धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसहिष्णुता -

सचिन-पाताळधुंड्या's picture
सचिन-पाताळधुंड्या in काथ्याकूट
2 Aug 2008 - 10:55 pm
गाभा: 

धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसहिष्णुता -
.
मुळातच "मुळमुळीत" असलेली हिंदुच्या मानसिकतेचा वापर (गैरवापर? ) करत गांधीनि अहिंसेच्या मार्गाने शांत, सोम्य लढा दिला. अहिंसा,उपोषण, धर्मनिरपेक्षता, शत्रुप्रेम, मवाळपणा असल्या गोष्टी मग आपसुकच हिंदुमधला तो मुळळितपणा वाढवायला कारणीभुत ठरल्या असाव्यात... .
.
आणि हिंदुमध्ये मुळातच असलेल्या सहिष्णूतेचं रुपांतर षंढप्रव्रुत्तित केंव्हा झाले हे आम्हाला कळलेही नाहि.
.
मला तर वाटतय कि "धर्मनिरपेक्षता" ह्या शब्दाची संयुक्तिक व्याख्या परत अधोरेखित व्हायला हवी.
.
आज हे कांग्रेसवाले, समाजवादी पार्टिवाले मुलायम,अमरसिंग, लालू यादव, आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत असे म्हणतात. . त्यांना त्या शब्दाचा अर्थ कितपत उमगला आहे हे तपासायला पाहिजे..

.
धर्मनिरपेक्ष जीवन जगने म्हणजे धर्माची लुडबुड आपल्या जगण्यात होवू न देने...
.
स्वताला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणार्यांनिच हिंदुराष्टामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, बोद्ध, जाट अशी असी साऱ्या धर्मांची रसमिसाळ स्वार्थापोटी करून टाकलि. धर्मनिरपेक्षतेच्या खोट्या पांघरुना खालून हिंदुसोडून इतरांनाच खैरात दिली आणि हिंदुसाठी "असली निरपेक्षिता" म्हण्जे एक शिवीच झालिये...
.
परधर्मसहिष्णुते बद्दल मला काहिच आक्षेप नाहिये. पर धर्माबद्दल आम्हाला आदर आहेच आणि असायलाच पाहिजे,.. ....
.
. पण पायातली चप्पल पायात आहे तोपर्यंतच चांगली, परधर्मानेही मर्यादा सोडल्याच तर, मग कसली आली परधर्मसहिष्णुता?

प्रतिक्रिया

सुधारक's picture

3 Aug 2008 - 4:23 pm | सुधारक

स्वतःच्या जीवनात धर्माची 'लुडबुड' हवीच हो. फक्त ती सरकारी कामकाजाच्या बाहेर ठेवणे ही खरी धर्मनिरपेक्षतता.

सचिन-पाताळधुंड्या's picture

3 Aug 2008 - 6:16 pm | सचिन-पाताळधुंड्या

.
उदाहरणार्थ -
पुर्विच्या काळातिल सती जाण्याचि प्रथा, स्पुश्य-अस्पुश्य, धर्मावरून भेदभाव, धर्मावरुन दंगलि, उच्च-निच ठरविणे ई.ई. किंवा यासांरख्या धार्मिक गोष्टि दैंनदिन जिवनात न आणणे म्हन्जे " धर्म निरपेक्ष जिवण" असा प्रगल्भ अर्थ घ्यावा.

या वरिल धारमिक गोष्टिंचि लुडबुड व्यवहारिक जिवणात चालेल काय?
.
धार्मिक गोष्टि म्हन्जे "फक्त" पुजा, अर्चा असा समज करु नये.

नीलकांत's picture

3 Aug 2008 - 4:43 pm | नीलकांत

पण पायातली चप्पल पायात आहे तोपर्यंतच चांगली,

या वाक्याचा अर्थ नाही समजला

आमच्या बालबुध्दीला याचे आकलन झाले नाही.

नीलकांत

सचिन-पाताळधुंड्या's picture

3 Aug 2008 - 6:04 pm | सचिन-पाताळधुंड्या

नीलकांत.....

चप्पल जोपर्यंत पायात आहे तो पर्यंत ठिक आहे, पण तिच जर कुणि तुमच्या गालात मारलिच तर कसे वाटेल?
. परधर्मानेहि आपलि मर्यादा ओळखुनच राहवे. ते जोपर्यंत मर्यादा ओलांडत नाहित तो पर्यंत ठिक....

असा साधा सरळ अर्थ आहे त्यात. हे न कळण्याइतकिहि आपलि "बुद्धि" बाल नाहि आहे हे हि आम्हि समजु शकतो.

नीलकांत's picture

4 Aug 2008 - 12:17 pm | नीलकांत

धर्मनिरपेक्षता आणि परधर्मसहिष्णुता ह्या तर हिंदू धर्माच्या अंगभूत वृत्ती आहेत असं मला वाटतं. आमच्या संविधानाने प्रत्येक भारतीयाला आपापला धर्म जपण्याचे, त्याचे उत्सव साजरा करण्याच, आपला धर्मप्रसाराचे आणि हवा तो धर्म स्विकारण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे.

याचा अर्थ असा की भारतात कुठल्याही एका धर्माला विशेष दर्जा नाही. त्यामुळे तुमच्या पायातल्या चपलेचे उदाहरण जे की इतर धर्मांच्या बाबतीत होते ते मला खटकले. अशी उपमा देणे चुकीचे आहे असं मला वाटलं म्हणून मी ते अधोरेखीत केलं.

हिंदू म्हणून माझे संस्कार सुध्दा असं सांगतात की इतरांच्या भावनांची कदर करा. उगाच कुणालाही पादत्राणाची उपमा देण्याचा अधीकार तुम्हाला नाही.

मात्र तुमच्या लिखानावरून मात्र तुम्हाला मुद्दामच बोचरं लिहायला आवडतं असं दिसतंय. कारण हे वाक्य लिहायला दूसरी प्रेरणाच असू शकत नाही.
चप्पल जोपर्यंत पायात आहे तो पर्यंत ठिक आहे, पण तिच जर कुणि तुमच्या गालात मारलिच तर कसे वाटेल?

अर्थात आम्हाला हे असे खेळ नवीन नाहीत.

मी कित्येकदा माझ्या अनेक मित्रांना एक विनंती करत असतो ती येथे तुम्हालाही करतो. की हिंदू बना आणि हिंदू रहा. इतर धर्मीयांची वागणुक फक्त खुप आकर्षक दिसते म्हणून त्यांचं अनुकरण करू नका. भारत धर्मनिरपेक्ष आहे हे त्याचं वैशिष्ट्य आहे. उगाच भारताचा पाकिस्तान करून वाटोळे करण्याचा प्रयत्न करू नका. धर्मनिरपेक्षतेचा गैरफायदा घेण्यात हिंदू धर्मीयांचाच जास्त वाटा आहे असं मला दिसतं.

भारत हे सर्वधर्मीयांच कडबोळं आहे असं तुम्हाला वाटतं, मात्र थोडा विचार कराल तर याला आपण हिंदूच जवाबदार आहोत. आम्ही आमच्या जातीपातीच्या जोखडात जखडलेले आहोत अजूनही केवळ हिंदू म्हणून आमची ओळख पुर्ण होत नाही आम्हाला जात सांगावीच लागते. मग कसली आलीये धार्मीक ए़की? आणि धार्मीक एकीकरण झाले की लागलीच कुणीतरी त्याचा नेता म्हणजे देवाचा दलाल होईल. त्यापेक्षा आहे असं धर्माचं स्वरूप काय वाईट आहे? केवळ आमच्याच धर्मात नर आणि नारायणाच्या मधात सरळ संवाद होऊ शकतात काही पंथ तर अद्वैतच मानतात. असं जगात दुसरं कुणीही नाही. असो. तुम्हालाही हा सल्ला की जरा डोळसपणे आजूबाजूला बघा. केवळ वैतागून काही होणार नाही.

मनिष's picture

4 Aug 2008 - 1:07 pm | मनिष

याचा अर्थ असा की भारतात कुठल्याही एका धर्माला विशेष दर्जा नाही. त्यामुळे तुमच्या पायातल्या चपलेचे उदाहरण जे की इतर धर्मांच्या बाबतीत होते ते मला खटकले. अशी उपमा देणे चुकीचे आहे असं मला वाटलं म्हणून मी ते अधोरेखीत केलं.

हिंदू म्हणून माझे संस्कार सुध्दा असं सांगतात की इतरांच्या भावनांची कदर करा. उगाच कुणालाही पादत्राणाची उपमा देण्याचा अधीकार तुम्हाला नाही.

नीलकांतचा प्रतिसाद अतिशय आवडला, १००% सहमत!!

सचिन-पाताळधुंड्या's picture

4 Aug 2008 - 9:09 pm | सचिन-पाताळधुंड्या

इतरांच्या भावनांची कदर करा...
.
वयक्तिक आणि सामाजिक पातळिवरहि इतरांच्या भावणांचि कदर व्हायलाच हवि.. दुमत नाहि. किंबहुना कुणाच्या धार्मिक भावणांवर आक्षेप नाहिये... पण मि याअगोदर कुठेच भावणा हा शब्द वापरलेला नाहिये, हे लक्शात घ्या... तो तुम्हिच प्रथम वापरला व संपुर्ण लिखाणाचा भलताच अर्थ काढलात...
भावना ह्या प्रवित्र असाव्यात आणि असतात... त्या जर नापाक, कुटिल असतिल तर "हेतु" असा शब्दप्रयोग योग्य वाट्तो.

आता तुमचं वरिल वाक्य मि जरासा बदल करुन परत लिहतो...."इतरांच्या हेतुची कदर करा" ... हेतु समजा वाईट, अतिरेकि असेल तर तुमचे विधान योग्य कि अयोग्य ते तुम्हिच सांगा...

मर्यादा सोडलि तर? असे मि म्हटले आहे.... तोपर्यंत आंम्हाला त्यांचा आदरच आहे....

मनिष's picture

4 Aug 2008 - 9:56 pm | मनिष

नीलकांतचे म्हणने फक्त कोट केले, ती प्रतिक्रिया आवडल्यामुळे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Aug 2008 - 1:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नीलकांत,

मीही तुमच्याशी सहमत आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी पण हिंदू आहे. धर्म फक्त माझ्यापुरता आहे, इतरांसाठी आहे ती 'मी एक माणूस आहे' एवढीच ओळख.
इतर धर्मीयांची वागणुक फक्त खुप आकर्षक दिसते म्हणून त्यांचं अनुकरण करू नका.
हे तर वाक्य तुम्हीच बोल्ड टाईपमधे लिहायला हवं होतंत! फक्त उपासना करण्याचंच नाही तर हिंसेचं, सक्तीचंही अनुकरण काही "हिंदू" करतात त्यांना हे वाक्य दिसायला हवं असं.
भारत धर्मनिरपेक्ष आहे हे त्याचं वैशिष्ट्य आहे. उगाच भारताचा पाकिस्तान करून वाटोळे करण्याचा प्रयत्न करू नका. धर्मनिरपेक्षतेचा गैरफायदा घेण्यात हिंदू धर्मीयांचाच जास्त वाटा आहे असं मला दिसतं.
माझेही आपल्यासारखेच विचार आहेत. त्यांना खूप संयत शब्दरूप दिलंत. वाचून मनात खूप शांत वाटलं. मलाही असंच काहीसं लिहावंसं वाटलं होतं, पण ... शब्द, ते दगा देतात, म्हणून वाद वाढवण्यापेक्षा गप्प बसले.

यमी

मेघना भुस्कुटे's picture

5 Aug 2008 - 8:46 am | मेघना भुस्कुटे

नीलकांतशी सहमत. ज्या गोष्टीची आपल्याला चीड येते, तिचेच अनुकरण करणे हा आपला पराभव आहे.

सचिन-पाताळधुंड्या's picture

4 Aug 2008 - 8:00 pm | सचिन-पाताळधुंड्या

उगाच कुणालाही पादत्राणाची उपमा देण्याचा अधीकार तुम्हाला नाही
.
.
उपमा नाहि आहे ति ... ते उदाहरण आहे ...
परधर्म हा चप्पलेप्रमाने आहे असं म्हटलं असते तर ति "उपमा" झालि असति ? नाहि का? .... क्रुपया गफल्लत करु नये..

आणि हो "बोचरं" लिहण्याबद्दल....
तसे लिहने गैर ते काय बरे?
तस्सं लिहणारे कैक मान्यवर होवुन गेलेत/आहेत, उदाहरने देत नाहि, नाहितर परत म्हणाल कि "उपमा" देताय......
.
भारतात कुठल्याही एका धर्माला विशेष दर्जा नाही

चुक ... कुठल्या दोन धर्मांना समान दर्जा आहे ते सांगा?
नाहितर मि सांगतो कुठल्या धर्माला मतांसाठि विशेष सवलति दिल्या जातात ते...


इतरांच्या भावनांची कदर करा.
पन कुठपर्यंत, ह्याचि मर्यादा सांगाल काय?

नीलकांत's picture

5 Aug 2008 - 12:19 am | नीलकांत

उपमा आणि उदाहरण मधे फरक काय आणि कसा ते कळेल का? अहो मला नाही समजलं नेमकं म्हणून तर पहिल्या प्रतिसादात विचारलं होतं ना? तर त्यावेळी खुलासा करण्या ऐवजी तुम्ही त्याला बगल दिलीत. :) असो यावेळी द्याल कदाचित.

भारतात सर्व धर्मांना समान दर्जा आहे. धर्माच्या आधारावर कुणाही नागरिकाला प्रथम किंवा दुय्यम वागणूक दिली जात नाही. असं होत नाही की कुणी नागरीक केवळ एका धर्माचा आहे म्हणून तो कुठल्याही सार्वजनिक निवडणूकीसाठी पात्र अथवा अपात्र ठरतो. भारताच्या नागरिकाची सर्वोच्च पात्रता तो भारताचा नागरीक आहे ही आहे. तो धार्मीक बहुसंख्य आहे की नाही हा निकष नसतो. ( हे असले निकष पाळण्याची परंपरा त्यांची, जे आजही आठव्या शतकात आहेत.)

आता तुमचे खालील दोन मुद्दे आणि एक साहेबांच्या खुलाश्या विषयी...

धर्मनिरपेक्षता म्हणजे देशाच्या कारभारात म्हणजे प्रशासनात धर्माला स्थान नसने. म्हणजे एखाद्या धर्मात कुठल्याही प्रसंगासाठी काही नियमावली असेल तर ती लागू न करता देशाच्या सार्वभौम संसदेने केलेले कायदे लागू करणे होय.

धार्मीक कायदा म्हणजे काय याचे उदाहरण द्यायचे झाल्यास हिंदूची मनुस्मृती आणि मुस्लीमांचा शरीया.

हे धार्मीक कायदे कदाचीत देशातील नागरिकांत फुट पाडण्यास मदत करतील आणि धार्मीक कायदे हे कुठल्यातरी एका कालखंडास योग्य असेच असतात त्यांच्यात बदल होत नाही आणि केला तर तो मान्य होत नाही अशी मानसिकता असते म्हणून धार्मीकतेला शासन आणि प्रशासनाच्या बाहेरच ठेवण्याचा निर्णय झाला असावा.

मुळात भारताचे संविधान तयार झालं तेव्हा संविधानात धर्मनिरपेक्ष हा शब्द नव्हताच. मात्र प्रशासन चालायचं ते याच तत्वावर. कारण हिंदूंची बनावटच अशी आहे की ते इतर धर्मीयांचा केवळ गैरहिंदू आहेत म्हणून तिरस्कार नाही करू शकत. हा गैरहिंदू शब्द सुध्दा कधी ऐकायला येत नाही. इतर धर्मीय मात्र असा गैर*** असे शब्द अनेकदा वापरतात. असो. धर्मनिरपेक्ष हा शब्द घटनेच्या सरनाम्यात ४२व्या घटनादुरूस्तीने टाकण्यात आला होता. ही घटना दुरूस्ती स्व. इंदीरा गांधींनी केली होती.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर येथील बहूसंख्य हिंदू आपल्यावर राज्य करतील आणि आपण इंग्रजांच्या गुलामगीरीतून हिंदूंच्या गुलामगिरीत जाऊ अशी भीती उराशी बाळगून मुस्लीम लीग ने भारताच्या फाळणीचा घाट रचला. हिंदू पुढार्‍यांनीच मुस्लीमांच्या आपण वेगळे आहोत ह्या भावनेला खतपाणी घातले. येथे संदर्भ घ्यायचा असल्यास १९१६ च्या लखनौ कराराचा घ्यावा किंवा खिलाफत आंदोलनाचा घ्यावा.

मात्र स्वातंत्र्यानंतर हिंदूच या देशाच्या अधिकारपदावर होते त्यांनी ह्या धर्मनिरपेक्षतेचा नेहमीच गैरअर्थ लावला. नेहमीच मुस्लीमांना मुख्यप्रवाहापासून वेगळं ठेवण्यासाठी प्रयत्न तरी केला किंवा अश्या प्रयत्नांना मदत तरी केलीये. गेल्या वर्षी जाहिर झालेला सच्चर आयोगाचा अहवाल खुप काही सांगून जातो. कॉग्रेस मुस्लीमांचेच केवळ भले पाहते किंवा हिंदूंवर अत्याचार करते असा माझाही गैरसमज होता त्याला या अहवालाने तर धक्काच दिला. शिवसेना करू शकनार नाही एवढं नुकसान मुस्लीमांचं कॉग्रेसने केलंय. एखाद्या धार्मीक गटाला देशाच्या मुख्यप्रवाहाच्या बाहेर ठेवणं किंवा अश्या प्रयत्नांना मदत करणं म्हणजे धर्मनिरपेक्षतेला दूर लोटने होय. प्रशासनाने असं केलंय. ते शहाबानो खटला प्रकरण व त्यामागोमाग मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड असो अथवा मदरस्यांमधे केवळ कुराण,हदिस आणि शरियाचं शिक्षण देणार्‍या संस्थांना सरकारी अनुदान असो. हे सगळं करणारी मंडळी हिंदू होती म्हणून माझं मत असं की हिंदूंनी या धर्मनिरपेक्षतेचा गैरफायदा घेतलेला आहे.

उत्सुक असलेल्या लोकांसाठी येथे एक नमुद करतोय की तुर्कस्थान हे मुस्लीम बहूल राष्ट्र धर्मनिरपेक्ष आहे. साधारणतः जागतीक पातळीवर मुस्लीम राष्ट्रांचा इतिहास पाहता हे खरं वाटत नाही मात्र हे खरं आहे आणि याचं श्रेय केमालपाशांना जातं.

असो.... माझं सांगायचं झालं आता थोडं माझं असं न बोलता जश्या उपमा किंवा उदाहरण म्हणा हवं तर आलेत त्या बद्दल बोलूया.

* हे असलं पायातली चप्पल किंवा ढेकणा-डासांचं उदाहरण जेव्हा देता ना... तेव्हा एक सूड घेतल्यासारखा वास येतो वाक्यांना. तुमची अडचण समजते हो पण काय करणार? आमच्या धर्मात कुनालाच काफर मानलेलं नाहीये. त्यामुळे ते जसा काफर शब्द वापरतात तसा शब्द आमच्या वापरात नाही. म्हणून मग असले शब्द वापरावे लागतात.

*ते बघाना कसे वागतात. जरा काही झालं की एकत्र येतात. आणि आपण हिंदू बघा... घरात असतो...
-- भारतात जेव्हा असं घडतं तेव्हा ते दु:खदायीच आहे मात्र ही केवळ हिंदू मानसिकता नसून बहुसंख्यकांची मानसिकता आहे. जेथे मुस्लीम बहूसंख्य आहेत तेथे ते एकमेकांसाठी असेच धावून येत नाहित.

हिंदूंचं सांस्कृतीक मुल्यांकन करून त्यांच्यातील चुकांवर सावरकरांनी खूप चांगला प्रकाश टाकला आहे. त्यातच बाबाराव सावरकरांनी एक छान शब्द दिला आहे. ते म्हणतात की आम्हा हिंदूत सदगुण विकृती आहे. म्हणजे आम्ही एवढे चांगले आहोत की आमचा चांगूलपणा आमचा घात करते. हा चांगुलपणा किंवा धार्मिकता जर का व्यवहारचतुर असेल तरच ठिक नाही तर ती घातच करेल.

हे झालं एक टोक आणि दुसरं म्हणजे विरोध करता करता आपल्या विरोधकांसारखं होणं. जसं की आता होतंय. म्हणजे काय तर जशी भाषा ते वापरतात तशी आपण वापरणं, त्यांच्या सारखं वागणं-भाषणं देणं आदी.

या दोंन्हीत आम्ही आमचं परमभाग्य म्हणजे आमच्या धर्माचं वेगळेपण, एकमेवाद्वितीयपण विसरतो आहोत. आम्हाला आमच्या धर्माने चिकित्सेचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. का? म्हणायचं स्वातंत्र्य आहे. अगदी ब्रम्ह तत्वा बद्दल सुध्दा जिज्ञासा उत्पन्न व्हावी असं पोषक वातावरण आहे.
हे सगळं सोडूण आपण मात्र त्यांच्या वाटेने जायचं. आपल्या तरूणांची माथी भडकवायची आणि त्यांच्या हातून भावनावेगात आपला हेतू साध्य करायचा. हे योग्य नाही.

त्यांना हज हाऊस आहे म्हणून आम्हाला अमरनाथा हाऊस हवं ही मागणी हास्यास्पदच आहे. त्याही पुढे जाऊन ती बोचतेच. अहो पंचांगाच्या एका ओळीने कोट्यावधी हिंदू कुंभमेळ्यासाठी जमतात. त्यांच्यासाठी कुठलंच हाऊस कधीच नव्हतं. तो मेळा आठव्या शतकात नाही सुरू झाला. गेले हजारो वर्षांपासून तो चालतोच आहे. का उगाच कमीपणा आणताय?

धमाल मुलाचं म्हणनं जे आहे ते खरंच बोचरं वास्तव आहे. आणि...
पण जेव्हा मुळावरच कोणी घाव घालत असेल तर त्यावर काहीही हालचाल न करता धर्मनिरपेक्षतेच्या आणि सहिष्णुतेच्या गफ्फा ठोकणं म्हणजे बधीरलेल्या समाजमनाचं मानसिक हिजडेपण आहे असं मला वैयक्तिकरित्या वाटतं.

ह्या वाक्याशी तर जगात कुणीच असहमत होईल असं वाटत नाही. कुणीही तो गैरधर्मीय असो अथवा आपल्यापेक्षा वेगळ्या विचाराचा असो आपल्यावर चालून आल्यास त्याचा सामना हा केलाच पाहिजे. तेथे त्याला उत्तर हे दिलेच पाहिजे. मात्र धमु येथे चर्चा चाललीये ती भारताच्या धर्मनिरपेक्षतेची त्यामुळे एक देश म्हणून भारतात धर्मनिरपेक्षता नांदली पाहिजे, वाढली पाहिजे असंच माझं मत आहे
अर्थात ती यापेक्षा प्रगल्भ व्हावी असंही वाटतं.

नीलकांत

एक's picture

5 Aug 2008 - 12:54 am | एक

"..मात्र स्वातंत्र्यानंतर हिंदूच या देशाच्या अधिकारपदावर होते त्यांनी ह्या धर्मनिरपेक्षतेचा नेहमीच गैरअर्थ लावला. नेहमीच मुस्लीमांना मुख्यप्रवाहापासून वेगळं ठेवण्यासाठी प्रयत्न तरी केला किंवा अश्या प्रयत्नांना मदत तरी केलीये. गेल्या वर्षी जाहिर झालेला सच्चर आयोगाचा अहवाल खुप काही सांगून जातो. कॉग्रेस मुस्लीमांचेच केवळ भले पाहते किंवा हिंदूंवर अत्याचार करते असा माझाही गैरसमज होता त्याला या अहवालाने तर धक्काच दिला. शिवसेना करू शकनार नाही एवढं नुकसान मुस्लीमांचं कॉग्रेसने केलंय. एखाद्या धार्मीक गटाला देशाच्या मुख्यप्रवाहाच्या बाहेर ठेवणं किंवा अश्या प्रयत्नांना मदत करणं म्हणजे धर्मनिरपेक्षतेला दूर लोटने होय. प्रशासनाने असं केलंय. ते शहाबानो खटला प्रकरण व त्यामागोमाग मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड असो अथवा मदरस्यांमधे केवळ कुराण,हदिस आणि शरियाचं शिक्षण देणार्‍या संस्थांना सरकारी अनुदान असो. हे सगळं करणारी मंडळी हिंदू होती म्हणून माझं मत असं की हिंदूंनी या धर्मनिरपेक्षतेचा गैरफायदा घेतलेला आहे. ...."

एकवेळ मान्य करू की हिंदूनीच मुसलमानांना प्रोत्साहन दिलं आणि एक प्रकारे "मुख्य प्रवाहा" पासून वेगळं रहाण्याची सोय करून दिली. हे जे काही प्रोत्साहन दिलं गेलं (स्वतंत्र कायद्याच्या मार्फत म्हणा किंवा इतर काही) ते त्या समाजावर जबरदस्तीने लादलं गेलं का त्यांच्या संम्मती ने दिलं गेलं? संमतीने दिलं असेल तर अजून त्यांचं समाधान झालं नाही का? आणि जबरदस्ती ने दिलं असेल तर तेव्हा विरोध का गेला नाही?

I still fail to understand कि असं प्रोत्साहन देवून हिंदूना नक्की काय फायदा झाला? म्हणजे मुसलमानांना तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हेतु:पुरस्सर बाजूला काढून प्रशासनाने एखादा हिंदूहिताचा काही कायदा किंवा काही सवलत मान्य केली का? आजही हिंदू वस्तीत बॉम्बस्फोट का होत आहेत? बॉम्बस्फोट करणारे बहुसंख्य (खरंतर १००% च पण काय सांगावं बॉम्ब साठी मदत करणारा एखादा लाचखाऊ हरामखोर हिंदूही निघायचा) मुसलमान का निघतात?

मी जी (डास-ढेकूण) उपमा दिली ती एखाद्या धर्माविरूद्ध दिली नाही. काफरा सारखा शब्द मिळाला नाही म्हणून डास-ढेकूण वापरले असही नाही. धर्मावरच टिका करायची असती तर तसे शब्द वापरले असते. माझा रोख आपल्याच देशाशी देशद्रोह करणार्‍यांवर होता आणि त्यांना कशी ट्रीटमेंट मिळायला हवी यावर होता. आता हे असे लोकं मुसलमान निघतात हा "योगायोग" आम्ही कुठवर बघायचा? आणि त्यांना शिक्षा द्यायची वेळ आली कि सेक्युलर लोकं "मुसलमानांवर अन्याय झाला हो " अशी बोंब ठोकतात आणि इतरांना "सहिष्णुत्वाचे धडे" का देतात?

देशद्रोही, गुंड, अतिरेकी प्रवृत्त्ती यांकडे "धर्मनिरपेक्षेने" बघायचं नाही का? गुन्हेगाराकडे गुन्हेगार म्हणून बघु शकत नाही का? त्याच्या शिक्षेच्यामधे तेव्हढा "धर्म" का येतो? ही "धर्मनिरपेक्षता" "सहिष्णुता" काय कामाची? असे अनेक प्रश्न सतावतात पण विचारणार कुणाला? असं काही लिहिलं किंवा विचारलं तर "माथं भडकाऊ, मुलतत्त्ववादी लेखन" म्हणुन हिणवलं जाणार..

जाऊ दे..

नीलकांत's picture

5 Aug 2008 - 12:38 pm | नीलकांत

मुळातच मुस्लीमांना आपल्या कोषात रहायला आवडतं. त्यांच्या धर्मात दिलंय तेवढंच हे जग आहे असं ते मानतात. त्यामुळेच त्यांनी आपल्याला कोषात राहता येईल असा देश तयार केला. या लोकांचा कित्येकदा भ्रमनिरास होतो मात्र तरी ते जागे होत नाहित की त्यापासून काही शिकत नाहीत.

भारतात सुध्दा त्यांना त्यांच्या कोषातच जगायला मिळाल्यास ते त्यांना हवेच होते आणि आहे. केवळ त्यासाठी त्यांनी आंदोलने केलेली आहेत. वेगळं लॉ बोर्ड मिळवलं आणि आपल्या शैक्षणीक संस्थासुध्दा वेगळ्या त्यातील शि़क्षणाचा व्यवहार पातळीवर कसलाही उपयोग असो अथवा नको मात्र आयुष्याचा महत्वाचा कालखंड ते असा घालवल्यावर कसली आलीये प्रगती? मग आहे त्याच व्यवस्थेचा जीवापाड सांभाळ करायचा. पुढची पीढी सुध्दा याच वाटेवर गेली पाहिजे याची काळजी घ्यावी. आहे तीच मुल्यव्यवस्था कायम राहीली तरच आपलं महत्व कायम राहील ही भीती, कायमच आहे तो कोष जपण्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा देते.

मात्र याच वेळी प्रगतीशील भारताचं म्हणून काही धोरण नको होतं का? नकोय का? त्यांनी कोषात राहण्यासाठी आंदोलनं करायची आणि आम्ही त्यांच्या धर्माच्या वेगळं काही केलं तर आपण धर्मनिरपेक्ष ठरणार नाही ही भीती. मग कलम ३७० असो अथवा समान नागरी कायदा असो. धर्मनिरपेक्ष राष्ट्रात कुणीही धार्मीक आधारावर वेगळे नको अशी संरचना आवश्यक असतांना हिंदूनींच मुस्लीमांना वेगळं वागण्याची अनुमती दिलीये.

धर्म ही तुमच्या व्यक्तीगत आचरणाची बाब आहे आणि सार्वजनिक स्तरावर मात्र कायद्यासमोर सर्वसमान हवेत असं नको का व्हायला?

काही मुस्लीम देशद्रोह करतात हे खरंय. मात्र बॉम्बस्फोट करणारे जसे १००% मुस्लीम निघतात तसेच मुस्लीमांच्या एकून संख्येत त्यांचं प्रमाण किती आहे ते सुध्दा बघा. म्हणजे लक्षात येईल की सर्वच मुस्लीम काही वाईट नाहीत. मी कुठेही मुस्लीम लोक खूपच चांगले असं वगैरे म्हणत नाहीये , माझा विरोध आहे तो मुस्लीम म्हणजे सर्वच वाईट असं म्हणायला तसेच तो अफजल केवळ मुस्लीम आहे म्हणून त्याची फाशी लांबवण्यास सुद्धा. हे दोन्ही पावित्रे आपल्याला परवडाणारे नाहीयेत.

देश म्हणून आपल्याला काहीतरी ठोस भूमिका घ्यायला हवीये. आज वर उल्लेख केल्या प्रमाणे राजकारणी लोक या धर्मनिरपेक्षता तत्वाचं वाटोळं करताहेत मात्र त्याला जवाबदार ते आहेत. धर्मनिरपेक्षतेचं तत्व नाही. ते तसंच कायम रहायला हवं कदाचीत पुढे येणारी पिढी त्याचा चांगला उपयोग करेल.

देशातील नागरीकांना समानपातळीवर आणने आणि त्यांना विकासाच्या समान संधी उपलब्ध करून देण्याची, म्हणून प्रशासनाची जी काही जवाबदारी आहे त्यासाठी हे आवश्यकच आहे.

मात्र जेव्हा मुस्लीम असे वागतात त्यावेळी आपण चिडणं साहजीकच आहे. मात्र आपल्या या चिडण्याचा हिंदूधर्मातील काही लोक फार बेमालुम फायदा उचलतात. ते टाळायला हवं म्हणून मी अश्या भडक विधानांना जमेल तेथे विरोध करतो. ह्या फायदा उचलणार्‍या लोकांचा आदर्श म्हणजे मुस्लीम उलेमा आहेत असं वाटावं इतपत त्यांची देहबोली आणि भाषणं सारखे असतात. फक्त तिकडचा हिरवा रंग बदलून येथे भगवा टाकला की झालं. भावना भडकवायच्या, असुरक्षीतता पसरावी, आणि काहीतरी भडक कृती करण्यासाठी आवाहन करावे. अश्यातूनच गडकरी रंगायतन सारखी कृती घडते आणि आपणासर्वांची मान लाजेने खाली जाते.

हिंदू धर्माबद्दल जरूर लिहावं, त्यावर होणार्‍या विविध आक्रमणांबद्दल लिहावं. ईशान्य भारतात काम करणार्‍या अनेक हिंदू कार्यकर्त्यांबद्दल सुध्दा लिहावं. फक्त लिखाणात किंवा विचारात कुठेही आपली लोक त्यांच्या पातळीवर उतरून ते वागतात तेच केवळ योग्य आहे असं नको व्हायला. जसास तसे उत्तर दिल्यानंतरही आपलं वैशिष्ट्य कायम असावं. त्यांना विरोध करण्याऐवजी आपल्या उत्कर्षावर आपलं लक्ष जास्त केंद्रीत केल्यास ह्या अडचणी सहज सुटतील व सोबतच आपली प्रगती सुध्दा होईल.

नीलकांत

मेघना भुस्कुटे's picture

5 Aug 2008 - 12:45 pm | मेघना भुस्कुटे

+++++१

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Aug 2008 - 1:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

++१

यमी

मनिष's picture

5 Aug 2008 - 1:03 pm | मनिष

प्रतिसाद खूssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssप आवडला!

धर्मनिरपेक्ष राष्ट्रात सर्वांना समान न्याय, वागणूक मिळावा याला दूजोरा, पण काही समाजकंटकांमुळे सगळ्या समाजालाच दोषी घ्रणे, किंवा गर्भित धमक्या देणे - याला माझाही विरोध आहे.

@ नीलकांत - तुझा ह्या विषयांचा अभ्यास, प्रतिसादात मुद्याला धरून सुस्पष्ट बोलणे, आणि संयत भाषा - हे फारच आवडले.

- मनिष

+१

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चिन्या१९८५'s picture

5 Aug 2008 - 4:49 pm | चिन्या१९८५

अहो पण मुस्लिमांनाच मागास रहायच आहे त्याला आपण काय करणार???काँग्रेसने मुस्लिमांच लांगुलचालन केले आणि मुस्लिमांनी मागितलेल्या सर्व गोष्टी त्यांना दिल्या.आता मुस्लिमांनी त्यांना कट्टरता मागितली आणि काँग्रेसनी ती त्यांना दिली.त्याचा विरोध हिंदुत्ववादी करणार यात काहीच चुक नाही.मुस्लिमांचा देशातील रिसोर्सेसवर पहीला हक्क आहे असे जेंव्हा पंतप्रधान म्हणतात तेंव्हा हिंदु त्याविरुध्द बोलणार नाहीत हे कसे???साध्या भाषेत सांगुन हिंदु जागरुक होत नाही त्यामुळे भडक भाषा वापरावी लागते

नीलकांत's picture

5 Aug 2008 - 10:04 pm | नीलकांत

मुस्लिमांचा देशातील रिसोर्सेसवर पहीला हक्क आहे असे जेंव्हा पंतप्रधान म्हणतात तेंव्हा

हा धर्मनिरपेक्षतेचा भंग आहेच आणि हिंदूंचा सुध्दा अपमान आहे असं माझं मत. जसं कुणी अल्पसंख्यांक आहे म्हणून त्यांच्यावर अन्याय होऊ नये असे धोरण असावे तसेच कुणी केवळ बहुसंख्यांक आहे म्हणून त्यांना दुय्यम वागणूक देणे हे सुध्दा वाईटच.

देशहितासाठी विरोध केला तर वाईट नाहीच, मात्र भावना असावी ती देशहिताची. केवळ हिंदूधर्मीयांचेच तेवढे भले व्हावे असा कुणाचा सुर असेल तर सावध व्हा ती पातळी अधीकाधीक खोलवर जाऊन जातीपर्यंत जाऊ शकते. यात खुप नुकसान होईल. जे करायचं ते न होता भलतच काही होईल.

केवळ हिंदू म्हणून सुध्दा निषेध नोंदवायला काहीच हरकत नाही , मग पुन्हा त्याला देशहिताचं पांघरून का घालावं?

देशहिताचं म्हणजेच हिंदूहिताचं असू शकतं मात्र,
हिंदू हिताचं म्हणजे देशहिताचंच असावं असं आवश्यक नाही.

नीलकांत

चिन्या१९८५'s picture

6 Aug 2008 - 10:29 pm | चिन्या१९८५

ते ठिक आहे पण हिंदुविरोध म्हणजे देशविरोधच असतो बहुदा.

कोलबेर's picture

5 Aug 2008 - 9:34 pm | कोलबेर

समतोल प्रतिसाद.

पिवळा डांबिस's picture

21 Mar 2009 - 10:21 am | पिवळा डांबिस

नीलकांता,
तुझ्याविषयी आम्हाला अत्यंत अभिमान आहे.
-पिडां

सचिन-पाताळधुंड्या's picture

5 Aug 2008 - 9:57 pm | सचिन-पाताळधुंड्या

भारतात सर्व धर्मांना समान दर्जा आहे. धर्माच्या आधारावर कुणाही नागरिकाला प्रथम किंवा दुय्यम वागणूक दिली जात नाही.
.
हे कितपत सत्य आहे,.... "प्रक्टिकलि" हे खरच पाळले जाते का? मग अफजल गुरुचि फासि का थांबवलि जाते? सच्चर समिति- मुसलमानांचि सैन्यातिल गणना का? सेना हि देशाचि असते ति कुठल्या धर्माचि असते काय? मदरसांनाच रेल्वे भरतिसाठि ग्राह्य का धरण्यात येते? देशाच्या संप्पतिवर पहिला हक्क मुसल्मान बांधवांचा असे म्हणताना तो समान दर्जा कुठे गेला होता? समान दर्जा आहे तर मग समान नागरि कायदयाला का विरोध केला जातो? कुराण पाठ्यपुस्तकात चालते मग गिता का नाहि, इथे दुय्यम वागणुक नाहिये का?

भारताच्या नागरिकाची सर्वोच्च पात्रता तो भारताचा नागरीक आहे ही आहे. तो धार्मीक बहुसंख्य आहे की नाही हा निकष नसतो.
. कुण्याच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह आम्हि उपस्थित केलेलेच नाहिये. नागरिकत्वाचा संबध इथे काय? आपल्या देशाचा नागरिक हिंदु, मुस्लिम, ख्रिस्त, कुणिहि असु शकतो आणि कुठल्याहि देशाचा नागरिक कुणिहि असु शकतो. हा मुद्दा मुळ विषयाशि संबधित आहे काय?

एखाद्या धर्मात कुठल्याही प्रसंगासाठी काही नियमावली असेल तर ती लागू न करता देशाच्या सार्वभौम संसदेने केलेले कायदे लागू करणे होय.
. मलाहि हेच म्हणायचे होते. इस्लाम मध्ये अनेक विवाह का करु दिले जात होते/आहेत? तलाक म्हटल्यानंतर घटस्फोट का होत होता? म्हण्जेच धर्मनिरपेक्श फक्त म्हणयचे आणि "प्रक्टिकलि" वेगळेच वागायचे? हा ढोंगिपणा नाहि ये का?

एखाद्या धार्मीक गटाला देशाच्या मुख्यप्रवाहाच्या बाहेर ठेवणं किंवा अश्या प्रयत्नांना मदत करणं म्हणजे धर्मनिरपेक्षतेला दूर लोटने होय. प्रशासनाने असं केलंय. ते शहाबानो खटला प्रकरण व त्यामागोमाग मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड असो अथवा मदरस्यांमधे केवळ कुराण,हदिस आणि शरियाचं शिक्षण देणार्‍या संस्थांना सरकारी अनुदान असो. हे सगळं करणारी मंडळी हिंदू होती म्हणून माझं मत असं की हिंदूंनी या धर्मनिरपेक्षतेचा गैरफायदा घेतलेला आहे.
.
म्हण्जे खर्रि धर्मनिरपेक्षता थोड्याप्रमाणात का होईना पण आचरणात आणलि जात नाहि हे आपणास मान्य आहे तर. आता धर्मनिरपेक्षतेचा गैरफायदा घेणारे हिंदु होते हे मान्य, पन ते फक्त जन्मानेच,... एकगठ्टा मतपेटि साठिच त्यांनि इतर धर्मांना हिंदुच्या मुख्य प्रवाहापासुन वगळे ठेवले. धर्मनिरपेक्षता ह्या शब्दाचा सर्वात जास्त वापर (गैर) कांग्रेशनेच केला ना? धर्माचा वापर यांनि दोन समाजमने वेगळे ठेवण्यासाठि केलाच ना? मग असलि खोटारडि धर्मनिरपेक्षता काय कामाचि हाच तर माझा प्रश्न आहे.

जेथे मुस्लीम बहूसंख्य आहेत तेथे ते एकमेकांसाठी असेच धावून येत नाहित.
मान्य नाहि... अमरनाथ सरिन बोर्डाचा वाद अजुन ताजाच आहे. कास्मिर मध्य मुस्लिम बहुसंख्य आहे तेथेहि एकत्रिक येत, आंदोलन करित त्यांनि जमिन परत माघारि घ्यायला लावलिच ना? ........ आणि बर्‍याच परदेशात हिंदु अल्पसंख्य आहेत मात्र म्हनुन ते असले आंदोलनांचे उद्योग तेथे करतात काय? नाहि ना? आणि म्हणुन आपला "बहुसंख्यकांची मानसिकता" हा मुद्दा हि पटत नाहि... याउलट यामागे " हिंदू मानसिकता" च आहे असे मि म्हनेन जि आम्हाला प्रिय आहे.
हिंदुच्या सहनशिलतेला आपण " बहुसंख्यकांची मानसिकता" म्हणुन अपमानित करत आहात हे विसरता आहात काय?

.
अजुनहि खुप लिहता येइल ... पन वेळेचा अभाव...

सचिन-पाताळधुंड्या's picture

5 Aug 2008 - 10:27 pm | सचिन-पाताळधुंड्या

उपमा आणि उदाहरण मधे फरक काय आणि कसा ते कळेल का? अहो मला नाही समजलं नेमकं म्हणून तर पहिल्या प्रतिसादात विचारलं होतं ना?
.
जर आपल्याला हा फरक समजलाच नव्हता तर मग आपण "उदाहरण" म्हणजेच "उपमा" असा आंधाळा समज कसा काय बरे करुन घेतला ?... अपुर्न ज्ञान अज्ञानपेक्षा वाईट हे ठावुक असेलच आपल्याला... चुकलो म्हणु नका पन असं उगाच पांघरुन कश्याला घेता?

"..धर्मनिरपेक्षतेचा गैरफायदा घेण्यात हिंदू धर्मीयांचाच जास्त वाटा आहे असं मला दिसतं. ..."

हे स्टेटमेंट करण्याच्या मागे काय पुरावा आहे हे जाणून घ्यायची इच्छा आहे.

त्याचं काय आहे. आम्ही असतो अमेरिकेत एसी रूममधे बसून बाहेरची कल्पना येत नाही आणि असं बसून बिनबुडाची, पुरावा नसलेली विधानं किंवा उपदेश करणं जमत नाही. ज्या अर्थी तुम्ही हे विधान केलत त्या अर्थी तुमचा नक्कीच अभ्यास असला पाहिजे तेव्हा प्लिज खुलासा करावा.
माझ्या अती शिळ्या माहिती नुसार मुस्लीम विवाह कायदा हा याच "धर्मनिरपेक्ष" राष्ट्राने त्यांच्यासाठी केलेला होता ना?

घरात घूसून घरातल्यांना त्रास देणार्‍या ढेकणा-डासांवर त्यांचा समूळ नाश हाच उपाय आहे असं मला वाटतं. ते योगायोगाने "डास-ढेकूण" या जातीचे निघतात किंवा मी केलेल्या सामुहिक कत्तलीत त्यांची अंडीपिल्ली मारली जातात यात माझा काही दोष आहे?

प्रकाश घाटपांडे's picture

5 Aug 2008 - 9:49 pm | प्रकाश घाटपांडे


"..धर्मनिरपेक्षतेचा गैरफायदा घेण्यात हिंदू धर्मीयांचाच जास्त वाटा आहे असं मला दिसतं. ..."

हे स्टेटमेंट करण्याच्या मागे काय पुरावा आहे हे जाणून घ्यायची इच्छा आहे.

अहो साधी गोष्ट आहे हिंदु धर्मियांची संख्या जवळपास ८० टक्के आहे. त्यामुळे गैरफायदा असो वा फायदा त्यांची संख्या जास्त असणार. :H
प्रकाश घाटपांडे

सचिन-पाताळधुंड्या's picture

5 Aug 2008 - 10:33 pm | सचिन-पाताळधुंड्या

...अहो साधी गोष्ट आहे हिंदु धर्मियांची संख्या जवळपास ८० टक्के आहे. त्यामुळे गैरफायदा असो वा फायदा त्यांची संख्या जास्त असणार.
प्रकाश घाटपांडे


.
नाहि हो...
फायदा झाला तर ठिक आहे... जास्त हिंदुना होईल् हे मान्य (directly proportionate)
पण...
तोटा झाला तर .... तर तोहि जास्त हिंदुचाच होईल ना? (Inversely proportionate)

आणि
इतिहास सांगतोय धर्मनिरपेक्षतेमुळे हिंदु नेहमिच तोटयात गेला आहे... फायदा इतरांनाच

II राजे II's picture

3 Aug 2008 - 6:32 pm | II राजे II (not verified)

"तुम्हाला आम्हाला र्धम दिवस भरात कोठे भेटतो ? "

मला तरी नाही भेट भाउ.... माझा धर्म .. माझी जात... मला कोठेच अडचण करत नाही... तसेच कोणाचा धर्म .. कोणाची जात मला अडचण करत नाही.. तेव्हा धर्माला विरोध नाही... ना ही जातीला.... ! ही नेते मंडळीच हे सर्व करतात असा आपला व माझा देखील समज आहे... तेव्हा मतासाठी सर्वात प्रथम नेहरु ह्यांनी "धर्मनिरपेक्षता" हा शब्द वापरला असे कोठे तरी मी वाचले होते... शक्यतो एका ब्लॉग वर !

देशात धर्मावरुन भांडण व्हावे.... इतकाच उद्देश ठेऊन जे दहशतवादी भारतात नंगानाच करतात त्यांना योग्य कायद्या द्वारे शिक्षा व्हावी व त्यासाठी कुठल्या दलाने योग्य प्रयत्न केले हेच मला समजत नाही आहे.... जेव्हा भाजपा सरकार होते तेव्हा देखील ना कुठला कायदा झाला.. ना हल्ले थांबले... ना भेसळ सरकार होते तेव्हा देखील... !

सर्वधर्मसहिष्णुता

हिंदुराष्टामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, बोद्ध, जाट अशी असी साऱ्या धर्मांची रसमिसाळ

वर उलेख लेल्या धर्मा पैकी फक्त मुस्लिम व ख्रिश्र्चन हे धर्म बाहेरुन आले.... देखील काही शतकापुर्वी ... त्यांना कोणी आणले नाही... ते स्वतः येथे आले.. व समाजाचा एक अंग बणून राहीले... ! जसे काही कट्टर हिदुत्व वादी आपल्या कडे आहेत तसेच काही मुस्लमानांकडे देखील आहेत... त्या दोघांना आपली भाकरी भाजणे गरजेचे म्हणून हे दंगे .... व बळी आपण सर्व सामान्य !

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

सचिन-पाताळधुंड्या's picture

3 Aug 2008 - 7:26 pm | सचिन-पाताळधुंड्या

धन्यवाद राजे,...
बरोबर आहे आपले,

पण,. .
सिंधु पलिकडुन अनेक टोळ्या भारतात आल्या. त्याच टोळ्यांचे पुढे ४६०० जाति-पोटजाति आणि जातिसमुह, ५२ जमाति, ६ मुख्य वंश, १६०० बोलिभाषात रुपांतर झाले. सार्‍या टोळ्या एकमेकांत मिसळुन त्यांचे सांस्क्रुतिक ऐक्यहि साधले गेले. एकेश्र्वरवाद, चातुर्व्ण्यांचा सिद्धांतहि सार्‍या टोळ्यांनि मान्य केला.....
.
पक्त एकच टोळि त्यांत मिसंळु शकलि नाहि ति म्हण्जे " इस्लामधर्मि",...... कारन ते मिसळण्यासाठि आलेच नव्हते तर त्याना धर्मासाठि इथलि सत्ता हवि होति... दारुल-उल्-इस्लाम (इस्लामभुमि) आणि दारुल-उल्-हरब (युद्धभुमी) अश्या दोनच प्रकारात त्यानि प्रुथ्विचि विभागनि केलि होति...... भारतात इस्लाम सत्ता नव्हति म्हणुन भारत त्याच्यासाठि युद्धभुमि होता... युद्ध करा आणि सत्ता मिळवा, हा मुळ धार्मिक संदेश होता..... आणि म्हणुन "ते समाजाचे एक अंग बनुन राहिले" हे आपले विधान मला पटत नाहिये...

ऋषिकेश's picture

3 Aug 2008 - 8:23 pm | ऋषिकेश

तुम्हाला आम्हाला र्धम दिवस भरात कोठे भेटतो ? मला तरी नाही भेट भाउ

खरच नाहि भेटत?
का फक्त भेटतो ते जाणवत नाहि?
का जाणवतं पण मन दुर्लक्ष करतं?
हाच प्रश्न कोणत्याहि अल्पसंख्य समाजाला विचारला तर? त्यातील काहि नुसता जाणवतच नाहि तर टोचतो असे उत्तर देतील का?
असे उत्तर देणार्‍या अल्पसंख्यांना देशविरोधी म्हणणार, आक्रस्ताळे म्हणणार का तेच सत्य आहे?

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

सचिन-पाताळधुंड्या's picture

3 Aug 2008 - 9:02 pm | सचिन-पाताळधुंड्या

म्हणुन दैनंदिन व्यवहारिक जिवनात धर्माला अवास्तव स्थान नको...

चिन्या१९८५'s picture

4 Aug 2008 - 5:43 pm | चिन्या१९८५

फक्त उपासना करण्याचंच नाही तर हिंसेचं, सक्तीचंही अनुकरण काही "हिंदू" करतात त्यांना हे वाक्य दिसायलाच हवं असं.

जशास तसे कराव लागत काय करणार. ९\११ नंतर अमेरिकेनी ख्रिस्ताच्या अहिंसेची भाषणे न देता क्रुसेड्सच्या युध्दाची भाषा केली. आमचे हिंदुत्व प्रतिकार आहे. जोपर्यंत आमच्यावर हल्ले होतात तोपर्यंतच आहे. एकदा ते थांबल की आम्हीही थांबु.

समाजाचा एक अंग बणून राहीले... !
बेसलेस विधान आहे हे. असे होते तर फाळणि झालीच नसती.

बाकी भारत देशात सेक्युलॅरीसम नसुन सुडो सेक्युलॅरीझम आहे .जोपर्यंत हिंदु जागरुक होत नाही तोपर्यंत हे तसेच रहाणार आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

5 Aug 2008 - 9:54 pm | प्रकाश घाटपांडे

फक्त........
वरिल सर्वावरुन "रामप्रहर" या विजय तेंडुलकरांच्या स्तंभ लेखनावर असलेला नाट्याविष्कार सुदर्शन रंगमंचावर पाहिला त्याची आठवण झाली. हेच त्यात आहे.
प्रकाश घाटपांडे

धमाल मुलगा's picture

4 Aug 2008 - 6:13 pm | धमाल मुलगा

कालच, धर्म ह्या विषयावर सहजच चर्चा चाललेली असताना काही नव्या गोष्टी कळाल्या, काही जुन्या समजल्या.

मुळात धर्मनिरपेक्षता, बहुसांस्कृतिकता ही भारताची ओळख आहे.
चला क्षणभर धर्मनिरपेक्षता बाजुला ठेऊ, पण बहुसांस्कृतिकता?? ती तर आहे ना?
मग ही आली तरी कोठून?
निरनिराळ्या धर्मातूनच ना?

काल धर्मावरची चर्चा करताना डोक्यात एक विचार आला, जर आपण धर्मनिरपेक्षता जपली नसती तर हा चर्चेबरोबर घोट गोट घेत असलेला फक्कड इराणी चहा मिळाला असता का? विनोदाचा भाग द्या सोडून, पण धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसहिष्णुता हे भारताची मुलभुत अंग आहेत असं मला वाटतं.
फक्त...फक्त ह्या दोन्ही गोष्टी केवळ सो-कॉल्ड बहुसंख्य हिंदूंच्या माथी मारण्याचा जो हलकट प्रकार मतांच्या राजकारणानं वर्षानुवर्षं घडवत आणला तो मात्र मुळीच स्विकारण्याजोगा नाही.

मला इथं अतिशय संयत मतं व्यक्त करणार्‍यांच्या वैचारिकतेबद्दल आदर आहेच. पण मला कोणी हे सांगेल का, की रस्ते रुंदेकरणात हिंदूंची देवळं बिनदक्कत पाडली जातात पण हिरवं फडकं बांधलेला दिड फुटाचा दगड जरी हलवायचा असेल तर सरकारी बाबुंचे हात थरथर कापतात..असे का?
'सर्व'धर्म समानता आणि सहिष्णुता ह्याबद्दल बोलतो ना आपण? मग असं का?

ओरिसामध्ये ग्रॅहॅमला जाळलं तर देशभर केव्हढा आगडोंब...ह्यापुर्वी अशी कृत्यं कधी झाली नाहीत?
नुकत्याच वाचलेल्या बातमीमध्ये होतं: प.बंगालातल्या एका मुस्लिम मुलीनं एका हिंदूशी प्रेमविवाह केला, गावात पंचायत (बहुधा जात पंचायत असावी) बोलावली. निकाल काय दिला माहितीये? त्या तरुणाला ठार मारण्याचा...कोणी हक्क दिला हा ? इथे मात्र सोईस्कर दुर्लक्ष! पण एका ग्रॅहॅमला जाळलं तर मात्र कंठशोष... का तर ते एका हिंदूचं कृत्य म्हणून?
कुठे आहे निरपेक्षता?
मुस्लिमांसाठी वेगळे कायदे, कुठे आहे निरपेक्षता?

छे: फार काही लिहावसं वाटतंय, पण नको, उगाच मी त्या कट्टरतेच्या व्याख्येत बसुन हीन नजरांचा धनी व्हायचो.
राजकारणाबद्दल म्हणाल तर इथुन तिथुन सगळे सारखेच. मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारे. तो विषय्च बाजुला ठेऊ आपण.

मला वाटतं, हिंदू हे मुळातच सहिष्णु असतात, टोळ्यांचे नियम त्यांच्या अंगी नसतात. कारण ५००० वर्षांची एक संस्कृती आहे पाठीशी.
पण जेव्हा मुळावरच कोणी घाव घालत असेल तर त्यावर काहीही हालचाल न करता धर्मनिरपेक्षतेच्या आणि सहिष्णुतेच्या गफ्फा ठोकणं म्हणजे बधीरलेल्या समाजमनाचं मानसिक हिजडेपण आहे असं मला वैयक्तिकरित्या वाटतं.

प्रिय धमाल मुलगा...

रस्ते रुंदेकरणात हिंदूंची देवळं बिनदक्कत पाडली जातात पण हिरवं फडकं बांधलेला दिड फुटाचा दगड जरी हलवायचा असेल तर सरकारी बाबुंचे हात थरथर कापतात..असे का?
'सर्व'धर्म समानता आणि सहिष्णुता ह्याबद्दल बोलतो ना आपण? मग असं का?
.
मुद्दा अगदि पटला .

. 'सर्व'धर्म समानता आणि सहिष्णुता.. ति फक्त बोलण्यात आहे...
या देशात ति एकाच धर्माने पाळायचि असते.. हिंदुने... अशि सरकारचि भावणा असते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Aug 2008 - 1:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>>मला वाटतं, हिंदू हे मुळातच सहिष्णु असतात, टोळ्यांचे नियम त्यांच्या अंगी नसतात. कारण ५००० वर्षांची एक संस्कृती आहे पाठीशी.
म्हणूनच का आपण सार्वजनिक ठिकाणी बेशिस्त वर्तन करतो? (आणि घरात, अर्वाचीन संस्कृतींच्या देशात शिस्तबद्ध वागतो)!
हा मला काही वर्षांपासून पडलेला प्रश्न आहे.

मराठी_माणूस's picture

5 Aug 2008 - 1:27 pm | मराठी_माणूस

>>मला वाटतं, हिंदू हे मुळातच सहिष्णु असतात, टोळ्यांचे नियम त्यांच्या अंगी नसतात. कारण ५००० वर्षांची एक संस्कृती आहे पाठीशी.
म्हणूनच का आपण सार्वजनिक ठिकाणी बेशिस्त वर्तन करतो? (आणि घरात, अर्वाचीन संस्कृतींच्या देशात शिस्तबद्ध वागतो)!
हा मला काही वर्षांपासून पडलेला प्रश्न आहे.

आधिच्या मुद्यां कडे सोयिस्कर दुर्लक्ष

मेघना भुस्कुटे's picture

5 Aug 2008 - 1:32 pm | मेघना भुस्कुटे

आधीच्या मुद्द्यांवर नीलकांतनी वरतीच सविस्तर उत्तरं दिली आहेत आणि यमीनं त्याला दुजोराही दिलेला आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Aug 2008 - 1:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

वरच्या प्रतिसादामधे आधिच्या मुद्यांकडे सोयिस्कर दुर्लक्ष केलंय म्हणूनच प्रतिक्रियेच्या विषयातही "अवांतर" असं लिहिलेलं आहे.

अनिल हटेला's picture

5 Aug 2008 - 5:07 pm | अनिल हटेला

मला वाटतं, हिंदू हे मुळातच सहिष्णु असतात, टोळ्यांचे नियम त्यांच्या अंगी नसतात. कारण ५००० वर्षांची एक संस्कृती आहे पाठीशी.
पण जेव्हा मुळावरच कोणी घाव घालत असेल तर त्यावर काहीही हालचाल न करता धर्मनिरपेक्षतेच्या आणि सहिष्णुतेच्या गफ्फा ठोकणं म्हणजे बधीरलेल्या समाजमनाचं मानसिक हिजडेपण आहे असं मला वैयक्तिकरित्या वाटतं.

बरोबर रे दादा!!

आणी इथे थोड जास्त लिहील की इतराचा वेगळाच समज होतो

बाकी वाट बघुत ,कधीतरी पहाट होइन !!!!!

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

मिसळपाव डॉट कॉम (मिपा) या संकेतस्थळावर जात, पात, पंथ, धर्म या विषयाबाबत लेखन करण्यास/चर्चा करण्यास मिपा व्यवस्थापन आजपासून पूर्णपणे बंदी घालत आहे.

या चर्चांमधून काहीही निष्पन्न होत नाही, उलटपक्षी अशा लेखनातून/चर्चांमधून बर्‍याचदा सभासदांमध्ये एकमेकांच्या जातीधर्मावर आणि पर्यायाने एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर उतरून चिखलफेक केली जाते. आणि त्यामुळे या संकेतस्थळाची शांतता भंग पावते असे मिपा व्यवस्थापनाला वाटते!

तर बहुदा संपादक मंडळी डुलक्या काढण्यात मग्न आहेसं दिसतं.
साती

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Aug 2008 - 8:48 pm | बिपिन कार्यकर्ते

दे टाळी....

बिपिन.

प्रियाली's picture

5 Aug 2008 - 9:03 pm | प्रियाली

शीर्षक धर्मनिरपेक्षता असं आहे ना! त्यामुळे डुलकी काढणे गरजेचे झाले. :)

म्हणूनच मला ज. डायरावतार/ हिटलरावतार आवडतो.

आपली,
प्रियाली गोबेल्स.

ह. घ्या.

नीलकांत's picture

5 Aug 2008 - 10:41 pm | नीलकांत

सचिनसर,

मी मुद्दामच वेगवेगळे दाखले देत खोलात न जाण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यालाही कारण हेच की वेळ कमी आहे. असो. तुम्ही वर माझा प्रतिसाद देऊन खाली काही उदाहरणे दिलीत खात्री बाळगा मीही अशी उदाहरणे अनेक देऊ शकतो. त्याने चर्चा भरकटण्याची भिती असते बाकी काही नाही.तरीही काही समायीक मुद्यांना सोबत उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो.

सच्चर आयोग - हा आयोग नेमल्या गेला तो अल्पसंख्यांक लोकांच्या सरकारी सहभाग नोंदवण्यासाठी. मुस्लीम अनुनयाचं घाणेरडं राजकारण कॉग्रेस करते हे मात्र सर्वश्रुत आहे. त्याचाच परिणाम म्हणजे सैन्याची मोजणी आणि मदरश्याला नोकरीतील मान्यता हे आहेत.

अहो कॉग्रेस चुकतेय हे खरं आहे म्हणून धर्मनिरपेक्षता तत्वच मुळात वाईट या पावित्र्याला माझा विरोध आहे.

उद्या भाजपचे सरकार आलं तर ते सुध्दा मतांसाठी असं काही तरी करेलच की,

बाबासाहेब आंबेडकर घटना समितीत भाषण करतांना बोलले होते की, ' संविधान कितीही चांगले असलं तरी त्याच्या अंमलबजावणी करणारे करंटे असतील तर त्या संविधानाला काही अर्थ उरत नाही. उलटपक्षी एखादे संविधान वाईट जरी असले तरी कर्तुत्ववान राज्यकर्ते त्याचा लोकहितासाठी उपयोग करून घेतील.'

आज आमची अवस्था अशीच आहे. आमच्या महद् भाग्याने आम्हाला एवढे चांगले संविधान लाभलेले आहे. मात्र आमचे राज्यकर्ते त्या चंदनाचा कोळसा करण्यातच धन्यता समजतात.

कॉग्रेसच्या या धोरणांवरचा तुमचा राग मी समजू शकतो, माझंही मत काहिसं तसंच आहे. मात्र याचा दोष आपल्या देशाला अथवा संविधानाला देण्याचे काहीच कारण नाही.

आता येऊ तुमच्या मुस्लीम प्रेमाकडे ;) हे वाक्य जरा हलके घ्या. म्हणजे पुढे मला काय म्हणायचे ते कळेल.

अहो तुम्ही बिनधास्त असं म्हणताय की जागातील मुस्लीम कायम एकसंध राहिलाय ! असं कुठेतरी आहे का? धार्मीक आधारावर वेगळं होऊन तरी ते सुखी समाधानी किंवा किमानपक्षी शांततेत तरी राहू शकले का?
मुस्लीम ब्रदरहूड नावाचा प्रकार हा फक्त लिहायला वाचायलाच ठिक आहे. प्रत्यक्षात असा काहीच प्रकार नाही. जेथे जो समाज बहुसंख्य आहे तेथे तो थोडा सुस्तावणारचा आणि जो अल्पसंख्यांक आहे तो असुरक्षीततेच्या भावनेने का होईना एकत्र येणारच.

येथे जसे मुस्लीम एकत्र येताना दिसतात तसेच मलेशियात हिंदू एकत्र येतात (आठवा हिंद्रफ) आणि श्रीलंकेत तमीळ एकत्र येतात. यात अनैसर्गीक काही नाही. आम्ही आमच्या देशाची धोरणे योग्य राबवतांना कमी पडतोय हाच निष्कर्ष यातून निघतो.

हिंदुच्या सहनशिलतेला आपण " बहुसंख्यकांची मानसिकता" म्हणुन अपमानित करत आहात हे विसरता आहात काय?

हे वाक्य सनातन मधेच जास्त शोभुन दिसलं असतं. ;)

नीलकांत

सचिन-पाताळधुंड्या's picture

6 Aug 2008 - 6:09 pm | सचिन-पाताळधुंड्या

वरिल प्रतिसाद वाचुन बरे वाटले... चला .. आपले विचार काहिअंशि तरि एक आहेत असे वाटते आहे..

अहो कॉग्रेस चुकतेय हे खरं आहे म्हणून धर्मनिरपेक्षता तत्वच मुळात वाईट या पावित्र्याला माझा विरोध आहे.
.
धर्मनिरपेक्षता वाईट आहे असं मलाहि म्हनायचे नाहि..
.. पण तिचा चुकिचा अर्थ आणि फायदा जे लोक घेवु पाहताहेत आणि आम्हिच फक्त धर्मनिरपेक्ष आहोत म्हनताहेत, त्यांचि "तसलि धर्मनिरपेक्षता" काय कामाचि असे मि म्हटले आहे..

परत अधोरेखित करावसं वाटते आहे कि धर्मनिरपेक्षतेचा मला अतंरिम अभिमान आहे, वास्तवातहि ति पाळलि जावि अशिच मला इच्चा आहे... आणि म्हणुन माझा विरोध फ्क्त ढोंगि धर्मनिरपेक्षतेचे अवडंबर माजवणार्‍यांना आहे... खर्या धर्मेनिरपेक्षतेला मुळिच नाहि...

सचिन...

रोहन गेला विरुन's picture

7 Aug 2008 - 9:53 am | रोहन गेला विरुन

का आम्च्यवर ११५० वर्श दुस्र्यनि राज्य केले? दुस् रे स्वाताचा धर्म प्र सार क्र र ताना , आम्हि काय झक मार्लि माहिति आहे?
आम्हि स्वाताच्या धर्म बान्ध्वाना हाक्ल्ल्ले!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

सचिन-पाताळधुंड्या's picture

11 Aug 2008 - 9:30 am | सचिन-पाताळधुंड्या

रोहन गेला विरुन .
.
त्यावेळि स्वताच्या धर्म बांधवानां हकलनारे कोण होते ? त्या वेळचे पुढारिच ना? याचाहि उहापोह होवु देत ..

स्वानंद's picture

21 Mar 2009 - 7:49 am | स्वानंद

बाजीप्रभु खिंडित आहात का आजुन?
का आले आहात कामावर?

विद्याधर३१'s picture

21 Mar 2009 - 7:55 am | विद्याधर३१

युद्ध् संपल्यावर रणांगणात आलात वाटतं...........ऍम्बुलन्स घेवून...

विद्याधर

सचिन-पाताळधुंड्या's picture

21 Mar 2009 - 8:30 am | सचिन-पाताळधुंड्या

कोन्चि आंबुलन्स रे?

अमृतांजन's picture

21 Mar 2009 - 1:20 pm | अमृतांजन

१. धर्म म्हणजे काय?
2. धर्माचे आचरण म्हणजे काय?

समजेल अशा सोप्या शब्दात सांगावे. हे कळले की, आम्ही पुढची पायरी म्हणजे धर्मनिरपेक्षता म्हणजे काय ते समजाउन घेउ शकू.

अमृतांजन's picture

21 Mar 2009 - 10:02 am | अमृतांजन

क्षणभर आपण असे मान्य करु की तुम्ही मांडलेले सगळे प्रॉब्लेम सुटले व भारतातील ७०-८० कोटी लोक नीट वागायला लागले; त्यांना धर्मनिरपेक्षता वगैरे समजायला लागले तर त्यामुळे खालील प्रश्न सुटणार आहेत का? व कसे?

१. गरीबी
२. अत्याचार
३. पिण्याचे पाणी
४. शिक्षण
५. मिळकत
६. भ्रष्टाचार

तुम्ही मांडलेल्या प्रशांचा व वरील गोष्टींचा काहीच संबंध नाही असे आपल्याला वाटत असेल तर ते तसे का हे ही समजाऊन सांगा.

विटेकर's picture

29 May 2014 - 11:00 am | विटेकर

२००८ सालातील हा धागा केवळ श्री नीलकांत यांचे विचार वाचण्यासाठी वर काढत आहे.
किती संयमित आणि संतुलीत प्रतिसाद आहेत या धाग्यावर !
आजच्या च्या लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा वाचून पहावेत यासाठी !

खरं तर चपलेची उपमा देणं मलाही rude वाटतंय पण त्या धर्माच्या नावावर उच्छाद मंदलेल्यांना ती उपमा योग्य आहे . सती जाण्याचि प्रथा, स्पुश्य-अस्पुश्य, धर्मावरून भेदभाव, धर्मावरुन दंगलि, उच्च-निच ठरविणे हे धर्मात येत नाही. काही विशिष्ट जातींनी स्वताच्या फायद्यासाठी ह्या गोष्टी धर्मात घुस्मादल्या. 'धर्माने वागणं' महत्वाचं.