मी ब्राम्हण नाही, परंतु सध्याचे आरक्षणावरूनचे वातावरण अवतीभवती बघितले कि खालील विचार माझ्या मनात येतात.
सध्याचे आरक्षण (लेटेस्ट आरक्षण सहित) जर मान्य करावे, तर ब्राम्हण समाजाला सुद्धा २% आरक्षण शिक्षण व नोकरीत द्यावे/मिळावे हि माझी प्रामाणिक कळकळ आहे.
जर आरक्षण हे दरिद्र निर्मूलनाचे साधन आहे असे लोजीक लेटेस्ट आरक्षणासाठी देण्यात येते, तर ब्राम्हण समाज सुद्धा गरिबीच्या महागाईच्या झळा सोसतो आहे. आत्ताच्या लेटेस्ट आरक्षणासाठी जी स्पष्टीकरणे समर्थकांकडून दिली जातात, त्यात विक्टीम समजाच्या नावा जागी ब्राम्हण असे वाचल्यास, माझ्यामते त्यांना आरक्षण हे मिळालेच पाहिजे, या मतापर्यंत मी आलो आहे. मी स्वतः म. गांधी, म. फुले, बाबासाहेब आंबेडकर यांना खूप मानतो, या तिघांची दृष्टी हि संपूर्ण समाज/देशाच्या भल्याची होती. आपल्याला खरच जर जातीत विभागलेला तालिबानी वृत्तीचा भविष्यातील भारत बघायचा नसेल तर न्याय करताना दुसर्या कोणावरही अन्याय होऊ न देता, सर्व समाजाला बरोबर घेऊनच चालावे लागेल.
आपण सर्वच भारतीय, रिवर्स-अपर्थेड होऊ नये म्हणून सजग होऊया, ही भारतमाते चरणी प्रार्थना.
प्रतिक्रिया
14 Nov 2014 - 9:29 pm | पगला गजोधर
हो, आणि मी, '१० वा माणूस', या नियमाला अनुसरूनच प्रामाणिकपणे माझे मन मोकळे केले आहे, ऐकदा मी हे विचार, गावजेव्नात मांडून, जेवणा ऐवजी भरपूर शिव्या टीका खाऊन पोट भरून घेतले आहे, त्यामुळे मी शिव्यांना इम्यून झालो आहे, कृपया वैयक्तिक हल्ले करण्या ऐवजी आईडियावर चर्चा करावी.
14 Nov 2014 - 9:50 pm | अत्रुप्त आत्मा
14 Nov 2014 - 9:45 pm | आदूबाळ
या धाग्यासाठी मिपाकर्स २०० प्रतिसाद रिझर्व करून ठेवणार यात बाकी शंका नाही. बाकी चालूद्या...
14 Nov 2014 - 9:50 pm | पालव
आर्थिकदृष्टया मागासलेले आहेत त्यांनाच आरक्षण द्यावे/ द्यायलअ हवे ...आर्थिक निकषावर आरक्षण मिळाले तर कोणत्याच समाजाला असे शक्तिप्रदर्शन करावे लागणार नाही.
14 Nov 2014 - 11:18 pm | रामपुरी
"म. गांधी, म. फुले, बाबासाहेब आंबेडकर यांना खूप मानतो, या तिघांची दृष्टी हि संपूर्ण समाज/देशाच्या भल्याची होती"
आंबेडकरांना 'संपूर्ण' समाज किंवा देशाच्या भल्यापेक्षा समाजातील एका विशिष्ट वर्गाच्या भल्याची चिंता होती.
ब्राह्मणांना पण आरक्षण मिळेलच थोड्या दिवसात. मतांसाठी कायपण.
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याची बातमी नुकतीच आली आहे त्यावरूनच धागा प्रेरीत आहे काय? बाकी धाग्याला पंख लागले नाही तर २००+ कुठे जात नाहीत. पण धागा विकांताला टाकल्याने सांगता येत नाही.
चालू द्या...
15 Nov 2014 - 10:36 am | पिंगू
च्यायला खड्ड्यात गेलं पाहिजे आरक्षण.. बिनलायकीचे उमेदवार त्यामुळे काहीही पात्रता नसताना पात्र उमेदवारांवर मात करुन पुढे जाताना दिसतात आणि पुढे आपल्या अतुल्य ज्ञानाच्या जोरावर अतर्क्य गाढवपणा करताना दिसतात..
- (आरक्षणाच्या नावाने खडे फोडणारा) पिंगू
15 Nov 2014 - 11:45 am | होकाका
१. आरक्षण हे प्रथमपासूनच राजकारणाचाच मुद्दा बनले होते. असं वाचल्याचं स्मरतंय की आंबेडकर आरक्षणाच्या विरोधात होते परंतु त्यांच्या समकालीन मंडळींच्या आग्रही भुमिकेमुळे त्यांनी केवळ पाच (की दहा?) वर्षे आरक्षण ठेवण्यास संमती दिली.
२. आरक्षणाच्या कक्षा आणि वैधतेची मर्यादा (वर्षे) हे कालानुरूप वाढतच राहीले आणि आता त्याचा असा राक्षस बनलाय जो कोणत्याही राजकीय पक्षाच्या नियंत्रणात येणं कठीण आहे.
३. गेल्या काही वर्षांमध्ये, १९९१ नंतर, एक महत्वाचं स्थित्यंतर घडलं -- लिबरलायझेशान. आणि त्यामुळे बर्याच प्रमाणात आरक्षणामुळे भरडल्या जाऊ शकत असलेल्या समाजासाठी सरकारी क्षेत्राबाहेरील नोकरीच्या आणि व्यवसायाच्या संधी निर्माण झाल्या.
४. नजीकच्या काळात लिबरलायझेशनचा जोर वाढतच जाण्याची शक्यता असल्याने, हळूहळू बर्याच मोठ्या समाजाच्या दॄष्टीने आरक्षणाचा मुद्दा असून नसल्यासारखा असेल.
18 Nov 2014 - 6:16 pm | राजाभाउ
आरक्षण हे केवळ नोकरी पुरते मर्यादित नसुन ते शिक्षणात पण आहे त्यामुळे त्याचा सर्वानाच फरक पडणार चांगल्या किंवा वाईट अर्थी
15 Nov 2014 - 3:03 pm | विजुभाऊ
आरक्षण बहुतेक पुढच्या २० वर्षात अदखलपात्र झालेले असेल
आरक्षीत आणि बिनरक्षीत समाज हा एकाच पातळीवर असेल ( हे झालं स्वप्न रंजन......)
16 Nov 2014 - 8:58 pm | पुतळाचैतन्याचा
वीस वर्ष पूर्वी दिला असत तर उपयोग झाला असता...एव्हाना बरेचसे ब्राह्मण हे सुस्थितीत आले आहेत आणि आरक्षणाची वाट न पाहता आपल्या मार्गी लागले आहेत...भारत छोडो चा नारा पूर्वीच दिला असल्याने फारसे आडले नाही आणि अडणार पण नाही...कोणाला हव्यात सरकारी नोकर्या ...आणि पैसे फेकले कि कुठेही प्रवेश मिळून शिक्षणाची सोय होते...ते हि परवडते हल्ली...आणि स्वाभिमान वगेरे ची काडी टाकली कि नको ते आरक्षण असे सगळेच ब्राह्मण म्हणतात