या नालायकांना अटकाव कसा करायचा

गणा मास्तर's picture
गणा मास्तर in काथ्याकूट
7 Aug 2008 - 8:25 am
गाभा: 

रायगडाला जेव्हा लाज येते...
महराष्ट्र टाइम्स मधली ही बातमी वाचुन डोके तापले. ह्या नालायकांना अटकाव कसा करायचा?
दोन वर्षांपुर्वी मला राजगड्लाही हाच अनिभव आला होता.

प्रतिक्रिया

सर्किट's picture

7 Aug 2008 - 8:28 am | सर्किट (not verified)

आज नवीन झाली !

काही वर्षांपूर्वी सिंहगडावर एका बिड्य फुंकणार्‍याच्या कानशिलात भडकावले होते, ह्याची आठवण झाली.

तुम्ही कराल हे एकदा तरी ?

कृपया, कराच.

उगाच नुसते महाराज आणि विनोदबुद्धीविषयी बडबड करण्यात काय अर्थ आहे ?

- सर्किट

संदीप चित्रे's picture

8 Aug 2008 - 12:07 am | संदीप चित्रे

>> काही वर्षांपूर्वी सिंहगडावर एका बिड्य फुंकणार्‍याच्या कानशिलात भडकावले होते, ह्याची आठवण झाली.

सर्किटराव ... राग मानू नका पण शिवाजी महाराज, तानाजी आणि मावळ्यांबद्दल पूर्ण आदर ठेवून विचारतोय -- महाराजांच्या काळी सिंहगडावर मावळ्यांपैकी कोणी विडी ओढली नसेलच ह्याची काय गॅरंटी ?
--------------------------
www.atakmatak.blogspot.com

प्रियाली's picture

8 Aug 2008 - 12:09 am | प्रियाली

महाराजांच्या काळी सिंहगडावर मावळ्यांपैकी कोणी विडी ओढली नसेलच ह्याची काय गॅरंटी ?

मला प्रश्न जाम आवडला. =))

बिड्या फुंकणार्‍यांच्या कानशिलात का वाजवायचात हो तुम्ही सर्केश्वर? बिड्यांनी वातावरण प्रदूषित होतं म्हणून की किल्ल्यावर कुठेतरी आग लागून नुकसान होईल म्हणून? कारण बिडी फुंकून लोक काहीतरी विचित्र चाळे करत असतील असं वाटत नाही. म्हणजे ग्यारंटी नाही पण तरीही... ;)

सर्किट's picture

8 Aug 2008 - 12:31 am | सर्किट (not verified)

चित्रे साहेब,

मावळ्यांनी गडांवर आणखी बर्‍याच गोष्टी केल्या असतील. (मावळ्यांची वाढती संख्या त्याची साक्ष पटवते.)

म्हणून तुम्ही आम्ही गडांवर जाऊन ते करावे का ?

ह्यावरून एक विनोद आठवला.

ग्यास स्टेशनावर सिगरेट फुंकणार्‍याला हटकले तेव्हा तो म्हणतो "मग तुम्ही ग्यास स्टेशनावर सिगरेटी विकता कशाला ?"

त्यावर उत्तरः "ह्या ग्यास स्टेशनात आम्ही काँडोम पण विकतो."

असो,

- सर्किट

लंबूटांग's picture

8 Aug 2008 - 1:49 am | लंबूटांग

=))

पण विनोदाचा भाग सोडला तर काँडोम मुळे पेट्रोल पंपावर स्फोट नाही होत. सिगारेट मुळे होऊ शकतो.

टारझन's picture

8 Aug 2008 - 1:50 am | टारझन

जबराट .... =))

-- ( टारझन ऊर्फ खवीस )

धमाल मुलगा's picture

7 Aug 2008 - 9:59 am | धमाल मुलगा

फक्त हिंम्मत आणि पक्का विचार हवा.

आम्ही सिंहगडावर कोजागिरीच्या रात्री पुर्ण रात्र हातात काठ्या घेऊन फिरत असायचो, दिसला कोणी असे चाळे करताना की नडगी फोडायची.

ठिकठिकाणी चोचीत चोच घालुन बसलेली कबुतरं हा देखील अशा ठिकाणचा के मोठा प्रश्न आहे. अरे, फिरायला येता, नीट फिरा ना! नसते उद्योग कशाला करता? असे सापडले की त्या पोराच्या कानफटात आम्ही आणि आमच्या बरोबर असलेल्या मुली त्या पोरीच्या कानफटात ठेऊन द्यायचो, आणि सरळ पोलिसांच्या ताब्यात द्यायचो. मग पोलीस व्यवस्थित त्यांच्या घरी फोनाफोनी करुन बोलावून घेतात आणि....

ही असली गड किल्ल्यांवर राडे करणारी बांडगुळं झोडून काढली तरी पोलीस आपल्याला त्रास देत नाहीत, उलट आपल्या बाजुनेच राहतात असा वैयक्तिक अनुभव आहे. मात्र, तिथेल्या पोलीस ठाण्याशी आधी संपर्क साधून थोडंसं बोलुन घ्यावं लागतं इतकंच.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Aug 2008 - 10:01 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

उत्तम!

मेघना भुस्कुटे's picture

8 Aug 2008 - 10:41 am | मेघना भुस्कुटे

खालचा प्रतिसाद वाचल्यानंतर असं वाटतं आहे, तू हे उपरोधानं म्हणते आहेस. तसंच आहे का? तसं असेल तर, उपरोध स्पष्टपणे मांडत जा, उगाच गैरसमज नकोत. आधीच इथे समोरासमोर बोलायचे मार्ग नसताना गैरसमजांना वाव पुष्कळ असतो.

एक's picture

7 Aug 2008 - 11:01 pm | एक

चाळ्यांची व्याख्या दे म्हणजे मला नी ट वाद घालता येईल. ;)

बाकी दारू पिऊन धिंगाणा घालणार्र्‍यांवर लाठी चालवायची असेल तर मला पण बोलाव. हाताला खूप खाज सुटते आहे.. ;)

(जर त्यांच्या प्रणयात काही अश्लिल नसेल तर) "चोचीत चोच घालुन बसलेली कबुतरांचा " काय अपराध? छान थंड हवा आहे, थोडं धुकं आहे आणि थोडा थोडा पाऊस आहे अश्यावेळी असा काही अपराध करून बघितला आहेस का? अरे मजा असते अश्या चोरटेपणात सुद्धा.
घरामधे आणि रोजच्या धकाधकी च्या जिवनात असे प्रसंग येतात का?

टारझन's picture

8 Aug 2008 - 1:59 am | टारझन

एकाशी सहमत आहे राव धम्या ... जरा व्याख्या स्पष्ट कर .. चोच सोडुन अजुन खालच्या पातळी चे वर्तन ठिक नाहीच ..पण ते ईतर लोकांना शो नको म्हणूनच तिकडे जातात ना ? एकांतासाठी कुठे जावे रे बाबा ? अजुन कोणी लव्ह झोन नाही ना काढलेले. परत तु त्यांचे कान लाल करुन पुन्हा पोलिसी इंगा दाखवतोस .. खटकले रे ..

बाकी पिऊन घाण+धिंगाणा+त्रास देणारांना (कुठे ही असो .. किल्ले किंवा माळशेज घाट) मनसोक्त चोप देण्याची मजा काही औरच !!!

-- ( टारझन ऊर्फ खवीस )

चिन्या१९८५'s picture

7 Aug 2008 - 7:36 pm | चिन्या१९८५

फटके देणे अथवा पोलिस कारवाई हे दोनच उपाय आहेत असे मला वाटते

अराजक नसलेल्या राज्यांत ही जबाबदारी सामान्य नागरिकांकडून काढून घेतली जाते आणि सरकारच्या हातात दिली जाते. अराजक असलेल्या राज्यांत ही कामगिरी प्रत्येक नागरिक मारामारी करून उचलू शकतो.

सर्किट यांनी पूर्वी सिंहगडावर बिडी फुंकणार्‍याच्या श्रीमुखात भडकावली होती. क्यालिफोर्नियात मात्र बहुधा अयोग्य ठिकाणी सांगितल्यावरही दुर्लक्ष करून बिड्या फुंकणार्‍याबद्दल ते "योग्य अधिकार्‍या"कडे तक्रार करतील, असे वाटते. कानशिलावर ठेवली तर मारामारीचा गुन्हा त्यांचा मानला जाईल.

(सध्या कोजागिरीच्या रात्री सिंहगडावर चोचीत चोच घालून बसणे गुन्हा आहे की केवळ निर्लज्जपणा? आमच्या लहानपणी जीन्स-प्यांट घालणार्‍या मुलींना कित्येक घरंदाज लोक "निर्लज्ज" समजायचे, पण बहुधा गुन्हा नव्हता. तरी अशा कुठल्या "निर्लज्ज" मुलीचा आमच्या आजोबा-चुलतआजोबा-मामेआजोबांनी चारचौघांत पाणउतारा केल्याची कथा कुटुंबात सांगत नाहीत. त्या निर्लज्ज मुलींना अद्दल घडवायला हवी होता का?)

तरी बहुतेक ठिकाणी "चाळे करणार्‍यांना" शिक्षा करायचा मक्ता साधारणपणे गल्लीतल्या दादाकडे असतो. शिकागो येथील एमेट टिलची कथा वाचण्यासारखी आहे. मिसिसिपी राज्यात वेब गावी हा आजोळी आला होता. तेव्हा त्याने एका मुलीकडे बघून शीळ घातली, आणि अर्वाच्य शब्द वापरले. तेथीलच रॉय ब्रायन्ट आणि टी.जे. मिलम या स्वाभिमानी, परखड नागरिकांनी एमेट याला अद्दल घडवायचे ठरवले. त्यास मारहाण करून गोळ्या घातल्या. एमेट टिलचे प्रेत सापडले तेव्हा शवपेटीत बंद घालून शिकागोला धाडले - पेटी उघडणार नाही या बोलीवर. पण एमेट टिलच्या आईने आकांत करून पेटी उघडण्यास भाग पाडले. त्याच्या चेहर्‍याचा इतका चेंदामेंदा झाला होता की नाक-डोळे-तोंड असे काहीच दिसत नव्हते. (विकिपेडिया पानावर फोटो आहे.) गंमत म्हणजे या घटनेनंतरही सर्व निर्लज्ज पोरांनी काही धडा घेतलेला नाही. अजूनही शिकागोमध्ये, तसेच मिसिसिपीमध्ये काही तरुण मुले शीळ वाजवून मुलींना त्रास देतात. गल्लीगल्लीत रॉय ब्रायन्ट आणि टी.जे मिलम हवेत का? (माझ्या कॉलेजमधील १०-२०% तरी मुलांच्या अशा शवपेट्या निघाल्या असत्या.) की कायदा सांगतो ती अतिसौम्य शिक्षा पोलिसांकरवी करवून घ्यावी?

संदीप चित्रे's picture

8 Aug 2008 - 12:33 am | संदीप चित्रे

धनंजय आणि प्रियाली ...
चला माझ्यासारखा विचार करणारेही भेटले :)
तुम्हाला अनुमोदन !
------
प्रियाली ...
आपल्याकडे 'दंड होणं' आणि 'दंडाची खरी रक्कम पूर्ण भरणं' ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेतच :)

प्रियाली's picture

8 Aug 2008 - 12:44 am | प्रियाली

आपल्याकडे 'दंड होणं' आणि 'दंडाची खरी रक्कम पूर्ण भरणं' ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेतच

आणि ती 'दंडाची रक्कम योग्य जागी जमा होणे' याचीही गणती करावी. ;)

तुमच्या दुसर्‍या प्रतिसादाला अनुमोदन.

मारामारी करून प्रश्न सुटत नसतात. एखादा तुमच्यापेक्षा भारी भेटला तर तुम्ही त्याला एक कानफटात माराल आणि तो तुम्हाला लाथा-बुक्क्यांनी बुकलेल. :)

प्रियाली's picture

8 Aug 2008 - 12:24 am | प्रियाली

देशाची मालमत्ता समजल्या जाणार्‍या सार्वजनिक ठीकाणी दारूबंदी आणावी आणि ती न पाळणार्‍यांवर जबरदस्त दंड करावा.

काही दिवसांपूर्वी आमच्या एका मैत्रिणीने स्टॉप साईन पाहूनही गाडी पूर्णपणे थांबवली नाही म्हणून $२०० चा दंड भरला होता. असा भरभक्कम दंड लावा. सगळ्या वीरांची घोडदौड थांबवता येईल.

संदीप चित्रे's picture

8 Aug 2008 - 12:35 am | संदीप चित्रे

>> असे सापडले की त्या पोराच्या कानफटात आम्ही आणि आमच्या बरोबर असलेल्या मुली त्या पोरीच्या कानफटात ठेऊन द्यायचो, आणि सरळ पोलिसांच्या ताब्यात द्यायचो (इति -- धमु)
>> फटके देणे अथवा पोलिस कारवाई हे दोनच उपाय आहेत असे मला वाटते (इति -- चिन्या१९८५)

गैरसमज नसावा तुम्हाला असं नाही वाटत का आपण स्वनियुक्त संस्कृतीरक्षक बनून त्या नावाखाली सरळ मारहाण करतोय ?
जर जोडपं सज्ञान असेल तर त्यांना मारायचा अधिकार तुम्हाला कोण देतं ? पोलिसांना कळवणं मी समजू शकतो पण तुम्ही कुठल्या हक्काने मारू शकता ?
इंग्रजीत एक म्हण आहे -- 'तुमचा हात फिरण्याचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी संपतं ज्या ठिकाणी माझं नाक सुरू होतं !'

हे म्हणजे असं झालं की सिगारेट ओढणार्‍यामुळे, समोरच्याला पॅसिव्ह स्मोकिंगचा, त्रास होतो म्हणून त्याने सिगारेट ओढणार्‍याला मारायचं ? का रे बाबा ? सिगारेट ओढण्याचा तुला त्रास होतो तर तिथे थांबू नको किंवा सिगारेट ओढणार्‍याला दुसरीकडे जायची विनंती कर !

जर एखादं जोडपं चाळे करतंय असं वाटलं तर पोलिसांना कळवून घरी निरोप पाठवा. मारण्याचा अधिकार कसा मिळतो ?

अशी मारहाण तुम्ही अमेरिकेसारख्या देशात केली तर कोर्ट कचेर्‍या होऊन वर खिशाला किती चुना लागू शकतो ह्याची काही कल्पना केलीय का?

मला असाच पडणारा दुसरा प्रश्न म्हणजे आपल्याकडे एखादा ऍक्सिडंट झाल्यावर लोक कुठल्या हक्काने (मोठ्या गाडीच्या) ड्रायव्हरला मारतात ?

-- (सिगारेट, दारू इ. कुठलेही व्यसन नसलेला आणि सिंहगडच काय पण कुठल्याच सार्वजनिक ठिकाणी चाळे न केलेला)संदीप

चिन्या१९८५'s picture

8 Aug 2008 - 6:08 am | चिन्या१९८५

स्वनियुक्त संस्कृतीरक्षक बनून त्या नावाखाली सरळ मारहाण करतोय ?

who cares????तुम्ही तस म्हणु शकता.तुम्ही आम्हाला गुंडही म्हणु शकता.कुठपर्यंत चालायच आणि कुठे थांबायच हे आम्हाला कळत.मग तुम्ही आमच्या चालण्यावर हसलात्,ओरडलात्,शिव्याशाप दिलेत तरि आम्हाला घेणेदेणे नाही.काही काही गोष्टी सज्ञान माणसाला कळायला हव्यात. ते म्हणतात ना 'शहाण्याला शब्दाचा मार'. पण ज्याला शब्दाचा मार कळत नाही त्याला खरा मार द्यावा लागतो आणि ती भाषा जगातल्या प्रत्येकाला समजते.
अशी काही स्थळे आहेत ज्याच्याशी लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत. त्यांचा आदर करायलाच हवा.तुम्ही म्हणाल आम्हाला स्वातंत्र्य आहे. पण तुमच स्वातंत्र्यही absolute terms मधे नसत मिस्टर्.तुम्हालाही मर्यादा टाकलेल्या आहेत्.कायदे आहेत जे अशा मर्यादा टाकतात. या मर्यादा तुम्हाला पाळाव्याच लागतात..... समाजासाठी.तुम्हाला उपचार नाकारायच स्वातंत्र्य आहे पण जर तुमच्या रोगाने दुसर्‍यांना संसर्ग होणार असेल तर तुमच्यावर बळजबरीने उपचार केले जातात्.मग कुठे जात तुमच स्वातंत्र्य??

जर जोडपं सज्ञान असेल तर त्यांना मारायचा अधिकार तुम्हाला कोण देतं ?
आम्ही तुम्हाला मारल्यावर तुम्हीही स्वतंत्र आहात आमच्याविरुध्द पोलिसांकडे जायला.

'तुमचा हात फिरण्याचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी संपतं ज्या ठिकाणी माझं नाक सुरू होतं !'

तुमच असंस्कृत वागण त्या ठिकाणी संपत ज्या ठिकाणी आमच आदराच स्थळ सुरु होत.

समोरच्याला पॅसिव्ह स्मोकिंगचा, त्रास होतो म्हणून त्याने सिगारेट ओढणार्‍याला मारायचं ?
तो सिगारेट कुठे ओढतोय ते महत्वाच.

अशी मारहाण तुम्ही अमेरिकेसारख्या देशात केली तर कोर्ट कचेर्‍या होऊन वर खिशाला किती चुना लागू शकतो ह्याची काही कल्पना केलीय का?

कशाला कल्पना करायची आहे???चंद्रावर चालताना उड्या मारुन चालाव लागत म्हणुन काय आम्ही आमच्या घरात्,रस्त्यांवर उड्या मारायच्या का??मीही परदेशात रहातो. अमेरिकेत नियम आहेत ना ते अमेरिकेत ठेवा.भारतात भारताचे नियम चालतील्.मी अमेरिकेत गेल्यावर भारताचे नियम पाळणार नाही.गाडी डाव्या बाजुनी चालवणार नाही,उजव्या बाजुनी चालवील्.आणि अमेरिकेत हत्यार बाळगायला परवानगी अमेंडमेंट ऍक्ट अनुसार आहे ती का आहे हे तुम्हाला माहीत असेलच्.अमेरिकेच्या संस्थापकांच मत होत की जर सरकार कायदे वगैरे करुन तुमच्यावर अन्याय करत असेल ,ते सरकार अथवा ती व्यवस्था अन्यायकारक असुनही ती तुम्हाला कायदेशीररीत्या व बहुमत असुनही उलटता येत नसेल कारण कायदे तुम्हाला रोखत असतील तर तुम्ही बंदुका हाती घेउन ती व्यवस्था उलटा.आता या अंतर्गत 'जर्-तर' मधे कायदा हाती घेण बरोबर आहेच ना??तुम्हाला सर्व ठीकाणी दारु प्यायला,रोमान्स करायला परवानगी आहेच ना???मग अशा आदराच्या ठिकाणी तरी सुसंस्कृतपणे वागा की.

मला असाच पडणारा दुसरा प्रश्न म्हणजे आपल्याकडे एखादा ऍक्सिडंट झाल्यावर लोक कुठल्या हक्काने (मोठ्या गाडीच्या) ड्रायव्हरला मारतात ?

माणुस असल्याच्या हक्काने मारतात्.तुमची चुक दुसर्‍याच्या मृत्युचे कारण बनु शकते.जो मरतो त्याच्याबरोबर पण अन्यायच आहे ना???कायदा मोडला तुम्ही आणि शिक्षा होतेय त्याला.अर्थात कधीकधी जिवंत ड्रायव्हरची चुक नसते.पण त्याच्या गाडीला धक्का लागुन कोणी मरण पावला तर त्याचे दुर्दैव्.तेव्हढी रिस्क तर असतेच्.मी विमानात जेंव्हा पाउल ठेवतो तेंव्हा ते विमान पडुन माझा मृत्यु होउ शकतो याची जाणीव मला असणे आवश्यक आहे.

गडावर जाऊन (किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी) आचरटपणा करणं अमान्यच! प्रेमाची भावना व्यक्त करणं आणि अश्लीलपणा यात फरक आहे ... तो समजत नसेल तर गडांवर सभ्य आणि सड्याफटींग सारखं रहाणंच बरं! पण तरीही असं वाटतं ...

अशी काही स्थळे आहेत ज्याच्याशी लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत. त्यांचा आदर करायलाच हवा.तुम्ही म्हणाल आम्हाला स्वातंत्र्य आहे.
मग प्रेमिकांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी विशिष्ट जागा आहेत का? त्या उपलब्ध करून न देता कायदा हातात घेऊन फक्त मारहाण करून काय मिळणार आहे?
आणि आदराचंच म्हणाल तर खजुराहोच्या मंदिरांमधे कुणी प्रेमिकांनी आपल्या भावना संयतपणे व्यक्त केल्या तर तो अनादर होईल का (कमी प्रमाणात) अनुकरण?

या मर्यादा तुम्हाला पाळाव्याच लागतात..... समाजासाठी.तुम्हाला उपचार नाकारायच स्वातंत्र्य आहे पण जर तुमच्या रोगाने दुसर्‍यांना संसर्ग होणार असेल तर तुमच्यावर बळजबरीने उपचार केले जातात्.मग कुठे जात तुमच स्वातंत्र्य??
एका जोडप्याने आपल्या भावना व्यक्त केल्या म्हणून दुसय्रा जोडप्यानेही तसंच करावं असं काही नाही. आणि प्रेम करणं आणि/किंवा ते व्यक्त करणं हा रोग नाही ना ते अश्लील आहे.
आणि रोगाचंच म्हणाल तर, कुष्ठरोग्यांवर बळजबरीने उपचार होतात का त्यांना वस्तीबाहेर काढलं जातं या देशात?

आम्ही तुम्हाला मारल्यावर तुम्हीही स्वतंत्र आहात आमच्याविरुध्द पोलिसांकडे जायला.
गुद्द्यांचीच भाषा करायची असेल तर मुद्दे का मांडावे?

अमेरिकेत नियम आहेत ना ते अमेरिकेत ठेवा.भारतात भारताचे नियम चालतील्.
म्हणून अमेरीकेतलं चांगलंही फक्त तिथेच ठेवून परत आलं की रस्त्यावर पिंका उडवत, पोरीबाळींकडे पाहून अश्लील हावभाव करत, शिट्या मारत, बस/रेल्वे मधे तिकीट न काढत, ट्रॅफिकचे नियम मोडत (इत्यादि) करत फिरायचं का?
आणि मग आम्ही मुली असल्या मुलांना बदडू शकत नाही म्हणून ते आम्ही सहन करायचं का? तेव्हा कुठे जाते संस्कृती?

मग अशा आदराच्या ठिकाणी तरी सुसंस्कृतपणे वागा की.
परस्परांवर प्रेम करणाय्रा जोडप्याने, दुसरी शांत जागा नाही म्हणून अशा ठिकाणी येऊन परस्परांचं चुंबन घेतलं तर काय असंस्कृतपणा होतो?
आणि अशा लोकांना मारलं की संस्कृती जपली जाते का? अशा मारण्यामुळे त्यांचं वागणं बदलणार आहे का विचार?

माणुस असल्याच्या हक्काने मारतात्.तुमची चुक दुसर्‍याच्या मृत्युचे कारण बनु शकते
प्रत्येक वेळा चूक मोठ्या वहानाच्या चालकाचीच असते का? आणि एका वाहनाच्या चालकानी दुसय्राचा जीव घेतला, तर त्याला बदडून तुम्ही काय हो वेगळं केलंत?

गड-किल्ल्यांवर मी पण गेले आहे, तिथे आचरट लोकांचा त्रास होतो, प्रेमी युगुलांचा नाही; असले आचरट लोकं की कधीकधी आम्हा मुलींना लघुशंका करणंही शक्य नसतं. तेव्हा त्यांना कोणी कधी काही केल्याचं दिसत नाही. मग जे लोक आपल्यातच मश्गुल आहेत, बाहेरच्या जगाला त्रास देत नाही आहेत त्यांना का शिक्षा? माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की ट्रेकर्सच्या ज्या गटात मुली असतात त्या गटामधली मुलंही सभ्य असतात (किंवा तसं वागतात तरी)! इतर लोकांना त्यांचा उपद्रव नसतो.

भिन्नलिंगी (कधी कधी समलिंगी पण, पण तो मुद्दा अवांतर आहे) व्यक्तीबद्दल आकर्षण, प्रेम ही भावना एका विशिष्ट वयानंतर माणसांमधे नैसर्गिकपणे निर्माण होते. आपल्या समाजात एवढा मोकळेपणाच नाही की ही भावना तरुणांना व्यक्त करता येईल. एवढंच नाही तर अनेकांना यात काहीतरी चुकीचं, अनैसर्गिक, अश्लील वाटतं. पण भावना या भावना आहेत. त्या जर मोकळ्या नाही झाल्या तर आतल्या आत प्रेशर कुकरप्रमाणे त्या दबाव आणतात. आणि मग माणूस विकृत, विघातकही बनू शकतो. सगळेच हिंस्त्र बनतील असं नाही, पण एक प्रकारचा गंड निर्माण होतो. आपण या सगळ्याला कारणीभूत ठरायचं का समाजात मोकळेपणा वाढत जाऊन विकृती कमी होईल याचा विचार करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

जर आपण कोणाला मदत करू शकत नाही तर किमान त्रास तरी देऊ नये.

संदीप चित्रे's picture

8 Aug 2008 - 6:55 pm | संदीप चित्रे

>> तिथे आचरट लोकांचा त्रास होतो, प्रेमी युगुलांचा नाही;

काल माझ्या बायकोशी ह्या विषयावर बोलत होतो आणि तिने एक्झॅक्टली हेच मत व्यक्त केले होते :)
--------------------------
www.atakmatak.blogspot.com

चिन्या१९८५'s picture

8 Aug 2008 - 7:56 pm | चिन्या१९८५

मग प्रेमिकांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी विशिष्ट जागा आहेत का?
अशा विशिष्ठ जागा जरुर उपलब्ध करुन द्याव्यात्.त्याला मी विरोध केलेला नाहीये.शिवाय विविध बागांमधे प्रेमी युगुलांना अशा जागा उपलब्ध आहेतच.

खजुराहोच्या मंदिरांमधे कुणी प्रेमिकांनी आपल्या भावना संयतपणे व्यक्त केल्या तर तो अनादर होईल का
तो मुद्दा वेगळा आहे.आणि आम्ही फक्य प्रेमी युगुलांबद्दलच नाही तर दारु पार्ट्यांबद्दलही बोलतोय्.गडावर जाउन दारु पार्ट्या करण्याला विरोध आहे.आणि प्रेमी युगुलही त्यांचे प्रेम इतर ठिकाणी करु शकतात्.आता सिंहगडच्या खाली कितीतरी जागा आहे,झाडीपण आहे.

प्रेम करणं आणि/किंवा ते व्यक्त करणं हा रोग नाही ना ते अश्लील आहे.
मग तुम्ही मंदिरातही ते व्यक्त कराल का???तुम्हाला तसे करायची इच्छा आहे का??आणि प्रेमाबद्दल कोण बोलतय???मुद्दा आहे विविध किल्ल्यांवर ज्या दारु पार्ट्या चालतात आणि काहीकाही प्रेमी युगुल तिकडे फक्त हातात हात घालुन चालत नाहीत्.माझ्या एका मित्राने एका रात्री एका युगुलाचे विविध आवाज ऐकले होते.त्याने शोधायचा प्रयत्न केला पण अंधारात कोणि सापडल नाही.शिवाय हा मित्र आणि त्याच्याबरोबरचे १-२ जण अगदीच मवाळ होते.मग हेही प्रेम व्यक्त करण आहे असे तुम्ही म्हणाळ्.मग तेहि चालु द्यायच का??

म्हणून अमेरीकेतलं चांगलंही फक्त तिथेच ठेवून परत आलं की रस्त्यावर पिंका उडवत, पोरीबाळींकडे पाहून अश्लील हावभाव करत
अमेरीकेतल चांगलच आणता का तुम्ही???जाउ तिथे दारु पिण्,पार्ट्या करण हे ही आणताच ना???स्वातंत्र्य ,अभिव्यक्तीच्या नावाखाली??

मग आम्ही मुली असल्या मुलांना बदडू शकत नाही म्हणून ते आम्ही सहन करायचं का? तेव्हा कुठे जाते संस्कृती?
आम्ही जस काही त्या टारगट पोरांना संरक्षणच बहाल करतोय!!!आम्ही त्याचाही विरोधच करु.

परस्परांवर प्रेम करणाय्रा जोडप्याने, दुसरी शांत जागा नाही म्हणून अशा ठिकाणी येऊन परस्परांचं चुंबन घेतलं तर काय असंस्कृतपणा होतो?
शांत जागा नाही म्हणुन गडावर शारीरीक संबंध ठेवुन प्रेमाची भावना व्यक्त केली तर्???त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल??

एका वाहनाच्या चालकानी दुसय्राचा जीव घेतला, तर त्याला बदडून तुम्ही काय हो वेगळं केलंत?
बर्‍याचदा वाहनचालक दारु पिउन दारु चालवतात आणि अशानी अपघात होतात्.आणि जर एखाद्या चालकाची चुक नसेल तर त्याला मी मारायला जाणार नाही.मला काय हौस नाही कुणाला मारायची.मी आधीच लिहिलय की किती चालायच आणि कुठे थांबायच हे मला कळत.

तिथे आचरट लोकांचा त्रास होतो, प्रेमी युगुलांचा नाही;
जेंव्हा अशा धाडी टाकल्या जातात तेंव्हा अशा आचरटांनाही चोप मिळतो.

ट्रेकर्सच्या ज्या गटात मुली असतात त्या गटामधली मुलंही सभ्य असतात (किंवा तसं वागतात तरी)!
पण आम्ही मुला-मुलींनी एकत्र ट्रेकला जायला कुठे विरोध केलाय???

तर अनेकांना यात काहीतरी चुकीचं, अनैसर्गिक, अश्लील वाटतं. पण भावना या भावना आहेत.
आम्ही कुठे तुमच्या भावनांना रोखलय्??आम्ही फक्त स्थळाबद्दल आग्रही आहोत.

टारझन's picture

8 Aug 2008 - 10:10 pm | टारझन

वाईट नको वाटून घेऊस पण तुझ नाव चिन्या१७५८ हवं ..कमीत कमी तुझ्या विचारांवरून तरी तसं वाटतं...
आता वैयक्तीक घेऊ नकोस. ज्यांच मत तुझ्या सारख आहे, त्यांना खाली 'तु' म्हणून संबोधतो.
सगळ्यात पहिल्यांदा, दारू विषयी. दारू पिऊन धिंगाणा घालणारा जो पर्यंत मला किंवा कोणालाही (माझ्या समोर) त्रास देत नाही तो पर्यंत मला त्याचा काहीही फरक पडत नाही आणि कोणालाही पडू नये. ज्या क्षणी त्रास झाला, तर आधी कमीत कमी समज द्यावी आणि समजला नाहीच तर फोडणे ऊत्तम. जे मी ही करतो. तु "दिसला पिणारा की हाण त्याला" अशा विचारांचा दिसतो. मला हे मुघल काळात मोगलाई नावाचा प्रकार होता तसे वाटले.

पॉईंट २ : प्रेमी युगूल मुद्दा , तु कधीही हे वाक्य म्हणाला नाहीयेस की त्यांच वागणं लिमीट पर्यंत सहन करावं. आणि मला नाही वाटत की ते कोणाच्या प्रेझेंस मधे असं काही करतील. (कुत्रे आणि माणसांत फरक आहे.) कुत्र्यांना जरूर दगड मार.ते त्यांचे तिकडे गटूर-गु करो नाही तर अन्य काही, त्यांनी ते तु समोर आहे असं समजून केलेलं नाही. तु खौट शेंगदाणा तोंडात यावा तसा त्यांच्या पुढ्यात पडतोस. त्याला ते काही करू शकत नाही. कोणालाही संबध नसताना मारण्याचा सोडच पण बोलण्याचा पण तुला हक्क नाही. ऊगाच अंगात गुर्मी असल्याची (आणि "त्या"च्या सारख का करु शकत नाही याचं फ्रस्ट्रेशन) याचा भाग यात मोठा वाटतो. शिवसेनेने आर्चिस च्या दुकाना वर हल्ला केल्याचं गुर्मी मग्रुरी आणि _डमस्ती हे ऊत्तम ऊदाहरण आहे.
बाकी अशी मग्रुरी करणार्‍यांना आम्ही दुप्पट तिप्पट मार देऊन त्यांना अपवर्तन केलेल्या जोडप्यांची माफी लावायला भाग पाडण्याचं कर्तव्य मात्र मी(आणि गँग) ने चोख पणे केलंय. हा अन्याय आहे. आणि जसे दारू पिऊन धिंगाणा घालणे तुझ्या भाषेत पात्र आहेत, तसेच आपली गँग आहे म्हणून जस्ट समाज सुधारकाच्या नावाखाली दादागिरी करणे मार खाण्यास पात्र आहेत असे मला वाटते.

कृ. पर्सनली घेऊ नये. हे सर्व समविचारी लोकांसाठी आहे.

-- ( टारझन ऊर्फ खवीस )

चिन्या१९८५'s picture

9 Aug 2008 - 1:41 pm | चिन्या१९८५

ज्यांच मत तुझ्या सारख आहे, त्यांना खाली 'तु' म्हणून संबोधतो.
नाही कळल मला.

तु "दिसला पिणारा की हाण त्याला" अशा विचारांचा दिसतो.
तुम्ही माझ्या पोस्ट नीट वाचा.मी दारु पिण्याला अथवा प्रेम करण्याला विरोध केलेला नाहीये. मी फक्त स्थळाबद्दल आग्रही आहे.मुलगा आणि मुलीने आपापसात काय करायच्,संबंध कुठपर्यंत न्यायचे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.मी तिथे लुडबुड करत नाही.मी फक्त स्थळाबद्दल आग्रही आहे. बागेत्,जंगलात जाउन करा काय ते.बारमधे जाउन दारु प्या हवी तितकी. गड हे स्थळ यासाठी योग्य नाही असे माझे मत आहे. तुमचे काय मत आहे???शिवरायांचे गड दारुच्या पार्ट्या,युगुलांचे स्पॉट्स बनावेत का???

ऊगाच अंगात गुर्मी असल्याची (आणि "त्या"च्या सारख का करु शकत नाही याचं फ्रस्ट्रेशन) याचा भाग यात मोठा वाटतो.
तस समजा हव तर्.मी कुठली गोष्ट का करतो हे मला माहीत आहे.शिवाजी महाराजांचे गड दारुचे अड्डे होउ नयेत असे वाटल्याने मी ते करतो.मला कोणीही भाई,दादा वगैरे म्हणत नाही आणि म्हणावी अशी इच्छाही नाही.त्यामुळे फ्रस्टरेशनचा प्रश्नच नाही. प्रश्न हा आहे की मी उगाच रँडमली कुणालाही मारत नाही आणि मारणार्‍याच समर्थनही करत नाही.जोडप्यानी काय करायच हे मी जोडप्याला सांगत नाही.त्यानी ते कुठल्या ठिकाणी करु नये हे सांगतो.प्रत्येक गोष्ट करण्याला एक विशिष्ठ जागा असते.गड ही जागा नक्कीच त्यासाठी नाही.

बाकी अशी मग्रुरी करणार्‍यांना आम्ही दुप्पट तिप्पट मार देऊन त्यांना अपवर्तन केलेल्या जोडप्यांची माफी लावायला भाग पाडण्याचं कर्तव्य मात्र मी(आणि गँग) ने चोख पणे केलंय.
नाही कळल तुम्हाला काय म्हणायच आहे ते.मला अस वाटतय की कुणीतरी जोडप्याला काहीतरी केल्यावर तुम्ही त्याची पिटाई केली. म्हणजे तुम्ही आमचाच मार्गाचा अवलंब केला ना???तुम्हाला वाटल जोडप्याला बोलण चुकीच आहे म्हणुन तुम्ही त्याला मारल. आम्हाला वाटल की गडावर दारु पिण चुकीच आहे म्हणुन आम्ही दारु पिणार्‍याला मारल. दोन्ही मधे काय फरक आहे???

टारझन's picture

9 Aug 2008 - 8:19 pm | टारझन

नाही कळल मला.
याचा अर्थ मी तुला वैयक्तिक बोललो नाही. सेम विचारसरणींच्या लोकांना मी "तू" (म्हणजे तू नव्हे) संबोधलं.

टिप : दारूड्यांचा मुद्दा सोड , मला काहीही म्हणनं नाही, गड असो वा नसो धिंगाणा घालणारे दारुडे फटकवलेच पाहिजेत.

गडांवरच्या रोमांसला तुझा असलेला विरोध नाही पटला. गडांवर महाराजांनी देखील याला बंदी नाकारली नाही, सर्किट म्हणतात त्याप्रमाणे मावळ्यांची वाढलेली संख्या त्याचा पुरावा आहे. अरे आम्ही कुणाला गडावर जाऊन पोरं पैदा करा याचं समर्थन नाही करत.पण चोचीत चोच घालून आपल्या विश्वात रमलेल्यांच काही चुक नाही.जिथे एकांत मिळतो तिथेच पब्लिक जाणार,असे वर्तन सार्वजनिक जागेत (बस,नाना नानी पार्क ,ई) मलाही मान्य नाही. लव्ह झोन असते तर कोणाला गडावर जायची हौस असेल ?
बाकी शिवाजींचा अभिमान आम्हालाही आहे, दर शिवजयंतीला शिवज्योत घेऊन आम्हीही पळालेलो आहोत.गडांच पावित्र्य आम्हालाही मान्य आहे.पण हा तुझा प्रॉब्लेम नाही. भारताचा राष्ट्रध्वजाचा मानही नुसत्या केक वर तिरंगा होता म्हणून दंगे करणारे महाभाग आपल्या ईथे आहेत.

प्रत्येक गोष्ट करण्याला एक विशिष्ठ जागा असते.गड ही जागा नक्कीच त्यासाठी नाही.
विशिष्ट जागा दे आणि मग बोल रे बाबा.

आम्हाला वाटल की गडावर दारु पिण चुकीच आहे म्हणुन आम्ही दारु पिणार्‍याला मारल. दोन्ही मधे काय फरक आहे???

आहे ! फरक आहे . आम्ही उगाच आरेरावी करणार्‍यांना मारलं आहे. ते गडांच्या पावित्र्यभंगा पेक्षा खालंच्या दर्जाचं वाटलं !!!

लक्षात घे वैयक्तिक काही नाही. सगळ्यांनाच अपवर्तन पाहून राग येतो. मुद्दा ऍटीट्युड आहे. विचार कर बाबा !!

-- ( टारझन ऊर्फ खवीस )

चिन्या१९८५'s picture

10 Aug 2008 - 12:24 am | चिन्या१९८५

गड असो वा नसो धिंगाणा घालणारे दारुडे फटकवलेच पाहिजेत.
दारुडेच महत्वाचे आहेत्.साधारणतः जोडप्यांना सांगितल की हद्दीत रहा की ते ऐकतात.

जिथे एकांत मिळतो तिथेच पब्लिक जाणार,असे वर्तन सार्वजनिक जागेत (बस,नाना नानी पार्क ,ई) मलाही मान्य नाही. लव्ह झोन असते तर कोणाला गडावर जायची हौस असेल ?
अहो,पण आता सिंहगडावर जाण्याआधी किती वाट आहे,जंगल आहे.तिथे त्यांना एकांत मिळतो,खडकवासल्याजवळाही एकांत मिळतो.तिथे रोमान्स करा. बर्‍याच पालकांना गडावर रोमान्स करणारे पाहीले की आपल्या लहान मुलांना तिथे पाठवावस वाटत नाही.त्याचे काय्???गडावर संस्कारक्षम वयात जाणे जास्त चांगले. गडावर मुलांचा हक्क नाही का???

पण हा तुझा प्रॉब्लेम नाही.
मी लिहिलय की मलाही काय मारामारी करायची हौस नाही.पण गड हे दारुच्या अड्ड्याचे हॉट स्पॉट्स बनावेत याबद्दल मला एक शिवभक्त म्हणुन लाज वाटते.आणि तुम्ही म्हणता की दारुडे कुठेही फटकावले पाहीजेत्.मग मीही म्हणतो की हा तुमचा प्रॉब्लेम नाही म्हणुन.

विशिष्ट जागा दे आणि मग बोल रे बाबा.
जागा देणारा मी कोण्??जर माझ्याकडे इतकी ताकत असती तर मी नियम करुन गडावर होणारे हे असले प्रकार थांबवले असते. लव्हर्स झोन अथवा लव्हर्स पार्क्स जरुर बनवावेत्.माझा त्याला विरोध नव्हता आणि नाही.

आम्ही उगाच आरेरावी करणार्‍यांना मारलं आहे. ते गडांच्या पावित्र्यभंगा पेक्षा खालंच्या दर्जाचं वाटलं !!!
हे करताना तुम्हीही अरेरावी करता आहात हे विसरु नका. आणि हा तुमचा प्रॉब्लेम नाही

गैर गोष्ट घडल्यावर संयमाने त्यावर उपाय काढणे हाच दूरगामी योग्य पर्याय आहे. मारामार्‍यांनी कदाचित गोष्टी तात्पुरत्या 'सुधारतील' पण अनिष्ट पायंडा मात्र जास्त नुकसानकारक ठरेल. चूक होऊ शकते हे मान्य करणे आणि त्याला योग्य असे शासन योग्य व्यवस्थेकडून घडणे हाच लोकशाही मार्ग आहे.

चतुरंग

मी आधीच कबुल करतो की कोणत्याही ऐतिहासीक किंवा सार्वजनिक स्थानी कसलिही गैरवर्तन [ मग ते दारुबाजी असो, रेव्हपार्ट्या असो वा चोचीच चोची घालुन बसणे असो ] ह्याला माझा सक्त विरोध आहे. अशा स्थळांचे पावित्र्य हे टिकवलेच पाहिजे ह्याबाबत दुमत असायचे कारण नाही.

पण जेव्हा हे पावित्र्य "सक्तीने" म्हणजे कुणाच्या कानफाडीत मारुन , नडग्या फोडुन किंवा धाक दाखवुन किंवा अन्य कायदेशीर वा बेकायदेशीर पणाने टिअकवायचा प्रयत्न होतो तेव्हा मला कणभर चीड येते, कणभर कीव येते आणि कणभर खंत वाटते. चीड अशासाठी की ह्या गाढवांना [ पावित्र्यभंग करणार्‍या ] आपली लायकी काय व आपण कुठे येऊन करतो काय याचे मुळीच भान नसते. कीव अशासाठी येते की जे "पावित्र्यरक्षणाचा प्रयत्न" करतात त्यांनाच नीट पावित्र्य काय हे समजलेले नाही म्हणुन ते हाणामारीचा असा आतातायी मार्ग अवलंबतात आणि खंत अशासाठी वाटते की जरी "पावित्र्यरक्षकांनी " त्यांना योग्य भाषेत समजावले असले तरी त्या "पावित्र्यभंगकाला" त्या स्थळाचे पावित्र्य ह्याबद्दल काडीइतका जिव्हाळा निर्माण झाला नसतो मग आत्मियता तर सोडाच, ती आपली बिचारी दुसरीकडे जाउन"चोचीत चोच" घालायला रिकामी.

मग प्रश्न असा येतो की ह्यातुन मिळाले काय ? पावित्र्यरक्षण म्हणजे क्षणिक कुनाच्या कानफाटीत मारणे की त्याला व्यवस्थीतपणे , समंजसपणे समजावुन त्या स्थळाचे महत्व पटवुन देणे व त्याच्या मनात त्याविषयी आदरभाव निर्माण करणे ? ह्या प्रश्नचे जोपर्यंत मिळत नाही तोवर ह्या मोहिमांना अर्थ नाही.

मुळात पावित्र्य म्हणजे काय ह्याबद्दलच लोकांमध्ये अज्ञान आहे [ हेच संस्कॄतीबद्दल, पण तो विषय इथे नाही . असो] .
पावित्र्य ही काय "नाजुक कचकड्यांची बाहुली" आहे का की कुणा लुंग्यासुंग्याच्या गैरवर्तनामुळे ती भंग व्हायला ?
का ते काचेचे भांडे आहे की फुटले आणि लगेच पावित्र्य भंग झाले ?
जेव्हा हजारो व्यक्ती आपल्या रक्ताचे पाणी करुन, कष्टाने व आपल्या कर्तुत्वाने व शौर्याने अशा "ऐतिहासीक इमारती" उभारतात तेव्हा ते आपसुकच लोकांचे श्रद्धास्थान बनते. ह्यासाठी झालेल्या बलिदानाची मोजदोज नाही. मग त्याच्या पावित्र्याची किंमत कोन ठरवणार व ते भम्ग कसे झाले ह्याचे मोजमाप कसे होणार ?
तेव्हा मला सांगा की अशा परिस्थीती एक काय अशा "पावित्र्यभंगकांच्या १०० पिढ्या" जरी आल्या तरी त्या "पवित्र वास्तुच्या पावित्र्याची" एक वीट तरी हालेल का हो ?
एवढ्या कमजोर पायावर का ते उभे राहिले आहे की कुणी तेथे येऊन काही आगळीक केली की झाले पावित्र्यभंग ?
अजुन एक म्हणजे "सक्तीच्या पावित्र्यरक्षकांकडुन " तरी "खरे पावित्र्यरक्षण " होते काय हो ?

अहो, ते स्थळ तुम्ही असे विकसीत का करत नाही की "कुणाही देशी अथवा परदेशी येथे आला की इथला इतिहास व वैभव पाहुन त्याची मान आपोआप आदराने झुकली पाहिजे" , अशा परिस्थीतीत मग पावित्र्यभंग ही संकल्पनाच नाहीशी होईल ....
माझ्या मते ह्या स्थळांचा योग्य विकास न झाल्याने अशा गोष्टी घडतात. तेव्हा त्याला "योग्य व समर्पक विकास" हेच उत्तर आहे, कुणाच्या "कानफाटीत देणे" हे मुळीच नव्हे.
आपण भारतातल्या कुठल्याही प्रसिद्ध मंदिरे अथवा बाहेरील देशातल्या अशा ऐतिहासीक स्थळांपासुन काही शिकलो तरीही उत्तम, तिकडे अशा "पावित्र्यरक्षकांच्या फौजांची" आज गरज वाटत नाही, जनमानसात ती भावना आपोआप येते.

मला वाटते मी माझे म्हणणे योग्य आणि सुस्पष्ट शब्दात मांडले आहे.

डिसक्लेमर : माझी सध्याच्या "पावित्र्यरक्षकांबद्दल" काहीही तक्रार नाही फक्त त्यांचा मार्ग चुकीचा आहे हेच माझे मत आहे. सध्याच्या परिस्थीत त्यांच्या कामाचे कौतुक करायला हरकत नाही पण ते योग्य आहे असे माझे मुळीच मत नाही.

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

चिन्या१९८५'s picture

8 Aug 2008 - 6:33 am | चिन्या१९८५

त्याला व्यवस्थीतपणे , समंजसपणे समजावुन त्या स्थळाचे महत्व पटवुन देणे व त्याच्या मनात त्याविषयी आदरभाव निर्माण करणे ?
ते ही केल जातच.पण काहीकाहींच्या डोक्यात शिरत नाही.मुळात आपण शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर जातोय ,त्याचे महत्व काय हे समजायला हवेच सुज्ञ माणसाला.

तेव्हा मला सांगा की अशा परिस्थीती एक काय अशा "पावित्र्यभंगकांच्या १०० पिढ्या" जरी आल्या तरी त्या "पवित्र वास्तुच्या पावित्र्याची" एक वीट तरी हालेल का हो ?
प्रश्न तो नाहीये.ज्या शिवाजी राजांनी आमच्या पुर्वजांवर अपार उपकार केलेत्,ज्यांच्यामुळे आम्ही आज 'दाढीवाले खान' नाही त्यांनी बांधलेल्या पवित्र स्थानाचे पावित्र्यही आम्ही राखु शकत नाही याची आम्हाला लाज वाटते.

माझ्या मते ह्या स्थळांचा योग्य विकास न झाल्याने अशा गोष्टी घडतात.
बेसलेस विधान आहे हे. मी गरीब असेल आणि झोपडीत राहत असेल तर मी माझ्या झोपडीतच निसर्गर्विधी करावा का???ज्या वेळेला माझे घर विकसित होईल त्यावेळेला मी आपोआपच टॉयलेटमधे जाईल म्हणने बरोबर आहे का??

आपण भारतातल्या कुठल्याही प्रसिद्ध मंदिरे अथवा बाहेरील देशातल्या अशा ऐतिहासीक स्थळांपासुन काही शिकलो तरीही उत्तम, तिकडे अशा "पावित्र्यरक्षकांच्या फौजांची" आज गरज वाटत नाही, जनमानसात ती भावना आपोआप येते.
हे नतद्रष्ट लोक तिथेही जाउन असे चाळे करतीलही.फक्त त्यांना याची भिती असते की आपण असे करायला गेलो तर आपल्याला चोप मिळेल. गडावर मात्र कोण असतो दररोज्??तिथे चाळे करण सेफ आहे.म्हणुन हे तिथे चाळे करतात्.त्यांना त्या स्थळाच पावित्र्य समजावुनही उपयोग नाही.

पण ते योग्य आहे असे माझे मुळीच मत नाही.
योग्य-अयोग्यचा प्रश्नच नाहीये.आम्हीही म्हणत नाही की आम्ही पुर्णपणे योग्य आहोत.वर एक उपाय आलाय की या लोकांना भरमसाठ दंड करा.उपाय अगदी बरोबर आहे.दंड होईल या भितीने ते तसे वागणार नाहीत. शेवटी येउन जाउन गोष्ट भितीवरच अडकते.आम्हीही तेच करतो.त्यांना फटके पडतील या भितीनेही ते चाळे करण्यास दुसरी जागा शोधतील्.पण जोपर्यंत असा दंड व्हायला सुरुवात होत नाही,त्याची अंमलबजावणी व्हायला सुरुवात होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या पध्दतीने याला आळा घालणारच.

पण काहीकाहींच्या डोक्यात शिरत नाही.मुळात आपण शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर जातोय ,त्याचे महत्व काय हे समजायला हवेच सुज्ञ माणसाला.

तुझे काही अंशी बरोबर आहे.
माणसाला समजत नाही आपण कुठे काय करतोय ते, पण ते समजावयाची जबाबदारी आपलीच की ...
सरकार कुठे कुठे आणि काय काय बघणार ?
पण त्यासाठी लगेच "लाठ्याकाठ्या आणि हॉकी स्टीकचा" वापर कशाला ? एकट्यादुकट्याला [ मी निर्दोष म्हणत नाही हे लक्षात घ्यावे ] पकडुन मारण्यात कसले आले शौर्य आणि पावित्र्यरक्षण ? खाली महाराजांच्या नावावर जे काही घडते ते पाहुन वर महाराजांच्या आत्म्याला किती वेदना होत असतील ह्याचा कुणी विचार करतो का ?
कितीही नाकारले तरी कमीत कमी मला तरी ह्यात थोडा का होईना "वैयक्तीक आणि राजकीय स्वार्थ" दिसतो बाबा ...
पण मी "इमानदारीने हे कार्य" करणार्‍यांच्या भावनांचा व कष्टांचा अपमान करत नाही हे लक्षात घ्यावे, त्यांच्याबद्दल आदर आहेच की. त्यांची भावना मुळीच चुक नाही पण मार्ग नक्कीच चुकीचा आहे.

ज्यांच्यामुळे आम्ही आज 'दाढीवाले खान' नाही त्यांनी बांधलेल्या पवित्र स्थानाचे पावित्र्यही आम्ही राखु शकत नाही याची आम्हाला लाज वाटते.

यु सेट इट ...
ही भावना प्रत्येकाच्याच मनात आहे ह्याबद्दल दुमत नाहीच ...
पण पावित्र्य राखायचा हा आतातायी मार्ग कशासाठी ?
शोधले तर हजारो मार्ग सापडतीलच की, मग फक्त हाच का निवडता ...
समाजातल्या प्रत्येक वर्गाला ह्याविषयी काही ना काही आत्मियता वाटतेच ना, मग त्यांना सामीक करुन घेऊन का एखादा "समंजस व योग्य मार्ग" निघत नाही, हा लाठ्याकाठ्यांचा वापर कशासाठी ?
"अशा स्थानांचे पावित्र्य अशा आतातायी मार्गाने टिकवण्याचा प्रयत्न होतो ह्याची आम्हाला मनापासुन लाज वाटते"

मी गरीब असेल आणि झोपडीत राहत असेल तर मी माझ्या झोपडीतच निसर्गर्विधी करावा का???ज्या वेळेला माझे घर विकसित होईल त्यावेळेला मी आपोआपच टॉयलेटमधे जाईल म्हणने बरोबर आहे का??

हेच पुर्ण बेसलेस विधान आहे ...
ह्याचा काय संबंध आपल्या विषयाशी ?
आपली "सोय आणि पावित्र्य ह्या संकल्पनांशी" गल्लत होत आहे.

हे नतद्रष्ट लोक तिथेही जाउन असे चाळे करतीलही.फक्त त्यांना याची भिती असते की आपण असे करायला गेलो तर आपल्याला चोप मिळेल.

मी असहमत आहे ह्याच्याशी ...
त्या ठिकाणी अशी भानवाच निर्माण होत नाही, ह्याचा अर्थ असा नाही की "गडांवर ह्या भावनेला खतपाणी मिळते", कॄपया असा गैरसमज करुन घेऊ नये ...
तुम्हीच सांगा हो, समजा तुम्ही व कुनीही "तिरुपतीला, शिर्डीला, पंढरपुरला" आलात तर असे वागाल का ?
त्यावर जनमानसाच्या रिऍक्शनचा प्रश्न नंतर येतो, मुलात कोणी असे करणारच नाही कारण अशी भानवा ह्या ठिकाणी निर्माण होने शक्य नाही ...
मी तर नाही वाचले / पाहिले बॉ की कुणी "तिरुपतीला, शिर्डीला, पंढरपुरला" मंदिरात दारु पिऊन धिंगाणा केला, चोचीच चोच घालुन बसले वा इतर काही , हे कशाचे प्रतिक ?
बाकी सोडा हो, लोक अशा पवित्र ठिकाणी "पारोशा अंगाने" जायला मनापासुन बिचकतात ...
ह्यात कुठली सक्ती किंवा लठ्याकाठ्यांचा दबाव नसावा कदाचित ...

अजुन एक आपन दंडाची भाषा करता, कशासाठी दंड हो ?
केलेल्या सो कॉल्ड पावित्र्यभंगासाठी ? त्यापेक्षा तशी भावना निर्माण होणार नाही अशी व्यवस्था का होऊ शकत नाही ?
जोरजबरदस्तीत काही अर्थ नाही व शौर्यही नाही ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

चिन्या१९८५'s picture

8 Aug 2008 - 8:22 pm | चिन्या१९८५

माणसाला समजत नाही आपण कुठे काय करतोय ते, पण ते समजावयाची जबाबदारी आपलीच की ...
अहो ती काय लहान मुल असतात का न समजायला???त्यांना समजावल तर समजावणार्‍यावरच हसतात्.भरपुर लोक असतील तर म्हणतात 'ठीक आहे .दारु नाही पिणार्'.मग आपण दुसरीकडे गेल्यावर दारु पितातच .किंवा कोणी अपमान करतात आणि वर म्हणतात तुम्ही कोण सांगणारे.सगळ्या गोष्टी इतक्या सरळ नसतात. आम्हालाही काही कामधंदे नाहीत अस नाही.आम्हालाही काही मारामार्‍या करायची हौस नाही.आजच हे थांबवल नाही तर हे दारु पार्ट्या,रेव्ह पार्ट्यांचे हॉट स्पॉट्स होतील्.मग काही करायला गेलो तर लोक म्हणतील आम्ही वर्षानुवर्ष हेच करतोय्.इतके वर्ष कुठे होता.

खाली महाराजांच्या नावावर जे काही घडते ते पाहुन वर महाराजांच्या आत्म्याला किती वेदना होत असतील ह्याचा कुणी विचार करतो का ?
उद्या दारु पार्ट्यांचे हॉट स्पॉट्स झाले तर किती वेदना होतील महाराजांच्या आत्म्याला. आम्ही त्या वेदना होउ नये म्हणुन कार्यरत आहोत्.आणि महाराजांच्या नावावर इतर चुकिच्या गोष्टी होतात म्हणुन गप्पच बसायच का??? ज्या वेदना होण टाळता येईल तेव्हढ आम्ही करतो.आमच्यानी जितक होईल तितक आम्ही करतो.

कितीही नाकारले तरी कमीत कमी मला तरी ह्यात थोडा का होईना "वैयक्तीक आणि राजकीय स्वार्थ" दिसतो बाबा
तस म्हणा हव तर्.कृतीला महत्व आहे.उद्या तुम्हाला कोणी विचारल की या गडांवर होणार्‍या चुकीच्या गोष्टी टाळण्यास तुम्ही काय केल तर तुमच्याकडे काय उत्तर असेल्??आम्ही ऍट्लीस्ट इतक तरी म्हणु शकतो की आम्ही काहीतरी केल्.तुम्ही काय बोलणार???'दुसरे करत आहेत त्यांचे आम्ही पाय ओढले' हेच ना???

शोधले तर हजारो मार्ग सापडतीलच की, मग फक्त हाच का निवडता ...
मग काढा ने हे हजार मार्ग्!!!!कोणी रोखलय तुम्हाला???आम्हाला जो मार्ग सोपा आणि प्रॅक्टिकल वाटला तो आम्ही वापरला. पण आम्ही कृतीशील आहोत.

"अशा स्थानांचे पावित्र्य अशा आतातायी मार्गाने टिकवण्याचा प्रयत्न होतो ह्याची आम्हाला मनापासुन लाज वाटते"
दारु पार्ट्या करणार्‍यांपेक्षा त्या पार्ट्या करण्यापासुन रोखणार्‍यांची तुम्हाला लाज वाटते तर 'वी डोंट केअर'!!!करा ना तुम्ही काहीतरी!!!आम्ही करतोय तर पाय कशाला ओढता??

आपली "सोय आणि पावित्र्य ह्या संकल्पनांशी" गल्लत होत आहे.
आपला मुद्दा विकासाचा होता. मी मांडलेला मुद्दा बरोबर आहे. विकास होईपर्यंत काहीही चालु द्यायच का तिथे???

समजा तुम्ही व कुनीही "तिरुपतीला, शिर्डीला, पंढरपुरला" आलात तर असे वागाल का ?
अहो या देशात देवतांना नग्न करणारे लोक आहेत त्या लोकांना या मंदिरांच पावित्र्य काय कळणार???वरील मंदिरांमधे असे चाळे करायला गेलात तर तुम्हाला चोप मिळेल या भितीने लोक हे करत नाहीत्.सगळेच काही भाविक नसतात.पारोशा अंगाने जायला भाविक बिचकतो.ज्याला त्या स्थानाबद्दल्,देवतेबद्दल काहीही आदर नाही,विश्वास नाही तो तिथेही हे चाळे करेल.

अजुन एक म्हणजे "सक्तीच्या पावित्र्यरक्षकांकडुन " तरी "खरे पावित्र्यरक्षण " होते काय हो ?

अहो, ते स्थळ तुम्ही असे विकसीत का करत नाही की "कुणाही देशी अथवा परदेशी येथे आला की इथला इतिहास व वैभव पाहुन त्याची मान आपोआप आदराने झुकली पाहिजे" , अशा परिस्थीतीत मग पावित्र्यभंग ही संकल्पनाच नाहीशी होईल ....


छो.डॉ. ची प्ततिक्रीया अगदी बोलकी आहे.
त्याच्या मतांशी १००% सहमत.

खरंच जोपर्यत अशा लोकांच्या मनाला जाणीव होत नाही की आपण कोठे आहोत, काय करत आहोत आणि ते चुकीचे आहे तो पर्यत मारहाणी करून काहीही साध्य होणार नाही.

मेघना भुस्कुटे's picture

8 Aug 2008 - 10:20 am | मेघना भुस्कुटे

मीपण डॉनशी शंभर टक्के सहमत.

आनंदयात्री's picture

8 Aug 2008 - 10:28 am | आनंदयात्री

डॉनशी सहमत.

आपल्या राष्ट्रीय संपत्तीचे आपणच रक्षण अन आदर नाही केला तर दुसरे काय करणार.............

संदीप चित्रे's picture

8 Aug 2008 - 2:19 am | संदीप चित्रे

>> अहो, ते स्थळ तुम्ही असे विकसीत का करत नाही की "कुणाही देशी अथवा परदेशी येथे आला की इथला इतिहास व वैभव पाहुन त्याची मान आपोआप आदराने झुकली पाहिजे" ,
------
पटतंय एकदम :)

एक's picture

8 Aug 2008 - 4:53 am | एक

चक्क माझ्या विचाराची बरीच लोकं भेटली.

धम्याचा "कबुतरांवर" लाठीहल्ला किंवा मारहाण करणं मला पटलं नव्हतं.

आम्ही जे काही करतो आहोत ते परस्पर सांमजस्याने असेल आणि अश्लील नसेल तर हे कोण आम्हाला मारणार?

चिन्या१९८५'s picture

8 Aug 2008 - 6:35 am | चिन्या१९८५

आम्ही जे काही करतो आहोत ते परस्पर सांमजस्याने असेल आणि अश्लील नसेल तर हे कोण आम्हाला मारणार?

परस्पर सामंजस्याने तुम्ही काहीही करा हो आम्हाला त्याच्याशी काही घेणदेण नाही. फक्त स्थळाचे भान ठेवा एव्हढच आमच म्हणन आहे.

एक's picture

8 Aug 2008 - 10:14 am | एक

आमच्या वेळा अश्या सो कॉल्ड संस्कृतीरक्षक गँग नव्हत्या..

स्थळाच भान ठेवणं आणि अश्लीलतेच्या व्याख्या आजकाल या गँग्ज स्टँडर्डाईज करतात बहुतेक.

किल्ले आणि गड केव्हा पासून "पवित्र" झाले? त्यांच्या नि:संशय आदर आहेच. आणि त्या अत्यंत मोलाच्या वास्तू आहेत यात संशय नाही. पण जिथे रक्ताचे सडे पडले, कटकारस्थानं शिजली अशा वास्तू देवळासारख्या पवित्र कश्या झाल्या?

अजुन अजंटा वेरूळ च्या लेण्याकश्या काय शिल्लक राहिल्या? फोडून टाकल्या पहिजेत किति अश्लील मुर्ती कोरल्या आहेत तिथे..

चिन्या१९८५'s picture

8 Aug 2008 - 8:25 pm | चिन्या१९८५

आमच्या वेळा अश्या सो कॉल्ड संस्कृतीरक्षक गँग नव्हत्या
तुम्ही वयानी मोठे दिसता. तुमच्या पिढीने गप्प राहील्याने आज कितीतरी समस्या वाढल्या आहेत.

अजुन अजंटा वेरूळ च्या लेण्याकश्या काय शिल्लक राहिल्या? फोडून टाकल्या पहिजेत किति अश्लील मुर्ती कोरल्या आहेत तिथे..
शृंगार आणि अश्लिलतेतला फरक न कळणारे नुसतेच शरीरानी मोठे झालेले दिसतात.

टारझन's picture

9 Aug 2008 - 1:11 am | टारझन

डॉन रावांशी १००% सहमत, याला म्हणतात खरा आदर ठेवणे आणि शिवाजी महाराजांबद्दल खरा आदर.
(सार्वजनिक ठिकाणी दारू पिणार्‍यांबद्दल आधिच राग आहे. किल्ले असो नाही तर अन्य काही.)

तुम्ही वयानी मोठे दिसता. तुमच्या पिढीने गप्प राहील्याने आज कितीतरी समस्या वाढल्या आहेत.
=)) काहीही !!! गडांवर हे (मी फक्त युगुल मुद्द्याबद्दल म्हणतोय.) काम केल्याने जर ते एवढे अपवित्र होत असेल तर बाबा तु लग्न झाल्यावर पण ब्रम्हचारी राहीलं पाहीजेस. कारण आई बाबांच्या घरात (जे कुणासाठीही किल्ल्यांपेक्षा पावन आहेत) तिथल पावित्र्य तु खराब नाही केलं पाहिजे नाही का ? आशा करतो तु फक्त **** ठिकानीच असले धंदे करशील. आणि तुझे घर पवित्र ठेवशील .

शृंगार आणि अश्लिलतेतला फरक न कळणारे नुसतेच शरीरानी मोठे झालेले दिसतात.
=)) =)) =)) काय प्रचंड बुद्धीवाद आहे हा ..
आपण शरीराने च नाही तर मनाने पण बालिश दिसता .. "तारे जमिन पर"

बाबा रे जरा आदर ठेव .. असा अनादर कुठल्याही ठिकाणी करणार्‍याचे लै कान फोडलेत आम्ही.
आसल्या टारगटांच्या टोळ्या सार्वजनिक संडासात घुसून हाणल्यात बघ. ते बाकी गेलं ऊडत पण दादागिरी करणारे ऊर्मट पहिल्यांदा बदकवले पाहीजे.

गँग (किंवा एकटा) च्या जोरावर दुबळ्यांवर हात उचलणार्‍यांची ** मारणारा
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
हनुमान जिम

चिन्या१९८५'s picture

9 Aug 2008 - 1:59 pm | चिन्या१९८५

गडांवर हे (मी फक्त युगुल मुद्द्याबद्दल म्हणतोय.) काम केल्याने जर ते एवढे अपवित्र होत असेल तर बाबा तु लग्न झाल्यावर पण ब्रम्हचारी राहीलं पाहीजेस.
अहो,म्हणजे अगदी शारीरीक संबंध ठेवले गडावर जाउन तरी तुम्हाला चालेल का??

काय प्रचंड बुद्धीवाद आहे हा ..आपण शरीराने च नाही तर मनाने पण बालिश दिसता .. "तारे जमिन पर"
बाप रे 'अजिंठातील लेण्या' आणि 'इतर ठिकाणी होणारी अश्लिलता' एकाच प्रकारची आहे असे म्हणने हा एक नविन शोध म्हटला जावा.

बाकी तुम्ही मला काल १७५८ म्हटल होत आज १८५७ म्हणत आहा. मी वर लिहिलेल्या पोस्टमधील काही वाक्ये पुन्हा टाकतो आणि मग सांगा की मी कितव्या शतकात जगतोय ते.
मग प्रेमिकांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी विशिष्ट जागा आहेत का?
अशा विशिष्ठ जागा जरुर उपलब्ध करुन द्याव्यात्.त्याला मी विरोध केलेला नाहीये.शिवाय विविध बागांमधे प्रेमी युगुलांना अशा जागा उपलब्ध आहेतच.
प्रेमी युगुलही त्यांचे प्रेम इतर ठिकाणी करु शकतात्.आता सिंहगडच्या खाली कितीतरी जागा आहे,झाडीपण आहे.
जर एखाद्या चालकाची चुक नसेल तर त्याला मी मारायला जाणार नाही.मला काय हौस नाही कुणाला मारायची.मी आधीच लिहिलय की किती चालायच आणि कुठे थांबायच हे मला कळत.
पण आम्ही मुला-मुलींनी एकत्र ट्रेकला जायला कुठे विरोध केलाय???
आम्ही कुठे तुमच्या भावनांना रोखलय्??आम्ही फक्त स्थळाबद्दल आग्रही आहोत.
तुम्ही माझ्या पोस्ट नीट वाचा.मी दारु पिण्याला अथवा प्रेम करण्याला विरोध केलेला नाहीये. मी फक्त स्थळाबद्दल आग्रही आहे.मुलगा आणि मुलीने आपापसात काय करायच्,संबंध कुठपर्यंत न्यायचे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.मी तिथे लुडबुड करत नाही.मी फक्त स्थळाबद्दल आग्रही आहे. बागेत्,जंगलात जाउन करा काय ते.बारमधे जाउन दारु प्या हवी तितकी. गड हे स्थळ यासाठी योग्य नाही असे माझे मत आहे.
मी उगाच रँडमली कुणालाही मारत नाही आणि मारणार्‍याच समर्थनही करत नाही.जोडप्यानी काय करायच हे मी जोडप्याला सांगत नाही.
परस्पर सामंजस्याने तुम्ही काहीही करा हो आम्हाला त्याच्याशी काही घेणदेण नाही. फक्त स्थळाचे भान ठेवा एव्हढच आमच म्हणन आहे.

बाबा रे जरा आदर ठेव .. .
आदर तर ठेवलाच आहे.पण वयानी मोठ्या असलेल्या माणसाने उथळ्,थिल्लर वक्तव्ये करु नयेत.

असा अनादर कुठल्याही ठिकाणी करणार्‍याचे लै कान फोडलेत आम्ही
तुमच्या एकुण लेखनावरुन तुम्हीच अव्वल गुंड दिसता आहात्.आम्ही काय उगच कुणालाही मारत सुटत नाही.

धनंजय's picture

8 Aug 2008 - 7:18 am | धनंजय

आपल्या मध्यात आहेत, हे वाचून बरे वाटले.

पण विधानसभेत जायला कदाचित आणखी प्रशिक्षण लागेल. त्यासाठी नामानिराळे राहून कळसूत्री पद्धतीने भारावलेले, मारामारीसाठी तयार, तरुण खेळवावे लागतात. स्वतःच मारामारी करण्यास उतरलेले त्या मानाने मर्यादित प्रगती करू शकतात.

माझ्या अकरावीतील वसतीगृहातील रूममेटला एका मुलीशी चाळे करण्यावरून कॉलेजमधील विद्यार्थी परिषदेचे राजकारण खेळणार्‍या एका मुलाने (त्याच्या मित्रांसह) बेदम हाणले होते. या (हाणणार्‍या) मुलाची "समाजसेविका" आई पुढे गोवा विधानसभेत आमदार झाली (हल्लीहल्लीपर्यंत होती किंवा अजून आहे.) मुलगा मात्र समाजसेवक का अशीच काही उपाधी घेऊन कमाई करतो आहे. स्वतः आमदारकी मिळवली नाही.

तुलनाच करायची माझ्या वर्गातला आणखी एक विद्यार्थी गोवा विधानसभेत आमदार आहे. त्या काळातही - याचे काही बिघडवू नका - अशी जरब होती. पण बोलताना मुलगा अगदी राजकुमरासारखा शालीन होता. त्याने खुद्द कोणावर हात उगारल्याचे स्मरणात नाही. पण त्याच्याशी पंगे घेणार्‍या कोणाचे कधी बरे झाले नाही.

असो. एवढ्या माहितीवरून गोव्यातील या आमदारांची नावे सहज शोधून काढता येण्यासारखी आहेत. म्हणून अधिक नावे-तपशील देत नाही.

आपणांमध्ये अजून स्वतः ठोकपीट करणारे समाजसेवक, फारतर कॉर्पोरेटर, आहेत. आमदारकीची कळसूत्री पात्रता त्यांच्यात अजून आलेली नाही.

प्रियाली's picture

8 Aug 2008 - 3:11 pm | प्रियाली

आपणांमध्ये अजून स्वतः ठोकपीट करणारे समाजसेवक, फारतर कॉर्पोरेटर, आहेत. आमदारकीची कळसूत्री पात्रता त्यांच्यात अजून आलेली नाही.

अगदी! अगदी! प्रसंगी छातीवर लाठ्या खाऊ पण भगवा विधानसभेवर फडकलाच पाहिजे अशा विचारांचे शिवसैनिक आपल्यात आहेत. बाळ, उद्धव ठाकरे नाहीत. :)
हिंदूंचे राष्ट्र झालेच पाहिजे असे ध्येय बाळगणारे बजरंगदली कार्यकर्ते आहेत, वाजपेयी, महाजन, अडवाणी नाहीत. :)

चिन्या१९८५'s picture

8 Aug 2008 - 8:29 pm | चिन्या१९८५

बजरंगदली कार्यकर्ते आहेत, वाजपेयी, महाजन, अडवाणी नाहीत
भगत सिंग शेजार्‍याच्या घरात निर्माण झाला पाहीजे असे म्हणनारेही आपल्यात आहेत पण स्वतः भगत सिंग व्हायचा प्रयत्न करणारे आपल्यात नाहीत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Aug 2008 - 8:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मटाच्या फोटोवरुन पोरं बाकी मस्त मजा करत आहेत. मात्र स्थळ चुकलेच.

अवांतर : विद्यार्थ्यांची सहल सिंहगडावर घेऊन गेलो होतो, आता महाविद्यालयातील काट्टे म्हटल्यावर ते कोणाचा मुलहिजा बाळगत नाहीत हे वेगळे सांगणे न लगे. पैकी एकानं महाराजांबद्दल काही तरी अनादर वाटेल असे शब्द उच्चारायला आणि वर जसे काही उल्लेख आले नडगी फोडणारे वगैरे तसेच एका कार्यकर्त्याला ऐकायला एकच वेळ झाला. प्रचंड (गुंड, म्हटले पाहिजे असे ) रिकामटेकडे लोक जमा झाले, आमच्या विद्यार्थ्याला हाताच्या कोपरावर गुढग्यावर रांगायाला लावत माफी मागायला लावले. तेव्हापासून आम्ही विद्यार्थ्यांना गडांवर घेऊन जाण्याचा उद्योग बंद केला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(विद्यार्थ्यांचा सहल संयोजक)

धमाल मुलगा's picture

8 Aug 2008 - 11:34 am | धमाल मुलगा

आम्ही हे जे काही करायचो, ते गुंडगिरीच्या सदरात मोडतं, व्यक्तिस्वातंत्र्यावर अतिक्रमण करणारं असतं असंच आता वाटायला लागलंय.

बर्‍याचजणांच्या प्रतिसादातुन हे जाणवतंय, की कोणाही सर्वसामान्य नागरीकाला असं करण्याचा हक्क नाही,आणि हे करणंही चुक आहे. असेलही. आता ते मी त्रयस्थ नजरेने पाहिल्यावर मलाही तसंच काहीसं वाटायला लागलंय.

पण एक गोष्ट विचारात घेतली पाहिजे, आम्हाला (पक्षी-हे काम करणार्‍यांना) पोलिस कसे बुवा काही म्हणत नाहीत? उलट श्रीफळ-गुलाब देऊन पोलीस-मित्र म्हणून का बुवा संबोधत असावेत?

इथे दारुड्यांच्या गडावर दारुपार्ट्यांविरोधातल्या आमच्या भुमिकेचा फारसा कोणाला राग आला नाही, पण जी प्रेमी युगुलं गडावर येऊन जे उद्योग करतात, ते रोखण्याबाबत उचललेल्या पावलांविरोधात जनमत आहे असं प्रथमदर्शनी दिसतंय (चु.भु.दे.घे.).

प्रियाली ताईचा मुद्दा अगदी विचार करण्याजोगा.
भरमसाठ दंड केला की त्या भितीने लोक चुका करणार नाहीत.
मान्य, पण महाराष्ट्रातल्या पोलीसखात्यातले, जे गस्तीसाठी फिरतात त्या सब-कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल्स ना पगार किती असतो माहितीए? महिना ४००० ते ५००० रु.
गडावर दारु पिण्यास मनाई असुन, दंड ५००० रु.असेल, आणि मी जर गस्तीवरचा पोलीस असेन, तर दहा जणांच्या दारुपार्टीचा दंड ५०००रु. भरण्याऐवजी, प्रत्येकानं मला ५०/- जरी दिले तरी माझ्या महिन्याच्या पगाराच्या १०% रक्कम मी गडाच्या एका फेरीत जमा करु शकतो. भारतात कायद्याच्या अंमलबजावणीपेक्षा "काय'द्याचं बोला" हेच जास्त चालतं ही वस्तुस्थिती कोणीही नाकारु शकत नाही. मग कुठे ह्या दंडाचा परिणाम होणार?

आपल्याकडे 'दंड होणं' आणि 'दंडाची खरी रक्कम पूर्ण भरणं' ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेतच

हेच म्हणतो.

आणि ती 'दंडाची रक्कम योग्य जागी जमा होणे' याचीही गणती करावी.

:? ह्याचा अर्थ नाही कळला प्रियालीताई.

वर एक मुद्दा आला आहे, की अशा लोकांना समजावूनही सांगता येऊ शकतं.
केलेले आहेत..हे ही प्रयत्न केलेले आहेत. पदरी काय पडलं? दारुड्यांचा मार, प्रेमी युगुलांच्या शिव्याशाप.

आणी ऊठसुठ प्रत्येक जोडीची कानशीलं आम्ही शेकायचो असा काहीसा गैरसमज इथं झालेला दिसतोय.
जे व्यवस्थित फिरतात त्यांना कोणिही त्रास देत नाही. उलट सुरुवातीला जेव्हा आम्ही दारुड्यांना समजवायचो तेव्हा एखादं जोडपं जर दारुडे बसलेल्या ठिकाणापासून जात असेल, तर त्या जोडप्याला आमच्यातले काहीजण सोबतही करायचो.

पण जेव्हा तुम्ही एखादं जोडपं, ज्या तानाजी मालुसर्‍यांनी पोराचं लग्न बाजुला ठेऊन स्वतःचा जीव देऊन गड काबीज केला, त्या तानाजींच्या अर्धपुतळ्याचा आडोसा पकडून अश्लील चाळे करताना पाहता, तेव्हा त्याचं तुम्हाला काहीच वाट्त नाही? आश्चर्य आहे !

बरं, गुंडगिरीबद्द्ल म्हणाल, तर आमच्या ह्या ग्रुपमधली जवळपास सगळी मुलं चांगल्या घरातलीच होती. सोबत मुलीही असायच्या (फक्त दिवसा...कबुतरं केसेस हाताळायला...नाहीतर हे लोक विनयभंगाच्या उलट तक्रारी नोंदवायचे.).
नडग्या फोडण्याबद्दल म्हणाल तर, जर आपण हे केलं नाही, तर आपल्या नडग्या फुटणार हे नक्की. कारण एकदा ही 'अक्काबाई' पोटात गेली की सगळेच शुरवीर होऊन जातात.
एक आठवण सांगतो, जिच्यामुळे आम्ही काठ्या वापरायला सुरुवात केली. एका शनिवारी रात्री गडावर दारु पिणार्‍यांना समजाऊन सांगताना त्यांच्यातला एकजण अचानक भडकला, सोबत असलेली क्वॉर्टर त्यानं आमच्या एका मित्राला फेकुन मारली, कपाळावर बाटली फुटली आणि काचाही घुसल्या. त्यानंतर ठरवलं, स्वसंरक्षण हे पहिलं. पुरे झाली गांधीगिरी.

छोटा डॉन म्हणतात,

पावित्र्य ही काय "नाजुक कचकड्यांची बाहुली" आहे का की कुणा लुंग्यासुंग्याच्या गैरवर्तनामुळे ती भंग व्हायला ?

मुळीच नाही. एखाद दुसर्‍या फडतुस माणसाच्या गैरवर्तनाने कधीच असं होणार नाही...
पण, जर त्याला वेळीच अटकाव केला नाही तर मात्र लोकांना ती सवय होऊन जाते. मग हळुहळु 'त्याला काय होतंय? सगळे हेच करतात की' ही भावना वाढीला लागते, आणि मग हळुहळु गडाचा 'ओपन एअर बार' व्हायला वेळ नाही लागणार.

ह्याच वाक्याच्या धर्तीवर मी असं म्हणालो की, "माझ्यासारख्या लुंग्यासुंग्यानं देवळात लघुशंका केली तर कुठे बिघडलं?" तर?

ही जबाबदारी प्रत्येकाची आहे. आणि ज्यांना ती कळत नाही, त्यांना ती कधी प्रेमाने, हात जोडून तर कधी नडग्या फोडून शिकवावी लागते. अर्थात शिकली जात नाही हा भाग अलाहिदा!

अहो, ते स्थळ तुम्ही असे विकसीत का करत नाही की "कुणाही देशी अथवा परदेशी येथे आला की इथला इतिहास व वैभव पाहुन त्याची मान आपोआप आदराने झुकली पाहिजे" ,

लाखमोलाचं बोललात डॉनराव.
आमची लाख इच्छा आहे, पण लाल फितीचा कारभार आडवा येतो ना!

छान थंड हवा आहे, थोडं धुकं आहे आणि थोडा थोडा पाऊस आहे अश्यावेळी असा काही अपराध करून बघितला आहेस का? अरे मजा असते अश्या चोरटेपणात सुद्धा.

एकराव ;)
अगदी पटलं बॉ!
पण असे अपराध करताना एक पथ्य सांभाळलं, गड-किल्ल्यांवर नाही गेलो, इतर बरीच ठिकाणं आहेत तिकडे गेलो.. ;)

चाळ्यांची व्याख्या द्यायची म्हणजे नक्की काय करावे बुवा?

सध्या कोजागिरीच्या रात्री सिंहगडावर चोचीत चोच घालून बसणे गुन्हा आहे की केवळ निर्लज्जपणा?

माफ करा धनंजयराव, पण कोजागिरीचा संबंध गडावर दारु पिण्याशी होता, आणि इतर वेळी चोचीत चोच घालुन बसणे हा वेगळा संदर्भ होता.

असो,
कदाचित आमची मतं टोकाची असु शकतील, असतीलही, पण तात्कालिन परिस्थितीमध्ये जे आम्हाला योग्य वाटलं ते केलं.

डिसक्लेमर : माझी सध्याच्या "पावित्र्यरक्षकांबद्दल" काहीही तक्रार नाही फक्त त्यांचा मार्ग चुकीचा आहे हेच माझे मत आहे. सध्याच्या परिस्थीत त्यांच्या कामाचे कौतुक करायला हरकत नाही पण ते योग्य आहे असे माझे मुळीच मत नाही.

:) डानराव,
योग्य मार्गाची अंमलबजावणी अंशतः चालु झाल्यापासुन आम्हीही हा चुकीचा मार्ग बंद केला आहे.
पण ती अंमलबजावणी सुरु व्हायला, चुकीचा मार्गच कारणीभूत ठरला हे ही नसे थोडके.

सर्किट's picture

8 Aug 2008 - 11:38 am | सर्किट (not verified)

मस्त !

- सर्किट

गुंडोपंत's picture

8 Aug 2008 - 11:46 am | गुंडोपंत

नको तिथे
दारू पिवून धिंगाणा करणार्‍यांना, मुली बायकांना त्रास देणार्‍यांना मात्र धम्याचाच मार्ग योग्य आहे.

आणि त्याला माझा १००% पाठिंबा आहे आणि राहिल.
आगे बढो!

एक किस्सा आहे पण तो परत कधी तरी.

आपला
गुंडोपंत

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Aug 2008 - 12:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आपल्याशी सहमत गुंडोपंत! दारू पिऊन त्रास देणाय्रांना शिक्षा झालीच पाहिजे ... कशी होते किंवा होत नाही हा वेगळा मुद्दा आहे.

पंकज's picture

8 Aug 2008 - 2:13 pm | पंकज

आमची लाख इच्छा आहे, पण लाल फितीचा कारभार आडवा येतो ना!
येकदम शिवसेना ष्टाइल....कानशीलं शेकवताना लाल फित नसते वाटतं. :)

तुमचे विचार चांगले असतील हो... पण तुमच्या पावलावर पाउल ठेवून आलेल्या स्वंयघोषीत संस्कृतीरक्षकांची जबाबदारी कोण घेणार. मी बोलेल तीच संस्कृती,मी बोलेल तेच योग्य...यापेक्षा वेगळे काय असेल?

धमाल मुलगा's picture

8 Aug 2008 - 2:41 pm | धमाल मुलगा

येकदम शिवसेना ष्टाइल....

हे लय भारी :)

कानशीलं शेकवताना लाल फित नसते वाटतं.

तेव्हामात्र आडवी येत नाही..खाकी ची कृपा. त्यांच्याशी आधीच विचारविनिमय करुन पाऊल उचलल्यावर लाल फित आडवी येत नाही. आणि जर कुठे येण्याची शक्यता असेलच, तर आमच्या त्या गृपमधले २ वकील कायदेशीर बाबी सांभाळून कृती करायचे सल्ले देत.

तुमचे विचार चांगले असतील हो... पण तुमच्या पावलावर पाउल ठेवून आलेल्या स्वंयघोषीत संस्कृतीरक्षकांची जबाबदारी कोण घेणार. मी बोलेल तीच संस्कृती,मी बोलेल तेच योग्य...यापेक्षा वेगळे काय असेल?

पंकजराव,
हे मात्र अगदी १०१% खरं.
ह्याचाच त्रास व्हायला लागून पुढे आमची ही मोहीम आम्ही बंद केली.
स्वतःला काडीचा फायदा नसताना, खिशातले पैसे घालुन पेट्रोल जाळून तिथे जायचं,आणि करुन सवरुन पुन्हा वर, स्वतःच्या पोटातलं पाणीही न हलवता शिव्यांची लाखोली वाहणार्‍यांच्या आणि आमच्या कामाचीही तुलना पुंडाईशी करणार्‍या संभावित पांढरपेशी 'आपल्याच' लोकांचा त्रास सहन करायचा ह्याला विटलो आणि सरळ डोळ्यावर कातडं ओढून घेतलं. आणि अंशतः कारवाई चालू झाल्यापासून ह्या फुकटच्या उस्तवारीशी फारकत घेतली.
आता सरकार, दारुडे, जोडपी आणि अजुन कोणी असतील ते...जो गोंधळ घालायचा तो घालुदे...

चुकुन माकुन कधी गेलोच गडावर, तर आम्हीही जे चाललंय ते मिटक्या मारत पाहू...

पंकज's picture

8 Aug 2008 - 4:11 pm | पंकज

तेव्हामात्र आडवी येत नाही..खाकी ची कृपा. त्यांच्याशी आधीच विचारविनिमय करुन पाऊल उचलल्यावर लाल फित आडवी येत नाही. आणि जर कुठे येण्याची शक्यता असेलच, तर आमच्या त्या गृपमधले २ वकील कायदेशीर बाबी सांभाळून कृती करायचे सल्ले देत.

खाकी आणि वकिल गडाच्या विकासाकरता मदत करत नाहीत हे बरेच झाले. असो. समजावून सांगणे वा समाजात जागृती करणे हे वेळखाउ पण परिणामकारक काम आहे. त्यामानाने कानशीलं शेकवणे हे तकलादू व तात्पुरता उपाय आहे असं मला वाटतं.

आपल्या जबाबदर्‍या, आपले कर्त्यव्य व आपले हक्क काय याचे शिक्षण व प्रात्यक्षिक लहानपणापासून दिले गेले पाहिजे. "रस्त्यावर थुंकू नये" हे मी करू शकतो परंतू दुसरा कोणी थुंकत असेल तर त्याला तसे करू नको हे सांगण्याचे काम प्रत्येकानेच केले पाहिजे. "रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का?" या प्रश्नाला कसे हाताळायचे याचे शिक्षण दिले गेले पाहिजे. Career guidance प्रमाणे असे वर्ग काढता येऊ शकतील.

गुंडोपंत's picture

8 Aug 2008 - 11:49 am | गुंडोपंत

चर्चा वाचली.
आता 'या' नालायकांना अटकाव कसा करायचा असे शीर्षक द्या!
कारण हे खरे ना लायक!
यांनी नको तिथे जावून मारामार्‍या केल्या. भलत्याच लोकांना हाणले ते पण त्यांना वाचवणारे तेथे कुणी नसतांना!

वर अशा ठिकाणांची शांतता घालवून म्हणणार की पावित्र्य टिकवले?
पावित्र्य टिकवायला तुम्ही कोण आले पवित्र? काय पात्रता?

मी पण लै पाहिलेत असले वीर!
एकदा हे असलेच संस्कृती रक्षक (!) पांडवलेण्याला पोरा पोरींना कोपर्‍यात गाठून सकाळी सकाळी त्रास देत होते.

मी मध्ये पडलो तर मला म्हणतात "आय टकल्या, तुला माज आला का?"
मी म्हंटलं "हो! खाऊन खाऊन माजलेलोच आहे."
आणि हाणले एका संस्कृती रक्षकाला धरून. तर बाकीचे वीर चक्क पळून गेले!

ती पोरगी पण असली जबरी!
तीने त्यांच्या मागे धावून एकाला धरले आणि अजून दोन कानफटात दिल्या. त्या तो संस्कृती रक्षक अचानक पणे तीचा भाऊ बनून "नको ना ताई आता परत नै ना!"

"तुमी कदी पन या ना इकडे, आमी आता कदीच येनार नै ना!"

वगैरे करायला लागला.

मी म्हंटलं चल आता देतो तुला अंबड पोलिस स्टेशन जमा करून. अक्षरश: माझ्या त्या पोरीच्या आणि पोराच्यापण पाया पडला तो आणि पळून गेला.

त्या युगुलाला विचारलं कसं काय आहे सगळं ते.
दोघे ही चांगले होते.
इंदिरा नगर ला रहायचे आणि सकाळी सकाळी रोज चालायला म्हणून पांडवलेण्याला यायचे. यात कसले पावित्र्य भंग होत होते?
अरे एकट्या दुकट्याला गाठून कसले मारता रे?

असले तर हे संस्कृती रक्षक वीर!

त्रंबकचा पण एक किस्सा आहे, तो सांगेन कधी तरी नंतर.

आपला
गुंडोपंत

धमाल मुलगा's picture

8 Aug 2008 - 3:17 pm | धमाल मुलगा

गुंडोपंत,

नको तिथे दारू पिवून धिंगाणा करणार्‍यांना, मुली बायकांना त्रास देणार्‍यांना मात्र धम्याचाच मार्ग योग्य आहे.
आणि त्याला माझा १००% पाठिंबा आहे आणि राहिल.

धन्यवाद.

आता वळुया तुमच्या दुसर्‍या प्रतिसादाकडे.

एकदा हे असलेच संस्कृती रक्षक (!) पांडवलेण्याला पोरा पोरींना कोपर्‍यात गाठून सकाळी सकाळी त्रास देत होते....
...असले तर हे संस्कृती रक्षक वीर!

हे खरे संस्कृतीरक्षक होते की कातडं पांघरलेले संस्कृतीभक्षक बुभुक्षित लांडगे?
हाताची पाचही बोटं सारखी असतात का? नाही ना?

मध्ये बर्‍याच बातम्या यायच्या, "खडकवासला धरणापाशी पोलीस असल्याचे भासवून जोडप्यांना लुटले", "पुणे विद्यापीठात पोलीस असल्याचे भासवून बलात्कार" इ.इ. मग हे खरे पोलीस होते का? नाही ना?

यांनी नको तिथे जावून मारामार्‍या केल्या. भलत्याच लोकांना हाणले ते पण त्यांना वाचवणारे तेथे कुणी नसतांना!

माझा वरचा प्रतिसाद बारकाईने पाहिला तर लक्षात येईल की, भलत्याच लोकांना मारलेले नाही.
नको तिथे जाऊन मारामार्‍या ह्या शेवटचा पर्याय म्हणून कराव्या लागल्या.

पावित्र्य टिकवायला तुम्ही कोण आले पवित्र? काय पात्रता?

किमान, ज्या अयोग्य गोष्टी आपण करत नाही आहोत त्या रोखण्याची पात्रता असु शकत नाही काय?
आता योग्य आणि अयोग्य हे कोणि ठरवायचे असाही प्रश्न उद्भवू शकतोच.
तर सारासार विचारशक्तीला साक्षी ठेऊन सद्सदविवेकबुध्दीला जे खटकतं ते अयोग्य.
आपल्या बरोबर असलेल्या माय बहिणींना ज्या उघड गोष्टींमुळे लाजेने मान खाली घालावी लागेल ते अयोग्य.

आपल्या अनुभवातले 'संस्कृतीरक्षक' जर योग्य हेतुने फिरत असते, तर नक्कीच हे घडले नसते.
काय त्यांच्याबरोबर ह्या कामासाठी कॉलेजात शिकणार्‍या मुली, काही विवाहित स्त्रियाही फिरत होत्या? आमच्या बरोबर नेहमी असायच्या. त्यामुळे जरी कोणाला तुमच्या वरच्या अनुभवाप्रमाणे करावसं वाटलंच तरी ते करणं, म्हणजे आपल्याच सोबत्यांकडून मार खाणं हे माहित असल्याने आणी मुळातच तसे हेतु मनात नसल्याने अशा प्रकारच्या गोष्टी होत नसत, ह्याची नोंद घेण्यासारखी.

गल्लीतल्या गुंडगिरीचा फायदा घेऊन / राजकिय पक्षाच्या आशिर्वादाने ह्या कामास सुरुवात करुन त्याला घॄणास्पद रुप देणारे हे देहान्त प्रायश्चित्त देण्याच्या लायकीचे आहेत असं माझं वैयक्तिक (आणि टोकाचं म्हणा हवंतर) मत आहे.

आम्हालाही व्यक्तिस्वातंत्र्याचा पुर्ण आदर आहेच,
पण सार्वजनीक ठिकाणी कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळणं म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्य असा अर्थ जर ध्वनीत होत असेल तर त्याला विरोध करणारे आम्ही फार मोठे गुन्हेगार आहोत.

मराठी_माणूस's picture

8 Aug 2008 - 12:25 pm | मराठी_माणूस

वरिल एका प्रतिसादात असे म्हटले आहे

अशी काही स्थळे आहेत ज्याच्याशी लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत. त्यांचा आदर करायलाच हवा.

हे म्हणणे एकदम बरोबर आहे.

आता मुद्दा असा आहे की अशा जागा मधे काहि जागा राजकारणा मधिल पण आहेत. ह्या जागी स्वातंत्र्या पुर्वी आणि नंतर पण काहि वर्षे फार चांगलि, त्यागी , लोकाबद्दल कळकळ असलेलि माणसे होति , त्या जागेवर आज कोण आहेत आणि ते काय चाळे करत आहेत ते दिसत नाहि का ?

त्याना शिक्षा करण्याचे धाडस का होत नाहि ?

आणखी एक , ह्या नेत्यांचे मोठेपण म्हणजे , त्यांच्या एका शब्दाखातर लोक काहिहि करायला तयार व्हायचे आणि तेहि कोणत्याहि धाकट धपशाविना.

प्रबोधन हे मारहाणि मुळे होणार नाहि, ज्याना मारहाण झालि त्याना पश्चाताप होण्या ऐवजि आपला अपमान झाला असे वाटेल. संधि मिळालि तर ते उट्टे काढण्याचा प्रयत्न करतिल न कि चुकिचि माफि मागण्याचा

पक्या's picture

8 Aug 2008 - 1:05 pm | पक्या

धमाल्या,
प्रेमीयुगुलांना मारहाण करून गडाचे पावित्र्य कमी करण्यास तुम्हीही हातभार लावलात की रे. दारू पिऊन धिंगाणा घालणे, इतरांना नाहक त्रास देणॅ , गडावर कचरा करणे अशावेळी संस्कृतीरक्षकांनी जरूर पुढे यावे. आणि त्यावेळी स्वसंरक्षणार्थ तुम्ही अवलंबवलेला मार्ग योग्य.
पण प्रेमीयुगुलांनी एकांतात चार दोन प्रेमाच्या गोष्टी केल्यास काय बिघडले त्यात? हा त्यात सार्वजनिक ठिकाणी (मग तो गड असो वा कुठलीही बाग ) इतरांना (बघणार्‍याला ) अश्लील वाटतील असे चाळे करणे हे अयोग्यच. त्याचेही भान या प्रेमीजनांनी ठेवायला हवे.
मटाच्या बातमीत म्हटल्याप्रमाणॅ प्रत्येक गडाखाली ...गडावर जाता येतील अशा सर्व रस्त्यांवर एक चेक पोस्ट असावे . आणि तेथेच गडावर दारू नेणार्‍यांना अटकाव करावा.
गड किल्ल्यांवर गणवेषातील प्रशिक्षित रेंजर्स असावेत. रेंजर्स चे कामच असते त्यांच्या अखत्यारीतील भागाचे रक्षण करणे आणि त्या भागाला भेट देणार्‍या पर्यटकांचेही रक्षण करणे.
अर्थात हे सूचना म्हणुन चांगले वाटले तरी प्रत्यक्षात अमलात आणणे अवघड आहे. पण अशक्य मात्र नाही.
बाकी लोकांच्या मनात मुळातच इतिहासाविषयी , महाराजांबद्द्ल, गड किल्ल्यांबद्द्ल अभिमान , आदर असायला हवा. आणि तो नसेल किंवा बोथट झालेला असेल तर ते योग्य प्रबोधनानेच घडू शकेल्...मारहाणी मुळे नाही.

धमाल मुलगा's picture

8 Aug 2008 - 1:49 pm | धमाल मुलगा

कदाचित माझी भुमिका मला पहिल्या प्रतिसादात योग्य प्रकारे मांडता आली नाही.

पण वाईट इतकंच वाटलं, की सगळ्यांनी जी बोटं रोखली, ती फक्त प्रेमी युगुलांना विरोध करण्यावरुन. मान्य आहे त्यांना एकांत हवा असतो, आणि बरंच काही.आम्हीही गेलोय त्या काळातून. पण जेव्हा एखाद्या रविवारी सकाळी तुम्ही बायको मुलांना घेऊन सिंहगडावर जाता आणि असले प्रकार नजरेला पडतात तेव्हा काय करता? सरळ ठरवता ना की बास झालं, हे आलो हे शेवटचं?

ईच्छा नसल्यास नका मान्य करु, पण आम्ही गडावर फिरुन तिथे आलेल्या लोकांशी संवाद साधून मगच हे पाऊल उचललंय.

ह्या जोडप्यांच्या अशा अनिर्बंध वागण्याला विरोध करायला जेव्हा पुण्यात विजयानगर कॉलनीची बाग, डेक्कनचे पूल आणी नदीकाठ ह्या ठिकाणी "खबरदार" वगैरे प्रकारचे फलक लावले गेले तेव्हा ते योग्यच होते ना?
मग हाच नियम गडावर का नाही लागु होत?

दुसरी एक गोष्ट, जेव्हा ही जोडपी आपल्याच विश्वात रममाण झालेली असतात, तेव्हा कदाचित त्यांचा तोल सुटत असेलही, मान्य. पण ह्याची दुसरी बाजु पाहिलीये कोणि?
त्यांचा भावनांचा 'उत्सव' चालू असताना, जर एखादा टवाळ कंपू आला तर त्या मुलीला हा एकटा प्रेमवीर वाचवू शकेल?
आता तुम्ही म्हणाल ह्याच्याशी तुम्हाला काय घेणं देणं?
उत्तर आहे "काहीच नाही". पण संभाव्य धोका टाळल्याच एक समाधान.

प्रेमीयुगुलांना मारहाण करून गडाचे पावित्र्य कमी करण्यास तुम्हीही हातभार लावलात की रे.

:) पक्याशेठ,

आणी ऊठसुठ प्रत्येक जोडीची कानशीलं आम्ही शेकायचो असा काहीसा गैरसमज इथं झालेला दिसतोय.
जे व्यवस्थित फिरतात त्यांना कोणिही त्रास देत नाही. उलट सुरुवातीला जेव्हा आम्ही दारुड्यांना समजवायचो तेव्हा एखादं जोडपं जर दारुडे बसलेल्या ठिकाणापासून जात असेल, तर त्या जोडप्याला आमच्यातले काहीजण सोबतही करायचो.

पण जेव्हा तुम्ही एखादं जोडपं, ज्या तानाजी मालुसर्‍यांनी पोराचं लग्न बाजुला ठेऊन स्वतःचा जीव देऊन गड काबीज केला, त्या तानाजींच्या अर्धपुतळ्याचा आडोसा पकडून अश्लील चाळे करताना पाहता, तेव्हा त्याचं तुम्हाला काहीच वाट्त नाही? आश्चर्य आहे !

गड म्हणजे साबरमतीचा आश्रम नव्हे ना? :)

जेव्हा झुडपात खसफसतं आणि तुम्ही आवाज देता "कोण आहे रे तिकडं? येऊ का?" तेव्हा एखादी मुलगी तोंड ओढणीनं झाकून कमरेची सलवार एका मुठीत आवळून पळून जाताना पाहिली ना की मग लक्षात येतं, काय करायला हवं आणि काय नाही!

मटाच्या बातमीत म्हटल्याप्रमाणॅ प्रत्येक गडाखाली ...गडावर जाता येतील अशा सर्व रस्त्यांवर एक चेक पोस्ट असावे . आणि तेथेच गडावर दारू नेणार्‍यांना अटकाव करावा.

पावसाळ्यात आणि खास सुट्टीदिवशी हे सिंहगडाच्या पायथ्याशी होतंच हल्ली. सिगारेटची पाहिटंही जप्त केली जातात.

पक्या's picture

8 Aug 2008 - 9:41 pm | पक्या

धमाल मुला,
नाण्याची दुसरी बाजू (गडाचे पावित्र्य, अश्लील चाळे, दारू पिऊन धिंगाणा, स्वसरक्षण) पाहिली तर तुमचे वागणे पटते. दारू पिवून धिंगाणा करणार्‍यांना, मुली बायकांना त्रास देणार्‍यांना फटकेच बसले पाहिजेत.
फक्त ते (प्रेमी) पोरा-पोरींना मारहाण करणे ही एकदम टोकाची भूमिका वाटली म्हणून वरील प्रतिसाद लिहीला. बाकी बघणार्‍याला अश्लील वाटतील असे चाळे गड काय इतरत्र करणॅ अयोग्यच ...हे मी आधीच लिहीले आहे.

>> मटाच्या बातमीत म्हटल्याप्रमाणॅ प्रत्येक गडाखाली ...गडावर जाता येतील अशा सर्व रस्त्यांवर एक चेक पोस्ट असावे . आणि तेथेच गडावर दारू नेणार्‍यांना अटकाव करावा.
पावसाळ्यात आणि खास सुट्टीदिवशी हे सिंहगडाच्या पायथ्याशी होतंच हल्ली. सिगारेटची पाहिटंही जप्त केली जातात.

हे अगदी योग्य. इतर गडांवर पण हे व्हायला हवे.

लबाड मुलगा's picture

8 Aug 2008 - 2:33 pm | लबाड मुलगा

हे सगळे ठीक आहे हो पण रोजच्या जीवनात रोज रस्त्यावरुन जाता येता जे पौपकोर्न खाणे चाललेले आहे ते पाहुन शरम वाटते

ब्राच्या पट्या दाखवित बनियन चड्डी घातलेल्या पोरी ( मागुन आतील चड्डीचा ब्रैड पण वाचता येतो)
मोटारसायकल वर पुढील पोराच्या पाठिवर चढुन बसलेल्ञा ललना (सीट मोकळे)
रात्री ७ पासुनच पार्क करुन ठेवलेल्या कार ज्या मधुनच आपोआप हालतात परत परत

धरबंदच उरला नाही या शहरात ..... छ्या

गुंडोपंत's picture

8 Aug 2008 - 2:38 pm | गुंडोपंत

पन मला कलत नाय,
तुमी कश्याला पाह्यला जाता जवळून
बनियन चड्डी घातलेल्या पोरींच्या चड्डीचे ब्रँड?

आपन आप्लं सरळ बगून का चालू नाय?

आपला
गुंडोपंत

लबाड मुलगा's picture

8 Aug 2008 - 7:26 pm | लबाड मुलगा

तुमास्नी का दाताखाली खडा लाग्ला?

टारझन's picture

9 Aug 2008 - 1:47 am | टारझन

गुंडोपंत आणि पक्या डेंजर ...
=)) =)) =))
हसून हसून मेलो आहे. (१० मिनीटांनी) हुस्श्श्श्श्श....
जबराट ... दारुड्यांपासून कबुतरांकडे गेलेला टॉपिक तुम्ही अचानक चड्ड्यांच्या ब्रांड कडे नेलात .. जबरा =))

बाकी धमू शेटचं दारुड्यांना फटकवणे (स्वरक्षणार्थ) अति योग्य ... मला पण बोलव रे धमु...
आणि ते तु म्हणालास ना की चाळे करणारांना कोणी टोळीने त्रास दिला तर ... अरे .. ही टोळी नुसते हातात हात घालून एकांतात फिरणारांना पण त्रास देते ना राव. ह्या टोळ्यांना तर अजुनच फटकवलं पाहीजे. मी तर म्हणतो एक एकाच्या चड्ड्या काढून (आणी ब्रांड बघून ;) ) ताशाच्या काड्यांनी नरम केलं पाहीजे.
बाकी दस्तुरखुद्द महाराजांनी पण गडावर प्रेम करायला बंदी नव्हती रे केली. नाही तर स्वराज्य ऊभे करणारे मावळे कसे पैदा झाले असते? (अर्थात त्याचा अर्थ तिथे आता मावळे पैदा करा असा नाही) झुडपं हलवणार असतिल तर पोलीस.. योग्य मार्ग. म्हणजे हे दिवे त्यांच्या घरच्यांना पण कळतील. मग काहींच तेरी लग्न लाऊन दिलं जाईल मग ते गड नाही शोधणार. पण मी काय म्हणतो धम्या ... गडांवरची झुडपं काय आणि माळरानावरची झुडपं काय ? असे धंदे दिसले की पोलीस आणी घरवाले हे योग्य चाप देऊ शकतात एकदम ईफेक्टीव्हली. आणि पोर्‍या सन्नी देओल की दाखवायला लागला की त्याला प्रेम चोपडा करूयात.
तुझा हेतू वाईट(राजकिय->शिवसेना) नाहीये हे वाचून बरं वाटलं

-- ( टारझन ऊर्फ खवीस )

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Aug 2008 - 3:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बरोबर आहे गुंडोपंतांचं! तुम्हाला कोणी सांगितलं तर ... साहेबी कपडे बंद आणि सरळ धोतर, बंडी असा वेषच परीधान करायचा!
आणि मग साडी नेसल्यावर कंबर दिसते ते चांगलं का वाईट?

लबाड मुलगा's picture

8 Aug 2008 - 7:31 pm | लबाड मुलगा

साडी नेसल्यावर कंबर दिसते ते चांगलं का वाईट?

फक्त कंबरच दिसते
चड्ढी घातल्यावर काय काय दिसते हे पहायचे असेल तर सिग्नलला बाजुला उभ्या राहुन पहाच काय दिसते ते..... लाज वाटेल तुम्हालाच

सरळ धोतर, बंडी असा वेषच परीधान करायचा!

काय वाईट आहे त्या वेशात
जरा आभाळातुन डोळै काढुन बघा भारतात
८० टक्के पुरुष हाच वेश परिधान करतात

च्यायला आजकाल लोकांचा भारताशी संबंधच तुटत चाललाय

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Aug 2008 - 8:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

चड्ढी घातल्यावर काय काय दिसते हे पहायचे असेल तर सिग्नलला बाजुला उभ्या राहुन पहाच काय दिसते ते..... लाज वाटेल तुम्हालाच
मनात वाईट विचार नसतील तर लाज वाटायचं कारणंच काय?
आणि फक्त कंबरच दिसते तर ते चांगलं का वाईट हे कोण ठरवणार? आपल्या देशात हे दाखवतात म्हणून तुमची नजर मेली आहे, एवढंच मी म्हणू शकते. मी त्यापेक्षा बरंच जास्त जग पाहिलं आहे, आणि माझी नजर पूर्णच मेली आहे म्हणा हवं तर! आणि मला काहीही गैर वाटत नाही स्वतः असे कपडे घालण्यात! साडी नेसून सायकल चालवण्यापेक्षा छोटी चड्डी आणि टॉप घालून सायकल चालवणं सोप जातं!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Aug 2008 - 2:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पावसाळ्यात आणि खास सुट्टीदिवशी हे सिंहगडाच्या पायथ्याशी होतंच हल्ली. सिगारेटची पाहिटंही जप्त केली जातात.
बेश्टच! डोंगरांवर वाट चुकल्याचं नाही पण, गुटख्याच्या पाकिटांनी रस्ता दाखवल्याचं वाईट वाटायचं.

प्रसाद आरोसकर's picture

8 Aug 2008 - 4:15 pm | प्रसाद आरोसकर

Namaskar mitrano

lihitana english cha vapar karit aahe karan mi ajun marathi typing madhye far slow aahe. kahi mudde tatdine mandanyachi garjechi vatali mhanun ha patra prapanch.

Gad kille, itihasik thikane hya nusatya vastu navhet tar tirth kshetre aahet. tya mule tumachya tithalya vavara varati bandhane yenarach ani ti asalich pahijet. mandira madhye, masjidi madhye ... ekhadya pavitra thikani tumi daru piun jal , cigareti odhat, preyasichya bahupashat jal ka ? ani jat asal tar kay bolnar tumachya vishayi !!

shivaji maharajansarakha raja , rajan sathi talhatanvar shir gheun ladhaleli manase hi tyanchya karma mule daivpada la pohachali aahet. tyanchya vishayi aadar balagane sarv marathi janateche kartavya aahe.

kahi patranmdhye ase vachale ki tikadache vatavaran agadi chochi madhye choch ghalun basanya sarakhe asate ... arrey kay he ...arrey murkha sinhgadavar - tanaji malusarenchi samadhi aahe ... raigada var pratyaksha shivaji maharajanchi samadhi aahe .. ani tithe tumhi asale prakar karanar ? arrey aaplya sarvancha baap aahe re to !! maharaj, tanaji malusare, bajiprabhu kay lok hote te !!

gada var sahkutumb yeun maja karane madhye ethalya nisargacha aanand ghene basat nahi ka ? mast zunka bhakar, kandabhaji khane basat nahi ka ? agadi tumachya preyasi sobat tumhi chhan gappa maru shakat nahi ? nahi tar kay mhanave tumachya premala ... aani he asalya goshti karayala gad kille ha ekach paryay aahe ??

aata hyana adavanar kon ? kahitari kayam swarupi yantrana havi ... ani tyacha aagrah dharayala hava .... maharajanchya nava khali satta milavanare , karodonchi sampatti jamavanare ...killyanchya dekhrekhi sathi kahi lakh kharch karu shakat nahi ? ani aapan tyana jab vicharnya aivaji ... cigaret odhali tar kay zale ? chochi madhye choch ghatali tar kay zale ? hya charcha karato.

mi hyachya awareness sathi kahi goshti karit aahe, interested people can contact me on prasad,aroskar@gmail.com

Aapala
Prasad Aroskar

लिखाळ's picture

8 Aug 2008 - 7:06 pm | लिखाळ

ऐतिहासिक वास्तू आणि तेथील वातावरन कसे जपावे याबद्दलची मते वाचले. बरीचशी मते पटली.

पण पावित्र्याबद्दलची मते जरा तीव्रच होत आहेत असे वाटले.
सिंहगडावर दर रवीवारी व्यायामासाठी जाणे, सिंहगडावरील हवेची-वातावरणाची मजा लुटायला तेथे मुक्कम करणे, तेथील भजी-झुणका-भाकरीची वर्णने करणे आणि ते खायला मुद्दाम उठून पुण्यातून जाणे इत्यादी गोष्टी पावित्र्य जपण्यामध्ये बसतात का? असा प्रश्न पडला. हे म्हणजे देवाच्या दर्शनापेक्षा तेथल्या प्रसादाच्या अपेक्षेने देवळात जाण्यासारखे आहे असे म्हणावे का?
--(गोंधळलेला) लिखाळ.

लंबूटांग's picture

8 Aug 2008 - 8:56 pm | लंबूटांग

विषया वर भाष्य करणारा एक quote वाचला.

"The direct use of force is such a poor solution to any problem, it is generally employed only by small children and large nations."- David Friedman.

भगतसिंग कुठे आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते कुठे...

चिन्या१९८५'s picture

8 Aug 2008 - 9:32 pm | चिन्या१९८५

oh really?????then what is ur solution 2 dis problem???what have u done 4 dat???

भगतसिंग कुठे आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते कुठे
आम्ही स्वतःला भगत सिंघ म्हणत नाही.पण आम्ही तुमच्याप्रमाणे फक्त भाष्य करत बसत नाही तर जे चुकतय ते बदलण्याचा प्रयत्न करतो. आम्ही चुकीच्या गोष्टी बदलण्याचा प्रयत्न तरी करतो.तुम्ही तर तोहि करत नाही. आणि काही लोक तर काही करायच नाही म्हणुन डोळ्यावर चष्मा घालुन 'कुठे काय चुकतय' म्हणतात.

एक's picture

8 Aug 2008 - 10:13 pm | एक

हा आपला शेवटचा प्रतिसाद या थ्रेड ला..

बर्‍याचशा प्रतिसादांमधे आता "संभाजी ब्रिगेड" , बजरंग दल सारखी मेंटालिटी दिसायला लागली आहे.

मूळ मुद्दा सोडून चिन्या सारखी लोकं आता वैयक्तिक पातळीवर घसरायला लागली आहेत..
हे बघा..

" शृंगार आणि अश्लिलतेतला फरक न कळणारे नुसतेच शरीरानी मोठे झालेले दिसतात..."

तेव्हा आपला रामराम...

चिन्या१९८५'s picture

8 Aug 2008 - 10:40 pm | चिन्या१९८५

ज्यापध्दतीच लिखाण करता त्यापध्दतीची उत्तरे द्यावी लागतात्.इथ आम्हाला अगदी गँगस्टर,कॉर्पोरेटर्,आमदार वगैरे म्हटले आहे त्याचे काय्??तुम्ही आणि तुमच्याशी सहमत असलेल्यांनी काहीही लिहाव आणि आम्ही थोडस काही लिहिल की लगेच निषेध हे डबल स्टँडर्ड्स का???आणि वरील तुम्हाला आक्षेपार्ह वाक्याचे उत्तर काय्???त्या दोन गोष्टींमधे फरक आहे का नाही??

सखाराम_गटणे™'s picture

11 Aug 2008 - 8:30 am | सखाराम_गटणे™

मित्रहो, तुमची इतकी चर्चा वाचल्या नंतर, मला ऐक प्रश्न पडला आहे.


सार्वजनिक ठिकाणी प्रेम कसे करावे?

अनुभवी लोकांनी सल्ले द्यावेत.

सखाराम गटणे

प्रकाश घाटपांडे's picture

11 Aug 2008 - 9:39 am | प्रकाश घाटपांडे

रहमानी किडा प्रत्यक्षात आहे कि नाही हे मला माहित नाही. पण एकदा टाकली कि तो प्रत्येकाच्या _डीत वळवळायला सुरवात होते. आता त्या वळवळण्याची व्याप्ति किती हा खरा प्रश्न आहे. चतुरंग म्हणतात तसे या उपाय योजना तात्पुरत्या असतात. पण कायमस्वरुपी व्यवस्था होत नाही तोपर्यंत या तात्पुतत्या व्यवस्थांच महत्व अबाधित आहे.
कायदा व सुव्यस्था कमी पडते त्यावेळि समांतर न्याय व्यवस्था तयार होत असते. यात कायदाच केवळ हातात घेतला जात नाही तर न्यायाधीश ही आपणच बनतो. जोथे भावना तीव्र बनतात तिथ मेंदु विवेकाचा आधार न घेता भावनेच्याच आहारी जातो.
पोलिस खात्यात समरी पॉवर या नावाने अनेक बेकायदेशीर गोष्टी चालतात. एखादी गोष्ट बेकायदेशीर आहे म्हणुन अनैतिक आहे असे नव्हे किंवा एखादी गोष्ट कायदेशीर आहे म्हणुन नैतिक आहे असेही नव्हे. हा युक्तिवाद इथे लढवता येतो.
महाराष्ट्रातल्या अनेक गडांवर पोलिस बिनतारी पुन:प्रक्षेपण केंद्रे आहेत. अनेक गडांवर असे गैर प्रकार चालतात ते रोखण्यासाठी याचा काही उपयोग होत नाही . कारण ती जबाबदारी व अधिकार इथे दिलेला नसतो. पोलिस खात्यात मोठ्या प्रमाणात मनुष्य बळ वाया जात असतं.
(आमच्या भाषेत ६० बाय ९० चादर) जुन्यापुराण्या पोलिस मॅन्युअल नुसार चालणारे कामकाज, कालबाह्य रुढी परंपरा यात अडकलेलि यंत्रणा, मनुष्य बळाचे मुल्यमापन करणारी आधुनिक व्यवस्थापनाची यंत्रणाच नसणे अशाकिति तरी गोष्टी आहेत.
http://www.misalpav.com/node/114 इथे थोडेसे.
सिंहगड , पेठ घाट, चतु:श्रुंगी अशा ठिकाणि नोकर्‍या केलेला.
( टंकायचा कंटु आला)
( बिनतारी जगत मधुन बाहेर पडलेला)
प्रकाश घाटपांडे

धमाल मुलगा's picture

29 Dec 2009 - 5:22 pm | धमाल मुलगा

आज असंच मटा पाहता पाहता थर्टी फर्स्टच्या रात्री सेनेचा 'पहारा' ही बातमी वाचनात आली :)

सहजच कुठेतरी गडकिल्ल्यांवर दारु पिणे, दंगा करणे वगैरेसंदर्भात असल्याने एकदम आठवण झाली :)