गाभा:
आज आपण अंतर्जालावर लिहितो. पण का लिहतो? हा एक प्रश्न किती दिवसांपासून मनात येतोय. आपण लिहितो त्या मागे काही कारणे असतातच. म्हणून हा प्रश्न.
माझ स्वत:चे म्हणाल तर वयाच्या पन्नासी नंतर अंतर्जालावर आपण लिहू शकतो हे आणि लोक ते वाचतील ही. मी मोडकी-तुटकी का होईना मराठीत लिहायचा निर्णय घेतला. अर्थात लिहिताना पुष्कळ समस्या आल्या पण लिहिणे सुरु ठेवले. माझा लिहिण्याचा उद्देश्य समाजातले आर्थिक, सामाजिक आणि राजनैतिक सत्य लोकांसमोर ठेवणे.
सत्याबाबत म्हणाल तर सहा आंधळ्यांनी, सहा प्रकारे हत्तीचे वर्णन केले. सर्वांचे वर्णन वेगळे असले तरी प्रत्येकाच्या दृष्टीने ते सत्य होते.
मला दिसलेले सत्य लोकांना पटले पाहिजे असा माझा आग्रह नाही.
प्रतिक्रिया
5 Sep 2014 - 12:33 pm | बॅटमॅन
काही नवीन वाचतां कंडुअतिशमनार्थ लेख तो ल्याहावा |
तेहीं नसतां मग प्रतिसादोन काळ काढावा ||
5 Sep 2014 - 10:17 pm | खटपट्या
या प्रकारचा मूळ श्लोक माहित आहे का ?
6 Sep 2014 - 10:26 pm | अत्रन्गि पाउस
इथे देण्या जोगा
नहि...:)
6 Sep 2014 - 11:04 pm | टवाळ कार्टा
टाका की...दुसर्या एका संस्क्रूत वरील लेखाच्या एका प्रतिसादात होता तो...मिपावरच
6 Sep 2014 - 11:07 pm | खटपट्या
मला वाटत उडवल्या जाइल !!!
6 Sep 2014 - 11:52 pm | टवाळ कार्टा
आधीचा नव्हता उडाला :)
7 Sep 2014 - 8:07 am | खटपट्या
व्यनि केलाय !!
6 Sep 2014 - 11:05 pm | खटपट्या
बरोब्बर !! :)
5 Sep 2014 - 12:34 pm | मंदार दिलीप जोशी
(१) व्यक्त होणे ही माझी गरज आहे (या वाक्यात संपतं कारण पण तरी......)
(२) अशा संस्थळांवर लिहीले की (अ) आपण लिहीतो त्यातल्या चुका प्रतिसादांमुळे, खरडींमुळे तिथल्यातिथे समजतात. (ब) लिहीणे सुधारते, दिशा मिळते.
(३) लिखाणावरच्या प्रतिसादांमुळे ज्ञानवृद्धीही होते - त्याचा उपयोग मग लिखाण सुधारण्यातही होतो.
5 Sep 2014 - 12:35 pm | कंजूस
बरेच उपमुद्दे आहेत मुख्य दोन १)का लिहितो आणि २)आंतरजालावरच का लिहितो.
5 Sep 2014 - 12:49 pm | जेपी
आंजावर का लिहीतो ?
.
.
.
.
काय माहित नाय ब्बॉ.
5 Sep 2014 - 12:59 pm | प्रसाद गोडबोले
मी लिहितो
कारण १ ) टवाळखोर प्रतिसाद : ऑफीसात काम नसते , खरडफळ्यावर गफ्फा मारायला कोणी नसते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मिपावरच्या काही आयडीं ( ब्यॅट्या , सूड , धन्याप्यारे , नेफळे वगैरे ) सोबत बौध्दिक वादावादी करायला लय मजा येते *biggrin* ... नो ऑफेन्स हं फ्रेन्ड्स !
कारण २ )गंभीर प्रतिसाद : फार क्वचितवेळा गंभीर प्रतिसाद लिहिण्याची वेळ येते ( तेव्हा मग ऑफीसात काम असुनही वेळ काढला जातो) जेव्हा एखाद्याविषयावर आपले मत कंप्लीटली ऑर्थोगोनल (मराठी ? संपुर्ण विरोधी ?) असते तेव्हा ते लोकांना कन्व्हे करण्याची प्रॅक्टीस करता येते शिवाय हुशार लोकांशी चर्चा केल्याने जर आपले मत चुकीचे असेल तर बदलता येते किंव्वा बरोबर असेल तर त्यातील लूपहोल्स रिमुव्हता येतात .
कारण ३ ) काथ्याकुट धागा : लईच कंटाळा आला असल्यास आणि लईच वादग्रस्त विषय हाती लागल्यास्की काथ्याकुट धागा काढतो ... ( अर्थात आपल्या काथ्याकुटवर कुटाकुटी झाली नाहीतर लई वाईटही वाटते )
कारण ४ ) स्वतंत्र लेखन ( कविता कथा लेख गोष्ट वगैरे ): हे तर फार म्हणजे फार क्वचितवेळा करण्याचा योग येतो ...पण काही काही विषय असे असतात की मला बस्स बोलायचंय ऐकायला कोनी नसलं तरी चालेल मला बस्स बोलायचंय असं जेव्हा वाटतं तेव्हा असे काही लेखन करतो !
5 Sep 2014 - 2:47 pm | बॅटमॅन
आयला मनातलंच बोललास की रे.
5 Sep 2014 - 4:22 pm | सूड
असेच म्हणतो.
5 Sep 2014 - 1:52 pm | प्रसाद१९७१
खरे खुरे उत्तर असे आहे की असले आजा वर प्रतिक्रिया वगैरे लिहीण्याचे उद्योग मी ऑफिस मधुनच करतो, घरुन अजिबात नाही.
वाचना बद्दल म्हणाल तर,
चर्चा आणि प्रतिक्रीया वाचुन नविन काहीच हाती लागत नाही. नेहमीचेच चालू असते.
डॉ खरे आणि जयंत कुलकर्णी ह्या लेखकांच्या लेखातुन बरीच नविन माहीती मिळते आणि ते ती छान पद्धतीने लिहीतात म्हणुन वाचतोच वाचतो.
बाकी नाव घेण्यासारखे फारसे कोणी नाही ( हल्ली लिहीणार्यातले )
पर्यटना वरचे वाचुन काढतो आणि फोटो बघतो.
5 Sep 2014 - 2:11 pm | प्रसाद१९७१
एकुणात निरीक्षण - अभिव्यक्तीची हौस खूपच वाढली आहे जनतेत.
5 Sep 2014 - 2:58 pm | भिंगरी
लेखनाची सुप्त इछा पुरी होते,आम्हा बुद्धीहीनांची बुद्धीवानांबरोबर गाठ्भेठ होते.
मन मोकळे होते.
5 Sep 2014 - 3:01 pm | भिंगरी
इच्छा
5 Sep 2014 - 3:00 pm | भिंगरी
गाठभेट असे वाचावे
5 Sep 2014 - 3:04 pm | डॉ सुहास म्हात्रे
घरबसल्या जगभरच्या लोकांशी संवाद साधता येतो हेच कारण पुरेसे आहे !
5 Sep 2014 - 3:25 pm | शिद
+१
5 Sep 2014 - 3:45 pm | आदूबाळ
खाज.
5 Sep 2014 - 3:49 pm | कवितानागेश
स्वतःसाठी! मी एकलकोंडी होउ नये म्हणून. :)
5 Sep 2014 - 10:03 pm | प्यारे१
असंच म्हणतो. एकलकोंडा होऊ नये म्हणून.
5 Sep 2014 - 4:12 pm | आनन्दा
सध्या अभिव्यक्तीवरील लेखांचे अगदी पेवच फुटलेले दिसते.
5 Sep 2014 - 8:16 pm | प्रभाकर पेठकर
बोलायला, ऐकायला, इतरांचे बोलणे ऐकून घ्यायला, विचारांचे आदानप्रदान करायला आवडते म्हणून.
केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार !
शास्त्र ग्रंथ विलोकन मनुजा चातुर्य येतसे फार !!
आणि
वादे वादे जायते तत्व बोधः
वगैरे वगैरे सुभाषितांनी माणसाच्या व्यक्तीमत्व विकासाचा मार्ग अधोरेखित केला आहे. जसे वाहते पाणी स्वच्छ असते तसेच प्रवाही विचार स्वच्छ राहतात. जर विचार प्रवाही केले नाहीत तर बुद्धीचेही 'डबके' होते आणि त्यात गाळ साठत राहतो. मिपावर विचार प्रवाही राहण्यासाठी बराच कच्चा (आणि पक्का) माल मिळतो.
5 Sep 2014 - 8:56 pm | मित्रहो
दुसर काय?
नाही वाटल की नाही लिहीत.
5 Sep 2014 - 10:54 pm | मुक्त विहारि
वाटते म्हणून लिहीतो...
6 Sep 2014 - 4:18 am | पिवळा डांबिस
अक्षर सुधारावं म्हणून!!!
:)
6 Sep 2014 - 1:04 pm | प्रसाद गोडबोले
=))
7 Sep 2014 - 11:07 am | पैसा
१) का लिहिता?
जेव्हा एखादा लेख आतून बोंब मारतो तेव्हाच लिहिते.
फक्त एक लेखमालिका "आमचें गोंय" पब्लिकला गोव्याबद्दल माहिती व्हावी या उद्देशाने प्रीतमोहर आणि मी लिहिली होती. अर्थात तेव्हा आम्हाला ढकलण्याचे कार्य आमचे पुणेस्थित मित्र बिपिनचंद्रजी कार्यकर्ते यांनी केले होते.
२) आंजावर का लिहिता?
मी लिहिलेलं कोणी छापणार आहे काय! कैतरीच काय!
३)प्रतिक्रिया का लिहिता?
टाईमपास, दुसर्याला कंटाळा आणणे, काड्या टाकून मजा पाहणे, खोटे बोलणार्यांना पकडणे असे अनेक उद्देश वेगवेगळ्या वेळी असतात. मात्र नवे लेखक आणि कवी या लोकांना मी चांगल्या प्रतिक्रिया द्यायचा प्रयत्न करते, कारण हे सहसा हळवे असतात आणि उगा प्रतिक्रिया आल्या नाहीत म्हणून रुसून बसण्याचा संभव असतो.
7 Sep 2014 - 12:35 pm | प्रभाकर पेठकर
>>>>टाईमपास, दुसर्याला कंटाळा आणणे, काड्या टाकून मजा पाहणे, खोटे बोलणार्यांना पकडणे असे अनेक उद्देश वेगवेगळ्या वेळी असतात. मात्र नवे लेखक आणि कवी या लोकांना मी चांगल्या प्रतिक्रिया द्यायचा प्रयत्न करते, कारण हे सहसा हळवे असतात आणि उगा प्रतिक्रिया आल्या नाहीत म्हणून रुसून बसण्याचा संभव असतो.
पाककृतींना वगळल्याबद्दल तीव्र निषेध.
7 Sep 2014 - 12:56 pm | पैसा
पाकृ, इतर चांगले लिखाण यांना उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली जातेच! ते सोडून इतर कारणे लिहिली म्या!
7 Sep 2014 - 3:48 pm | प्रभाकर पेठकर
*i-m_so_happy* *HAPPY* :happy:
7 Sep 2014 - 3:32 pm | भिंगरी
म्हणुनच सगळ्यांच्या आवडत्या पैसाताई
7 Sep 2014 - 3:40 pm | प्यारे१
हो हो!
आमच्याही. कधीकधी. ;)
7 Sep 2014 - 6:15 pm | पैसा
भिंगरीला नेहमी आणि प्यारे१ ला कधी कधी धन्यवाद! ;)
7 Sep 2014 - 11:11 am | पिंपातला उंदीर
जास्तित जास्त प्रतिसाद मिळवेत म्हनुन : )
7 Sep 2014 - 8:52 pm | माम्लेदारचा पन्खा
१) आपल्याच मनाची विचार करायची पद्धत आपल्यालाच नव्याने कळते
२) मनाला त्रास देणाऱ्या घटनांवर लिहिल्याने त्याची आंतरिक टोचणी कमी होते
३) आजपर्यंत जे करू शकलो नाही किवा जिथे जाऊ शकलो नाही त्या काल्पनिक जगात सफर करून आल्यामुळे नवीन चैतन्य येते
४) एकूणच विचारांची समृद्धी येते
8 Sep 2014 - 12:40 am | भिंगरी
नं.२ जास्त पटले,बाकी मुद्देही आमच्या मनातलेच.