जादूगार डाइनमो

कंजूस's picture
कंजूस in जनातलं, मनातलं
8 Dec 2014 - 1:35 pm

ब्रैडफॉर्ड इंग्लडचा लोकप्रिय जादूगार DYNAMO याचे जादूचे प्रयोग HISTORY TV CHANNEL 18 वर दाखवतात. युट्युबवरही पाहता येतात. आतापर्यँत चौदा मोठे शोज झाले आहेत.
त्याच्या गाजलेल्या जादूंमध्ये या आश्चर्यकारक ठरल्या आहेत:
१)थेम्स नदीवर चालणे.
२)कागदाची फुलपाखरे जिवंत करणे.
३)रिओ डि जाने मध्ये हवेत उडणे.
४)टाईम्स स्क्वेअरमध्ये एकाच वेळी एकाच नंबरवरून शेकडो लोकांना कॉल येणे.
५)कारंज्याचा पाण्याचा बर्फ करणे.
तुम्ही या डाइनमोचे कार्यक्रम पाहिलेत का ?
मागच्या वर्षी तो वाराणसी आणि धारावीत येऊन गेला होता . आता क्रिसमसला नवीन शो दाखवतील असे वाटते.

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

बोका-ए-आझम's picture

8 Dec 2014 - 2:08 pm | बोका-ए-आझम

वाराणसी आणि धारावी? काय रेंज आहे बा प्रेक्षका!

प्रमोद देर्देकर's picture

8 Dec 2014 - 2:10 pm | प्रमोद देर्देकर

हो बघिलेत आणि भारतात (वाराणसी/धारावी) आलेला तेव्हा ऊदबत्ती काडेपेटी शिवाय पेटवली होती ते पाहिले.
काही प्रयोग हातचलाखी तर काही रासायनीक अभिक्रिया (आग लावणे) प्रकार वाटतात.

प्रसाद प्रसाद's picture

8 Dec 2014 - 2:12 pm | प्रसाद प्रसाद

थक्क करणाऱ्या ट्रिक्स असतात डायनॅमोच्या. घरात आवर्जून हा कार्यक्रम पाहिला जातो.

DYNAMO याचे जादूचे प्रयोग ह्या अर्ध्या कॅमेरा ट्रिक्स असतात, खूप कमी तो आक्चुयल ट्रिक्स करतो, बाकी लोक वीडियो ट्रिक्स जास्त आहेत,बाकी मार्केटिंग छान आहे as a professional in magic field मला त्या पेक्षा इंडियन मेजीशियन च्या ट्रिक्स जास्त आवडतात. खूप दिवसा पासून मी पा वाचतो, पण कधी live disscuession मधे भाग घेतला नाही. हा विषय माझा जिवाल्या आहेय म्हणून प्रतिसाद, मराठी जास्त नाही टाइप करत, so got some mistakes , सो शमस्व

पाण्यावर आपल्याकडे कोणी चालला आहे का ?

आपल्या कडे जास्त मॅजिक शो हे स्टेज मॅजिक शो असतात. out of india जास्त लोक हे स्ट्रीट मॅजिक ह्या प्रकारात इंट्रेस्टेड असतात. walking on water हा स्ट्रीट मॅजिक ह्या प्रकारात मोडतो. भारतात हा प्रकार काही लोक करतात, बाकी जास्त लोक हे स्टेज मॅजिक ला प्रेफरेन्स देतात.

एका योग्याने पाण्यावर चालुन काहितरी दाखवल म्हणे बरीच वर्ष तपस्या करुन साधना वगैरे
मग गंगेच्या इकडुन तिकडे कायतरी गेला
मग राप म्हणाले दोन रुपयात ( आता भाव माहीत नाही तेव्हाचा समजा) नावाडि पार करतो मग काय
इतकी वर्ष घालवायची
सहज आठवल
जादुगारांविषयी लय आकर्षण आहे पी.सी.सरकार ने ट्रेन गायब केल्याच आठवतय कुठेतरी वाचलेल
तोहि बंगालीच

डाइनमोने वाराणसीत गंगेची आरती (पाण्यात शेकडो दिवे पेटवून दाखवले )करून दाखवली मी म्हणतो की घ्या पाचपन्नास हाईटेक व्हिडिओ कैमरे ,टेक्निशन आणि दाखवा करून ही जादू. करमणूक करायची आहे अध्यात्म ठेवू थोडा वेळ बाजूला. आणा आपलं पुष्पक विमान. लावा आपले आइआइटीचे एंजिनिअर कामाला. होऊन जाऊ दे धमाल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Dec 2014 - 9:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, डायनमो उर्फ स्टीव्हन फ्रेन याने भारतातही धुमाकुळ घातलाय. एक पणती पाण्यात सोडुन असंख्य पणत्या पाण्यावर तेवत दिसणे हा प्रयोग मला भन्नाट वाटला. आता कसं काय वगैरे, आपल्याला काय करायचं म्हणुन सोडून दिलं. पण, खरंच ही जादू तो कसं करतो हे कोडं कोणी उलगडून दाखवलं तर ते समजुन घ्यायला आवडेल.

-दिलीप बिरुटे

काही काळा पूर्वी पाहिलेला खालील व्हिडीयो :-

बाकी Darcy Oake's चा खालील व्हिडीयो देखील पाहिला विसरु नका :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Why The U.S. Won’t Give Germany Their Gold Back

व्हिडिओ ट्रिकच्या आक्षेपाला उद्देशून आहे की होऊन जाऊ द्या एक स्ट्रीट शो. काय वाटेल ती साधने वापरा आणि येऊ द्या हव्वा.

मुक्त विहारि's picture

8 Dec 2014 - 10:37 pm | मुक्त विहारि

खरे तर हातचलाखीच. पण माणसे भुलतातच.

"प्रेस्टीज" असू दे किंवा "हॅरी पॉटर" किंवा "अल्लाउद्दीनचा दिवा".

असो,

माझ्या मते जादू बघायची आणि मनोरंजन करायचे आणि सोडून द्यायचे.जादूच्या मागचे रहस्य समजले की, जादूची मजा गेली.

बाद्वे, आमची बायको ह्या जगातील सगळ्यात मोठी जादूगार.

कधी-कधी आमच्या डोळ्यासमोर दिवसा काजवे काय चमकावते, अचानक आमच्या कपाळावर टेंगूळे काय उगवतात, मनातले सुप्त भाव ओळखण्यात तर तिचा फार हातखंडा आहे.

कधी-कधी आमच्या डोळ्यासमोर दिवसा काजवे काय चमकावते, अचानक आमच्या कपाळावर टेंगूळे काय उगवतात, मनातले सुप्त भाव ओळखण्यात तर तिचा फार हातखंडा आहे.

मनातले सुप्त भाव ओळखण्यात तर तिचा फार हातखंडा आहे.

मला तुमच्याविषयी सहानुभुती दाटुन आलीय मुवि जी कारण अस जर असेल तर
मुक्त विहार करतांना (कल्पनेच्या विश्वात म्हणतोय मी ) किती अडचणी येत असतील तुम्हाला याची मला कल्पना देखील करवत नाही.\
प्रचंड सहानुभुती मुवि तुमच्याविषयी वाटतेय
भगवान दुष्मन के साथ भी एसा ना हो

एक आपला अंदाज लावतोय बसल्या बसल्या
१- तेरा जादु चल गया...
२- आखो से तुने जो क्या कह दिया
३- मेरे दिल मे आज क्या है तु कहे तो मै बता दु ( याची बहुधा गरजच पडत नसावी )
अजुन एक शंका समजा तुम्ही हे गाण मनातल्या मनात गुणगुणत असाल तर काय होइल ? म्हणजे तुम्ही कधी चिडुन मनातल्या मनात हे गाण गुणगुणतात का ? समजा एक प्रत्युत्तर म्हणुन संताप म्हणुन
कई बार यूँ भी देखा हैं
ये जो मन की सीमा रेखा हैं, मन तोड़ने लगता हैं
अनजानी प्यास के पीछे , अनजानी आस के पीछे, मन दौड़ने लगता हैं
ह्.घ्या मुवि सर

मुक्त विहारि's picture

9 Dec 2014 - 12:30 am | मुक्त विहारि

अहो,

अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात.निदान मी तरी घेत नाही.

आणि क्रुपया मला "मुवि"च म्हणा.

पण जादुगार पेक्षा एन्ड्युरन्स आर्टीस्ट म्हणुन तो जास्त आहे
जादु पण करतो पण स्ट्रीट मॅजिक करतो हलक्या फुलक्या फार ग्रेट जादुगार नाही पण ग्रेटेस्ट एन्ड्युरन्स आर्टीस्ट म्हणता
येइल.
म्हणजे जे काय केल आहे ते मला वाटत भुतलावर अजुन कोणी केल नसाव
१- फ्रोजन इन टाइम मध्ये बर्फाच्या आत सलग ६३ तास
२- एका १०० फुट उंचीच्या पिलरवर ३५ तास सलग उभा राहुन मग जंप
३-४४ दिवस सलग अन्ना विना फक्त पाण्यावर एका ग्लास च्या कॅबिन मध्ये (थेम्स नदिवर टांगलेल्या) फक्त साडेचार लीटर पाणी रोज प्यायचा एक वेबकॅम सर्वांसमोर बिलकुल ओपन
४-एकदा इलेक्ट्रीफाइड चा एक शो केला कीतीतरी व्होल्ट्स च्या इलेक्ट्रीक फिल्ड मध्ये
फारच भयंकर मनुष्य याची डिटेल खुप आहेत इथे वाचा
http://en.wikipedia.org/wiki/David_Blaine#Street_Magic_and_Magic_Man

रॉय एफ़ बॉमिस्टर या प्रख्यात संशोधकाच एक पुस्तक वाचल होत विलपॉवर- रीडिस्कव्हरींग द ग्रेटेस्ट ह्युमन स्ट्रेंथ नावाच. यात विलपॉवर वरील अत्यंत सायंटीफ़ीक रीसर्च दिलेल आहे. त्यात त्यांनी डेव्हीड ब्लेन च एक विश्लेषण दिलेल आहे त्याची फ़िलॉसॉफ़ी त्याने दिलेली आहे. त्याच एक कोट आहे: द मोअर द बॉडी सफ़र्स द मोअर द स्पीरीट फ़्लॉवर्स : ते त्याने कॊणा संताच आहे त्यावरुन घेतलय त्या पुस्तकात एक्स्ट्रीमली इंटरेस्टींग वर्णन आहे तो कस करतो हे सर्व साध्य बॉमिस्टर ने त्याच्याशी चर्चा केली होती खुप इन्सपायरींग मोटीव्हेटींग आहे. पण अर्थात हा मॅजिशियन म्हणुन ग्रेट नाही. धाग्याचा मुख्य विषय जो जादुगार आहे त्यात याला फ़ारस स्थान नाही. थोडा वेगळा टाइप आहे. पण या माणसाच एन्ड्युरन्स हिच एक जादु वाटते मला
एन्ड्युरन्स ला चांगला मराठी शब्द म्हणजे सहनशीलता किंवा सहनसीद्धि कसा वाटतो.?

नवीन चांगल्या लिंक मिळताहेत कालच एका माणसाने अनाकोंडा सापाकडून खाववून घेतले आणि एक तासाने बाहेर आला ऐकलं सगळं शूट केलंय आता इकडे भारतात लग्नानंतर 'अनाकोंडा'च्या विळख्यात आयुष्यभर अडकूनही किती हसतमुख राहतात ,गाणी गातात ,अनाकोंडाची

टवाळ कार्टा's picture

9 Dec 2014 - 8:31 am | टवाळ कार्टा

अजगर एखाद्याला गिळल्यावर शरिराचे वेटोळे करुन खाल्लेल्या प्राण्याची हाडे मोडतो...१ तासाने माणूस बाहेर येऊच शकत नाही

मुक्त विहारि's picture

9 Dec 2014 - 10:05 am | मुक्त विहारि

हे दोन वेगळे वेगळे सर्प जमातीतले प्राणी असावेत...

(मोगँबो खूष हुवा....)

टवाळ कार्टा's picture

9 Dec 2014 - 10:07 am | टवाळ कार्टा

अ‍ॅनाकोंडा ही अजगर प्रजातीतलीच १ शाखा आहे

मुक्त विहारि's picture

9 Dec 2014 - 10:09 am | मुक्त विहारि

अजगर म्हणजे अजगरच... त्याला अ‍ॅनागोंडाची सर (आपली शरीरयष्टी...आपले ते कात....) कुठून येणार?

कंजूस's picture

9 Dec 2014 - 6:59 am | कंजूस

स्तुती करतात Unsung Heros एक दुर्लक्षित जमात(जामात).

जादू ची रहस्य सांगितली की त्याची मजा निघून जाईल. भूलवते ती जादू. अर्थात ज्याना हवे ते गूगलून बघू शकतात. revelaed secrets सर्च केले की मिळेल सगळे.

सिरुसेरि's picture

9 Dec 2014 - 8:10 pm | सिरुसेरि

द ग्रेट इंडियन रोप ट्रिक ही तर कितीतरी काळापासून फक्त भारताची मक्तेदारी आहे . पाश्चात्य लोकांना त्याचे खुप कुतूहल आहे .

कपिलमुनी's picture

10 Dec 2014 - 11:43 am | कपिलमुनी
खटपट्या's picture

10 Dec 2014 - 12:24 pm | खटपट्या

या चित्रफितीमधे १:२३ ला जादुगाराचा सहाय्यक गारूडी काय करतो ते बघा. तो ती मोठी टोपली मैदानाच्या मध्यावर आधीच केलेल्या छीद्रावर ठेवतो. ते छीद्र आधी दीसू नये म्हणून त्यावर फुले ठेवलेली असतात जी तो बाजूला करतो.आणि पटकन त्यावर टोपली ठेवतो. आणि मग पुढे काय होते ते तुम्ही पाहीलेच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Dec 2014 - 7:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जमीनीतून कोणी वर हा बांबू ढकलतोय हे मात्र तितकं स्पष्ट होत नै ये ना ?
अजून उलगडा केला पाहिजे या ट्रीकचा.

-दिलीप बिरुटे

खटपट्या's picture

10 Dec 2014 - 11:03 pm | खटपट्या

नक्कीच कोणीतरी खालून ढकलत असणार. जमीनीच्या ज्या भागाला कुंपण घातलंय त्या भागातील मातीचा रंगही वेगळा आहे.

धर्मराजमुटके's picture

10 Dec 2014 - 11:55 am | धर्मराजमुटके

छान धागा !
जादूची आवड असलेल्यांसाठी The Prestige (2006) हा इंग्रजी चित्रपट आवर्जून बघावा असे सुचवेन. चित्रपट संथ आहे आणि जादूच्या फार काही ट्रिक्स नाहियेत. पण एका जादूगाराची मानसिकता त्यात फार सुंदर रितीने उलगडून दाखविलेली आहे.

टवाळ कार्टा's picture

10 Dec 2014 - 12:12 pm | टवाळ कार्टा

http://www.imdb.com/title/tt1670345/

हा पण मस्त आहे

धर्मराजमुटके's picture

10 Dec 2014 - 1:04 pm | धर्मराजमुटके

आजच बघतो.

धर्मराजमुटके's picture

10 Dec 2014 - 5:13 pm | धर्मराजमुटके

तुम्ही सुचविलेला चित्रपट पाहिला. एकदम जबरा. आवडला.

टवाळ कार्टा's picture

10 Dec 2014 - 7:29 pm | टवाळ कार्टा

\m/

आता मुख्य मुद्द्याकडे वळतो -याच जादू करणारा भारतात असता आणि त्याने स्वत:ला अवतार रूपात लोकांसमोर सादर केले असते तर काय उलथापालथ झाली असती!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

11 Dec 2014 - 2:00 am | निनाद मुक्काम प...

पहिला हवा हा शो काहीतरी वेगळे पाहण्यास बरे वाटेल.

अनेकोंडा चा स्टंट पाहिला. जबरी आहे/