केवळ मराठी भाषा दिवस म्हणून नव्हे तर मराठी भाषेसंबंधी बरच काही चांगल या फेब्रुवारी महिन्यात होत असतं. फेब्रुवारी महिन्याचा आणि मराठी भाषेचा निश्चीत काहीतरी ऋणानुबंध असला पाहीजे.
भालचंद्र नेमांडेंच्या बद्दलच्या धागाचर्चेत आपण कृपया नेमाडेंच्या कादंबर्यांबद्दलची विकीपाने सुरू कराल का? एक कोसला सोडलं तर बाकीच्या कादंबर्यांबद्दल फारशी माहिती मराठी विकिपीडियावर उपलब्ध नाही. (हाच धागा पुढे वाढवून मराठीतील वेगवेगळ्या साहित्यकृतींबद्दल विकिपीडियावर माहिती टाकली जावी अशी विनंती.) असा मिपा सदस्य स्वॅप्स यांचा प्रतिसाद आला आहे.
या निमीत्ताने एक सुरवात म्हणून मराठी विकिपीडियावर माहिती लिहून हव्या असलेल्या मराठीतील १७ पुस्तकांची नावे देत आहे. हि नावे ' आकाशवाणी' च्या मुंबई केंद्राने १९४७ ते १९९७ या पन्नास वर्षातील 'सर्वोत्कृष्ट दहा' पुस्तके निवडायचे आवाहन श्रोत्यांना केले होते. आकाशवाणीवरून सातत्याने निवेदन देऊन, नियतकालिकांतून निवेदन प्रसिद्ध करून, वाचकांच्या शिफारशी मागवल्या होत्या . त्यात निवडली गेलेली पुस्तके. ( काहींना समान गुण मिळाल्याने एकाच क्रमांकावर दोन-तीन पुस्तकेही आली.त्यामुळे यादीत अठरा पुस्तके आहेत.)
ऋ
ऋतुचक्र (पुस्तक)
क
काजळमाया (कथा संग्रह)
कोसला
द
दुर्दम्य
प
पानिपत (कादंबरी)
ब
बटाट्याची चाळ
बलुतं
बहिणाबाईंच्या कविता
म
मर्ढेकरांची कविता
माणदेशी माणसं
म पुढे.
मृत्युंजय
य
ययाति (कादंबरी)
युगान्त
व
व्यक्ती आणि वल्ली
स
स्वामी
मराठी विकिपीडियावरील ज्ञानकोशीय लेख वाचनीय होण्यासाथी सर्वसाधारणपणे प्रती लेख किमान दोन परिच्छेद माहितीची (अंदाजे ४००० बाईट्स) गरज भासते असा अनुभव आहे. उपरोल्लेखीत पुस्तके किंवा तत्संबंधी ओळख, परिचय, रसग्रहण, अथवा समीक्षणे, वृत्तांत, टिका माध्यमातून काही आपण जी काही माहिती गोळा व्हावी असा या धाग्याचा उद्देश आहे.
* मराठी विकिपीडियावरील द्वा
* माहिती देताना कृपया आंतरजालावरील इतरांच्या लेखनाचे संदर्भ चालतील पण कॉपीराईट भंग होणारे च्योप्य पेस्ट टाळावे.
* आपले या धाग्यावरील प्रतिसाद लेखन कॉपीराईट मुक्त गृहीत धरले जाईल.
* चर्चेत सहभागाबद्दल आणि विषयांतर टाळण्यात सहकार्याबद्दल सदस्य आणि मॉडरेटर मिपा व्यवस्थापन सर्वांचे आभार.
प्रतिक्रिया
11 Feb 2015 - 2:11 pm | कपिलमुनी
वरच्या यादीतील बहुसंख्य 'सर्वोत्कृष्ट ' नसून लोकप्रिय आहेत
11 Feb 2015 - 2:40 pm | तिता
पूर्णपणे सहमत
11 Feb 2015 - 4:20 pm | माहितगार
ठिक, 'सर्वोत्कृष्ट' हा शब्द आकाशवाणीच्या तत्कालीन निवडमंडळाचा. जिथ पर्यंत विकिपीडियाचा संबंध आहे, सर्वोत्कृष्टता अथवा लोकप्रीयता हे निकष नाही तर ज्ञानकोशीय उल्लेखनीयता महत्वाची ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेचे निकष सर्वस्वी निराळे आहेत. एखाद्या साहित्यकृतीच्या उल्लेखनीयतेस त्रयस्थ संस्थेच्या प्रक्रीयेतून दुजोरा मिळतो आहे हे विकिपीडियातील उल्लेखनीयतेच्या दृष्टीने साहाय्यकारी आहे एवढेच सध्या पुरेसे आहे.
11 Feb 2015 - 4:30 pm | माहितगार
सर्वोत्कृष्ट नसण्या बद्दल टिका करण्यासारख काही तरी शिल्लक असेल अथवा उणीव असेल तर त्याबाबत माहितीचही स्वागत असेल शक्य असेल तेथे टिकेचाही आंतर्भाव करता येईल.
11 Feb 2015 - 4:29 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
कोसला, बटाट्याची चाळ, व्यक्ती आणि वल्ली, पानिपत, स्वामी आणि माणदेशची माणसंचा परिचय करुन देउ शकीन. पण ह्या आधी विकीपेडीयावर कधीही माहिती टाकलेली नाही. माहितीचा आणि लागणार्या फोटोग्राफचा कॉपीराईटशी काही संबध आहे का ते सांगा म्हणजे मीही थोडाफार हातभार लावु शकीन.
11 Feb 2015 - 5:25 pm | माहितगार
खर म्हणजे मराठी विकिपीडियावर पुस्तक परिचयाच्या संदर्भात उदाहरणादाखल सांगण्यासारखी उदाहरणही कमी आहेत त्यामुळे फुल न फुलाची पाकळी माहितीचे स्वागतच असेल. आपण नव्याने पुस्तक परीचय लिहून देऊ शकाल अथवा इतरांच्या लेखनाचा संदर्भ देऊन तीच माहिती स्वतःच्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्नही चालू शकेल (अमुक तमूक यांच्या म्हणण्यानुसार/ मतानुसार अस लिहून पुढे मते उधृत केल्यास इतरांच्या मजकुर कॉपीराईटचा प्रश्न जरासा हलका होऊ शकेल). अर्थात येथील प्रतिसादातून होणार आपल स्वतःच लेखन प्रताधिकार कॉपीराईट मुक्त होत आहे अस गृहीत धरतो आहे.
विवीध मराठी संस्थळावरील माहितीचा संदर्भ देऊन, मी गाथा सप्तशती आणि गीतरामायण या बद्दल मराठी विकिपीडियावर लेखन केले आहे ते विकिपीडियावरील लेखनाची पद्धत म्हणून आवश्यकते नुसार अभ्यासता येईल (अर्थात एक तर मी त्या लेखात दीर्घ लेखन केले तसे दीर्ग असणे गरजेचे नाही, दुसरेतर ते अभ्यासणेही आवश्यक भाग नाही केवळ उदाहरण म्हणून नमुद केले एवढेच).
ज्ञानकोशीय शैली वगैरे करता मजकुर नंतरही संपादीता येतो म्हणून कॉपीराईट विषयक प्रश्न मजकुराच्या बाबतीत सौम्य असतात. पण पुस्तकाच्या फोटोग्राफचा ( छायाचित्रचा) मामला कष्टदायक असू शकतो. कारण पुस्तकांच्या कव्हरच्या चित्रकाराकडे अथवा छायाचित्रकाराकडे त्याचा कॉपीराईट असतो आणि प्रकाशन मालकी सहसा प्रकाशकाकडे असते त्यामुळे कमी रिझोलूशनची वॉटरमार्क केलेली पुस्तकाचे छायाचित्र मिळाल्यास हवेच असते पण सोबत तरीही संबंधीत (छाया)चित्रकार आणि प्रकाशकाची दोघांची लेखी संमती लागतेच लागते ते केवळ प्रकाशकांशी प्रत्यक्ष परिचय असल्यास शक्य होऊ शकेल. लेखकांचीही कॉपीराईट फ्री छायाचित्रे चालू शकतील. एकुण कष्टदायक कॉपीराईट प्रक्रीयेमुळे तुर्तास फोटोग्राफचा विषय दूर ठेवला तरीही हरकत नाही.
आपण डायरेक्ट माहिती टाकून पाहिल्यास ते सोप आणि छानच. इथे लिहिलेत तरीही मी ते विकिपीडियावर टाकेन (अर्थात मीसुद्धा विकिपीडियावर काळाच्या ओघात सवड आणि मूडनुसार माहिती भरत असतो त्यामुळे माझ्या कड्न क्वचीत विलंब संभवतो)
*विकिपीडियावर स्वतः लेखन करावयाचे झाल्यास त्या दृष्टीने माहिती देणारा धागा मी मागच्या वर्षी काढलेला धागा.
11 Feb 2015 - 8:01 pm | आदूबाळ
मराठी वाङ्मयकोश खंड ३ रा (ग्रंथपरिचय) इ.स. १८५८ ते १९६०
इथे मिळेल
पुस्तक | पान क्रमांक
ऋतुचक्र | १४
बटाट्याची चाळ | ६८
बहिणाबाईंची गाणी | ६९
मर्ढेकरांची कविता | ८४
माणदेशी माणसं | ९०
ययाती | ९५
व्यक्ती आणि वल्ली | १२१
अठरापैकी सात पुस्तके १९६० पूर्वीच्या सूचीत मिळणे ही बाब मराठी वाचकाच्या अभिरूचीवर चांगलाच झोत टाकते. एकही कवितासंग्रह (अगदी विशाखा आणि शेला सारखाही) नसणं हेही जाणवून गेलं.
11 Feb 2015 - 8:14 pm | आदूबाळ
बहिणाबाई आणि मर्ढेकर आहेत. स्वारी.
12 Feb 2015 - 10:36 am | माहितगार
मराठी वाङ्मयकोशाच्या उपयूक्त ऑनलाईन दुव्याबद्दल धन्यवाद. मराठी वाङ्मयकोशातील ग्रंथ परिचय उपलब्ध आहेतच त्या माहितीत भर पडेल अशी माहिती कुणी लिहून दिल्यास आनंदच होईल.
तुम्ही म्हणता ते बरोबर वाटते आहे. या स्थितीला लेखक, प्रकाशक आणि आणि वाचक आणि एकुण वाचनाचे प्रमाण अशी एकंदरीत पूर्ण संस्कृतीच जबाबदार म्हणता येणार नाही का? तंत्रज्ञानाने पुस्तके ऑनलाईन उपलब्ध होतील पण वाचन संस्कृतीच्या परिस्थितीत सुधारणा शेवटी वाचकांच्या हाती आहे. मराठी संस्थळांच्या माध्यमातून पुस्तक परिचयाचे रसग्रहणाचे प्रयत्न नक्कीच उपयूक्त ठरू शकतील असे वाटते.
अशाच यादी मटा आणि आंतर्नादनेही यापुर्वी केल्या आहेत. अर्थात आताच्या वय वर्षे १५ ते ३५ या जनरेशन करता अशी अॅक्टीव्हिटी केली तर काय परिस्थिती हाताशी लागू शकेल या बद्दल जराशी साशंकता वाटते.