बर्यापैकी अगोदर संयोजित केलेल्या एखाद्या कार्यक्रमासाठी वेळ काढण्यास सोयीचे असते या हिशेबाने कट्टा फेम मुवि यानी
कशेळे वनविहार कट्टा मिपाकरांसाठी खूप वेळ देऊन घोषित केला होता. त्यानुसार उत्साहात एक पाहिली यादी जाहीर झाली काहींच्या अचानक आलेल्या अडचणींमुळे त्यातून काही नावे गळाली. पण कट्टा पार पडला.
एकमेकाना फोनाफोनी करता पुण्याहून चिंचवडमार्गे एकूण साडेनउ माणसे जाणार हे नक्की झाले. पण हे सर मुविना ( आपल्या मिपाचे सर रविद्र जडेजा )कळविण्यासाठी त्यांच्याशी नेटवर्क हे नेटवक्र झाल्याने संपर्क होईना. शेवटी चला तसेच जाउ पाहू या पुढे असे ठरले. पुण्याहून अतृप्त आत्मा यांच्या " गाडीत गाडी परागची गाडी " या नेहमीच्या आमच्या व्हाईट अल्टो मधून समीर२०, अआ व फक्त ५० हे पहाटे साडेपाचलाच पुण्याहून निघाले . वाटेत चौकटराजा व अन्या दातार हे त्याना येउन मिळाले. निगडीहून गाडी सुटताच बुवांना एकदम आपण अमेरिकेत गाडी चालवत असल्याचा भास झाला व ते राईट साईड ड्रायव्हिग करू लागले. नशीब असे की पुढून कोणी इंडीयन ट्रक आला नाही. बुवाना चूक कळून आली व गाडी डाव्या लेनला आली.सगळ्यानी ( बुवासकट) सुटकेचा निश्वास टाकला. तेवढ्यात 'चौ रा, तेवढी दरवाज्याच्या खिट्टी लावून घ्या " अशी सूचना आली . ती पाळली गेली पण मस्करी करायचा मूड आलेल्या चौरानी " अरे खिट्टी लावायची राहिली चौरा दिसत नाहीत ते .....अ रा रा वाईट झाले. आता पेट्रोल च्या कॉन्ट्रीव्यूशन मधला एक कमी झाला !! " असे चौरानी म्हणतात एकदम हास्य कल्लोळ झाला. व सहलीचा मूड चालू झाला. देहुरोड ला चहा घेतल्यावर फक्त पन्नास गाडी चालवायला बसले. पण सुरवातीला त्यांचे व बुवांच्या गाडीचे काही ट्यूनिंग जमेना. " बुवा, तुमच्या गाडीला परपुरूषाचे वावडे दिसतेय" असे चौरा यानी म्हणतात पुन्यांदा हास्याचा फवारा. तेवढ्यात वल्ली साहेब उर्फ दूदू दू दू दू अगोबा यांचा फोन आला. " आपण न आल्यामुळे जरा मद्यार्क कमी पडला आहे ! अशी चौ रा यांची कॉमेंट येताच पुन्हा हा हा हा हा !
कुठेतरी मिसळ हाणायची म्हणून लोण्यावळ्यात अगदी महामार्ग सोडून आडवळणाला गेलो तर हॉटेलाचे कामगार नुकतेच आळोखे पिळोखे देत असलेले दॄष्य .पुढे आण्खी गप्पा मारीत घाटाचा प्रवास करून खोपोलीत दाखल झालो तरी मिसळवाल्या हॉटेलाचा पत्या नाही. मग आम्हाला वाटू लागले थेट वनविहारालाच नाष्टा करायचा की काय ? खोपोली कर्जत रस्त्याने मार खात व मार्ग काढीत काढीत कर्जत रे स्टे लगतच्या पुलाजवळ आलो. मग पाव उसळ, मिक्स भजी, वडा पाव असा भरपेट नाष्टा झाला.
फक्त ५०,समीर२०, अन्या दातार व अ आ व टेबलावर नाष्टा आहेच .
चौकात स्थानिकांशी चौकशी करून उल्हास नदीवरील पूल ओलांडून कडाव गावात आलो. इथे आंबिवली चौकशी करून मार्गस्थ झालो. सात किलो मीटर वर असलेल्या कोटिंबे गावाल नेणार्या फाट्याने उजवीकदे वळून त्या गावात आलो. पुन्हा एक नदीपूल पार करून मुविना फोन लावला.तो लागला..कुठेही न वळता सरळ या " असे त्यानी सांगितल्यावर पाचच मिनिटात वनविहार येथे पोहोचलो.
समीर२० , अन्या दातार, बुवा व फक्त पन्नास पुण्याचा पहिला ग्रूप व अर्थातच मागे गाडीत गाडी परागची गाडी
वनविहार येथे पोहोचल्यावर
वनविहार चे प्रवेश द्वार - वनविहार हे एक पर्यटकांसाठी तयार केलेले छोटेसे स्थळ आहे. एका नदीकाठी वसलेले. नदीवरून भीमाशंकर चा डोंगर दिसतो.हे वनविहार एक रम्य ठिकाण आहे. बॅडमिटन खेळायची सोय, बाहेर एक हॉल, दोन प्रकारच्या सुविधा असलेले निवास , स्वयंपाक घर व जेवणाचा हॉल अशा सोयी आहेत. शाकाहारी व मांसाहारी जेवण मिळते. सदर अतिथी गृह एका सहकारी संस्थेच्या वतीने चालविण्यात येते व वीकेंड व रविवारी इथे गर्दी असते असे समजले. श्री शिवाजी मिस्कर हे व्यवस्थापक स्वयंपाकी, वाढपी अशी सर्व कामे करतात. बुकिंग वाढले तर तात्पुरते जादा लोक कामाला घेतो असे त्यानी सांगितले. याची स्थापना होऊन २५ वर्षे उलटून गेली असून हे कर्जत जांबरुंग रस्त्यावर आहे.
मुवि व सौ मुवि यानी स्वागत केले. आमचाच ग्रूप त्यांच्या खेरीज प्रथम पोहोचलेला होता. पुण्यातील मितान व त्रिवेणी या आपापले श्री ना घेऊन निघाल्याचा एसेमेस मला आला होताच तो मुविना कळवल्यावर भरली वांगी, फ्लावर बटाटा रस्सा,कांदा भजी भाकरी असे चालेल ना? असा सवाल त्यानी केला व त्याला ओके उत्तर मिळाल्यावर त्यानी फिरून वनविहारातील सोयी दाखवल्या. एव्हाना डॉक खरे हे ही खरेच येऊन पोहोचले. अजया प्रकृति तक्रार करत असतानाही ही मितान च्या येण्याला प्रतिसाद म्हणूनच की काय कॅन्सलेशन चा बेत कॅन्सल करून येऊन पोहचल्या बरोबर श्री अजया होतेच.
चौकटराजा यांचे कॅमेर्यात निसर्गाची ही अनोखी कला बद्ध झाली आहे.
कंजुष काका सगळ्यांशी ओळख करून घेत होते. सुहास झेले, मिस्टर व मिसेस किनकिनाट , श्री व सौ मामलेदार- पंखा ई आल्यानंतर स्वत:ची ओळख करून देण्याचा कार्यक्रम थोडक्यात आटपला. काही जणांनी तेथील पोह्यांचा स्वाद घेतला. बाकी चहाचे घुटके घेत घेत कंजूश काका लहानपणीचे मित्राचे काही किस्से सांगून मनरंजन करीत होतेच.
मस्त हास्यविनोदी मूड मधे बुवा डॉक खरे जी व समीर२०
काही जण अजूनही वाटेवर असल्याने त्यांची प्रतिक्षा करीत जमल्यात गप्पा.
समीर२० अन्या, चौरा, कंजुसकाका, फक्त५० व मुविभॉय कट्टावाला सौ सह. चहाचा आस्वाद घेताहेत.
आला रे बाबानो पुण्याचा दुसरा ग्रूप - हे स्पेशल साडेचार- मितान , श्री मितान, चिं सगुणा, श्री व सौ त्रिवेणी.
कट्ट्यातील एक गोड कार्यक्रम- चिं सगुणा बड्याना खाउ देतेय ! .
मिपाकरांचा बर्डस आय व्ह्यू - खास करून खरे व मुवि
नंतर जरा परिसरात भटकून यावे म्हणून कंजूस काकांच्या मार्गदर्शना खाली जवळच असलेल्या नदीच्या पात्राकाठी असलेल्या गुफा पहाण्यासाठी हा जिना उतरून गेलो.नदीला फारसे पाणी नसले तरी ते नितळ मात्र दिसत होते. पलिकडी दूरवर भीमाशंकरच्या हनुमान तळ्यावरून वर गेले असता ही रिज लागते, तिची किनार दिसत होती. त्या उंच भितींच्या सावलीत कलावंतीण बुरूज दिसत होता.
भीमाशंकर चा हनुमान तळे येथून वर गेल्यास एक रिज आहे . तीवरून खाली पाहिल्यास पोटात गोळा येतो. त्या रिजचे दर्शन नदीकाठावरून. बाजूला डावीकडे कलावंतीण सुळका दिसत आहे.
नदीच्या पलीकडे एक दरी व अलिकडे ही जांबरुंग दरी आहे अशी माहिती कंजूस काकानी दिली. मग सर्वानी गुफात प्रवेश करून तेथील थंडावा अनुभवला. काही मूर्तीही होत्या. भेट देणार्या लोकांची मनोगते लिहिलेली एक वही ठेवण्यात आली होती. फत ५० त्यात डोकावून पहात होते. मग तेथे एक मोठा ग्र्रूप फोटो झाला. मग पायरीवर काही लोक गप्पा मारत बसले तर काहीनी नदी पात्रात प्रवेशून थोडासा पाण्यात पाय बुडविण्याचा आनंद मिळविला.
अत्रुप्त आत्मा, अन्या, मामलेदार प़ंखा व डॉं खरे यांची " खडी मैफिल"
ही दुसरी एक महफिल- सौ व श्री किनकिनाट मुवि व कंजुस काका.
भोजन आस्वादात मग्न असलेला एक कोपरा
थोड्या थोडयाने सगळे जण तो जिना दमत दमत चढत येऊन पुन्हा वनविहारात आले. जेवण तयार असले तरी आम्हा सर्वाना एकत्र भोजनाचा आनंद मिळावा म्हणून दुसर्या एका ग्रूप ला जेवावयास बसविण्यात आले. तो पर्यंत काही जण क्रिकेटची कॉमेण्ट्री एकण्यात मग्न तर काही जण बाहेरील बाकडयावर विश्रांत होउन बसले. जेवण्याच्या हॉल मधे कुणाला काय प्राणी पाळायचे याचा काही नेम नसतो या विषयाला धरून्ही एक अल्प परिसंवाद घडला. अचानक पैसे मिळण्याचे आपले अजब मनोराज्याचा कसा फज्जा उडाला याची दोन मिनिटात हकिगत चौकट राजा यानी सांगितली. जेवणाचा आस्वाद
घेण्यासाठी सामिष व निरामिष असे दोन गट वेगवेगळे बसले.
भोजन होईपर्यंत तीन वाजायला आले होते. भारताने मॅच जिंकली . सहलीला यायला एक नवे ठिकाण दिसले , मिपावरील काही नावे प्रत्यक्ष भेटली याचा सर्वानाचा मनस्वी आनंद वाटला. एकमेकांचा दृद्य निरोप घेऊन पुढच्या फेबू मधे इथे चौपट संख्येने येऊ असा ठराव करून सगळे पांगले.
निरोप घेउन पुन्हा फेब्रू २०१६ मधे एकत्र येण्याचा ठराव.
कॅमेरा न २ असलेले टोळके जातानाही तुफान हास्यकल्लोळ करीत निगडीत येऊन पोहोचले मुविंच्या उत्साहाची आठवण काढीत.
प्रतिक्रिया
18 Feb 2015 - 10:47 am | प्रमोद देर्देकर
गुरुजींच्या हातात अदृष्य चहाचा ग्लास आहे की काय असं वाटतंय. *biggrin*
किंवा काही तरी जबरा विनोद झाल्या नंतर गुरुजींनी हातातला चहाचा ग्लास तसाच खाली सोडला आणि काही क्षण हात आधांतरी तसाच राहिला असावा. +D
18 Feb 2015 - 10:53 am | अजया
छान वृत्तांत!
लेण्यांपाशी काही ऐतिहासिक दस्तावेज होते म्हणे? तिथे एका टोळक्याने बखर लिहिली असे बुवा अन्याला सांगताना मितानने ऐकले असे त्रिवेणीने तिच्या श्रींना सांगताना मी ऐकले.खरे खोटे जिमो जाणे =))
18 Feb 2015 - 5:57 pm | अत्रुप्त आत्मा
@तिथे एका टोळक्याने बखर लिहिली असे बुवा अन्याला सांगताना मितानने ऐकले असे त्रिवेणीने तिच्या श्रींना सांगताना मी ऐकले.खरे खोटे जिमो जाणे Lol>> =)) दुष्ट...दुष्ट...! =))
18 Feb 2015 - 11:00 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:
18 Feb 2015 - 11:10 am | डॉ सुहास म्हात्रे
चौरा ईष्टाईलचे चिमटेदार वर्णन आवडले. फोटोही मस्तच !!
18 Feb 2015 - 11:22 am | गणेशा
फोटो आणि वृत्तांत जबरदस्त.
५० फक्त बर्याच दिवसानी दिसले..
अवांतर :
चौरा काका .. काय सारखे मी म्हतारा हा गड च्ढेल का आण ह्याव अन त्याव चाल उअसते, फोटो तर एकदम तजेलदार दिसताय , अगदी बाजुला बसलेल्या अन्या दातारा प्रमाणे
(अन्या दातार यांनी आपण ही गोड तजेलदार आहे हा (गैर) समज करुन घेतल्यास हरकत नसावी.
18 Feb 2015 - 11:27 am | सुहास झेले
मस्त हलकाफुलका वृत्तांत...शाब्दिक चिमट्यांसकट ;-) :)
18 Feb 2015 - 11:33 am | टवाळ कार्टा
कट्ट्याला जी काही खलबते झाली त्याचे डिट्टेल्स सोयिस्कररीत्या टाळलेले आहेत असे वाट्टे :)
18 Feb 2015 - 5:00 pm | चौकटराजा
इथे आगवाले भरपूर व बंब कमी आहेत हा आण्भव असल्या मुळे.......... मुद्दाम क्यामेर्यात ब्ल्रर व्हिजन टाकले आहे त्या बाबतीत. बाकी आपल्याकडे .......
18 Feb 2015 - 11:47 am | खटपट्या
छान व्रुत्तांत्त !!
18 Feb 2015 - 12:14 pm | नाखु
पापी म्हणून फोटु दिसत नाहीत का *dash1* अजून कोणी आहे माझ्या बरोबर?
वृत्तांत "काटछाट-कात्री" लावून टाकला गेला आहे याची नोंद घेतली आहे बुवांना भेटावच लागणार *acute* सटीक 'समा"लोचना"साठी' !!!
18 Feb 2015 - 12:23 pm | टवाळ कार्टा
तुमचे "स्थान" चुकले असेल =))
18 Feb 2015 - 12:38 pm | पिंगू
चौराकाकांनी मस्तच चिमटे काढलेले दिसताहेत.. मी मात्र कट्ट्याला मिसलो :(
18 Feb 2015 - 12:40 pm | सस्नेह
वृत्तांत, निसर्ग, खादाडी आणि एस्पेशली मिपाकर्स इ. सगळे फोटूत पाहून दिल कट्टा कट्टा हो गया !
सकाळपासून बाटल्यावर बाटल्या (इनोच्या) रिचवणारी,
स्नेहांकिता +D
18 Feb 2015 - 1:22 pm | सविता००१
छान फोटो आणि सुरेख वृत्तांत.
मस्त.
18 Feb 2015 - 1:55 pm | अन्या दातार
"एका लेणीची खरडवही" असा पुढचा धागा येणार आहे काय? असेल तर उगाच टंकनश्रम नाही करत :D
18 Feb 2015 - 1:59 pm | सूड
'एका दर्पणसुंदरीची खरडवही' हे जास्त उचित वाटतंय!! ;)
18 Feb 2015 - 1:58 pm | सूड
चौराष्टाईल वृत्तांत!! यादिवशी अस्मादिक शाळामित्रांच्या-मैत्रिणींच्या गराड्यात असल्याकारणाने जळजळ झाली नाही.
18 Feb 2015 - 2:14 pm | प्रचेतस
मस्त खुसखुशित वृत्तांत.
बुवांना छळण्याची जबाबदारी चौराकाका आणि अन्याने व्यवस्थित पार पाडलेली दिसतेय.
काही फोटोंमध्ये कट्टेकरी जाम खुश तर काहींमध्ये ते दुर्मुखलेले दिसत आहेत.
चौरा आणि कंजूस यांची जोडी छानच जमलेली दिसत आहे.
कट्ट्याला मिसल्याची लै हळहळ वाटतेय.
18 Feb 2015 - 4:57 pm | चौकटराजा
बुवांना छळण्याची जबाबदारी चौराकाका आणि अन्याने व्यवस्थित पार पाडलेली दिसतेय.
छ्या ! काहीतरीच काय ? तुमची बरोबरी आम्ही काय करावी. आम्ही वेगवानमारा केला फिरकी ,तिरकी ,गिरकी तो सगळा आपला प्रांत. बुवानी आमची बायोलॉजिकल फालयम सांगितली नाही.
18 Feb 2015 - 2:14 pm | स्पंदना
भारी वर्णन चौरा काका!
तो बर्डस आय व्ह्यु .. :))))
स्वतःचा बरे नाही तो तसला बरडस आय व्ह्यु?
बाकी किणकिणाट एकदम शांत दिसताहेत.
धमाल आलेली दिसत आहे. फेबू कट्ट्याला शुभेच्छा!!
18 Feb 2015 - 2:18 pm | सूड
+१ ;)
18 Feb 2015 - 5:03 pm | चौकटराजा
पहिया चित्रात उजवीकडील फिगर ही एका आत्म्याचा फोटो आहे. सबब तो असा पुसट ( अर्ध अंतर्धान) आलेला आहे. पण आमचा आता दावा आहे की आत्मा ही नुसती कल्पना नाही आम्ही चक्क फोटो काढला आहे. स्वॅप यांच्या पुढे एक पाउल.
18 Feb 2015 - 11:45 pm | एस
हाहाहाहा! अगदी अगदी!
18 Feb 2015 - 5:30 pm | अत्रुप्त आत्मा
...........वनविहार - मिपा कट्टा - कॅमेरा नं ३..(उर्फ थर्ड आय ऑफ अत्रुप्तबाबा!) .........
हा येणार्,तो येणार करता करता ,अगदी आदल्या रात्रीपर्यंत प्लॅनिंग होता होता.. पुणे आगारातून पहिल्या गाडिला ..मी ,समीर२०,धूमकेतू पण्णासराव असे तिघे भल्या पहाटे साडेपाचला डबल बेल मारली. फुडं पिंपरीचिंचवड अगारात, एक ........ (असो! =)) ) व्यक्तिमत्व-चौराकाका, आणि त्याच आगारातील एका कुटीलं हत्तीचा व आमच्या आगारातील एक हलकट बोकडाचा आत्मा उधार घेतलेले सणमाणणीय अन्याभाऊ दा'तारकर..असे येकंदरीत पाच जण (एकदाचे.. ;) ) निघालो.
आम्ही हुंबै रोडला लागल्यावर समीर२०..यांनी पुणे गेट या हाटील बद्दल एक मद्यार्की कॉमेंट मारली..आनी त्यामुळे अचानक आमचा मणावरिल वरिजणल ताबा सुट्ला ( आपल्यावरिल आरोप दुसर्यावर कसे ढकलावे..हे वल्ली...आपलं ते हे..,हल्ली..हल्ली आंम्ही चांगलेच शिकलो आहोत! =)) ) आणि संपूर्ण रस्ता हा आपल्याच बाजुचा आहे असे भासून काहिक्षण आम्ही आमच्या शियेन्जी खेचरा सह एकं-दरितच, (काहि समाजवाद्यांप्रमाणे...) उजवीकडे झुकलो. पण समोरून येणारा आमच्याहून कट्टर स'माज-वादी बाइकवाला असा काहि आमच्या अंगावर आला,की आम्हाला त्वरित आपला रस्ता-चुकल्याचे नि'दर्शनास आले. पण त्याच वेळी समीर२०..यांनी अहो..अहो..अहो.. करत इतक्या ज्जोर्रात हाळी दिली,की आम्ही स्वमताच्या निर्णयावर येण्यापूर्वीच आमच्यावर-त्यांचा प्रभाव पडला.आणि आंम्ही परत, डाविकडे-झुकलो. (पहा लोकहो..पहा..समीर२० हे आमच्या डाविकडे बसलेले असल्यानी आंम्ही त्यांच कित्ती त्वरेने ऐकलं.कारण आंम्ही लेखन्,ब्याटींग्,बॉलिंग इत्यादी सर्व काहि डाव्याच हताने करतो. आंम्ही जन्मजात-डावे आहोत.बॉर्न कम्युनिश्ट ;) त्यामुळे काहिही डाविकडून-आलं,की कसा त्याचा चटकन स्विकार होतो..पहा! ह्हा ह्हा ह्हा! :D ..प्र'कटन समाप्त. :p ) आणि मग मात्र उरली आणि सुरली झोप उडवण्यासाठी लग्गेच आंम्ही पहिल्या चहाला थांबलो. पण काहिवेळा काहि गोष्टींचा आंम्हा डाव्यां'वर विरुद्ध परिणाम होतो..हे पुन्हा एकदा प्रत्ययाला आले. त्या कडक छा...नी आमची झोप उडविण्या ऐवजी परत-आणवली. मग आंम्ही आमच्या सीएनजी-खेचराची दोरी पण्णासांचे हाती सोपवली.आणि स्वतः मागील सीट्वर मात्र उजव्या-बाजुस बसलो. (पहा... आंम्हा डाव्यांची करामत, जबाबदारी दुसर्याच्या अंगावर ढकलंली की कसे आंम्ही लग्गेच -उजवे होतो ते! ;) ) तिथून..(म्हणजे देहु-रोड फाट्याहून हां!..) पण्णास यांनी गाडी-चालवायला सुरवात केली.
मागे आमची ५ मिनिटं झोप होते नाही तोवरच.. पिंपरी आगारातून एका छळू हत्तीचा फोण आला,आणि त्यानी माझ्यावर (नेहमीप्रमाणे :-/ ) -
अश्या अनेक (अर्थातच..) निरर्र्थक ( =))))) ) प्रश्नांचा भडि-मार सुरु केला. आंम्हि ही मग सराइत उजव्या विचारवंता प्रमाणे प्राथमिक एक दोन वाक्यांची प्रस्तावना करुण "आता पुढे ते बोलतील" असं म्हणून स्वतःच्या माथी आलेलं काम , चौ रा का का ..या अनुभवी संसदसदश्याकडे ऑऊट सोर्स क्येलं. आणि पुण्ण्हा णिवांत जाहलो.. पण तोपर्यंत त्या दोघांचे आत्मे उ-धार घेतलेल्या अन्याभाऊ दातारकरांनी माझ्या मेंदूचा ताबा घेण्याचे काहि क्षीण प्रयत्न केले. पण मी ही ह्या हल्ल्याला चांगलाच सरावलेला असल्यानी,ते सर्व दुर्लक्ष नावाचे हत्यार वापरून निकामी केले. पुढे पण्णास आणि समीर२० यांच्या छान गप्पा चालल्या होत्या.पण त्या सर्व त्यांच्यासाठी छान आणि माझ्यासाठी अंगाईगीत म्हणून उप योगास आल्या. आणि नाश्ट्याचे ठिकाण यीई परेंत माझी एकंदर छान गै..गै.. झाली.
मग आमच्या रायगडातला फेवरीट उसळपाव निवांत चरून झाल्यावर ,आंम्ही परत शेवटच्या टप्प्याकडे प्रस्थान केले. पुणे आयोजक चौराकाका यांना वनविहारापर्यंतच्या रस्त्यातील झाडे व दगड सोडता अख्खा रस्ता गावं वस्त्यांच्या खुणांसह पाठ असल्यानी लौकरच आंम्ही अपेक्षित स्थळी जाऊन थडकलो. पण मधे (एकदाच्या कनेकट जाहलेल्या :-/ ) मु.विं.च्या फोनवरून ..ते दारातच वेलकम्चा बोर्ड घेऊन हुबे असतील,असे मानसचित्र जे तैय्यार जाहले होते.. ते मात्र गेल्यावर विरले. वनविहारात खेचर पाण्याला सोडून आंम्ही उतरलो..पण मु.वि.कुठेच दिसेनात. आम्म्हास वाटले,की ते ही कंजूसकाकांसह डोंगरात ग्येले की काय? पण तसे नव्हते..कंजूस काका किल्ल्यावरून आभाळात फिरून आलेले होते..पण मु वि मात्र आदलेच दिवशी-रात्रीपासून, आभाळातून*-किल्ल्यात आलेले असल्यामुळे.. ते कदाचित मूळ सूचनेच्या अंमल-बजावणीस विसरले(असावे! ;) ) असा आंम्ही ग्रह करवून घेतला. (* - अधिक खुलाश्यासाठी व्य.नी. धाडावा! ;) ) मग आमच्या बोंबल्यावरून नवग्रहशांती सुरु केल्यावर त्यांचा एकाच वेळी फोनवर आणि आजु बाजुनी सुद्धा आवाज ऐकू येऊ लागला.. आमचे श्रद्धाळू मण आंम्हास म्हणू लागले...
पण तेव्हढ्यात त्या आध्यात्मिक केंद्रातल्या झाडी आडूनच हा आवाज (त्याच आभाळ-मायेनी =)) ) रि-पिटतो आहे, हे आंम्हास आंम्ही कोकणच्या मातीत आलेले असल्याने लग्गेच ध्यानात आले!
आणि मग या या... करत मु.विं.नी आमचे स्वागत केले. वेंट्रीलाच एका ठिकाणी सौमुविंनी नाजुकशी छान रांगोळी काढली होती..मग प्रथम आंम्ही त्या रांगोळीमागे या चौरा मुवि यांना हुबे करुण पहिला फोटू मारला.

आणि आंम्ही.., थतल्लीच दोन पाना,आनी यका दगराची सुपरी-घेऊन..,संमेलनाचा विडा-लावला.
(विडा उलटा-का लावला..असे खौट पणे विचारू नये,नायतर त्याच विड्यावरील चिक्कू तिथूनच फेकून मारण्यात येइल. =)) )

मग हळू हळू हुंबै आगारातून बाकिच्या गाड्याही आल्या (आणि अजया तैं सह..एक डबडे,थोडा कोळसा,एक साधीदोरी, सुमारे अर्धाडझन चपला आणि एक शिमिटचं पोतं..अश्या आहेराच्या वस्तूहि आल्या! *mosking* ) मग सर्व मंडळी चहा,नाश्टा आणि समीर२० नी आणलेल्या अप्रतिम चिवड्याचा,व अन्यानी आणलेल्या लाडुंचा, खर्यांच्या आणलेल्या चकल्यांचा आस्वाद घेऊ लागली. थोड्याच वेळात पुण्याहुन मितान आणि त्रिवेणी ह्या सहकुटुंब आल्या आणि मग,..आधी आलेल्या अनाहिता- आणि या... ,असा एक "हा.........य!!! अश्या खास आवाजांसह -, हृदयंगम भेटी सोहळा पहाण्यास मिळाला. मग.., सगळेजणं जेवण पूर्व अवस्थेला पोहोचण्यासाठी वनविहाराच्या मागील तो जुना लेणीविहार आणि पाठमोर्या भीमाशंकराचे दर्शन घेण्यास निघालो.






खाली उतरल्यावर समोर ती नदी आणि पाठमोरा भीमाशंकराचा डोंगर .. याची समग्र माहिती कंजुसकाकांनी ऐकवली..मग पुढे हा विहार दिसला
विहार समान्यतः सारखाच असल्यानी फारसे काहि विट्रेश्टिंग असणार नाही हे कळत होतेच..पण मी अन्या मा.प. असे आत मधे त्या जागेचा फायदा घेत काहि मंत्र ,आवाज, गाणी इत्यादीत गुंतलो असतानाच ..पण्णासरावांनी मात्र...तेथील ख'रडवही खरच-चाळायला घेतली.. (५०फक्त..यांचे चेहेर्यावरचे भाव पहा-लोक्स! =)) )
आणि आदलेच दिवशी असलेल्या व्ह्यालेंटाइन डे च्या पीरेमाचा त्यात वहात असलेला पूर त्यांण्णा सापडला.. आंम्ही त्यात सामिल झाल्यावर पुढील अर्धा तास (नाही नाही त्या.. =)) ..) अशक्य जोकिंग मधे गेला..
जे बिचारे ते दोघेजण..तिथे ती अभिप्रायरूपी प्रथमप्रेमी ग्गोग्गोड खरड टाकुन गेले होते.. ते जर तिथे लपून हे ऐकत असते,तर त्यांनी -ह्या प्रेमटवाळक्या मानवजातीवर् ( =))))) ),चिडून..त्याच नदीतून.. प्रायश्चित्तार्थ ...आजन्म भीमाशंकराच्या डोंगररानात आश्रयासाठी तात्काळ प्रस्थान केले असते... :D
पण तेव्हढ्यात संपादिका बै...
(ज्या आत..विहारात छडी घेऊन बैसल्या होत्या.. =)) )
त्या..हा कोलाहलं ऐकून बाहेर आल्या..लग्गेच कुणीतरी (मुख्याध्यापक आले ..च्या चालीवर..) ओरडा करूण... शूशूक्क्क्क.. केले. मग आंम्ही काहि काळ दूर जाहलो,तर संपादिका बैं नी त्यात काहितरी एडिटिंग सुरु केल्याचे दिसले.. आंम्ही नंतर त्या विहारी खरडवहीत काय दिसणार??? .. म्हणून विचार करत असता... जरा वेळानी जाऊन पहातो..तर काहिही कापले न जाता..चक्क त्यात वाढ..दिसत होती... आंम्ही म्हटलं... "हे संपादकांच्या देवा... तू धर्मात सूट दिलीस काय?" पण नाही!, जेंव्हा त्यातील ती-भर वाचली..आणि त्याखालचं संपादिका बैं नी टाकलेलं नाव वाचलं,
त्यावरून ... संपादिका बैं चा - "टोपिवाले आणि माकड कंपनी"- हा खरा खरा डू आय डी आहे, =))))) हे ध्यानात आले.
त्या प्रसंगाचा भरपूर मजा घेऊन मग आंम्ही खाली नदीत काहि काळ हुंदडलो.. मग जरा वेळ तिथल्या मागच्या (आमच्या ;) ) घाटावर विश्रांती घेतली ..आणि- डॉ.खर्यांचं , कट्ट्यातल्या अनेकांपैकी...(म्हणजे प्रवचन करणार्यांपैकी..असंच्च म्हणायचय मला! =)) )-एक प्रवचन ( आता आमचं मरण! =)) ) आंम्ही ऐकलं. आणि जरावेळानी त्या वादविवादात आम्म्ही वर..म्हणजे सदर घाटाच्या-वर गेलो असता..आंम्हास मागुन एक अप्रतिम फोटु मिळाला. आजवर आपण चंद्रावरचे खड्डे अनेकदा पाहिले... पण खड्ड्यात गेलो तरी ,आपणास जवळून कध्धिह्ही ( ह्ही ह्ही! ) चंद्र पहावयास मिळत नाही..आणि तो ही एक नव्हे...........तर तीन!

=)) ओळखा पाहू... हे कोणकोणत्या ग्रहाचे (मरा आता! =)) ) चंद्र!? =))
यातले पहिले- खरे-..खरे, दुसरे- खरच-खरे,आणि तिसरे- खर्याहूनी-खरे!
मग मात्र काहि काळ वरच्यांचा हास्यात गेला आणि सर्वांना लागलेल्या भुकेची जाणिव जाहली. मग सर्व जणं त्या लाइट उन्हातूनही ह्हाश्श हुश्श करत परत -वरती आलो..आणि समोर आलेल्या साध्या परंतू चवदार अन्नाचा यथेच्छ समाचार घेतला. तंगड्प्रेमींन्निही मनसोक्त -तंगड्तोड क्येली. आणि जेवणानंतर पुन्हा मागच्या हॉलमधे काहि काळ गप्पांमधे गेला. प्रत्यक्षभेटीमुळे कंजूसकाकांनी ही त्यांचं प्रश्नोपनिषद ठरल्याप्रमाणे माझे समोर उघडलं..मी ही उत्तरलो. आणि मग पुन्हा अश्याच भेटीच्या ठरावानंतर आमच्या गाड्या आपापल्या गावी पांगल्या....

===================================
मात्र हे संमेलन खर्या अर्थानी सं-मेलन झालं,ते या जोडगोळी साठिच..
आंम्ही काहि कोणी एकमेकांना अपरिचित नव्हतो..पण यांच्या ज्या गप्पा मस्त रंगत होत्या,त्यावरून तरी माला हे वरिल काहि जाणवलेलं आहे.. :)
आपण ते ..या हळूच घेतलेल्या फोटोतंही पाहु शकता. अश्या छोट्या छोट्या संमेलनातून हेच तर साधायचे असते. नाहितर,त्या डोंगरदर्या राईपर्वत निसर्गाला जगायला कारण काय राहिल? सांगा बरं? :)
..........................
18 Feb 2015 - 6:00 pm | प्रचेतस
छान.
उत्तम उपवृत्तांत.
18 Feb 2015 - 7:18 pm | गणेशा
जबरदस्त ... एकदम झकास लिवलय
18 Feb 2015 - 6:22 pm | चौकटराजा
बुवा, सर्व काही सांकेतिक पणे आले आहे. एका अनाहितेने आम्ही आमचा चंद्र दाखविला नाही या बद्द्ल तक्रार केली होती. आम्ही मुविला अहो मेहुणे असे का म्हणतो त्याचा मस्त फोटो आला आहे. ओ, त्या अनिहिता हा फटू पहावा आपण. आता काय तक्राद नाही ना ?
19 Feb 2015 - 5:55 am | स्पंदना
न्हाय न्हाय :))
आणि ओ चौरा काका..म्या मिपाकरीन फर्स्ट आन मग अनाहिता आहे. काय?
18 Feb 2015 - 6:55 pm | रेवती
चौराकाका व आत्मूबुवांचा वृतांत व फोटू बहारदार आहेत.
18 Feb 2015 - 9:09 pm | मधुरा देशपांडे
बहारदार वृत्तांत.
18 Feb 2015 - 7:43 pm | पैसा
मस्त वृत्तांत आणि फोटु! अत्रुप्त बुवांची वॅल्यू अॅडिशन पण कमालीची!!
18 Feb 2015 - 8:28 pm | अजया
दुष्ट दुष्ट बुवा,तुमची खरडवहीतली अॅडिशन कुठेय?
18 Feb 2015 - 8:49 pm | अत्रुप्त आत्मा
=)) येतिया! वैच थांबा! :-D
18 Feb 2015 - 10:47 pm | अत्रुप्त आत्मा
@तुमची खरडवहीतली अॅडिशन कुठेय?>> ही घ्या! :D

18 Feb 2015 - 9:02 pm | कंजूस
मस्तच लिहिलं आहे अतृप्तबुवा नाही अतृप्तबाबा {आता हा आइडी कोणीतरी अगोदरच बुक करा}.
18 Feb 2015 - 9:17 pm | अत्रुप्त आत्मा
=)) येतिया! वैच थांबा! :-D
18 Feb 2015 - 11:27 pm | जुइ
फटु!!!!
19 Feb 2015 - 5:57 am | स्पंदना
आत्मुस :))))
ही हा हा :))))
19 Feb 2015 - 9:02 am | कंजूस
एकमेकांची खेचणे ही सुप्त इच्छा प्रत्येकातच दडलेली असते शाळेत ती पूर्ण होते. पण नंतर कुठे अजमावयाला मिळत नाही. कट्ट्याच्या आणि संस्थळाच्या माध्यमातून पुन्हा एकदा - -.आणि कोणी मनावरही घेत नाही.
19 Feb 2015 - 9:44 am | अजया
कॅमेरा नं ४से वृत्तांत!
रविवारी सकाळपर्यंत आपल्याला बरं नाही तर कट्ट्याला नाही जाता येणार हे वाटून घरात दर्दभरे नगमें ऐकवत बसले होते.तेवढ्यात मितानने रात्रीच टाकलेला मेसेज पाहिला.मी आणि त्रि कट्ट्याला जातोय उद्या.ते आमच्या ह्यांना दुःखी अंतःकरणाने सांगीतल्याने आणि आदल्या दिवशीच्या दवाखान्यात घालवलेल्या संत व्हॅलेन्टाईन प्रगटदिनाला केलेल्या आवाहनाने ह्यांच्या तोंडून संत वदले,चल जाऊन येऊ कशेळीला,जवळ तर आहे!बघू दे तुझे मिपाकर! मग मला अचानक बरे वाटायला लागले!बघता बघता तासाभरात पोचलो.तिथे आधीच मुरलेले कट्टेकरी त्यात पूणेकर हजर होते.अंदाजाने सर्व ओळखु आले.पण अन्या दातार,समिर यांच्यातलं एक टवाळ कार्ट आहे की काय वाटत होते =)) त्याला द्यायचा खाऊ आणलेला ना!पण आमचा आवडता आय डी म्हणे अाम्हाला घाबलुन आलाच नाही!!
तेवढ्यात अभ्याने फोनवरुन कट्टयाला हजेरी लावली.त्याचा कोणीच उल्लेख केला नाहीये,जळ्ळे मेले मित्र त्याचे ^_~
आमच्या ह्यांनी मिपाकट्ट्यासाठी चाॅकलेटं आणली होती.ती मितानसुता सगुणेने वाटली.तेव्हा तिथे समोर दिसणारा चिवडा मिळेल असं वाटत होतं पण चिवडामालकांनी तो आॅफरच केला नाही.तेव्हा काढलेल्या फोटोत काही लोक दुःखी दिसत आहेत.त्याचे कारण हे!
मग चहाच्या राऊंड्स झाल्यावर सगळे लेणी आणि नदी बघायला निघाले.लेण्यांच्या आता सुरेख गारवा शांतता आणि अंधार असल्याने काही जोडपी व्हॅलेन्टाईन दिन साजरा करायला आली होती.पण त्यांच्या आजुबाजूला मिपाकर दंगा करत होते.ते अंधार्या गुहेत गेले तर एक मिपाकर तिथेच मोबाईलचा फ्लॅश मारुन आत मूर्ती आहेत का बघायला गेले =)) शेवटी ते जोडपे बाहेर येऊन ही भूतावळ जायची वाट बघत बसले.तिथेच घोळका करुन काही मिपाकर बखर लिहित गोंधळ घालत होते.त्याचा फोटो जोडप्यासह आलाय!पण लॅपटाॅप सध्या हाॅस्पिटलात आहे.मिळाला की टाकेन.
नंतर कंजूसकाकांचे कंजूस किस्से ,डाॅ खरेंसोबत गप्पा ऐकताना तर "आमचे हे"मला विसरुन गेले!
वर परत आल्यावर निवांत झोपाळ्यावर बसुन गाॅसिप केलं!!त्यामुळे चार्ज्ड अप होऊन जेवण अंमळ दोन घास जास्तच जेवलो.
मग रुममध्ये गेलो तर तिथे लाडवाचा डबा गावला.त्याचा समाचार घेतला.ते अन्याने आणलेले.छानच होते.
मग परत गप्पाटप्पा होऊन आवळा कॅन्डीची खरेदी करुन निघालो.मस्त रिफ्रेश होऊन.आता कोणी फोटोवरुन काहीही अंदाज बांधू दे पण माझा मितभाषी नवरा निघाल्यावर म्हणे,मजा आली की.मीही येत जाईन यापुढे कट्ट्याला!हाच कट्टयाचा करिष्मा.नेहमी आपलीच ओळखीची मित्रमंडळी जमवुन गाॅसिप करण्यापेक्षा वेगवेगळ्या आधी न भेटलेल्या मिपाकरांना आपले पूर्वग्रह बाजूला ठेवुन भेटायला खरंच मजा येते.कधीतरी प्रत्येक मिपाकराने ट्राय करुन बघाच!वाचताय काय नुसतं सामिल व्हाच!!
19 Feb 2015 - 10:00 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
इनोचे चार मोठे डबे इकडे पाठवुन द्या.
@अन्या दातार...आज भेटलास तर लाडु पाहिजेत =))
*ROFL* *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =)))))) दुss Ssss sss ssssSSssssss SsssssSSSSSssssssssSSSSष्टपणाची परिसीमा. =))
19 Feb 2015 - 10:00 am | चौकटराजा
मस्तच गं अजया !
( रेवती, पैसा, त्रिवेणी ,स्नेहांकिता च्या मालकीचा हा खरे तर हा प्रतिसाद ! )
19 Feb 2015 - 6:45 pm | रेवती
सहमत हो काका!
19 Feb 2015 - 12:32 pm | टवाळ कार्टा
मी आदल्या दिवशी दिवसभर बाईकवर भटकत होतो त्यामुळे जम्ले नाही कट्ट्याला येणे....आणि अनाहितांना कै घाब्रायचे (स्वगत - अस्ल्या ५६....जौदे धाग्याचा वधुवर व्हायचा :) )
अनाहिता आणून आणून चिन्धीगीरी करून लिमलेटच्या गोळ्याच आण्णार होत्या...मी अख्खा कॅडबरीचा खोका घेऊन येणार होतो :P
19 Feb 2015 - 12:42 pm | अजया
घरी ठेवलेला कॅडबरीचा खोका!त्याचं काय कौतुक!
19 Feb 2015 - 12:45 pm | टवाळ कार्टा
तुम्हाला पण कट्ट्याला आण्लेल्या खुळखुळ्याचे कै कौतिक :P
19 Feb 2015 - 1:23 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
झैरात!!!! फ्लेक्स छापुन घे रे आणि लाव मुंबैभर =))
२-४ इकडे पाठाउन दे...सगळ्या टोलनाक्यांवर लावतो =))
19 Feb 2015 - 1:57 pm | टवाळ कार्टा
=))
19 Feb 2015 - 10:02 am | श्रीरंग_जोशी
झाले बहु, होतील बहु पण या सम हाच.
सर्व फोटो व विविध वर्णनांवरून हे संमेलन खूपंच खास झालेलं दिसत आहे.
भविष्यात फटुबरोबर व्हिडिओ पण प्रकाशित करावेत ही प्रार्थना.
19 Feb 2015 - 12:39 pm | मदनबाण
वॄतांत आवडला ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोदींनी नऊ महिन्यांत केले काय?
19 Feb 2015 - 1:02 pm | कंजूस
इथे वनविहारात खासगी आणि सार्वजनिक दोन्ही जागा भरपूर आहेत त्यामुळे एकाच महाकट्ट्याचे पाच मिनीकट्टे झाले. स्वातंत्र्य आणि अर्धापाऊण तासाने ऑर्डर दिलीत का ची भुणभुण नसणे यामुळे सर्व कट्टेकरी चेहऱ्यावर उसने हासू न आणता वरिजिनल लांब चेहऱ्याने आपला मुद्दा आणि विनोद समोरच्या माणसाच्या गळी उतरवण्याच्या खटपटीत होते.आम्हीही चौकटराजांवर इंप्रेशन मारण्या गुंग असतांना कैमऱ्यात पकडले गेलोच. सावलीची पार्कीँग मिळाल्याने कार्स आणि त्यांचे मालक खुशित तेतते Tetate (=गप्पा फ्रेंच)करत होते. एकजण झाडीत क्लिकक्लिकाट करत होते त्याचा परिणाम वरच्या फोटोंत आला आहेच.काही मिपाकरांनी नको तिथे नको त्यावेळी उजेड पाडून इतरांच्या आनंदात विरजण घातले ही गोष्ट नोंदवून संपादकीय कामाचे ओझे बाळगत आनंदी चेहऱ्याने वावरणे कित्ती अवघड असते हे दाखवले. लांब आणि गंभिर चेहरे असण्याची आणखी काही गुप्त राजकीय परिस्थितीजन्य कारणे असण्याची शक्यता नाकरता येत नाही.
19 Feb 2015 - 6:34 pm | आरोही
सगळे वृत्तांत मस्तच !!!
20 Feb 2015 - 10:51 am | सविता००१
मस्त. भारी आहेत. फोटोही सुरेख