Calligraphy: देवनागरी सुलेखन तक्ता

एस's picture
एस in मिपा कलादालन
5 Dec 2014 - 4:57 pm

डिस्क्लेमर १ - खालील कैच्याकै क्यालिग्राफी उर्फ सुलेखन पाहून कोणाला आम्हांस शिव्या द्यायची इच्छा झाल्यास अवश्य द्या. ;-) आमच्याकडून हे पातक करवून घ्यायची कल्पनेची आयडिया ही मिपाचे माननीय सुपरशेफ गणपाशेट यांची आहे. तेव्हा खालील कित्त्यांकडे पाहून कोणाला जे काही वाटेल ते सर्व मिररवरून परावर्तित होऊन त्यांच्याकडे जाणार आहे. यात त्यांना आमचा पत्ता देणार्‍या माननीय पैसाताईंचापण वाटा आहे.

डिस्क्लेमर २ - आपल्याला द्येव्वनाग्री क्यालिग्राफी काही येत नाही. तेव्हा चुकल्यामाकल्या वळणांकडे दुर्लक्ष केले जावे. खाली दिलेली उदाहरणे ही इंडिकेटिव्ह आहेत. फॉन्ट-फॉन्टमध्ये फरक असू शकतो. माझ्याकडे देवनागरीसाठी वापरला जाणारा बोरू वगैरे नव्हते. नेहमीचा जो डावीकडे कातरलेला बोरू बाजारात मिळतो तो रोमन लिपीच्या कॅलिग्राफीसाठी योग्य असतो. त्याने देवनागरी सुलेखन करता येत नाही. देवनागरीसाठी उजवीकडे कातरलेला बोरू मिळतो, तो घ्यावा. तसेच शाई वापरावी. त्यासाठीही खास गडद शाई मिळते. मी खालील सुलेखन हे घरात बरेच दिवस पडून असलेल्या साध्या A-4 कागदांवर काळ्या जलरंगाने व चार नंबरच्या सपाट (फ्लॅट) ब्रशने केले. त्यामुळे त्या कागदांचा सदुपयोगपण झाला आणि जलरंगांच्या पेटीतील कधीही न वापरला जाणारा एक रंगही संपला! (FYI: जलरंगचित्रणात काळा आणि पांढरा रंग वापरला जात नाही. कागदाचा पांढरेपणा आणि वेगवेगळे रंग एकत्र करून बनवलेले गडद मिश्रण वापरले जाते.) बोरूने जास्त सुबक सुलेखन करता येईल.

आता वेळ नाही. आकृत्यांमध्ये जास्तीत जास्त पायर्‍या दाखवल्या आहेत. काही शंका असल्यास अजिबात विचारू नये. :-D

स्वर - अ अ‍ॅ आ ऑ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः ऋ ॠ ऌ ॡ
यातील अ, इ, उ, ऋ आणि ऌ हे र्‍हस्व स्वर आहेत तर उरलेले दीर्घ स्वर आहेत.

A-1

ब्रशने दिलेल्या स्ट्रोकची जाडी सुमारे आठ ते दहा मिमी इतकी येत असल्याने मी त्याच्या सहापट मिडल झोनची उंची ठेवली. तसेच अडीच-अडीच पट जागा ही टॉप झोन आणि बॉटम झोनसाठी ठेवली. टॉप झोनमध्ये वेलांट्या, मात्रा वगैरे येतात. बॉटम झोनमध्ये 'द' सारख्या अक्षरांचे पाय तसेच उकार वगैरे येतात.

दुसरे असे, की तुम्ही जर साध्या पेनने किंवा बोरूने सुलेखन करणार असाल तर देवनागरी अक्षरांवरील आडवी दांडी ही सर्वात शेवटी दिली जाते. पूर्ण शब्द किंवा अक्षर काढून झाल्यावर. इथे साइनबोर्ड पेंटिंगची पद्धत वापरली आहे. त्यात आधी आडवी रेघ देतात. (ज्ञानामृत स्रोत - लहानपणी पेंटरांचं नीरस शासकीय पाट्या रंगवण्याचं काम तासन् तास न्याहाळणे. आता तो वर्गच दुर्मिळ झाला बिचारा. फ्लेक्सने वाट लावली या धंद्याची!)

A-2

A-3

A-4

A-5

A-6

A-7

A-8

A-9

A-10

A-11

A-12

A-13

A-14

अं आणि अः (अनुस्वार आणि विसर्ग) हे स्वर नसून व्यंजने मानली जातात.

व्यंजने -

कंठव्य - क, ख, ग, घ, ङ

Ka-1

Ka-2

ख च्या दोन पद्धती दाखवल्या आहेत. जी आवडेल ती वापरा. जुन्यासारखी 'रव' ही पद्धत आता वापरात नाही. महाराष्ट्र शासनाने अशा श, ल यांच्या वळणांसारख्या काही गोष्टी हिंदीतून आयात केल्या असे मध्ये कधीतरी वाचले होते. असोत.

Ka-3

Ka-4

Ka-5

तालव्य - च, छ, ज, झ, ञ

Cha-1

Cha-2

Cha-3

Cha-4

Cha-5

मूर्धव्य - ट, ठ, ड, ढ, ण

Tta-1

Tta-2

Tta-3

Tta-4

Tta-5

दंतव्य - त, थ, द, ध, न

Ta-1

Ta-2

Ta-3

Ta-4

Ta-5

ओष्ठव्य - प, फ, ब, भ, म

Pa-1

Pa-2

Pa-3

Pa-4

Pa-5

विशिष्ट व्यंजने - य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ, क्ष, ज्ञ

Ya-1

Ya-2

Ya-3

ल जुने मराठी वळण आणि दांडीवाले हिंदीतून घेतलेले वळण.

Ya-4

Sha-1

श चे पण तसेच. डावीकडचे जुने वळण.

Sha-2

Sha-3

Sha-4

Sha-5

Sha-6

Sha-7

यातील ज्ञ, क्ष, श्र, क्त वगैरे व्यंजने ही जोडाक्षरे असल्याने काही वेळा त्यांचा समावेश वर्णमालेत स्वतंत्र व्यंजन म्हणून केला जात नाही. पण मी बालवाडीत वगैरे जे शिकलेलो आठवतंय त्यानुसार इथे क्रम दिला आहे.

वेलांटीची पद्धत - र्‍हस्व आणि दीर्घ वेलांट्या. यात वेलांट्यांच्या कुठल्या बाजू टेकलेल्या आहेत व कुठपर्यंत त्या खेचायच्या याकडे लक्ष द्या.

Velanti

उकार - र्‍हस्व आणि दीर्घ

Ukaar

रु आणि रू

RuRoo

काही जोडाक्षरे -

र इतर अक्षरांना जोडण्याच्या पद्धती

R-1

R-2

R-3

ह इतर अक्षरांना जोडण्याचा पद्धती

H-1

द्य - हे वळण मी दिले आहे तसे आधुनिक पद्धतीने काढावे. हीच पद्धत द्ध सारख्या इतर जोडाक्षरांनाही वापरावी. त्यामुळे 'मु्द्द्याचे' हा शब्द नीट लिहीता येईल. इथे मिपावर दिसतो तसा नका लिहू.

Dya

आणि हे अंक -

0-9

हुश्श...! बास झालं, आता तुमचं तुम्ही गिरवत बसा! आमची बेडरेस्ट संपली... ;-)

(गणपाशेठ, खुश?)

जाताजाता - शुद्धलेखनाशिवाय सुलेखन म्हणजे रंगलेल्या मैफिलीत गायिकेला लागला ठसका. तेव्हा आधी शुद्धलेखन शिकावे. :-)

प्रतिक्रिया

सुलेखनाचा असा फायदा होत असेल, तर नक्कीच शिकायला पाहिजे.

अनुप कोहळे's picture

8 Dec 2014 - 4:23 pm | अनुप कोहळे

मस्तच. खुप छान. शुद्धलेखनच्या नावाने आमची बोंबाबोंबच असायची. हस्ताक्षरे पण जेमतेमच. हा धागा कन्येला देवनागरी शिकवायला उपयोगी पडेल.

सस्नेह's picture

8 Dec 2014 - 5:31 pm | सस्नेह

सायबी सह्या ठोकून ठोकून अक्षर लैच वळणदार झाल्यामुळे क्यालिग्राफीच्या वाटेला जाण्याचा घास नाही... ! *biggrin*

मस्तानी's picture

8 Dec 2014 - 10:07 pm | मस्तानी

"वाचनखुण साठवा" हा पर्याय अजूनही दिसत नाहिये :( काहीतरी करा हो संपादक मंडळी !
मजा म्हणजे या लेखात दिसत नाहिये आणि दुसऱ्या एका धाग्यात दिसतोय, अस कस ?

अद्द्या's picture

12 Dec 2014 - 4:44 pm | अद्द्या

च्यायला . . सुंदर अक्षर आणि मी . हि दोन विरुद्ध टोके आहोत .

काहीही झालं तरी कोणत्याही भाषेत मी चांगलं अक्षर काढू शकत नाही .

आणि लेखातले दिलेले प्रकार करायला मला बहुदा ३-४ जन्म घ्यावे लागतील :D

असं नाहीये. प्रयत्न केल्यास जमेल. बॅक टू बेसीक जावे लागेल इतकंच.

तसा प्रयत्न सुरु हि केला होता . पाचवीत असताना . . पण मग . .आमच्या हिंदी च्या बाई म्हणाल्या माझ्या आईला . . (ती पण त्याच शाळेत शिकवायला होती ) . एवढं घाण अक्षर काढतो हा. नक्की डॉक्टर होणार . .
त्या चेष्टेत म्हणाल्या . पण मी ते शिरेसली घेतलं . आणि प्रयत्न सोडून दिले :P

खटपट्या's picture

15 Dec 2014 - 11:54 pm | खटपट्या

डॉक्टर झालात का ?

अद्द्या's picture

16 Dec 2014 - 11:03 am | अद्द्या

नाही . . नेटवर्क / सर्वर एडमीन आहे .

खटपट्या's picture

16 Dec 2014 - 11:23 am | खटपट्या

ह्म्म, आमच्याच पंथातले नीघालात !!

अद्द्या's picture

22 Dec 2014 - 5:45 pm | अद्द्या

येस्स . . . आता गेट पास वर सही करण्यापुरतच काय ते "लिहायला " ;लागतं . . बाकी समदं मेल नीच होतं . तरी बरं तिथे फोन्ट असतात तिथे . नाय तर अक्षर वाचून नोकरी जायची .

अनुप कोहळे's picture

16 Dec 2014 - 10:17 am | अनुप कोहळे

ह्या उत्क्रुष्ट धाग्याला वाचनखुण म्हणून साठवता येत नाहि. काय बरे कारण आसावे?

अभ्या..'s picture

25 Dec 2014 - 2:26 pm | अभ्या..

स्वॅप्सबुवा खूप खूप कष्ट घेऊन काढलात हा धागा. अभिनंदन आणि धन्यवाद.
माझ्या शैक्षणिक अभ्यासक्रमातील हा विषय असल्याने चार पैसे टाकावे म्हणतो. आशा आहे तुम्हाला राग येणार नाही. थोडीशी चिरफाड वाटेलही पण तुमच्या चिकाटीला आणि ह्या अक्षर प्रेमाला सलाम असल्याने समजून घेतालच. राहता राह्याला गंपादादाचा विषय. तो काय माझ्यावर चिडणार नाही हे म्हैते.
तर आम्हाला (आम्ही जी डी आर्टस हो, अ‍ॅप्लाईड आर्टस.... कमर्शिअल आर्टवालं. झैरात, झैरात, झैरात) विषय दोन वेगळे असायचे कॅलिग्राफी अन टायपोग्राफी. कॅलिग्राफी म्हणजे सुलेखन नाही, प्रत्येक अक्षर एकाच साचातले ते टायपोग्राफी. कॅलिग्राफी म्हणजे भावलेखन. कॅलिग्राफीत प्रत्येक अक्षराला, शब्दाला पाहुन जे डोळ्यासमोर व्हिज्युअलाइज होते तसे रेखाटणे याला महत्व असते. त्य्या अक्षराचा, शब्दाचा गोडवा जाणवला पाहिजे, त्याचा भाव डोळ्यासमोर उतरला पाहिजे. एक चित्र असे ते व्हिज्युअलाइज झाले पाहिजे. (या ज्ञानाचे श्रेय आपल्या ब्याटम्यानाप्पाच्या मिरज गावाचे निवासी अन आमचे गुरु श्री, बिदनूर सर यांना. ब्याटू कदाचित त्यांना ओळखत पण असेल.)
टायपोग्राफी हा फारच क्लिष्ट अन तांत्रिक विषय. स्वॅप्सबुवानी दिलीय ती टायपोग्राफीची वळणे. म्हणजेच मराठी सुरे़ख किंवा नटराज ह्या फॉन्टची वळणे. अगदी मेजरमेंटनी काढायाची सुध्दा ठरवली तर एक अक्षर काढायला अर्धा तास लागतो. त्याची मापे वळणे, स्पेसिंग, स्टेम्प, सेरिफ ठरलेले असते. असे प्रत्येक फॉन्टचे टाइपफेस असतात. इंग्लिश असेल तर त्यात परत केसेस. बोल्ड, स्माल, इटालिक, एक्स्ट्रा बोल्ड, हेवी, लाईट, मिडीअम अशा. अभ्यासक्रमात आम्हाला जवळपास ३०० तर फॉन्टस अ‍ॅक्चुअली इंजिनिअरिंग ड्रॉईंगची साधने वापरुन प्रत्येक मिलिमिटर मोजून ड्रॉ करावे लागत. सगळ्या केस्सीस सहित. ते शब्दशः पाठ होतात आम्हाला. त्यात परत ऑप्टिकल स्पेसिंग वेगळेच. फोन्ट साइज, पायका, पॉइन्ट अशी मेजर्मेंट असायच्याच. हा तीन वर्षे फुल्ल टाइम आभ्यासाचा विषय आहे. स्पेशालायझेशनसह. सध्याच्या डीटीपीच्या जमान्यात त्याचे महत्व कुणाला कळतही नाही आणि अर्थात तेवढी गरज ही राह्यलेली नाही.
सध्या सुलेखनाचे वर्ग वगैरे असतात. तिथे शिकवतात ती टायपोग्राफीक अक्षरे काढायला. एकसाऱ़ख्या वळणाचे अक्षर असणे ही चांगलीच गोष्ट आहे, ते दिसतेही छान पण ती कॅलिग्राफी नव्हे. क्यालिग्राफी चित्रकलेला जास्त जवळची. (एवढे करुन माझे अक्षर अत्यंत भिकार आहे. पण एखादा श्लोक वा शब्द वेगळ्याच वळणदार पध्दतीने लिहु शकतो.)
ल्याटीन, अरेबिक अथवा संस्कृत ग्रंथातली अक्षरे सर्व एकसमान नसायची. रामदास स्वामींनी सांगितलेली अक्षरांची वळणे टायपोग्राफीला जास्त जवळची. कॅलिग्राफी करुन केलेली टायटल्स, सर्टिफिकेटस ही कॅलि ग्राफीक फॉन्टस वापरुन केलेली टायपोग्राफी असते. एका प्रतिसादात कुणीतरी लिहिलेय की शिवाजी अक्षरात तलवारीचा आकार दिसायचा ती क्यालिग्राफी. पाडगावकरांची पापड पाऊस कविता अशा निथळणार्‍या अक्षरात असायची ती क्यालिग्राफी. अच्युत पालवांची प्रत्येक अक्षर हेच चित्र असा अनुभव देणारी ती क्यालिग्राफी. समजणार्‍या भाषेत म्हणायचे तर सोनी, पेप्सीचा लोगो टायपोग्राफीक, किर्लोस्कर, कोकचा लोगो क्यालिग्राफीक.
फक्त अक्षर सुरेख वळणदार व्हावे असा उद्देश असेल तर चक्र या फोन्ट्ची प्रॅक्टिस असावी. पूर्वी प्लास्टीकचे तक्ते असायचे (बहुतेक कित्ता) त्यात अक्षरे खोदलेली असायची. ती याच फॉन्टमध्ये असायची. हे वळण अक्षराचा मूळ आकार लक्षात आणून देते. क्यालिग्राफिक फॉन्ट फक्त कटनिबने अथवा बोरुने काढलेली छान दिसतात पण अक्षराचे मूळ वळण हरवायचा धोका त्यात जास्त. बाकी वळणाचा कोन, निबची जाडी, माध्यम, आणि हातातील सफाईदारपणा हे नंतरचे, मूळ अक्षराची वळणे त्यात दुर्लक्षित होतात.
तर असो. मी क्यालिग्राफी पेपरवर शाईने, आणि पीसीवर फोटोशॉप आणि कोरल ड्रॉ दोन्हीत करतो. डिव्हाईस म्हणून क्रॉक्युल, बोरु, ब्रश, मार्कर, माऊस आणि लाईट पेन्सीलचा ऊपयोग करतो. बर्याचदा सगळ्यांचा एकत्रित पण वापर करतो. जमल्यास, वेळ मिळाल्यास त्याची उदाहरणे व इमेजेस देईन.
लैच हुशारीचे झाड झाले असेल तर माफी असावी पण स्वॅप्स बुवांनी केली मेहेनत आणि इतर सर्वांचे अक्षरप्रेमामुळे हे लिहिले. धन्यवाद.

प्यारे१'s picture

25 Dec 2014 - 3:06 pm | प्यारे१

मस्त रे अभ्या.
ह्या पोराचं लईच कौतुक वाटतं खरंच.
वय किती लहान आणि काय काय केलंय ह्यानं ते समजत नाही.
२१ की कितीसे डिप्लोमा आहेत काहीतरी त्याच्याकडं.

एक काम कर. वरच्या प्रतिसादाला आणखी थोडा वेळ काढून वाढव आणी आवश्यक तिथं चित्रं काढ. किंवा चिकटव आणि एक लेखच बनव. वाचनखूण साठवायची आहे. करच.

अभ्या..'s picture

25 Dec 2014 - 3:12 pm | अभ्या..

कसचं कसचं... ;)
२१ काही नाहीत पण थोडे फार आहेत.
स्वॅप्सबुवांनी परवानगी दिली अन वेळ मिळाल्यास अवश्य हा धागा सजवुयात. :)

अवश्य भर टाका. खूप चांगली माहिती देताय.

ब़जरबट्टू's picture

7 Jul 2016 - 2:52 pm | ब़जरबट्टू

ते धागा अजून रंगवायचे मनावर घ्या राव.. बोरू म्हणजे काय ? कुणी चित्र दाखवता का चित्र ?

अच्युत पालवांची कलाकारी इथे बघा:

हा पाहिला असेल बर्‍याच जणांनी आधी. या विषयामुळे इथे द्यावासा वाटला.

चतुरंग's picture

7 Jul 2016 - 8:38 pm | चतुरंग

फक्त दोन शंका - 'झ' आणि 'ज्ञ' या दोन्ही अक्षरांच्या दांड्या खालपर्यंत आहेत माझ्या माहितीप्रमाणे...

(स्व. मनोहर त्र्यंबक सप्तर्षी गुरुजींकडून हस्ताक्षराचे धडे गिरवलेला)__/\__रंगा