अभिवाचनयोग्य कथा सुचवा....

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in काथ्याकूट
17 Jan 2015 - 6:44 pm
गाभा: 

मित्रहो,
जाहीर कार्यक्रमात अभिवाचन करता येतील, अशा मराठीतील काही वेगळ्या, दर्जेदार कथा सुचवता येतील? प्रसिद्ध कथाकारांच्या फारशा परिचित नसलेल्याही चालतील. फक्त त्या अभिवाचनयोग्य हव्यात. (थोडं वर्णन, थोडे संवाद, थोडं रंजन, असा मिलाफ साधणा-या.)
आधी वाचलेल्या, कुणी सुचवलेल्या कथाही नमूद केल्या, तरी चालेल.
अभिप्रायांच्या प्रतीक्षेत....

प्रतिक्रिया

कंजूस's picture

17 Jan 2015 - 6:48 pm | कंजूस

कॉपीराइटचं काय ?

आपला अभिजित's picture

17 Jan 2015 - 6:54 pm | आपला अभिजित

सुचवायला कशाला लागतोय copyright?

प्रसाद गोडबोले's picture

17 Jan 2015 - 7:03 pm | प्रसाद गोडबोले

जर सुचवल्या नन्तर कॉप्यराईट मुळे अभिवाचन करताच येंआर नसेल तर मग सुचवुन काय उपयोग ?

प्रसाद गोडबोले's picture

17 Jan 2015 - 9:51 pm | प्रसाद गोडबोले

मित्रहो,
जाहीर चांद्रयान कार्यक्रमात वापरता येतील, अशी परसनल स्पेसशटल ची मॉडेल्स सुचवता सुचवता येतील? प्रसिद्ध कंपन्यांच्या वा फारशा परिचित नसलेल्याही चालतील. फक्त त्या चंद्रावर नेता येण्यायोग्य हव्यात. ( थोडं डिझाईन, थोडे पॉवर , थोडं मायलेज, असा मिलाफ साधणा-या.)
आधी कोणी वापरलेल्या स्पेसशटल्स नमूद केल्या, तरी चालेल.
अभिप्रायांच्या प्रतीक्षेत....

विजुभाऊ's picture

17 Jan 2015 - 6:58 pm | विजुभाऊ

वपुं ची " बाप" नावाची कथा आहे.

"जाहिर कार्यक्रमात --"फुकट असले तरी "कोणत्याही प्रकारे दृक् श्राव्य पुन:प्रसारण --"साठी पूर्वानुमती घेणार आहे एवढेतरी इथे लिहा ना.

आपला अभिजित's picture

18 Jan 2015 - 10:33 am | आपला अभिजित

अभिप्रायांबद्दल धन्यवाद.