भिगवण - पोएट्री इन मोशन

नांदेडीअन's picture
नांदेडीअन in भटकंती
18 Feb 2015 - 10:11 pm

माझी ‘बकेट लिस्ट’ तशी फार साधारण आणि छोटी आहे.
‘भिगवणला एकदा तरी जायचे !’ हा माझ्या या छोट्या लिस्टमधला एक पॉइंट होता.
कित्येक वर्षांपासून फक्त प्लॅनच तयार व्हायचा आणि ऎनवेळी कोणत्या तरी कारणाने तो रद्द व्हायचा.
गेल्या २ वर्षांपासून पुण्यात राहतोय, तरी योग जुळून येत नव्हता.
शेवटी मागच्या महिन्यात २९ तारखेचा प्लॅन केला आणि यावेळी तो रद्द होऊ दिला नाही.

भिगवणबद्दल ‘वेगळे’ काही लिहिण्यासारखे माझ्याकडे नाहीये, कारण भिगवण कशासाठी प्रसिद्ध आहे हे सगळ्यांनाच माहित आहे.
त्यामुळे फक्त माझा अनुभव शेअर करतो.

भिगवणबद्दल बरेच ऎकून, वाचून आणि फेसबुकवर बघून होतो.
भिगवणला जाऊन आलेले पर्यटक अनेक ब्लॉग आणि वेबसाईट्सवर संदिप नगरे (दूरध्वनी क्रमांक-9960610615) यांचा उल्लेख करतांना दिसायचे.
या संदिप नगरेंवर Pune Mirror मध्येसुद्धा एक लेख आला होता.
http://www.punemirror.in/pune/others/Birding-takes-wing-for-Bhigwans-fis...

संदिप नगरे कुंभारगावला (Birding Point) पर्यटनाचा व्यवसाय चालवतात, कसलेही ‘व्यावसायिकीकरण’ होऊ न देता.

भिगवणच्या जवळ पोहोचल्यावर रस्ता विचारण्यासाठी आम्ही फोनवरून सतत त्यांच्या संपर्कात होतो.
एका ठिकाणी त्यांच्या ‘अग्निपंख बर्ड वॉचर ग्रूप’ची पाटी दिसली म्हणून आम्ही आमची गाडी तिथे थांबवली.
तिथे काही सदगृहस्थ उभे होते, त्यांना आम्ही संदिप यांच्याबद्दल विचारले तर त्यांच्यापैकी एक सदगृहस्थ म्हणाले, ’तो पुढे गेलाय. मी तुमच्याबरोबर एक मुलगा पाठवतो, तो तुम्हाला बोटीजवळ घेऊन जाईल.’
त्यांनी बोलावलेला एक मुलगा आमच्या गाडीत बसला आणि ड्रायव्हरला रस्त्याबद्दल गाईड करायला लागला.
बरेच अंतर पुढे आल्यावर त्या मुलाने एका घराजवळ गाडी थांबवायला सांगितली.
गाडीखाली उतरून आम्ही संदिप भाऊंची वाट बघायला लागलो.
तेव्हढ्यात संदिप भाऊंचाच फोन आला.
आम्ही कुठवर पोहोचलोत याची विचारपूस ते करत होते.
आम्ही त्यांना सगळी परिस्थीती सांगितल्यावर त्यांनी आम्हाला आहोत तिथेच थांबायला सांगितले आणि थोड्याच वेळात स्वतःच्या दुचाकीवर ते तिथे आले.
तिथून गाडी परत फिरवून मग आम्ही संदिप भाऊंच्या घरी पोहोचलो.

संदिप भाऊंनी सांगितले की ज्या सदगृहस्थांनी आम्हाला पुढे पाठवले होते, त्यांचा स्वतःचा एक वेगळा ग्रूप आहे.
बरं, त्या सदगृहस्थांचा काही गैरसमज झाला असेल असे म्हणायलासुद्धा काही वाव नव्हता, कारण आम्ही संदिप भाऊंकडे आलो आहोत हे आम्ही त्यांना सांगितले होते.
तेव्हा मात्र आम्हाला जाणीव झाली की या ठिकाणी व्यावसायिक स्पर्धा सुरू व्हायला लागली आहे.

तुमच्यासोबत अशी फसवणूक होऊ नये म्हणून हा अनुभव शेअर केला.

गरमागरम पोह्यांचा नाश्ता करत संदिप भाऊंसोबत चर्चा करतांना जाणवत होते की त्यांचा पक्षी, पक्ष्यांचा अधिवास, पक्ष्यांची दिनचर्या वगैरे गोष्टींचा अभ्यास फार चांगला आहे.
पोहे संपवून संदिप भाऊंच्या ग्रूपमधल्या एका मुलाच्या होडीतून आम्ही पक्षी निरीक्षणासाठी निघालो.
एका होडीमध्ये साधारणतः ८ लोक बसू शकतात.
शेरींगमध्ये होडी केल्यास प्रत्येकी ८० ते १०० रूपये लागतात, आणि फक्त एकट्यासाठी किंवा एका छोट्या फॅमिलीसाठी सेपरेट होडी केली तर ६०० रूपये लागतात असे त्या मुलाने सांगितले.

होडीतून प्रवास करतांना आम्ही अनेक पक्षी पाहिले. (फोटो अपलोड केले आहेत.)
आयुष्यात पहिल्यांदा नैसर्गिक अधिवासात फ्लेमिंगो (रोहित पक्षी) मी इथेच पाहिले.
शेकडोंच्या संख्येने असणारे रोहित पक्षी जेव्हा एकाच वेळी आकाशात उडाले, तेव्हा त्यांना मिळालेले अग्निपंख हे नाव किती यथार्थ आहे याची प्रचिती आली.
रोहित पक्ष्यांची आकाशभरारी केवळ अनुभवण्यासारखीच !

चांगल्या दोन-अडीच तासांच्या बोटिंगनंतर आम्ही परत फिरायचे ठरवले.

फिरून आल्यानंतर आम्ही संदिप भाऊंना जेवणाचे बघायला सांगितले.
जेवण अगदी घरगुती पण तितक्याच उत्तम चवीचे होते.
विशेष म्हणजे जेवण अतिशय स्वस्त होते.
आत्ता निट आठवत नाही, पण फिश थाळी बहुतेक १०० रूपयांना आणि व्हेज थाळी बहुतेक ८० रूपयांना होती.

आदरातिथ्यासाठी संदिप भाऊ आणि त्यांच्या टिमचे आभार माणून आम्ही परतीचा मार्ग धरला.

अथांग पसरलेल्या उजनी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये होडीत बसून केलेला प्रवास आणि पक्षी निरीक्षण माझ्या कायम स्मरणात राहील.

ता. क. :-
भिगवणला बोटिंगवर बंदी आणल्याचे मागच्या आठवड्यात वर्तमानपत्रात वाचले होते.
त्यामुळे भिगवणला जाण्याअगोदर खात्री करूनच जा.

अथांग पसरलेला जलाशय

Northern Shovelers - थापट्या

बघा, मोजता येत असतील तर.
तरी फक्त ५० टक्केच आलेत या फ्रेममध्ये.
Northern Shovelers - थापट्या

Northern Shovelers - थापट्या

Asian Openbill Stork (मुग्धबलाक) and Black headed ibis (काळा शराटी)

Asian Openbill Stork (मुग्धबलाक)

Brown headed gullls (तपकिरी डोक्याचा कुरव) and Greater flamingos - रोहित/अग्निपंख (background)

Brown headed gull - तपकिरी डोक्याचा कुरव

Brown headed gull - तपकिरी डोक्याचा कुरव

Brown headed gull - तपकिरी डोक्याचा कुरव

अशी ‘बझुका लेन्स विकत घेणे’सुद्धा आहे माझ्या बकेट लिस्टमध्ये

Greater Flamingos - रोहित/अग्निपंख

Greater Flamingos - रोहित/अग्निपंख

Greater Flamingos - रोहित/अग्निपंख

Greater Flamingos - रोहित/अग्निपंख

Greater Flamingos - रोहित/अग्निपंख

Greater Flamingos - रोहित/अग्निपंख

Greater Flamingos - रोहित/अग्निपंख

Greater Flamingos - रोहित/अग्निपंख

भुरटा चोर
Brown headed gull (तपकिरी डोक्याचा कुरव) and Painted Storks (रंगीत करकोचा)

Painted Stork (रंगीत करकोचा)

Painted Stork - Juvenile (रंगीत करकोचा)

Painted Stork (रंगीत करकोचा)

Painted Stork (रंगीत करकोचा)

Brown headed gulls - तपकिरी डोक्याचा कुरव

Brown headed gull - तपकिरी डोक्याचा कुरव

Brown headed gulls - तपकिरी डोक्याचा कुरव

Grey Heron - राखी बगळा

Great Egret - बगळा

Pond Heron - वंचक

प्रतिक्रिया

चाणक्य's picture

18 Feb 2015 - 11:16 pm | चाणक्य

अवांतर:- भिगवणला हाॅटेल ज्योती मधे मिसळ खाल्लीत की नाही. ती पण भारी असते. एकदा तिथून घरच्यांसाठी पार्सल आणायची होती मिसळ. पण ते म्हणे डबा आणा, प्लॅस्टिकच्या पिशवीत नाही देणार. मग भिगवणच्या बाजारात गेलो, भांड्यांच्या दुकान शोधलं, एक स्टेलनेस स्टीलचा डबा घेतला विकत आणि त्यात घेउन आलो पार्सल.

गणेशा's picture

19 Feb 2015 - 12:19 am | गणेशा

निव्वळ अप्रतिम

सव्यसाची's picture

19 Feb 2015 - 12:43 am | सव्यसाची

जबर्‍या..! एकच नंबर..!

कंजूस's picture

19 Feb 2015 - 9:23 am | कंजूस

मस्त. एकदा का फोन नं देऊन जाहिरात सुरू केली की अधिकाऱ्यांचे लक्ष जातं. बंदी आणणे गैर नाही कारण कधी अपघात झाला (पेरियार थेक्कडी आठवा)तर ?
भंडारदऱ्यातला जो रतनवाडीतला बोटवाला आहे त्याचीपण बोट बंद केली होती. तो केरळात जाऊन शिकून प्रमाणपत्र घेऊन आला. बोटीची नोंदणी केली, पासिंगही असते. आता अधिकृत आहे. सापुतारा, वापी- दादरा तलावातले बोटवाले केरळचेच लाइसनवाले आहेत. टैक्सी ऑटोरीक्षांनाही पासिंग आणि लायसन असतेच ना ?

प्रचेतस's picture

19 Feb 2015 - 9:34 am | प्रचेतस

लै म्हणजे लैच भारी फोटो.

जयंत कुलकर्णी's picture

19 Feb 2015 - 9:44 am | जयंत कुलकर्णी

फारच छान फोटो.......मस्तच....

राही's picture

19 Feb 2015 - 9:46 am | राही

फोटो फारच सुंदर. तसेही रोहित पक्षी फोटोमध्ये नेहेमी सुंदरच दिसतो. पण प्रत्यक्ष्यात तो अधिकच सुंदर, अगदी नयनसुखाची परमावधी असतो.
माझ्याही बकेट लिस्टमध्ये भिगवण आहे. बघू केव्हा जमते ते.
जाता जाता : त्या तपकिरी डोक्याच्या कुरव पक्ष्याचे डोके तपकिरी दिसत नाही. एखाददुसर्‍या फोटोत किंचितच गुलाबी दिसले. मग त्याला तपकिरी डोक्याचा असे नाव का पडले असावे?

पिंपातला उंदीर's picture

19 Feb 2015 - 9:53 am | पिंपातला उंदीर

लै भारि. खादाडि बद्दल पन अजुन वर्णन आल असत तर आत्मा त्रुप्त झाला असता : )

नांदेडीअन's picture

19 Feb 2015 - 10:20 am | नांदेडीअन

सगळ्यांचे मनःपूर्वक आभार ! :)

@ चाणक्य
माहित नव्हते या हॉटेलबद्दल. :(

@ कंजूस
संदिप भाऊंच्या होडीमध्ये लाईफ जॅकेट असतात, इतरांचे माहित नाही.
त्यांच्या दृष्टीने हे नेहमीचे काम असले तरी शास्त्रशुद्ध ट्रेनिंग घ्यावे याबद्दल दुमत नाही.

@ राही
हे पक्षी आपल्याकडे हिवाळ्यात येतात.
हिवाळ्यात यांच्या डोक्याचा रंग असा असतो. (थोडासा राखाडी आणि कानाजवळ काळा ठिपका.)
जसा जसा उन्हाळा जवळ येत जातो, तसा यांच्या डोक्याचा रंगसुद्धा बदलत जातो.
हा खालचा फोटो बघा, उन्हाळ्यातला आहे. (इंटरनेटवरून घेतलाय.)

@ पिंपातला उंदीर
ते दोनच वाक्य लिहिताना डोळ्यापुढे त्या फिश येत होत्या आणि तोंडाला पाणी सुटले होते. :-D

राही's picture

19 Feb 2015 - 10:28 am | राही

तशी शंका आलीच होती कारण प्लूमेज किंवा मेटिन्ग सीज़नमध्ये पक्ष्यांचा रंग बदलतो तसाच हवामानाप्रमाणेही असू शकतो हे मी नेटवर पडताळून पहायला हवे होते.
त्वरित शंकानिरसनासाठी धन्यवाद.

चौकटराजा's picture

19 Feb 2015 - 11:36 am | चौकटराजा

नुकतेच आम्ही इथे जाउन आलेलो असल्याने पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला.आपले फटू आमच्या पेक्षा लय भारी आलेत.

जागु's picture

19 Feb 2015 - 11:45 am | जागु

अ प्र ति म...

आमच्या उरणच्या खाडीत येतात फ्लेमिंगो. ह्यावेळी मी पेंटेड स्ट्रोक अगदी जवळून पाहीले.

सूड's picture

19 Feb 2015 - 2:46 pm | सूड

आवडलं!!

सुहास झेले's picture

19 Feb 2015 - 3:16 pm | सुहास झेले

जबरा ... बकेट लिस्टमध्ये भिगवण भरले ;-)

सांगलीचा भडंग's picture

19 Feb 2015 - 5:09 pm | सांगलीचा भडंग

अतिशय अप्रतिम फोटो आणि माहिती

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Feb 2015 - 5:44 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अफाट सुंदर आलेत सगळे फोटो....

विशाल चंदाले's picture

19 Feb 2015 - 6:14 pm | विशाल चंदाले

अफाट सुंदर आलेत सगळे फोटो >> +१

निखळानंद's picture

19 Feb 2015 - 7:41 pm | निखळानंद

ते मनोहारी फोटोज, ती फोटोग्राफीची कला, ते वृत्तांत लेखन, या मागची खटपट, passion अणि या सगळ्याचे subject matter ते सुंदर पक्षी - सगळ्यालाच सलाम !

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Feb 2015 - 7:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

भन्नाट !

त्रिवेणी's picture

20 Feb 2015 - 10:36 am | त्रिवेणी

खुप मस्त फोटो.
आम्ही गेलो होतो तेव्हा आम्हालाही हाच अनुभव आला होता पत्ता विचारतांना. पण तितक्यात संदीप यांची मुले आली आणि घरापर्यंत नेले.
पक्षी संख्या वाढली का? कारण आम्ही गेलो तेव्हा पक्षी संख्या थोडी कमी होती. आम्ही आणि अजुन 2 मुंबईकर मुक्कामाला थांबलो होतो. आम्ही संध्याकाळी आणि पहाटे असे दोन वेळा गेलो होतो.
जेवण चांगलेच होते, संदीप यांच्या आईने फिश फ्राय खुप छान केले होते. पण चिलापी खाण्यायोग्य नाही असे मध्यंतरी वाचण्यात आले होते.
15 च्या रविवारी जावू या असे नवरा म्हणाला होता पण कट्ट्याला जायचे ठरले आणि भिगवण कॅन्सल झाले. आता या रविवारी आपली मॅच असल्याने हा रविवार ही कॅन्सल.
सो त्यापुढचा रविवार नक्की. पुणेकर कोणी येणार का?

त्रिवेणी's picture

20 Feb 2015 - 10:39 am | त्रिवेणी

सांगायचेच राहिले- तुम्ही कॅमेराच्या धाग्यावर मार्गदर्शन केल्याप्रमाणे Panasonic lumix FZ 70 k घेतला. खुप मस्त आहे कॅमेरा. आत्ता तारकर्ली ट्रीप झाली त्याच्या धाग्यावर पोस्ट करेन फोटो.
खुप खुप धन्यवाद मार्गदर्शनाबद्दल.

नांदेडीअन's picture

20 Feb 2015 - 1:09 pm | नांदेडीअन

पक्षी संख्या वाढली का?
कारण आम्ही गेलो तेव्हा पक्षी संख्या थोडी कमी होती.

असेल कदाचित.
कारण जसजसं पाणी कमी होत जातं, तशी पक्ष्यांची संख्या वाढत जाते.
उथळ पाण्यामध्ये खायला भरपूर मिळतं ना पक्ष्यांना.
मार्चच्या दुसर्‍या-तिसर्‍या आठवड्यापर्यंत अजून भरपूर पक्षी बघायला मिळतील, पण उन्हही तितकेच असह्य होईल.
त्यानंतर मात्र हळू हळू सगळे परदेशी पक्षी परतायला लागतात.

पण चिलापी खाण्यायोग्य नाही असे मध्यंतरी वाचण्यात आले होते.

याबद्दल माहित नाही.
वाचावे लागेल.

सांगायचेच राहिले- तुम्ही कॅमेराच्या धाग्यावर मार्गदर्शन केल्याप्रमाणे Panasonic lumix FZ 70 k घेतला. खुप मस्त आहे कॅमेरा. आत्ता तारकर्ली ट्रीप झाली त्याच्या धाग्यावर पोस्ट करेन फोटो.
खुप खुप धन्यवाद मार्गदर्शनाबद्दल.

अरे वा, अभिनंदन !
मस्तच आहे तो कॅमेरा.
लवकर टाका फोटो. :)

तारकर्लीबद्दल दोन वर्षांपूर्वी मीसुद्धा लिहिले होते .
इथे वाचू शकता.
http://www.misalpav.com/node/23436
त्यावेळी माझ्याकडे Panasonic FZ18 हा कॅमेरा होता.

नांदेडीअन's picture

20 Feb 2015 - 1:28 pm | नांदेडीअन

@ चौकटराजा, जागु, सूड, सुहास झेले, सांगलीचा भडंग, कॅप्टन जॅक स्पॅरो, विशाल चंदाले, इस्पीकचा एक्का, त्रिवेणी
आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. :)

@ निखळानंद
जमेल तशी फोटोग्राफी तर नेहमीच सुरू असते.
पण तुमच्यासारखे प्रोत्साहन देणारे भेटले की फिरायला आणि लिखाणातून व्यक्त व्हायला अजून हुरूप येतो. *yahoo*

आतिवास's picture

20 Feb 2015 - 1:39 pm | आतिवास

मस्त आलेत फोटो.
फ्लेमिंगो पाहणं हा एक खास अनुभव आहे!

नांदेडीअन's picture

21 Feb 2015 - 2:29 pm | नांदेडीअन

धन्यवाद. :)

रामपुरी's picture

21 Feb 2015 - 2:38 am | रामपुरी

कुठला कॅमेरा?

नांदेडीअन's picture

21 Feb 2015 - 2:29 pm | नांदेडीअन

Nikon D5100 + 55-300mm lens

अत्रुप्त आत्मा's picture

21 Feb 2015 - 3:29 pm | अत्रुप्त आत्मा

येकदम खट्टरनाक फोटूज!

सर्वसाक्षी's picture

21 Feb 2015 - 4:56 pm | सर्वसाक्षी

अतिशय सुंदर पक्षीचित्रण

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 Feb 2015 - 2:53 pm | राजेंद्र मेहेंदळे

सुंदर फोटो आणि लेख...आमचेही भिगवण असेच राहुन जातेय

नांदेडीअन's picture

24 Feb 2015 - 11:34 am | नांदेडीअन

@ अत्रुप्त, सर्वसाक्षी, राजेंद्र जी

धन्यवाद. :)

खंडेराव's picture

4 Mar 2015 - 10:32 am | खंडेराव

फोटो एकदम मस्त आलेत! बघुनच भिगवनला जावे वाटतेय.

पिशी अबोली's picture

4 Mar 2015 - 11:01 am | पिशी अबोली

अहाहा.. अतिशय सुंदर! किती नेत्रसुखद फोटो आहेत हे!

मदनबाण's picture

4 Mar 2015 - 11:46 am | मदनबाण

क्लास १ :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पांगळेपणाचे डोहाळे

नांदेडीअन's picture

4 Mar 2015 - 12:16 pm | नांदेडीअन

@ khadadkhau, पिशी अबोली, मदनबाण

धन्यवाद. :)

नाखु's picture

4 Mar 2015 - 3:36 pm | नाखु

नसेल तर मुलांना घेऊन जाता येईल का?
फोटो निव्वळ लाजवाब !!

नांदेडीअन's picture

4 Mar 2015 - 3:56 pm | नांदेडीअन

धन्यवाद.
पायपीट मुळीच करावी लागणार नाही.