कशेळे वनविहार येथे १४-१५ फेब्रुवारीला मिपा कट्टा ठरल्यावर शनिवारी जवळचाच पेठचा किल्ला पाहून रविवारी सकाळी खाली कट्ट्याला येण्याचे ठरवले होते. हा ट्रेक फारच सोपा आहे आणि फार वर्णन न करता फक्त फोटो देत आहे.
१)सकाळी.
१ब
२)या स्वागत आहे.
३)दरवाजा.
४)
५)दरवाजातून खाली पाहताना.
६)रविवारी सकाळी.
७)शनिवार संध्याकाळी.
८)चला पेठच्या किल्ल्यावर.
९)दूरवर खाली जाम
रूघ गाव ,पुढे कलावंतीणीचा महाल-सुळका ,मागे भिमाशंकर डोंगराची शिखरे.
१०)वरच्या कट्ट्याची सोबतीण. निमित्त: व्हलेंटाईन डे आणि नाइट.
११)
१२)पेठ गडावरचा देव.
१३)उंच झाड.
१४)आणि हा सेल्फि व्हलेंटाइनसाठी.
__________________
प्रतिसादातले चार दिसत नाहीत ते
१)
२)
३)
४)
प्रतिक्रिया
18 Feb 2015 - 8:08 am | मुक्त विहारि
झक्कास...
18 Feb 2015 - 8:33 am | अजया
मस्त!थोड्याश्या पाय-या चढून धापा टाकणारे आम्ही आणि लीलया किल्ला चढुन उतरुन परत कट्ट्याला येणारे तुम्ही!
18 Feb 2015 - 8:44 am | नाखु
नुसतं स्वस्तात पण तरी मस्त ! ही कल्पना भन्नाट आहे!
18 Feb 2015 - 9:28 am | पैसा
झकास फोटु!
18 Feb 2015 - 10:30 am | खटपट्या
जबरा फोटो !!
शेवटच्या फोटोमधे काय स्माईल दीलाय तीने :)
18 Feb 2015 - 10:45 am | डॉ सुहास म्हात्रे
डबल बेनेफिट स्कीम आवडली ! मस्त फोटो :)
18 Feb 2015 - 3:34 pm | मदनबाण
+१
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- स्वाईन फ्लूचा कहर, देशात 624 बळी, राज्यात बळींचा आकडा 72 वर
18 Feb 2015 - 2:06 pm | प्रचेतस
कंजूसकाका रॉक्स.
मुक्काम किल्ल्यावरच्या लेणीत केला का खाली वाडीत?
18 Feb 2015 - 4:55 pm | कंजूस
वरच्या लेणीतच आणि साथीला प्रिया होतीच.
18 Feb 2015 - 5:08 pm | प्रचेतस
हाहाहा =))
18 Feb 2015 - 5:11 pm | अजया
=))
20 Feb 2015 - 11:03 am | सविता००१
:))
18 Feb 2015 - 2:07 pm | सूड
फोटो दिसत नाहीयेत
18 Feb 2015 - 2:08 pm | अन्या दातार
>>एका दगडात दोन कट्टे- एक कंजूस प्लान
याहून कंजूसपणा दुसरा तो काय? नावाला जागलात ;)
18 Feb 2015 - 2:27 pm | स्पंदना
साथीदार आवडली. नो बक बक, नो पकपक ओन्ली गप गप!!
18 Feb 2015 - 3:06 pm | अत्रुप्त आत्मा
:Happy:
18 Feb 2015 - 3:27 pm | सुहास झेले
मस्तच... :)
20 Feb 2015 - 7:09 am | चौकटराजा
कंजूस काका, पुढच्या भटकंतीत प्रिया नसणार तेंव्हा आताच " प्रिया आज माझी नसे साथ द्याया " हे गाणे पाठ करून ठेवा
बरं !!
20 Feb 2015 - 8:07 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
कालचं अन्या दातारकडुन किस्सा ऐकलाय...बेक्काsSSsssSssर हसलोय...!!! =))
20 Feb 2015 - 8:26 am | अत्रुप्त आत्मा
आंsssss :-\ दू...दू...दू...! :-\
आम्हाला सांगा ना हे प्रिया करण काय ते! :-\
20 Feb 2015 - 8:46 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
ऐकीव ष्टॉरीप्रमाणे... =))
20 Feb 2015 - 2:00 pm | कंजूस
१)
२)
३)
४)
20 Feb 2015 - 2:47 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
तो तोफेचा फोटो काय अप्रतिम आलाय हो. तो जर का एक्झॅक्ट मिरर अँगल मधे काढला असता तर सुर्य म्हणजे तोफेतुन सुटलेल्या गोळ्यासारखा दिसला असता. =))
20 Feb 2015 - 12:53 pm | कंजूस
प्रिया प्रकरण असं झालं-
तीन वाजता वरच्या लेणीत पोहोचलो त्यावेळी मुंबईचा पाचसहा मुलामुलींचा एक ग्रुप तिथे वलेंडाइन डे फेसबुकपेजसाठी सेल्फी काढण्यात व्यस्त होता. ते गेल्यावर चार वाजता 'ती' दबकत आत आली. प्रथम तुज पाहता जीव वेडावला वगैरे झालं. पाच वाजता आम्ही दोघेजण वरच्या बालेकिल्ल्यात जोडीने फिरलो. भिंती आहेत साक्षीला. सहा वाजता सूर्यास्त तोफेवर बसून पाहिला. फरसाण खाल्ले फोटो काढले. रात्रीसाठी टाक्यातलं पाणी भरून घेतलं. सर्व परिसर आमच्यासाठीच होता. साडेसातला पालकपराठे, टोमेटो सलाड असे जेवण झाले. स्वीट डिश साठं होती. पराठे तिला फारच आवडले. मग सातवाहनकालीन पन्नासफुटी कटट्यावर आडवे झालो. सैकची कॉमन उशी केली. रात्री एकदा चांदण्यात फिरलो. खाली गावांतले दिवे लुकलुकत होते आणि दूर डोंगरावर पवनचक्क्या वीज गोळा करत होत्या. सकाळी पुन्हा एकदा फोटो काढून खाली उतरलो. पेठवाडीतल्या तिच्या घरी सोडल्यावरही थोडी वाट बरोबर येऊन शेपुट हलवून तिने निरोप दिला.
20 Feb 2015 - 1:06 pm | चौकटराजा
" प्रिये , इकडे कर पाहू तुझे शेपूट ,, वा वा नागिणीचा डौल ही फिका पडेल तुझ्या वेणीसमोर,,, आता मला जरा टणटणीचे हे मस्त सप्तंरंगी रानफूल मा़ळू दे ना गं.."
ह ह ह ह गुर्र्र्र्र्र
" हे काय अशी अबोल का गडे ? एक श्वाना आमच्यावर रागावलेली दिसतेय .... बरं सलाड देउ का,,,, मग तर राग जाईल...?
20 Feb 2015 - 8:32 am | कंजूस
वलेंनडाइन डे ची ऐशीतैशी. एक वेगळ्याप्रकारे आणि गाणे पाठ करतो अथवा मोबल्यात रिंगटोन साठवतो तिच्या वॉलपेपरसह .रात्री काय जिव्वापाड प्रेम केलंय तिने काही विच्चारू नका.
20 Feb 2015 - 1:52 pm | सूड
आवरा !! =))))
20 Feb 2015 - 6:07 pm | अत्रुप्त आत्मा
मी उगीचच जोडगोळी हे नाव दिलेलं नाही. ;)
20 Feb 2015 - 11:04 am | सविता००१
फोटो आणि वॅलेंटाईनही गोड आहे की ;)
20 Feb 2015 - 3:52 pm | माम्लेदारचा पन्खा
प्रिया आहे हे माहीत असते तर आम्ही पण आलो असतो..
माणसात माणुसकी उरलीये कुठे नाहीतरी... ही सोबत लाख पटीने बरी !!
20 Feb 2015 - 4:00 pm | अन्या दातार
सांभाळून बोला. तुमच्या सौ मिपा वाचत असतील तर काय वाटेल त्यांना?? :P
20 Feb 2015 - 5:21 pm | माम्लेदारचा पन्खा
दोघांचंही मत हेच आहे....