नुकतीच लेह ची ट्रीप मारून आलो. खूप लोकांनी डिसेंबर च्या थंडीची भीती घातली पण मी तिला भीक न घालता ८ दिवस आरामात फिरून आलो.
जी काळजी घ्यायला सांगतात त्याच्या बरोब्बर विरुद्ध कृती केली. (आगाऊपणा म्हणून नव्हे तर सवय म्हणून :) ) उदा. गरम पाणी प्यावे !!! मी जवळपास रोज थंड बीअर घ्यायचो. पहिल्या दिवशी बाहेर फिरू नये !!! मी २ तास झोप घेऊन बाजारहाट करून आलो. उणे २ ते उणे १० पर्यंत तापमान होते पण रोजची अंघोळीची सवयही मोडता आली नाही. थोडक्यात काय नशीब बलवत्तर आणि शरीराला गेल्या ४ वर्षात हिमालयाच्या थंडीची झालेली सवय म्हणून काही झाले नाही.
पुण्याहून थेट विमानाने लेह ला आलो आणि गाडी ठरवून मनसोक्त भटकलो. थोडीफार पायी पण भटकंती केली.
सिया-ला नावाचे छान गेस्ट हाउस मार्केट जवळच आहे तिथे राहिलो. फार थोडी हॉटेल्स डिसेंबर मध्ये चालू ठेवतात त्यापैकीच हे एक (आणि माफक दरात). मार्केट मध्ये छोटी छोटी रेस्टोरंट्स आहेत जिथे चायनीज आणि तिबेटन फूड मिळाले. त्यावर पण जमेल तसा ताव मारला.(या दिवसात फक्त संध्याकाळी ७ पर्यंतच ही सुरु असतात.)
खाली फोटो डकवतो आहे म्हणजे कुठे फिरलो हे शब्दात सांगायची गरज नाही. (लिहायचा कंटाळा फारच आहे). बऱ्यांच लोकांनी लेह ला जातो आहेस का लदाख ला पण ? असा सवाल केला. लेह-लडाख हा शब्दप्रयोग बदलण्याची नितांत आवश्यक्ता वाटली.
सिंधू आणि झांस्कार नदीचा संगम…. (यातील हिरवट दिसते ती सिंधू आणि गडद निळी आहे ती झांस्कार)
बॉलीवूड चा आवडता पॅंगॉंन्ग लेक ….
आणि काही इतरही जागा बघितल्या पण त्यांचे फोटो एडिटिंग अजून चालू आहे. ते नंतर कधितरी ………………….…. :)
प्रतिक्रिया
19 Dec 2014 - 11:40 pm | मधुरा देशपांडे
अफाट सुंदर फोटो!! अप्रतिम. लामायुरू चा रस्ता आणि सिंधु आणि झांस्कार नदीचा संगम खास आवडले.
19 Dec 2014 - 11:47 pm | विलासराव
मला पण जायचे आहे मे नंतर.
पण ट्रेन आनी पुढे बसने.
आता तुम्ही मला सांगा काय काळजी घ्यायला हवी?
19 Dec 2014 - 11:55 pm | किल्लेदार
एकच काळजी घ्या....प्रवासात झोपू नका. :) .कारण प्रत्येक फ्रेम बघण्यासारखी आहे. मी ड्रायव्हरला दर १० मिनिटांनी गाडी थांबवायला सांगायचो (फोटो काढायला). पण बिचारा न कंटाळता थांबवत होता.
20 Dec 2014 - 12:01 am | विलासराव
नक्की.
माझा मनाली मार्गे जाउन काश्मीरमार्गे परत किंवा उलट असा विचार आहे.
20 Dec 2014 - 12:22 am | सूड
प्रवास कसा प्लान केला ते थोडक्यात देता का? व्यनिच केला असता, पण इथे बाकीच्या लोकांना हा प्रश्न असू शकतो. इन केस प्लान करायचं झालं तर तुमचा प्रतिसाद/ वेगळा धागा उपयोगी पडेल.
20 Dec 2014 - 12:24 am | यसवायजी
हेच्च म्हणतो. कंटा़ळा न करता, थोडा वेळ काढाच.
फोटो अप्रतिम आलेत. *OK*
20 Dec 2014 - 12:09 am | डॉ सुहास म्हात्रे
अफाट आहे हा भाग ! सुंदर फोटो !!
20 Dec 2014 - 12:09 am | खटपट्या
जबरा फोटो !!
तो रस्ता बघून तर मस्तपैकी बुलेट हाणावी असे वाटतेय त्या रस्त्यावर.
मधे कोणीतरी विचारत होते की बुलेटवरून लेह,लडाख करायचे का म्हणून.
लेह आणि लडाख बद्दल अजुन माहीती मिळाली असती तर बरे झाले असते.
20 Dec 2014 - 12:15 am | मुक्त विहारि
तुमचे आमचे नक्कीच जमणार...फोटोग्राफी मुळे नाही....तर बियरप्रेमामुळे...
बादवे,
अज्जुन फोटो असतील तर जरूर टाका...
20 Dec 2014 - 12:29 am | मस्तानी
तो पहिलाच फोटो इतका अफाट आहे की शब्द सुचत नहियेत
Please, desktop background म्हणून वापरला तर चालेल का?
20 Dec 2014 - 5:55 am | शिद
एक सो एक जबराट फोटो आले आहेत. *ok*
डेस्कटॉप बॅकग्राऊंड किंवा फोनचं वॉलपेपर म्ह्णून सहज खपतील. झक्कासच.
20 Dec 2014 - 7:59 am | अत्रुप्त आत्मा
आंssssss :-\ का काढले इतके सुंदर फोटूssss :-\
आता मी ते चोरणार! :-D
20 Dec 2014 - 8:10 am | अजया
सुंदर फोटो!नद्यांच्या संगमाचा तर अप्रतिम.
20 Dec 2014 - 8:10 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
अप्रतिम फोटो :)
20 Dec 2014 - 8:43 am | श्रीरंग_जोशी
अहाहा, काय ते फोटोज. डोळ्यांचं पारणं फिटलं.
20 Dec 2014 - 8:46 am | पिंपातला उंदीर
जळुन खाक झालो. लै भारि
20 Dec 2014 - 8:57 am | प्रचेतस
अतिशय सुंदर.
20 Dec 2014 - 9:50 am | जुइ
दहा वर्षांपुर्वी केलेली लेहची सहल आठवली.
20 Dec 2014 - 9:54 am | चौकटराजा
किल्लेदार म्हणजे मस्त रेखीव फोटो असणारच या अपेक्षेने धागा उघडला ! आपुनका जजमेण यक्दम बराबर हाय !
20 Dec 2014 - 10:13 am | rain6100
सिंधू आणि झांस्कार नदीच संगमा वरील घर आहे कि हॉटेल ? तेथे राहायला काय मजा येईल राव .... मस्त समोर दोन्ही नद्यांचा संगम आणि एक बिअर मग मोक्ष काय दूर नाही ..
20 Dec 2014 - 11:10 pm | किल्लेदार
बिअर मेक्स थंडी बिअरेबल :)
21 Dec 2014 - 9:48 pm | किल्लेदार
दोन्हीही नाहि.... पण बीअर नक्किच पिता येइल इथे *drinks*
20 Dec 2014 - 11:26 am | किसन शिंदे
अप्रतिम आलेत सगळे फोटो! :)
20 Dec 2014 - 11:38 am | सस्नेह
दुसरा आणि नद्यांच्या संगमाचा फोटो सर्वात आवडला.
20 Dec 2014 - 12:22 pm | शेखर बी.
मस्त आलेत फोटो..
20 Dec 2014 - 12:24 pm | मदनबाण
अहाहा... केवळ अप्रतिम ! :)
लेह-लढाख चे नुसते फोटो जरी पाहिले तरी रोमांच उभे राहतात... इथल्या आकाशाच्या निळाइचे कमालिचे आकर्षण आहे मला.
कधी जाणार मी हिथ ? :(
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राजा तू बन जा मेरा दादला... ;) { Vaishali Samant composed by Avadhoot Gupte }
20 Dec 2014 - 1:14 pm | प्यारे१
आहाहा!
आमचे शब्द खुंटतात अशा जागी.
सुं...द...र फोटो.
20 Dec 2014 - 1:40 pm | जयंत कुलकर्णी
मस्त फोटो............ माझा मुलगा दोनदा त्याच्या ट्रायंफवर पुणे ते लडाखला ते पुणे जाऊन आलाय. कोणाला काही त्या संदर्भात काही माहिती हवी असल्यास मिळू शकेल......
20 Dec 2014 - 7:22 pm | टवाळ कार्टा
ट्रायंफ कितीला घेतली :)
21 Dec 2014 - 12:49 am | सूड
सदस्यनाम सार्थ करणारा प्रश्न !! =))))
21 Dec 2014 - 6:28 am | जयंत कुलकर्णी
खरेतर त्याच्याकडे ट्रायंफ आहे हे लिहिणार नव्हतो पण त्याचे व तरुणांचे जे गाड्यांचे पॅशन आहे ते पाहिल्यावर ते लिहिले नसते तर अन्यायकारक झाले असते म्हणून लिहिले. मुद्दा अर्थात काही माहिती हवी असल्यास मिळू शकेल हा आहे......
21 Dec 2014 - 6:30 am | जयंत कुलकर्णी
आणि एक ...त्याची त्याने घेतली. मग आमच्या विरोधाला कोण जुमानतो ?
21 Dec 2014 - 2:55 pm | टवाळ कार्टा
स्वस्तात पडली काय?
21 Dec 2014 - 2:55 pm | टवाळ कार्टा
चायला "सूड मोड" म्हणजे आत्ता कळले....डांबिस
22 Dec 2014 - 3:26 pm | सूड
धन्यवाद टवाळ'जी कार्टा !! ;)
22 Dec 2014 - 1:42 pm | कपिलमुनी
ट्रायंफचा कोणता मॉडेल ?
20 Dec 2014 - 8:49 pm | पारस
अप्रतिम फोटो आहेत.
20 Dec 2014 - 11:13 pm | किल्लेदार
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. पण कॅमेरा कुठेही कसाही फिरवला तरी इथले फोटोज चांगलेच येतील याची खात्री आहे.
21 Dec 2014 - 8:23 am | विनोद१८
अप्रतिम फोटो आहेत, पेनेरोमिक फोटो असतील तर दाखवा.
21 Dec 2014 - 12:46 am | एस
मघाशी फोटो दिसत नव्हते. आता दिसले आणि आवडले.
(सीपी इफेक्ट एक दोन ठिकाणी कमी करता आला असता का?)
21 Dec 2014 - 9:43 pm | किल्लेदार
ठीकसे गोम्पा सोडल्यास बाकी ठिकाणी सीपी चा वापर केलेला नाहि. किंचित जास्त निळाई स्पॉट मीटरींग मुळे आली आहे.
22 Dec 2014 - 11:59 am | मदनबाण
किंचित जास्त निळाई स्पॉट मीटरींग मुळे आली आहे.
मॅट्रीक्स किंवा तत्सम मीटरींगच्या ऐवजी स्पॉट मीटरींग वापरण्याचे कारण ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops?
Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…
22 Dec 2014 - 1:19 pm | किल्लेदार
पांढऱ्या-निळ्याचा अपेक्षित कॉण्ट्रास्ट साधण्यासाठी तसे केले
22 Dec 2014 - 2:29 pm | जयंत कुलकर्णी
कलर कास्ट अगोदर काढले असते तर मला वाटते असे झाले नसते....करुन बघण्यास हरकत नाही....
22 Dec 2014 - 3:13 pm | किल्लेदार
कलर कास्ट हा कळीचा मुद्दा आहे. मला जमत नाही आणि फोटोशोप चे लेटेस्ट वर्जन पण नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
22 Dec 2014 - 3:42 pm | जयंत कुलकर्णी
फार सोपे आहे. इमेज मेनू मधे जाऊन फोटो डुप्लिकेट करावा. दोन्ही फोटो वोर्किन्ग स्पेसमधे ओढावेत. एकाला फिल्टरमधे जाऊन ब्लर-अॅव्हरेज करावे. मग दुसर्या फोटोत लेव्हल्स उघडावे. मधला आयड्रॉपर घेऊन त्या अॅव्हरेज ब्लर केलेल्या फोटोवर क्लिक करावे. ज्यासाठी लेव्हल्स उघडले आहे त्यातील कास्ट निघून जाईल. अर्थात या नंतर फोटो थोडाफार अडजस्टही करावा लागेल विशेसतः व्हायब्रन्ससाठी.......मला नीट सांगता आले आहे असे वाटत नाही ...पण हे समजले नसल्यास मी परत प्रयत्न करीन.....
22 Dec 2014 - 3:53 pm | किल्लेदार
कॉल केला तर चालेल का ?
22 Dec 2014 - 4:26 pm | जयंत कुलकर्णी
जरुर का नाही ?
22 Dec 2014 - 6:55 pm | किल्लेदार
फोन द्या...... :)
21 Dec 2014 - 7:23 am | गुलमोहर
खुप छान आहेत फोटो...मस्तच....
21 Dec 2014 - 9:56 am | सर्वसाक्षी
सर्वच चित्रे अतिशय सुंदर! आकाशाची अशी निळाई यापूर्वी इजिप्त प्रवासात अनुभवली होती.
21 Dec 2014 - 2:49 pm | श्रीगुरुजी
अशक्य सुंदर प्रकाशचित्रे आहेत! भाग्यवान आहात. हा सुंदर प्रदेश बघायला मिळाला तुम्हाला.
21 Dec 2014 - 3:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जब्रा फोटो. नदी संगम क्लास. (प्रियकर प्रेयसीला भेटल्यासारखं वाटलं)
-दिलीप बिरुटे
21 Dec 2014 - 9:46 pm | किल्लेदार
:D
21 Dec 2014 - 10:18 pm | हुकुमीएक्का
फोटो अतिशय सुंदर आलेत. स्पॉट Metering मुळे एव्हडी निळाई? अप्रतिमच! मला वाटले आपण CPL वापरला असाल. परंतु CPL न वापरताही खुपच छान निळाई आलीय. मस्तच! *smile* *good*
22 Dec 2014 - 11:38 am | पियुशा
अप्रतिम !!!!!!
डिसेंबरच्या थंडीत बर्फ नाही पड्त का तिकडे ?
22 Dec 2014 - 12:03 pm | सविता००१
अप्रतिम
22 Dec 2014 - 1:20 pm | किल्लेदार
डिसेंबर एंड ला बर्फ पडतो म्हणतात.
22 Dec 2014 - 6:29 pm | बॅटमॅन
काय अप्रतीम फटू तेच्यायला. काश्मीरला जाऊन आलोय, पण लेह-लडाखचं सौंदर्य काय वेगळंच!
23 Dec 2014 - 9:24 am | गिरीश मांधळे
मस्त फोटोज् !!
16 Jan 2015 - 2:03 pm | गणेशा
लेह लडाख येकदा करायचेच आहे.
फोटो अप्रतिम आहेत