नवीन संपादक

नीलकांत's picture
नीलकांत in घोषणा
29 Sep 2014 - 2:02 pm

नमस्कार,

आज पासून मिसळपाव.कॉम च्या संपादक मंडळात तीन नवीन संपादक सहभागी झाले आहेत. तसेच मिसळपावच्या महिला दालनात एक नवीन संपादक सहभागी होत आहे. येत्या सहा महिण्यांसाठी ह्या नेमणुका असतील. त्यापुढे आवश्यकता भासल्यास नवीन घोषणा करता येईल.

नवीन संपादकांची नावे

१) इस्पीकचा एक्का
२) स्नेहांकिता
३) अजया

अनाहिता संपादक
१) मितान

सर्व नवीन संपादकांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभकामना.

प्रतिक्रिया

एस's picture

30 Sep 2014 - 6:12 pm | एस

आणि संपादन करण्यालायक काही लिहू नये ही विनंती.

नवीन संपादक निरागस आहेत. :-P (ह. घ्या.)

बादवे, प्रतिसादकांनो, वरील विनंती गं. घ्या.

संपादक म्हणून जे काही भोगावे लागते, याचा चांगला अनुभव माझ्यापाठीशी देखील आहे ;)
त्यामूळे तुम्हाला सर्वात जास्त ज्याची गरज आहे ते "भरपूर शुभेच्छा" :)

इस्पीकचा एक्का यांच्या लेखनामुळे थोडीफार ओळख झाली आहे व मितान मला चांगला ओळखते ;) तारेवरची ही कसरत तुम्हाला सहज जमेल व सर्वत्र आनंदच पसरत राहो यासाठी तुम्ही सर्वजण मनापासून या लष्कराच्या भाकऱ्या थापत प्रयत्न कराल याची खात्री आहे.

पुन्हा एकदा भरपूर शुभेच्छा आणि अभिनंदन!

**
सिलसिले के बाद कोई सिलसिला रौशन करें
इक दिया जब साथ छोड़े दूसरा रौशन करें -ज़फ़र गोरखपुरी

संपादक म्हणून जे काही भोगावे लागते, याचा चांगला अनुभव माझ्यापाठीशी देखील आहे >>>

=)) =)) =)) =))

" व्हायचे थांबले का " वाले आठवले ;)

दशानन's picture

29 Sep 2014 - 10:12 pm | दशानन

हसू नको मेल्या! =))

किसन शिंदे's picture

29 Sep 2014 - 10:41 pm | किसन शिंदे

सर्व नवीन संपादकांचे अभिनंदन!!

सर्व नवनिर्वाचित संपादकांचे हार्दिक अभिनंदन.
शुभेच्छुक - समस्त मिपा वाचक मंडळ

सर्व नवीन संपादकांचे संपादक मंडळात स्वागत, अभिनंदन आणि शुभेच्छा! जास्त काही सांगून आताच घाबरवत नाही! सतत आईस-बकेट चॅलेंज घेऊन आहात असा विचार केलात तरी हरकत नाही! ;)

प्रचेतस's picture

29 Sep 2014 - 11:29 pm | प्रचेतस

नवीन संपादकांचे अभिनंदन व शुभेच्छा.

भिंगरी's picture

30 Sep 2014 - 12:22 am | भिंगरी

अभिनंदन!!!!!!!!!!!

आनन्दिता's picture

30 Sep 2014 - 2:14 am | आनन्दिता

नवनिर्वाचितांचे अभिनंदन!! अगदी सार्थ निवड..

जाता जाता: संपादक पदासाठी पुढच्या जागा कधी निघणार आहेत? :) :)

प्रभाकर पेठकर's picture

30 Sep 2014 - 9:14 am | प्रभाकर पेठकर

इच्छुकांनी शक्ती प्रदर्शन करावे.

स्रुजा's picture

30 Sep 2014 - 5:46 am | स्रुजा

अभिनंदन!!!

इशा१२३'s picture

30 Sep 2014 - 9:59 am | इशा१२३

नवीन संपादकांचे अभिनंदन.
नविन संपादकांनी आपले लेखन पहिल्यासारखेच जोमाने सुरु ठेवावे अशी विनंती. :smile:

बहारिन् चा खलिफा's picture

30 Sep 2014 - 12:05 pm | बहारिन् चा खलिफा

नवीन संपादकांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!

मितान's picture

30 Sep 2014 - 12:19 pm | मितान

माझ्यासारख्या आळशी व्यक्तीला कामाला लावणं हे आईसबकेटच्यालेंजाहून अवघड काम आहे. त्यासाठी जेष्ठ संपादकांना हार्दिक शुभेच्छा ! ;)

प्रभाकर पेठकर's picture

30 Sep 2014 - 4:16 pm | प्रभाकर पेठकर

'उत्साह' आवडला.

अजया's picture

30 Sep 2014 - 1:40 pm | अजया

धन्यवाद सर्वांनाच!!

राजेश घासकडवी's picture

30 Sep 2014 - 8:41 pm | राजेश घासकडवी

नवीन संपादकांना शुभेच्छा...

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

1 Oct 2014 - 3:58 am | निनाद मुक्काम प...

मनःपूर्वक अभिनंदन , नवीन संपादकांची पूर्वी कधी राडे झाले होते का हे आठवण्याचा प्रयत्न केला पण मग लक्षात आले
अलीकडे मी खूप मवाळ झालो आहे ,
सब का साथ सबका विकास धोरण अंगवळणी पडल्याने पुढील ५ वर्षात संपादकासह मिपाकर व मालकाशी सौजन्याने वागण्याची लेखी हमी भरत आहे :-)

शशिकांत ओक's picture

2 Oct 2014 - 2:18 am | शशिकांत ओक

नव संपादकांचे अभिनंदन...

ए़डमिनना विनंती -
एकूण आता अन्य संपादक मिळून किती जण झाले? त्यांची नावे व अन्य माहिती पुन्हा दर्शवता आली तर छवी तयार होईल. छान,

कुणाच्या विचारांचा दर्जा कुणी ठरवू शकत नाही पण माझ्या वडिलांबद्दलच्या कवितांना घाणेरड्या प्रतिक्रिया आल्या. याबाबत आपले काही मार्गदर्शन मिळेल का? मला अशा लोकांकडे दुर्लक्ष करायचे असते हे माहीत आहे. मला खरेच त्यांची कीव...कीव येते.कुठलाही माणूस असे दुर्गंधीयुक्त विचार घेऊन मोठा होत नसतो.