http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan/news/arti...
आजच्या महाराष्ट्र टाईम्स आणि टाईम्स आॅफ इंडिया मध्ये आलेली ही बातमी आहे. राहुल येलांगे आणि त्यांची पत्नी पूर्णिमा यांना त्यांच्या गावाने बहिष्कृत केलेलं आहे. रायगड जिल्ह्याच्या पोलादपूर तालुक्यात हे गाव आहे. राहुल येलांगे गिर्यारोहक असून पूर्णिमा येलांगे सायबर लाॅ या विषयातल्या तज्ञ आहेत. गावक-यांचा आक्षेप त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला तेव्हापासून सुरू झाला. हा विवाह आंतरजातीय आहे असं गावक-यांना वाटलं म्हणे! राहुल यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी गावात जी डेअरी चालू केलेली आहे तिलाही गावक-यांचा विरोध आहे. काही गावक-यांनी तर पोलादपूर पोलिस ठाण्यात जाऊन असं नमूद केलंय - की जर येलांगे दांपत्याच्या म्हशी ठेवलेल्या जागेला आग लागली तर त्यांना जबाबदार धरण्यात येऊ नये. गावक-यांचा पूर्णिमा येलांगे यांच्या कपड्यांवरही आक्षेप आहे. त्या साडी, मंगळसूत्र, कुंकू या गोष्टी वापरत नाहीत आणि त्यामुळे गावक-यांनी या दांपत्याला जगणं कठीण केलेलं आहे. राहुल यांनी माऊंट एव्हरेस्ट आणि त्याशिवाय इतर अनेक पर्वतशिखरे पादाक्रांत केली आहेत, " पण या गावातल्या लोकांचं मन वळवणं ही महाकठीण गोष्ट आहे. "
स्वतःला पुरोगामी म्हणवणा-या महाराष्ट्रात असं काही होत असेल आणि तेही एका शहरात स्थायिक होऊ शकणा-या पण आपल्या मूळ गावात स्थायिक होण्याचा निर्णय घेणा-या जोडप्याच्या बाबतीत होत असेल तर ही नक्कीच लाजिरवाणी गोष्ट आहे.
प्रतिक्रिया
16 Jan 2015 - 10:43 pm | एस
अतिशय धक्कादायक बाब. महाराष्ट्र पुरोगामी-पुरोगामी म्हणून मिरवण्यात काही हशील राहिला नाही असे म्हणावेसे वाटते.
16 Jan 2015 - 11:35 pm | बॅटमॅन
कसला घंट्याचा पुरोगामी!!!!!!!!!! वाय झेड महाराष्ट्र आहे.
16 Jan 2015 - 11:40 pm | भृशुंडी
इच्छा : महाराष्ट्र पुरोगामी का काय ते असावा
वस्तुस्थिती: महाराष्ट्रात वर उल्लेखलेले प्रकार होत आहेत्/पूर्वीही झाले आहेत.
तेव्हा "पुरोगामी महाराष्ट्रात" ह्याची क्लिशे दप्तरांत नोंद करून घ्यावी.
16 Jan 2015 - 11:52 pm | पिवळा डांबिस
आयला, रायगड जिल्ह्यातल्या, कुठल्याश्या पोलादपूर तालुक्यातल्या कुठल्याश्या भोगावसारख्या बुद्रुक गावातले अडाण*ट गावकरी काहीतरी वागले म्हणून उभ्या महाराष्ट्राच्या मानसिकतेबद्दल शंका घेऊन लाज वाटून घ्यायची म्हणजे अतीच झालं!
त्या भोगाव आणि पोलादपूरला फाट्यावर मारले आहे!!!!
17 Jan 2015 - 12:15 am | बोका-ए-आझम
मान्य आहे पण हे तिकडे होतंय तर होऊ दे! मला काय? अशी वृत्तीही घातक आहे हे मला वाटतं तुम्हालाही मान्य होईल पिडांकाका!(साॅरी पण तुम्ही मिपावरच्या सार्वजनिक काकांपैकी एक आहात म्हणून काका म्हणतोय!)
17 Jan 2015 - 12:23 am | पिवळा डांबिस
काका म्हंटल्याबद्दल नो नीड सॉरी! :)
ती भोगावकरांची वृत्ती घातकच नाही तर तिरस्करणीय आहे, म्हणूनच त्यांना फाट्यावर मारले आहे!
पण त्याबद्दल आणखी काही करायचे असेल तर ते पोलादपूरकरांनी करायला हवं.
उर्वरित महाराष्ट्राने उगाच स्वतःला गिल्टी कॉन्शस घेण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं, इतकंच.
17 Jan 2015 - 12:57 am | बॅटमॅन
हो पण हे फक्त मानसिकतेचे ओव्हर द टॉप प्रदर्शन आहे. इतक्या टोकाला न जाणार्यांची मानसिकताही कैक वेळेस फार वेगळी नसते. त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राने स्वतःला प्रोग्रेसिव्हही समजू नये. अर्थात फालतूचा गिल्ट कॉम्प्लेक्सही काही कामाचा नै म्हणा.
स्वगतः अशा गोष्टींवर ऑनलाईन काही बोलणे हे अलीकडे निरर्थकच वाटू लागलेय. बाकी सदस्यांचा इथे काही संबंध नाही.
20 Jan 2015 - 3:47 pm | नाखु
ना द्राक्षांनी* बिघडेल
ना रूद्राक्षांनी घडेल
महाराष्ट्र . बाकी महाराष्ट्र अग्रेसर आही चांगल्या आणि वाईट बाबतीतही, त्या बद्दल जालावर फारसे संतुलित कधीच वाचण्यात आले नाही हे एक माझ निरिक्षण.
17 Jan 2015 - 12:03 am | डॉ सुहास म्हात्रे
निषेध !
मात्र एका खेडेगावात झालेल्या नि:संशयपणे निषेधार्ह प्रकाराचे सर्व महाराष्ट्राला वेठीला धरून केलेले सरसकटीकरण चूक आहे.
महाराष्ट्र जेवढा (तथाकथित) पुरोगामी शहरी लोकांनी बनलेले राज्य आहे तेवढेच पुराण्या सरंजामशाही मनोवृत्तीच्या शहरात आणि खेड्यांत वसलेल्या लोकांनी बनलेले राज्य आहे.
17 Jan 2015 - 12:04 am | शिल्पा ब
थोडक्यात गावात काही सुधारणा करण्याऐवजी शहरात जाऊन स्वतःची प्रगती करणे सोपे. हे बहिष्कार वगैरे आततायी झालं हे अजून एक.
काही वर्षांपूर्वी नात्यातल्या एका व्यक्तीने गावातल्या लोकांना २००० झाडं फुकट वाटण्यासाठी आणली. कोणीही घेतली नाहीत अन वर जेव्हा हि झाडं मोठ्या देवळाभोवती लावली तेव्हा चोरली.
17 Jan 2015 - 1:23 am | आतिवास
दुर्दैवी!
17 Jan 2015 - 2:28 am | अर्धवटराव
ज्या कुठल्या गावात असले प्रकार होतात त्यांचं एकदम प्रबोधन वगैरे करण्याच्य भानगडीत पडु नये. त्याबद्द्ल गिल्टी कॉन्शस तर अजीबात वाटुन घेऊ नये. एकतर हे बहिष्कार वगैरे रिकामटेकड्या डोक्याचे उद्योग आहेत. प्रत्येक गावाचं पैशाने विकत घेण्याजोगं श्रद्धास्थान असतं. तिथे हजार रुपये फेकावे, मान-सन्मान विकत घ्यावा, व गावकर्यांच्या डोक्यावर मिरे वाटावे.
17 Jan 2015 - 4:32 am | संदीप डांगे
एक नंबर, लय भारी बोललात.
20 Jan 2015 - 4:14 pm | प्रसाद१९७१
+१११११११११
20 Jan 2015 - 4:32 pm | कपिलमुनी
गारंबीचा बापू आठवला
20 Jan 2015 - 4:40 pm | सौंदाळा
काय हो मुनी तुंबाडचे खोत वाचुन झालं का?
बापुचा दोस्त - सौंदाळा मुसाशेठ सुपारीवाला
22 Jan 2015 - 7:03 pm | कपिलमुनी
पेंडसे आणि त्याम्च्या कोकणच्या पार्श्वभूमीवरच्या कांदबर्या ..
हा मस्त चर्चेचा विषय आहे बघा !
17 Jan 2015 - 3:08 am | आजानुकर्ण
बहिष्कार घालण्याचा प्रकार दुर्दैवी आहे. पण अशा ऐकीव प्रकरणांनुसार हा नोंदणी-आंतरजातीय-विवाह, जीन्स-टीशर्टचा प्रकार नक्कीच नसावा. बहुदा जमिनीचा वगैरे वाद असणार. काहीतरी करुन या कुटुंबाला हाकलून लावण्यासाठी वापरण्यात आलेला अभिनव मार्ग दिसतोय. १० कुटुंबाचं गाव म्हणजे बाकीचे सर्व नात्यागोत्यातलेच असण्याची शक्यताही खूपच जास्त आहे.
17 Jan 2015 - 4:28 am | संदीप डांगे
असेच वाटते.
९०% प्रकरणांमध्ये अंतर्गत राजकारण, वर्चस्वाची भावना, जमीन वैगेरे चा वाद असतो. खेड्यातले काही लोक जगात स्वतालाच फार शाणे समजत असतात, त्यांच्यापुढे कुणी आपली हुशारी, कर्तबगारी किंवा पाश्चात्त्य संस्कृती दाखवायला लागला कि मिळेल तसे ते न्यूनगंडातून येणारा अहंगड दाखवून समोरच्याला दाबायला बघतात.
माझ्या अतिखेड्यातल्या नातेवाईकांचा फार छान अनुभव आला. आमचे एक काका तेंव्हा मुंबईला प्रथमच माझ्याकडे आले तेंव्हा त्यांना काहीतरी विशेष मद्यपान जे त्यांच्या गावातच काय स्वप्नात पण मिळणार नाही ते द्यावे असे वाटले. मनात बडेजावाचा काही विचार नव्हता बस असाच कि यांना पण बघू दे काय लाइफ़ असते इकडचं. १५०० रुपयांची इम्पोर्टेड वाइन ४ घोटात मारून काकाश्री म्हणतात, "काय पांचट दारू हाये बे, याच्यापेक्षा ते साली ५ रुपयाची एकच गिलास जास्त चढते".
तेंव्हापासून "तुम्ही महान" म्हणून गप बसत असतो.
20 Jan 2015 - 3:55 pm | बॅटमॅन
न्यूनगंडातला अहंगंड >>>>>>>>>>>>>>> +१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११!!!!!
एकच नंबर बोललात बघा. अशा वायझेड लोकांशी जवळून संपर्क आलेला आहे. नात्यातले असतील तर पुरतेपणी हाड देखील करता येत नाही. पण योग्य वेळी जागा दाखवून द्यायची. मस्त बोंबलत बसतात.
20 Jan 2015 - 10:28 pm | रवीराज
बहिष्कार घालण्याचा प्रकार निश्चितच निंदनीय आहे, पण मीडिया सांगेल-दाखवेल त्या गोष्टींवर आपण चटकन विश्वास ठेवतो, ब्रेकिंग न्यूज साठी मीडियावाले कुठल्याही पातळीवर जातात,
17 Jan 2015 - 6:48 am | टिल्लू
... आणखी चार कुटूंबे वाळीत.
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/social-crime/a...
17 Jan 2015 - 7:38 pm | पैसा
धिक्कार त्या गावाचा! आता सगळीकडे वाईट प्रसिद्धी मिळाल्यावर तरी शहाणपण सुचतंय का त्यांना? ही पुच्छप्रगती सर्वांगीण दिसते. मुंबईत कुठेतरी महिलांनी गाऊन घातला तर दंड अशी बातमी हल्लीच वाचली होती. :(
17 Jan 2015 - 7:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च्यायला, जसं जसं आपण आधुनिक होत चाललो, नव विचारांचे होत चाललो पण मुर्खपणाच्या काही गोष्टी आपल्या पाठ सोडायला तयार नाही.
-दिलीप बिरुटे