'लेखन' नावाचा टॅब ऑप्शन

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in काथ्याकूट
31 Dec 2014 - 12:39 pm
गाभा: 

मिसळपाव प्रशासकांना विनंती -

मिसळपाववर सदस्याच्या प्रोफाईलमध्ये सध्या दृश्य, वाचनखुणा, संपादन, Track, खरडवही असे पाच ऑप्शन्स दिसतात.

याच्या जोडीला लेखन हा ऑप्शन पण देता येईल काय?
त्या सद्स्याने केलेले सर्व लेखनाचे धागे या एका टॅबमध्ये सापडू शकतील.

अन्यथा Track चा वापर करुन शोधावे लागते. त्यात लेखकाचे स्वतःचे लेखन असले तरी इतर धाग्यांवर दिलेल्या प्रतिक्रीयाही असल्याने थोडे कठीण जाते. नवे लेखन मध्ये शोधणे तर अधिकच कठीण. विशेषतः जुने लेखन असेल तर.

टेक्नीकली हे कितपत कठीण आहे याची कल्पना नाही, पण इतर अनेक मराठी साईट्सवर (उदा. मायबोली, ऐसी अक्षरे) ही सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे मिसळपाववरही उपलब्ध होणं शक्य आहे असं वाटतं.

प्रतिक्रिया

एस's picture

31 Dec 2014 - 12:47 pm | एस

इथे सदस्याच्या आयडीवर माऊस नेऊन पाहिल्यास http://misalpav.com/user/24080 असे दिसेल. ते कॉपी करून ब्राऊजरच्या अ‍ॅड्रेसबारमध्ये पेस्ट करा व त्यापुढे /authored असे लिहून एंटर करा. त्या लेखकाचे सर्व लेखन दिसू लागेल. उदा. तुमचे सर्व लेखन http://misalpav.com/user/24080/authored या दुव्यावर दिसू शकते.

बाकी अशा स्वरूपाची सुविधा देणे तांत्रिकदृष्ट्या अजिबात कठीण नाही आणि ते उपयुक्तही ठरेल.

श्रीरंग_जोशी's picture

31 Dec 2014 - 6:59 pm | श्रीरंग_जोशी

सप्टेंबर॑ २०१२ च्या उर्ध्वश्रेणीकरणापूर्वी हा पर्याय उपलब्ध होता.

खटपट्या's picture

31 Dec 2014 - 10:08 pm | खटपट्या

उर्ध्वश्रेणीकरणापूर्वी

बाबौ !!

एस's picture

31 Dec 2014 - 10:53 pm | एस

हो, पूर्वी होतं.
प्रत्येक लेखाखाली त्या लेखकाचे सर्व लेखन असा एक दुवा ही दिसत असे.

मुक्त विहारि's picture

31 Dec 2014 - 1:06 pm | मुक्त विहारि

सहमत

विशाल कुलकर्णी's picture

31 Dec 2014 - 2:14 pm | विशाल कुलकर्णी

बाकी अशा स्वरूपाची सुविधा देणे तांत्रिकदृष्ट्या अजिबात कठीण नाही आणि ते उपयुक्तही ठरेल.>>>

सहमत आहे.

याच बरोबर कलादालनात टाकलेले लेख "माझे लेखन" मधे दिसण्याची सोय करावी... माझे बरेच फोटुवाले धागे माझे लेखन या पर्यायात दिसत नाहीत ! :(

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Make in India: PM Narendra Modi approves action plan for ease of doing business
Make in India gets defence sector spurt as BHEL takes up submarine project
Brent falls towards $57 as demand concerns outweigh supply disruptions
US opening of oil export tap widens battle for global market

मुक्त विहारि's picture

31 Dec 2014 - 3:42 pm | मुक्त विहारि

माझे लेखन या पर्यायात दिसत नाहीत !...

साहजीक आहे...

तुम्ही त्या फोटोंना पण अत्तर लावले असेल.

अत्तर पण उडाले आणि मग फोटू पण उडाले.

पैसा's picture

31 Dec 2014 - 2:42 pm | पैसा

उजव्या कॉलममधे "आवागमन" विभागात "माझे लेखन" पर्याय आहे. पूर्वी प्रत्येक लेखाच्या शेवट "अमूकतमूक यांचे लेखन" ऑप्शनखाली लेखकाचे सर्व लिखाण दिसत असे. मालकांना वेळ होईल तेव्हा ते करतीलच!

@मदनबाणाने सांगितलेले अन्य कोणीतरी बोलले होते. आणि ती विनंती मालकांच्या कानावर घातली होती. बहुधा जुन्या कलादालनाला काही प्रॉब्लेम आल्यामुले नवे कलादालन सुरू केले. त्याच्या लिंकिंगचा काही छोटासा भाग राहिला असावा. नीलकांतला वेळ झाला की तो नक्कीच करून देईल.

एस's picture

31 Dec 2014 - 6:05 pm | एस

ही बाब नुकतीच नीलकांत यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यांना वेळ मिळाल्यास करतीलच.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Dec 2014 - 6:48 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

माझेही वाहनविश्वचे भाग दिसत नाहीत सगळे.

बहुगुणी's picture

31 Dec 2014 - 9:36 pm | बहुगुणी

आणखी एक (आड)मार्ग म्हणजे जियो मिपा. या नकाशावर लेखकाचं / लेखिकेचं नाव (मिपा-नाव) शोधून त्यांच्या झेंड्यावर क्लिक केल्यावर त्या खालील Description मध्ये त्यांच्या समग्र मिपा- लेखनाचा दुवा दिसतो.उदाहरणार्थ, मिपाकर कॅप्टन जॅक स्पॅरो यांच्या झेंड्यापाशी त्यांच्या सर्व लेखांचा दुवा आहे, ज्यात वाहनविश्वातील ३ लेखही दिसताहेत.

अर्थात, यासाठी त्या लेखकांचे झेंडे लावलेले असणं आवश्यक आहे, ज्यांचे लावणे बाकी असेल त्यांनी ते लावावेत असं आवाहन.

आणि एखाद्याचा असलेला झेंडा (आणि लेखन) शोधायचं असेल तर खालील चित्रात दिल्याप्रमाणे जियो मिपावर व्ह्यू--> सर्च करून मिपाकराचं / मिपाकरिणीचं नाव 'नेम' या टॅब मध्ये टंकायचं, म्हणजे मध्ये त्यांच्या लेखनाचा दुवा दिसेलः

--

hitesh's picture

1 Jan 2015 - 7:36 pm | hitesh

पूर्वीच्या मिपात होते

आदिजोशी's picture

2 Jan 2015 - 2:24 pm | आदिजोशी

पूर्वीचं मिपा राहिलं नाही