मिपा संमेलन १५ फेब्रु. २०१५ आणि पुणेकर

चौकटराजा's picture
चौकटराजा in भटकंती
3 Feb 2015 - 10:51 am

कट्टा फेम मुवि यानी सूचित केलेल्या आम्बिवली येथील वनविहार येथे दि. १५ फेब्रुवारी रविवार रोजी मिपातील पुणेकर व मुंबईकर व बाकी येतील ते असे संमेलन आयोजित होत आहे. या संमेलनास जाण्यासाठी पुणेकरांचे समायोजकाचे ब्याटन श्री इस्पिक एक्का साहेब यानी माझ्याकडे दिले आहे.

पुणेकरानी पुणे ते पुणे व्हाया चिंचवड ( येथे मी व मुवी चे चिरंजीव हे प्रवासी ) असे जावे त्यासाठी रेलवे मग सहा आसनी
असा प्रवास शक्यतो करू नये असे मला वाटते. त्यासाठी जर भाड्याने ( येथे किराया हा अर्थ घ्यावा ) वाहन घेतले तर ३०० किमी चे अंंतराचे पैसे बहुतेक द्यावे लागतील. सदर अंतर त्या पेक्षा काहीसे कमी असेल. पण सर्वाना मजेत जाता येईल. दुसरा पर्याय असा की पुणेकरातील जे येणार आहेत त्यानी पूल करून येण्याजाण्याचा खर्च वाटून घ्यावा. त्यासाठी कोणाकडे स्वत:ची कार आहे का? ते देण्यास ते तयार आहेत का ?हे पहावे लागेल. प्रथमत: त्यासाठी जे पंधरालाच सकाळी येणार आहेत त्यानी माझ्याकडे संपर्क साधावा. त्यात आपण रेल्वे आरक्षण केले आहे सबब परस्पर येऊ. मी शेअर करून येणार पण मी माझी कार काही आणू शकत नाही. किंवा मी माझी कार आणतो. मला इतरानी शेअर करावे. ( असे असल्यास चालविणारा सोडून इतर किती कार मधे सामावून घेउ शकाल याचे उत्तर . असे त्वरित कळवावे. म्हणजे पुढील कायवाही करता येईल.

==============================================

कट्ट्याला येणार्‍या पुणे-पिंचि च्या सर्व सभासदांनी कृपया संयोजनाला लागणारी आपली माहिती खालीलप्रमाणे चौकटचा राजा या आयडीवर पाठवावी :

(* : योग्य पर्याय ठेऊन दुसरा डिलीट करा.)

१. मिपा आयडी / नाव :

२. निघण्याची तारीख : १४ फेब / १५ फेब *

३. निघण्याचे ठिकाण : पुणे / पिंचि *

४. सामाईक व्यवस्था शक्य झाल्यास तिने प्रवास कसा करण्याची इच्छा आहे का ? : हो / नाही *

५. एकूण कितीजण येणार आहेत ? : अ) मोठे :________ आ) मुले:______

==============================================

धन्यवाद !

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

3 Feb 2015 - 11:48 am | मुक्त विहारि

माझ्या मुलासाठी एक सीट नक्की ठेवा.

प्रवासखर्च देईन.

ब्याटन लिडर चौकटराजांचे पुस्पगुच्छ देऊन स्वागत आहे.

त्रिवेणी's picture

3 Feb 2015 - 1:42 pm | त्रिवेणी

ये ण्या ची ई छा हो ती प ण को णी अ ना हि ता सो ब त ना ही.

पोचलीस की आम्ही आहोत ना.सुचेताला विचार.

प्रभाकर पेठकर's picture

3 Feb 2015 - 4:04 pm | प्रभाकर पेठकर

>>>>ये ण्या ची ई छा हो ती प ण को णी अ ना हि ता सो ब त ना ही.

मिपावरील पुरुषमंडळी विश्वास ठेवण्याजोगी नाहीत हे जाणवून, वाईट वाटले.

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Feb 2015 - 4:18 pm | ज्ञानोबाचे पैजार

पेठकर काका,

तुम्ही उगाच सुता वरुन स्वर्ग गाठू नका.

त्यांच्या विधाना वरुन त्यांना केवळ पुण्यातल्या मिपाकर पुरुषांबद्दल खात्री वाटत नाही असा अर्थ फारतर काढता येईल.

त्यातही संम्मेलनाला पुण्यामधुन कोण मिपाकर पुरुष जात आहे ते तपासायला पाहिजे, त्यांच्या पैकी केवळ एखाद दूसर्‍या मिपाकर पुरुषाबद्दल त्यांना खात्री नसावी.

इतर पुणेकर आणि पुणेतर मिपाकरांची झाकली मुठ राहुदे.

पैजारबुवा,

टवाळ कार्टा's picture

3 Feb 2015 - 4:39 pm | टवाळ कार्टा

=))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Feb 2015 - 12:03 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

पुण्याचे सगळे मिपाकर जंटलमण आहेत, क्वाय!!!!! उगीचं आपलं पुण्याला काड्या सारायचा केविलवाणा प्रयत्न =))

सुहास झेले's picture

5 Feb 2015 - 12:25 am | सुहास झेले

हा हा हा =))

सूड's picture

3 Feb 2015 - 2:25 pm | सूड

शुभेच्छा!

मी-सौरभ's picture

3 Feb 2015 - 3:55 pm | मी-सौरभ

ब्याट्न लीडर अन् कट्ट्याला सुद्धा...

प्रभाकर पेठकर's picture

3 Feb 2015 - 4:06 pm | प्रभाकर पेठकर

यायला नक्कीच आवडलं असतं, पण.......

कट्टेकरी पुणेकरांना शुभेच्छा.
नेमकं हापिसच्या कामामुळे सालं रहित झालं.

पिवळा डांबिस's picture

4 Feb 2015 - 1:58 am | पिवळा डांबिस

त्यासाठी जर भाड्याने ( येथे किराया हा अर्थ घ्यावा ) वाहन घेतले

हे स्पष्टीकरण इथं द्यायला लागलं म्हणून मिपाविषयीच्या अभिमानाने ऊर भरून आला आहे!
(इथे ड्वाले पानावल्याची बाहुली कल्पावी!)
बाकी संमेलनाला हार्दिक शुभेच्छा!
पेठकरकाकांप्रमाणेच म्हणतो की, 'यायला नक्कीच आवडलं असतं, पण.....'
:)

मुक्त विहारि's picture

4 Feb 2015 - 3:54 am | मुक्त विहारि

अहो,

तुम्ही आलात की, परत एक कट्टा करू या.

हाकानाका.

पिवळा डांबिस's picture

5 Feb 2015 - 12:38 am | पिवळा डांबिस

जरूर करूयात.
धन्यवाद मुविशेठ.

मुक्त विहारि's picture

5 Feb 2015 - 9:33 am | मुक्त विहारि

पण "मुविशेठ" नका म्हणू.

शक्यतो "मुवि"च म्हणाला तर उत्तम...

कुंदन's picture

15 Feb 2015 - 8:06 am | कुंदन

ओक्के मुक्त बिहारीजी.

यशोधरा's picture

5 Feb 2015 - 9:43 am | यशोधरा

कवा येतांव?

अक्षया's picture

5 Feb 2015 - 12:41 pm | अक्षया

शुभेच्छा! !

मोनू's picture

14 Feb 2015 - 10:24 am | मोनू

सर्वांना कट्ट्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा ... पुढील कट्ट्यास येण्याचा नक्की प्रयत्न करेन .

कुंदन's picture

15 Feb 2015 - 4:43 am | कुंदन

शुभेच्छा!

अत्रुप्त आत्मा's picture

15 Feb 2015 - 5:32 am | अत्रुप्त आत्मा

पुणे मिपाकर कंपु नं १ ( ;-) ) निघालो!
हुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र!!!! :-D

कुंद्याचा रिप्लाय बघुन आनंद झाला

पर्नल नेने मराठे's picture

17 Feb 2015 - 5:57 pm | पर्नल नेने मराठे

फोतो कुथेत

अत्रुप्त आत्मा's picture

17 Feb 2015 - 9:59 pm | अत्रुप्त आत्मा

@फोतो कुथेत >> =)))))

किच्चु ताईची आठवण आली! :-(

अहो चुचुमामी आलेली असताना किच्चुताईची काय आठवण काढताय. अच्रत बव्लत!!

अत्रुप्त आत्मा's picture

18 Feb 2015 - 9:22 am | अत्रुप्त आत्मा

चूप! :-\
हल्कत कुजकत! :P