Lumber Spondylosis .............

नितीन पाठक's picture
नितीन पाठक in जनातलं, मनातलं
9 Feb 2015 - 4:40 pm

नमस्कार मंडळी ..............

दि. 27 आणि 28 डिसेंबर रोजी मित्राच्या मुलीचे कोल्हापूर येथे लग्न होते. त्यानिमित्त अहमदनगरहून कोल्हापूर ला जायचा योग आला होता. कोल्हापूरला जाण्यासाठी लक्झरी बस होती. आम्ही दोघे सकाळीच मित्राच्या घरी पोहोचलो. मित्राच्या घरी गेल्यावर थोडे फार कामे केली. सामान, बॅग उचलणे इ इ कामे केली. बस मध्ये मागील बाकावर बसून, साधारण 8 तास प्रवास करून आम्ही कोल्हापूरला पोहोचलो. संध्याकाळचा सीमंतपूजन कार्यक्रम झाला. जेवणे झालीत आणि आम्ही सर्व जण झोपी गेलो.
दुस-या दिवशी सकाळी उठलो तर काय ... माझी पाठ पूर्णपणे आखडून गेली होती. प्रचंड पाठ दुखत होती. मला तर सरळ असे उभे रहाता येईना. काय करावे काय करू नये सुचत नव्हते. रविवार असल्यामुळे सर्व दवाखाने बंद होती. कसे तरी आवरून बसून राहीलो. दुकाने उघडल्यावर 2-3 वेदनाशामक गोळ्या घेतल्या आणि आराम केला. लग्न लागले, जेवणे झाली. आम्ही सर्व व-हाडी परत 8 तास प्रवास करून नगरला परत आलो.
दुस-या दिवशी M.S. (Orthopedic) यांना दाखवले. त्यांनी X-Ray आणि MRI काढायला सांगितला. MRI काढला. नगरला रूबी हॉस्पिटल, पुणे यांची शाखा आहे. आणि तेथील डॉक्टरांनी म्हणजे पुणे रूबी हॉस्पिटल यांनी रिपोर्ट दिला ............
Conclusion:

Lumber Spondylosis.
Posterior protrusion at L4 - 5 intervertebral disc, causing significant compression of the thecal sac & respective nerve roots.
Mild posterior bulge at L5 – S1 intervertebral disc, causing indentation of the thecal sac & left S1 traversing nerve root.
डॉक्टरांची ओषधे चालू झाली त्यासोबत Physiotherapy डॉक्टरॉंकडून Traction, IFT Treatment चालू झाली. 15 दिवस हे सगळे न चुकता केले. आता थोडे बरे वाटत आहे. उभे रहाता येते. चालता येते. पाठ दुखण्याचे प्रमाण जवळ जवळ 90 % कमी झाले. Physiotherapy डोक्टरांनी परवानगी दिली म्हणून ऑफिसला यायला सुरूवात केली. आता Physiotherapy डोकटरांनी काही व्यायाम सांगितले आहेत ते सकाळ, संध्याकाळ करतो.
या संदर्भात आपल्या मिपा वर असणा-या जाणकार, तज्ञ सदस्यांपैकी कोणाला काही अनुभव असल्यास जरूर सांगावा. असल्यास उपाय सांगावा . कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची, व्यायाम, औषधे इ.इ. माहीत असल्यास योग्य तो सल्ला द्यावा ही विनंती.
धन्यवाद

औषधोपचार

प्रतिक्रिया

मी गेली तीन वर्षे वेगवेगळ्या डॉक्टरांकडून उपचार करून घेतलेत. अजून काहीही फरक नाही. सांगितलेले व्यायाम नियमित करतो. तेव्ढ्यापुरते बरे वाटते. पण बैठे काम असल्यामुळे पुन्हा कंबर आखडून जाते.
जास्त चालले तरी कंबर दुखते.

प्रियाजी's picture

9 Feb 2015 - 6:33 pm | प्रियाजी

मलाही हा त्रास फार पुर्वी झाला होता. पण जनरल कंबरदुखीवर व पाय दुखण्यावर मी कबीर बाग योग सन्स्था पुणे येथे मागील वर्शी उप्चार घेतले. मला चांगला उपयोग झाला.

राजाभाउ's picture

9 Feb 2015 - 6:41 pm | राजाभाउ

एकच सांगतो डॉक्टरांनी सांगीतलेले व्यायाम आणी इतर पथ्ये (म्हणजे जड वस्तु न उचलणे, गाडी चालवण्या बाबतचा सल्ला वगैरे) नियमीत पाळा. सुरवातीला आपण हे सर्व करतो पण नंतर पुर्ण बरे झाल्यावर याकडे दुर्लक्ष करतो. माझ्या एका जवळच्या नातेवाइका बाबत हे घडले आहे. ४/५ वर्षांपुर्वी असाच त्रास झाला तेंव्हा विश्रांती, व्यायामाने बरे झाले नंतर त्याकडे दुर्लक्ष झाले त्यांना नुकताच परत त्रास सुरु झाला या वेळी ऑपरेशन करावे लागले.
आजकाल ही ऑपरेशन (स्पाइनची) पुर्वी येव्हडी औघड नाही आहेत तरीही ऑपरेशन टाळण्याचा प्रयत्न करावा.

राजे साहेब's picture

9 Feb 2015 - 8:06 pm | राजे साहेब

नम्स्कार नितिनजी अयुर्वेदिच पन्च्कर्मा घ्या योग करा बर वाटेल स्वानुभव आहे.

श्रीमान's picture

9 Feb 2015 - 8:28 pm | श्रीमान

मी सायटिका चा त्रास सोसलेला आहे. मलाहि foraminal disk bulging आणि severe L5, S1 nereve root compression अशि लक्षने MRI report मधे सांगितलि होति. ortho dr. नि मला operation हाच उपाय आहे व त्या साठि खर्च हि १ लखा पर्यंत येइल असे सांगितले होते. माझ्या family dr. च्या सल्ल्यावरुन मि neurosurgeon चे second opinion घेतले, त्यानि पन operation हाच उपाय सांगितला. पन मी ulternative treatement चा आग्रह धरल्या वर त्यानि physical theropy करुन बघा फरक पडतो का असे सांगितले. दरम्यान मि net वर या विषयावर उपलब्ध माहिती मिळविन्यात ३ ते ४ दिवस घालवले. बहुतेक ठिकानि operation हा शेवट्चा पर्याय आहे हे स्पष्ट पने सांगितले होते, तसेच हा त्रास नैसर्गिक रित्या आवश्यक काळजि घेतल्यास (including physical theropy) ४ ते ५ महिन्यात दुर होऊ शकतो असे सांगितले होते. मि व्यक्तिशः physical theropy घेन्या आधि पुढिल उपाय केले.
१. गाडि वापर पुर्ण बंद केला. नोकरि च्या ठिकानि सुद्धा ( २.५ कि.मि) चालतच जाने येने सुरु केले. तसेच सकाळ व संध्याकाळि सुद्धा अर्धा तास वेगात चालन्याचा व्यायाम घेतला. (net सल्ला )
२. ताठ बसन्यासाठि खुर्चि ऐवजि स्टुल चा वापर केला. (net सल्ला )
३. सकाळि व रत्रि झोपताना सधारनतः १० मि. गरम पान्या च्या पिशविने पाठिला शेक घेतला.
४. जड वस्तु उचलने तसेच पुढे वाकने पुर्णतः टाळले. (net सल्ला )
५. रात्रि झोपताना पातळ गादी चा वापर केला. झोपन्या आधि थोडावेळ पोटा वर झोपुन डोके वर उचलुन् पाठिला झेपेल इतपत ताण दिला. ( Dr. सल्ला )
magically चालने सुर केल्याच्या पहिल्याच दिवशि पाठिचे व पायाचे दुखाने निम्यावर आले. मात्र फक्त झोपताना pain killer घ्याव्या लागल्या, पाचव्या दिवसा नंतर मात्र दुखने पुर्न थांबले, pain killer हि त्या नंतर घेन्याचि गरज भासलि नाही.
अर्थात वरिल अनुभव हा माझा वैयक्तिक आहे (मि आठ्वड्या साठि पुढे ढकललेलि physical theropy नंतर घेतली नाहि, मात्र neuro चा pain killer वगळ्ता ७ दिवसा साठिचा medicine course पुर्न केला,) तो मि कुनाला सुचवत नाहि आहे. मात्र रोज किमान १ तास चालन्याच्या व्यायामाचा मात्र असा त्रास असनार्यानि doctary सल्ल्याने जरुर उपयोग करावा असे सुचविन. शिर्षकात सांगितल्या प्रमाने neurosurgeon कडुन गरज भासल्यास second opinion जरुर घ्या.

सुबोध खरे's picture

9 Feb 2015 - 8:35 pm | सुबोध खरे

मला पण डिस्क प्रोट्रयूजन आणी बल्ज होता १९९७ साली. कोणतेही औषध न घेता जीवन पद्धती बदलून मी सर्व गोष्टी करतो.
१५ तारखेच्या कट्ट्याला या. फुकट सल्ला आणी स्वानुभवाचे बोल सांगितले जातील.
मुंबईला येणार असाल तर व्यनी करा आणी माझ्या दवाखान्यात या फुकट सल्ला मिळेल. फोनवर समग्र माहिती देणे कठीण आहे यास्तव हा प्रपंच. (मिपाकरांना फुकट सल्ला. जाहिरात नाही).

माम्लेदारचा पन्खा's picture

9 Feb 2015 - 10:25 pm | माम्लेदारचा पन्खा

मानलं बुवा डॉक तुम्हाला.....

प्रसाद१९७१'s picture

10 Feb 2015 - 4:00 pm | प्रसाद१९७१

मिपाकरांना फुकट सल्ला. जाहिरात नाही

सलाम डॉक्टरसाहेब तुम्हाला.

१)http://www.misalpav.com/node/27828 संधीगत वात व पक्षाघात- सामान्य लक्षणे व संयुक्त उपचार पद्धती. २) http://www.misalpav.com/node/28179 वातव्याधी सामान्य आहार :- ३)http://ayurvedandpanchakarma.com/arthritis-treatment-in-pune/

भाग्यश्री कुलकर्णी's picture

10 Feb 2015 - 12:08 am | भाग्यश्री कुलकर्णी

खरे साहेब मलाही सेम त्रास आहे.आणी बल्ज पन.व्यायामाने तेवढ्यापुरते बरे वाटते.परत जैसे थे.आमी काय कट्टयाला नाय वो.इतच लिवा की.नायतर वायला धागा काडा जी.

नि३सोलपुरकर's picture

10 Feb 2015 - 3:59 pm | नि३सोलपुरकर

मी गेली तीन वर्षे वेगवेगळ्या डॉक्टरांकडून उपचार करून घेतलेत पण उपयोग शुन्य.
कट्ट्याला यायचे होते पण काही कारणांमुळे शक्य होणार नाही.

श्रीगुरुजी's picture

10 Feb 2015 - 5:44 pm | श्रीगुरुजी

"Lumber Spondylosis" बद्दल कमी माहिती आहे. ३ महिन्यांपूर्वी माझी cervical Spondylosis ची शस्त्रक्रिया झाली. ऑक्टोबर महिन्यात डावा हात, डावा खांदा व मान प्रचंड दुखायला लागली. डाव्या हाताच्या बोटात मुंग्या येत होत्या. C5-C6 या मणक्यांतील चकती बरीच झिजली असून काहीशी बाहेर आल्याचे एमआरआय स्कॅनिंगमध्ये दिसले. दोन डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नाही हे लक्षात आले.

सुरवातीला मला भीति वाटत होती. परंतु ही शस्त्रक्रिया अत्यंत सुलभ असून एंडोस्कोपी तंत्राने करता येते हे डॉक्टरांनी समजावून सांगितले. नोव्हेंबर मध्ये शस्त्रक्रिया झाली. गळ्याच्या उजव्या बाजूला ओपनिंग करून आधीची जुनी चकती काढून कंबरेच्या हाडापासून तयार केलेल्या नव्या चकतीचे ग्राफ्टिंग करून त्याला केज नावाच्या एका इंस्टृमेंटने स्क्रूच्या सहाय्याने आधार दिला. शस्त्रक्रियेत अत्यंत कमी रक्त गेले व अजिबात रक्त द्यावे लागले नाही. शस्त्रक्रिया संपल्याक्षणी हातातील वेदना थांबल्या होत्या. शस्त्रक्रियेच्या ४ थ्या दिवशीच रूग्णालयातून बाहेर सोडले. आता जवळपास ९५ टक्के रिकव्हरी झाली आहे.

सध्या नियमित फिजिओथेरपिस्टने सांगितलेले व्यायाम करतो आहे.

कंबरेच्या चकतीसाठी अगदी अशीच सुलभ शस्त्रक्रिया आहे. अशा शस्त्रक्रियांचा सक्सेस रेट ९९% टक्के आहे. कंबरेच्या व मानेच्या व्यायामांचा एक चार्ट माझ्याकडे आहे. हवा असल्यास इथे टाकीन.

टवाळ कार्टा's picture

10 Feb 2015 - 10:14 pm | टवाळ कार्टा

५-७ वर्षे बाईक चालवून आता कंटाळा आलाय...थोडासा पाठीचा त्रास होतो कधी कधी
तो चार्ट द्या इथेच...सुरु करेन यायाम

नितीन पाठक's picture

11 Feb 2015 - 2:50 pm | नितीन पाठक

श्रीगुरूजी,
आपण उल्लेख केलेला कंबरेच्या व मानेच्या व्यायामांचा चार्ट द्यावा ही विनंती आहे.
धन्यवाद

त्यांचे व्यायाम ते देतीलच पण इथेही आहेत बघा बहुतांश उपयुक्त व्यायामः

टवाळ कार्टा's picture

11 Feb 2015 - 3:09 pm | टवाळ कार्टा

खिक्क

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Feb 2015 - 3:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे "हवाई" व्यायाम स्पाँडिलोसिसच्या रुग्णाला कायम व्हिलचेअरवर बसवतील ! +D

अगदी गांभिर्याने प्रतिसाद वाचायला घेतला होता!! उपयुक्त व्यायाम !!! :)))

माम्लेदारचा पन्खा's picture

11 Feb 2015 - 10:59 pm | माम्लेदारचा पन्खा

ह्याने फक्त डोळे ठीक होतील.... कंबरेचं काय हा मुद्दा बाजूलाच् राहतोय ?? :-))

टवाळ कार्टा's picture

11 Feb 2015 - 11:02 pm | टवाळ कार्टा

आणि उत्साहाच्या भरात गुढगेदुखी सुरु होण्याची शक्यतासुध्धा नाकारता येत नाही ;)

..इन एनी केस..कमरेला फायदा आहेच.

नितीन पाठक's picture

12 Feb 2015 - 11:47 am | नितीन पाठक

गवि सर ,
हा व्यायाम करण्यासाठी मी कोणता ड्रेस घालू ???????

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Feb 2015 - 11:50 am | डॉ सुहास म्हात्रे

व्हिडिओत दाखवला आहे तोच ड्रेस घातल्यास तसाच फायदा होईल ;)

श्रीगुरुजी's picture

11 Feb 2015 - 10:09 pm | श्रीगुरुजी

उद्या नक्की टाकतो.

आयुर्हित's picture

11 Feb 2015 - 12:01 am | आयुर्हित

आजकाल pain killer देवून किंवा traction लावून किंवा bed rest सांगून, आणि patient मालदार असला तर ताबडतोब शल्यक्रिया करायला लावून आजाराचे management केले जाते.

पण आजाराचे मूळ कारण बहुतेक वेळेला (>९०% वेळेला) तसेच ठेवले जाते व पुढच्या मोठ्या आजाराची एक सुरवात होते. त्यातून अजून एक मोठी शल्यक्रिया केली जाते. असे वर्षानुवर्षे आजारी पडून सारे मनस्वास्थ्य घालवून बसतो.

ज्याचा कोणाचा सल्ला घेणार तो complete recovery साठीच घ्या अथवा मला व्यनी करा!

टवाळ कार्टा's picture

11 Feb 2015 - 12:01 pm | टवाळ कार्टा

मला व्यनी करा! इतकेच लिहिले असते तरी चाल्ले अस्ते की ;)

आयुर्हित's picture

11 Feb 2015 - 1:52 pm | आयुर्हित

व्यनी करा अथवा करू नका, पण focus मात्र complete recovery वर ठेवा म्हणजे झाले!

टवाळ कार्टा's picture

11 Feb 2015 - 1:55 pm | टवाळ कार्टा

अगदी अगदी....थोडी मस्करी केली हो काका....इतके मनावर घेउ नका :)

कमरेच्या दुखण्यापेक्षाही जास्त तीव्रतेने एकाच पायात नस ताणल्याप्रमाणे अथवा आखडल्याप्रमाणे भरपूर दुखणे, कोणत्याही पोझिशनमधे उभे राहताना दुखल्याने सतत पोझिशन बदलायला लागणे, पायाचा काही भाग बधीर होणे वगैरे असे त्रास होतात का कोणाला या कारणाने?

हे त्रास एकदा उद्भवले होते आणि दोनतीन आठवडे वेळ खाऊन नष्ट झाले. एमाराय वगैरे सर्व झाले. त्यात डिस्कमधील कसलेसे मटेरियल बाहेर आले आहे आणि नसेमधे घुसत असल्याने एकूण परिस्थिती वाईट आहे असे काहीसे समजले. आपोआप कमी न झाल्यास ऑपरेशन असंच म्हणाले होते डॉक्टर, पण काही आठवड्यांत आपोआप कमी झालं म्हणून आता डोक्यातून काढून टाकलं आहे. अद्यापही अधेमधे वेदना उपटते. पण पायात जात नाही.

जेपी's picture

11 Feb 2015 - 2:06 pm | जेपी

वय वर्ष 13 .अपघात.
मानेजवळील pivot joint ला गंभीर इजा.दोन वर्ष हॉस्पीटलला चकरा.सोलापुर पासुन मुंबे पर्यंत.नंतर ठीक.आता डॉक ने सांगितले.गाडी चालवणे सोडा.चालायला लागा.नायतर गुजारिशचा रुतवीक व्हाल.

कपिलमुनी's picture

11 Feb 2015 - 3:43 pm | कपिलमुनी

२००३ साली अपघात झाला होता . त्या नंतर एका क्ष ठिकाणी माकडहाडाच्या वर दुखायचा .जितका वेळ जास्त बसेल तेवढा जास्त दुखायचा. क्ष म्हणजे एक रुपयाच्या आकाराचा भाग दुखायचा . सोनोग्राफी , एक्स रे , स्कॅन झाले पण काहीही निदान नाही .
डॉक्टर ने सांगितले तिथल्या मसल्सला धक्का बसला आहे . जास्त ताण पडला की ते दुखतात. त्यांची ताक्द कमी झाली आहे.

सध्या ड्रायव्हिंग करताना व बसताना ही ट्यूब वापरायला सांगितली आहे .

tube

श्रीगुरुजी's picture

12 Feb 2015 - 2:52 pm | श्रीगुरुजी

कंबरदुखीसाठी व्यायाम व सूचना (व्यायामप्रकार करण्यआआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. विशेषतः अल्सर, कोलायटीस सारखे पोटाचे विकार असणार्‍यांनी डॉक्टरांच्या सूचनेनुसारच व्यायामप्रकार करावेत).

नितीन पाठक's picture

12 Feb 2015 - 3:37 pm | नितीन पाठक

धन्यवाद श्री गुरूजी,
आपण सुचविलेले व्यायाम अतिशय उपयुक्त आहेत. करायला पण सोपे आहेत,
सध्या मी माझ्या Physiotherapist ने मला आपण वर दिलेल्या सर्व सूचना सांगितल्या आहेत. चित्र क्रं १, २, ८ आणि ९ आधिक इते व्यायाम मी करीत आहे,
पुन्हा एकदा धन्यवाद.

श्रीगुरुजी's picture

12 Feb 2015 - 3:01 pm | श्रीगुरुजी

मानदुखीसाठी व्यायाम व सूचना (व्यायामप्रकार करण्यआआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा).

___________________________________________________________________________


_______________________________________________________________________________

याच चार्टचे दोन वेगळे तुकडे

_______________________________________________________________________________