वेताळाच्या बेताल बोलण्याकडे दुर्लक्ष करीत राजा विक्रमादित्य भराभरा रेशमाच्या बागेकडे चालू लागला. वेताळाने राजाला एक गोष्ट सांगायला सुरुवात केली..
ओसाडवाडीच्या पंचवार्षिक जत्रेत, सकाळी सकाळी अंबादास बाळाजी मानव (अं.बा.मानव) , सर्व दुकानात, त्याला हवे असलेलं डस्टबिन शोधात होता, साध्याच डस्टबिन दिवसेंदिवस खराब होत चालले होत. खिशात फक्त ऐक रुपयाच होता. तोच ऐका दुकानदाराने त्याला हटकल्यावर थांबला.
दुकानदार: केम भाया, सु आपु तमे ? काय देऊ तुला ?
अं.बा.मानव: चांगले बिन शोधत व्हतो हो, हल्लीच खराब झालं आहे माझं बिन. ऐकुलता ऐक रुपया हाय माझ्याकड. या पंचवार्षिक जत्रेत मिळालं तर मिळालं, नायतर मी राहतुया ती वस्ती हाय ऐका टोकाला, तिरंगाई देवीच्या पंचवार्षिक जात्रेशिवाय, कोणबी हिकड फिरत न्हाय.
दुकानदार: अच्छा तो बंदा रुपया मला दे नी तू , जत्रा संपल्यावर , तुला अच्छे बिन दाखवतो, मग बोलू .
अं.बा.मानव खुश झाला, त्याने तो एकुलता ऐक रुपया दुकानदाराला दिला व बिनघोर डोंगरावर देवीच्या दर्शनाला व विश्रांतीला गडावर गेला. त्याला तर दुपारची डुलकीसुद्धा लागली, त्यात त्याला स्वप्न देखील पडलं, कि आपल्याला अच्छे बिन मिळणार आहे.
तिन्हीसांजेला जवळजवळ सर्व जत्रा उठून गेलेली होती, तो दुकानदाराला भेटला व बिन बद्दल विचारलं.
दुकानदार: अरे ते तर तू फकस्त advance दिला नी मला, अच्छा बिन मिलेगा, लेकिन अच्छे बिन, महंगे होते है.
अं.बा.मानव: अरे तू सकाळीच मला तशी कल्पना दिली असती तर मी दुसरीकडे नसते का पाहिलं, आता पुढल्या जत्रेशिवाय कोण दुकानदार फिरकणार पण न्हायी हिकड.
दुकानदार: ते मला म्हाईत नाही, चाल ते तुझी चांदीची अंगठी दे नी.
अं.बा.मानव: अरे मी ती माझ्या मुलाला देणार होतो रे, तेव्हडीच ऐक बचत होती माझ्यकडे त्याला देण्यासाठी.
दुकानदार: माझ्याकडे आता रोख नाही, मी माझ्या सावकाराला देऊन टाकली, आता पुढच्या जत्रेत मी तुला देईल परत तुझा रुपया. पटत असल तर बघ, नाही तर कोणाकडे दाद मागायची असलं तर तिकड जा, पण याद राख, जर दाद मागितली तर पुढच्यावेळी तो रुपया सुद्धा देणार नाही तुला.
अं.बा.मानव मुकाटपणे अंगठी दुकानदाराला देतो. एवढे बोलून वेताळ थांबला. "राजन् 'अधिक महाग असलेल्या, सर्वच वस्तू किंवा सेवा चांगल्या दर्जाची असतात', असा अर्थ होतो का ? "
तू मौन बाळगलंस. त्याबरोबर मी तुला हि गोष्ट सांगून शेवटी हा कूट प्रश्न विचारत आहे, उत्तर येत असूनही गप्प राहिलास तर तुझ्या डोक्याची हजारो शकले होतील.
विक्रमादित्य उत्तरला, बऱ्याच लोकांना वस्तू किंवा सेवा अधिक महाग, तेव्हा तो दर्जा किंवा सेवा अधिक चांगली असली पाहिजे, असे वाटते. कदाचित ग्राहकांना, वस्तू अथवा सेवेबद्दल सर्वांग संपूर्ण माहिती, कधीच नसते, (असूही शकत नाही, कारण ते कोणालाही, ह्युमनली शक्यही नाही ) जी काही थोडीबहुत असते, ती त्या वस्तूच्या वा सेवेच्या, ईफेक्टीव जाहिरातींमुळे असते. अश्यावेळेस हि ठोस माहितीची पोकळी, आपला मेंदू 'Naïve Theory 'या थिअरिने ('अधिक महाग असलेल्या, सर्वच वस्तू किंवा सेवा चांगल्या दर्जाची असतात'… या थिअरिने ) भरून काढतो, व महाग वस्तू पदरात पडून देखील, तिचा दर्जा नक्कीच उच्च असला पाहिजे, अशी मनाची समजूत करून घेतो.
प्रतिक्रिया
10 Jul 2014 - 12:19 am | आयुर्हित
आय ऑब्जेक्ट!
10 Jul 2014 - 8:43 am | ब़जरबट्टू
आवडले.. आने दो..
10 Jul 2014 - 9:47 am | मंदार दिलीप जोशी
बकवास लेख
10 Jul 2014 - 10:23 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
६० वर्ष नेमानी रुपये, अंगठ्या, गळ्यातलं, कानातलं, अंतरवस्त्रं ई.ई. ढापणार्या लोकांच्या समर्थकांकडुन आलेला लेख सुरळी करुन चुलीत घालण्यात आलेला आहे.
10 Jul 2014 - 2:08 pm | पगला गजोधर
म्हणजेच ६० वर्ष ढापनारे आणि आत्ताचे बेपारी, यांच्यात जास्त काय फरक नाही, ते लुबाडतच होते, हेही तसेच 'मागील पानावरून पुढे' स्टाइल ने चालू ठेवतील, असं तुमच्या कॉम्मेंट पाहून वाटतंय ! 'व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले' असा धडा आजच्या काही लोकांच्या बाबतीत परत येईल का हो ?
आणी ६० वर्षेच मागे का जाता ? त्याही मागची काही दशके/शतके पण लक्षात घ्या, त्यावेळी सुद्धा रुपये, अंगठ्या, गळ्यातलं, कानातलं, अंतरवस्त्रं, श्रम, dignity ई.ई. ढापणारे लोक व त्याचे समर्थक होतेच की, नाही का ?
10 Jul 2014 - 11:10 am | गब्रिएल
हाहाहा.. चलने दो ! नायत्री आता 'कॉन'ग्रेसी भाट त्यांच्या मालकांची नोक्री ग्येल्याने बेकार झाल्याले हैत... तेवा ते ईवाळले तर आच्चर्य नाय आजाबात ! तुमी तशी कता लिवा आशी कता लिवा आम्च मणोरंजण करा बास ! =)) (जोकरको दुस्रा काय जमेगा ? नाय्का?) ;)
10 Jul 2014 - 12:24 pm | मंदार दिलीप जोशी
येकदम बरोब्बर साहेब!
10 Jul 2014 - 5:17 pm | ऋषिकेश
दणदणीत उपहात्मक लेख!
मजा आली!
और भी आने दो!
17 Jul 2014 - 4:24 pm | अन्या दातार
'बिन' तेरे सनम, मर मिटेंगे हम....
18 Jul 2014 - 9:55 am | पगला गजोधर
बिन "तेरे" है, लेकिन मर-मिटेंगे "हम", अर्रे व्वा ,हे बरय !