आनंद वि॰ कार्लसन यांचा प्रत्येक डाव नंतर पुन्हा खेळून पाहतोय. इथे खेळाडूची पहिली खेळी झाली की लगेचच सिसिलिअन, फ्रेँच, ग्रंडफिल्ड, इत्यादी सुरवात/ रक्षण पध्दती अशी टिप्पणी येते. कम्प्युटर आणि महालढवैये त्याचे बरोबर-चूक विश्लेषण करून पुढील खेळी कोणती खेळणार हे सुचवतात बहुतेक तीच चाल चालली जाते. बुध्दिबळ हा खेळ आता इतक्या साचेबंद अवस्थेत पोहोचला आहे का?खेळाडू आता वेळेशी जमवून घाईने खेळताना चुकला की डाव घसरून हारतो. खेळातले वैविध्य हरवत चालले आहे असं वाटू लागतं.
राजा -गुलाम आणि वजीराच्या जोडीला रंभा ही मानवी मोहरी वाढवायला हवीत आणि पट १० चौकडीँचा करावा.
गुलाम:याचा एकवेळा बळी देऊन एकदा शह निष्क्रिय करता येईल.
रंभा:शत्रुपक्षाच्या वजीराच्या संपर्कात आल्यास एक खेळी वजीर निष्क्रिय होईल. एक खेळी गमावण्याच्या बदल्यात रंभेला पटावरून काढता येईल.
गुलाम आणि रंभेचे गणित करताना कम्प्युटर बहुतेक चुकेल.
तुमच्या आणखी काय कल्पना आहेत ?
प्रतिक्रिया
13 Nov 2014 - 1:50 am | रामपुरी
बुद्धिबळातल्या शक्य चालींचा हिशोब केला तर असे प्रश्न नाही पडणार. पहिल्या १०-१५ चाली पुस्तकी असतात पण पुढे खेळाडूचे कौशल्यच असते. आणि बुद्धिबळात आणखी मोहरी वाढवायची गरज नाही फक्त राजा आणि वजीराच्या जागांची अदलाबदल केली तरी पुरेसे आहे. कास्पारोवनेच असं कुठेतरी म्हटल्याचे आठवतंय.
13 Nov 2014 - 5:18 am | बहुगुणी
रंभा:शत्रुपक्षाच्या वजीराच्या संपर्कात आल्यास एक खेळी वजीर निष्क्रिय होईल.
रंभेची नेमणूकः मजेशीर कल्पना आहे!
फक्तः इंग्लिश मधल्या बुद्दीबळात मध्ये वजीर नसतो, त्याला क्वीन म्हणतात! :-)
13 Nov 2014 - 12:32 pm | प्रसाद गोडबोले
आणि क्वीन जर रंभा ठेवणार असेल तर ते जरा जास्तच रोमॅन्टीक होईल नै ;)
14 Nov 2014 - 10:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रंभेची नेमणूकः मजेशीर कल्पना आहे !
+१
-दिलीप बिरुटे
13 Nov 2014 - 6:40 am | कंजूस
होय !रणांगणावर सर्वात अधिक चाली चालणाऱ्या मोहरीला क्वीन का म्हणतात हे अगम्य आहे जितके ब्रिटिश मेजरमेँट सिस्टिम{कोणतेही माप ठराविक पटीत नाही.}
13 Nov 2014 - 7:18 am | जेपी
वजीर सगळ्याचा नाकात दम आणु शकत असल्यामुळे क्विन म्हणवला जात असेल.
13 Nov 2014 - 9:55 am | बोका-ए-आझम
पु.लं.नी ' तुझे आहे तुजपाशी ' मध्ये याचा उल्लेख केला आहे - गृहिणी सचिव: हा कालिदासाचा श्लोक संदर्भ म्हणून वापरलाय. राणी ही राजाचा सल्लागार असू शकते.
13 Nov 2014 - 12:32 pm | आदूबाळ
नियमाप्रमाणे दरवेळी वागणारे (deterministic) दोन काय, दोनशे मोहरे आणले तरी संगणक गणित चुकणार नाही. त्यासाठी probabilistic वागणारे मोहरे हवेत. उदा. प्रेक्षकांत काळा चष्मा लावून आलेल्या तीन मुली असतील तर हत्ती सरळ चालीऐवजी अडीच घरं तिरका चालेल.
13 Nov 2014 - 12:38 pm | बॅटमॅन
असे नाही. काँबिनेटोरियल अॅनॅलिसिस करून पाहिले असता पहिल्या १० खेळ्यांचेच नंबर ऑफ ऑप्शन्स जवळपास १८ आकडी येतात. बाकीचं तर सोडाच. त्यामुळे साचेबंद अवस्था इ.इ. खरे नाही.
पण साधारण खेळण्याचा अनुभव असला की कुठल्या केसमध्ये काय करावे याचे ठोकताळे तयार असल्याने ते नंबर ऑफ ऑप्शन्स कमी होतात. तरी अगदी साचेबंदही म्हणवत नाही. लै फ्रीडम असते. तेवढ्यासाठी नियम बदलायची गरज वाटत नाही.
13 Nov 2014 - 12:50 pm | थॉर माणूस
तात्पुरतं हे घ्या चालवून. ;)
13 Nov 2014 - 5:30 pm | चतुरंग
कोणत्याही थिअरीमध्ये अनेक वर्षात जसजशी प्रगती/बदल होत जातात तसेच बुद्धीबळातही होत गेलेत. संगणक यायच्या आधी खेळाडू आणि तज्ज्ञ स्वतःच विचार करुन वेगवेगळ्या लाईन्स शोधून काढत. संगणक आल्यानंतर प्रत्येक चालीच्या पुढची अनेक चालीपर्यंतची कॉम्बिनेशन्स (जवळपास १८ ते २० चालींपर्यंतची) तो तुम्हाला देऊ शकतो. सखोल थिअरीच्या तयारीसाठी हे उपयोगाचे आहेच. परंतु याचा भाग फक्त २५ टक्के आहे.
उरलेले ७५ टक्के हे खेळाडूचे कौशल्यच असते. एकतर अनेक प्रकारचे खेळले गेलेल डाव लक्षात ठेवावे लागतात. कोणत्या लाईन्स्वरती काय डेवलपमेंट झाली आहे ते लक्षात ठेवावे लागते. अक्षरशः हजारो डाव त्यांच्या लक्षात असतात! पुस्तकातल्या चाली पहिल्या १५ च्या आसपास असतात पुढल्या एका चालीत बदल होताक्षणीच पूर्णपणे स्तिती बदलते. पटावरतीच विश्लेषण सुरु होते आणि डाव रंगत जातो.
डावाच्या कोणत्या स्थितीत कोणती मोहोरी कशी वापरावीत, प्याद्यांचा वापर, राजाचा वापर, घोड्याचा आणि उंटाचा वापर हा पटावरच्या खेळीगणिक बदलत असतो. हत्तीसारखे मोहोरे हे उभे आडवे जाऊ शकत असल्याने त्याने हल्ला मागून करावा की पुढून असे अनेक आडाखे असतात.
याशिवाय प्रतिस्पर्ध्याचे टेंपरामेंट काय आहे, बॉडी लँग्वेज काय आहे, हावभाव कसे आहेत, त्याच्या खेळींमधून बचावात्मकता दिसते आहे की आक्रमकता, तो कोणत्या परिस्थितीत साधारणपणे कसा खेळतो याचा सखोल अभ्यास आवश्यक असतोच असतो.
तेव्हा बुद्धीबळ हा साचेबंद अजिबात नाही. अन्यथा दर डावाला लक्षावधी प्रेक्षकांनी तितक्याच आतुरतेने हजेरी लावली नसती.
एक समांतर उदाहरण द्यायचे तर क्रिकेटचे देईन फलंदाजाचे किती फटके आहेत पुस्तकात फारतर २५ प्रकारचे फटके असतील ते संपले की खेळ साचेबंद होतो का? सचिनने प्रत्येक वेळी कवर ड्राईव किंवा स्ट्रेट ड्राईव मारला की आपण तितक्याच आनंदाने उड्या मारतो! तसेच आहे प्रत्येक डाव नवा, प्रत्येक चाल आगळी, प्रत्येक हारजीत वेगळी!!
13 Nov 2014 - 5:37 pm | थॉर माणूस
*ok* *ok* *ok* *ok* *ok*
*good* *good* *good* *good* *good*
13 Nov 2014 - 5:47 pm | अविनाश पांढरकर
+११११
13 Nov 2014 - 7:12 pm | कंजूस
इकडे पट टाकला होता आणि त्यातली पुढची खेळी काय करेल ,मिमांसा त्यानंतर बऱ्याच वेळी तीच खेळी होते आहे हे वाचून माझा असा समज होऊ लागला. धन्यवाद, चतुरंग.
13 Nov 2014 - 7:19 pm | प्रसाद गोडबोले
आणि अगदीच हवे असल्यास बुध्दीबळाचे असे मॉडीफाईड प्रकार आधीच अस्तित्वात आहेत हे पहा
http://en.wikipedia.org/wiki/Chess_variant
पण आधी सिंपल चेस झेपत नाही आपल्या डोक्याला अजुन कुठे अवघड करता ?
बाकी
ह्या प्रकारातील http://en.wikipedia.org/wiki/Bughouse_chess हा एक आमचा अत्यंत आवडता प्रकार आहे :)
14 Nov 2014 - 10:00 am | पगला गजोधर
शेल्डन कुपर जर मराठी असता व त्याने हा लेख वाचला असता, तर त्याला लेखकाबद्दल बंधुप्रेमाचा उमाळा नक्कीच आला असता.
14 Nov 2014 - 10:32 am | टवाळ कार्टा
+१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११