आख्खा मसुर

जयंत माळी's picture
जयंत माळी in पाककृती
2 Mar 2015 - 3:49 pm

मला खुप आवडतो म्हणून शिकलो कराडचा स्पेशल
"आख्खा मसूर"

साहित्य :- भिजवून फुललेले मसूर दीड वाटी (साधारण अर्धी-पाऊण वाटी कोरडे भिजवावे लागतील, ७-८ तासांसाठी)
एक मोठा कांदा - बारीक चिरून
एक मध्यम टोमॅटो - बा.चि.
टोमॅटो प्युरे - दोन मोठे चमचे
कांदा-लसूण मसाला - तिखटाच्या आवडीनुसार
हिंग, हळद, मोहरी - फोडणीसाठी
तेल, मीठ

कृती
मसूर कुकरमधे वाफवा. दाणे अखंड आणि वेगळे राहिले पाहिजेत. (म्हणूनच अख्खा मसूर नाव?) तेल तापवून फोडणी करा. कांदा लाल होईपर्यंत परतून घ्या. टोमॅटोही परता. टोमॅटो प्युरे घालून २-३ मिनिटे शिजवा.
कांदा-लसूण मसाला व मसूर घालून आणखी २ मिनिटे शिजवा, जास्त कोरडे वाटत असेल तर थोडे कोमट पाणी घाला व नंतर झाकण लावून एक वाफ येउद्या. वाफ आल्यावर मीठ घालून मसूर मोडू न देता हलक्या हाताने ढवळून घ्या. अख्खा मसूर इज रेडी.

प्रतिक्रिया

आवडत्या डिशचा फोटू नसल्यामुळे नाराजीचा शेरा मारून पाककृती रद्दबातल करण्यात येत आहे.

जयंत माळी's picture

2 Mar 2015 - 4:03 pm | जयंत माळी

उद्या करतो आणी फोटो पण देतो

एस's picture

2 Mar 2015 - 4:07 pm | एस

:-)

मसूर कुकरमधे वाफवा. दाणे अखंड आणि वेगळे
राहिले पाहिजेत.

म्हणजे नक्की काय करायचं?

जयंत माळी's picture

2 Mar 2015 - 4:19 pm | जयंत माळी

जरा वेळच शिजवा
जेणे करुन जरासा कच्चा राहील

रानडेंचा ओंकार's picture

2 Mar 2015 - 4:30 pm | रानडेंचा ओंकार

याचा आख्खा मसूर मसाला पण मिळतो ना?

जयंत माळी's picture

2 Mar 2015 - 6:10 pm | जयंत माळी

नाही

अत्रुप्त आत्मा's picture

2 Mar 2015 - 4:45 pm | अत्रुप्त आत्मा

फोटूsssssssssssssssssssssssssss :-/

नवीन आहे मिपा वर फोटो कोठून अपलोड करतात ?

श्रीरंग_जोशी's picture

2 Mar 2015 - 8:09 pm | श्रीरंग_जोशी

मिसळपाव वर फोटो कसा चढवावा?

पाकॄ आवडली. फटुची प्रतिक्षा राहील.

उदय के'सागर's picture

2 Mar 2015 - 5:06 pm | उदय के'सागर

सोप्पी पाकृ, ह्यातच फोडणी साठीच्या तेलात लसाणाच्या पाकळ्या ठेचून आणि किसलेलं आलं घातलं की कुठल्याही डाळी पदार्थाला अप्रतिम चव येते असा अनुभव.

मुसलमानांमध्ये मसूर ह्या डाळीचा जास्त वापर करतात जसं की मसूर भात, मसूर खिचडी, मसूराचं वरण ई. ह्याला काही शास्त्रीय कारण आहे का?
(मुळात खरंच मुसलमानांमध्ये ह्या डाळीचा जास्त वापर करतात का ह्या बद्दल विशेष निरीक्षण नाही पण आमच्या जुन्या घरासमोर व शेजारी मुसलमान परिवार रहात असे ते सांगत की मुसलमानांमध्ये मसूर डाळ जास्त वापरतात)

उमा @ मिपा's picture

2 Mar 2015 - 5:26 pm | उमा @ मिपा

मसूर सात आठ तास भिजवलेले असतील तर कुकरला लावायची गरज नाही. १५-२० मिनिटात शिजतात ते.
ही हमखास मस्त होणारी, आवडीची भाजी आहे.

Maharani's picture

2 Mar 2015 - 8:04 pm | Maharani

सोप्पी पाकृ

black pearl's picture

2 Mar 2015 - 8:45 pm | black pearl

फोटू टाका की राव ...

जयंत माळी's picture

2 Mar 2015 - 8:58 pm | जयंत माळी

केला की टाकतो फोटो

कुकरला आणि कशाला लावायचा आणि तो/ती मसूर?
अहो फोडणीतच शिजून येते झटक्यात. जरा पाण्याचा हबका मारा वरुन बस होइल.

मनिमौ's picture

4 Mar 2015 - 1:34 pm | मनिमौ

ला मावशी बरोबर लई वेळा खाल्ला आहे. चविष्ट एकदम

जयंत माळी's picture

4 Mar 2015 - 3:14 pm | जयंत माळी

इस्लामपुर इथला M.K. ढाबा प्रसिद्ध आहे

कपिलमुनी's picture

4 Mar 2015 - 1:40 pm | कपिलमुनी

प. महाराष्ट्राच्या हॉटेलमध्ये मिळणारी पाकृ थोडी वेगळी असते.