बंगल्याबाहेर बसलेलं डुक्कर कुणाचं आहे हे विचारल्यावर तुमच्या चेहर्‍यावरचे भाव बघायला आवडेल.

पैसा's picture

5 Mar 2015 - 8:40 pm | पैसा

बेवारस डुकराला उचलून जंगलात नेऊन टाका म्हणून सांगेन आणि इतर प्राण्यांना योग्य त्या जागी. (गायींना पांजरपोळात वगैरे). त्यांचे मालक शोधत आले की त्यांना पण पोलिसच्या ताब्यात देऊ हाकानाका. रस्ते मोकळे होणार असतील तर एवढा त्रास काहीच नाय!

प्रसाद गोडबोले's picture

5 Mar 2015 - 1:36 pm | प्रसाद गोडबोले

प्रतिसाद वाचले .

हितेश , ह्यांचा पराकोटीचा हिंदुद्वेश मोदी/भाजप द्वेष लक्षात आला .
इरव्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांना संडासवीर म्हणणार्‍यांचे अचानक उफाळुन आलेले सावरकर प्रेम दिसले.
गाय हा उपयुक्त पशु असे सावरकर म्हणाले त्याचा गाय वगैरे सर्रास मारुन खावे हे अजब तर्क मतिगुंग करुन गेला.
भाकड गायी रस्त्यावर बसतात म्हणुन मारुन टाका असाही तर्क दिसला मग मुंबईत फुटपाथावर जे भिकारी रस्ता अडवुन बसतात त्यांनाही मारावे काय असा एक विचार आला .
महाभारत काळात गाय खात म्हणुन आजही खावी असा एक तर्क दिसला मग महाभारत काळात राक्षसविवाह पैशाच्च विवाह चालत होता तसा आजही चालु करावा काय असा विचार मनात डोकावला .
आणि माणसाची उत्पत्ती जणु काही जगातील सर्वच प्राण्यांना मारुन खाण्यासाठी झाली आहे अशा प्राकरचे एक मत दिसले , माणुसच सर्वभक्षक काळ झाला हे पटले.

असो . हे असले काही वादविवाद पाहिले की ह्या कोपर्‍यात असलेल्या ज्ञानेश्वरांची आणि तुकारांची फार फार कीव येते काही वेळा .

"ज्ञानोबा , तुकोबा , तुम्हाला अपेक्षित धर्मात गोहत्याबंदी होती का हो ?"

आणि गायीच्या हत्येवर बंदी घालण्या पेक्षा गायछापवर ( अर्थात तंबाखु आणि सर्व तंबाखुजन्य प्रॉडक्ट्स वर) बंदी घालवर्)जास्त महत्वाचे आहे हे आमचे वैयक्तिक मत मांडुन कीबोर्ड आवरता घेतो .

बाळ सप्रे's picture

5 Mar 2015 - 3:09 pm | बाळ सप्रे

प्रतिसादातल्या शेवटच्या २ ओळींशी प्रचंड सहमत !!

अगदी असेच म्हणतो. भूतदयेचा प्रथम आविष्कार म्हणून गायछापवर बंदी घातली पाहिजे.

बॅटमॅन's picture

5 Mar 2015 - 4:05 pm | बॅटमॅन

इरव्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांना संडासवीर म्हणणार्‍यांचे अचानक उफाळुन आलेले सावरकर प्रेम दिसले.

एरवी स्वातंत्र्यवीरांच्या फोटोंनी इंटरनेट भरून टाकणार्‍यांचे यावरील मौनही तेवढेच बोलके आहे.

महाभारत काळात गाय खात म्हणुन आजही खावी असा एक तर्क दिसला मग महाभारत काळात राक्षसविवाह पैशाच्च विवाह चालत होता तसा आजही चालु करावा काय असा विचार मनात डोकावला .

मुळात आहारश्रेष्ठत्वाच्या हास्यास्पद संकल्पनेला उत्तर म्हणून तो मासला दिला गेलेला आहे. आपला धर्म श्रेष्ठ कारण आपण गाय खात नाही वगैरे हास्यास्पद कल्पना बाळगणार्‍यांना किमान हे सत्य कळावे इतकाच त्यामागचा हेतू आहे.

अन सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, अनेक गरिबांसाठी बीफ हा प्रथिनांचा स्वस्त स्रोत आहे. त्यावर बंदी आणण्यात काही मोठेपणा आहे असे वाटत असेल तर त्यांच्या बुद्धीची कीव आल्याखेरीज राहत नाही.

प्रसाद गोडबोले's picture

5 Mar 2015 - 5:25 pm | प्रसाद गोडबोले

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, अनेक गरिबांसाठी बीफ हा प्रथिनांचा स्वस्त स्रोत आहे. त्यावर बंदी आणण्यात काही मोठेपणा आहे असे वाटत असेल तर त्यांच्या बुद्धीची कीव आल्याखेरीज राहत नाही.

आणि हा खालच्या प्रतिसादातील एक भाग

पशुपालक असलेल्या आर्यांच्या सनातन धर्माला प्रथिनांच्या या मोठ्या स्रोतापासून दूर नेण्यामागे भगवान बुद्ध व भगवान महावीर या दोन महानुभावांच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाची व त्या विचारांच्या चळवळीची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे समतेची व जातिव्यवस्थेविरोधाची शिकवण देणाऱ्या या महानुभावांच्या शिकवणीला सरकारने एक प्रकारे मान्यता देण्यासाठी हा निर्णय घेतला असेल, असे समजून त्याचे कौतुक व्हायला हवे.

आता बोला =))

बुद्ध आणि महावीरांची नावे आणल्याने याविरुद्ध बोलणे थांबेल असे नाही.

तदुपरि- सूकरमद्दवाची गोष्टही माहिती असेलच, नै ;)

खंडेराव's picture

5 Mar 2015 - 4:24 pm | खंडेराव

असो . हे असले काही वादविवाद पाहिले की ह्या कोपर्‍यात असलेल्या ज्ञानेश्वरांची आणि तुकारांची फार फार कीव येते काही वेळा .

"ज्ञानोबा , तुकोबा , तुम्हाला अपेक्षित धर्मात गोहत्याबंदी होती का हो ?"

त्याँना अपेक्षित धर्मात कोणत्याही प्राणिमात्राला बाधा नसावी. गाईला सिलेक्टीव वागनुकीचा मुद्दा कळाला नाही.

बॅटमॅन's picture

5 Mar 2015 - 4:30 pm | बॅटमॅन

अगदी अगदी...........

प्रसाद गोडबोले's picture

5 Mar 2015 - 5:15 pm | प्रसाद गोडबोले

गायच काय , कोणत्याही प्रकारचे रेड मीट हे आरोग्याला हानिकारकच असते .

धार्मिक कारणं गेली खड्ड्यात पण आरोग्याच्या दृष्टीने विज्ञानाच्या आधाराने ही बंदी योग्यच वाटते .

hitesh's picture

5 Mar 2015 - 6:53 pm | hitesh

विज्ञानाच्या नेमक्या कोणत्या पुस्तकात दिले आहे ?

आमच्या एम बी बी एस च्या पुस्तकात असे काही दिसले नाही.

बीफ खाल्ल्याने आरोग्याला अपाय होतो हा शोध लावल्याबद्दल अभिनंदन.

गायच काय , कोणत्याही प्रकारचे रेड मीट हे आरोग्याला हानिकारकच असते .

हे वैज्ञानिक सत्य असेलच तर मग फक्त गायीला अभय देऊन त्याहून जास्त प्रमाणात खाल्ल्या जाणार्‍या अपायकारक रेड मीटवर का बंदी नाही आणली गेली? उदा. बोकड, पोर्क, लॅम्ब वगैरे..?

हे म्हणजे फळे आरोग्यास अपायकारक असे सिद्ध झाले (उदा.) म्हणून भारतात फक्त पपनस खाण्यावर बंदी आणणे अन केळी, चिकू, संत्री , कलिंगडे यांची विक्री अन सेवन खुशाल चालू देणे असे झाले..

सुबोध खरे's picture

10 Mar 2015 - 8:50 pm | सुबोध खरे

रेड मीट आरोग्याला हानिकारक आहे म्हणून ते बंद करायचे झाले तर सर्वात पहिल्यांदा तंबाखू आणी त्याचे पदार्थ यावर संपूर्ण बंदी घालावी. मी स्वतः गोमांस खात नाही पण गोहत्या बंदी साठी अशी कारणे देणे हा दांभिकपणा आहे. भाजप सरकार बर्याच गोष्टी करीत आहे त्याचे कोणतेही संयुक्तिक कारण देत नाही हि गोष्ट माझ्यासारख्या भाजपला सहानुभूती असणार्या( मी समर्थक नाही पण सहानुभूती असणारा आहे) माणसाला पटत नाही .

भाजप सरकार बर्याच गोष्टी करीत आहे त्याचे कोणतेही संयुक्तिक कारण देत नाही हि गोष्ट माझ्यासारख्या भाजपला सहानुभूती असणार्या( मी समर्थक नाही पण सहानुभूती असणारा आहे) माणसाला पटत नाही .

खरे काका, याच्याशी अगदी बाडिस. ही लोकांच्या मनातली गोष्ट आहे आणि (५ वर्षांपलिकडे रहायचे असेल तर) हे टाळायला हवे असे वाटतेय. :)

अगम्य's picture

15 Mar 2015 - 10:21 pm | अगम्य

योग्य शब्दात मान्डलेत.

म्हणुन सगळे बीफ मार्केट बंद करुन टाकायचे....

बीफ मार्केटातुन कार्बन डायऑक्साइड का काहीतरी कार्बन बाहेर पडते , असेही मॉदीभक्तानी रंग उधळले आहेत.

मग इतर उद्योगधंद्यातुन अत्तराचा घमघमाट दरवळुन अमृताच्या नद्या बाहेर पडतात का ?

हेच लॉजिक असेल तर सगळेच उद्योगधंदे बंद करावे लागतील.

'पिंक' पॅंथर्न's picture

5 Mar 2015 - 2:27 pm | 'पिंक' पॅंथर्न

तुमच्या वैयक्तिक मताशी सहमत !!

राष्ट्रपतींनी या प्रलंबित विधेयकावर स्वाक्षरी करून एकाअर्थी अत्यंत क्रांतिकारक निर्णय घेतला आहे. प्राचीन काळापासून मांस हा प्रथिनांचा पुरवठा करणारा अन्नपदार्थ म्हणून भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा घटक समजला जात होता. प्राचीन इतिहासाचे अभ्यासक डॉ. डी. एन. झा यांनी वैदिक काळापासून गोमांसाचे जीवनपद्धतीतील महत्त्व स्पष्ट केले आहे. ऋग्वेदापासून ते मनुस्मृतीपर्यंत याचे अनेक दाखले आहेत. अश्वमेध यज्ञात विविध प्रकारच्या सहाशे पशु-पक्ष्यांचा बळी दिला जात असे आणि सांगता २१ गायींचा बळी देऊन होत असे. मुख्य म्हणजे यज्ञात अग्नीला अर्पण होणारी प्रत्येक गोष्ट ही प्रसाद म्हणून सेवन करता येण्याजोगी असे. संघ परिवाराच्या जवळ असणारे लेखक भैरप्पा यांनी मानववंशास्त्राच्या आधारे लिहिलेल्या 'पर्व' कादंबरीत महाभारतातील बहुतेक पात्रे गोमांस भक्षण करतात. पशुपालक असलेल्या आर्यांच्या सनातन धर्माला प्रथिनांच्या या मोठ्या स्रोतापासून दूर नेण्यामागे भगवान बुद्ध व भगवान महावीर या दोन महानुभावांच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाची व त्या विचारांच्या चळवळीची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे समतेची व जातिव्यवस्थेविरोधाची शिकवण देणाऱ्या या महानुभावांच्या शिकवणीला सरकारने एक प्रकारे मान्यता देण्यासाठी हा निर्णय घेतला असेल, असे समजून त्याचे कौतुक व्हायला हवे.
.
.
माझा गोहत्येला विरोधच आहे पण हा उतारा मि आज महाराष्ट्र टाइम्स मध्ये वाचला. ह्या उतार्यात काहि सत्यता आहे का?

प्रसाद गोडबोले's picture

5 Mar 2015 - 5:13 pm | प्रसाद गोडबोले

त्यामुळे समतेची व जातिव्यवस्थेविरोधाची शिकवण देणाऱ्या या महानुभावांच्या शिकवणीला सरकारने एक प्रकारे मान्यता देण्यासाठी हा निर्णय घेतला असेल, असे समजून त्याचे कौतुक व्हायला हवे.

हा दृष्टीकोन आवडला =))

कोंबडी प्रेमी's picture

5 Mar 2015 - 5:22 pm | कोंबडी प्रेमी

आवडला *BRAVO*

तद्दन मूर्ख उतारा आहे. बुद्ध आणि महावीरांची नावे आणली की लोक बोलायचे थांबतात म्हणून खेळलेला हा रडीचा डाव आहे.

प्रसाद गोडबोले's picture

5 Mar 2015 - 5:35 pm | प्रसाद गोडबोले

=))

पण त्या निमित्ताने भाजपावर टिकाकरणार्‍या तथाकथित पुरोगामींनीना आणि भाजपाने हा कायदा पास करुन हिंदुंचे हिंदु धर्माचे भले केले असे वाटणार्‍या अडाणी हिंदु धार्मिकांना एका चेंडुत ऑऊट केले आहे ....

=))

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Mar 2015 - 7:44 am | कैलासवासी सोन्याबापु

डी.एन.झा अथॉरिटी आहेत! त्यांचे मिथ ऑफ़ द होली काऊ पण! वैदिक काळात पाहुण्याला "गोघन" असे म्हणत ! ह्यचाच अर्थ जो आल्यावर वासरु मारून त्याला पाहुणचार करावा लागतो असा!!

जेपी's picture

5 Mar 2015 - 5:25 pm | जेपी

दिमाग सटपटा गया...
मेरे लिये एक बडे का नल्ला और एक पलटी लेके आव... *wink*

hitesh's picture

5 Mar 2015 - 6:54 pm | hitesh

चर्मण्वती या शब्दाचा इतिहास समजु शकेल का ?

स्वतःला उत्तर माहीत असलेले प्रश्न निरागसपणे विचारुन लोक नक्की काय साधू पाहतात हो ? :)

विकास's picture

5 Mar 2015 - 10:02 pm | विकास

हा धागा अजूनही चाललेला दिसतोय त्यावरून पुलं असते तर त्यांनी म्हैस ऐवजी गाय अथवा बैल-वळू म्हणून नवीन गोष्ट लिहीली असती असे वाटते! :) असो. खालील प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल का?

सरकार आणि लोकप्रतिनिधींकडून जनतेच्या सेवेसाठी निर्णय आणि कायदे करणे अपेक्षित असते. नव्हे, ती त्यांच्यावर घटनेने सोपवलेली जबाबदारी आहे. या कायद्या निमित्ताने एक प्रश्न पडला की नक्की याच्या अंमलबजावणीचा फायदा काय आहे?

महाराष्ट्रातले आधीचे संपुआ सरकार संपुष्टात येण्याचे कारण ह्या कायद्यातल्या तॄटी होत्या का, ज्यामुळे जनता विटली आणि त्यांनी युती सरकारला सत्तेवर आणले? जर तसे नसले तर (हा कायदा आणणे गरजेचे आहे असे प्रामाणिकपणे गृहीत धरून विचारतो की) या कायद्याची तातडीने काय गरज होती ज्यामुळे महाराष्ट्रातले उद्योग वाढणार आहे अथवा, गंगाजळी वाढून लाखोकरोडोमधले कर्ज कमी होणार आहे का अचानक सर्वत्र वीज मिळू लागणार आहे अथवा शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबणार आहेत? तसे नसले, तर ते होण्यासाठी सरकारने काही तातडीने निर्णय घेतले आहेत का?

हा गंभीर प्रश्न आहे, उपरोधीक नाही. कारण आपण केवळ माध्यमांना हवे ते वाचत असतो, त्यामुळे जर बाकी काही व्यवहार्य निर्णय घेतले असले तर ते देखील येथे कोणी सांगू शकेल का?

आजानुकर्ण's picture

5 Mar 2015 - 10:21 pm | आजानुकर्ण

या कायद्याची आता काहीच गरज नव्हती असं वाटतंय. प्रचारात भ्रष्टाचार व टोलनाके वगैरे विषय गाजले होते त्यासंदर्भात काही निर्णय घेतलेले ऐकले नाही. टोलनाक्यांबाबत कुणीतरी 'लेखापरीक्षण' चालू आहे असं म्हटलंय. तर ते करण्यासाठी टोलनाके बंद ठेवून लेखापरीक्षण करता आले असते. फार तर लेखापरीक्षणानंतर टोलनाके चालू ठेवण्याची गरज आहे असे उघडकीला आले तर काही काळ मुदतवाढ देता आली असती. अर्थात टोलनाक्यांच्या प्रश्नाबाबत सरकार खरंच गंभीर आहे असं मी इथं गृहीत धरतोय. मात्र नवे धोरण आखले जात आहे असे टोलगुरू आणि आयआरबीमित्र गडकरीमहाशयांचे वक्तव्य वगळता काहीच वाचनात आलेले नाही. आता उद्या लेखापरीक्षणानंतर टोलनाके चुकीचे आहेत असे उघडकीला आले तर प्रवाशांचे पैसे परत करण्याबाबत काय व्यवस्था केली जाणार आहे हा कळीचा प्रश्न आहे.

चांगले रस्ते हवे असतील तर टोल द्यावा लागतो वगैरे भूमिका मला आधी पटत होती. नुकताच भारतात जाऊन आलो तेव्हा मुंबई विमानतळापासून घरापर्यंत जाताना ५ ते ६ ठिकाणी टोल द्यावा लागला त्यानंतर भूमिका बदलली आहे. टोलच्या मानाने अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था व एकंदर सोयींची स्थिती वाईट वाटली. सोमाटणे फाटा, खारघर किंवा भोसरी-मोशी परिसरातले टोल अनावश्यक आहेत असे मला वाटते.

विकास's picture

6 Mar 2015 - 9:04 pm | विकास

विषय वेगळा आहे पण निघाला म्हणून.. टोल संदर्भातील मुद्दे मान्य.

ते करण्यासाठी टोलनाके बंद ठेवून लेखापरीक्षण करता आले असते.
सहमत

चांगले रस्ते हवे असतील तर टोल द्यावा लागतो वगैरे भूमिका मला आधी पटत होती.

मला ती आज देखील पटत आहे. एखादी व्यवस्था/भुमिका ही नीट आमलात आणली नाही तर काय होते हे या सर्व टोल प्रकरणातून दिसतो. त्यासाठी जास्त पारदर्शी आणि प्रभावी व्यवस्था हवी ज्यात टोल मधून किती पैसे मिळाले, रस्त्यावर किती खड्डे (वगैरे) आहेत, अपघात किती झाले, पावसाळ्यात पाणी किती साचले वगैरे सर्व रिपोर्ट्स तसेच त्यावर वार्षिक स्तरावर काय काय काम केले हे नकाशावर दाखवणे हे सार्वजनिक हवेत. (अर्थात असे करावे लागले तर तमाम राजकारण्यांसाठी फारच लफडे होईल हा भाग वेगळा... त्यामुळे किती आशा करावी माहीत नाही. )

आजानुकर्ण's picture

6 Mar 2015 - 11:07 pm | आजानुकर्ण

त्यामुळे जर बाकी काही व्यवहार्य निर्णय घेतले असले तर ते देखील येथे कोणी सांगू शकेल का?

दोन दिवसात एकाही व्यवहार्य निर्णयाची माहिती आली नाही. अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा!

विकास's picture

7 Mar 2015 - 3:38 am | विकास

दोन दिवसात एकाही व्यवहार्य निर्णयाची माहिती आली नाही.
खरेच की!

अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा!
गेल्या दहा वर्षात जिथे महाराष्ट्र ठेवला गेलाय तिथून एकदम पुढे आणणे अवघड जात असणार बाकी काही नाही. ;)

हेमन्त वाघे's picture

6 Mar 2015 - 4:14 pm | हेमन्त वाघे

विचारास प्रवृत्त करणारा हा प्रश्न शाळेत सामंत सरांनी शाळेत विचारला होत.
मूळ लेखक - अज्ञात ( सावरकर ??) ……….
२५+ वर्षानंतर आजही तोच प्रश्न .........

या कायद्याचे समर्थन करणारे -
मध्यतरी मुंबई मधे काही सोसायट्या मधे नोन वे़ज खाणार्यान्ना बंदी केली होती. बिल्डर फ्लट विकत नव्हते त्यांना.
त्याविरोधात बरीच चर्चा झाली, काही राजकारन्याणी हे महारास्त्रियन विरोधी आहे अशी भुमिका घेतली.

आपले काय मत आहे? हे योग्य आहे का, आपल्या खाण्यावर आपल्याला घर मिळणे/ न मिळणे?

विकास's picture

6 Mar 2015 - 8:58 pm | विकास

खालील २००३ ची बातमी (स्त्रोत: इकॉनॉमिक टाईम्स) वाचली आणि लक्षात आले की सध्याचे महाराष्ट्र सरकार हे छुपे कम्युनिस्टांचे सरकार आहे.. ;)

Cuba bans cow slaughter

गोवंश हत्त्या

* * *

गोवंश हत्याबंदी कायदा म्हणजे शेतकर्‍यावरची ’साडेसाती’

केंद्रात व राज्यात सत्ताबदल झाला आणि नव्या सरकारांनी एकापाठोपाठ एक शेतकरीविरोधी धोरणांची अंमलबजावणी सुरू केली. कांदा आणि बटाट्याला जीवनावश्यक वस्तू यादीत घातले, शेतकर्‍यांना आयुष्यातून उठवून देशोधडीस लावण्याची विकृत क्षमता असलेला भुसंपादन व अधिग्रहण कायदा दुरुस्ती केली आणि त्याच सोबत तब्बल १९ वर्षांपासून रखडलेल्या गोवंश हत्या बंदी लागू करून शेतकर्‍याला पूर्णत: नागडे करण्याचा चंगच बांधलेला दिसत असल्याने मोदी सरकार म्हणजे शेतकर्‍यांसाठी ’साडेसाती’ ठरू पाहत आहे.

गाय, बैल वा या प्रजातीतील गुरे आजारी किंवा वृद्ध झाल्याचे कारण करून कत्तल करण्यासाठी विकणाऱ्यांना व विकत घेणाऱ्यांना पाच वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. याशिवाय गोवंश हत्या करणाऱ्यास कठोर शिक्षेची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आली आहे त्यामुळे आधीच आर्थिकस्थितीने घायकुतीस आलेल्या शेतकर्‍यांनी लेकराला चड्डी घेतली नाहीतरी चालेल पण भाकड जनावरांना पोसण्याचे व सांभाळण्याचे काम करावेच लागणार आहे. शहरी धर्ममार्तंडांनी गोपूजनाच्या गोलमाल गोष्टी सांगायच्या आणि तिला पोसायचे ओझे मात्र शेतकर्‍याने घ्यायचे अशी व्यवस्था निर्माण होणार आहे.

गोवंश हत्या बंदी कायदा चांगला कि वाईट यापेक्षा शेतकर्‍यावर आणखी फ़ालतू खर्चाचा बोझा वाढणार आहे, हेच शेतकर्‍यांचे मुख्य दुखणे ठरणार आहे.

भाकड जनावरे पोसण्याचा भुर्दंड शेतकर्‍यावर पडू नये म्हणून सरकारने खालीलप्रमाणे तातडीने निर्णय घ्यावे;

१) सर्व भाकड जनावरे शेतकर्‍याकडून बाजारभावाने खरेदी करण्याची व्यवस्था करून गोप्रेमींकडे पालन-पोषण करण्यासाठी सुपूर्द करावीत.

२) भाकड जनावरांची शिरगीनती करून भाकड जनावरांना ’पेन्शन’ योजना सुरू करावी. तसे केल्यास भाकड जनावरे सांभाळण्याचा भुर्दंड शेतकर्‍यावर पडणार नाही.

सरकारने काहीही उपाययोजना न केल्यास शेतकरी भाकड जनावरे मोकाट सोडून देतील. या मोकाट जनावरांचा उपद्रव शेतशिवारासोबतच नागरी वस्तींनाही होईल. अशा मोकाट जनावरांची चारापाण्याची व्यवस्था न झाल्यास या जनावरांचे अन्नावाचून कुपोषण होऊन ते अल्पावधीच मृत्यूमुखी पडतील. किंवा अशी मोकाट जनावरे चोरूनलपून कत्तलखाण्यात पोचतील व कसाबांचा धंदा आणखी तेजीत येईल.

योग्य उपाययोजना न झाल्यास हा गोवंश हत्या बंदी कायदा म्हणजे शेतकर्‍यासाठी आणि गोवंशासाठी ’साडेसाती’ ठरणार आहे, हे सुर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे.

- गंगाधर मुटे
-----------------------------------------------

बाळ सप्रे's picture

9 Mar 2015 - 2:08 pm | बाळ सप्रे

मोकाट जनावरे चोरूनलपून कत्तलखाण्यात पोचतील व कसाबांचा धंदा आणखी तेजीत येईल.

ज्या कत्तलखान्यांमुळे शेतकर्‍यांना भाकड जनावरे विकण्याचा विकल्प उपलब्ध आहे त्यांनाच कसाब म्हणून संबोधणे योग्य वाटत नाही..

त्यांनाच कसाब म्हणून संबोधणे योग्य वाटत नाही..

अहो, "कसाब" म्हणजेच "कसाई" हो. एकाच अर्थाचे हे शब्द आहेत. ( त्या अजमल कसाबशी काहीही संबंध नाही.) :)

संदीप डांगे's picture

9 Mar 2015 - 2:41 pm | संदीप डांगे

मुंटेंच्या प्रस्तावास सहर्ष अनुमोदन. तुमच्या प्रतिसादाच्या भयंकर प्रतिक्षेत होतो.

अजून एक सल्ला माय-बाप सरकारला देऊ इच्छीतो:
३. गोवंशहत्याबंदी कर असा कर सुरु करावा. ज्याप्रमाणे गॅस सिलेंडरची सबसिडी ऐच्छीकरीत्या नाकारण्याचे आवाहन सरकार करत आहे, त्याच प्रमाणे हा कर गोमाता-प्रेमींनी ऐच्छीकरीत्या सरकारजमा करावा असे आवाहन करावे. ह्या करांतून येणारा पैसा भाकड गायी वैगेरे सांभाळण्यासाठी खर्च आणि पगार म्हणून शेतकर्‍यांना द्यावा. म्हणजे गो-प्रेमींचे प्रेम कायम राहील, शेतकर्‍यांच्या पोटापाण्याचा आणि गायींच्या सुरक्षेचा प्रश्न झटक्यात निकालात निघेल.

दर वर्षाला किती कर असावा यासाठी एक समीकरणः
क्ष (राज्यातल्या एकूण गोवंशाला सांभाळण्याचा खर्च) ÷ य (एकूण गोमाता-भक्त) = झ (प्रत्येकाला दरडोई येणारा कर).
हा कर भरल्याने कुठेही कोणती आयकरातून सूट देऊ नये. परतावा म्हणून फार तर गोमूत्र किंवा शेण मिळु शकेल. ते पण शेतकर्‍यांनी दिले तरच कारण शेणखत तयार करण्यास त्याचा उपयोग होतो. तेवढीच शहरी गो-प्रेमींची शेतीला प्रत्यक्ष मदत.

फक्त कर लागू झाल्यावर सो-कॉल्ड गो-प्रेमींनी बादशहाचा हौद दुधाने भरण्याच्या कथेतल्या लोकांप्रमाणे करायला नको. नै काय आहे ना की सर्व भारत घुसळून काढणार्‍या 'भ्रष्टाचार नही चलेगा' च्या घोषणेने काय झाले याचा आणुभव आहे म्हणून आपलं उगाच....

hitesh's picture

9 Mar 2015 - 3:37 pm | hitesh

मोदीनी ग्यास सबसिडी नाकारायचे आवाहन केले होते.. पण मोदीभक्तानी हे आव्हान स्वीकारले नाही.

आता मोदीभक्तानी गायी पाळुन गोबरग्यास बनवुन कीचन चालवावे

मृत्युन्जय's picture

9 Mar 2015 - 11:05 pm | मृत्युन्जय

तुमच्यासारख्या विरोधकांनी तरी हे आव्हान स्वीकारले की नाही? भक्तांनी नाही तर शत्रूंनी जरी स्वीकारले असले तरी झाले की. तुम्हीही स्वीकारले नसले तर तुम्ही करा चालु गोबरगॅस प्रकल्प.

hitesh's picture

10 Mar 2015 - 10:27 am | hitesh

व्हाट्सपवर तो मेसेज काही करोड लोकानी लाइक केला होता.

प्रत्यक्षात अनुदान नाकारणार्‍यांची संख्या काही हजारात आहे.

अरेरे

मृत्युन्जय's picture

10 Mar 2015 - 6:15 pm | मृत्युन्जय

उत्तम. तेवढ्यांनी तरी नाकारले ना. मग झाले तर. अगदीच काही नसण्यापेक्षा हे बरे. तुम्ही नाकारले की नाही?

hitesh's picture

10 Mar 2015 - 6:57 pm | hitesh

आमच्याकडे ग्यास नाही... पूर्ण स्वयपाक इंडक्शन कुकरवर करतो. म्या इथे काही पाककृती दिल्य होत्या . त्या इंडक्शनवरच केल्या होत्या... आताच त्यावर लेमन टी करुन प्यालो. रात्री भरली वांगी करणार आहे. काल हुग्गी केली होती... पण मला तरी बै शीरखुर्म्याइतके कोणतेच पक्क्वान्न प्रिय नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Mar 2015 - 6:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

कटू वस्तूस्थिती : आंतरजालावर वटवट करणारे करोडोंनी असतात, बोलल्याप्रमाणे कृती करणारे काही हजारच असले तरी खूप ! :(

दुसर्‍याकडे बोट दाखविण्या अगोदर प्रत्येकाने स्वतःपासून तपास सुरू केला तर काही वेगळे क्वचितच दिसेल !

उदा : मेणबत्ती मोर्च्यात हजारोंचा सहभाग असतो, पण रस्त्यावर मुलीची छेड काढणार्‍याला जाब विचारणे ही "ब्रेकिंग न्यूज" इतकी विरळ गोष्ट आहे, नाही का ?

कपिलमुनी's picture

10 Mar 2015 - 7:20 pm | कपिलमुनी

तुम्ही फक्त शेतकर्‍याबद्दल विचार करता . चामडे उद्योग , त्यावर अवलंबून असणारा रोजगार , त्यावरील आधारभूत वस्तूंच्या किमती , मांस उद्योग व रोजगार असे सर्वंंकष लिहा .

शेतकर्‍यानेसुद्धा इतरांच्या समस्येबाबत आस्था दाखवली तरच इतर लोक शेतकर्‍याच्या समस्येबद्दल काळजी दाखवतील

दरवेळी फक्त शेतकर्‍यावर अन्याय झाला म्हणून ओरडण्यात काही अर्थ नाही.

पिंपातला उंदीर's picture

9 Mar 2015 - 2:41 pm | पिंपातला उंदीर

इथे कसाब म्हणजे अतिरेकी कसाब अपेक्षित नाही . खाटिक काम करणारी हि जात आहे .

आजानुकर्ण's picture

9 Mar 2015 - 10:17 pm | आजानुकर्ण

http://www.loksatta.com/desh-videsh-news/road-transport-highways-ministe...

लोकांना चांगल्या सुविधा हव्या असतील, तर त्यासाठी पैसे मोजावेच लागतील. रस्ते बांधण्यासाठी आवश्यक निधी सरकारकडे नाही. त्यामुळे लोकांना चांगल्या रस्त्यासाठी टोल द्यावाच लागेल, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी राज्यसभेत सांगितले.

या सर्व प्रकाराला - प्रचारात टोलमुक्तीची घोषणा करणाऱ्या पक्षाला सत्तेतून आलेले शहाणपण म्हणावे काय?

याला स्पष्ट शब्दात विश्वासघात म्हणावे. प्रथम त्यांच्या कट्टर समर्थकांचा आणि नंतर इतर लोकांचा की ज्यांनी यांच्यावर विश्वास ठेवला.
जे "टोल बंद कसे करणार?" असा रास्त प्रश्न उपस्थित करत असताना "आम्ही सुरु केलेत आम्हाला बंद करायचे ठाऊक आहे" अशा उगी हवेतल्या वल्गना करून (पण उत्तर न देता) त्यांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न झाला.
या पार्श्वभूमीवर टोलबाबत ही (बहुतेक राज ठकरे, नक्की सांगता येत नाही) भुमिका पटते, "टोल लगेच हटवता येणार नाहीत, तशी मागणीही नाही परंतु त्याच्या वसुलीबाबत कठोर काटेकोरपणा आणि पारदर्शिता आणता येईल, तुम्ही कर्ज घेता त्याचे हप्ते भरता तेव्हा त्याची माहिती तुमच्या हातात मिळू शकते त्याचप्रमाणे तुम्ही हे टोलदेखील जनतेने घेतलेले कर्ज समजून जनतेला खडा न खडा माहिती द्या."
शिम्पल्स.
पण दुर्दैवाने ही साधी तार्किक गोष्ट कुठे मार्गी लागताना दिसत नाही.

शहाणपण म्हणाल तर या एका पिढीतल्या लोकांना येईल असे म्हणावे लागेल, कारण जे भाजपकडून स्वप्नील अशा आशा लावून हिरिरीने "मोदींना मत द्या, भाजपला मत द्या" असे तावातावाने मांडत होते तेच आता सध्यातरी वैतागले आहेत (आम्ही आहोतच खिजवायला.. ;) ).
( ता.क. : पुढच्यावेळी मतदानाच्या वेळेस हे मित्र माथेरानला जाणार असे आत्ताच म्हणत अहेत.. )

आजानुकर्ण's picture

9 Mar 2015 - 11:21 pm | आजानुकर्ण

टोलवसुलीबाबत पारदर्शकता असणे आवश्यक आहे. काही ठिकाणी कालमर्यादा संपलेले टोलनाकेही या गुंडांच्या दहशतीखाली चालू होते असे वाचले आहे. जर एखाद्या नागरिकाने टोल भरण्यास नकार दिला तर रीतसर त्याची पावती देऊन कायदेशीर कारवाई करण्याऐवजी गाडीची काच फोड, आरसा तोड, लाथा मार असे प्रकार होतात हे पाहून आश्चर्य वाटते. ट्रॅफिक सिग्नल तोडल्यावर पावती भरण्यास नकार दिला तर पोलीसही स्वतः शिक्षा करत नाही. मात्र हे शिक्षा करण्याचे हक्क या टोलभैरवांना आहेत हे विशेषतः नागरिकांसाठी अत्यंत लज्जास्पद आहे. कायदा मोडण्याचे व त्यानुसार कायदेशीर शिक्षा मिळण्याचे स्वातंत्र्य नागरिकांना हवे.

विकास's picture

9 Mar 2015 - 11:59 pm | विकास

लोकसत्तेतील बातमी अपूर्ण आहे असे वाटते...
टाईम्सचील लिंक असली तरी हीच बातमी बहुतांशी प्रमुख इंग्रजी वृत्तपत्रात पहायला मिळेल.

Govt to scrap 125 toll plazas by month end: Nitin Gadkari

यातील प्रमुख मुद्दे:

  1. १२ फेब्रुवारीतील बातमीप्रमाणे त्यावेळ पर्यंत ६५ टोल प्लाझा बंद केले होते.
  2. ५० कोटी खालील रस्त्यांना टोल आकारणी केली जाणार नाही असा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.
  3. जिथे टोल रहाणार आहे तेथे इ-टोल पद्धती आणून वेळ वाचवणे आणि मिळणारे पैसे त्वरीत गोळा करणे (पक्षी: टोलगुंडांना मिळणार नाहीत हे पहाणे) यावर लक्ष दिले जात आहे. (The study said, "Rs 60,000 crore was lost on account of various delays at check posts and electronic toll collection could save Rs 88,000 crore." )
  4. त्यासाठी इंडीयन हायवे मॅनेजमेंट कंपनी अशी मला वाटते निमसरकारी कंपनी स्थापण्यात आली आहे. (" Its objectives are collection of toll through ETC System and to manage the project strategically, administratively, legally, technically and commercially. It will also provide services of central ETC system which include toll transaction clearing house operations, help desk support and setting up of call centres for incident management ")

हे आधीच्या सरकारने का केले नाही कोण जाणे! म्हणजे गडकरींच्या आधीच्या काळात रस्ते आणि पूल बांधले गेले त्यावर टोल आकारण्याची पद्धती देखील आणली गेली. नंतरच्या काळात नुसतेच टोल वाढत गेले. आता तसे होऊ नये म्हणून व्यवस्था तयार केली जात आहे, जे स्वागतार्ह आहे असे वाटते. सगळे लगेच होईल का? अर्थातच नाही. पण वर सांगितलेली दिशा योग्य आहे का? मला तरी योग्य वाटते. आणि तशी अगदी आधीच्या युपिए सरकारने पण आणली असती तरी स्वागतच केले असते. पण...

तरी देखील टोलचे पैसे कसे वापरले जातात (विशेष करून जे खाजगी टोलमाफिया गोळा करतात ते) या संदर्भात पूर्ण पारदर्शिकता (वरील माझ्याच प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे) आली पाहीजे असे वाटते. असो.

हा गोवंश हत्याबंदी कायदा आहे की शेतकर्‍यावर लादलेली वेठबिगारी?

१. गोवंश हत्याबंदी असावा की असू नये, असा हा मुद्दाच नाही. गाईचे शेणमूत सावडता सावडता आम्ही लहानाचे मोठे झालो. गाईच्या पाठीमागून जाताना तिच्या लाथाही आम्ही आमच्या कंबरेच्या मागूनपुढून खाल्या, आईवर कसे प्रेम करावे हे कदाचित सर्वांना कळत असेल पण गाईवर प्रेम कसे करायचे, स्वत: अर्धपोटी राहुनही गाय चारायाला कसे रानात जायचे, तिला पोटभर कसे खाऊ घालायचे... हे फ़क्त शेतकर्‍यांनाच कळते, धर्ममार्तंडांना अजिबात नाही. आणि तरीही ही मंडळी शेतकर्‍याला फ़ुकाची अक्कल वाटत सुटतात एवढेच नव्हे तर शेतकर्‍यांना विश्वासात न घेताच कायदा केला जातो, तेव्हा हाडाचा शेतकरी खवळून उठणारच.

२. शेतकर्‍यांना विश्वासात घेऊन सरकारने हा कायदा केलेला नाही. ज्यांनी कायदा केला त्यांनीच गाईचे पालनपोषण करावे. कायदा करायचा त्यांनी आणि गाई राखायच्या आम्ही? वेठबिगारी अशीच असते. हा कायदा शेतकर्‍यांना वेठबिगार समजत आहे. आम्ही शेतकरी सरकारचे वेठबिगार नाहीत. आम्हाला गरज नसलेली जनावरे आम्ही विकणारच. गोवंश हत्याबंदीवाल्यांनी ती बाजारभावाने खरेदी करावी. गाईची सेवा करावी आणि मोक्षप्राप्ती करावी.

३. आम्हा शेतकर्‍यांना जीवंतपणी सन्मानाने जगायचे आहे, मुलाबाळांच्या गरजा पूर्ण करायच्या आहेत. मुलाचं ढुंगण आणि बायकोची मांडी झाकणे, हे बाप म्हणून आमचे पहिले कर्तव्य आहे. घरातल्या सख्या आईला वृद्धाश्रमात घालून "मातृप्रेमाचे ढोंग" करणे हे फ़क्त धर्ममार्तंडांनाच जमू शकते, शेतकर्‍याला कधीच जमले नाही. त्यामुळे आहे त्या अठराविश्व दारिद्र्यातून मार्ग काढताना आम्हाला पहिल्यांदा आमचा प्रपंच नीट सांभाळू द्या, परमार्थाचा व मेल्यावर मोक्ष की नरक मिळावा, याचा विचार त्यानंतर करू.

४. अनेक लोक आईच्या आणि गायीच्या दुधाची भावनीक तुलना करतात. पण; शेतकर्‍याच्या मुलाला लहानपणी फ़क्त आईचेच दूध मिळते. शेतकर्‍याचा संसाराचा रहाटगाडा चालण्यासाठी दूध तर बाजारात जात असते.

५. घरची गाय, घरचं दूध पण शेतकर्‍याच्या मुलाला आईचे दूध अपूरे पडले तर गाईचे दूध नव्हे तर पिठाचे पाणी करून पाजले जाते.

प्रसिद्ध कवी स्व. प्रा.स.ग.पाचपोळ एका कवितेत म्हणतात,

आया-बाया सांगत होत्या होतो जवा तान्हा
आनं दुष्काळात मायचा माह्या आटला होता पान्हा
पिठामधी पाणी टाकून मले पाजत जाये
तवा मले पिठामधी दिसते माही माय

माझा मुद्दा स्पष्ट आहे, आमच्या मर्जिने आम्ही भाकड गायीच काय, रानडुकरे, रानहेले, कुत्री, मांजर, कोंबड्या, बकर्‍या, बेडूक, घारी, पाली, सरडे, साप, विंचू, वाघ, सिंह वगैरे पाळू... पण आमच्या मर्जिने... कायद्याची वेठबिगारी आम्ही स्वत:वर लादून घेणार नाही. धर्ममार्तंडाची हौस पुर्ण करण्याची मक्तेदारी स्विकारण्यास आम्ही शेतकरी कोणत्याही स्थितीत राजी नाहीत.

६. सरकारी तिजोरीत खड्खडाट असेल बुद्धीमान समजल्या जाणार्‍या मनुष्यप्राण्याचे शासकिय तिजोरीतून होणारे सर्व खर्च बंद करा. माणसे आहेत ती; जनावरे नाहीत ना? भरतील आपापले पोट कसे तरी. त्याऐवजी सर्व तर्‍हेच्या प्राण्यांची हत्याबंदी कायदा करून प्राण्याच्या पालनपोषणावर तीच रक्कम खर्च करा.

हे माझे मत स्विकारायला कोणीही राजी होणार नाहीत..... कारण त्यांच्या नजरेत आम्ही वेठबिगार आहोत!

- गंगाधर मुटे
-------------------------------

अत्रन्गि पाउस's picture

10 Mar 2015 - 6:15 pm | अत्रन्गि पाउस

आपले म्हणणे आपण पुन्हा एकदा का मांडत आहात ?
आपली कळकळ व्यवस्थित पोहोचली असतांना आपल्या मूळ मुद्द्यांना ह्या वरच्या प्रतिपादनाद्वारे आपण काही जास्त पैलू जोडू इच्छित असाल तर तसे स्पष्ट लिहा ...

प्रसाद गोडबोले's picture

10 Mar 2015 - 6:31 pm | प्रसाद गोडबोले

शेती / पशुपालन करा अशी सक्ती सरकार ने कधी केली तुमच्यावर ?

इतर विषयात गती नसते म्हणुन आणि वाडवडिलोपार्जित शेती असते म्हणुन लोक शेती करतात . एकप्रकारची आगतिकता असते ती !

उगाच वेठबिगारी वगैरे अवघड शब्द वापरु नयेत .

आणि हो , कायद्याला पळवाटा असतात ज्या अभ्यास करणार्‍यांना लक्षात येतात ... गोहत्याबंदी महाराष्ट्रात झाली आहे , गोव्यात , कर्नाटकात , केरळात , इतर बाहेरच्या देशात नाही , हुशार शेतकरी ह्या ना त्या मार्गाने भाकड गायी एक्क्ष्पोर्ट करुन पैसा कमावेलच ह्यात शंका नाही . तो वर आम्ही अहुशार शेतकर्‍यांच्या आंदोलनांना पाठिंबा देवुच !!

अनुप ढेरे's picture

10 Mar 2015 - 6:37 pm | अनुप ढेरे

शेती / पशुपालन करा अशी सक्ती सरकार ने कधी केली तुमच्यावर ?

+१

आजानुकर्ण's picture

10 Mar 2015 - 6:41 pm | आजानुकर्ण

शेती / पशुपालन करा अशी सक्ती सरकार ने कधी केली तुमच्यावर ?

हे खरंय. पण मग गायींना मारु नका अशी सक्ती सरकार का करतंय? गाय मारल्याने सरकारचे काय घोडे मारले जाते?

प्रसाद गोडबोले's picture

10 Mar 2015 - 7:52 pm | प्रसाद गोडबोले

माणुस सोडुन कोणताही प्राणी मारण्यावर/खाण्यावर राष्ट्रसत्तेने किंव्वा धर्मसत्तेने बंदी घालण्याचे काही एक कारण नाही असे माझे स्पष्ट मत आहे .

लोकांच्या किचन बेडरुम संडासबाथरुम बाल्कनी मधे राष्ट्राने किंव्वा धर्माने ढवळाढवळ करु नये , धर्म हॉलपुरता ( आणि ज्याच्या त्याच्या इच्छेने देवघरापुरता) आणि राष्ट्र घराबाहेर पुरतेच मर्यादित असावे !

-छुपा सनातनी आणि उघड अनार्चिस्ट
प्रगो

हाडक्या's picture

10 Mar 2015 - 10:27 pm | हाडक्या

तुमच्या स्पष्ट मताशी (चक्कचक्क) स्पष्ट सहमत !! :)

गंगाधर मुटे's picture

10 Mar 2015 - 8:35 pm | गंगाधर मुटे

ही अप्रत्यक्ष सक्तीच आहे.
कुणी खरीददारच नसेल तर जनावरे खपणारच नाही. मग त्याचे पालनपोषण शेतकर्‍याला करावेच लागेल.

आताच शेतीउपयोगी जनावरांच्या किंमती बाजारात अर्ध्यावर आल्याची चर्चा आहे. (याक्षणी खात्रीने सांगू शकत नाही.)

दुखद घटना 48 घंटे मे 105 गौवंश की मौत
घटना के पाछे साजिश की संभावना
बरोड़ा ( गुजरात ) के पांजरपोल में जहरीली घास खाने से 60 गऊवों की मौत हो गयी 2 दिन पहले भी इसी गौशाला की ब्रांच मे 45 गौवंश की मौत हुई थी !
मृत गोवंश को चमड़े उतारने वाले को दे दिया गया ! गौशाला के ट्रस्टी राजीव ने बताया की गुजरात मे सभी गौशाला वाले ऐसा ही करते है गोवंश कि मृत्यु हो जाने पर चमडे उतारने वाले को दे देते है !
पूर्व घटना से गौशाला वालो का सावधान ने होना, 48 घन्टे मे लगातार यह दूसरी घटना घटित होना और गोवंश को चमडे उतारने वाले को देना, गौरछकों को घटना स्थल पर जाने से रोकना संदेह पैदा कर रही है कि घटना के पीछे कोई साजिश तो नही है हम प्रसाशन से मॉग करते है कि इसकी जॉच होनी चाहिए और सच सामने आना चाहिए!
विस्तृत व पूर्ण समाचार के लिए डाउनलोड़ करे गौमाता न्यूज़ चैंनल एप्प - वंदे गौ मातरम्
गौमाता न्यूज़ चेंनल
Whatsapp- 9247555500

https://hi-in.facebook.com/jaygoumata/posts/410622542467300del

त्यामुळे गायी घातपाताने मारुन टाकण्याचे प्रमाण वाढेल का ?

गोवंश हत्याबंदी कायद्याबाबत सध्या उलट-सुलट विचारप्रवाह सुरू आहेत. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी 1995 ला या कायद्याचे विधेयक मंजूर झाल्यानंतर "शेतकरी संघटक'मध्ये लिहिलेल्या प्रदीर्घ लेखातील संपादित भाग येथे त्यांच्या परवानगीने पुनर्मुद्रित करीत आहोत.

- शरद जोशी

गोवंशाचे संरक्षण म्हणजे केवळ कसाई-कत्तलीवर बंदी नाही. कसाईबंदीचा उपयोग कोणा जमातीला खिजविण्यासाठी होत असेल, पण त्यामुळे गाईंना मारण्याचे थांबणार नाही. कायद्याने बंदी घालून आजपर्यंत कोणतीच सुधारणा झाल्याचा दाखला नाही. 18 वर्षांखालील मुलींची लग्ने सर्रास होतात. नवविधवा सती जात असल्याच्या बातम्या अजूनही येतात. दारूबंदी पोलिस खात्यालाच संपवून गेली. नवीन कायद्याने गोवंशाचे संरक्षण होणार, अशी कायदा करणाऱ्यांचीही कल्पना नसावी.

गोसंरक्षकांची विचारपद्धती किंवा निदान प्रचारप्रणाली काहीशी विचित्र आहे. गाईचा विषय निघाला, की ते काव्यमय भाषेत बोलू लागतात. गाय माता आहे, "गाय मरी तो बचा कौन?' असे मोठ्या निष्ठेने ते मांडतात. भारतीय गाईत काही अद्‌भुत गुण आहेत. तिच्या श्‍वासोच्छ्वासातून प्राणवायू बाहेर पडतो. तिच्या शेणात आणि मुत्रात काही विलक्षण पोषक, कीटकनाशक, आरोग्यदायक गुण आहेत, असे ते विज्ञानातील अर्धे कच्चे संदर्भ देऊन सांगू पाहतात. खत म्हणूनसुद्धा गाईच्या शेणमुत्राची मातब्बरी इतर कोणत्याही जनावरांच्या उत्सर्जनापेक्षा जास्त आहे, असे आग्रहाने सांगतात. गोरक्षण व गोसंवर्धन एवढ्या एकच कलमी कार्यक्रमाने देश समृद्ध होण्याची ते खात्री सांगतात.

सर्वच जनावरे उपयुक्त पशू असतात; गाय हा विशेष उपयुक्त पशू. हे खरे असले तरी जगातील सर्व देशांत गाईंविषयी भावनिक जवळीक नाही. सहृदयतेच्या कारणाने किंवा अगदी अर्थशास्त्राच्या आधाराने कोणत्याही प्राण्याचा वध करू नये असे मांडता येईल. पण व्यवहारी हिशेबापोटी असावे, अगदी गांधीवादीसुद्धा अहिंसेचा आग्रह धरताना सर्व पशूंच्या कत्तलींवर बंदी घालावी, अशी मागणी करण्याचे धारिष्ट करीत नाहीत. त्यांची करुणा गाईपुरतीच मर्यादित राहते!
विज्ञानाचा किंवा अर्थशास्त्राचा आधार गोवंश रक्षणासाठी आवश्‍यक आहे असे मला वाटत नाही. गाईविषयीचा पूज्यभाव समाजात आहे, एवढे पुरे आहे. कोणतीच पूज्य भावना तर्कशास्त्राच्या विचक्षणेस उतरू शकत नाही. गाईच्याच बाबतीत अशी विचक्षणा का? सर्वसामान्य समाजाला गाय मारली जाऊ नये असे वाटत असेल, तर तसा कायदा करण्याचा त्यांना अधिकार आहे. गाईच्या श्‍वासात प्राणवायू आहे आणि प्रत्येक गाय "कामधेनू'च असते असला अवास्तव कांगावा करण्याची काहीच आवश्‍यकता नाही.

गाईविषयी प्रेम, आदर आणि करुणा भारतीय साहित्यात पूर्वापार आढळते. याउलट, बैल यज्ञयागात बळी देण्याची प्रथा वेदकालीन आहे. गोरक्षणाची परंपरा आहे, तशी बैल आणि वळू यांच्या रक्षणाची परंपरा भारतीय इतिहासात नाही. पण आधुनिक हिंदुत्ववाद्यांना त्यासाठी आपणास आवश्‍यक ते जनसमर्थन आहे असं वाटत असल्यास त्यांना कोण आणि कसे थांबविणार?

मध्य प्रदेशातील छत्तरपूर येथील गांधी स्मारक आश्रमात मुक्कामास असताना एका सर्वोदयी नेत्याने गोरक्षणावर चांगले तास दोन तासांचे प्रवचन ऐकवले होते. ते गेल्यानंतर शेतकरी संघटनेच्या बैठकीस सुरवात झाली. मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसमोर मी शेतीमालाच्या उत्पादन खर्चावर आधारित रास्त भावाचे विस्तृत निरूपण केले. सर्व प्रश्‍न सोडविण्याची गुरुकिल्ली रास्त भाव आहे, हे सांगितले. त्यानंतर एका शेतकरी कार्यकर्त्याने उठून म्हटले, ""शरदजी, तुमचा मुद्दा आम्हाला पटला. तुमच्या आंदोलनात आम्ही जरूर सामील होऊ. पण येथे मध्य प्रदेशात आमच्यापुढे त्याहीपेक्षा एक मोठी समस्या आहे. गावोगावी भाकड गाईंचे कळप संख्येने वाढत चालले आहेत. त्यांना पोसण्याची जबाबदारी साऱ्या गावाची. कुंपण नसले, तर कळपच्या कळप शेतात घुसून पिकाची धूळधाण करतात. शरदजी, हमे गायसे बचाओ, वाजिब दामका मामला हम निबट लेंगे।' शेतकऱ्यांच्या मनातील भावना आणि शेतकऱ्यांचे नाव पुढे करून बोलणाऱ्यांचे युक्तिवाद यातील तफावतीने मला मोठा धक्का बसला.

महाराष्ट्रात काही जिल्हे सोडल्यास असे मोकाट जनावरांचे कळप नाहीत. पण तरीदेखील दावणीला असलेल्या जनावरांची संख्या सारखी घटत असते हे रहस्य समजून घेण्यासाठी सोळा-सतरा वर्षांपूर्वी आम्ही बैलाचा उत्पादनखर्च काढण्याचा उपद्‌व्याप केला होता. जन्मल्यापासून अडीच-तीन वर्षे गोऱ्ह्याला चांगले पोसावे तेव्हा तो कामास येतो आणि वय झाल्यानंतर जुवाखालून निघाल्यानंतर चार-पाच वर्षे तरी बैलाला तसेच पोसावे लागते. मधल्या सात-आठ वर्षांच्या काळात तर त्यांच्या पोषणाचा खर्च खूपच वाढतो. पेंड, वैरण, हिरवा चारा काहीच तोडता येत नाही; नाहीतर, शेतीची कामे होतच नाहीत. सतरा वर्षांपूर्वी बैलाच्या आयुष्यात दर दिवशी त्याच्या खाण्याचा खर्च 28 रुपये येतो, असा निष्कर्ष निघाला. शेतातले गवत असले तरी ते काही फुकट नाही, तेही विकतच घेतले आहे असे गृहीत धरून हा हिशेब काढला होता. आयुष्यभर, वर्षभर दरदिवशी 28 रुपये खर्चून पोसलेल्या बैलाचा उपयोग त्याच्या उमेदीच्या वर्षात दरवर्षी जास्तीत जास्त 40 दिवस असतो. त्या काळी भाड्याने बैलजोडी 30 रुपयाने मिळे. असे बैल ठेवणारा शेतकरी शेतीतून सहीसलामत जगण्यावाचण्याची शक्‍यता शून्य. त्याच्या शेणमूत्रामुळे होणारा फायदा लक्षात घेऊनही बैल ही न परवडणारी गोष्ट आहे, असा निष्कर्ष निघाला.
भारतात पवित्र मानली जाणारी एक वशिंडाची नंदी गाय. हिच्यात काही विशेष गुण आहे, यात काही शंका नाही. ती बिचारी अगदी दुष्काळाच्या काळातही जमिनीवर आलेले पेरभर वाळकेसाळके गवत खाऊन स्वतः गुजराण करते आणि जमेल तसे म्हणजे अर्धा लिटर, लिटर दूध कसोशीने देते. भारतातील शेतकरी "सर्व्हाव्हल टेक्‍नॉलॉजी' वापरतो. ही भारतीय शेतकऱ्याची श्रेष्ठता, तसेच त्याची गाय दुष्काळात, इतर बिकट परिस्थितीत ती टिकून राहते हा तिचा मोठा गुण! नंदी गाईची बहीण संकरित गाय. तिच्या खाण्यापिण्यात आठवडाभर हयगय झाली, तर ती कायमची खराब होते. नंदी गाईच्या असल्या मिजाशी नाहीत, हे तिचे कौतुक.

पण "नंदी गाई'च्या या विशेष गुणाचा एक मोठा विपरीत परिणाम दिसून येतो. गाईची ही झेबू जात जगाच्या पाठीवर प्रामुख्याने भारतीय उपखंड आणि एका काळी त्याला संलग्न असणारा आफ्रिकेचा पूर्व किनारा येथेच सापडते. म्हणजे, या गाईचा राहण्याचा प्रदेश बांगला देश, भारत, पाकिस्तान, इथिओपिआ, टांझानिया आणि केनिया. आश्‍चर्याची गोष्ट अशी की नेमके हेच देश जगात सर्वांत दरिद्री राहिले आहेत. सपाट पाठीच्या गाईंचे देश वैभवाच्या शिखरावर आहेत. म्हशी बाळगणारे थायलंड, कंबोडिया, मलेशियासारखे देश खाऊन-पिऊन सुखी आहेत. वशिंडाची गाय साऱ्या देशाची लक्ष्मी फस्त करून टाकते याचा हा सज्जड पुरावा आहे.

याचा अर्थ गोवंशाच्या कत्तलीस बंदी करू नये असा नाही. अशा बंदीमुळे देशात चैतन्य पसरणार असेल, तर तसे अवश्‍य केले पाहिजे. फक्त वाचलेल्या गाईंचे सड एकाकडे आणि खायचे तोंड दुसऱ्याकडे अशी विभागणी करून चालणार नाही. गाय आमची आई आहे, ती भली तोट्याची असो, तिला शेवटपर्यंत सुखाने पोसण्याचा आमचा निर्धार आहे. त्यासाठी काहीही किंमत द्यावी लागली तरी चालेल, असा जेथील आम जनतेचा निर्धार आहे, तेथे कत्तलीस बंदी जरूर झाली पाहिजे. पण बंदीमागोमाग इतरही काही पावले उचलली पाहिजेत. गाईची उत्पादकता सात-आठ वर्षे आणि आयुष्यमान बारा-तेरा वर्षे अशी परिस्थिती या कायद्याने तयार होईल. भाकड काळात गाईला पोसायचे कोणी? शहरी धर्ममार्तंडांनी गोपूजनाच्या गोष्टी सांगायच्या आणि तिला पोसायचे ओझे मात्र शेतकऱ्यांवर अशी व्यवस्था टिकू शकणार नाही. कत्तलखान्यातील कत्तली थांबतील, पण शेतकऱ्याच्या घरची हेळसांड थोडीच थांबणार आहे? कत्तलीवर बंदी घातली तर मेलेल्या जनावरांचा उपयोग करण्यात आला असे नाटक वठवता येईल. मग, गायबैल खरोखरच नैसर्गिकरीत्या मेले, की खाण्यापिण्याची हेळसांड झाल्यामुळे मेले, की औषध घालून मारले गेले याची प्रत्येक वेळी चौकशी करावी लागेल. प्रत्येक गायबैलाचे शवविच्छेदन करावे लागेल. शेतकऱ्यांना कचाट्यात पकडून त्यांच्याकडून दक्षिणा उकळू पाहणाऱ्या नोकरशहांची आणखीच चंगळ होईल.

गोवंश हत्याबंदी पशुपालनाच्या सर्व सिद्धांतविरुद्ध आहे. गाईचा गोठा किफायतशीर व्हायचा असेल तर कळपातील गाईंची दररोजच्या दुधाची सरासरी 8 लिटर तरी असली पाहिजे. म्हणजे, वितानंतर वीस-बावीस लिटरपेक्षा कमी दूध देणारी गाय आर्थिकदृष्ट्या निव्वळ बोजा आहे. चांगल्या चांगल्या गाईंचे संवर्धन आणि कमस्सल गाईंना गोठ्यातून काढणे ही दूध उत्पादनातील आणि यशस्वी पशुसंवर्धानातील गुरुकिल्ली आहे. त्यांचा मान राखला नाही तर काय होईल? गाईंची पूजा करणाऱ्या भारतातील गाई सर्वांत कमअस्सल आणि जेथे गाय खाल्ली जाते, तेथे गाईच्या सर्वोत्कृष्ट जातींचे संवर्धन असे विचित्र दृश्‍य चालूच राहील.

पण हे सर्व बाजूला ठेवून, भावनेपोटी, गाईंची कत्तल होता कामा नये असा आग्रह धरण्यात चूक काही नाही. तसे करायचे ठरले तर येथील दुधाची किंमत जगातील इतर देशांच्या तुलनेने निदान दुप्पट राहील. ती देण्याची तयारी, गाईविषयी पूज्य भावना बाळगणाऱ्यांनी ठेवली पाहिजे. "तुम्ही गाई सांभाळा आम्ही वसुबारसेला हळद-कुंकू वाहू' असली दांभिकता काय कामाची?

नवी विटी आली आहे, नवे राज्य चालू आहे. समाजवादाच्या घोषणा संपल्या, हिंदुत्वाच्या सुरू झाल्या आहेत. हाही आजार ओसरला म्हणजे माणसे माणसासारखा विचार करू लागतील, अशी आशा बाळगायला काय हरकत आहे!

ऍग्रोवन ई-पेपर
eSakal

गंगाधर मुटे's picture

15 Mar 2015 - 10:01 pm | गंगाधर मुटे

गोवंश हत्या बंदी? नव्हे, 'गो'पाल हत्या - शरद जोशी यांनी लिहिलेला व २१ ऑगस्ट १९९५ ला शेतकरी संघटक मध्ये प्रकाशीत झालेला लेख येथे वाचता येईल.