कौटूंबिक वातावरणात भावंडांच्या केव्हा न केव्हा आपापसात कुरबुरी होतच असतात. एखाद्याची बाजू घेताना अगदी आईवडलांवरही त्यांच्या न्याय्य निष्पक्ष वागण्यावर विश्वास न ठेवता पक्षपाताचे आरोप होत असतात पण कौटूंबीक वातावरणातली हि छोटी चहाच्या कपातली वादळं बहुतांश वेळा विस्मृतीच्या आड जातात आणि स्मृतीत राहतात ते कौटूंबिक प्रेमाने भारलेले क्षण.
पण जेव्हा आपण सामाजिक परिस्थितीकडे येतो ज्या व्यक्ती समभाव आणि निष्पक्षतेने वागू इच्छितात अथवा तटस्थता बाळगू इच्छितात त्यांना केवळ पक्षपाताच्याच आरोपांना सामोरे जावे लागत नाही तर आपल्याच मंडळींच्या निष्ठूरतेस सहनही करावे लागते. नेत्यांवर बर्याचदा लोकानुनय न करता स्वतःच्याच समूहाच्या लोकांना समजवण्याची वेळ येऊ शकते पण त्यांचे अनुयायी किंवा त्यांच्या स्वतःच्या समुदायाचे लोकही अशा नेत्यांवर नाराज होताना दिसतात, प्रसंगी नेते मंडळींना स्वतःच्याच लोकांच्या संतापास सामोरेही जावे लागताना दिसते.
चहाच्या कपातली वादळं कौटुंबिक पर्सिस्थीतत जशी विस्मृतीच्या सहज आड जातात तशी सामाजिक राजकीय स्तरावरची वादळे तेवढ्या सहज शातं होत नाहीत. परस्पर अविश्वासाच आणि गढूळतेच वातावरण मनाच्या कोणत्यातरी एका कोपर्यात वागवत समुदाय जगत राहतात पण कुठे एवढीशी ठिणगी पडली की पुन्हा पेटून उठतात आणि यास जुन्या आठवणी जुने अनुभव बर्याचदा कारणीभूत होतात.
असे समुहांदरम्यानचे अविश्वासाचे वातावरण आणि नाराजी दूर होऊन सलोख्याचे वातावरण निर्मिती व्हावी म्हणून गेल्या काही दशकात Truth and reconciliation commission यात उद्देश आपण कुठे चुकलो ते प्रत्येकाने कबूल करावयाचे चुकांचा अभ्यास करून पुन्हा असे होणार नाही हे पहावयाचे, इथे भर चुकलेल्यांना शिक्षा करण्याचा नसतो तर स्वतःस बदलण्यास आणि मनोमीलनास संधी आणि परस्पर विश्वासा निर्मितीवर भर असतो. Truth and reconciliation commission वर चुकांना अजिबातच शिक्षा नसल्याची टिका होते त्या दृष्टीने कमाल सात दिवस ते एखाद महीना शिक्षांच्या तरतुदी ठेवल्यास Truth and reconciliation commission प्रक्रीयेवर अधिक विश्वास निर्माण होऊन दिर्घ कालीन सामाजीक शांतता प्रक्रीयांना बळ मिळू शकेल असे वाटते.
भारतातील सामाजिक सद्भाव वाढवण्यासाठी Truth and reconciliation commission सारखी व्यवस्था असण्या बद्दल काय मते/ दृष्टीकोण आहेत आणि न्याय्य निष्पक्षता अथवा तटस्थता बाळगणार्यांवर सर्वच बाजूंनी जो भडीमार होत राहतो त्यास कसे सामोरे जावे असे तुम्हाला वाटते, या साठी कौटूंबिक अनुभव काही प्रमाणात अप्लाय करणे शक्य असू शकेल काय ?
प्रतिक्रिया
2 Oct 2014 - 9:54 am | संजय क्षीरसागर
हा सगळ्यावर नामी उपाये.
2 Oct 2014 - 9:59 am | माहितगार
:)
2 Oct 2014 - 10:10 am | माम्लेदारचा पन्खा
कबूल करनार हितंच ग्यानबाची मेख हाय !!
2 Oct 2014 - 10:18 am | अर्धवटराव
आपल्या चुका, स्वार्थ इ. त्यागुन नवीन सुरुवात करायला सामाजीक संकेत, औपचारीकता, पायंडे तयार करणं हे परंपरा स्थापनेमागिल महत्वाचं कारण. त्यांचं सतत इव्हॅल्युएशन आणि पुनरज्जीवन करत राहाणं हा एक उपाय या समस्येवर आहे.
*श्रद्धा हा शब्द रुढार्थाने वापरला आहे. या धब्दाची माझी व्याख्या वेगळी आहे.
3 Oct 2014 - 11:11 am | कवितानागेश
लोक पूर्ण समाजाला 'कुटुंब' समजत नाहीत, आपसात दुही आहे, हाच खरा प्रॉब्लेम आहे.
कशी काय लागायची शिस्त?
अत्ता आलेले हेडमास्टर काहीतरी करु शकतील, अशी आशा आहेच. :)
3 Oct 2014 - 11:22 am | संजय क्षीरसागर
हेडमास्तर कशाला हवेत?
लोकसंख्या नियंत्रणात आली आणि देशातलं राहाणीमान सुखद झालं की देशप्रेमाला आपोआप भरती येईल.
3 Oct 2014 - 11:50 am | नाव आडनाव
लोक पूर्ण समाजाला 'कुटुंब' समजत नाहीत, आपसात दुही आहे, हाच खरा प्रॉब्लेम आहे.
लई वेळा +
3 Oct 2014 - 12:37 pm | संजय क्षीरसागर
यावर आपलं नियंत्रण नाही.
आपण आपल्याबाजूनं प्रश्न सोडवायला हातभार लावायला हवा आणि तेवढच आपल्या हातात आहे.
3 Oct 2014 - 12:49 pm | नाव आडनाव
सर, तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे, पण काही ठरलेल्या मुद्यांवरुन पब्लिक ला कायमंच खालच्या पातळी वर चर्चा (?) करतांना बघितलं तर वाईट तर वाटतंच.
3 Oct 2014 - 1:45 pm | संजय क्षीरसागर
धाग्याची सुरुवात पाहा :
धिस इज टू बी रिझॉल्व्ड.
3 Oct 2014 - 12:49 pm | मुक्त विहारि
+ १ सहमत
3 Oct 2014 - 2:26 pm | काउबॉय
याचा अभ्यास केला की सहज लक्षात येइल हे देशाबाबत का घडत नाही ते... कुटुंब ही मर्यादित (आकाराने लहान) व्यवस्था असते म्हणून ताण, प्रश्न, जबाबदारी, फायदे व कृतिंचे धडक परिणाम यासाठीची मर्यादा सामान्याच्या आवाक्यात राहते..... पण असे असुनही कुटुम्बे सातत्याने विभक्त होतच असतात आणि इतरही बाबी आहेत ज्याला आपण चहां कपातिल वादळे नक्कीच म्हणु शकत नाही.