मिपाकर सप्रेम नमस्कार !
आज मीनाकुमारी यांचा वाढदिवस आहे , त्या निमित्ताने मागे त्यांचे काढलेले एक स्केच इथे जोडत आहे , यावेळी लेख नाही लिहू शकलो - क्षमस्व !
काल महंम्मद रफी यांची २८ वी पुण्यतिथी होती त्या निमित्ताने काही या आठवड्याच्या अखेरीस जमल्यास लिहून मिपा वर देण्याचा प्रयत्न करीन !
तोवर या सोज्वळ नटीला आमची श्रध्दांजली !
उदय सप्रेम
प्रतिक्रिया
2 Aug 2008 - 1:40 pm | विसोबा खेचर
चित्र खास वाटलं नाही. प्रामाणिक मत, राग नसावा...
पुढील चित्रकलेकरता शुभेच्छा!
तात्या.
2 Aug 2008 - 1:43 pm | सुचेल तसं
डोळे आणि टिकली छान जमले आहेत. पण नाक आणि ओठ जरा गंडले आहेत. त्यामुळे मीनाकुमारीचं स्केच आहे असं सांगितल्याशिवाय समजत नाही.
http://sucheltas.blogspot.com
2 Aug 2008 - 1:56 pm | प्रकाश घाटपांडे
मला वाटलं कि मीच गंडलो कि काय?
प्रकाश घाटपांडे
2 Aug 2008 - 3:26 pm | टारझन
सप्रे सर ..
चित्र ऍज अ मिनाकुमारी थोडा हुकलय. लोकांच्या अपेक्षा जास्त आहे.
अवांतरः आपले शेडींग फारच भारी. नुसते चित्र काढण्यापेक्षा त्यावर भाव आणने जिकरीचे असते.
फक्त चित्र म्हणुन क्लास च
टारझन (गेल्या जन्मीचा खविस)
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
4 Aug 2008 - 7:09 pm | मनस्वी
उदय काका,
तुम्ही शेडिंग छान करता.
पण नाकाखालचा आणि नाकावरचा असे २ भाग एकमेकांशी मिसमॅच होतात असे वाटते.
तुमच्या आत्तापर्यंत टाकलेल्या चित्रात नाकच गंडलेलं वाटतंय. पण हे नाक जरा बरोबर आल्यासारखं वाटतंय! केसांची बट पण छान जमलीये.
राग नसावा.
पुढील चित्रास शुभेच्छा.
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *