थ्री क्वशन्स- लिओ टॉलस्टॉय

लाल टोपी's picture
लाल टोपी in जनातलं, मनातलं
26 Feb 2015 - 11:11 am

उद्याच्या जागतिक मराठी दिनानिमित्त लिओ टॉलस्टॉय यांच्या 'थ्री क्वशन्स' कथेचा स्वैर अनुवाद...

एकेकाळी एका राजाच्या कारकिर्दीत घडलेली ही एक एक घटना आहे. कोणताही अचूक निर्णय घेण्याची निश्चित वेळ कोणती? कोणाचे म्हणणे गांभिर्यपूर्वक ऐकावे आणि कोणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे? आणि या सर्वाहूनही महत्वाचे म्हणजे कोणते काम सर्वाधिक महत्वाचे आहे ज्यासंबंधी राजा म्हणून मला अधिक लक्ष केंद्रीत केले पाहिजे आणि जे केल्यामुळे मला सर्वोत्तम कामगिरी केल्याचे समाधान मिळेल?
या प्रश्नांवर बरेच दिवस विचार करूनही नेमकी उत्तरे न मिळाल्यामुळे त्याने संपूर्ण राज्यात जाहीरपणे सर्व नागरीकांना या प्रश्नांची उत्तरे देण्याचे आवाहन केले आणि जी व्यक्ती या प्रश्नांची उत्तरे त्याला पटतील अशी देईल त्याला भरघोस इनाम देण्याचेही त्यावेळच्या प्रथेप्रमाणे जाहीर केले.

राजाच्या या अवाहनाला अनुसरून अनेक व्यक्ती त्याच्याकडे येण्यास सुरुवात झाली त्यामध्ये अनेक विद्वान व्यक्तींचा समावेश होता.
पहिला प्रश्न: कोणताही अचूक निर्णय घेण्याची निश्चित वेळ कोणती? या बाबत वेगवेगळी उत्तरे त्याला मिळाली. संपूर्ण वर्षाच्या कामांची काटेकोर आखणी करणारा एक तक्ता तयार करून त्याबरहुकूम सगळे निर्णय अगदी तंतोतंत त्या आखणीनुसार घेण्यात यावेत. यामुळे घेतले जाणारे सर्वच निर्णय योग्य वेळी घेतले जातील. याचा फायदा असा होईल की कोणताही निर्णय घेतांना तारांबळ उडणार नाही, कोठेही गोंधळाची स्थिती रहाणार नाही; मात्र काहींचे म्हणणे याच्या अगदी उलट होते, सर्वच प्रकारच्या निर्णयाबाबत अशा प्रकारे वेळापत्रक आखून ठेवणे शक्य नाही त्याऐवजी आधीच कोणताही निर्णय घेण्यापेक्षा योग्यवेळी जशी परिस्थती निर्माण होईल तीचे आवलोकन करून जशी गरज असेल तसे निर्णय घेण्यात यावेत. काही विद्वानां च्या मते राजाने सर्वच निर्णय एकट्याने घेण्यात चूका होऊ शकतांत त्यामुळे राज्यातील तज्ञ व्यक्तींची एक समिती बनवून त्यांच्याकडे सर्व निर्णय देण्याचे अधिकार द्यावेत. ही समिती योग्य वेळी याठाग्या निर्णय घेईल असेही त्यांचे म्हणणे होते. मात्र या मतालाही विरोधक होतेच. निर्णय घेतांना प्रश्नाचा सांगोपांग विचार करून, त्याचे परीणाम काय होतील त्यामुळे भविष्यात कशी काय घडामोडी होतील या विचार करून त्यानुसार योग्य ते ठेरावावे मात्र असा योग्य अंदाज करण्यासाठी ती व्यक्ती जादुगाराच असायला हवी!

दुस-या प्रश्नासंबंधी देखील अशीच गोंधळाची परिस्थिती होती. कोणाचे म्हणणे गांभिर्यपूर्वक ऐकावे? कोण राजाला अचूक निर्णय घेण्यासाठी योग्य सल्लागार असावा? काहींच्या मते विद्वान लोकांची समिती योग्य, तो सल्ला देईल, काहिंनी धर्मगुरू, डॉक्टर, सेनापती, याकामासाठी योग्य असल्याचे हिरीरीने सांगीतले

तिसरा प्रश्न: कोणते काम सर्वाधिक महत्वाचे आहे? येथेही विज्ञान,युद्धतंत्राची सुसज्जता, धार्मिक विचारांवर भर अशा प्रकारची विविध उत्तरे त्याला मिळाली.

तीनही प्रश्नांची विविध उत्तरे मिळूनही राजाला एकही उत्तर समाधानकारक वाटले नाही. कोणालाही याबाबत भरघोस असे इनाम द्यावे असे त्याला वाटले नाही.मात्र या प्रश्नाची उत्तरे मिळावीत अशी त्याची तीव्र इच्छा होती म्हणूनच त्याच्या राज्यात अत्यंत प्रतिभाशाली असणा-या हर्मिटची भेट घेऊन त्याचे मत अजमावण्याचे राजाने ठरवले.

हा हर्मिट एक वल्लीच होता. तो घनदाट जंगलात रहायचा. कोणत्याची कारणासाठी जंगल सोडून बाहेर जात नसे आजुबाजूच्या गावातील सर्वसामान्य माणसांखेरीज इतरांना तो भेटतही नसे. म्हतूनच त्याला भेटायला जातांना राजा साधारण कपडे घालून आपल्या घोड्यावरून उतरून आपले अंगरक्षक आणी इतर लवाजमा हर्मिट्च्या खोपटापासून दूर ठेऊन एकटाच चालत हर्मिटपाशी पोहोचला.

राजा तेथे पोहोचला तेव्हा हर्मिट त्याच्या खोपटाजवळच असलेले शेत नांगरत होता. राजा त्याच्याजवळ पोहोचतांच हलकेसे स्मित करून त्याने स्वागत केले आणि आपले काम सुरूच ठेवले. हर्मिट दुबळा, अशक्त होता. शेत नांगरतांना थोडीशी जमीन नांगरुन जोरजोरात धापा टाकत थोडावेळ थांबून पुन्हा नांगरणीच्या कामाला लागत होता.

राजा त्याच्या जवळ गेला आणि त्याने आपले प्रश्न विचारले, हर्मिट तू राज्यातला सर्वात अधिक जाणकार माणूस आहेस मला तीन प्रश्न पडले आहेत. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची वेळ काय असली पाहिजे? मला सर्वात जास्त उपयुक्त व्यक्ती कोण आहे? आणि सर्वप्रथम मी लक्ष द्यावे असे कोणते क्षेत्र आहे?

हर्मिट ने राजाचे म्हणणे ऐकले आणि काहिही न बोलता त्याने आपले नांगरणीचे काम चालू ठेवले.
'हर्मिट तू दमला असशील, दे तो नांगर माझ्याकडे मी थोडावेळ नांगरणीचे काम करतो' राजाने आपुलकीने त्याला विनवले.
'मी आपला आभारी आहे' आपल्या हातातील नांगर राजाकडे देत हर्मिट उत्तरला.
राजाने त्यासमोरील जमिनीचे दोन छोटे जमिनीचे तुकडे नांगरून झाल्यानंतर आपले तिन्ही प्रश्न पुन्हा विचारले.
आपल्या जागेवरून उठत, हर्मिट म्हणाला, ' तू दमला असशील, थोडावेळ विश्रांती घे, मी पुन्हा कामाला लागतो'. पण राजा त्याला हे कष्टाचे काम करू देत नाही. शेत नांगरण्याचे काम राजा सुरूच ठेवतो.
असेच काही तास निघून जातात, सूर्य मावळतीला झुकायला लागतो तेव्हा राजा पुन्हा विचारतो 'हे भल्या माणसा मी तुला काही प्रश्न विचारतोय, त्यांची उत्तरे मिळवण्याचा मी खूप दिवसांपासून प्रयत्न करतो आहे ; तुझ्याकडे सांगण्यासारखे काही नसेल तर तसे सांग मी परत जातो'.
'ते बघ कोणीतरी इकडे पळत पळत येत आहे, चल पाहू तो कोण आहे'.

राजाने वळून पाहिले तर खरोखरच एक माणुस त्यांच्याकडे जीवाच्या आकांताने पळत येतांना दिसला. तो बराच जखमी झालेला दिसत होता त्याने एक हात पोटावर दाबून धरला होता तरीही पोटातून रक्त वहात होते. होणा-या असह्य वेदनांमुळे तो विव्हळत होता. तो राजाच्या जवळ पोहोचला आणि कोसळला. त्याच्या पोटाजवळ धारदार शस्त्रामुळे झालेली मोठी जखाम दिसत होती, तेथून खूप रक्तस्त्राव होत होता. हर्मीट आणि राजाने मिळून त्याची जखम धुतली, हर्मिट्ने दिलेल्या स्वच्छ कापडाने बांधली; रक्तस्त्राव अजूनही थांबत नव्हता बांधलेल्या कापडातून रक्त पुन्हा वाहू लागले. पुन्हा ती जखम धुवून नवीन कापडाने बांधली असे अनेक वेळा केल्यानंतर अखेरीस रक्तस्त्राव थांबला आणि काही वेळानंतर तो माणुस शुध्दीवर आला. राजानेच त्याला पाणी दिले.

एवढे सर्व घडेपर्यंत बरीच रात्र झाली होती. हर्मीट्पर्यंत पोहोचण्यासाठी केलेली पायपीट, तेथे पोहोचल्यावर केलेले शारिरीक श्रम, नंतर आलेल्या आगंतूक माणसाची सुश्रुषा या सर्वाची राजाला सवय नसल्यामुळे आलेल्या थकव्यामुळे लगेचच तेथेच तो गाढ झोपेच्या आधीन झाला. सारी रात्र तो निश्चिंतपणे झोपला होता. सकाळी जाग आल्यावर आपल्या बाजूलाच कोणीतरी अनोळखी माणुस पाहून त्याला आपण कोठे आहोत हे आठवण्यासाठी काही वेळ द्यावा लागला.. मात्र तो अनोळखी माणुस त्याच्यापुर्वीच जागा झाला होता आणि राजा जागा होण्याचीच वाट पहात होता.
'मला माफ करा', राजाला जागे झालेला आणि आपल्याचकडे पहात असलेला पाहून तो म्हणाला.
'मी तर तुला ओळखतही नाही, तर तुला कशाबद्दल माफ करू?'
'तुम्ही मला ओळखत नसला तरी मी आपल्याला ओळखतो, माझ्या भावाने केलेल्या काही गुन्ह्यांची शिक्षा म्हणुन त्याला तुरुंगात टाकते, त्याची सर्व कौटुंबिक संपत्ती जप्त केली. त्यांची झळ मला काहीही कारण नसतांना बसली, त्यामुळेच तुमचा बदला घेण्याची संधी शोधत होतो. काल तुम्ही कोणत्याही रक्षकाशिवाय हर्मिटला भेटण्यासाठी जंगलात येणार आहात हे मला समजले त्याचाच फायदा घेऊन येथून परत जाताना, महाराज, हल्ला करून तुम्हाला ठार मारण्याचा विचार करून मी तुमच्या परतीच्या वाटेवर दाबा धरून बसलो होतो. पण संध्याकाळ झाली तरी तुम्ही परतला नाहीत म्हणून मी माझ्या लपलेल्या जागेवरून बाहेर येऊन तुमचा शोध घ्यायला निघालो तर तुमच्या रक्षकांच्या तावडीत सापडलो आणी त्यांच्याच हल्ल्यात जखमी होऊन त्यांची नजर चुकवून येथे पोहोचलो. सैनिकाच्या हल्ल्यात झालेल्या जखमांमुळे खरतर काल माझे मरण निश्चित होते मात्र तुमचा जीव घेण्याच्या इराद्याने आलेल्या माणसाचा जीव तुम्ही केल्या सुश्रुशेमुळे वाचला. यातून जगलो वाचलो तर आता आजन्म तुमचा विश्वासू सेवक होण्यास तयार आहे, मला माफ करा'.

आपल्या जीव घेण्याइतका मोठा शत्रू इतका सहजपणे विश्वासू सेवक झाल्याचे पाहून राजाला बरे वाटले.
जखमी माणसाचा निरोप घेऊन राजा बाहेर आला. बाहेर गुडघ्यावर बसून काल नांगरलेल्या जमिनीत बियाणे पेरेत असलेला हर्मिट त्याला दिसला. राजा सरळ त्याच्याकडे गेला,
'हर्मिट तू बुद्धिमान आहेस हे मला पूर्णपणे ठावूक आहे म्हणुनच जाण्यापूर्वी मी तुला अखेरचे विचारतोय, माझ्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेस का?'
'ती तर तुला मिळालीच आहेत.'
'म्हणजे? कधी राजाने आश्चर्यचकित होत विचारले
तुझ्या लक्षात नाही आले? हर्मिट्ने विचारले काल माझी दया येवून तू जर शेत नांगरयला घेतले नसतेस आणि तसाच निघून गेला असतास तर त्या माणसाने बदल्याच्या भावनेपोटी तुझावर हला केला असता आणि कदाचीत तू जीवही गमावला असतास आणि येथे न थांबण्याची किंमत तुला चुकवावी लागली असती. म्हणून जेव्हा तू जमीन नांगरत होतास ती वेळ सर्वात महत्वाची वेळ, त्यावेळी तुझ्यासाठी सर्वात महत्वाचा माणुस होतो, मी आणि सर्वात महत्वाचे काम होते माझ्यासाठी आवश्यक असणारी तू करीत असलेली मदत. त्यानंतर तो जखमी माणुस आल्यावर सर्वात महत्वाची वेळ होती त्याची तू केलेली सुश्रुषा नाही तर त्या जखमांची योग्य काळजी न घेतली गेल्यामुळे त्याचा जीवही गेला असता. त्यावेळी तो माणुस तुझ्यासाठी सर्वात महत्वाचा होता आणि त्याची जखम बरी करण्यासाठी केलेले काम हे तेव्हाचे सर्वात आवश्यक काम होते.
लक्षात घे, आताचा क्षण, वर्तमानकाळ हीच सर्वात महत्वाची वेळ कारण तुझ्या हातात जी काही शक्ती आहे ती त्याच काळात आहे. तुझ्या बरोबर वर्तमानकाळात असणारी व्यक्ती सर्वात महत्वाची कारण कोणाबरोबर, कोणत्यावेळी कशा प्रकारे संबंध येतील हे कोणीही सांगू शकत नाही. सर्वात उत्तम काम म्हणजेच तुझ्या बरोबर असलेल्या व्यक्ती साठी तुझ्याकडून होईल तितके भले करणे कारण माणुस माणसाला मदत करण्यासाठीच जन्माला आलेला असतो.

साहित्यिकभाषांतर

प्रतिक्रिया

अबोली२१५'s picture

26 Feb 2015 - 11:34 am | अबोली२१५

अतिशय सुंदर *****

hitesh's picture

26 Feb 2015 - 12:11 pm | hitesh

.

योगी९००'s picture

26 Feb 2015 - 12:52 pm | योगी९००

छान पण....
काल माझी दया येवून तू जर शेत नांगरयला घेतले नसतेस आणि तसाच निघून गेला असतास तर त्या माणसाने बदल्याच्या भावनेपोटी तुझावर हला केला असता आणि कदाचीत तू जीवही गमावला असतास आणि येथे न थांबण्याची किंमत तुला चुकवावी लागली असती. म्हणून जेव्हा तू जमीन नांगरत होतास ती वेळ सर्वात महत्वाची वेळ
आता त्या राजाला थोडेच माहीत होते की कोणीतरी त्याला मारण्यासाठी त्याची वाट बघते आहे?

एस's picture

26 Feb 2015 - 12:56 pm | एस

छान बोधकथा!

मदनबाण's picture

26 Feb 2015 - 1:33 pm | मदनबाण

सुंदर बोध कथा ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Swine flu: India's Ahmedabad limits public gatherings

असंका's picture

26 Feb 2015 - 4:37 pm | असंका

अच्छा हे तीन आहेत तर...

मला वाटायचं , की हे तीन प्रश्न म्हणजे १. माणसात काय वास करते, २. माणसाला काय कळू शकत नाही ? आणि ३. माणुस कशावर जगतो. पण ती एक वेगळी गोष्ट दिसते आहे टोल्स्टोय ची.....'दया तिचे नाव' या नावाने मी ती गोष्ट मराठीत वाचली होती.

बाकी गोष्ट छान सांगितलीत! पण ते योगी ९०० म्हणतात तेपण तसं खरंच आहे की हो. तसं बघितलं तर तो एक योगायोगच होता. निर्णय कुठला घेतला होता राजाने त्यात?

योगी९००'s picture

26 Feb 2015 - 9:23 pm | योगी९००

खरं म्ह्णजे ह्या जर तर ला काहीच अर्थ नसतो. जर मला माहीत आहे की मी ह्या विशिष्ट वेळी एका विशिष्ट ठिकाणी गेलो तर मरणार आहे तर मी त्यावेळी तिकडे कशाला जाईन?

माझ्या दोन चुलत भावांची गोष्ट, दीड वर्षापुर्वी ते दोघे बाईक अपघातात गेले. गोवा हायवेवर जात असताना दुसर्‍या बाजूने येणार्‍या एका दुसर्‍या बाईकने ट्रकला ओवरटेक करण्याच्या नादात ह्यांच्या बाईकला धडक दिली आणि सर्व जण जागीच गेले.

नंतर घरचे म्हणत होते की सकाळी जाताना जरा पाणी पिऊन निघ असे म्ह्टलं होतं पण यांनी ऐकले नाही आणि गडबडीत गेले. जर पाणी प्यायला थांबले असते तर ती वेळ टळली असती. हेच जर पाणी पिऊन गेल्यावर घडले असते तर तेच लोकं उगाचच पाणी पित बसले, लवकर गेले असते तर ती वेळ टळली असती असे ही म्हणाले असते.

असंका's picture

26 Feb 2015 - 10:18 pm | असंका

खरं आहे... :-(
दुर्दैव...!!

घडून गेलेल्या गोष्टींमध्ये अर्थ लावायचा प्रयत्न करणे कधी कधी अस्थानी होऊन जाते...

लाल टोपी's picture

1 Mar 2015 - 7:28 pm | लाल टोपी

गेले दोन तीन दिवस प्रवासात असल्यामुळे प्रतिसाद उशीरा देत आहे.
@ योगीजी
बोधकथांबाबत अतिशय तर्कशुध्द विचार खरंतर करता येत नाही, आणि ही कथादेखील १०० वर्षांहून जूनी आहे. त्यावेळ्चे संदर्भ भाषाशैली ही आतापेक्षा वेगळी असणे शक्य आहे. मात्र आपण उल्लेखलेला प्रसंग मात्र दुर्दैवी आहे होणारी घटना टाळता येणारी नसली आपल्या प्रियजनांबाबत आपण अधिकच हळवे असतो. त्यामुळेच असे प्रसंग आपण जर.. तर.. च्या पातळीवर मोजू पहातो. मानवी मनाचे हे खेळ आहेत. मात्र आपणास यामुळे त्या प्रसंगाची आठवण करुन् दिल्याबद्दल क्षमस्व.