रसायनीमार्गे कर्नाळा

कंजूस's picture
कंजूस in मिपा कलादालन
7 Dec 2014 - 10:30 am

कलादालनात अंतर्भूत करण्याइतके चांगले फोटो नाहीत तरी देत आहे. या नवीन भटकंतीच्या जागेची ओळख करून द्यावी हा हेतू आहे.

काल रसायनी स्टेशन मार्गे कर्नाळा करून आलो. ही वाट गार सावलीची आहे आणि गुळसुंदाकडून येणाऱ्या वाटेपेक्षा अधिक रम्य आहे.
'आपटा - गुळसुंदा - कर्नाळा (+फोटो)' हा मिसळपाववरचा
लेख इथे आहे.

मार्ग :रसायनी रेल्वे स्टेशन - फाटकातून उजवीकडे -तुराडा कष्टकरी नगरातून - पुढे चांगल्या पायवाटेने अर्धा तास चालत - तुराडा ठाकरवाडी - सुगम पायवाटेने ४००मिटर्स चढून किल्ला आहे.

मला कर्नाळा किल्यापेक्षा अभयारण्याची भटकंती आवडते ती इथे मिळाली. पक्षी,फुलपाखरे,कीटक भरपूर आहेत.पक्षी माणसाच्या वावरास सरावलेले आहेत. चांगला कैमरा असता आणि सकाळी लवकर गेलो असतो तर आणखी चांगले फोटो मिळाले असते.

१)जास्वंदीची फुले खाणारे किडे.

२)जास्वंदीची फुले खाणारे किडे.

३)कुरडु.

४)ओढा.

५)खाजकुईलीची फुले, भुंगा आणि त्याच्या पाठीवर चमकणारे सूर्याचे प्रतिबिंब.

६)खाजकुईली फुले आणि शेंग.

७)रानफुले.

८)वाट.

९)गणेशवेलीची फुले.

१०)शेवाळे असलेली फांदी.

११)एक दमलेले फुलपाखरू.

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

7 Dec 2014 - 10:40 am | खटपट्या

खूप छान फोटो..
तुमच्या बरोबर फिरायचा योग आला पाहीजे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Dec 2014 - 11:05 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर फोटो. तुमची भटकंतीची आवड खास आहे. 'कंजूस' पेक्षा 'निसर्गात रमणारा माणूस' हे नाव तुम्हाला जास्त शोभून दिसेल :)

तुषार काळभोर's picture

7 Dec 2014 - 11:30 am | तुषार काळभोर

निसर्गात मणारा माणूस...

प्रचेतस's picture

7 Dec 2014 - 11:18 am | प्रचेतस

आवडलं.

काका,अनेक धन्यवाद.मस्त माहिती.लवकरच जाणार.

वरच्या तुरडा ठाकरवाडीतून एका ठाकर मुलीला वाट दाखवण्यासाठी वाटाडी घ्या म्हणजे फुल टू अनाहिता गट होईल (अनाहूत कट).

दिपक.कुवेत's picture

7 Dec 2014 - 11:33 am | दिपक.कुवेत

कुठे कुठे भटकत असता ओ?? जरा काहि जागा आम्हि आल्यावर आमच्याबरोबर पण भटकायच्या ठेवा कि!!!

एस's picture

7 Dec 2014 - 2:34 pm | एस

पहिल्या फोटोतील किडे 'सोल्जर बीटल' असावेत बहुतेक. रानफुलांचे नाव विसरलो.

काल रविवारी २८ डिसेंबरला हुकमी एक्का, त्यांचा भाऊ, भटक्या खेडवाला आणि कंजूस (मी) असे रसायनीमार्गे कर्नाळ्याला गेलो होतो त्या ट्रेकचे माझ्या मो॰कैमऱ्यातले काही फोटो:
१)हुकमी एक्का गाडीत

२)भटक्या खेडवाला यांना एक्का त्यांच्या मोबाइलमधल्या गंमती दाखवताना

३)कर्नाळा वाटेवर

४)एक वेल

५)खाजकुइली

६)रानफुले

७)वाटेवर

कंजूस's picture

29 Dec 2014 - 7:31 pm | कंजूस

आणखी फोटो
९)भटक्या खेडवाला

१०)हु एक्काची फोटोग्राफी

११)

१२)रानफळे

१३)रानफुले

१४)पाहुण्यांची वाट पाहणारा कोळी

१५)विश्रांती

१६)राखणदार

हुकुमीएक्का's picture

3 Jan 2015 - 9:55 pm | हुकुमीएक्का

कंजूस (शरद काका) आणि भटक्या खेडवाला (विनायक काका) यांच्यासोबत झालेली ट्रिप मस्तच होती. फक्त अपेक्षेएव्हडे पक्षी पहायला मिळाले नाहीत. परंतू कंजूस काकांना आणि विनायक काकांना भेटायची इच्छा पूर्ण झाली.

कविता१९७८'s picture

29 Dec 2014 - 10:05 am | कविता१९७८

मस्तच, जायला हवं एकदा किल्ला पहायला, तिथे जेवणाखाण्याची काही सोय आहे का?

कविता, हाच तो ट्रेक तुला सांगत होते!मी मिसला :(

कविता१९७८'s picture

29 Dec 2014 - 1:27 pm | कविता१९७८

अजया, मिसला आपण

गोवा रोडकडून कर्नाऴयाचे मेन गेट आहे तिकडे पुढे(१किमी) चांगली हॉटेल्स आहेत उदा हॉटेल कर्नाळा. रसायनीकडून चहापण मिळत नाही परंतू निसर्ग छान आहे.

ताक :आजपासून तीन दिवस कर्नाळा बंद आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Dec 2014 - 11:50 am | अत्रुप्त आत्मा

व्वाह! फ़ुलंहि आवडली,आणि फुलपाखरुही! *HAPPY*

भ ट क्या खे ड वा ला's picture

29 Dec 2014 - 7:19 pm | भ ट क्या खे ड वा ला

कंजूस,(निरमा) तुमच्याकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे.
कालचा दिवस सत्कारणी लागला. धन्यवाद.

सखी's picture

29 Dec 2014 - 8:32 pm | सखी

छान फोटो आणि भटकंती. सूर्याचे प्रतिबिंब आणि दमलेलं फुलपाखरु भारीच.

विवेकपटाईत's picture

29 Dec 2014 - 8:40 pm | विवेकपटाईत

फोटो पाहून फिरण्याचा काही अंशी आनंद मिळाला. आणखीन काय पाहिजे ...

धर्मराजमुटके's picture

29 Dec 2014 - 11:05 pm | धर्मराजमुटके

रसायनीतुन खाली उतरताना एक छोटी नदी लागते. ती नाही लागली का तुम्हाला ? अगदी नैमिष्यारण्य क्षेत्र आहे ते.

ती छोटी नदी म्हणजे पाताळगंगा. रेल्वेने आल्यास उजव्या डोंगराकडच्या काठाने आपण येतो परंतू कर्जत-पेण रस्ता या नदीवरचा पुल ओलांडून रसायनी कडून येतो. काही वर्षाँपूर्वी या 'छोट्या' नदीने गावं आणि रिलाअन्स कंपनी गिळली होती. तळाचा नैमिषारण्याचा रम्य प्रदेश म्हणजे गुळसुंदा, सवणे तलाव,आणि जांभिवली परिसर.

एस's picture

30 Dec 2014 - 12:39 pm | एस

पुनरेकवार जायलाच हवे इथे.