रिबटेबल प्रिझंप्शन

आदूबाळ's picture
आदूबाळ in जनातलं, मनातलं
9 Feb 2015 - 11:35 pm

ती हाताच्या तळव्यात हनुवटी ठेवून एकटक पहात होती. काहीही कळलं नव्हतं बहुतेक तिला.

"हे बघ, सोपा आहे हा फॉस वर्सेस हारबॉटल रूल." मी परत प्रयत्न केला, "कंपनीच्या बाबतीत काही गैरकृत्य घडलं, तर कंपनीच कोर्टात जाऊ शकते. शेअरहोल्डर नाही."

तिची नजर तशीच स्थिर. माझ्याकडे बघणारे दोन टपोरे डोळे.

"याला काही एक्सेप्शन्स असतात. म्हणजे मायनॉरिटी शेअरहोल्डर..." मी परत प्रयत्न केला.

"तुमचा अटेम्ट कधी आहे सर?" तिने अचानक विचारलं.

आयसीएसाय काही मला पास करायला मागत नव्हतं. हा चौथा अटेम्ट जूनमध्ये. इकडे डिग्रीविना क्लास पण चालेनात. ही एकच विद्यार्थिनी. फ्रस्ट्रेशन सालं...

ती बाकावरून उठून जवळ आली.

"सर, पास झालात की लग्न कराल माझ्याशी?!"

बस्स! टचकन डोळ्यांत पाणी आलं माझ्या. ती "पास झालात की" म्हणाली; "पास झालात तर" नाही...

मी मिठीत घेतलं तिला. "नक्की. प्रॉमिस." घशात काहीतरी दाटून आलं होतं.

कितीतरी वेळ आम्ही तसेच उभे होतो. तिचा उष्ण उ:श्वास माझी छाती उबारून टाकत होता.

पण...पण...

"लग्नाचं वचन मी देऊ शकणार नाही..."

"का?" तिने वर पाहिलं. "दुसरी कुणी..."

"नाही, तसं काही नाहीये." मी दुखावलो. "सोशल काँट्रॅक्ट्स आर नॉट एन्फोर्सेबल. बॅल्फोर वर्सेस बॅल्फोर. नाईन्टीन नाईन्टीन. टू के बी फाईव सेवंटीवन." मी छाती काढून म्हणालो.

"एवढंच ना?" ती छातीवर डोकं घुसळत म्हणाली. "ते रिबटेबल प्रिझंप्शन असतं. तेवढी रिस्क घ्यायला मी तयार आहे!"

--------------------------
तर मंडली, अ‍ॅडव्हान्समध्ये सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!

नाट्यशुभेच्छा

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

10 Feb 2015 - 12:16 am | बहुगुणी

आवडली!

हा द्विशतशब्द्कथा फॉर्मॅट का :-)

हॅपी व्हॅलेंटाईन्स डे!

टवाळ कार्टा's picture

10 Feb 2015 - 8:53 am | टवाळ कार्टा

कस्सच...कसच्च...इतक्या गोग्गोड गोष्टीत तुम्ही शब्द मोजत बस्लात

नगरीनिरंजन's picture

10 Feb 2015 - 5:12 am | नगरीनिरंजन

लै भारी!

अजया's picture

10 Feb 2015 - 8:22 am | अजया

वा!मस्तच!

श्रीरंग_जोशी's picture

10 Feb 2015 - 8:24 am | श्रीरंग_जोशी

कथा आवडली.

आता जरा या सी ए वाल्यांच्या संज्ञा समजून घेणे आले ;-) .

आता जरा या सी ए वाल्यांच्या संज्ञा समजून घेणे आले
हेच म्हणतो.. *wink*

प्रेम दिवसाच्या शुभेच्छा

वेल्लाभट's picture

11 Feb 2015 - 12:06 pm | वेल्लाभट

सी एस आहे कथेतील पात्र. म्हणजे कथेत अजून सी एस पूर्ण व्हायचंय त्याचं. पण

सी नव्हे.

तो वेगळा प्रकार असतो. असो. इतकंच.

श्रीरंग_जोशी's picture

11 Feb 2015 - 7:10 pm | श्रीरंग_जोशी

मी हा प्रतिसाद लिहिला तेव्हा त्यांचे संज्ञांबाबतचे स्पष्टीकरण यायचे होते.

मागे एकदा आदूबाळ यांचा मिपावरच्या दुसर्‍या सी ए असलेल्या सदस्याशी सी ए बाबत झालेला संवाद वाचला होता. म्हणून आजवर मी आदूबाळ यांनाही सी ए समजत होतो.

आदूबाळ's picture

11 Feb 2015 - 7:20 pm | आदूबाळ

मी सीए (सुद्धा?) आहे.

खर्‍या अर्थाने सीएस नाहीये. (म्हणजे इन्स्टि. ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ ईंडियाचा सभासद नाही.)

श्रीरंग_जोशी's picture

11 Feb 2015 - 8:47 pm | श्रीरंग_जोशी

या क्षेत्राबद्दल मला फारच जुजबी माहिती आहे. मिपावर आमच्यासारख्या याबाबतीत अज्ञानी असणार्‍या लोकांसाठी सीएबाबत एखादा लेख (किंवा मालिका) लिहावा अशी नम्र विनंती.

वेल्लाभट's picture

11 Feb 2015 - 9:00 pm | वेल्लाभट

नको हो! नको
काही चुकलं असेल तर क्षमा मागतो.....

श्रीरंग_जोशी's picture

11 Feb 2015 - 9:05 pm | श्रीरंग_जोशी

मला खरोखरंच जाणुन घ्यायचे आहे या क्षेत्राबाबत. हा धागा व हे प्रतिसाद केवळ एक निमित्त झाले.

कृपया गैरसमज करून घेऊ नका.

वेल्लाभट's picture

11 Feb 2015 - 9:01 pm | वेल्लाभट

माझ्या बाजूने. आदुबाळांचं मत माहीत नाही.

वेल्लाभटांनो, खरं तर चांगली सुचवणी आहे.

एक तर सीए काय करतो याबाबत गैरसमज फार. "तुम्ही साले लोकांना टॅक्स चुकवायला मदत करता" इथपासून "सबप्राईम मॉर्गेज क्रायसिस तुमच्यासारख्यांमुळेच झाला" इथपर्यंत काय काय म्हणून मी ऐकलेलं आहे.

दुसरं म्हणजे "अवघड असतं" यापलिकडे माहिती बहुदा नसते. असलेच तर गैरसमज - "गणित फार भारी असावं लागतं किंवा "वीस वीस तास अभ्यास करता का रे..." वगैरे.

तिसरं म्हणजे सीए माणूस हा तारूण्याची होळी स्वतःच्या हाताने केलेला, खप्पड अरसिक गोटा असणार असा सर्वसाधारण समज असतो. सीए नायक असलेले बॉलिवुडमधले चित्रपट आठवा - मला दोनच आठवताहेत. अमोल पालेकरचा "गोलमाल" आणि आमिर खानचा "हम है राही प्यार के".

आणि मिपावर बरेच सीए आहेत. "ते गेलेले एक" सोडले तरी खाली प्रतिसादांतच बघा किती आहेत. आपण एकमेकां सहाय्य (क्राऊडसोर्सिंग) करू. ;)

श्रीरंग_जोशी's picture

11 Feb 2015 - 9:31 pm | श्रीरंग_जोशी

माझ्याच भावना मांडल्यात. नेमके माझ्या जवळच्या मित्रांत किंवा जवळच्या नातलगांत कुणीच सीए नाही.

दूरच्या नातलगांत खूपच प्रथितयश सीए आहेत ज्यांच्याशी माझा व्यक्तिशः कधीच संबंध आला नाही.

मृत्युन्जय's picture

12 Feb 2015 - 10:13 am | मृत्युन्जय

अजुन एक चित्रपट आहे. अफसाना प्यार का. आमीर खान - फराह. त्यात कादर खार आमीरखान बद्दल बोलताना वो "चाटता हुआ अकाउंटंट है" असा एक अतिशय पांचट विनोद करतो.

सी एस बद्दलचा पहिला उल्लेख मी स्वाभिमान मालिकेत बघितला. त्यातील सी एस चे आडनाव दलाल असते आणि तो नंतर कंपनीत काहितरी गफला करतो वगैरे असे दाखवले आहे. कंपनी सेक्रेटरीला एवढी मोठी भूमिका प्रथमच मिळाली असावी बहुधा.

बेकार तरुण's picture

12 Feb 2015 - 10:28 am | बेकार तरुण

जर मला नीट आठवत असेल तर रेहना है तेरे दिल मैं चित्रपटात नायिका सी ए असते (दिया मिर्झा आहे बहुतेक)

वेल्लाभट's picture

12 Feb 2015 - 11:18 am | वेल्लाभट

नाही; ते सगळं ठीक आहे...पण....जाऊदे. थोडी वेगळी मतं आहेत.

एक मात्र आहे. गैरसमज अनेक. टॅक्स वाला संवाद तर अनेकदा ऐकलाय. कीव करावीशी वाटते. अशा समजुती करून घेणा-यांना समजावणार तरी काय? आणि का?

श्रीरंग_जोशी's picture

10 Feb 2015 - 8:24 am | श्रीरंग_जोशी

कथा आवडली.

आता जरा या सी ए वाल्यांच्या संज्ञा समजून घेणे आले ;-) .

जयंत कुलकर्णी's picture

10 Feb 2015 - 8:57 am | जयंत कुलकर्णी

हा हा...... :-)

मुक्त विहारि's picture

10 Feb 2015 - 9:26 am | मुक्त विहारि

"नाही, तसं काही नाहीये." मी दुखावलो. "सोशल काँट्रॅक्ट्स आर नॉट एन्फोर्सेबल. बॅल्फोर वर्सेस बॅल्फोर. नाईन्टीन नाईन्टीन. टू के बी फाईव सेवंटीवन." मी छाती काढून म्हणालो.

"एवढंच ना?" ती छातीवर डोकं घुसळत म्हणाली. "ते रिबटेबल प्रिझंप्शन असतं. तेवढी रिस्क घ्यायला मी तयार आहे!"

म्हणजे नक्की काय?

हो की नाही?

टवाळ कार्टा's picture

10 Feb 2015 - 9:28 am | टवाळ कार्टा

"एवढंच ना?" ती छातीवर डोकं घुसळत म्हणाली.

हे आहे की...बस्स ना...बाकी ऐकले नाही ऐकले ...कि फर्क पैंदा ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Feb 2015 - 12:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

नायतर काय ? ती छातीवर डोकं घुसळत रिस्क घ्यायला तयार आहे आणि मुवि शब्दांचे अर्थ काय या विचारात ? काय चाललंय काय तुमचं मुवि ??? +D

कपिलमुनी's picture

10 Feb 2015 - 1:45 pm | कपिलमुनी

टकाला विचारा ! अणुबवी आहे असा प्रतिसादावरून दिसत आहे !

पिंपातला उंदीर's picture

10 Feb 2015 - 9:45 am | पिंपातला उंदीर

मस्त हो आदुबाळ . तुम्ही एवढ कमी का लिहिता असा प्रश्न पडला आहे

लॉरी टांगटूंगकर's picture

10 Feb 2015 - 8:15 pm | लॉरी टांगटूंगकर

+१

राजाभाउ's picture

10 Feb 2015 - 11:07 am | राजाभाउ

मस्त !!!
>>ती "पास झालात की" म्हणाली; "पास झालात तर" नाही...
हे फारच आवडले

ते फक्त "ते रिबटेबल प्रिझंप्शन असतं. तेवढी रिस्क घ्यायला मी तयार आहे!" समजाउन सांगा म्हणजे झाले.

विटेकर's picture

10 Feb 2015 - 12:04 pm | विटेकर

आवडले ..

ते छातीवर घुसलणे वगैरे ठिक आहे पण पास होणे आवश्यक आहे हे विसरु नये .

मग या सगळ्यात प्रिझंप्शन नक्की कुठलं होतं की जे रीबट केलं जाऊ शकतं?

रीबट केल्यावर राहील ते प्रिझंप्शन म्हणजे सोशल कॉण्ट्रॅक्ट इज एन्फोर्सिएबल...हां हां आता अर्थ लागला!!

सुंदरच!!

आदूबाळ's picture

10 Feb 2015 - 12:22 pm | आदूबाळ

आयमाय स्वारी. आयुष्यात पहिल्यांदाच प्रेमकथा लिहायच्या नादात फारच दुर्बोध करून ठेवली बहुतेक.

रीबटेबल प्रिझंप्शन म्हणजे एखादी गोष्ट खोटी सिद्ध होईपर्यंत ती खरी मानून चालणे. या कथेच्या संदर्भात - खोटी पाडण्याची धमक बाळगणे. नायक नायिकेला म्हणतो, की लग्नाच्या वचनासारख्या "सोशल कॉन्ट्रॅक्ट्स" ना अर्थ नसतो. पक्षी: आपण पास होऊ का, करियर मार्गी लागेल का याबद्दल त्याच्या मनात अजून साशंकता आहे, त्यामुळे तो हातचा राखायला पहातो आहे. त्यावर त्याची प्रेयसी त्याला म्हणते, की हे रीबटेबल आहे - पक्षी: हे खोटं पाडायची धमक मी बाळगून आहे. तिचं त्याच्यावर प्रेम आहे - त्याच्या डिग्रीवर नव्हे. तिचा त्याच्यावर विश्वासही आहे, ती त्याला आर्थिक आधार वगैरे द्यायलाही तयार आहे. ती त्याला सांगू पहाते आहे, की बाबा रे, हातचा ठेवायची गरजच नाही, माझा इरादा पक्का आहे.

अजून एक छिद्रान्वेषः यातला नायक (आणि नायिकाही) सीएस (कंपनी सेक्रेटरी) च्या परीक्षा देत आहेत. सीए प्रमाणे यातही तीन कठीण होत जाणार्‍या पातळ्या, नापास होण्याचं प्रचंड प्रमाण, कंटाळून सोडून देणारे विद्यार्थी वगैरे असतं.

एक काहीसा क्रूर विनोद प्रचलित आहे: सीए/सीएस मध्ये रॅगिंग का होत नाही? कारण कधी कोण कुणाचा सीनियर होईल ते सांगता येत नाही! सीए/सीएस करणं हे कष्टाचं, चिकाटीचं काम तर आहेच, पण त्यात नशीबाचा भागही असतो. इतर शिक्षणक्षेत्रात पास होणं तुलनेने सोपं, आणि डिस्टिंक्शन/मेरिट वगैरे गोष्टी असतात. सीए/सीएसमध्ये मुळात पास होणं हाच एक मोठा आडवा दगड असतो. फायनल परीक्षेचा रिझल्ट स्क्रीनवर (हल्ली) किंवा बोर्डावर (पूर्वी) बघितल्याशिवाय आपण या दिव्यातून सहीसलामत बाहेर पडलो आहोत, याबद्दल कधीच खात्री पटत नाही.

ज्यांना एकापेक्षा जास्त अटेंप्ट द्यावे लागतात त्यांची परिस्थिती सर्वात बेक्कार - एकीकडे तारूण्य धडका मारत असतं, मित्रबित्र उद्योगधंद्याला लागलेले असतात, आणि आपण मात्र मे-नोव्हेंबर किंवा जून-डिसेंबरची आषाढी कार्तिकी करत असतो. प्रत्येक अयशस्वी प्रयत्नाबरोबर आत्मविश्वास खचत चाललेला असतो. कितीही खंबीर असलात तरी अंधश्रद्धाळूपणा चोरपावलांनी यायला लागतो. अतिशय हळवं व्हायला होतं. अशा वेळी कोणाचा बारीकसा आधारही मोलाचाच असतो.

असो - वहावत गेलो जरा. "त्या दिवसांबद्दल" लिहावं तितकं थोडं आहे. कथा आवडल्याचं कळवल्याबद्दल आभार!

असंका's picture

10 Feb 2015 - 12:33 pm | असंका

आयला वारीच्या आठवणींनी डोळ्यात पाणी आलं....

शब्दा शब्दाशी सहमत....

अंधश्रद्धेबद्द्ल तर काय बोलू!! अगदी खरं सांगतो, तुमचा हा शब्द वाचून मला पहिल्यांदा जाणीव झाली की ज्या गोष्टीमुळे आपण शेवटी सुटलो असं मी मानतो, ती तसं बघितलं तर अंध श्रद्धाच असली पाहिजे...(म्हणजे मी यापुढे हे मान्य करणार नाही, पण एका हळव्या क्षणी बोलून गेलेलं सत्य हे आहे की ती अंधश्रद्धा असली पाहिजे!!)

सविता००१'s picture

11 Feb 2015 - 12:15 pm | सविता००१

आठवली. अरे देवा

मृत्युन्जय's picture

10 Feb 2015 - 12:37 pm | मृत्युन्जय

सी एस बरेच सोप्पे करुन ठेवले आहे आजकाल तरी. बरेच लोक लोंढ्याने पास होता. आपण जून्या काळातले सी एस दिसता त्यामुळे आषाढी कार्तिकीचा अण्भव आहे. आजकाल बर्‍याच जणांना नसतो.

आजकाल बरेच सोप्पे करुन ठेवले आहे

दहावीपासून ते डॉ, ईं व सर्व अभ्यासक्रमाचे सर्व माजी विद्यार्थ्यांचा पेटंट डायलॉग ;)

सुबोध खरे's picture

11 Feb 2015 - 1:21 pm | सुबोध खरे

अगदी अगदी

खरं तर वैद्यकीय अभ्यासक्रम आता इतका प्रचंड वाढला आहे कि आमच्या वेळेस सोपे होते असेच म्हणतो( आताच्या परिस्थितीत आम्हाला झेपलेच नसते)
अशीच परिस्थिती इतर अभ्यासक्रमांची असावी असे वाटते

आदूबाळा अरे प्रेमाच आय मीन लेखाची बँलेन्स शीट समजवुन सांगितली नसतीस तर काय घंटा उमगले नसते रे !
हल्ली अलगद डोळा मारायचे दिवस गेलेत काय ? ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }

मृत्युन्जय's picture

11 Feb 2015 - 3:57 pm | मृत्युन्जय

खरे आहे. पण जर पुर्वी रिझल्ट १०% लागत असेल आणी आता २५% लागत असेल तर माझे म्हणणे अगदीच काही अवास्तव नाही हे तर मान्य करावे लागेल?

कपिलमुनी's picture

11 Feb 2015 - 4:47 pm | कपिलमुनी

आजकाल बरेच सोप्पे करुन ठेवले आहे

मलाही असेच वाटते ! पूर्वी ईंजिनीयरींग मध्ये फर्स्ट क्लास किंवा डिस्टींग्शन दुर्मिळ असायचे. आता खोर्‍याने सापडतात .

पोरं जास्त हुशार झाली असतील ;)

शिरियसली - मला असं वाटतं की हल्लीची पोरं (x) जास्त परीक्षाभिमुख आहेत. एकतर त्यांच्याकडे परीक्षेचा अडथळा पार करवतील असे स्रोत आहेत (y), आणि दुसरं म्हणजे त्यांना specialisationचं महत्त्व लहान वयातच कळलेलं असतं. त्यामुळे ते आपल्या आवडीच्या उपविषयात प्राविण्य मिळवून बाकीच्यांचा पास होण्यापुरता अभ्यास करतात.

हे मत अर्थात मी ज्यांच्याबरोबर काम करतो त्यांच्याकडे पाहून बनवलेलं आहे.

_______
(x) भेंडी कसं म्हातारं म्हातारं झाल्यासारखं वाटायला लागलंय!
(y) नव्या पद्धतीची पुस्तकं, क्लासेस वगैरे

कपिलमुनी's picture

11 Feb 2015 - 5:07 pm | कपिलमुनी

परीक्षाभिमुख हे बरोबर आहे . सध्या नक्कीच जास्त मार्क पडत आहेत. नक्की काय केल्यावर मार्क पडतात हे माहीत आहे आणि तसाच शिकवतात.
पण खोलवर अभ्यास नाही . रेफरन्स बूके वाचायचा प्रमाण प्रचंड घटला आहे . ईं. च्या बाबतीत निराली , टेकमॅक्स , प्रगती यांची पुस्तके वापरतात ज्यात फक्त कामापुरत असता . त्याच्या बाहेरचा प्रश्न यांना येत नाही. बर ! या पुस्तकांचे लेखक हे जुने - जाणते प्रोफेसर असतात जे विद्यापीठामध्ये पेपर सेटर असतात त्यामुळे पेपर त्यातूनच येतो .

आपल्याकडे संशोधक आणि ती वृत्ती कमी असण्याचे कारण मार्कांना दिले जाणारे महत्व आणि परीक्षाभिमुख पद्धत हे आहे असे वाटते .

( फारच अवांतर झाले .)

मे नोवेंबरच्या आषाढी कार्तिकी अगदी जवळून पाहण्यात आल्या आहेत. त्या मानाने विंजिणेर अगदी आरामात बनता येतं. ४० , केट्या, जयकर अगदी दिमतीला उभे असतात.

मिहिर's picture

10 Feb 2015 - 9:23 pm | मिहिर

हे वाचण्याआधी गोष्ट कळली नव्हती. आत कळली आणि आवडली.

सुबोध खरे's picture

11 Feb 2015 - 10:59 am | सुबोध खरे

हीच परिस्थिती कोणत्याही व्यावसायिक अभ्यासक्रमात असते. डॉक्टर होण्यात असेच कष्ट असतात. त्यातून गेलेल्या माणसाला त्याची किंमत कळते. आयुष्यात स्वतःच्या यशाची खात्री नसताना एखाद्या सुंदर मुलीला कष्टप्रद परिस्थितीत ढकलू न इच्छिणाऱ्या तरुणाची मनोवृत्ती आपण फार छान लिहिली आहे.
"प्यार मुझसे जो किया तुमने तो क्या पाओगी" या गाण्यात अशी मनोवृत्ती फार छान पणे दाखवली आहे. फारुख शेखचा अभिनय पण यात अतिशय उत्कृष्ट झालेला आहे. अगदी काळजाला भिडणाऱे असे गाणे.
जमेल तसे(वेळ मिळेल तसे) लिहित राहा.

आपण ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या मी पण अनुभवल्या आहेत. अतिशय कठिण काळ असतो तो.
मी पण एकच ग्रुप चार वेळा दिला :) दर वेळि ४ ८ गुणांमुळे परत वारि करावि लागायचि. खूप निगेटिव विचार मनात सतत डोकावत असायचे. त्यातला एक अत्यंत नेहमिचा म्हंणजे, अरे तो अबक पण पास झाला आणी मी होतच नाहिये. त्याला आजवर माझ्यापेक्षा एकाहि परिक्षेत जास्ति गुण नव्हते !!
अशा वेळि योग्य ती साथ मिळालि आणी निराशेच्या गर्तेत न सापडता, पुन्हा लढायचि जिद्द पण मिळालि. अखेर इन्स्टिट्युट नि पुढे ढकलुन दिले :)
बाकि सीएस हि परिक्षा अवघड होति आणि आता सोपी ह्यात मला काहिच माहित नाहि, त्यावेळी माझ्या कुवतिला नक्किच अवघड गेलि मला हे नक्कि. आज देखिल हि परिक्षा द्यायला गेलो तर नक्कि पहिल्या वेळेसच पास होईन ह्याचि मला खात्रिपण नाहि

स्वाती२'s picture

10 Feb 2015 - 6:15 pm | स्वाती२

कथा आवडली.

कथा आवडली. सुदैवाने दुसर्‍या वाचनात समजली. काल प्रतिसाद द्यायचा राहिला. आज तुमचे स्पष्टीकरणही आवडले.

पैसा's picture

10 Feb 2015 - 8:02 pm | पैसा

छान आहे!

प्रसाद गोडबोले's picture

10 Feb 2015 - 9:39 pm | प्रसाद गोडबोले

आदुबाळ , हा अण्याव आहे ...
कथा बेस्टच आहे पण आमच्या सारख्या नान शी.ये वाल्यांना स्पश्टीकरण दिल्याशेवाय कसे कळणार ? तुमचा वरचा प्रतिसाद वाचल्यावर थोडाफार अर्थ उमगला .

आता प्रत्येकाने त्याच्या त्यच्या कार्यक्षेत्राशी निवडीत गोष्टींवर प्रेमकथा लिहायला हरकत नसावी ...

ही घ्या आमच्या कडुन एक प्रेमकथा :

ती : आय लव्ह यु , माझ्याशी लग्न करशील ?
मी : ऑप्शन का फ्युचर ?
ती : ऑप्शन =)
मी : सोल्ड अमेरिकन :D

समाप्त

सविता००१'s picture

11 Feb 2015 - 4:42 pm | सविता००१

फार भारी आहे. आवडलं.
हे मार्केट ट्रेडिंग प्रपोझल वाट्टं??????
मस्ताड आहे

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 Feb 2015 - 9:04 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आता प्रत्येकाने त्याच्या त्यच्या कार्यक्षेत्राशी निवडीत गोष्टींवर प्रेमकथा लिहायला हरकत नसावी ...

ह्म्म...!! द

मी: प्रिये, तुला पाहिलं की हृदयाचा पॉसिटीव्ह डिस्प्लेसमेंट पंप धडधडु लागतो. तु हसलीस की डोक्यात w-16 इंजिनाचं स्मुथ हमिंग चालु होतं. तु केसाची बट उडवताना असं वाटतं, अस वाटतं की साक्षात ब्युगाटीचा पहिला गिअर पडलाय. तुझ्या गालावरची खळी पाहिली की मर्सिडिझ्च्या सेक्साड ब्रेक कुलर्स ची आठवण होते. माझी होशील का गाडी....आपलं माझी होशील का राणी?

ती: ^&*@^&*^@&#^*@&#^*&@ आता जातो का दादाला बोलाउ. =))

मी: एक लै फेमस गाणं गुणगुणत (ब्रेक अप के बाद) वालं...!! =))

सानिकास्वप्निल's picture

10 Feb 2015 - 11:15 pm | सानिकास्वप्निल

कथा आवडली :)

बबन ताम्बे's picture

11 Feb 2015 - 11:34 am | बबन ताम्बे

छान आहे कथा !

वेल्लाभट's picture

11 Feb 2015 - 12:12 pm | वेल्लाभट

कथा मस्त.... पण कुठेतरी खोल झालेल्या जखमेवरची खपली खरवडून गेली.

सविता००१'s picture

11 Feb 2015 - 12:17 pm | सविता००१

कथा आवडली

आतिवास's picture

11 Feb 2015 - 2:41 pm | आतिवास

''स्पष्टीकरण प्रतिसाद'' वाचल्यावर कथा समजली आणि आवडली.
तुम्ही अधिक लिहिलं पाहिजे हे पुन्हा एकदा लक्षात आलं.

प्रचेतस's picture

11 Feb 2015 - 3:06 pm | प्रचेतस

हेच म्हणतो.

नंदन's picture

11 Feb 2015 - 3:36 pm | नंदन

''स्पष्टीकरण प्रतिसाद'' वाचल्यावर कथा समजली आणि आवडली.
तुम्ही अधिक लिहिलं पाहिजे हे पुन्हा एकदा लक्षात आलं.

तंतोतंत!

स्नेहल महेश's picture

11 Feb 2015 - 2:53 pm | स्नेहल महेश

स्पष्टीकरण वाचल्यावर गोष्ट कळली

प्रेमकथा असून सम्जायला इतका वेळ लागला. *unknw*
म्हणुनच एकाच फिल्ड मधली माणस जास्त सम्जू शकता एकमेकाची भाषा.

मौका भी है और दस्तुर भी..!

कैलासवासी सोन्याबापु's picture

7 Feb 2016 - 7:38 pm | कैलासवासी सोन्याबापु

आदूबाळाssssssss

पुढे काय झालेन? कॉन्ट्रैक्ट झाला काय सात जलमाचा!! :D :D

Keanu's picture

7 Feb 2016 - 10:36 pm | Keanu

कॉलेजचे दिवस आठवले. Merger and amalgamation चे प्रश्न आले की धडकी भरायची. एका अकाउंटची एन्ट्री दुसऱ्या अकाउंटला क्रेडिट करायची आणि tally न होणारे पैसे miscellaneous अकाउंटला टाकायचे, एवढंच माहित होत.

पद्मावति's picture

7 Feb 2016 - 11:01 pm | पद्मावति

:) मस्तं आहे कथा.

मस्त आहे कथा.दोन मुंग्या त्यांच्याच भाषेत बोलणार ना? मिशा हलवून!
सगळं समजलं पण जेपीने आताच वर का काढली कथा?१४ फेब्रुवारीची तयारी?

मारवा's picture

8 Feb 2016 - 1:53 pm | मारवा

सुंदर
तुम्ही सी ए आहात हे वाचुन तुमच्याविषयीचा अगोदर असलेला आदर दुणावला.
सी.ए. म्हणजे ग्रेट असतात.
संदर्भाशिवाय मात्र वरचा लेख कळला नसता.
अजुन लिहत रहावे कमी लिहीता याच्याशी सहमत.

बॅटमॅन's picture

8 Feb 2016 - 2:12 pm | बॅटमॅन

पुनरेकवार खूप आवडली कथा.

नव-वाचकांना आणि पुनर्वाचकांना धन्यवाद!

ही गोष्ट म्हटली तर खरी, म्हटली तर काल्पनिक आहे. म्हणजे पात्रं खरी आहेत / खर्‍या व्यक्तींवर आधारित आहेत, पण घटना तंतोतंत नाहीत. (या संदर्भात सत्य कल्पनेपेक्षा खरोखर भन्नाट आहे!)

तारीख पे तारीखच्या चक्रात अडकलेल्या विद्यार्थ्याला छोट्या / क्षुल्लक गोष्टीचाही कसा आधार वाटतो हे सांगण्याचा एक प्रयत्न होता.

आणि हो, २०१६च्या व्हॅलेंटाईन दिवसाच्या शुभेच्छा!

मारवा's picture

8 Feb 2016 - 6:15 pm | मारवा

सी.ए. हा अभ्यासक्रम तसा कॉलेज किंवा युनिव्हर्सीटी त होत नसतो ना. हा एक इन्स्टीट्युट ची मेंबरशीप मिळते. मग असे जे विद्यार्थी आहेत जे १२ वी नंतर हा कोर्स करतात. त्यांचा नॉर्मल कॉलेज लाइफ शी संबंध कसा येतो मग ?
म्हणजे जर हा अभ्यासक्रम क्लासेस व अभ्यास यावरच आधारीत असतो तर दुसरे अभ्यासक्रम जसे कॉलेज वा युनिव्हर्सीटी त होतात तर या मुलांच सोशल लाइफ कस बनत मग ?
म्हणजे त्यामुळे काही दुष्परीणाम , अलग पडल्यासारख होत नसेल का ? आणि त्याने हा कोर्स अधिकच आव्हानत्मक होतो का ? म्हणजे मी जी कॉमर्स क्षेत्रातली मुल बघितलीत वा जो हा कोर्स करणारी ते कॉलेज ला फारच कमी जातात व ऑफीस मला वाटत जी काय तुमची कंपलसरी उमेदवारी असते त्यात लवकरच ही मुल लागतात.
थोड काही म्हणा एकंदरीत थोडे काही म्हणा रुक्षतेला अनुकुल वातावरण होत का ?

सीए / सीएस दोन प्रकारे करता येतं. एक म्हणजे तुम्ही म्हणता तसं बारावीनंतर. आणि एक बॅचलर्स डिग्रीनंतर. जे डिग्रीनंतर करतात त्यांना डिग्रीपर्यंत तरी कॉलेजलाईफची मजा घेता येतेच.

मी बारावीनंतर केलं होतं. कॉलेजला बारावीआधीही फारसा जात नसे. त्यानंतर तर जवळजवळ थांबलंच. त्यातून आमच्या कॉलेजमध्ये "पुर्गं सीए करतंय" म्हणून कोणत्याही विशेष सवलती मिळत नसत. (आणि ते बरोबरच होतं.) कॉलेज लाईफशी तसा संबंध येत नसे. गॅदरिंग / डेज पुरता हजेरी लावत असे इतकंच. तरी सीए करणारे पुष्कळ होते, आणि दिवसात चारपाच तास तरी क्लास असे. त्यामुळे तशी सोशल लाईफची कमतरता नव्हती. ;)

---

सीए/सीएस लोक रुक्ष असतात हा एक लोकप्रिय गैरसमज / स्टीरियोटायपिंग आहे. कंपनीज अ‍ॅक्टचे ठोकळे किंवा आकड्यांनी गच्च भरलेलं एक्सेलशीट हाताळणारी व्यक्ती शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेऊ शकते, किंवा "शांताबाई" वर एक पाय वर करून नाचू शकते हे सहसा पटकन पचनी पडत नाही. इथे मिपावरच मला माहिती असलेले चार तरी सक्रिय आयडी सीए/सीएस आहेत. ते बाकी काहीही असले/नसले तरी रुक्ष नक्कीच नाहीत.

असतात - रूक्ष, कंटाळवाणे, वैतागवाडी, छिद्रान्वेशी सीए/सीएस लोकही असतात. पण ते स्टँडप कॉमेडियन किंवा बोहारीण किंवा पायलट झाले असते तरी रुक्षच झाले असते.

मारवा's picture

8 Feb 2016 - 7:42 pm | मारवा

झकास प्रतिसाद आवडला
तुम्ही आणि संजय क्षीरसागर किमान या दोघांना बघुन तरी सीए रुक्ष असतात हा गैरसमज नसावा.

अभ्या..'s picture

8 Feb 2016 - 8:10 pm | अभ्या..

मस्त रे आदूबाळा
तुझ्याच वाक्याचे एक्स्टेन्शन म्हणजे आदूबाळ सीएस न होता सायंटिस्ट, डॉन किंवा बिजनेसमन झाला असता तरी सेन्स ऑव्ह हयुमर असाच लाजवाब अन बिनतोड राहिला असता.
मिपाला मिळालेला वनेनोन्ली नाईस आयडी. कीपीटप

मारवा's picture

8 Feb 2016 - 9:56 pm | मारवा

अभ्या भौ
सिर्क एक
स्रिर्फ एक
इतनी बडी मेंबरशीप और सिर्फ एक मेंबर
वनेन ओन्ली इतक्या आयड्या बघितल्या आणि तुम्ही म्हणताय
ओन्ली विमल
बहोत ना इंसाफी है

यशोधरा's picture

8 Feb 2016 - 10:01 pm | यशोधरा

१२ वीनंतर सीए?? बापरे! _/\_

कैलासवासी सोन्याबापु's picture

9 Feb 2016 - 7:44 am | कैलासवासी सोन्याबापु

पण ते स्टँडप कॉमेडियन किंवा बोहारीण किंवा पायलट झाले असते तरी रुक्षच झाले असते.

आदूबाळ भाऊ एकलंबर हो!! सीए लोकांची मेहनत पाहुन आहे! फार कमी वयापासून अफाट सिलेबस सोबत झोंबायच्या सवयी मुळे सीए/सीएस/डॉक्टर लोकांचे सिविल सर्विसेज किंवा स्टेटसिविल सर्विसेज मधे निवडून यायचे प्रमाण भारी असते पहिल्याच एटेम्पट ला

माझे दोन मित्र,एक मैत्रीण सिए आहेत.
त्यांनी घेतलेले मेहनत अफाट आहे..
त्यातील एकाने आता त्याचे क्लास चालु केलेत..