मृत्युषडाष्टक

नितीनचंद्र's picture
नितीनचंद्र in काथ्याकूट
19 Feb 2015 - 11:29 pm
गाभा: 

आजच एक जोडी माझ्याकडे सल्ल्यासाठी आली होती. मुलाचे जन्मनक्षत्र आर्द्रा म्हणजे मिथुन रास तर मुलीचे जन्मनक्षत्र जेष्ठा म्हणजे वृश्चिक रास. या दोन्ही राशी एकमेकांपासुन सहाव्या आठव्या येतात म्हणजे षडाष्टक योगात गुणमेलनाचे गुण एकदम कमी होऊन कोणी ज्योतिषी लग्न करा असा सल्ला द्यायला धजावत नाही.

यातुन मृत्यु हा शब्दामुळे दोघेही भांबावलेले / धास्तावलेले होते. दोघेही वडीलधार्‍या व्यक्तीच्या सोबत न येता फक्त दोघेच आले होते त्यामुळे हा मामला प्रेमाचा आहे हे समजावयला वेळ लागला नाही. अधीक चौकशीत ते एकमेकांचे ( विवाहाला अडथळा नसलेले नातेवाईक म्हणजे मुलाच्या मामाची मुलगी ) आहे हे समजले. दोघे एकमेकांना लहान पणा पासुन चांगले एकमेकांच्या स्वभावाचा परिचय असलेले आणि एकमेकांवर अत्यंतीक प्रेम असलेले दिसत होते.

गावाकडे गुणमेलनाच्या सॉफ्टवेअरमधे लग्न जुळत नाही हा शिक्का लागलेला कागद घेऊन आले होते.

दाते पंचांगात याला पर्याय म्हणजे दोघांच्या नवांश कुंडल्या मांडुन नवांशस्वामी एकमेकांचे मित्र असल्यास षडाष्टक योग असुनही विवाह वर्ज नाही हा सल्ला तर दिलाच त्या शिवाय मुलीला जेष्ठा नक्षत्र शांती करावयाचा सल्ला दिला जी झालेली नव्हती.

जेष्ठा नक्षत्र हे जेष्ठता मिळवण्यासाठी आतुर नक्षत्र समजले जाते. त्यांना डावललेले चालत नाही. प्रत्येक गोष्टीत पतीने पत्नीचा सल्ला घेणे आणि आपली बाजु समजाऊन सांगुन जर दुमत असेल तर एकमत बनवणे ही शहाण्या जोडप्याने वागायची रितही समजाऊन सांगीतली. लग्न हे समजुतदारपणाने निभावले जाते हेही सांगायला मी विसरलो नाही.

मंगळ आणि बुध हे एकमेकाचे शत्रु असल्याने एकमेकांचे पटत नाही हे शास्त्र झाल. व्यवहारात अनेक वेळा अश्या राशीच्या लोकांना नोकरी/व्यवसायात एकमेकांना पटवावे लागते. बुध हा शब्द्प्रभु असल्यामुळे त्याला फार भावनेच्या आहारी न जाता असे पटवणे सोपे जाते.

मिसळपाववर षडाष्टक योगाची चर्चा झाली आहे आणि स्वभाव न पटल्यास एकत्र रहाणे म्हणजे मृत्युसम या अर्थाने याला मृत्युषडाष्टक म्हणणे योग्य ठरेल हे विधान मलातरी पटले आहे.

दोघांनी एकमेकांना पसंत केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे एकमेकांशी संघर्ष कधी झालेच नाहीत आणि होणारही नाहीत इतक्या खात्रीने ते विवाह करत असतील तर उगाच भिती दाखवुन तो विवाह टाळण्यास सांगण्याचा सल्ला देण्यात काही हशील नव्हता. शिवाय एकमेकांशी विवाह न करता ते किती सुखी होतील असा प्रश्न विचारल्यावर अजिबात नाही असे उत्तर दोघेही देत होते. असे असताना आणि त्यांची वये पाहुन हे फक्त आकर्षण नाही हे स्पष्ट समजत होते. आर्थीक सुसंपन्नता तर आहेच. अस असताना या दोन आत्म्यांना माझ्या अंतरात्म्याला न पटलेला सल्ला देणे म्हणजे काहीतरी पाप करणे वाटत होते.

यातला अजुन एक भाग म्हणजे दोघांची एकनाड आहे. परंतु दोघांचे पंचमेश दोषमुक्त आहेत. पंचम स्थान आणि गुरु देखील सुस्थीतीत आहेत. याशिवाय आज सायन्स इतके पुढे गेले आहे त्यामुळे दोष असलाच तर किमान एक संतती होणे सायन्स च्या सहायाने अशक्य नाही.

शभंभवतु हा आशिर्वाद मी दिलाच आहे. मिसळपावकरांना माझे म्हणणे पटेल.

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

19 Feb 2015 - 11:37 pm | कपिलमुनी

बर्‍याच दिवसांनी फलज्योतिषावर लेख आला.

( पुन्हा जुनाच धुरळा न उडवता मिपाकर सुज्ञपणा दाखवतीलच)

पण लग्न करण्याची इच्छा असणार्‍या एका जोडप्याला तुम्ही कुंडली मेचींगच्या जंजाळातुन सोडवलं इतकं समजलं. बरं आहे.

पिवळा डांबिस's picture

20 Feb 2015 - 1:50 am | पिवळा डांबिस

चला, बरं झालं!
पण आता आम्हां मिपाकरांना रडवायला त्या जोडप्याला अपत्यप्रातीत अडचण वगैरे काही दाखवू नका हां!
अहो जोडप्याची कुचंबणा दाखवून, मिपाकरांना रडवून, प्रतिसाद मिळवायचे म्हणजे पाऽऽप हो!!!

आदूबाळ's picture

20 Feb 2015 - 2:12 am | आदूबाळ

:D

आनन्दिता's picture

20 Feb 2015 - 6:01 am | आनन्दिता

=)) त्या सुक्या मासळी चा धागा आल्यापासुन डांबिस काका फुल्ल फॉर्मात आहेत.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Feb 2015 - 7:53 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

यसवायजी's picture

20 Feb 2015 - 9:20 am | यसवायजी

कुंडली बदला की हो.
अहो, जन्मवेळ आणि स्थळ आता कसे बदलणार?
मग भडजी बदला की हो. ;)

बॅटमॅन's picture

23 Feb 2015 - 6:06 pm | बॅटमॅन

अगदी अगदी. =))

बॅटमॅन's picture

23 Feb 2015 - 6:06 pm | बॅटमॅन

रावसाहेबं =)) =)) =))

१)ज्योतिषात जर त्यांच्याच शास्त्राप्रमाणे जातकाच्या कुंडलीतील ग्रहमानाप्रमाणेच गोष्टी घडणार आहेत तर गुणमेलन पत्रिका जुळवणे हा खटाटोप ज्योतिषांनी करू नये असं माझं मत आहे.
२)मुलाची मिथुन चंद्ररास सांगते की निर्णय घेण्यास असमर्थ असणे, प्रत्येक गोष्टीचा कीस काढणे, ठामपणा नसतो.
३)प्रेमविवाह करणाऱ्यांना सरळ सांगा ज्योतिष पाहात नाही.
४)योग हे जोडयोग असतात. मुलास वाहनयोग असल्यास बापाकडे पैसा असतोच. मुलास अल्पमृत्यु आणि आइवडिलांस पुत्रशोक योग असतोच.
५)मुलीस वैधव्य असेल तर नवऱ्यास अल्पमृत्युयोग असणाराच असतो. हे तुम्हाला कळले तरी ते तुम्ही तोंडावर सांगू शकत नाही. सांगण्यास टाळाटाळ केली तर आणखी शंका येते.
थोडक्यात लग्न जुळवाजुळवीच्या भानगडीत {ज्योतिषी लोकांनी तरी}अजिबात पडू नये.

आयुर्हित's picture

20 Feb 2015 - 10:53 am | आयुर्हित

वाह व्वा कंजूसजी,
(फक्त)क्रमांक ४चा मुद्दा आवडला व पटला देखील.

क्रमांक १,२,3,५ वर नितीनचंद्रजी काय म्हणतात बघू या!

मग ज्योतिष ज्ञानाचा उपयोग काय ?

उलट असे प्रकार व्यवस्थीत डोक्युमेंट केले तर ज्योतिष हे शास्त्र आहे हे सिद्ध व्यायला मदत होइल ना ?

पिवळा डांबिस's picture

20 Feb 2015 - 11:26 pm | पिवळा डांबिस

....तर ज्योतिष हे शास्त्र आहे हे सिद्ध व्यायला मदत होइल ना ?

व्यायला मदत करायला हरकत नाही हो, पण दर वेळेस भरंवशीच्या म्हशीला टोणगाच होतोय, त्याचं काय? :)

(तुमचा टायपो आहे हे लक्षात आलं होतं, पण प्रसंगानुरूप म्हण वापरायचा मोह आवरला नाही. ह. घ्या)

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Feb 2015 - 11:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

नका आवरू मोह. दोष तुमचा नाही, तो त्या आयडीचा गुण असावा +D

(हघ्याहेवेसांन)

१)ज्योतिषात जर त्यांच्याच शास्त्राप्रमाणे जातकाच्या कुंडलीतील ग्रहमानाप्रमाणेच गोष्टी घडणार आहेत तर गुणमेलन पत्रिका जुळवणे हा खटाटोप ज्योतिषांनी करू नये असं माझं मत आहे.
उत्तर : आपल्याला पुण्याहुन दिल्लीला जायचे आहे तर सोयीची गाडी शोधाल की चेन्नईला जाऊन तिकडुन दिल्लीला जाल ? वैवाहीक जीवन काही लोकांना सुखावह नसते. अश्यावेळी त्यातल्या त्यात सुखावह व्यक्तीशी विवाह करणे आपल्या हातात असते.
२)मुलाची मिथुन चंद्ररास सांगते की निर्णय घेण्यास असमर्थ असणे, प्रत्येक गोष्टीचा कीस काढणे, ठामपणा नसतो.
उत्तर : म्हणुन तर जोडी माझ्याकडे आली होती. मी नुसते ज्योतीष पहात नाही तर समापुदेशन पण करतो.
३)प्रेमविवाह करणाऱ्यांना सरळ सांगा ज्योतिष पाहात नाही.
उत्तर : हे आपण का ठरवावे ? ते विवाह करणारच आहेत. यावर उपाय काय आणि किती रिस्क आहे याची असेसमेंट त्यांना हवी होती.

४)योग हे जोडयोग असतात. मुलास वाहनयोग असल्यास बापाकडे पैसा असतोच. मुलास अल्पमृत्यु आणि आइवडिलांस पुत्रशोक योग असतोच.

उत्तर : वहानयोग ड्रायव्हरला पण असतो. फरक इतकाच की त्याला वहानाचे सुख नसते. मुलास अपमृत्यु ( अल्पमृत्यु नसतो ) याचा वरील लेखाशी काय संबंध ? लग्नामुळे मृत्यु असा योग मुळी नसतो. मी दोघांच्या पत्रीका आयुष्यमान पहाण्याकरता सुध्दा तपासल्या. दोघांना दिर्घायुष्य आहे. हीच भिती घालवणे महत्वाचे.
५)मुलीस वैधव्य असेल तर नवऱ्यास अल्पमृत्युयोग असणाराच असतो. हे तुम्हाला कळले तरी ते तुम्ही तोंडावर सांगू शकत नाही. सांगण्यास टाळाटाळ केली तर आणखी शंका येते.

उत्तर : असले कोणतेही योग दोघांच्या पत्रीकेत नव्हते. लेखन विस्ताराच्या भयाने हे लिहणे टाळले इतकेच.
थोडक्यात लग्न जुळवाजुळवीच्या भानगडीत {ज्योतिषी लोकांनी तरी}अजिबात पडू नये.

याचे उत्तर वेगळे लिहले आहे.

नितीनचंद्र's picture

20 Feb 2015 - 11:49 am | नितीनचंद्र

थोडक्यात लग्न जुळवाजुळवीच्या भानगडीत {ज्योतिषी लोकांनी तरी}अजिबात पडू नये.

आपण मला सल्ला देण्याच्या आधी विषय समजाऊन घेतला असता तर बरे झाले असते. माझे वधु-वर सुचक मंडळ नाही. लोक दुकान मांडुन खरा सल्ला भिती/आत्मविश्वास अभावा पोटी देत नाहीत. लग्न झाल्यामुळे मृत्यु असा कर्मविपाक माझ्या पहाण्यात नाही. त्या जोडीला हीच भिती होती.

मी माझी कामे माझ्या विवेकानुसार करतो.

>>योग हे जोडयोग असतात. मुलास वाहनयोग असल्यास बापाकडे पैसा असतोच. मुलास अल्पमृत्यु आणि आइवडिलांस पुत्रशोक योग असतोच.
५)मुलीस वैधव्य असेल तर नवऱ्यास अल्पमृत्युयोग असणाराच असतो. हे तुम्हाला कळले तरी ते तुम्ही तोंडावर सांगू शकत नाही

ह्यासाठी तुम्हाला एक मँगो केशर मस्तानी!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Feb 2015 - 7:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे भविष्यकथन नव्हे तर व्यावहारीक लॉजिक आहे... पण त्यामध्ये एक खडा आहे, तो हा...

मुलास वाहनयोग असल्यास बापाकडे पैसा असतोच.

हे असेच असेलच असे नाही. कारण...

अ) "मुलगा लहानपणापासून गाडीतून फिरणार" असा असल्यास ती गाडी वडिलांचीच असेल असे कशावरून... आईने अथवा एकत्र कुटूंबातील इतर कोणी (आजोबा, काका, इ) घेतलेली असू शकेल.

आ) मुलगा मोठा झाल्यावर स्वतःची गाडी घेऊ शकेल... सद्या कित्त्येक तरुणांकडे विशीच्या दशकात स्वतःची (हप्त्याने घेतलेली का होईना) पण गाडी आहेच ना ?

:)

आयुर्हित's picture

20 Feb 2015 - 9:39 pm | आयुर्हित

असेही बऱ्याच बाबतीत असू शकते/ आहेच!
१००% सहमत आहे

पैसा's picture

20 Feb 2015 - 11:03 am | पैसा

बाकी गोष्टींबद्दल आपला पास. पण एकूण परिस्थिती पाहून अतिशय योग्यप्रकारे वागलात!

नितीनचंद्र's picture

20 Feb 2015 - 11:51 am | नितीनचंद्र

चला, मी योग्य सल्ला दिल्याचे तुम्हालातरी पटले.

प्रसंग छान वर्णिला आहे. लिखाणाची हातोटी आवडली.

मुळात इतका समंजसपणा असताना हे नक्षत्रांचे आणि ग्रहांचे आणि त्यांना शांत वगैरे करण्याचे हातचे हवेतच कशाला?

ज्योतिषाधारे कोणतेही निर्णय घेणे हा मूळ भागच अशासाठी चुकीचा वाटतो की उदा. या लग्नाबाबत हे जोडपे तुमच्याकडे आले म्हणून ठीक. या नक्षत्ररचना अन योग त्यांच्या मार्गात धोंड बनून राहिले नाहीत. पण ज्योतिषावर विश्वास ठेवून निर्णय घ्यायचे ही पद्धत रुजलेलीच राहिली असेल तर अशी जोडपी इतर ज्योतिष्यांकडेही जातील आणि जातच असणार. त्यांना असा समजूतदार ज्योतिषी मिळेलच असं नाही. म्हणून या एकूण पद्धतीविषयीच पुनर्विचार करायला हवा.

गिरकी's picture

20 Feb 2015 - 12:27 pm | गिरकी

+१

आणि जरी ज्योतिषाने कितीही वाईट सांगितले तरी लग्न करण्याचा विचार पक्का असेल तर उगीच ज्योतिषाकडे जाऊन असेसमेंट किंवा रिस्कच प्रमाण कशाला शोधत बसायचं?

नक्षत्र शांतीने अनेक अडचणी दुर होतात. घरच्यांचा थोडासा विरोध आहे ज्याला त्यांना पटेल असा उपायही आवश्यक आहे. नक्षत्रशांती आणि अडचणी दुर होणे हे पटायला अवघड आहे. अनुभव मला आहे. अनुभुती जातकांनी घ्यावी.

एकूण पद्धतीविषयीच पुनर्विचार करायला हवा. +१११११

ब़जरबट्टू's picture

20 Feb 2015 - 2:02 pm | ब़जरबट्टू

परंतू तो जर तुम्ही विरुध्द जरी दिला असता, तरी हे जोडपे जोपर्यन्त त्यांच्या सोयीनुसार सांगणारा ज्योतीषी भेटत नाही तोपर्यन्त भटकले असते...
मुळात बेस्ट ज्योतिषी कोण असतो ? जो माझ्या बद्दल ग्रेट बोलतो... :) दुसरे काही नसते हो ऐकायचे....

वेगळाच अँगल.. लैच भारी...!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Feb 2015 - 11:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

जोतिष्याच्या नादी लागलेल्या बर्‍याच जणांचे असेच वागणे असते. मनासारखे भविष्य सांगणारा मिळेपर्यंत शोधत राहतात आणि एखाद्याने सागितलेले भविष्य एकदा खरे ठरले की नंतर कितीही वेळा त्याची भाकीते खोटी ठरली तरी त्याला सोडणे जमत नाही.

माणुस राजा होतो ??

सूड's picture

20 Feb 2015 - 2:54 pm | सूड

माणुस राजा होतो ??

हो

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Feb 2015 - 7:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

सहमत.

मी तरी इतर कोणत्याही प्राण्याला राज्याभिषेक झालेला पाहिले/ऐकले/वाचले नाही ! +D

नाखु's picture

23 Feb 2015 - 9:42 am | नाखु

माणूस (बाप्या) राजा होतोच.

सकाळची सुरवातच मुळी राज्या उठ तुला शाळेला जायचयनां पासून होऊन "गाढवा/गधड्या" पर्यंत थांबते तस्मात राजा होणे अटळ आहे.

प्रेमी युगुलांचे "राजा-राणी" वेगळे प्रकरण आहे स्वानुभवी-जाणकार अनुभव दाखले देतीलच.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 Feb 2015 - 11:29 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

रेफ्रन्स साठी आदी जोशींचे ब्लॉग्स वाचावेत असं सुचवतं आहे.

ड्राइवर ला वाहनयोग आहे असे म्हणत नाहीत मागच्या सीटवर बसणाऱ्याला तो योग असतो. प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्याने ज्योतिषाचा सल्ला मागायला जाणे हा शुद्ध दांभिकपणा आहे. प्रेम केलं आणि विवाहही केला {दुसऱ्याशी}असा प्रकार झाला. नितिनचंद्र तुमची मतं ही नितिनचंद्र यांची न धरता ज्योतिष विषयाची सांगितलेली मतं असं धरतो आहोत.
आता एक उदाहरण टी एन शेशन यांचे घ्या(त्यांच्याच पुस्तकातून)त्यांना स्थळं सांगून आली की त्यांचेच ज्योतिषी वडील प्रत्येक कुंडली नाकारायचे. असं का विचारल्यावर वडील म्हणाले तुलाच संततियोग नाहीये त्यामुळे संततियोग नसलेली मुलगी पाहतो आहे. आता हाच योग वरील लग्न करू इच्छिणाऱ्या मुलाच्या कुंडलीत असता तर तुम्ही तोंडावर सांगू शकला असता का ?
ज्योतिष, मंत्रतंत्र आणि जादू या तीन{वाईट} विद्या कधितरी त्यांनाच गोत्यात आणतात.वाईट योगावर घरातच कोणी जन्मला असेल की ज्योतिष खोटं ठरू दे अशी तो सतत प्रार्थना करतो.ज्योतिष कळणे ही फार क्लेशदायक गोष्ट ठरते.

वाईट योगावर घरातच कोणी जन्मला असेल की ज्योतिष खोटं ठरू दे अशी तो सतत प्रार्थना करतो.ज्योतिष कळणे ही फार क्लेशदायक गोष्ट ठरते.
सुदैवाने मला असा अनुभव नाही. किमान माझी धारणा " जे बदलता येणार नाही ते स्विकारण्याची आहे".

आपण कर्माचा सिध्दांत हे हरीभाई ठक्कर यांचे पुस्तक वाचले नसेल तर वाचावे. प्रारब्ध जे पक्व आहे सोडुन प्रयत्नपुर्वक बरेच काही बदलता येते यावर माझा विश्वास आहे. अर्थात सामान्य अपेक्षा गृहीत धरुन हे वाक्य लिहले आहे.

माझ्या पहाण्यात असे अनेक जातक आहेत ज्यांच्या पत्रीकेत संतती योग कठीण असताना " नवसाने " त्यांना किमान एक कन्या वा पुत्र रत्न प्राप्त झाले आहे. आजकाल सायन्स इतके पुढे गेले आहे कि संतती योग कठीण म्हणजे पैसे खर्च करणे असे झाले आहे.

पुर्वीही अनेक उपायाने संतती प्राप्त करण्याचे मार्ग सांगीतले जायचे. अस असताना इतके खात्रीपुर्वक वागणारे श्री शेषन यांचे वडील एक अजब व्यक्तीमत्व मानायला हवे.

हाडक्या's picture

20 Feb 2015 - 11:04 pm | हाडक्या

आजकाल सायन्स इतके पुढे गेले आहे कि संतती योग कठीण म्हणजे पैसे खर्च करणे असे झाले आहे.

ह्म्म्म ... काहीही बोलण्यापासून स्वतःला रोखतो आहे, धाग्याचे वधु-वर करण्याची अजिबात इच्छा नाही म्हणून. ;)

तेव्हढे "सायन्स" पुढे गेलेय तर "विज्ञाना"लापण थोडे आणा पुढे आणि वापरा जरा. आणि हो, "कि" हा हिंदीत आहे, मराठीत अजूनतरी "की"च आहे.
असो, मातृभाषा-दिनाच्या आगाऊ शुभेच्छा.. :)

सिरुसेरि's picture

20 Feb 2015 - 11:51 pm | सिरुसेरि

म्हैशीस चालते का हो तुमचे ज्योतिषशास्त्र ? शांत केलीन म्हणजे झाले .

अत्रुप्त आत्मा's picture

21 Feb 2015 - 12:24 am | अत्रुप्त आत्मा

ख्याक्क! :-D

अत्रुप्त आत्मा's picture

21 Feb 2015 - 12:27 am | अत्रुप्त आत्मा

ख्याक्क! :-D

@म्हैशीस चालते का हो तुमचे ज्योतिषशास्त्र ? …>>> अंहों कां नै चांलणांर? माणसांस चांलतें,तर म्हैशिनी कांय घोंडं मारलंनीत??? ;-)
पथ्य पांळलनीत म्हणजें झांलं! ;-)

आनन्दिता's picture

21 Feb 2015 - 12:42 am | आनन्दिता

ज्योतिषशास्त्राची पथ्य फार कडक हां !! :)

पिवळा डांबिस's picture

21 Feb 2015 - 3:32 am | पिवळा डांबिस

ज्योतिषशास्त्राची पथ्य फार कडक हां !!

"सायन्सचं आणि तुमचं एव्हढं का हो वाकडं?"
"सायन्समध्ये लॉजिक नांवाचं विष असतं!"
"छे! लॉजिक तत्वज्ञानात असतं. सायन्समध्ये 'इंपरिकल एव्हिडन्स' की कायतरी असतं!"
"वाटेल ते बोलू नका! इंपरिकल एव्हिडन्स? इंपरिकल एव्हिडन्स म्हणजे ज्योतिषशास्त्राची शवपेटिका!!!!"
बोलणारे गृहस्थ पिडांकाका असावेत...
नायतर इथे मिपावर इतक्या ठणकावून बोलणार कोण?
:)

ज्योतिषशास्त्राच्या धाग्यात सायन्स, तत्वज्ञान, इंपिरिकल एव्हीडन्स सारखे शब्द ऐकुन काही अनुभवी मिपाकरांनी टपावरुन आपले बिस्तरे खाली उतरवले.

आता १०० प्रतिसादांची निश्चिंती झाली आत्मुदादा !!!

शंभर??? अरे खुळां काय तुं हाडक्यां ... मागे मुविंनी "अपेक्षांची" मेख मारलीन, तर मिपाकरांनी हजाराचा धुरळा उडवलानीत.
इथं तर अखंड कुंडलीये, त्या अपेक्षाना हजार तर, कुंड्लीतल्या प्रत्येक घरास किती????
घाल बोटें मोज !! =))

अत्रुप्त आत्मा's picture

21 Feb 2015 - 11:21 am | अत्रुप्त आत्मा

धन्य गं तुझि दुत्त दुत्त आ..नन्दीता! =))

आणि पिंडा काका की ( ही :-D ) जय हो! :-D

अत्रन्गि पाउस's picture

21 Feb 2015 - 1:42 pm | अत्रन्गि पाउस

क्या बात है !!!

अत्रुप्त आत्मा's picture

21 Feb 2015 - 4:12 pm | अत्रुप्त आत्मा

@ कुंड्लीतल्या प्रत्येक घरास किती????
घाल बोटें मोज !! >>> खुळा की काय तू? आडवा हो काश्मिर होइस्तर! " धाग्यावर प्रतिसाद उलगडीत मुवि नानांनी आपलं मत मांडलं.
इकडे धागा रणरणायला लागला होता. मंडळी आग ओकणार्‍या प्रतिसादांचा आश्रय शोधित होती. अत्यंत ओळखिचा धागा-अत्यंत ओळखिचेच प्रतिसाद. मग ''एकमेका सहाय्य करु",म्हणून कोणी डु आय डींच्या शोधार्थ निघाले. फेक अकाऊंट - अदली बदली व्हायला लागली. संपादकांच्या गाड्याबिड्या डु आय डीं ना पकडायला सुटल्या.
तेव्हढ्यात एकानी अवांतर करायला सुरवात केली.
================
भ्रमशः =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Feb 2015 - 4:51 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

@ कुंड्लीतल्या प्रत्येक घरास किती????
घाल बोटें मोज !! >>> खुळा की काय तू? आडवा हो काश्मिर होइस्तर! " धाग्यावर प्रतिसाद उलगडीत मुवि नानांनी आपलं मत मांडलं.
इकडे धागा रणरणायला लागला होता. मंडळी आग ओकणार्‍या प्रतिसादांचा आश्रय शोधित होती. अत्यंत ओळखिचा धागा-अत्यंत ओळखिचेच प्रतिसाद. मग ''एकमेका सहाय्य करु",म्हणून कोणी डु आय डींच्या शोधार्थ निघाले. फेक अकाऊंट - अदली बदली व्हायला लागली. संपादकांच्या गाड्याबिड्या डु आय डीं ना पकडायला सुटल्या.
तेव्हढ्यात एकानी अवांतर करायला सुरवात केली.
================
भ्रमशः Lol

=))

एकमेका सहाय्य करु....कैच्या कै ओ...कंपु अस्तित्वात नै मिपावर =))...

टवाळ कार्टा's picture

21 Feb 2015 - 10:57 pm | टवाळ कार्टा

कंपू...ते काय अस्ते ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Feb 2015 - 11:52 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

काही आयडीया नाही रे. मार्गदर्शक आहेत का कोणी कंपुबाजीवर भाष्य करणारे

भ्रमशः>>>>ये रहा येक अत्रुप्त सिक्सर! =)) =)) =))

बॅटमॅन's picture

23 Feb 2015 - 6:08 pm | बॅटमॅन

खी खी खी =))

मूळ मुद्दा कुंडली लग्नासाठी जुळवणे हा आहे. हे करणेच चुकीचे आहे. नितीनचंद्र अथवा दुसरे अचुक सल्ला देतात का हे गौण आहे. वरच्या उदाहरणात त्या मुलीला असे सांगणार का या तुझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या कुंडलीत संतति योग नाही दुसऱ्याशी व्यवहाराने लग्न कर आणि प्रेमाखातर अधूनमधून याच्याशी पत्रे भेटीगाठी कर?
अजूनही काही जोडपी सायन्स पुढे गेले तरी अपत्यहीन राहतात अथवा दत्तक घेतात अथवा टेस्ट ट्युब काय ते करवतात सरोगेट करवतात तरी संततियोग नाही हे भाकित खरं ठरतंच. आपल्या मुलालाच स्पष्टपणे संततियोग नाही हे सांगणे याला म्हणतात शास्त्रावर विश्वास. यातूनच ज्योतिष हे शास्त्र आहे याची खात्री पटते.

ड्रायविंगची नोकरीला वाहनयोग नसतो. गाडी स्वत:ची चालवणे हा निश्चितच वाहनसुखयोग आहे.

तिमा's picture

21 Feb 2015 - 2:00 pm | तिमा

नितीनचंद्र यांनी हा धागा ज्योतिषशास्त्र खरे की खोटे? यासाठी काढलेला नाहीये. त्यांनी त्यांचा अनुभव, त्या शास्त्रातले ज्ञान, प्रॅक्टिकली कसे वापरता येते, हे सांगण्यासाठी काढलेला आहे. त्यामुळे ज्यांना या विषयांत रस आहे त्यांनीच थांबावे, बाकीच्यांनी चपला घालाव्या, (तात्याचे वाक्य, तात्या म्हणजे ओरिजिनल मालक), असा प्रस्ताव मांडत आहे.

परिंदा's picture

21 Feb 2015 - 3:12 pm | परिंदा

+१

ज्योतिष ह्या विषयावर लिहीले की असा धुरळा उडतोच. मग कोणी इथे ज्योतिषावर काही लिहु नयेच का?
तसे असेल तर स्पष्ट सांगावे.

थोडा अत्रंगि पाऊस पाडलाय मी. थांबलोय. उगाच मिथुन राशिकरांचा मोर्चा यायला नको घरावर.

अत्रन्गि पाउस's picture

22 Feb 2015 - 4:32 pm | अत्रन्गि पाउस

का वो आमाले ओढता ह्यात
*lol*

नितीनचंद्र यांनी हा धागा ज्योतिषशास्त्र खरे की खोटे? यासाठी काढलेला नाहीये.

जो पर्यंत तांत्रीक चर्चा चालु आहे तो पर्यंत मला काही अडचण नाही. चर्चा करण्याऐवजी जेव्हा वैयक्तीक चिखलफेक होते तेव्हा जरा मन खट्टु होत इतकच. सावित्रीबाई फुले विद्यापिठात ज्योतिष विषयाच अध्यासन सुरु करायला काही तथाकथीत पुरोगामी वाद्यांनी झारीतल्या शुक्राचार्याची भुमिका बजावत खोडा घातला.

अध्यासनाच्या माध्यमातुन ज्योतिषविषयक नियम पुन्हा संशोधनातुन तपासता आले असते. पण असे घडले नाही. आज तथाकथीत पुरोगामी ज्योतिषाला शास्त्र मानायला तयार नाहीत. संशोधनातुन जर काही नियम सिध्द झाले असते तर ज्योतिषशास्त्राला मानावे लागले असते. काही नियम आपोआपच सिध्द न झाल्याने ज्योतिषशास्त्रातुन बाजुला निघाले असते. पण स्वतः विज्ञाननिष्ठ मानणारे लोक सुध्दा ज्योतिषशास्त्राला आणि ज्योतिषाला झुरळासारखे झटकु पहातात.

गेल्या वीस वर्षात परिस्थीती बदलली आहे. जनमानसात ज्योतिषशास्त्राला मान्यता मिळत आहे त्यामुळे अश्या टीकात्मक विचाराला फारसे महत्व मी देत नाही.

माझ्या पहाण्यात असे अनेक जातक आहेत ज्यांच्या पत्रीकेत संतती योग कठीण असताना " नवसाने " त्यांना किमान एक कन्या वा पुत्र रत्न प्राप्त झाले आहे.

बहुधा तुकोबांच्या पाहण्यात नसावेत. नाहीतर 'नवससायासे कन्यापुत्र होती, तरी का लागती पती?' असला कैच्याकै प्रश्न त्या काळात विचारण्यास त्यांची लेखणी धजावली नसती.

साती's picture

22 Feb 2015 - 1:21 pm | साती

तुकोबांच्या काळात सायन्स इतकं पुढे गेलं नव्हतं म्हणून!
;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Feb 2015 - 2:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

कुठलं, कुठलं सायन्स... नवसाचं सायन्स ???

" नवसाने " त्यांना किमान एक कन्या वा पुत्र रत्न प्राप्त झाले आहे.

ओह्ह ओके, त्याला नवस म्हणतात तर !!

टवाळ कार्टा's picture

23 Feb 2015 - 3:27 pm | टवाळ कार्टा

नवस नावाची एखादी नोक्री असेल तर ;)

तर तुझ्याइतकं मन लावून काम करणारं दुसरं कोणी नसेल मला वाटतं !! =))))

टवाळ कार्टा's picture

23 Feb 2015 - 3:39 pm | टवाळ कार्टा

=))
लाईन लागेल उमेदवारांची...तुला विंट्रेष्ट नै वाट्टे :P

माझी लेखनसीमा यापुढे नसल्याने गप्प बसत आहे. व्यनि किंवा प्रत्यक्ष भेटीत उत्तर देण्यात येईल. =))))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 Feb 2015 - 3:52 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

समदा वात्रटपणा व्यणि केलात तरी चालेलं दोघांनी =))

टवाळ कार्टा's picture

23 Feb 2015 - 4:09 pm | टवाळ कार्टा

त्यापेक्षा जौन भेट त्येला...बहुसंख्य बिगर-पुणेकर पुणे म्हणून ज्या भागाला ओळखतात तिथेच कुठेतरी र्हातो तो =))

टवाळ कार्टा's picture

23 Feb 2015 - 4:06 pm | टवाळ कार्टा

=))

बिझनेस असतोय मग.. कर्तो क्का ?

सावित्रीबाई फुले विद्यापिठात ज्योतिष विषयाच अध्यासन सुरु करायला काही तथाकथीत पुरोगामी वाद्यांनी झारीतल्या शुक्राचार्याची भुमिका बजावत खोडा घातला.

अगदी योग्य काम केले. नाणेफेकीपेक्षा किंवा द्राक्षासवमत्त गृहस्थांच्या कोलांटीच्या दिशाबदलापेक्षाही कमी अचूकतेच्या या ज्योतिषास शास्त्र म्हणण्यात काहीच अर्थ नाही.

प्रकाश घाटपांडे's picture

22 Feb 2015 - 4:09 pm | प्रकाश घाटपांडे

नितिनचंद्र जी योग्य सल्ला दिलात.

एस's picture

22 Feb 2015 - 10:52 pm | एस

ज्योतिष, कुंडली, ग्रहयोग वगैरे वगैरे बाजूला ठेवून पाहिलंत तर समुपदेशनाच्या दृष्टीने आपण योग्य तेच केलंत याबद्दल मात्र आपलं कौतुकच आहे.

बॅटमॅन's picture

23 Feb 2015 - 6:12 pm | बॅटमॅन

अगदी अगदी....योग्य सल्ला.

तरीही पत्रिकेचे एक स्थान असते, विशेषतः लग्नबाजारात. एखादे स्थळ आवडले नसल्यास नाही म्हणून सांगायला पत्रिकेचा चांगला उपयोग होतो.

प्रकाशजी धन्यवाद !

ज्योति अळवणी's picture

23 Feb 2015 - 9:55 am | ज्योति अळवणी

ज्योतिष्य हा विश्वासाचा भाग आहे. प्रेम केल तर ज्योतिष्य बघू नये. जर आपला जोड़ीदार आपण निवडला आहे तर मग कोणत्याही परिस्थितीत एकत्र रहाणे महत्वाचे

कंजूस's picture

23 Feb 2015 - 11:26 am | कंजूस

हाच मुद्दा मी मांडलाय.

अमोल केळकर's picture

23 Feb 2015 - 2:19 pm | अमोल केळकर

वा खुप छान

अमोल केळकर
मला इथे भेटा

आदूबाळ's picture

23 Feb 2015 - 6:03 pm | आदूबाळ

मला स्वतः गाडी (दुचाकी, चारचाकी) चालवायला बिलकुल आवडत नाही. स्वतः गाडी चालवायची वेळ शक्यतोवर येऊ न देण्याचा प्रयत्न करतो.

प्रवासाची मात्र आवड आणि हौस आहे. बोटीपासून लाल डब्ब्यापर्यंत कोणत्याही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा त्रास होत नाही.

मग मला वाहनसुखाचा योग आहे की नाही? कंडीशनल योग असतात का?

खराखुरा प्रश्न आहे, खवचटपणा नाही.

लॉरी टांगटूंगकर's picture

23 Feb 2015 - 8:05 pm | लॉरी टांगटूंगकर

आपणांस बहुदा सार्वजनिक वाहनसुखाचा योग आहे!
आम्हाला हा योग अर्धवट मिळालेला आहे. या योगाची लक्षणे म्हणजे मुख्यत: सीट बेल्ट लावणे आवडत नाही. हेल्मेट घालणे आवडत नाही. हेल्मेट घेतांना चष्मा न घालून गेल्याने नंतर चष्मा-हेल्मेट एकत्र घालता येत नाही हे नंतर लक्षात येते आणि अजून एखादे हेल्मेट आणावे लागते.
पीएमटीच्या बस स्टॉपवर कंटाळून तुम्ही रिक्षात बसला रे बसला की लगेच पाहीजे ती बस येते. जर कर्म धर्म संयोगाने हवी असलेली बस मिळाल्यास हव्या त्या चेहर्‍याशेजारी बसण्यासाठी तुम्ही पोहोचेपर्यंत ती सीट कोणी तरी हडपतो किंवा तो चेहरा बसमधून उतरतो. एखाद्या वेळेस नशीबाच्या जोरावर आपण तिथे पोहोचलो, आसनस्थ झालो की दुसर्‍या क्षणाला भोXXXXXXX!!, भेटत नाय बे इथेच असून... असं कोकलणारा दोस्त त्याच ठिकाणी बसमध्ये चढतो.
आपल्याला विशिष्ट प्रकारचा असा एक स्पेशल वास्तू योग असतो. यात घर फार उत्तम मिळते पण तिकडे जाणारा रस्ता फार खराब मिळतो. गावची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कितीही उत्तम असली तरी हवे तिथे जाण्यासाठी बस आपल्या ठिकाणाहून किमान दोनदा बदलावी लागते. या वास्तू योगात "जमत नाय, तिकडून रिटन भेटत नाय सायेsssब" म्हणणारे रिक्षावाले खच्चून सापडतात.

आयुर्हित's picture

24 Feb 2015 - 12:45 am | आयुर्हित

असे असू शकते व त्याची काही ठराविक कारणे ही आहेत/असतात.
कृपया व्यनी करा.

बॅटमॅन's picture

24 Feb 2015 - 10:38 am | बॅटमॅन

काहो होमियोहित साहेब, प्रत्येक वेळी ते 'व्यनि करा' चे शेपूट लावल्याशिवाय चैन नाय का हो पडत तुम्हांला?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Feb 2015 - 1:38 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

होमियोहित

व्युत्पत्ती व्य.नि. कर की रे शब्दाची जरा =))

सामासिक विग्रह म्हणायचंय का चिमणराव?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Feb 2015 - 1:58 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

नाही. व्युत्पत्तीचं बरोबर आहे.

समासविग्रह केला की अर्थ वा व्युत्पत्ती एकदम स्पष्ट होईल.

आदूबाळ's picture

24 Feb 2015 - 5:44 pm | आदूबाळ

ते जौदे.

(गंभीर आवाज सुरू)

त्यांना व्यनि करा.

(गंभीर आवाज समाप्त)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Feb 2015 - 6:22 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मोड येत नाहीत का हल्ली (ऑन ऑफ करायला) =))

लोकांच्या मोडांच्या भारी रे चवकश्या तुला, रुजत घालायचेत काय?

बघा ना. नाही त्याच्यात मोड-ता घालतात.

बॅटमॅन's picture

24 Feb 2015 - 6:59 pm | बॅटमॅन

मोडावरून एका अज्ञात मोरोपंतकालीन कवीची ही धमाल आर्या आठवली.

यतिनें न वागवावा चित्तांत अल्पहि मोड कामाचा |
सुरतीं घातक जैसा युवदांपत्यासि मोडका माचा || ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Feb 2015 - 11:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

=))

बॅटमॅन's picture

24 Feb 2015 - 6:49 pm | बॅटमॅन

का हो? मोड टोर्टुगाच्या बंदरात खारवून वाळवून दूरदेशी विकणार आहात की काय =))

(मोड आलेला मोड) =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Feb 2015 - 7:22 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

येस्स. गॉथम सिटीची डिमांड आहे खास खारवलेले वाळवलेले मोड =))

आमच्या गौतमहळ्ळीत लोकांच्या एकेक अत्रंगी सवयी आहेत. वेन टावरातून किती लोकांवर लक्ष ठेवणार म्हणा. तरी टोर्टुगातून येणार्‍या मालाकडे आमचे खास लक्ष असते. कृष्णमौक्तिकनौकेकडे तर अजूनच विशेष ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Feb 2015 - 8:02 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कृष्णमौक्तिकनौका

=))

लक्ष नै दिलतं तरी चालेलं. एक्पोर्ट क्वालिटीचं पाठवतो =))

विश्वास ठेवू नका ब्रुस्वेनभौ, हे बेणं या बोटावरची त्या बोटावर करण्यात लै तरबेज है.. पायरेट जमात है शेवटी. ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Feb 2015 - 10:18 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ओ कैच्या कै कवटीला येईल ते बोलु नका...ह्या बोटीवरची त्या बोटीवर म्हणा....हम बेईमानी का धंदा भी बडे इमान से करते है.. =))

हाडक्या's picture

24 Feb 2015 - 10:33 pm | हाडक्या

हम बेईमानी का धंदा भी बडे इमान से करते है..

ए धंदा तुम बोट से करते है की बडे इमान से वो पयले बतावो बाबा.
नै तो बोट की वाट बघेगा आन तुम इमान पाठवेगा, ऐसा नही चलेंगा रे. ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Feb 2015 - 10:36 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

विचएव्हर रिसोर्स ब्रिंग्ज गोल्ड कॉईन्स =))...इमान काय आणि बोट काय.. =))

श्रीगुरुजी's picture

25 Feb 2015 - 12:04 am | श्रीगुरुजी

मोड हवेत ना. हा घ्या माईसाहेब मोड.

माईसाहेब मोड ऑन -

ज्योतिष, पत्रिका वगैरे सगळं खूळ आहे असे हे म्हणतात. आमच्या लग्नाच्या वेळी आमच्या दोघांच्या पत्रिकेत काळसर्पयोग होता म्हणे. मग तो टाळण्यासाठी नाशकात गोदातीरी जाऊन नागबळी का कसलं तरी होमहवन केलं होतं आणि मगच लग्न लावलं. तेव्हा भटजींनी खूपच दक्षिणा उकळली होती. त्या विधीची तर मला बाई भीतिच वाटली. जिवंत नागाचा बळी देतात की काय आणि तो सुद्धा आपल्यासमोर या कल्पनेनीच मी घाबरले होते.

आता हे मला चेष्टेने म्हणतात की नागबळीवर पैसे घालवण्याऐवजी तू दुसर्‍याच वराशी लग्न केलं असतंस तर तू सुखी झाली असतीस आणि मी पण सुखी झालो असतो. मी बरी ऐकून घेईन? मी लगेच ह्यांना टोला हाणला की तुमचं नशीब बलवत्तर म्हणून देवाने तुमची माझ्याशी गाठ बांधली, पण माझं मेलीचं नशीबच खोटं.

परवाच ह्यांनी मला संध्यानंदमधला नागबळीवरचा एक लेख वाचून दाखविला आणि सांगितलं की बघ आता हे फॅड किती वाढलंय ते. ह्यांचा आता कशाकश्शावर म्हणून विश्वास राहिलेला नाही.

माईसाहेब मोड ऑफ -

या योगाला प्रवास धार्जिणा असणे {अथवा नसणे} योग म्हणतात. घरचेच वाहन असले तरी हा योग असतोच असं नाही.

ज्योतिष हे एक शास्त्र आहे, ज्या लोकांना हे पटत नसेल त्यांनि ह्या भानगडित पडु नये, ज्योतिष शास्त्र हे खुप चांगले शास्त्र आहे, पण ते बघनारा त्यातिल तज्ञ माणुस असला पाहिजे तरच त्याच्या सहायाने आपण भविष्याचा वेध घेउ शकतो आणि बर्यापैकि प्रोबलेम कमी करु शकतो, पण दुर्दैवने ह्या ज्ञानातिल तज्ञ माणसे खुपच कमी आहेत आणि अर्धवट ज्ञानवर ज्या लोकांनि दुकाने टाकलि आहेत त्यांच्यामुळेच ज्योतिषशास्त्र बदनाम झाले आहे, पण नितिनचंद्रनि त्यांच्या ज्योतिषशास्त्रातिल अभ्यासावरुन त्या जोडप्याला योग्य तोच सल्ला दिला आता तो मानने किंवा न मानने हे त्या जोडप्याच्या हातात आहे त्यासाठि नितिनचंद्र यांनि त्या जोडप्यावर कोणतिहि जबर्दस्ति केलि नाहि आहे ते त्यांचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहेत.

टवाळ कार्टा's picture

24 Feb 2015 - 1:36 pm | टवाळ कार्टा

कोणत्याही एका तज्ञाचे नाव सांगाल?

हॅ हॅ हॅ. शास्त्राची व्याख्या काय हो तुमची यमगर्निकर?

नया है वह's picture

24 Feb 2015 - 7:59 pm | नया है वह

ज्योतिष हे एक शास्त्र आहे अगदी बरोबर.

लिव्ह इन पण एक शास्त्र म्हणे. ;)

यसवायजी's picture

28 Feb 2015 - 3:51 pm | यसवायजी

या प्रतिसादाबद्दल यमगर्णीकरांना "वल्डफेमस निपाणीकर" मण्डळाकडून, कळशीभरुन वेदगंगेचे पाणी देण्यात येत आहे.

असा असा कुयोग होता. बरं झालं अमक्याला विचारायला गेला आणि वाचला. शुन्यालाच बर्फ झालं. तमक्याकडे गेला असता तर दहा डिग्रीलाच बर्फ झालं असतं. याला म्हणतात शास्त्र.

जाताजाता-
होमियो सेपिअन=अखील मानव जात .
होमिओहित =मानव जातीचं हित पाहणारा {व्यनितून}भलं करणारा .व्यापक ज्ञान मिळवण्याकरता गंडा बांधून घ्यावा लागतो .

सुबोध खरे's picture

24 Feb 2015 - 7:32 pm | सुबोध खरे

कंजूस साहेब
होमो सेपियन्स आहे होमियो नव्हे
होमियो चा अर्थ तत्सम (SIMILAR) आहे
होमोचे बरेच अर्थ आहेत.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Feb 2015 - 7:34 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

कंजूस's picture

24 Feb 2015 - 8:41 pm | कंजूस

होय, होमो च पाहिजे.