नमस्कार
मी बर्याच दिवसांपासून एक laptop विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे. मला mainly office use साठी घ्यायचा आहे पण माझ्या लहान बहिणीला पण उपयोग होईल असा हवा आहे. बहिण Architecture शिकत आहे आणि तिला Autocad किंवा तत्सम softwares वापरावी लागतात.
मला ऑफिसमध्ये स्वतःला simulations वगैरे करावी लागत असल्यामुळे processor पण फास्ट असणे जरूर आहे.
काहीजण मला अगदी छातीठोक पणे DELL च घे म्हणून सांगत आहेत तर काही जन LENOVA घे म्हणून सांगत आहेत.
माझे configuration साधारणपने असे आहे -
Processor - I५ - ४th generation किंवा I७
१ TB हार्ड डिस्क
८ GB RAM
१५.६ monitor
चांगले Graphics कार्ड
Budget - ५५०००/- ते ६५०००/- पर्यंत
मला मिपावर laptop संदर्भात काही चर्चा घडली होती असे अंधुकपणे आठवत आहे पण मला जुन्या links मिळाल्या नाहीत.
मिपाकर काही मार्गदर्शन करू शकतील का?
धन्यवाद
प्रतिक्रिया
7 Nov 2014 - 4:12 pm | आदूबाळ
एवढ्या बजेटमध्ये तुम्ही म्हणताय त्याच्यापेक्षा जास्त स्पेक्सचा येईल असं वाटतं. मला लेनोवोचे अतिऊत्तम अनुभव आहेत (गेली ९-१० वर्षं - ते आयबीएम होतं तेव्हापासून).
7 Nov 2014 - 4:35 pm | Madhavi_Bhave
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
पण आत्ताच माझ्या एका colleague सांगितले कि lenova आता IBM शी संलग्न नाही आहे. IBM ने हा ब्रांड कुठल्या तरी दुसर्या कंपनीला विकून टाकला त्यामुळे आता LENOVA quality-wise पूर्वीप्रमाणे नाही आहे. कदाचित माझी ही माहिती चुकीची असू शकते. कोणी जाणकार मार्गदर्शन करू शकले तर फार बरे होइल.
7 Nov 2014 - 4:39 pm | प्रसाद१९७१
लीनोव्हा ब्रँड एका चायनीज कंपनीला विकला आहे.
7 Nov 2014 - 5:03 pm | आदूबाळ
आयबीएमचा पर्सनल कॉम्प्युटर बिझनेस लेनोवोने २००५ सालीच विकत घेतला. नुकताच सर्व्हर बिझनेसही घेतला आहे.
सांगण्याचा मुद्दा हा होता की आयबीएम आणि लेनोवो - या दोन्ही अवतारात या लॅपटॉपांनी चांगली सेवा दिलेली आहे. आयबीएम-लेनोवो संक्रमणात क्वॉलिटी गेल्याचं मला तरी जाणवलं नाही ब्वा. (हा प्रतिसादही लेनोवो थिंकपॅड टी ४१० वरून टंकतो आहे.)
7 Nov 2014 - 4:37 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
डेलचा बरा. कारण 'डेलची सर्विस चांगली असते' असे नेहमी ऐकायला मिळते. Architecture ची गरज असेल तर जास्त रॅम असणारा व उत्तम ग्राफिक्स प्रोसेसरवाला लॅप्टॉप घेणे ईष्ट.
7 Nov 2014 - 4:43 pm | संदिप एस
पण घरी आत्ताच डेल चा घेत्ला सेम कॉन्फिगरेश्न पण रॅम १६ जीबी अप्ग्रेड केली ,ट्च्स्क्रीन आहे, पण विंडोज ८.१ मुळीच आवडले नाही म्ह्णून व्हीएमवेअर ईन्स्टॉल करुन ईतर ही ओएस टाकल्या आहेत. डेल चा छान वाटतोय वापरतांना..
7 Nov 2014 - 5:23 pm | मुक्त विहारि
सगळे वापरून झाले..
साधारण स्वानुभव असा आहे की,
एसर माझ्या कडे फार उत्तम चालतो आहे.
परत जर कधी लॅपटॉप वापरायची वेळ आलीच तर (बहूदा पुढच्या महिन्यांतच येईल असे वाटत आहे.) पहिले प्राधान्य एसरलाच.
कारण,
इतर कंपन्यांच्या पेक्षा किंमत कमी आणि शिवाय उत्तम चालतो.गेली ७ वर्षे मी आणि आमच्या घरातील समस्त मंडळी (अगदी आमच्या कुत्री सकट... तिने एकदा पंजा मारून लॅपटॉपच्या स्क्रीन वरील मांजराला पकडण्याचा प्रयत्न केला होता.मांजर सोडून की-बोर्ड वरील ३/४ बटणे तिच्या पंज्यात आली.जे काही हातात आले, ते न सोडण्याची कुत्र्यांची मानसिकता असल्याने, ती बटणे काही सोडवता आली नाहीत.त्या झटापटीत तिने शेवटी ती बटणे गिळली.आजही आमच्या लॅपटॉपवरील अप-डावून कीज बिना बटणाच्याच वापरल्या जातात.
असाच अजून एक मजेशीर प्रसंग.एकदा दळण घेवून आलो.फक्त १० किलो आणि आल्या आल्या चुकून डबा ठेवल्या गेला तो नेमका एच.पी.च्या लॅपटॉपवर.त्या स्क्रीनने तेंव्हापासून मान टाकली पण अजूनही अद्याप त्याची स्क्रीन दळण म्हटले की दचकते.गरजूंनी घरी येवून खात्री करावी.आधी फोन करून यावे.)
तस्मात आमची वैरक्तिक पसंती एसरलाच.
7 Nov 2014 - 6:04 pm | मुक्त विहारि
अजून एक सांगायचे राहिलेच की...
२ वर्षांपुर्वीच अॅटोकॅड त्या एसरवरच डावूनलोड केले अद्याप सुरु आहे.
(जर ७ वर्ष जुन्या एसरवर अॅटोकॅड चालत असेल तर, नविन येसरवर नक्कीच चालेल.
बादवे, मी येसरचा सेल्समन नाही, पण माझ्या कडे असलेल्या येसरची वस्तूस्थिती सांगत आहे.)
8 Nov 2014 - 11:15 am | पैसा
तुम्ही पण आमच्या घरच्या तमाम मंडळींसारखेच निष्काळजी दिसताय! बिचार्या वस्तू घरातल्या! =))
10 Nov 2014 - 12:31 am | मुक्त विहारि
जावू दे...आमच्या घरात आम्हाला अद्याप राहू देतात,हे मी कबूल करतोय,ह्यातच सगळे आले.
आमच्या निष्काळजी पणा बद्दल, आमची बायकोच जास्त सांगू शकेल, अर्थात पण त्यासाठी तुम्हाला डोंबोलीला यावे लागेल आणि प्रवेश फी म्हणून येतांना, गोव्यातील आमसूले आणायला लागतील.
आणि जर तळलेले फणसाचे गरे पण आणलेत तर, आमच्या मातोश्रींची आणि तुमची गाठ-भेट घालून देतो.ह्या आमच्या अशा स्वभावामुळे आईच्या हातचा जाम मार खाल्ला आहे.तुम्हाला लिहायला बरेच मटेरियल मिळेल.
7 Nov 2014 - 5:29 pm | पिलीयन रायडर
ओफिसात आम्हाला डेलचे १६ जीबी रॅम वाले सुंदर लॅपटॉप दिलेत. त्याच्या बॉक्सवर किंमत साधारण ७५००० /- आहे. अजुन तरी छान चालु आहे..
ह्या पेक्षा जास्त मला लॅपटॉप विषयी ज्ञान नाही.
तशीही मी ६४ जीबी रॅमचे वर्क स्टेशन मिळल्याच्या आनंदात डुंबत आहे...
7 Nov 2014 - 5:31 pm | योगी९००
दोन दिवसापुर्वीच मी लेनेवो 80E300FSIN हा घेतला. बजेट ३५००० होते. एकदम उत्तम laptop आहे.
AMD A8-6410 2Ghz, 8 GB RAM, 3 GB graphic ram, 1TB HDD असे config आहे. AMD A8-6410 is equivalent to i5.
7 Nov 2014 - 7:00 pm | उगा काहितरीच
Hp वापरत आहे मागच्या १ते१/2 वर्षापासून . मस्त आहे. HP e015tx
7 Nov 2014 - 7:05 pm | शिद
लेनेवोचा हाय कानफिगरेशनचा लॅपटॉप मी सिडनीवरुन २०१० साली विकत घेतला होता.
मागच्या वर्षी मदरबोर्ड उडल्यानं लेनेवा सर्विस सेंटरमध्ये घेऊन गेलो दुरुस्तीला. २-३ महीने लॅपटोप तिकडेच ठेवून घेतला होता व कधीही फोन केला की एकच उत्तर मिळायचं की कंपनीतून नविन मदरबोर्ड मागवला आहे. भारतात असे मदरबोर्ड मिळत नाहीत म्हणे.
शेवटी एक दिवस त्यांचाच फोन आला की कंपनीनं मदरबोर्ड बनविण्याचं बंद केलं आहे त्यामूळे लॅपटॉपचा मदरबोर्ड बदलून मिळणार नाही व लॅपटॉप घरी घेवून जावा.
आता काय लॅपटॉप तसाच घरी धुळ खात पडला आहे. :(
7 Nov 2014 - 7:56 pm | धर्मराजमुटके
कोणताही घ्या काही फरक पडत नाही.
लॅपटॉप मध्ये प्रामुख्याने दोन प्रकार असतात. कंझ्युमर सेगमेंट व कमर्शियल सेगमेंट.
कंझ्युमर सेगमेंट च्या तुलनेत कमर्शियल सेगमेंट चे मॉडेल महाग असतात. पण दर्जा उत्तम असतो.
कंझ्युमर सेगमेंट च्या प्रॉडक्टवर १ वर्षाची वॉरंटी मिळते. ( कधीकधी स्कीमअंतर्गत काही पैसे जास्त देऊन वॉरंटी वाढविता येते.) मात्र कमर्शियल सेगमेंट वर बाय डिफॉल्ट ३ वर्षांची वॉरंटी मिळते.
लेनोवो, एचपी, एसर किंवा लेनोवो या सर्व कंपन्यांच्या वेबसाईटवर याची माहिती मिळेल.
वर आदूबाळ यांनी उल्लेख केलेला थिंकपॅड टी ४१० हा कमर्शिअल सेगमेंट मधे मोडतो.
ऑनलाईन शॉपींग पोर्टल आणि क्रोमासारख्या स्टोअर्समधे कमर्शिअल सेगमेंट चे प्रॉडक्ट तुम्हाला मिळणार नाहित. त्याचे डिलर वेगळे असतात.
५०,००० ते ६०,००० ची वस्तू घेताय आणि ती १ वर्षाने खराब झाली तर कसे वाटेल ? म्हणून शक्यतो ३ वर्षे वॉरंटीवाले प्रॉडक्ट निवडा. जर एक वर्षात प्रॉडक्ट बदलायचे असेल तर माझे काही म्हणणे नाही.
आता ५०,००० ते ६०,००० हार्डवेअर वर खर्च करणार म्हणजे सॉफ्टवेअर वर खर्च करण्यासाठी पैसे उरणार नाहीच. मग Autocad विकत घेण्यासाठी पैसे नसणारच तेव्हा ते तुम्ही पायरेटेडच वापरणार नाही का ? :) तर ते असो.
पायरसीबद्दल तिटकारा असेल तर ( तसा भारतीय सापडणे जरा विरळाच म्हणा). ड्राफ्टसाईट हे सॉफ्टवेअर वापरा असे सुचवेन. हे डसॉल्ट सिस्टम या बाप कंपनीचे सॉफ्टवेअर आहे आणी बेसीक सॉफ्टवेअर मोफत आहे. विशेष म्हणजे Autocad च्या फाईल्स त्यात ओपन आणि एडीट ही होतात.
अजून काही माहिती हवी असेल तर निशं:क विचारा.
अवांतर : बाकी तुमचे कॉन्फिगरेशन आवडले. आय ५ किंवा ७ प्रोसेसर, ८जीबी मेमरी आणि १ टीबी हार्ड डिस्क असलेली स्त्री मी उभ्याच काय पण आडव्या, तिरप्या जन्मात देखील पाहिली नाही.
(अतिअवांतर : अवांतर प्रतिसाद मजेमजेत आहे. सिरीयसली घेऊ नये.)
7 Nov 2014 - 10:40 pm | खटपट्या
सहमत
मुटके साहेबांनी सांगीतलेला थिंक्पॅड ४३० घ्या. एकदम दणकट. गेली दोन वर्षे वापरतोय ! काही प्रोब्लेम नाही !!
8 Nov 2014 - 7:50 am | कंजूस
सर्व अनुभवाचे बोल आवडले.
प्रतिसाद गमतिदार(मुवीयांचा) आणि माहितीपूर्ण. संदिप एस-विंडोज ८ ,८.१कशी त्रुटियुक्त, वापरायला किचकट वाटते? धर्मराजमुटकेचा प्रतिसाद पटला.
8 Nov 2014 - 1:38 pm | मोक्षदा
आम्हाला पण laptop घेण्याचा विचार आहे ,
सगळ्यांची माहिती उपयोगी पडेल साग्ल्ल्यानच धन्यवाद
8 Nov 2014 - 1:58 pm | श्रीगुरुजी
डेल इन्स्पिरॉन १५२५ चा वाईट अनुभव आहे. लॅपटॉप घेतल्यानंतर काही महिन्यातच कूलिंग फॅन गेला. तो बदलण्याची किंमत ३-४ हजार रूपये आहे. बाकी ठीक चाललाय.
8 Nov 2014 - 2:12 pm | विजुभाऊ
धमाल मुलाला विचारा त्याच्या ल्यापटॉपच्या कळफलकावर बरेचदा कॉफी सांडलेली आहे.
या बाबतीत सर्वात ज्यास्त अनुभवी तोच असेल
9 Nov 2014 - 10:13 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
एच.पी. घ्या. तुम्हाला सिम्युलेशनसाठी हवा असेल तर रॅम १६ जी.बी. घ्या. थोडे पैसे जास्त जातील पण इट'स वर्थ ईट.
आय ७ फोर्थ जनरेशन
१६ जी.बी. गेमींग रॅम
१ टी.बी. हार्ड डिस्क
रेडॉन ९ सेरिज च १ किंवा २ जी.बी. डी.डी.आर. ५ वालं ग्राफिक्स कार्ड
९ सेल ची बॅटरी
आणि १५.६" चा स्क्रीन असलेलं कॉन्फिग निवडा.
9 Nov 2014 - 9:42 pm | अत्रन्गि पाउस
अति चिकित्सक पणा करू नका...
त्या बजेट मध्ये येणारा कोणताही laptop उत्तमच असेल ... आणि चांगलेच काम करेल ..
आणि १ वर्षात त्यावेळच्या उपलब्ध laptops मध्ये तो औटडेटेड झाला असेल ह्याची खात्री बाळगा
10 Nov 2014 - 11:16 am | Madhavi_Bhave
आदूबाळ, प्रसाद१९७१, माईसाहेब कुरसूंदीकर, संदिप एस, मुक्त विहारि, पैसा, पिलीयन रायडर, योगी९००, उगा काहितरीच, शिद, धर्मराजमुटके, खटपट्या, कंजूस, मोक्षदा, श्रीगुरुजी, विजुभाऊ, कॅप्टन जॅक स्पॅरो, अत्रन्गि पाउस
आपण सर्वांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल खूप खूप आभार.
10 Nov 2014 - 11:16 pm | हुकुमीएक्का
Processor, Mainboard, RAM, Hard disk या गोष्टी जास्त महत्वाच्या असतात. माझा पार्ट टाइम Business Computer Sales, Repair & Maintenance आहे. खुप ठिकाणी हेच पहायला मिळते की ज्या गोष्टींची गरज आहे त्याच गोष्टी Missing असतात.
माझ्या मते
Processor - 3rd Gen असावा - i5 सुद्धा चालेल. i7 च पाहीजे असे काही नाही.
Mainboard - Compatible असावा पण स्पीड साठी Particular category मधीलच असावा.
Ram - निदान 8 GB
Graphics Card- शक्यतो २GB ते 4GB NVIDIA असावे.
Monitor - 17 ते १९ inch असावा. ( नंतर १५.६ लहान वाटू लागतो आणि किमतीमध्ये पण जास्त फरक नसतो.)
Hard disk - 1 TB ( ठीक आहे.)
Operating System - शक्यतो Windows 7 घ्या. Windows 8 ला आणि 8.1 ला अजूनही काही Softwares म्हणावा तसा Support करत नाही आहेत. आणि Stable version नाहीये. शक्यतो Windows 7 चे Factory Version घेऊ नका. नंतर स्पीडवर परिणाम होतो.
22 Jan 2015 - 6:13 pm | सुबोध खरे
सर्व पाहून गोंधळलो आहे.
मुलाला FE (II semester) सिव्हील साठी घ्यायचा आहे. काही प्रश्न आहेत?
१)विंडोज ८.१ ला काय प्रश्न आहेत? ते कळले नाही
२) ८ GB RAM पुरेल कि १६ GB
३) ऑटोकॅड साठी हवे आहे त्याला अतिरिक्त काय लागेल ?
४) जालावर घ्यावे कि जवळच्या संगणक विक्रेत्याकडून? विक्रेते बर्याच वेळेस स्वतः ला दलाली ज्यात जास्त असते त्याची शिफारस करतात असे ऐकले आहे.
५) प्रोसेसर इंटेल घ्यावा कि ए एम डी चालेल.
६) आय ३,५ आणी ७ मध्ये प्रत्यक्ष किती फरक पडतो?
७) RAM विकत घेतल्यानंतर वाढवता येते का? आणी तसे केल्यास वारंटी संपते का?
22 Jan 2015 - 6:34 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
१. स्वानुभव विचाराल तर लॅपटॉपसाठी इंटेल (पॉवर कंझंप्शन कमी आणि गरमही तुलनेनी कमी होतो) आणि डेस्कटॉपसाठी ए.एम.डी. (पर्फोर्मस्न लै भारी) घ्यावा. (दोन्हीचे ६४ बीट व्हर्जन घ्या)
२. विंडोज ८.१ चांगली ऑपरेटिंग सिस्टीम आहे. सिक्युरिटी झक्कास आहे. शिवाय दिसायला आणि वापरायला मख्खन आहे.
३. सिव्हील इंजिनिअरिंगच्या कामासाठी अजुन दोन-तीन वर्ष ८ जी.बी. रॅम पुरेसा आहे. पण ग्राफिक्स कार्ड मात्र नक्की घ्या डीडीआर ५ १ जीबी. ऑनबोर्ड ग्राफिक्स कार्डचा रेंडरिंगसारख्या किंवा सिम्युलेशनसारख्य कामात उपयोग नाही.
४. जालावरुन घेणार असाल तरं फ्लिपकार्टपासुन लांब रहा. शक्यतो अॅमॅझॉन वरुन घ्या.
५. ३, ५ आणि ७ मधे जाणवण्याएवढा फरक आहे. तिसर्या/ चौथ्या पिढीचा आय-५ घ्या. आय-७ जलद असला तरी बराचं गरम होतो. तिसरी पिढी (आयव्ही) आणि चौथ्या पिढीच्या (हॅसवेल) मधे जाणवण्याएवढा फरक नाही. हॅसवेल तुलनेनी बरेचं जास्त गरम होतात असा अनुभव आहे. ह्याचा काही प्रॉब्लेम नसेल तर चौथ्या जनरेशन चा i5 घेउन टाका. बजेट थोडं वाढवणार असाल तर i-5 xxxxK हा अनलॉक्ड प्रोसेसरही विचारात घेउ शकता.
६. रॅम ऑथोराईज्ड डिलर कडुन वॉरंटी वर परिणाम नं होता वाढवता येतो. पण शक्यतो पहिल्यांदाच ८ जी.बी. घेउन टाका. अजुन काही शंका असतील तर कधीही फोन करा काही प्रॉब्लेम नाही.