केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सर्व राज्यांमधील मुख्य सचिवांना पत्र पाठवून '7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट', या काळात संस्कृत सप्ताह पाळण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पत्रानंतर ऐका राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यानी केंद्राच्या या सूचनेला विरोध करत, त्यामध्ये सुधारणा करण्याची विनंती केंद्राला केली आहे. "आमच्या राज्यात सरकारी स्तरावर अधिकृतपणे संस्कृत सप्ताह पाळणे अत्यंत चुकीचे आहे. याउलट, प्रत्येक राज्याच्या भाषिक परंपरेनुसार त्या त्या राज्यांमध्ये अभिजात भाषा सप्ताह पाळणे योग्य ठरेल,' असे त्यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
म्या पगल्याच्या, यासंधर्भात विकीपेडियावरील माहितीनुसार, २००१ च्या जनगणनेच्या माहितीनुसार अंदाजे ०.०००१ टक्का लोकसंख्या संस्कृतशी परिचित आहे. तक्ता खालील प्रमाणे.
Language-Speakers(in millions, 2001)
Hindi - 258–422
Bengali - 83
Telugu - 74
Marathi - 72
Tamil - 61
Urdu - 52
Gujarati - 46
Kannada - 40
Punjabi - 34
Malayalam - 33
Oriya - 33
Assamese - 13
Maithili - 12–32
Santali - 6.5
Kashmiri - 5.5
Nepali - 2.9
Konkani - 2.5–7.6
Sindhi - 2.5
Dogri - 2.3
English - 10.35
Manipuri - 1.5
Bodo - 1.4
Sanskrit - 0.01
'राजनैतिकविरोध', हा Angle बाजूला ठेवून, या माहितीकडे पाहिलं, तर थोडं तथ्य वाटते, तुमचं याविषयीच मत काय ?
ऐक प्राचीन परंतु, जवळ जवळ मृतप्राय भाषा यापलीकडे संस्कृतच भारतात काय स्थान ? तुमचं याविषयीच मत काय ?
प्रतिक्रिया
22 Jul 2014 - 4:49 pm | आनन्दा
मिपावर अजून पोल ची सुविधा आहे काय हो?
22 Jul 2014 - 7:58 pm | एस
संस्कृत आवडते. पण ती प्राचीन व सुंदर असली तरी मृतप्राय भाषा आहे हे दुर्दैवाने खरे आहे. आणि संस्कृत सर्वश्रेष्ठ वा सर्व भाषांची जन्मदात्री आहे हे मत काही मान्य नाही.
23 Jul 2014 - 10:23 am | पगला गजोधर
आजची इजिप्तची संस्कृति बाबिलोनियन संस्कृतीपासूनच निघाली आहे, ख्रिस्तपूर्व ६-७ हजार दरम्यान,
बाबिलोनियन संस्कृतीचे 'सुमेर' हे केंद्रस्थान होते. बाबिलोनियामध्यें बऱ्याच उत्तरकालापर्यंत सुमेर येथील सुमेरियन भाषा पवित्र/देवांची (गीर्वाण वाणी) मानली जात असे. सर्व प्राचीन शिलालेख त्याच भाषेंत खोदलेले आहेत. तशीच प्राचीन राजांची नांवेहि सुमेरियन आहेत.
संस्कृतप्रमाणेच सुमेरियन हि सुंदर भाषा. संस्कृत सुंदर आहे एकदम मान्य. परंतु आजच्या आधुनिक जगात इजिप्तमध्ये सुमेरियनला, पुरातन-भाषा म्हणूनच ओळख आहे, कोणी तिचा सामाजिक/ राजनैतिक प्रोपागेंडासाठी किंवा सांस्कृतिक अस्मितेचा बागुलबुवासाठी, वापर करताना आढळत नाही.
22 Jul 2014 - 8:22 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
संस्कृत सप्ताह पाळायचा म्हणजे काय करायचे?आमच्यासारखे घरी बसणारे 'गीता प्रेस गोरखपूर'चे एखादे पुस्तक जवळ ठेवतील पण कामावर जाणार्यांनी? बॅगेत भग्वद्गीता ठेवायची? की तुमच्या त्या वॉलपेपरवर 'आय लव्ह
सॅन्स्क्रीट' टंकायचे?