गाभा:
खरेतर हा कट्टा ऑक्टोबर मध्येच होणार होता.
पण काही कारणांमुळे कट्टा थोडा उशीरा होत आहे.
श्री.पेठ्कर ह्यांच्याकडे वेळ फार कमी असल्या कारणामुळे कट्ट्यासंदर्भात जास्त काही आखू शकलो नाही.तसदी बद्दल क्षमस्व.
आता पुण्यात कट्टा नक्की कुठे करायचा?
किती वाजता करायचा?
खायला-प्यायला काय आणायचे?
इत्यादी साधक-बाधक चर्चा करायला पुणेकर समर्थ आहेतच.
तस्मात धागा काढून आम्ही तुर्त आपली रजा घेतो.
(तरी पण अधून-मधून पिंका टाकायला येवूच.पुणेकरांच्या धाग्यावर पुण्यातल्या लोकांपेक्षा इतर नगरातील लोकांच्या उड्याच जास्त.)
प्रतिक्रिया
8 Dec 2014 - 9:47 am | श्रीरंग_जोशी
धमाल झालेला दिसतोय कट्टा.
वृत्तांत आवडला.
8 Dec 2014 - 10:00 am | प्रमोद देर्देकर
खुप छान कट्टा
पण वृत्तांत /फटु अजुन पाहिजेत.
रचक्याने:- पुणेरी हाटेलात कांदा कापुन मिळत नाही का? (आता "मुंबई पुणे" चित्रपटातील स्वपनील जोशीच्या स्टाईल मध्ये म्हणा "आमच्या पुण्यात हे असंच असतं.)
8 Dec 2014 - 10:30 am | टवाळ कार्टा
कांदा कापायचे वेगळे पैसे लावत असतील...भरोसा नाही कशाचा ;)
8 Dec 2014 - 4:36 pm | सूड
आपण कधी स्वयंपाकघरात किंवा मंडईत गेलात तर तुमचा गोंधळ होऊ नये म्हणून सांगतो; पानात वाढलेली कांद्याची पात आहे, कांदा नव्हे!!
8 Dec 2014 - 4:38 pm | प्रभाकर पेठकर
त्यालाच 'पातीचा कांदा' असेही म्हणतात.
8 Dec 2014 - 4:52 pm | सूड
हो, पण तो कापायलाच पाह्यजे असं नसतं ना!! ;)
8 Dec 2014 - 7:03 pm | दिपक.कुवेत
(पुणेरी).... न कापलेला पातीचा कांदा.
9 Dec 2014 - 8:51 am | नाखु
बुवांना दिलेल्या शुभेच्छांसाठी माझ्याकडून आपल्याला सुजाता मस्तानी (पेय)लागू हे जाहीर करण्यास मंडळाला आनंद होत आहे!!!!
8 Dec 2014 - 10:36 am | प्रमोद देर्देकर
हंंम्म. पुणं आहे बाबा ते शेवटी
8 Dec 2014 - 12:52 pm | बबन ताम्बे
मिपाकरांना भेटून आनंद झाला.
8 Dec 2014 - 7:57 pm | आशु जोग
जाऊ दे
त्यांचा त्यांचाच झालेला दिसतोय कट्टा...
8 Dec 2014 - 9:29 pm | सतिश गावडे
अहो मालक, तुम्ही ज्या धाग्यावर प्रतिसाद दिला आहे तो कट्ट्याचा जाहीर धागा आहे.
तुमच्या घरी येऊन कटट्याचं आमंत्रण द्यायला हवं असं जर तुमचं म्हणणं असेल तर तुमचा पत्ता देऊन ठेवा. पुढच्या कटटयाचं आमंत्रण तुमच्या घरी येऊन देऊ.
9 Dec 2014 - 8:42 am | टवाळ कार्टा
व्हिजीट फी लावतोस का? :P
9 Dec 2014 - 12:27 am | डॉ सुहास म्हात्रे
गल्ली चुकली की वो :)
8 Dec 2014 - 10:20 pm | रेवती
कट्ट्याचा वृत्तांत व फोटू आवडले.
9 Dec 2014 - 9:57 am | मदनबाण
कट्टा झकास झालेला दिसतोय ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?