अ‍ॅ अक्षराच्या लेखन वाचनातील समस्या आणि प्रमाणीकरण

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
8 Sep 2014 - 9:16 am
गाभा: 

आपण काही वेळा समस्यांनाही एवढे सरावलेले असतो कि नियमीत भेडसावणारी गोष्ट समस्या वाटेनाशी होते. अशाच काही अडचणी अ‍ॅ अक्षरा संबंधीत आहेत

१) ऄ (0904) ऎ (090E) (U+0944 ॆ) ऒ (U+091) (U+0948 ॊ) कंसातील युनिकोड क्रमांक कदाचीत जरासे वेगळे असू शकतील या युनोकोड चार्ट मध्ये म्ह्टल्या प्रमाणे देवनागरीत उपलब्ध केली जाणारी हि अक्षरे काश्मिरी बिहारी आणि दाक्षीणात्य (short e किंवा short o) उच्चारणे दाखवण्यासाठी उपयूक्त असू शकतील असे म्हटले आहे.

१ अ) ऄ (0904) ऎ (090E) (U+0944 ॆ) ऍ (090D) आणि मराठीचा अधिकृत अ‍ॅ (0972 ) यांच्या अभिप्रेत उच्चारणातील साम्य आणि भेद कोणते

१ ब) ऄ (0904) ऎ (090E) (U+0944 ॆ) ऒ (U+091) (U+0948 ॊ) हि अक्षरे काही अपवादात्मक कळफलक रचनात (किबोर्ड लेऑउट) मध्ये दिसून येतात. माझ्या मता प्रमाणे अपवादात्मक परिस्थितीत काश्मिरी बिहारी दाक्षीणात्य उचारणे दाखवण्यासाठी ती कॉपी पेस्टही करता येऊ शकतील. या अक्षरांचे मराठी कळफलकांवर असणे आणि काही गरजेच्या मराठी अक्षरांचे नसणे यामुळे काही लोकांच्या टंकनात समस्या उद्भवताना दिसतात तसेच मराठी कळफलकाच्या प्रमाणीकरणात अडथळा येतो असे वाटते. अर्थात हे माझे व्यक्तीगत मत झाले होता होईतो व्यापक सहमती साधता यावी म्हणून हा विषय येथे मांडत आहे. दुमत असल्यास कृपया सकारण नोंदवावे म्हणजे चर्चा करता येईल.

२ अ) ऍ (090D) हिंदी किंवा इतर कोणत्या भारतीय भाषेसाठी आहे का ? आणि या अक्षराचे मराठी कळफलकांवर असणे गरजेचे आहे का? कारण इनस्क्रिप्ट सारख्या महत्वाच्या कळफलकावर अ‍ॅ (0972 ) ची गरज असताना विनाकारण ऍ (090D) ने जागा अडवली आहे. त्यामुळे हि इनस्क्रिप्ट वाली मंडळी अ + ॅ = अॅ असे करून दुधाची तहान ताकावर भागवतात पण अ‍ॅ (0972 ) हा एक संघ अ‍ॅ आणि अॅ (अ + ॅ ) हे युनिकोडात वेगवेगळे असल्यामुळे शोध यंत्रात एकसंघ अ‍ॅ (0972 ) चा शोध घेताना अॅ (अ + ॅ ) असे लेखन केलेल्या अ‍ॅ ंचा तसेच त्या विरुद्ध प्रकारच्या शोधातही मराठी अ‍ॅ चे सर्व शोध आंतर्भूत होऊ शकत नाहीत.

२ ब) मराठी विकिपीडियावर वैश्विक टायपिंग सुविधे अंतर्गत (मायक्रोसॉफ्टच्या मदती शिवाय) जे क्वेरी/जावा अधारीत मराठी इनस्क्रिप्ट कळफलक उपलब्ध आहे किमान मराठी विकिपीडियावरच्या इनस्क्रिप्ट कळफलकात ऍ (090D) काढून बरोबर अधिकृत मराठी अ‍ॅ (0972 ) तांत्रीकदृष्ट्या शक्य होईल असे वाटते. तत्पुर्वी ऍ (090D) चा मराठी अथवा मराठी बोलींसाठी काही उपयोग असण्याची फारशी शक्यता नसल्याबद्दल दुजोरा हवा आहे.

२ क) कुणाकडे मायक्रोसॉफ्ट विंडोज ८ असल्यास त्याच्या मराठी इनस्क्रिप्टात सुद्धा अजूनही ऍ (090D) ने जागा अडवलेली आहे का याची माहिती हवी आहे.

२ ड) मायक्रोसॉफ्ट विंडोज संगणकांसोबत गेलेल्या अथवा भविष्यात वितरीत होणार्‍या मराठी इनस्क्रिप्टात सुद्धा अजूनही ऍ (090D) ने जागा अडवलेली आहे ती जागा बरोबर अधिकृत मराठी अ‍ॅ (0972 ) ला मिळवून देण्यासाठी आणि उपयोग कर्ते सजगते साठी काय करता येऊ शकेल. ?

२ इ) गमभन आधारीत मिपा आणि ऐसी या स्थळांवरही अधिकृत मराठी अ‍ॅ (0972 ) न वापरता अॅ (अ + ॅ ) असे लेखन केले जाते या मागची तात्वीक भूमीका कोणती की हे एक मागे पडलेले काम आहे.

३) खालील प्रकारची समस्या इतर कुणाला कधी जाणवते का ? हि समस्या आपल्या परिचयाची आहे का ? असल्यास ह्या समस्येचे शक्य निवारण काय असू शकेल ?

मराठी विकिपीडियावर ॲरिस्टॉटल नावाचा लेख आहे. यात अ‍ॅ या युनिकोडाक्षराची दोन वळण असावीत पण बहुधा युनीकोड संकेतांक एकच (बहुधा 0972) असावा कारण शोधयंत्रातून ती एक सारखे पणानेच शोधली जातात, हा सिंगल ॲ आहे, बहुधा अ + ॅ नव्हे कारण अ + ॅ = अॅ असेल तर बॅकस्पेसने ॅ वगळल्यास अ शिल्लक राहतो तसे ॲरिस्टॉटल लेखातील केसमध्ये होत नाहीए.

अ‍ॅरिस्टॉटल मधील अ‍ॅ ची दोन्ही वळण माझ्या सहीत बहुतांश लोकांना व्यवस्थीत दिसत असावीत, त्याच वेळी खालील चित्राप्रमाणे काही जणांना अडचण येते आहे. त्यांचा ब्राऊजर आणि ओएस ची कल्पना नाही, समजा ब्राऊजर आणि ओएस संबंधीत समस्या असतीतर एकच युनिकोड संकेतांक असलेल एक वळण दिसतय आणि एक वळण दिसण्यात समस्या येते आहे असे व्हावयास नको असे वाटते. समस्येचा ओळखण्यात/ अंदाजा बांधण्यात काही मदत मिळाल्यास हवी आहे.

समस्या येणार्‍याना अ‍ॅरिस्टॉटल लेख खालील प्रमाणे दिसतो.

प्रतिक्रिया

अगदी अ‍ॅ हे अक्षरही एॅ असे टंकले जाते किंवा बर्‍याच ब्राउजर्स् मध्ये तसे दिसते. उदा. इंटरनेट एक्स्प्लोअरर मध्ये मिपावर टंकताना अ‍ॅ हे व्यवस्थित उमटते. पण पूर्वदृश्यावर क्लिक केले की अ वेगळा आणि ॅ वेगळा दिसतो.

माहितगार's picture

8 Sep 2014 - 10:47 am | माहितगार

उदा. इंटरनेट एक्स्प्लोरर मध्ये मिपावर टंकताना अ‍ॅ हे व्यवस्थित उमटते. पण पूर्वदृश्यावर क्लिक केले की अ वेगळा आणि ॅ वेगळा दिसतो.

*मी आत्ता इंटरनेटएक्सप्प्लोरर ची १आव्र्त्त्वृत्तीतून मिपाचे अ‍ॅ साठी पूर्वपरिक्षण पाहिले ते व्यवस्थीत दिसते आहे पण तसेही वर म्हतल्या प्रमाणे मिपा आणि ऐसी आणि गमभन चा अ‍ॅ एकसंघ अ‍ॅ नाहीच तो वर म्हटल्या प्रमाणे अ आणि ॅ

ने बनवला आणि वस्तुतः अ‍ॅ (0972 ) हे एकसंघ अक्षर वापरले जावयास हवे. (मला इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये टायपिंग स्पीड फार म्हणजे फार कमी मिळत आहे कदाचित त्यांचा इंग्रजी वाला स्पेल चेकर चालू असल्यामुळे ?बापरे थकलो मी)

मी इंटरनेट एक्सप्लोररचा वापर करणे आणि त्यांच्या वापरकर्त्यांच्या समस्या विसरूनच गेलो होतो त्याचे स्मरण तुमच्या प्रतिसादाने झाले त्याव्बद्दल धन्यवाद

माहितगार's picture

8 Sep 2014 - 10:54 am | माहितगार

अगदी अ‍ॅ हे अक्षरही एॅ असे टंकले जाते किंवा बर्‍याच ब्राउजर्स् मध्ये तसे दिसते

* हम्म इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये तुमच्या प्रतिसादात मला ए आणि ॅ वेगवेगळे दिसते आहे पण अ‍ॅ एकत्र दिसतो आहे.

* कबर्‍याच म्हणजे आपला इतर कोणत्या टंकन प्रणाली आणि ब्राऊजर्स कडे निर्देश आहे ?

मला मोझिलामध्ये एॅ एकसंधच दिसते आहे. परंतु इंटरनेट एक्स्प्लोअररमध्ये गडबड होते. तसेच मोबाईल वरील ब्राउजरमध्येही हे सगळं वेगळंच काहीतरी दिसते. तुमच्याच http://www.misalpav.com/node/28783 ह्या लेखावरील अक्षरेही मोझिला व आयई या दोन्ही ब्राउजर्स मध्ये वेगळी आणि मोबाईल ब्राउजरमध्ये व्यवस्थित दिसतात. त्यामुळे बराच घोळ होतो आहे.

माहितगार's picture

10 Sep 2014 - 2:00 pm | माहितगार

मराठी विकिपीडियावर संतोष नावाचे सदस्य आहेत त्यांनी त्यांच्या चर्चा पानावर विवीध प्रणालील अ‍ॅ च्या गोंधळाचीबरीच छायाचीत्रे उपलब्ध केली आहेत. त्या छायाचित्रांमध्ये दाखवलेल्या पैकी कोणकोणते अ‍ॅ चे गोंधळ तुम्ही अनुभवले आहेत हे कळवलेत आणि त्या यादीत नसलेल्या गोंधळ अनुभवला असेल तर त्या बद्दल माहिती दिल्यास वेगवेगळे इश्यू सॉर्ट आउट करण्यासाठी बरे पडेल.

एस's picture

10 Sep 2014 - 3:01 pm | एस

मला लिंक देऊ शकलात तर मी प्रयत्न जरूर करेन.

माहितगार's picture

10 Sep 2014 - 6:18 pm | माहितगार

ओह सॉरी मी दुवा न जोडण्याचा गोंधळ केलेला दिसतोय. हा दुवा पहावा

हे होऊन गेल्या नंतर कदाचित आपल्याला ह्या दुव्यावरील चर्चेतही सहभागी होण्यास आवडेल असे वाटते.

एस's picture

10 Sep 2014 - 7:55 pm | एस

या उदाहरणांमधील

 3.ऑपरेटिंग सिस्टिम:Ubuntu 11.10 ब्राऊजर:Firefox 20
17.ऑपरेटिंग सिस्टिम:Ubuntu 11.10 ब्राऊजर:Firefox 7
18.ऑपरेटिंग सिस्टिम:Ubuntu 11.10 ब्राऊजर:Firefox 9
19.ऑपरेटिंग सिस्टिम:Ubuntu 11.10 ब्राऊजर:Firefox 11
20.ऑपरेटिंग सिस्टिम:Ubuntu 11.10 ब्राऊजर:Firefox 12

ही पाच उदाहरणे 'अ‍ॅ' हे अक्षर व्यवस्थित दर्शवितात. त्याचबरोबर 'स्टॉ' हे अक्षरही व्यवस्थित उमटलेले त्याच उदाहरणांत दिसतात.

'तत्त्वज्ञ' ह्या शब्दामधील किंवा 'सत्ता' या शब्दामधील अर्धा त + त हे जोडाक्षर जुन्या मराठी वळणाप्रमाणे दिसत नाही. जुन्या वळणानुसार एकाच 'त' च्या तोंडाशी थोडी आडवी रेघ बाहेर आली पाहिजे.

विकिपीडियावरील चर्चेमुळे बरीच माहिती मिळाली. धन्यवाद. जमेल तसे तिथेही भाग घेईन.

माहितगार's picture

11 Sep 2014 - 9:59 am | माहितगार

टिप
त्या चर्चेतील छायाचित्रा सोबतची माहितीत एक महत्वाची (क्रिटीकल) गोष्ट मिसींग राहते कि संबंधीत ब्राऊजर आणि ऑपरेटींग सिस्टीममध्ये कोणते फाँट/टंक संच वापरले आहेत. नेमके कोणते अद्ययावत उत्कृष्ट फाँट संच चांगले आणि कोणते त्रुटी दर्शवतात हे समजले तर उपयोगकर्त्यांना त्रुटी यूक्त फाँट संच चांगल्या अद्ययावत फाँट संचाने बदलता येतील. अर्थात कोणत्या ठिकाणी कोणता फाँट वापरला जातोय हे कळणे तांत्रिक दृष्ट्या जिकीरीचेच असते, पण तेही काम मराठी लोकांनी मिळून तडीस नेण्याची गरज आहे त्या साठी लौकरच वेगळा स्वतंत्र धागा काढेनच.


जरासा फरक

* आपण उबुन्टू 20.ऑपरेटिंग सिस्टिम:Ubuntu आणि फायर फॉक्स ब्राऊजर्सचा उल्लेख करता आहात ते स्वतः या पद्धती वापरत असल्यामुळे करत आहात आणि आपल्याला अ‍ॅरिस्टॉटल शब्द सर्वत्र ठिक दिसताहेत असे म्हणावयाचे आहे का ? तसे असेल तर आनंदाचीच गोष्ट ठरेल आणि आपण ऑपरेटिंग सिस्टिम:Ubuntu सोबत कोणते टंक वापरता आहाते हे समजून घेण्यास आवडेल

* परंतु वास्तवात सध्याची सर्वात मोठी तक्रार ऑपरेटिंग सिस्टिम:Ubuntu सोबतचीच दिसते आहे. या धागा लेखात अथवा आपण दुवे दिलेली छायाचित्रे पुन्हा एकदा अभ्यासली तर विकिपीडियातील अ‍ॅरिस्टॉटल लेखातील केवळ लेख शीर्षकात आणि विभाग शीर्षकात अ‍ॅरिस्टॉटल शब्द व्यवस्थीत दिसतो आहे. पण लेखात इतरत्रचा अ‍ॅरिस्टॉटल शब्द व्यवस्थीत दिसत नाही आहे.

** आपण ती छायाचित्रे पुन्हा तपासलीत तर ऑपरेटिंग सिस्टिम:Ubuntu आणि फायरफॉक्स वापरणार्‍या उपयोग कर्त्यांना सर्वाधिक कठीण जाते आहे. विंडोज शिवाय इतर प्रणालीत मॅक ओ.एस. ग्रेट नाही पण मॅनेज करून नेते आहे अ‍ॅ हे अक्षर मॅक मधे दिसते तरी. ऑपरेटिंग सिस्टिम:Ubuntu चा वापर बर्‍यापैकी आहे. ऑपरेटिंग सिस्टिम:Ubuntu आणि फायरफॉक्सवर शीर्षकेतर भागात अ‍ॅ दिसतच नाही पण लेखनात काही चूक असावी असा भास होतो. आपण किंवा इतर कुणी ऑपरेटिंग सिस्टिम:Ubuntu फा फॉ चे जाणकार असतील आणि समस्या कशी दुर करता येते हे जाणून घेणे अत्यंत निकडीचे आहे.

* विंडोज ८ ओपरेटींग सिस्टीम दृष्यता त्रुटी नसल्या मुळे अ‍ॅ आणि त ला त जोडलेले दोन्ही अपेक्षे प्रमाणे दिसते म्हणून सर्वाधिक बरी दिसते आहे. विंडोज ७ मध्ये अ‍ॅ व्यवस्थीत दिसतो पण त ला त जोडलेले दिसते पण फाँट जाणकारांना अपेक्षीत आदर्श पद्धतीने दिसत नाही (अर्थात याला विंडोज ७ सोबतचा डिफॉल्ट फाँट अधीक जबाबदार असण्याची शक्यता वाटते). व्हिस्टात व्यवस्थीत दिसत नाही पण व्हिस्टाचा वापर खूपही प्रचलीत नसल्यामुळे तेवढी काळजी वाटत नाही. पण विंडोज एक्सपी मध्ये अ‍ॅ न दिसणे मोठी समस्या आहे ( कारण शासकीय संस्था आणि ग्रामीण भागातील संगणकात अजूनही एक्सपी बर्‍या पैकी वापरात असेल अशी शक्यता वाटते. मी खूप पुर्वी एक्सपी वापरले होते तेव्हा मला का कोण जाणे ह्या समस्येची जाणीव झाली नव्हती) आयपॅड सफारी या काँबीनेशन ला अ‍ॅ आणि त्त हे दोन्ही व्यवस्थीत दिसते पण आय फोनला त्त चे जोडाक्षर अपेक्षीत दिसते मात्र आय फोनमध्ये अ‍ॅ मात्र गंडलेलाच आहे.

**(जे लोक डायरेक्ट या प्रतिसादावर पोहोचले असतील त्यांच्या साठी टिप चर्चा जुन्या ऍ (090D) बद्दल होत नसून मराठीचा अधिकृत अ‍ॅ (0972 ) असंख्य प्रणालीतून अद्याप न दिसण्या बद्दल चालू आहे. समस्य अजून तरी मोठी आहे पण चलता है संस्कृती मुळे आपल्यातील असंख्य ती सहन करताहेत)

तुम्ही उपस्थित केलेले मुद्दे लक्षात आले होते. पण मी केवळ सुलेखनाच्या दृष्टिकोनातून अ‍ॅ कसा काढला किंवा टंकला जावा ह्यावर माझे मत व्यक्त केले आहे.

मराठी टंकनात सुसंगती व एकसमानता हवी ह्याबद्दल सहमत. अजून एक मुद्दा म्हणजे टंकनाचा क्रम हा आपण लिहितो तसाच असायला हवा. उदा. पहिली वेलांटी असलेले अक्षर टंकायचे असेल तर आधी वेलांटी आणि मग अक्षर असाच क्रम असायला हवा होता. असो..