असं का?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
कॅप्टन जॅक स्पॅरो in काथ्याकूट
24 Dec 2014 - 2:12 pm
गाभा: 

अ‍ॅडमिनना विनंती. ह्या लेखामधे काही आ़क्षेपार्ह गोष्टींचा उल्लेख केला जाणार आहे. जर आपल्या नियमात बसत नसेल तर ही पोस्ट उडवुन लावावी. मी एक मुलगा असल्यानी मी माझ्या दृष्टीकोनामधुन हा लेख लिहिला आहे. कदाचित वाईस व्हर्सा अनुभव मुलींनाही येत असेल.

३-४ दिवसापुर्वी बस नी प्रवास करायला लागला. माझ्या शेजारी एक जेमतेम २०-२१ वर्षाचा म्हणजे माझ्यापे़क्षा ५-६ वर्षानी लहान कॉलेजकुमार बसला होता. फोनवर मित्राशी आपल्या सो कॉल्ड "प्रेमप्रकरणाबद्द्ल" गप्पा चालल्या होत्या. वन नाईट स्टँड आणि त्यातही दारुच्या नशेत केलेल्या वन नाईट स्टँड नंतर तिला हाकलुन लावण्याबद्द्ल (डीच करणे) अत्यंत बिभत्स भाषेमधे दबक्या आवाजात चर्चा चाललेली होती. पलिकडुन बोलणारे त्याचे "गुरुदेव" ह्या विषयामधे बरेचं अनुभवी दिसत होते. आपल्या आधीच्या प्रकरणात कसं पटकन सुटुन जाता आलं आणि ह्या पोरीला डिचं करणं कसं अवघड आहे, आणि ते कसं करायलाचं हवयं ह्याविषयी चर्चा चालु झाली. साला कचकचुन डोक्यात गेला हा हरामखोर. प्रेम (ह्या असल्या गिधाडांच्या बाबतीत फक्तं आणि फक्तं वासना) आणि त्यातुन घडणार्‍या पुढच्या नाजुक गोष्टी ह्या काय एवढ्या कॅजुअली कश्या घेऊ शकतात हे लोकं? ह्या मुलीसुद्धा पुढचा मागचा विचार नं करता अश्या हरामखोरांच्या जाळ्यात अश्या कश्या अडकु शकतात?

बरं आता ह्यामधुन सुटण्यासाठी काही मुली चक्कं आम्ही त्याला ओळखु शकलो नाही असं कारण देतात. हे कारण कसं काय अ‍ॅक्सेप्टेबल असु शकतं? मुलाचा अ‍ॅप्रोच कसा आहे ह्यावरुन तो सिरिअस आहे का असला छपरी आहे हे समजुन येतचं की.

जेव्हा एखादा अत्यंत सज्जन, सालस, कर्तुत्ववान आणि संयमी मुलाला एखादी मुलगी आवडते तेव्हा कितीतरी वेळा असं होतं की तो त्या मुलीला साधं कधी सांगुही शकत नाही (स्वानुभव, एक सज्जन सोडलं तर बाकी सगळे पॅरामीटर्स फिट लागु होतात). त्यातुन एखादयानी गेल्या ७०,००० पिढ्यांमधलं धैर्य एकत्र करुन विचारलचं तर त्याला किती वेळा होकार मिळतो समोरच्या बाजुकडुन? बहुतेक अशी मुलं फ्रेंडझोनमधेचं जातात. हजारात एखादा नशिबवान असतो की त्याचं सिरिअस प्रेम असणारी मुलगी त्याला हो म्हणते.

एक माझ्या माहितीमधला किस्सा मला इथे सांगावासा वाटतोय. नावं अर्थातचं जाहिर करणार नाही. आमचा मित्राचा मित्राशी ट्रेक ला म्हणा कुठे ट्रिपला म्हणा कुठे नाटक सिनेमाला म्हणा अश्या ओळखी होतं होतं एक मोठा मित्रामैत्रिणींचा ग्रुप तयार झालाय. त्यातल्या एका "क्ष" नावाच्या एका सुस्वभावी मुलाला एक "प" नावाची मुलगी खुप आवडायची. दोघही प्रोफेशननी ईंजिनिअर आणि आवडीनिवडींमुळे नेहेमी संपर्कात असायचे. मेड फॉर इच अदर म्हणतात ना तशी त्यांची जोडी होती. तिच्या घरी लग्नाची बोलणी सुरु झाल्यानंतर हा अस्व्स्थ झाला. आहे नाही तेवढं धैर्य गोळा करुन त्यानी तिला लग्नाबद्दल विचारलं. तिनी शिस्तीत त्याला कटऊन लावलं. हा बाबाजी मानसिकरित्या पार कोलमडला होता. कसाबसा २ महिन्यानी जागेवर आला. पण त्याच्या वागण्याबोलण्यातला मोकळेपणा, हजरजबाबी पणा कुठे हरवुन गेलाय काय माहिती?
ह्याच "प" मुलीला एका उच्चशिक्षितं गिधाडानी फशी पाडलं. जेमतेम महिन्याच्या आतमधे दोघांनी सगळ्या मर्यादा पार केल्या. तीन एक महिन्यानी काही मेडीकल कॉंप्लिकेशन्स होऊन हे लोकं सेपरेट झाले. ही मुर्ख मुलगी परत येऊन आता "क्ष" कडे येऊन मी तुला नकार देऊन चुक केली असं सांगते. "क्ष" तसा झालेला अपमान नं विसरणारा असल्यानी आता हे लफडं तुझं तु निस्तर असं म्हणुन पुर्ण अलिप्त झालाय. एकेकाळी घनिष्ठ मित्र असणारे दोघं आजं एकमेकांसमोर उभेही राहु शकतं नाहीयेत. "प"जानेवारीमधे लग्नं करेल ह्या. होणारा नवरा अर्थातचं अंधारात आहे. "क्ष" तिला माफ करु शकला नसला तरी अजुनही तिच्या आठवणीत झुरतोय. "थिंग्ज कुड हॅव बीन बेटर" अशी स्वतःचीचं समजुन घालतोय. त्या गिधाडाला मात्र नवीन भक्ष मिळालयं किंवा मिळेलचं.

असं का? सज्जनं मुलांची मुलींना अ‍ॅलर्जी असते का? का ह्या असल्या गिधाडांची बेफिकीर वागणुक त्यांना मॅस्क्युनालिटी साईन वाटते? "सिन्सिअर पिपल डाय अलोन"...."देअर इज नो लव्ह लाईफ फॉर सिन्सिअर्स अनलेस इट्स अरेंज्ड" असा काही नवीन फंडा तर निर्माण होतं नाहीये ना?

ह्या अश्या "शॉर्ट टर्म सॅटिसफॅक्शन अँड लाँग टर्म डॅमेज"ची विषवल्ली पसरली जाउ नये आणि अजुन कुठल्याही मुला-मुलींचं आयुष्य अश्या टेंपररी रिलेशनशिपमधे उद्ध्वस्त होऊ नये हिचं एक इच्छा. लेखं विस्कळीत आहे मान्य आहे. पण तो थोडा त्या वन नाईट स्टँड वाल्या मुलाच्या रागाच्या,धिस मस्ट मी स्टॉप्ड समव्हेअर आणि कदाचित स्पेशल तिला कधीच सांगु नं शकल्याच्या अपराधी भावनेतुन लिहिला असल्यानी थोडं समजुन घ्या. बस्स...!!!

प्रतिक्रिया

मितान's picture

24 Dec 2014 - 2:21 pm | मितान

संमिश्र भावनांचे संयत प्रकटीकरण !

"कॉन्फिडन्स" ही इम्प्रेषनची किल्ली असल्याने एखादा हरामखोर माणूसही त्या गुणामुळे सुरुवातीला आकर्षक वाटतो. जनरली सज्जन सालस वगैरे पोरं त्यातच मार खातात. शिवाय मुलगी म्हणजे परग्रहावरील सजीव, तिच्याशी बोलणे हे जरा पेश्शल, इ.इ. धारणा असलेली (कारण तशाच वातावरणात वाढलेली) पिढी अजूनही टिकून आहे. येत्या १५-२० वर्षांत अशी पिढी बरीच कमी होईल असे वाटते.

मुळात स्त्रीसान्निध्यच कमी, त्यात आकर्षण मिसळले की इंटरअ‍ॅक्शनला भाव जरा जादाच दिला जातो. त्यामुळे मनात कुढल्या जाते. तसे न करता, स्त्रीसान्निध्याला जास्ती भाव न देणे हे साध्य झाले की बाकी गोष्टीही सहजसाध्य आहेत. आता स्त्रीसान्निध्याला जास्ती भाव न देणे हे साध्य करण्याचा एकमेव उपाय काय? ते मिळवायचा प्रयत्न करणे इतकेच.

ह्या मुलीसुद्धा पुढचा मागचा विचार नं करता अश्या हरामखोरांच्या जाळ्यात अश्या कश्या अडकु शकतात?
मराठी साहित्यात त्याने तिला फुस लावली असे म्हणतात ! आता स्वतः लयं इंटलिजंट समजणार्‍या मुली असं कसं फुस लावुन घेतात ? हे कोडं आहेच !

सज्जनं मुलांची मुलींना अ‍ॅलर्जी असते का?
येस.
का ह्या असल्या गिधाडांची बेफिकीर वागणुक त्यांना मॅस्क्युनालिटी साईन वाटते?
येप्प...
सिन्सिअर पिपल डाय अलोन
मे बी...
देअर इज नो लव्ह लाईफ फॉर सिन्सिअर्स अनलेस इट्स अरेंज्ड
यू आर अबाउट रिच द करेक्ट पॉइंट !

मी तर अश्या अनेक मुली पाहिल्या आहेत, आणि काही "क्ष" मित्र सुद्धा आहेत की त्यांनी भरपुर "मजा" मारली आहे ! व्यवस्थित लग्न करुन सुखाने नांदत देखील आहेत / असतील...

पॉइंट :- फ्यु पिपल रिअलाइज द ट्रू लव्ह अ‍ॅड वॉन्ट टु एक्स्पिरिएन्स द सेम... बट अदर्स जस्ट वॉन्ट टु फ>>

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Shocking CAG Report on Army, Ordnance Factories and Defence Public Sector Undertakings ! {पीडीएफ}
Huge stockpile of defective anti-tank mines hurts army ops: CAG report
As China Upgrades Navy, India Misses Deadlines and Busts Budgets
All About Arihant

नाखु's picture

24 Dec 2014 - 2:37 pm | नाखु

बरेच युवक प्रेम व्यक्त्/विचारायला बिचकत नाहीत तर तद्नंतरच्या परिणाम्-गुंतागुंतीला-बोट्चेप्या स्वभावाला-आणि येऊ घातलेल्या न्युनगंडाला जास्त घाबरतात आणि तिथेच घोड अडतं!!
नकार मिळालेल्या मुलांबाबत इतर मुले/आणि मुलीही जास्ती "स्वघोशीत समीक्षक" असतात असे निरीक्षण आहे. *YES*
यात घरून "आकर्षण आणि प्रेम " यातला नेमका फरक समजावणारे कुणी (मोठी बहीण्/वहिनी/नक्की ? मैत्रीण) असेल तर ठिक नाही तर आनंदी-आनंद !!!

बॅटमॅन's picture

24 Dec 2014 - 2:44 pm | बॅटमॅन

बाकी काही असो, भारतात अशा सिन्सिअरांसाठी अ‍ॅरेंज्ड म्यारेज आहे. तेवढी एक कटकट तरी कमी.

मृत्युन्जय's picture

24 Dec 2014 - 2:56 pm | मृत्युन्जय

अगदी अगदी

वेल्लाभट's picture

8 Sep 2015 - 2:53 pm | वेल्लाभट

एक मिनिटं,
एक पार्टी सिन्सियर असून भागत नाही. अरेंज मधे पदरी पडणारी समोरची पार्टी सिन्सियर असेल (पूर्वीही, नंतरही) याची खात्री कोण देणार?

चौफेर भटकून झालेल्या मुली जेंव्हा अशाच एका सिन्सियर क्ष च्या अरेंज्ड बायको होतात तेंव्हा त्या क्ष ची प्रचंड दया येते.
तेंव्हा अ‍ॅरेंज इज नॉट अ 'नो रिक्स' बेट इदर.

एका सिन्सियर क्ष च्या अरेंज्ड बायको होतात

एक-दोन वर्गमैत्रिणींना असे सिन्सिअर क्ष मिळाले तेव्हा वारलो होतो. ;)

तेंव्हा अ‍ॅरेंज इज नॉट अ 'नो रिक्स' बेट इदर.

आणि ह्यासाठी प्रचंड सहमत!! आलातच पुण्यात तर एखादी मस्तानी देऊ..

वेल्लाभट's picture

8 Sep 2015 - 3:25 pm | वेल्लाभट

बास! त्यासाठी नक्की येणार.

पिलीयन रायडर's picture

24 Dec 2014 - 2:50 pm | पिलीयन रायडर

१५-१६ वर्षाच्या मुलीला छपरी पोरं आवडणं मी एकवेळ समजु शकते.. पण ग्रॅजुएशन झालेल्या.. नोकरी करणार्‍या मुलींना छपरी मुलगा समजत नसेल तर होणार्‍या त्रासाला त्या स्वतःच जबाबदार आहेत... त्यांना कुणीही काही मदत करु शकत नाही..
दुसरा जरा वादग्रस्त मुद्दा असा की ज्या मुली सर्व मर्यादा ओलांडु शकतात.. (म्हणजे ते सर्व करायची अक्कल असते..) त्या फसवल्या गेल्या की "गरीब- बिचार्‍या - नादान - भोळ्या" कशा होतात? सरसकट बोलत नाहीये मी.. पण लग्नाच्या वयांच्या मुली बद्दल बोलतेय जिला चांगल्या वाईटाची जाण आलेली असते..

प्रसाद गोडबोले's picture

24 Dec 2014 - 2:56 pm | प्रसाद गोडबोले

लेखन फारच एकांगी आहे .
दुसरी बाजु , दुसरे पर्पेटीव्ह असु शकतात ह्याचा लेखकाने विचार केलेला दिसत नाही असा आपला अंदाज आहे . गिधाड वगैरे काय ? ( गिधाड मेलेले प्राणी खाते , इथे ज्यांना गिधाड - गिधाडभक्श्य म्हणुन संबोधले गेले आहे ते दोघेही जिवंतपणे अन फुल कॉन्शसली निसर्गदत्त देहाकरवी स्वर्गीय आनंद घेत असतात . )

असो .
इतर लोकांचे प्रतिसाद पहातो आधी . मग अजुन प्रतिसाद देता येईल . सारखंच लॅटरल थिंकिंग रादर एक्क्षप्लेनिंग करायचा कंटाळा आलाय मलाही .

अवांतर : येथे विचारस्वातंत्र्य , अभिव्यक्तीस्वातंत्र्य , फ्रीडम ऑफ पर्सेप्शन ( मराठी ? ) आणि सर्वंकश चर्चा करायची इच्छा वगैरे गृहीत धरुन प्रतिसाद देत आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Dec 2014 - 3:08 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

गिधाड ही एक उपमा दिलेली आहे गिरिजा काका.
लेख कदाचित एकांगी असु शकेलही कारण मी फक्त एक मुलगा ह्या दृष्टीकोनातुनचं बाजु मांडलेली आहे. कदाचित मुलींच्या दृष्टीकोनातुन ह्याला अजुनही काही बाजु असु शकतील. मला ही गोष्ट खटकली म्हणुन लेखं लिहावासा वाटला बस्स.... लॅटेरल थिंकिंग करुन रायटिंग करायचा मला पण कंटाळा आलाय.

मदनबाण's picture

24 Dec 2014 - 3:08 pm | मदनबाण

दोघेही जिवंतपणे अन फुल कॉन्शसली निसर्गदत्त देहाकरवी स्वर्गीय आनंद घेत असतात .
हो...एकदम मान्य ! हे देह सुख मनुष्यां मधे सर्वेच्च सुख समजल जात / मानलं जात / अनुभवल जात...
परंतु हे सुख हवे तसे उप-भोगुन मग गळा काढणार्‍यांवर काय कराव ? यात मुख्यत्वे मुली असतात.
काही काळा पूर्वी एका वर्तमान पत्रात वाचलेली बातमी :- डोंबिवली मधली एक मुलगी रेल्वे स्थानकावर उभी होती,अचानक एका अनोळखी तरुणाशी तिचे बोलणे झाले आणि तिला खर्डीला घेउन गेला आणि तिकडच्या लॉजवर नेउन बलात्कार केला.
आता मला पडलेले प्रश्न :-
१}अनोळखी मुला बरोबर ती मुलगी गेलीच कशी ?
२}आपण या मुला बरोबर कुठे चाललो आहे ते तिला त्याला देखील का विचारावेसे वाटले नाही ?
३}बरं... लॉजवर जाई पर्यंत ही शांत कशी ?
५}लॉजवर भोंडल्याचा कार्यक्रम खेळला जात नाही हे न-समजण्या सारख्या मुली मूर्ख असतात का ?
६} हे सगळ झाल्यावर मला फुस लावली हे जाहिर करायचे,फुस लावुन घेतली या बद्धल मात्र सोयिस्कर मौन बाळगायचे ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Shocking CAG Report on Army, Ordnance Factories and Defence Public Sector Undertakings ! {पीडीएफ}
Huge stockpile of defective anti-tank mines hurts army ops: CAG report
As China Upgrades Navy, India Misses Deadlines and Busts Budgets
All About Arihant

"लग्नाच्या आमिषाने २ वर्षे बलात्कार" वगैरे बातम्या वाचून असेच वाटते. दोन दोन वर्षे बलात्कार काय चेष्टा लावलीय होय?

अजया's picture

24 Dec 2014 - 8:49 pm | अजया

अगदी अगदी!!या सो काॅल्ड भोळ्याभाबड्या फसवलेल्या मुली!

प्रसाद गोडबोले's picture

29 Dec 2014 - 2:52 pm | प्रसाद गोडबोले

ब्यॅट्या , सेम तुझ्या सारखे मत मुंबई हायकोर्टाने मांडले आहे , आता तुला आम्ही मिपावरील अष्टप्रधान मंडळात न्यायाधीष म्हणुन नेमत आहोत :D

ही पहा वरीजीनल बातमी

'लग्नाचा शब्द पाळला नाही म्हणून पुरुषावर सरसकट बलात्काराचा आरोप लावता येणार नाही,'

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Pre-marital-se...

बॅटमॅन's picture

29 Dec 2014 - 6:05 pm | बॅटमॅन

अगदी जबरदस्त निर्णय घेतला आहे. हा भारतभर लागू झाला पाहिजे.

काळा पहाड's picture

29 Dec 2014 - 6:21 pm | काळा पहाड

न्यायाधीश महाराज, तेवढं बेळगाव (बेळगावच!) महाराष्ट्रात ओढण्याचा आदेश द्या हो.

आणि न्यायाधीश साह्यबांनाच जर ते कर्नाटकात जावं असं वाटत असेल तर?

काळा पहाड's picture

29 Dec 2014 - 6:44 pm | काळा पहाड

हं.. मग अवघड आहे. मग आम्ही पण आपचा झेंडा हातात घेवून 'न्यायाधीश महाराजांचे अंबानी आणि अदानी बरोबर संबंध आहेत म्हणून ऑनलाईन मोर्चा काढू'.

प्रसाद गोडबोले's picture

24 Dec 2014 - 4:33 pm | प्रसाद गोडबोले

लॉजवर भोंडल्याचा कार्यक्रम खेळला जात नाही हे न-समजण्या सारख्या मुली मूर्ख असतात का ?

=))

वेल्लाभट's picture

8 Sep 2015 - 2:56 pm | वेल्लाभट

कड्डाक्क्क !

हेच्च्च म्हणतो नेहमी. अरे डोकी असतात की नाही या अशा मुलींना.... इतकं कुणीही______नसतं राव जगात.

प्यारे१'s picture

8 Sep 2015 - 2:59 pm | प्यारे१

धागा मिसलेला का वेल्ला?

नऊ महिन्यानं डीलिवरी केली? ;)

वेल्लाभट's picture

8 Sep 2015 - 3:19 pm | वेल्लाभट

हो !

आनन्दा's picture

24 Dec 2014 - 8:39 pm | आनन्दा

गिधाड वगैरे काय ?

अहो ती मुलं तर मैने ये लडकी खायी, वो लडकी खाऊंगा असेच म्हणत असतात.

टवाळ कार्टा's picture

24 Dec 2014 - 9:46 pm | टवाळ कार्टा

आयला हे तुम्ही कधे, कुठे आणि मुख्य म्हणजे त्या मुलांच्या नकळत "कसे" ऐकले????

प्रसाद गोडबोले's picture

29 Dec 2014 - 6:28 pm | प्रसाद गोडबोले

मैने ये लडकी खायी, वो लडकी खाऊंगा

तरीही गिधाड ही उपमा चुकीचीच ठरते कारण गिधाड मेलेले प्राणे खाते आणि थे ती "खालेल्ली" मुलगी जिवंत आणि फुल्ल कॉन्शंस असते ... काय सांगता तीही तिच्या मैत्रिणींना म्हणत असेल "मैने ये लडका खाया, वो लडका खाऊंगी " !

थोडक्यात तात्पर्य काय तर संमतीने केलेले सेक्स ही दोन्ही बाजुंनी फुल्ल इंजोय केली जाणारी आनंददायी गोष्ट आहे , उगाच पुरुष बाजु उपभोक्ता आणि दुसरी स्त्री बाजु उपभोग्य अशी विभागणी करणे योग्य नाही .

:)

अवांतर : ( प्रवचनकार बुवा मोड ) मुळातच उपभोक्ता उपभोग्य आणि उपभोग ही त्रिपुटी मिथ्या आहे , माया आहे , भ्रम आहे भ्रांती आहे , एकदा का हे द्वैत निरसन झाले आणि तुम्हाला ह्या तिन्ही कर्ता कर्म करण मध्ये समभाव निर्माण झाला , एकदा का ही व्यामिश्रता लक्षात घेतलीत की तुम्ही आनंदाच्या अनुर्वाच्च्य अवस्थेप्रत जाऊन पोहचाल . पण त्यासाठी समष्टी होणे अत्यंत गरजेचे आहे ( प्रवचनकार बुवा मोड ऑफ ) :D

विजुभाऊ's picture

24 Dec 2014 - 2:59 pm | विजुभाऊ

ज्याचे त्याने निस्तारावे. फसवले जाणे किंवा फसवणे या रीलेटिव्ह कोन्सेप्ट आहेत. आपण फसवले गेलो आहोत अशी जर त्या मुलीला जाणीव झाली तर तीने सरळ त्या फसवणार्‍या मुलाचा डायरेक्ट गेम करावा. अशा गेम्स ना कायद्याचे संरक्षण असावे .फसवणूकीचे शासन बरोब्बर मिळेल. अर्थात त्यामुळे पुढील फसवणारे किंवा फसवले जाणारे सावध होतील असे नाही. जोवर शारीरीक भावना आहेत त्या चाळवल्या जातात तोवर या गोष्टी होतच रहातील.

सविता००१'s picture

24 Dec 2014 - 3:01 pm | सविता००१

पिराशी बाडीस.मीही ती म्हणतेय तशा कित्येक मुली पाहिल्यात. तेव्हा चांगल्या-वाईटाची जाण वगैरे सगळं मागे पडून मजा मारणे हाच त्या मुलींचाही उद्देश असतो.एक मुलगी असूनही मलाच कित्येकदा वाटलंय की या अशा मुलींचा फंडा तेव्हा फक्त मतलब साध्य करून घेणे असाच होता. अशा एका केसमध्ये तर माझा खूप चांगला मित्र आम्ही गमावलाय आणि ती मुलगी आजही मज्जेत.. :(

भाग्यश्री कुलकर्णी's picture

24 Dec 2014 - 5:33 pm | भाग्यश्री कुलकर्णी

सवीताशी बाडीस.

बोका-ए-आझम's picture

24 Dec 2014 - 3:04 pm | बोका-ए-आझम

मुली, बस आणि गाड्या - एक गेली, दुसरी येते असा दृष्टिकोन ठेवावा आणि मनाला लावून घेऊ नये. मुळात कितीही भावनिक गुंतवणूक झाली तरी पुढे दगाफटका होऊ शकतो याची जाणीव ठेवावी. बाकी मुलींना जरा वाया गेलेली मुलं आवडतात असा अनुभव आहे. त्यांना तो मुलगा एक चॅलेंज वाटतो आणि आपण याला सुधरवू असा विश्वासही. मुळात आपला एका गोष्टीवर विश्वास आहे - मुलीच्या मागे लागण्यापेक्षा असं काहीतरी कर्तृत्व गाजवा की तिचे घरचे लोक तुमच्यामागे आमच्या मुलीशी लग्न कर म्हणून लागले पाहिजेत!

मुक्त विहारि's picture

25 Dec 2014 - 4:06 am | मुक्त विहारि

विशेषतः

"मुलीच्या मागे लागण्यापेक्षा असं काहीतरी कर्तृत्व गाजवा की तिचे घरचे लोक तुमच्यामागे आमच्या मुलीशी लग्न कर म्हणून लागले पाहिजेत."

येस्स्स सर...

प्रचंड सहमत....

मराठी_माणूस's picture

24 Dec 2014 - 3:12 pm | मराठी_माणूस

नासिरुद्दीन चा "कथा" सिनेमा आठवला

>>ही मुर्ख मुलगी परत येऊन आता "क्ष" कडे येऊन मी तुला नकार देऊन चुक केली असं सांगते. "क्ष" तसा झालेला अपमान नं विसरणारा असल्यानी आता हे लफडं तुझं तु निस्तर असं म्हणुन पुर्ण अलिप्त झालाय.

हे फार उत्तम केलं त्याने. तो म्हणजे काय ऑप्शनला ठेवलेला आहे की काय, कोणी नाहीच मिळालं तर हा बरा आहे म्हणून!! ज्या व्यक्तीने तुम्हाला एकदा नाकारलंय ती व्यक्ती तुमच्याकडे परत आल्यानंतर जेव्हा तुम्ही होकार देता तेव्हा तुमची किंमत शून्य होते, हे अशाच एका सिच्युएशन मध्ये अडकलेल्याला समजवताना मित्राकडून ऐकलंय आणि अगदी पक्कं मनात राह्यलंय.

मुलींची मानसिकता वैगरे ह्यावर बोलायचा मला कितपत अधिकार आहे हे माहीत नाही. पण सिगारेटी ओढणार्‍या, गाड्या उडवत फिरणार्‍या मुलांबद्दल कित्ती बोलू आणि कित्ती नको झालेल्या मुली मित्रवर्तुळात पाह्यल्या आहेत. थोड्या दिवसांनी हे हुरळून जाणं कमी होतं आणि जमिनीवर येईपर्यंत उशीर तरी झालेला असतो नाहीतर कोलमडलेल्या तरी असतात.

सेम केस विथ मुलं!! एखादी मुलगी मला प्रपोज करतेय तर माझ्यात असं काय आहे जे तिला आवडलं हे विचारायचं एकदाही धाडस करत नाही. पुढे ती मुलगी फिरते-फिरवते, सहा महिने झाले तरी हा काहीच करत नाही म्हणताना क्षुल्लक कारणावरुन रिलेशनशिप तोडते. आधीचे दोनेक बॉयफ्रेंड, एक डिव्हॉर्स आणि हा चौथा प्रपोज केलेला सोडून पाचव्याशी लग्न करुन सुखी होते. आणि हा प्रपोज केलेला लग्न करायचं नाही म्हणून कुढत राहतो. शिंच्यांचा सेल्फ रिस्पेक्ट अशावेळी कुठे जातो देव जाणे !!

मित्रमंडळींशी यावर चर्चा करताना खरं प्रेम वैगरे शब्द गेले आणि माताय एक मित्र पाच मिनटं वेड्यासारखा हसत होता.
असो. जोडीदाराच्या बाबतीत 'यथायोग्यं तथा कुरु' म्हणून देवावर (कुठली तरी अज्ञात शक्ती असते हे मानतात त्यांनी) सोडणं योग्य!! जी व्यक्ती अजून आयुष्यात आलेली नाही तिच्याबद्दल काळजीत पडण्यापेक्षा, बर्‍याच करण्यासारख्या गोष्टी आहेत.

*सदर प्रतिसादही विस्कळीत आहे, पण वाचता वाचता काही गोष्टी को-रिलेट झाल्या आणि जे मनात आलं ते लिहीलं. :)

प्रसाद गोडबोले's picture

24 Dec 2014 - 6:21 pm | प्रसाद गोडबोले

हे फार उत्तम केलं त्याने

.

हेच इथेच चुकलात तुम्ही सूडराव ! आधी भोंडला खेळुन घ्यायला पाहिजे होता त्याने , नंतर मग नकार द्यायचा ;)

"माझ्या आधी तू दुसर्‍या कोणाची तरी झाली होतीस हा विचारच माझ्या मनातुन जात नाही... मी तुझ्या विरहात जगेन एकवेळ पण तु माझी असुनही दुसर्‍या कोणाची तरी होतीस हा विचार घेवुन मी नाही जगु शकत तुझ्या सोबत"
हे काय बेष्ट कारण आहे राव ब्रेकाप करायला =))

अवांतर : च्यायला अजुनही कॉलेजात सुचायचं तसलं फिल्मी सुचतय की ... परत एकदा कथा लेखन सुरु करायला हरकत नाही

आधी भोंडला खेळुन घ्यायला पाहिजे होता त्याने , नंतर मग नकार द्यायचा

इथेच तुमचे आणि आमचे विचार वेगळे पडतात गिर्जाकाका!!

प्रसाद गोडबोले's picture

24 Dec 2014 - 7:42 pm | प्रसाद गोडबोले

Be bold and courageous. When you look back on your life, you'll regret the things you didn't do more than the ones you did.

बाकी चर्चा भेटीअंती :)

टवाळ कार्टा's picture

24 Dec 2014 - 7:51 pm | टवाळ कार्टा

प्रगो...वरच्या वाक्यासाठी माझ्याकडून १ एल.पी. सप्रेम भेट

प्रसाद गोडबोले's picture

8 Sep 2015 - 3:01 pm | प्रसाद गोडबोले

१ एल.पी. सप्रेम भेट

अजुनही १ एल.पी. च्या प्रतिक्षेत
- प्रगो

बॅटमॅन's picture

8 Sep 2015 - 3:14 pm | बॅटमॅन

एलपी म्हणजे लिनिअर प्रोग्र्याम ना रे ;) =))

-(निरागस) बॅटमॅन.

मीता's picture

8 Sep 2015 - 2:43 pm | मीता

+1

अर्र... माझा प्रतिसाद सूडसाठी होता .

पिंपातला उंदीर's picture

24 Dec 2014 - 8:54 pm | पिंपातला उंदीर

इथले प्रतिसाद मला एकट्यालाच चेकाळलेले , प्रचंड सरसकट करण करणारे आणि वाचाळ वाटत आहेत का अजून दुसरे कोणी आहे ? म्हणजे लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार यातला भंपक पणा , रोहतक ब्रेव्ह हार्ट्स प्रकरण मधला प्रचंड खोटेपणा आणि पुरूषाच victimization मान्य असल तरी स्त्रीयां ची बस शी तुलना करण , भोंडला शब्दावरून प्रचंड वाईट कोट्या करण आणि इतर हि काही bold discussion च्या नावाखाली दिलेले frustration दाखवणारे चरबट प्रतिसाद पाहून आपण अजूनही १८ व्या शतकात आहोत कि काय अस वाटायला लागत . आणि मुख्य म्हणजे या भाषेवर इथल्या कुठल्या हि स्त्री सदस्याला पण objection नाही . उलट काही स्त्री सभासदांचे पूरक प्रतिसाद पाहून धक्का बसला आणि मला वाटायचं स्त्रिया त्यांच्या आणि इतर स्त्रियांच्या dignity बद्दल जागरूक असतात .

प्यारे१'s picture

24 Dec 2014 - 9:05 pm | प्यारे१

>>> स्त्रीयां ची बस शी तुलना करण , भोंडला शब्दावरून प्रचंड वाईट कोट्या करण आणि इतर हि काही bold discussion च्या नावाखाली दिलेले frustration दाखवणारे चरबट प्रतिसाद पाहून आपण अजूनही १८ व्या शतकात आहोत कि काय अस वाटायला लागत .

१८ वंच का? १७ अथवा १९ का नाही?

>>>> आणि मुख्य म्हणजे या भाषेवर इथल्या कुठल्या हि स्त्री सदस्याला पण objection नाही . उलट काही स्त्री सभासदांचे पूरक प्रतिसाद पाहून धक्का बसला आणि मला वाटायचं स्त्रिया त्यांच्या आणि इतर स्त्रियांच्या dignity बद्दल जागरूक असतात

ख्रंय तुम्च्म. काय क्रता यीएल?

आवंयस!! पिंपातून असे अचानकसे बाहेर आलात?

टवाळ कार्टा's picture

24 Dec 2014 - 9:47 pm | टवाळ कार्टा

कदाचित इथला बोका/मौ त्यांच्या बीळात गेल्या असतील

काळा पहाड's picture

24 Dec 2014 - 10:06 pm | काळा पहाड

खिक..

टवाळ कार्टा's picture

24 Dec 2014 - 9:48 pm | टवाळ कार्टा

तुम्ही घराबाहेर पडू नका...हार्ट अ‍ॅटॅक येइल

मुक्त विहारि's picture

25 Dec 2014 - 3:56 am | मुक्त विहारि

तुम्ही नका त्रास करून घेवू.

इग्नोर मारा.

बोका-ए-आझम's picture

25 Dec 2014 - 5:17 pm | बोका-ए-आझम

तुम्हाला मुद्दाच कळलेला नाही. स्त्रियांची बसशी तुलना करण्याचा प्रश्नच नाही, दृष्टिकोन भावनिक गुंतवणूक टाळण्याचा असला पाहिजे नाहीतर त्रास होतो असं म्हणायचं आहे. आणि डिग्निटी ही दोघांचीही असते, असायला पाहिजे तरच कुठलीही रिलेशनशिप टिकते.मी तर पुढे जाऊन हेही म्हणेन की मुलींनीही मुलांबद्दल असा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. उगाचच एखाद्याच्या आठवणीत झुरून स्वतःच्या आयुष्याची वाट लावणं ही महाफालतूगिरी आहे. अशाने उलट माणूस स्वतःची डिग्निटी घालवतो.आणि हे पिंपात आणि पिंपाबाहेर - दोन्हीकडे सत्य आहे!

सस्नेह's picture

26 Dec 2014 - 10:59 am | सस्नेह

इथले प्रतिसाद मला एकट्यालाच चेकाळलेले , प्रचंड सरसकट करण करणारे आणि वाचाळ वाटत आहेत

याच्याशी सहमत !
भाषा चरबट आहे, हेही मान्य. पण त्यामुळे स्त्री-सदस्य किंवा त्यांची डिग्निटी यांचाच फक्त अवमान कसा काय बरं होतो ?
‘भोंडला’ काय फक्त स्त्रियाच खेळतात का ? दोघेही जे करतात, त्याबद्दल स्त्री चीच फक्त मानहानी कशी काय होते बॉ ?
आणि

स्त्रिया त्यांच्या आणि इतर स्त्रियांच्या dignity बद्दल जागरूक असतात

.
हे अगदी खरं आहे. दुर्दैवानं, पुरुष त्यांच्या आणि इतर पुरुषांच्या dignity बद्दल जागरूक असलेले दिसत नाहीत, हे खेदाने नमूद करावेसे वाटते !

टवाळ कार्टा's picture

26 Dec 2014 - 11:05 am | टवाळ कार्टा

\m/

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Dec 2014 - 12:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

दुर्दैवानं, पुरुष त्यांच्या आणि इतर पुरुषांच्या dignity बद्दल जागरूक असलेले दिसत नाहीत, हे खेदाने नमूद करावेसे वाटते ! याचे कारण आपल्या समाजाच्या मानिसिकतेत आहे.

ज्या गोष्टी स्त्रीला लांछनकारक आणि म्हणून लपवाव्या अश्या वाटतात त्याच गोष्टी त्या कृतीत सामील असलेल्या पुरुषाच्या पौरुष्याचे प्रतिक समजल्या जातात... आणि या मनसिकतेच्या बाबतित स्त्री-पुरुष दोघांत काही फारसा फरक दिसत नाही.

खटपट्या's picture

25 Dec 2014 - 2:14 am | खटपट्या

वा !! खूप चांगला विषय !!

चिऊकाऊ's picture

25 Dec 2014 - 6:03 am | चिऊकाऊ

लेखात आणि प्रतिक्रियांमध्ये एकंदरीत मुलींवर राग दिसतोय की त्या सज्जन मुलांना सोडून गिधाडांकडे जातात पण दादांनो तुम्ही पण तर देखण्या/फटाकड्या मुलींकडेच आकर्षित होता न? दिसण्यात बोलण्यात साधारण किंवा चशमिश किंवा १/२ वेण्या घालणाऱ्या बाळबोध मुलींना प्रपोज करता का?

"क्ष" तसा झालेला अपमान नं विसरणारा असल्यानी आता हे लफडं तुझं तु निस्तर असं म्हणुन पुर्ण अलिप्त झालाय.

मुलींचा नकार हा मुलांना "अपमान" वाटतो. ती एक माणूस आहे. तिचा नकार ही तिची "ईच्छा" म्हणून जेव्हा मुले स्वीकारतील तेव्हा त्यांना मुलींना विचारणे (प्रपोज करणे) आपोआप सोपे होईल.

दुसरा मुद्दा: हे one night stand किंवा तात्पुरते प्रकरण करायचे असेल तर मुल करण्या आधी मुलींना सांगण्याची हिम्मत दाखवता का? "मला लग्नात interest नाही आपण फक्त १ रात्र/काही दिवस मजा मारू या" असे सरळ मुलीला का नाही सांगत? मग तरी ती सोबत येत असेल तर मग म्हणावे की मुली मजा मारून बलात्काराचा आरोप कशा करतात. पण सहसा असे होत नाही. आधी मुलं मुलींना प्रेम दाखवितात. आणि आजच्या तरुण पिढीची परिस्थिती (movies / mobiles MMS ) अशी आहे की मुलीचा तोल जाणे शक्य आहे पण ही तिची "चूक" म्हणून मान्य न करता ते तिचे "चरित्र" ठरवून समाज मोकळा होतो. थोडक्यात मुलींचे "चरित्र" हे सरळ सरळ त्यांच्या virginity नुसार ठरते. आणि "मुलांचे चरित्र" हा concept च अस्तित्वात नाही. एका गिधाडाने फ़सविलेली किंवा तुमच्या भाषेत "गिधाडासोबत मजा मारून आलेली" मुलगी तुम्ही अजूनही "माणूस" म्हणून स्वीकारत नाहीत त्यामुळे अशा मुलींना त्या गिधाडावर बलात्काराचा आरोप करावा लागतो. गिधाडांचे मात्र आरामात लग्न जमते. ते गिधाडही मुलेच असतात न?

तर कॅप्टन जॅक स्पॅरो, फसविणारे कोणीही असू शकते त्यात मुली अथवा मुले असे सरळ सरळ classification करणे अवघड आहे.

खटपट्या's picture

25 Dec 2014 - 7:21 am | खटपट्या

अनुमोदने !!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Dec 2014 - 9:05 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

लेखामधे कुठे तुम्हाला मुलींवर राग व्यक्त केलेला आढळला ते सांगा प्लीज. म्हणुनचं लेखाच्या सुरुवातिलाचं ही ओळ टाकलेली आहे.

मी एक मुलगा असल्यानी मी माझ्या दृष्टीकोनामधुन हा लेख लिहिला आहे. कदाचित वाईस व्हर्सा अनुभव मुलींनाही येत असेल.

असाचं अनुभव मुलांच्या बाबतीत मुलींनाही येतं असेलचं. पण माझ्या पाहण्यात एकही नाही.
_________

पण दादांनो तुम्ही पण तर देखण्या/फटाकड्या मुलींकडेच आकर्षित होता न? दिसण्यात बोलण्यात साधारण किंवा चशमिश किंवा १/२ वेण्या घालणाऱ्या बाळबोध मुलींना प्रपोज करता का?

इथे मुली कशा दिसतायत ह्याचा पहिला म्हणजे प्रश्ण कुठे येतोय? लेखाचा उद्देश कमीटेड मुलांचं प्रपोजल अव्हेरुन, असल्या छपरी मुलांबरोबर जाऊन स्वतःचं नुकसान करुन घेणार्‍या (आणि हा इतिहास असताना भावी नवर्‍याला अंधारात ठेवणार्‍या आणि पर्यायानी फसवणुक करणार्‍या) मुलींबद्दल आहे. आणि सिन्सिअर मुलांना अल्टरनेट ऑप्शन म्हणुन गृहित धरायच्या वृत्तीबद्दल आहे. माझ्या स्वतःविषयी बोलाल तर मी कोणालाचं त्यांच्या दिसण्यावरुन जज करत नाही आणि कोणी तसं करुही नये.

पण माझ्या पाहण्यात एकही नाही.
माझ्या रूममेटची गल्फ्रेंड प्रकरण बरंच पुढ गेल्यावर म्हणाली की तिची येंगेजमेंट झालीय. आता त्याच एंगेज्ड पोराबरोबर सुखाने(?) राहते आहे.

शाळेत एका वर्गमैत्रीणीला समजवायला गेलो होतो. म्हटलं, "बाई, अगं तो चांगला मुलगा नाही, टैमपास करतोय तुझ्याबरोबर". तर म्हणाली, "मग मी कुठं सिरियस आहे?" :))

अजुन याच्या पुढची पण आहेत, पण इथे नकोत.

टवाळ कार्टा's picture

25 Dec 2014 - 11:55 am | टवाळ कार्टा

पुढची प्रकर्णे कट्ट्याला बर्का ;)

नाखु's picture

29 Dec 2014 - 10:09 am | नाखु

राजीखुशी फसवणूक नक्की कुणी कुणाला फसवले ??? मला विचारशील तर फक्त वाचकांनाच फशिवले जाय आहे अश्या बात्म्या देवून!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Dec 2014 - 9:29 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

लेखामधे कुठे तुम्हाला मुलींवर राग व्यक्त केलेला आढळला ते सांगा प्लीज. म्हणुनचं लेखाच्या सुरुवातिलाचं ही ओळ टाकलेली आहे.

मी एक मुलगा असल्यानी मी माझ्या दृष्टीकोनामधुन हा लेख लिहिला आहे. कदाचित वाईस व्हर्सा अनुभव मुलींनाही येत असेल.

असाचं अनुभव मुलांच्या बाबतीत मुलींनाही येतं असेलचं. पण माझ्या पाहण्यात एकही नाही.
_________

पण दादांनो तुम्ही पण तर देखण्या/फटाकड्या मुलींकडेच आकर्षित होता न? दिसण्यात बोलण्यात साधारण किंवा चशमिश किंवा १/२ वेण्या घालणाऱ्या बाळबोध मुलींना प्रपोज करता का?

इथे मुली कशा दिसतायत ह्याचा पहिला म्हणजे प्रश्ण कुठे येतोय? लेखाचा उद्देश कमीटेड मुलांचं प्रपोजल अव्हेरुन, असल्या छपरी मुलांबरोबर जाऊन स्वतःचं नुकसान करुन घेणार्‍या (आणि हा इतिहास असताना भावी नवर्‍याला अंधारात ठेवणार्‍या आणि पर्यायानी फसवणुक करणार्‍या) मुलींबद्दल आहे. आणि सिन्सिअर मुलांना अल्टरनेट ऑप्शन म्हणुन गृहित धरायच्या वृत्तीबद्दल आहे. माझ्या स्वतःविषयी बोलाल तर मी कोणालाचं त्यांच्या दिसण्यावरुन जज करत नाही आणि कोणी तसं करुही नये.

मुलींचा नकार हा मुलांना "अपमान" वाटतो. ती एक माणूस आहे. तिचा नकार ही तिची "ईच्छा" म्हणून जेव्हा मुले स्वीकारतील तेव्हा त्यांना मुलींना विचारणे (प्रपोज करणे) आपोआप सोपे होईल.

कुठलाही स्वाभिमानी माणुस नकार पचवु शकतो, पण भलतीसलती आणि खोटी अपमानास्पद कारणं देऊन मिळालेला नकार मरेपर्यंत विसरु शकत नाही. ती त्याला काय बोलली हे इथे लिहिण्यासारखे नाही

दुसरा मुद्दा: हे one night stand किंवा तात्पुरते प्रकरण करायचे असेल तर मुल करण्या आधी मुलींना सांगण्याची हिम्मत दाखवता का? "मला लग्नात interest नाही आपण फक्त १ रात्र/काही दिवस मजा मारू या" असे सरळ मुलीला का नाही सांगत?

मी तुमचं पाकीट मारणारे आज, द्या टाळी असं म्हणुन कुठला पाकिटमार चोरी करतो का? ह्या अश्याचं फसवणुकीच्या विरोधात मी मतं मांडायचा प्रयत्न केलाय. कारण कारभार करणारा मोकाट सुटुन जातो. खेळखंडोबा होतो तो अश्या फसवणुकीतल्या मुलीचा आणि पर्यायानी तिच्या होणार्‍या नवर्‍याचा.

थोडक्यात मुलींचे "चरित्र" हे सरळ सरळ त्यांच्या virginity नुसार ठरते. आणि "मुलांचे चरित्र" हा concept च अस्तित्वात नाही. एका गिधाडाने फ़सविलेली किंवा तुमच्या भाषेत "गिधाडासोबत मजा मारून आलेली" मुलगी तुम्ही अजूनही "माणूस" म्हणून स्वीकारत नाहीत त्यामुळे अशा मुलींना त्या गिधाडावर बलात्काराचा आरोप करावा लागतो. गिधाडांचे मात्र आरामात लग्न जमते. ते गिधाडही मुलेच असतात न?

हा सरळ सरळ आरोप होतोय. मी त्या मुलीला अजुनही माणुस ह्याच द्रूष्टीनी पाहातो. पण तीचं मुलगी आता सो कॉल्ड मॅस्क्युनल फसवणुकीत सापडुन आता माझ्या मित्राला माणुस नाही तर एक नाईलाज झाल्यावर वापरायचा ओपन ऑप्शन म्हणुन पाहात होती. ह्याला काय म्हणाल?

हे किती खरं किंवा किती खोटं मला माहित नाही. पण माझ्या मते तरी एवढ्या नाजुक बाबीपर्यंत गुंतागुंत वाढतात तेव्हा मुली नुसत्या शारिरिकद्रूशट्या गुंतलेल्या नसतात तर त्या मानसिकरित्या सुद्धा त्या विशिष्ट मुलामधे अडकत असाव्यात. नंतर त्यांचं लग्न दुसर्‍याशी झालं तरी जर त्याला मनातुन काढुन शकल्याचं नाहीत तरं ही फसवणुक कोणाची झाली? आणि अशी उदाहरणं घटस्फोटाच्या टोकापर्यंत गेल्याची उदाहरणं पाहण्यात आहेत.

आणि हा फसवणुकीचा मुद्दा मुलं आणि मुली दोघांनाही सारखाचं लागु पडतोय.

काळा पहाड's picture

25 Dec 2014 - 10:02 am | काळा पहाड

मुलीचा तोल जाणे शक्य आहे पण ही तिची "चूक" म्हणून मान्य न करता ते तिचे "चरित्र" ठरवून समाज मोकळा होतो

१. म्हणजे थोडक्यात, त्या मुलाने नाकारलेली ती मुलगी चांगल्या चारित्र्याची होती असं तुम्हाला म्हणायचंय?
२. असं करून त्या नाकारणार्‍या मुलानं अपराध केला असं तुम्हाला म्हणायचंय?

सस्नेह's picture

26 Dec 2014 - 10:49 am | सस्नेह

बॅलन्सड प्रतिसाद . आवडला !
निरपेक्ष विचारशैलीबद्दल अभिनंदन !

हेमंत लाटकर's picture

7 Sep 2015 - 5:06 pm | हेमंत लाटकर

one night stand किंवा तात्पुरते प्रकरण करायचे असेल तर मुल करण्या आधी मुलींना सांगण्याची हिम्मत दाखवता का?

ज्या मुलांना फक्त मजा मारायची असते ते आधी कशाला सांगतील?

कपिलमुनी's picture

8 Sep 2015 - 2:24 pm | कपिलमुनी

मुलांना फक्त मजा मारायची

मजा फक्त मुलांनाच मारायची असते !
समानतेच्या या युगात केवढा हा गैरसमज आणि प्रतिगामी दृष्टीकोन!

प्यारे१'s picture

8 Sep 2015 - 2:45 pm | प्यारे१

कान आणि बोट?

बॅटमॅन's picture

8 Sep 2015 - 2:48 pm | बॅटमॅन

मजा हेच मुळात टीमवर्क असते हे विसरलेले दिसतात ते साहेब.

नाखु's picture

8 Sep 2015 - 2:55 pm | नाखु

टी २० का कसोटी हा खेळाडूंचा वकूब-तग धरण्याची क्षमता-वेळेची ऊप्लब्धता यावर अवलंबून असतो.

खेळ-खंडोबा निरिक्षण प्रेक्षक नाखुस पोचवाला.

प्रसाद गोडबोले's picture

8 Sep 2015 - 3:00 pm | प्रसाद गोडबोले

=))

प्यारे१'s picture

8 Sep 2015 - 3:01 pm | प्यारे१

>>> खेळ-खंडोबा निरिक्षण प्रेक्षक नाखुस पोचवाला.

स्टेडियम मध्ये तिकीट काढून की टीवी वर टेलिकटेलि? ;)
-क्युरियस केस

घाटावरचे भट's picture

25 Dec 2014 - 12:06 pm | घाटावरचे भट

च्यायला, मला एक कळत नाही पोरं पोरी जेव्हा प्रेमात/रीलेशनशिपमध्ये/लग्नात पडतात, तेव्हा 'डोण्ट आस्क डोण्ट टेल' पॉलिसी का ठेवत नाहीत? 'की बाबा/बाई माझ्यासाठी टाईम टी=० आत्ता सुरू होतो. आता तू माझ्याशी आणि मी तुझ्याशी एकनिष्ठ राहाणं अपेक्षित आहे.' यानंतर जर दोघांपैकी कोणी/दोघेही इकडे तिकडे तोंड मारायला गेले तर करा म्हणावं हवी तितकी बोंबाबोंब. हाकानाका....

सिरुसेरि's picture

29 Dec 2014 - 5:55 pm | सिरुसेरि

होतकरु मुलांनी जोपर्यंत शिक्षण ( १० वी , १२ वी , पदवी , इतर कोर्सेस , मास्टर्स वगैरे) चालू आहे तोपर्यंत प्रेम वगैरे गोष्टींच्या नादाला लागू नये . दूर रहावे . फक्त शिक्षण , करीअर यांवरच लक्ष केन्द्रीत ठेवावे . कारण बहुतेक मुले हि तोपर्यंत आर्थिकद्रुष्ट्या पालकांवर अवलंबून असतात . मग जेव्हा साधा एक कप चहा वैयक्तिक कमाइवर पिण्याची आणी पिलवण्याची पात्रता नसते तेव्हा प्रेम करण्याचा विचारही करू नये . मुली या मुळातच शिक्षण , करीअर , पैसा , स्थिरस्थावरता यांबाबत जागरुक असतात . त्यामुळे त्या सावधपणे आपले हित पाहू व जपू शकतात .

हे तुमचं मत झालं, माझ्या रुममेटने या वयात केलेले प्रताप ऐकले तेव्हा आम्ही अगदीच मागास असल्याची प्रकर्षाने जाणीव झाली. ;)

कपिलमुनी's picture

29 Dec 2014 - 7:10 pm | कपिलमुनी

होतकरु मुलांनी जोपर्यंत शिक्षण ( १० वी , १२ वी , पदवी , इतर कोर्सेस , मास्टर्स वगैरे) चालू आहे तोपर्यंत प्रेम वगैरे गोष्टींच्या नादाला लागू नये

सध्या महानगरांमध्ये पहिला बॉयफ्रेंड / गर्लफ्रेंड असण्याचा वय १४-१६ आहे .

एस's picture

29 Dec 2014 - 6:20 pm | एस

निर्णय कसे घ्यावेत, का घ्यावेत आणि ते चुकले तर त्याची जबाबदारी घेऊन त्यातून मार्ग कसा काढावा, बरोबर आले तर उत्साहाला संयतपणाचे कोंदण कसे घालावे हे आपण का शिकवत नाही आपल्या मुलांना? आयुष्य हे प्रवाही असतं, कित्येक वेळा पाण्याची ओढ कशी असेल याची आपण केलेली गणिते चुकतात. पण ते तितके मनावर घेऊ नये. चांगल्यावाईटाला एक स्वतंत्र, जबाबदार आणि समर्थ व्यक्ती म्हणून सामोरे जायला शिकवले तर कित्येक मनांमधल्या साचलेपणाचा निचरा होईल.

सुधा मूर्ती यांनी बहुधा 'वाइज अ‍ॅण्ड अदरवाइज' या लेखसंग्रहात नॉर्वे की स्वीडनमधील आणि भारतातील अशा दोन कुमारी मातांच्या कथा सांगितल्या आहेत. नॉर्वेतील मुलगी प्रेमात पडते, एका मुलाला जन्म देते, नंतर तिच्या बॉयफ्रेंडसोबत तिचं ब्रेकअप होतं, तो त्यांच्या मुलाचा खर्च उचलतो आणि एवढं होत असतानाही ती तिच्या आईवडिलांसोबत अगदी आनंदाने जगत असते. भारतातील मुलगी, लग्नाआधी मातृत्त्व येण्यामुळे होणारी नाचक्की टाळण्यासाठी आत्महत्त्या करते. किती फरक आहे दोन्हीकडच्या संस्कृतीत! लैंगिक आकर्षणाला तिकडे नैसर्गिक समजलं जातं. इकडे शांतं पापं. हेच मुलांनाही लागू आहे. शारीरिक ओढ टाळता तर येत नाही. मग ती दडपण्याच्या दडपणातून मुले आणि मुली, दोन्ही चुका करून बसतात - किंवा केलंय त्याला चूक मानू लागतात.

कुठेतरी एक सुवर्णमध्य साधला गेला पाहिजे विचारसरणीत. समाज मोकळा झाला पाहिजे.

सिरुसेरि's picture

29 Dec 2014 - 7:56 pm | सिरुसेरि

जगातील सर्वांना / प्रत्येकाला कोणी सुधारु / बदलू शकत नाही . पण हा चंगळवाद आपल्या घरात प्रवेश करणार नाही याची मात्र जास्तीत जास्त काळजी घेता येणे शक्य आहे . अशा तामसी प्रव्रुत्तींना घराच्या उंबरठयाबाहेरच रोखावे.

>>अशा तामसी प्रव्रुत्तींना घराच्या उंबरठयाबाहेरच रोखावे.

कसं रोखावं??

पण मुळात अशा प्रवृत्ती नक्की तामसी असतात की पाशवी?

नॉर्वेतील मुलगी प्रेमात पडते, एका मुलाला जन्म देते, नंतर तिच्या बॉयफ्रेंडसोबत तिचं ब्रेकअप होतं, तो त्यांच्या मुलाचा खर्च उचलतो आणि एवढं होत असतानाही ती तिच्या आईवडिलांसोबत अगदी आनंदाने जगत असते. भारतातील मुलगी, लग्नाआधी मातृत्त्व येण्यामुळे होणारी नाचक्की टाळण्यासाठी आत्महत्त्या करते.

इथे एक अवांतर : जल्ला प्लानिंग, गर्भ निरोधके इत्यादि इत्यादि फकस्त लग्न झालेल्या लोकांना लागू असते काय हो ? (जर संभाव्य परिणामांना सामोरे जायची तयारी नसेल तर) लग्नाआधी केलं तर काय पप्पांची बाभळ बुडेल व्हय ?

काय कारायचय ते करा, पण झेपत नसेल घेऊ नये आन सोसत नसेल तर करु नये, एवढी अक्कल तर बाळगावी..

आणि आता अवांतराचे अतिअवांतर:
मंडळींसाठी डिट्टेलमध्ये (न बोललेल्या शब्दांसहित) मूळ म्हण : (दारु) झेपत नसेल तर घेऊ नये आन (स्वतःची चेष्टा) सोसत नसेल तर (दुसर्‍याची) करु नये. ;)

(उगी कल्पनाशक्ती लई पळवू नये!)

टवाळ कार्टा's picture

29 Dec 2014 - 8:34 pm | टवाळ कार्टा

=))

रुस्तम's picture

30 Dec 2014 - 10:22 am | रुस्तम

=))

प्रसाद गोडबोले's picture

7 Sep 2015 - 6:29 pm | प्रसाद गोडबोले

आता कोणी तरी धागा वर काढलाच आहे तर विचारुन घेतो ...मग पुढे काय झालं ?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 Sep 2015 - 1:51 am | निनाद मुक्काम प...

लेखातील व लेखास पूरक प्रतिसादातील काही मुद्दे खटकले
लेखातील उदाहरण श व प चे पहिले व कथा सिनेमा आठवला
काही प्रतिसादात कमिटेड मुलांना सोडून गीघाडे किंवा हरामखोर किंवा छपरी मुलांच्या कडे ..... असे वाचले ,
आता छपरी मुलगा म्हणजे तुम्हाला काय अपेक्षित आहे त्यांच्या माथी तसे लिहिले असते का तशी त्यांची वेशभूषा व भाषा असते असे तुम्हाला अभिप्रेत आहे ,
कथा सिनेमातील फारुख शेख आठवा
कमालीचा आत्मविश्वास असलेला संवांद कलेत हुशार हसलेला बायकांची नव्हे तर पुरुषांची मानसिकता त्यांचे कच्च्चे दुवे ओळखून त्यांना खिंडीत गाठणारा फारुख
प्रथम दर्शनी सालस लोभस व आकर्षक व्यक्तीमात्वाचा असतो.
माझ्या पाहण्यात अनेक मुली पटवण्यात पटाईत असणारे
अनेक तरुण सगळेच काही आकर्षक राजबिंडे नसतात ,हंटर सिनेमात नायक दाखवला तसा सामान्य दिसणारे सुद्धा असतात.
मुलींना व मुलांना कोणात काय आवडेल हा गहन विषय आहे
आपल्या संस्कृतीत लग्नाआधी शरीर संबंध समाजमान्य नाहीत पण ते अनेकदा होतात मुलगा कमिटेड असो किंवा भ्रमर वृत्तीचा लग्नाआधी शरीर संबंध ठेवतात , मुळात हे शरीर संबंध राजी खुशीने झालेले असतात तेव्हा उगाच झाल्या प्रकारचा जास्त बाऊ करण्यात काहीही अर्थ नसतो ,
मुलाने मुलीला फसवले किंवा पूर्वी नासवले असे शब्द प्रयोग वापरले जायचे
दुध नासते ते पूर्ववत होत नाही मात्र
लग्नाआधी महिलेने शरीर संबंध ठेवले तर संपल सगळ व पुरुषाने ठेवले तर त्याच्याकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन का
माणसाला आयुष्याचा प्रत्येक टप्प्यावर जे अनुभव मिळतात त्यातून बोध घेऊन त्याने पुढचे आयुष्य सुखद करायचे असते ,
भ्रमर वृत्तीच्या मुलांना व मुलींना त्यांच्या खाजगी आयुष्य किंवा त्यांचे प्रणय जीवन त्यांनी कसे जगावे किंवा कसे जगू नये ह्याबद्दल मार्गदर्शक सूची बनवणारे आपण कोण आहोत.
लेखाच्या सुरवातीला जेव्हा लेखाने एका मुलाला वन नाईट बद्दल बोलतांना ऐकले, तेव्हा ह्यांना प्रेम समजत नाही फक्त वासना मनात असते असे द्वेषाने लिहिलेले वाचले
आयुष्याचा प्रत्येक टप्यावर वासना वाईट व प्रेम उद्दात अश्या खुळचट कल्पना आपल्या मनात समाजातून आपसूक भरल्या जातात , शरीराला भिन्नलिंगी आकर्षण वाटणे हे नैसर्गिक आहे
दोघांच्या संमतीने शरीर सुखांचा अनुभव घेणे देखील नैसर्गिक त्यात दोघांच्या कृत्यावर तिसर्या त्रयस्थ व्यक्तीने ह्यांनी पुढे कमिटेड राहून लग्न केले तर ह्यांचा शरीर संबंध प्रेमाच्या वर्गवारीत उद्दात ठरतो व भ्रमर वृत्ती प्रमाणे दोघांनी कालांतराने आपापले जोडीदार बदलले तर त्यांनी वासनेच्या नावाखाली हैदोस घातला म्हणून बोंबा का माराव्यात
निसर्गात कीटक असो किंवा जनावर त्यात साप सिंह वाघ आलेत ह्यात नराला मादीस प्रणय करण्यात उद्युक्त करण्यासाठी खास प्रयत्न करावे लागतात
मी सालस आहे कमिटेड वृत्तीचा आहे लौकिक अर्थाने कमावता शिकलेला आहे म्हणून मुलगी माझ्या लगेच प्रेमात पडेल ह्या भ्रमात कुणीही राहू नये
एका सिनेमात अमोल पालेकर ला अशोक कुमार जसा ट्रेन करतो व पुढे असरानी चा पत्ता अमोल कापतो हे पाहता प्रत्येकाला आयुष्यात अशोक कुमार सारखा एखादा व्यक्ती
किंवा व पु ह्यांचा पार्टनर सखा गुरु म्हणून लाभेल असे नाही
अवांतर
पाण्यात पोहायला माश्याला व इटालियन व ब्राझिलियन माणसांना मग ते समाजातील कोणत्याही स्तरातील असो
मुलींना अप्रोच कसा करावा हे शिकवावे लागत नाही, असे माझे निरीक्षण आहे

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Sep 2015 - 7:21 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

Your comment is right, no doubt about that. One night stand or Friends with benefits or whatever other names it is called by. All I want to do is point out a major flaw due to which Genuine/ nice and sincere people (Doesn't matter whether that person is male or female) are ofthen (Too ofthen actually) ditched. When the other person realizes his/ her mistakes they find no shame in returning to people they ditched and tell them how they were wrong. But whats the point in accepting the fact when it's irreversible and too late? Good people are already hurt. This should be avoided at all costs.

The article is not about the incident but about aftermath. It's all about making right choices and not hurting genuine people :).

(Sorry for writing in english, browser is not translating text to Marathi :(. Will take some time to fix)

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Sep 2015 - 7:39 am | कैलासवासी सोन्याबापु

फ़क्त पोरींशी बोलायला बुझणारी पोरे ही शामळु किंवा सज्जन खचित नसतात बरंका कप्तानसाहेब!! उदाहरण अस्मादिक. कॉलेज मधे फ्रीक्वेंट बंडखोरी मारामार्या अन काय काय केलेला मी सज्जन खचित नव्हतो. पण आमच्या गावचे कर्मठ अन पारंपरिक वातावरण पाहता पोरींशी बोलणे मला मुश्किल होत असे. त्यात फादर प्रसिद्ध शिक्षक अन अडीच प्रसिद्ध पैलवान! नुसती सिगरेट प्यायची एखादी तर १० किमी गावाबाहेर जाणारा मी . तुम्ही म्हणता तसे पोरीही कधी त्या रावडीपणावर भाळल्याचे दिसले किंवा लक्षात आले नाही (आमचे दुर्दैव).