नमस्कार मंडळी ,
हा उतारा लिहायचं कारण म्हणजे परवा आमच्या घरी एक मराठी नावाजलेले कवी आले होते आणि तो अनुभव मला लिहावासा वाटला .
माझ्या नवऱ्याच्या मित्राचे सासरे येणार एवढाच मला निरोप होता .ते घरी यायच्या आधी ५ मिनिट अहोंनी सांगितला कवी आहेत त्यांचे बरेच ब्लोग्स वगेरे आहेत . एक तर मला त्यांचा नाव माहित नव्हता आणि माझा नवरा गूगल कर त्यांना म्हणाला. मी त्याला नाव विचारला तर त्याचं नाव शोधण्यात त्याचा १ मिनिट गेला गूगल करून त्यांचा एक एपिसोड बघावा इतक्यात त्यांची गाडी पार्किंग मध्ये आली . माझा नवरा त्यांच्या स्वागतासाठी गेला. त्यांना घरी घेऊन आला . त्यांना आमच घर UK मध्ये असूनही जुनाट पद्धतीच नाही म्हणून खूप आवडलं. नमस्कार करून झाला ,त्यांनी विचारल तू कुठल्या गावाची. मी सांगितला सासर सातारा माहेर इचलकरंजी . ये खुश झाले एकदम …. ते म्हणाले तुमच्या इथे dkte कॉलेज आहे न तिथे मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलं होता, मी पण अगदी हसत हसत हो का असा म्हणल . पुढे ते म्हणाले तुमच्या इथे आपटे वाचनालयात मला कविता वाचायला बोलावलं होता …परत मी मन हलवत हो का… मग ते कोकण संमेलन का अधिवेशन काय ते त्याचे काही काळ अध्यक्ष होते आणि हस्यसम्राट मध्ये ते परीक्षक होते ते तू बघितलाच असशील असा म्हन्ल्याबरोबर माझ खूप जास्त अज्ञान त्यांच्या बाबतीतल झाकून टाकण्यासाठी आणि पुढा अजून काहीतरी त्यांनी माझ्याकडून अपेक्ष्याभंग करून घेण्याआधी मी त्यांना सांगितला आताच आम्ही तुमचा खुपते तिथे गुप्ते बघितला …मश्य वाक्यात सुधारणा करून माझा नवरा म्हणाला आम्ही तुमचा खुपते तिथे गुप्ते तला एपिसोड बघितला तुमचा कीर्ती कॉलेजातला भाषण आईकला. त्याचे वाक्य संपला कि लगेच ते म्हणाले ते काही येवढा खास नव्हता ंअग तुम्ही अमुक अमुक बघितला का वगेरे सुरु झाला …मग पटकन मी त्यांना चहा करते म्हणून सांगून आत गेले त्यांच्या बायकोला मेनू सांगितला …मग त्यांचा चहा घेण वगेरे चालाल होता मग मी ते एखादी कविता म्हणतील या आशेने बाहेर आले ।नो कविता ।ते कुठे कुठे कुठल्या कुठल्या देश्यात त्याचा कार्यक्रम झाला हे सांगण्यात व्यस्त होते ।हे चालाल असताना अहो मधेच म्हणाले मग तुम्हाला लिखाणासाठी बराच माल मिळाला असेल. । त्याची गुगली करत ते म्हणाले मी कवी आहे प्रवास वर्णन लिहिणारा लेखक नाही … माझा नवरा काय बोलणार तो इतकाच म्हणाला आम्हाला लिखाण म्हणजे कविता ,धडे असा वेगळा कसा कळणार आम्ही त्यातले अज्ञानी . मी तो विषय तितेच ठेवून त्याच्या जेवण्याची तयारी करण्यासाठी आंत गेले काकू म्हणाल्या मदत करते म्हणून आत आल्या ।मग गप्पा मारत ,त्याच्या मुलीशी बोलत त्यांनी तिला माझी मदात करायला सांगितल. मग गप्पा मारतना त्या तू हि सिरिअल बघितली का, त्या
होमे मिनिस्टर च्या साड्या तथास्तु मधल्या असतात , त्या जान्हवीच लग्न झाला त्या सिरियल मधला कुणाशीतरी आता मला नाव आठवत नाही त्यांनी सांगितलेले …
मग शेवटी न राहवून काकू खरा सांगू मी आणी माझ्या घरातले T.V सिरियल्स बगह्त नहि. आणि मी इथे ,पुण्यात कधीही T.V घेतला नाही कारण आम्हांला घरात कुणालाच T.V बघायला वेळ नसतो .ओफ़्फ़िचेमधुन घरी आल्यावर आम्ही एकमेकींशी गप्पा मारायला वेळ मिळावा घरातलं वातावरण चांगला रहाव म्हणून अजून तरी तव घेतला नाही . सासू सासरे सातारला असतात त्यांना पण त्यांचे उद्योग(सामाजिक) इतके आहेत कि ते सुद्धा आठवला तर T.V लावतात ,केबल नाही घरी तिथे . त्यामुळे sorry पण मला तुम्ही सांगितलेले पेपर मध्ये वाचलेलं ते लग्न आठवते आहे आणि मी काकांचा त्यांनी सांगितलेले कार्यक्रम नंतर नक्की youtube वर बघेन . त्यांना मी खरा बोलल्यावर बरा वाटला । मग त्यांची मुलगी म्हणाली तू आता नोकरी सोडली आहेस मग आता वेळ कसा जातो । मी म्हणाला अफल्याना वेळ कसा घालवायचा हे विचार करायला वेळ नसतो । मी त्यांचीच सून, पुस्तक वाचायचा खूप नाद ,कधी कधी नवरा म्हणतो बाई तुमचा झाला असेल तर आमच्या पोटापाण्याची व्यवस्था करा इतकी मी माझ्याच गोष्टींमध्ये रममाण असते.
त्यांचा खाणं झाल,त्यांनी भरभरून कौतुक केले smoothy ,छोले त्यांना खूप आवडले माझ्या मुलाच्या मराठी बोलण्यावर ते खूप खुश झाले ।मे पण त्या काकाचं कौतुक करण्यापेक्ष्या माझ्या मुलाच कौतुक जास्त करत होते (ज्याच्याबद्दल आपल्याला जास्त माहित त्याच्याबद्दल आपण ज्यास्त बोलतो तसाच काहीतरी ) । मग मी त्यांना एखादी कविता आईकवा म्हणून विनंती केली ते म्हणाले ७-८ लोक असती तरी मी चांगली मैफिल केली असती (खुपच वाईट वाटला मला ….हे ऐकून ). मी काकांना म्हणाmanchester मध्ये असताना जर आपली भेट झाली असती तर मला हे शक्य झाला असत ७-८ मराठी मानसं जमवणं । गेले वर्ष्याभर मी इथे मराठी मानसं शोधण्याचा प्रयत्न केला एक जन भेटला सुद्धा पण त्यालाच मराठी बोलायची लाज वाटत होती … अश्या बर्याच गप्पा झाल्यानंतर जाताना मी काकांना म्हणाले काका तुमची एकही कविता आईक्ण्याचा लाभ नाही मिळाला आम्हाला . ते पुन्हा म्हणाले मी भारतात जायच्या आधी तू मराठी लोक गोळा कर मी करेन तुझ्याघरी कार्यक्रम …
असा आम्ही त्यांचा निरोप घेतला … त्या रात्री मला इतका वाईट वाटला आणि झोप पण नाही आली … त्यांची कविता त्यांच्या कडून आईकायला नाही मिळाली । भले त्यांनी मध्ये मध्ये एखादि ओंळ म्हणाली ती पण दुसर्या कवीची … खूप वाईट वाटला …
दुसऱ्या दिवशी माझ्या मैत्रिणीला मी फोन करून सांगितला ती म्हणाली असू दे ग त्या लोकांना कौतुक करून घेण्याची सवय झाली असते तू वाईट वाटून घेऊ नकोस .
प्रतिक्रिया
9 Jul 2014 - 3:12 pm | आदूबाळ
कमाल.
चुकून घडलेला विनोद असेल, पण
या वाक्यावर पाचेक मिन्टं हसत होतो.
बादवे तुमची नेमकी तक्रार काय आहे हे नीटसं कळलं नाही.
9 Jul 2014 - 3:32 pm | अम्रुता आफले
तक्रार कसलि, कहिच नाहि ...नो प्रोब्लेमो :).कदाचित मला अस वाट्ल कि ते एखदि कविता आइकव्तिल.
9 Jul 2014 - 3:33 pm | अम्रुता आफले
तक्रार कसलि, कहिच नाहि ...नो प्रोब्लेमो :).कदाचित मला अस वाट्ल कि ते एखदि कविता आइकव्तिल.
9 Jul 2014 - 3:57 pm | उदय के'सागर
माफ करा, राहवत नाही म्हणून बोलतो - मराठी खूपच अशुद्ध लिहीलं आहे. तुमच्या लिखाणातल्या भावना समजल्या, लिखाणात थोड्याफार चुका असत्या तर त्याही समजून घेतल्या असत्या पण एकही वाक्य शुद्ध नाही हो तुमच्या लिखाणातलं - वाक्यागणिक चुका :( वाचकाला किती गृहीत धरायचं ह्याला काही मर्यादा!
9 Jul 2014 - 4:06 pm | अम्रुता आफले
खरच हे मि शेवटि लिहिनरच होते कि मराठी typing अजिबात चान्ग्ला नहि आनि त्यात हा text editor खुपच लिहय्चि इच्चा झलि म्हनिन लिहिल हो ... very sorry
10 Jul 2014 - 3:22 am | सखी
सोर्रि - हा प्रतिसाद वाचुनसुद्धा हसुन हसुन डोळ्यात पाणी आले, मोकलाया दाही दिशाला कांप्मिटिशन आहे वाटतं. वर म्हटल्याप्रमाणे चुका होणारच.. कोणी चुका लक्षात आणुन दिल्या कि लगेच सुधारणा करायची.
असो. अनुभवाबद्द्ल बोलायचं झालं तर ते तुमच्या घरी आले होते एखादी दुसरी कविता म्हणुन दाखविली असती तर चालले असते असे वाटते, तेही तुम्ही आग्रह केला असताना. तुम्ही त्यांच्या घरी गेला नव्हतात किंवा बाहेर रस्त्यात वगैरे भेटलात तरी लोक अपेक्षा करतात (हे पुलंच्या बाबतीत अनेकदा घडायचे), हे बरोबर नाही.
७-८ लोकं जमवण्याचाही उद्देश कळला नाही, समजा केले ७-८ लोकं जमा आणि त्यांना कवितेत अजिबात रस नसेल किंवा ओ का ठो कळत नसेल तर काय उपयोग माणसं गोळा करण्याचा त्याउलट कोणी आग्रहाने स्वत:च्या घरीच विचारत असेल तर तो मान राखायला पाहीजे असे वाटते.
9 Jul 2014 - 3:57 pm | ज्ञानोबाचे पैजार
बरं झाल तुमच्या कडे संजीव कपुर आले नाही ते.
पैजारबुवा,
9 Jul 2014 - 10:41 pm | यसवायजी
त्यांच्या घरी कधी "द ग्रेट खली" आला तर ( नवर्यासोबत!!) कुस्ती खेळ म्हणतील त्या. :))
9 Jul 2014 - 4:05 pm | प्रभाकर पेठकर
स्वतःच्याच चेहर्याभोवती आरती ओवाळणार्यांपासून अपेक्षा ठेवू नये. दु:खंच वाट्याला येतं. नार्सिसिझमचे बळी असे म्हणून बोळवण करावी. ७-८ माणसं का लागावीत? ज्यांनी आपल्याला घरी जेवायला बोलावले आहे त्या यजमानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, 'येत्या पौर्णिमेला मुहूर्त आहे त्या दिवशी कृतज्ञता व्यक्त करतो' असे म्हणण्यासारखे आहे.
9 Jul 2014 - 4:08 pm | अम्रुता आफले
R u from pune ,just kidding comment varun vatala ...
9 Jul 2014 - 4:20 pm | प्रभाकर पेठकर
>>>>R u from pune?
No, I am from Muscat. And in Pune, 'P' should be a capital letter. Do not underestimate 'Pune' so much.
9 Jul 2014 - 4:31 pm | प्यारे१
यु शुअर इट्स ओन्ली 'पी'? आय हर्ड व्होल पुणे इज कॅपिटलाईज्ड! ;)
9 Jul 2014 - 6:05 pm | केदार-मिसळपाव
कोपर्यापासुन.
9 Jul 2014 - 4:34 pm | प्यारे१
यु शुअर इट्स ओन्ली 'पी'? आय हर्ड व्होल पुणे इज कॅपिटलाईज्ड! ;)
10 Jul 2014 - 5:36 pm | नित्य नुतन
पेठकर काका, अहो हे नार्सिसिझमचे बळी फारच त्रास देतात हो .. जवळच्या नात्यात असतील तर टाळताही येत नाहीत... काही तरी जालीम उपाय सुचवा ...
9 Jul 2014 - 4:11 pm | एसमाळी
हे सिलेब्रेटी कवी म्हणजे ते मांजरासारख्या फैंदांरलेल्या मिशा ठेवणारे का ?
9 Jul 2014 - 4:16 pm | समीरसूर
अशोक नायगांवकर होते का ते?
तुम्हाला त्यांची अजिबातच माहिती नव्हती म्हणून नाराज झाले असतील कदाचित ते. मग कला सादरीकरणात मजा नही आता. एका छोट्या गृपमध्ये मी एकदा गप्पांच्या ओघात एका गजलेच्या दोन ओळी म्हटल्या होत्या; सगळे मख्ख चेहर्याने बघत होते. मी थांबल्यावर एक जण दुसर्याला म्हणाला, "कल का मॅच देखा क्या? क्या सही हुआ ना?" :-)
चिकनच्या एका तंगडीचा लचका तोडून मी गप बसलो. :-) असं होतं कधी कधी. त्यांचावर राग धरू नका. तसा हसतमुख माणूस आहे तो. :-) त्यांच्या मिशांमुळे ते नेहमी हसत असल्याचा भास होतो. अर्थात तुमच्याकडे जे आले ते अशोक नायगांवकरच होते असं धरून बोलतोय मी.
9 Jul 2014 - 4:16 pm | समीरसूर
अशोक नायगांवकर होते का ते?
तुम्हाला त्यांची अजिबातच माहिती नव्हती म्हणून नाराज झाले असतील कदाचित ते. मग कला सादरीकरणात मजा नही आता. एका छोट्या गृपमध्ये मी एकदा गप्पांच्या ओघात एका गजलेच्या दोन ओळी म्हटल्या होत्या; सगळे मख्ख चेहर्याने बघत होते. मी थांबल्यावर एक जण दुसर्याला म्हणाला, "कल का मॅच देखा क्या? क्या सही हुआ ना?" :-)
चिकनच्या एका तंगडीचा लचका तोडून मी गप बसलो. :-) असं होतं कधी कधी. त्यांचावर राग धरू नका. तसा हसतमुख माणूस आहे तो. :-) त्यांच्या मिशांमुळे ते नेहमी हसत असल्याचा भास होतो. अर्थात तुमच्याकडे जे आले ते अशोक नायगांवकरच होते असं धरून बोलतोय मी.
9 Jul 2014 - 4:49 pm | अम्रुता आफले
माफ करा पण आधीच सांगितल्याप्रमाणे मला त्यांच्याबद्दल तक्रार नाही ,कारण पाहुणे,व्यक्ती म्हणून ते खूपच छान होते.
आणि त्यांच्याबद्दल नाही स्वतः च्या कमी dyanabaddal थोडं वाईट वाटत . :)
फक्त मी चुकीच्या जागी प्रकट केले माझा लिखाण ,परत एकदा माफी आणि नवरा आणि माझी आई सोडले तर मी जास्त कुणावर राग करत नाही. मजेने म्हणाल कारण ते दोघं मला जास्त समजून घेतात .
धागा delete कसा करतात हे जर कुणी मला सांगितला तर मला हा धागा delete करायला आवडेल .
9 Jul 2014 - 6:11 pm | केदार-मिसळपाव
धागा नष्ट करु नका. तुमची लिहिण्याची जागा आज्जीबात चुकलेली नाही.
इथे जास्तीत जास्त प्रतिक्रीया देत रहा. आपोआप मराठी लिहिण्याची सवय होइल.
थोड्याफार व्याकरणाच्या चुका होणारच.. कोणी चुका लक्षात आणुन दिल्या कि लगेच सुधारणा करायची.
हाय काय अन नाय काय.
9 Jul 2014 - 4:49 pm | अम्रुता आफले
माफ करा पण आधीच सांगितल्याप्रमाणे मला त्यांच्याबद्दल तक्रार नाही ,कारण पाहुणे,व्यक्ती म्हणून ते खूपच छान होते.
आणि त्यांच्याबद्दल नाही स्वतः च्या कमी dyanabaddal थोडं वाईट वाटत . :)
फक्त मी चुकीच्या जागी प्रकट केले माझा लिखाण ,परत एकदा माफी आणि नवरा आणि माझी आई सोडले तर मी जास्त कुणावर राग करत नाही. मजेने म्हणाल कारण ते दोघं मला जास्त समजून घेतात .
धागा delete कसा करतात हे जर कुणी मला सांगितला तर मला हा धागा delete करायला आवडेल .
9 Jul 2014 - 4:53 pm | अम्रुता आफले
आणि मिपा ला कोणी freelancer programmer हवा असेल तर मी आनंदाने तयार आहे …कारण खूप error दिसत आहेत :)
9 Jul 2014 - 5:37 pm | llपुण्याचे पेशवेll
धागा डिलीट करण्याची गरज नाही. अनुभव सांगितल्याबद्दल धन्यवाद.
10 Jul 2014 - 12:01 am | चित्रगुप्त
यावरून तीन-चार गोष्टी सुचल्या, त्या लिहितो:
१. समजा परदेशात आपल्या घरी जेवायला भारतातला एकादा प्रसिद्ध डेंटिस्ट, वकील, शेफ, नकलाकार, बासरीवादक, चित्रकार, वगैरे कुणी आला, तर त्याने अनुक्रमे यजमानाचे दात तपासणे, वकिली सल्ला देणे, एकादा खाद्यपदार्थ बनवणे, नकला करून दाखवणे, बासरी वाजवणे, चित्र काढणे, वगैरे करून दाखवायलाच हवे काय? मग कवीनेच काय घोडे मारले आहे ?
२. कलावंत मंडळी आपणहून आपल्या कलेचे प्रदर्शन कुणाकडे गेले असता सहसा करत नाहीत. यजमानाने त्यांना तशी विनंती केली, तर करतील कदाचित, मूड असेल तर.
३. कविता, गाणे यांची बैठक रंगायला थोड्याश्या दर्दी लोकांची उपस्थिती हवी. उठसूट कुणाकडे गेले की म्हण गाणे, वाच कविता, असे होत नाही.
४. परदेशातील काही भारतीय लोक भारतातून येणार्या (तथाकथित) सेलेब्रिटींचा कार्यक्रम आपल्या घरी ठेवतात, त्याचे ते प्रेक्षकांकडून प्रत्येकी तीस वा कमिजास्त डॉलर वसूल करतात. जेवणखाण व अन्य खर्च वजा करून जमलेले पैसे त्या शेलेबहाद्दरास देतात. तुम्ही असे काहीतरी करून मग पुन्हा त्यांना बोलवावे, असेही कदाचित त्यांना वाटत असेल.
असो. पुढील लेख लिहिल्यावर पुन्हा पुन्हा तपासून, पूर्वपरिक्षण करून सावकाशीने प्रकाशित करावा, ही विनंती.
11 Jul 2014 - 12:18 am | कानडाऊ योगेशु
चित्रगुप्तांशी सहमत. लेखावरुन तर असे जाणवते आहे कि यजमानांना जर कवीबद्दलच ओ कि ठो माहीती नव्हते तर त्यांच्या कवितांबद्दल काही माहीती असणेही शक्य नाही. अश्या वेळी समजा त्या कविराजांनी आपली एखादी प्रसिध्द अशी रचना सादर केली असती ( टु बी ऑन सेफर साईड कारण अश्या कवितांतल्या हशा/दाद देण्याजोग्या जागा साधारण रसिकांना माहीती असतात) आणि अश्या एखाद्या दाद मिळवण्याजोग्या जागेवर जर यजमानीणबाईंनी सखाराम गटणेंसारखा पेपर चाळायचा प्रकार केला असता तर कविराजांशी किती फजिती झाली असती बरे!.एकुण कविराजांशी झालेल्या चर्चेतुन त्यांना बहुदा तुमच्यातील श्रोतृत्वाचा अंदाज आला असावा व त्यामुळे कविता सादर करायला नो म्हणुन त्यांनी स्वतःची व पर्यायाने तुमची ही सुटका केली असावी. अजुन एक म्हणजे सहा सात जणांसमोरच सादर करेन अश्या म्हणण्यामागे ही ही भूमिका असु शकते कि त्या सहा सात जणांत एकतरी थोडाफार श्रोता असु शकतो व त्यामुळे एरवी झाली असती ती फजिती टळु शकते.(रटाळ लेक्चर देणार्या प्रोफेसरांच्या क्लासमध्येही केवळ प्रोफेसरांचा मान ठेवावा म्हणुन चार पाच हलणारी टाळकी असतात तश्या कॅटेगरीतला श्रोता.!)
20 Jul 2014 - 12:56 am | चलत मुसाफिर
दाद देण्याच्या जागेवर पेपर उघडायचा प्रकार गजा खोतने केला होता, सखाराम गटणेने नव्हे..! :)
10 Jul 2014 - 2:10 am | खटपट्या
राग मानू नका पण माझा इंग्रजी माध्यमात शिकलेला मामे भाऊ तुमच्या सारखा बोलतो.
10 Jul 2014 - 4:16 am | चित्रगुप्त
"तुमच्या सारखा" म्हणजे कुणासारखा ??
10 Jul 2014 - 5:43 am | खटपट्या
त्याची वाक्य रचना अमृतातै सारखी असते
14 Jul 2014 - 7:21 pm | पियू परी
हे म्हणजे कोणीही ओळख पाळख नसलेली मंडळी मी सीएस (कंपनी सेक्रेटरी) आहे हे कळल्यावर माझी फाईल बनवुन देणार का? (माझा आयटी रिटर्न बनवुन देणार का?) असे विचारतात तसे झाले.
आधीच सीएस ला सीए समजल्याने चीडचीड झालेली असते. वर लगेच कामं सांगायला/ सल्ले विचारायला सुरुवात. एका लग्नात तर दुसर्या पार्टीकडील एका बाईने मला असेच फुकट सल्ले विचारायला सुरुवात केली. मी २-३ वेळा नम्रपणे त्यांना मी सीएस आहे सीए नाही असे सांगायचा प्रयत्न केला पण ऐकेचनात. शेवटी काय वाट्टेल ते वेडेवाकडे सल्ले देऊन पळ काढला. ;)
14 Jul 2014 - 7:41 pm | आदूबाळ
"कंपनी सेक्रेटरी नक्की काय काम करतो" आणि "साध्या (पर्सनल) सेक्रेटरीचा आणि कंपनी सेक्रेटरीचा काहीही संबंध नाही" या दोन गोष्टी समोरच्याच्या गळी उतरवणे ही सीएसच्या सोशल लाईफमधली सर्वात कठीण गोष्ट असावी.
14 Jul 2014 - 8:04 pm | हाडक्या
हा हा हा ..!!
पण खरे सांगायचे तर, (माध्यमांचा दोष असेल कदाचित) कुठलाही सेक्रेटरी म्हणाले की बॉस समोर नोटपॅड घेवून उभी असलेली एखादी ललनाच डोळ्यासमोर येते.. ;)
15 Jul 2014 - 11:57 am | बॅटमॅन
'खट्याळ आम्रविका' आठवली की क्कॉय हो ;)
15 Jul 2014 - 2:07 pm | हाडक्या
हॅ हॅ हॅ .. !! आणि अजून क्काय क्काय .. ;)
15 Jul 2014 - 2:17 pm | बॅटमॅन
हा हा हा ;)
15 Jul 2014 - 2:22 pm | हाडक्या
१० सेकंदात प्रतिसाद..!! लईच फाश्ट बॅट्म्यानराव तुमी.. *biggrin*
15 Jul 2014 - 2:30 pm | प्यारे१
१० मिनिट आहे ते हाडकुकाका.
ह्याच धर्तीचा एक व्यनि आलेला अंधुकसा स्मरतोय. असो!
15 Jul 2014 - 2:37 pm | हाडक्या
नंतर आलं हो लक्षात प्यारे'काका' ;)
पण प्रतिसाद संपादीत करता येत नाहीत ना. म्हणून म्हनलं जौ देत.
(व्यनि चे काय कळाले नाही.)
15 Jul 2014 - 3:05 pm | प्यारे१
@ व्यनि:
एक फिरस्तीचा लेख आल्यावर ६-७ मिन्टात प्रतिसाद टाकला होता मी!
लेखक सज्जन माणूस.
त्यांनी मला विचारलं बाबा रे, सहा सेकंदात प्रतिसाद?
प्रतिसाद दिलास ठीके पण लेख वाचलास काय?
मी म्हटलं सरजी सम मिस्टेक हॅप्पन्ड फ्रॉम योर साईड.
सहा मिनिट आहे ते. आणि लेख वाचला, आवडला, प्रतिसाद दिला. असो!
15 Jul 2014 - 3:31 pm | प्रभाकर पेठकर
आहे लक्षात.
15 Jul 2014 - 3:04 pm | बॅटमॅन
धा मिण्टात दिलो होतो ओ..
आता तर ४२ मिण्टात दिलो.. एकूणच इंप्रूव्हमेंट आहे म्हणायची ;)
15 Jul 2014 - 7:38 am | बेकार तरुण
बर्याच वेळा कंपनी सेक्रेटरि आहे वा करत आहे हे सांगितल्यावर टायपिंगचा स्पीडहि विचारला जायचा !!!!
15 Jul 2014 - 12:22 pm | पियू परी
मला "शॉर्टहँड टायपींग केले असशील ना मग?" असं विचारलं जायचं.:)
15 Jul 2014 - 12:23 pm | पियू परी
अनुमोदन. :)
15 Jul 2014 - 10:35 am | विश्वनाथ मेहेंदळे
कंपनी सेक्रेटरी नेमके काय करतात ??
15 Jul 2014 - 12:26 pm | पियू परी
कंपनी सेक्रेटरी हे कंपनी कायद्याखाली नोंदणीकृत झालेल्या कंपन्यांची कायदेशीर बाजु सांभाळतो. अकाऊंटिंग आणि टॅक्स संबधित मॅटर्स सीए सांभाळतो.
या सगळ्यातुन वेळ मिळाला कि कंपनी सेक्रेटरी "कंपनी सेक्रेटरी नेमके काय करतात ??" या प्रश्नाचे उत्तर देत कळफलक बडवत बसतात. ;)
15 Jul 2014 - 2:09 pm | आदूबाळ
विमे
इथे पहा
http://www.icsi.edu/docs/WebModules/Student/ROLE%20OF%20COMPANY%20SECRET...
15 Jul 2014 - 3:31 pm | सुबोध खरे
@पियू परी
अहो ताई,
अशा लोकांना शांतपणे सांगायचे कि मागच्या तीन वर्षाच्या आय टी रिटर्न्स च्या फाईल्स आणून द्या म्हणजे अभ्यास करून सांगता येईल.चिकट माणसे असतील त्यांना तुम्हाला पगार किती मिळतो. "वरचे" उत्पन्न किती असे विचारा म्हणजे तेच पळ काढतील.
मला लोक रस्त्यावर विचारतात वजन कमी कसे करायचे तेंव्हा मी चिडचिड न करता त्यांना सांगतो कि येत्या १५ दिवसात तुम्ही जे काय खाल ते एका डायरीत नीटपणे लिहून आणा म्हणजे मला तुमच्या आहाराचा प्याटर्न कळेल म्हणजे मग मी तुम्हाला डाएट काय ते सांगू शकेन. माझी मुलगी पण सी एस करीत आहे. तिला मी सांगितले आहे अनभिज्ञ लोकांना शांतपणे सांग कि मी टी वाय बी कॉम करीत आहे.पुढे काय करणार असे विचारल्यावर बी कॉम झाल्यावर बघू असे ती सांगते. त्यांना सगळे रामायण सांगून काय उपयोग? आणि त्यांना कळले तरी काय क्रांती होणार आहे?
15 Jul 2014 - 4:03 pm | पियू परी
गुड आयडिया.. आभार.
15 Jul 2014 - 4:27 pm | विजुभाऊ
गुड. मला मी एस ए पी कन्सल्टिंग करतो ही सांगितल्यावर पुढचे कोणतेही प्रश्न येत नाहीत.
समोरचा एकदम औट होतो. त्यावरही कधीतरी कोणी एखादा प्रश्न विचारतो. तुम्ही प्रोग्रमिंग करता का? त्यावर विचारणाराचा प्रश्न कसा एकदम अती प्राथमीक पातळीवराचा आहे असा चेहेरा करून त्याला जाम पिडता येते.
एकदम मस्त गिर्हाईक मिळते.
15 Jul 2014 - 5:21 pm | एस
मी छायाचित्रण करतो हे सांगितल्यावर पुढचेमागचे बरेच अविचारी प्रश्न येतात. समोरचा एकदम 'अजि म्यां ब्रह्म पाहिले' असा चेहरा करून तुमच्याकडे आशेने पाहू लागतो. आधी फारसे ओळख न देणारेही उगाच भाव द्यायला लागले की समजायचे ह्यांचा प्रश्न काय असणार ते. त्यावरही नेहमीच कोणीही ठरलेला प्रश्न विचारतोच. तुमच्याकडे कोणता कॅमेरा आहे? त्यावर विचारणार्याचा प्रश्न कसा एकदम अतिस्वस्त पॉइन्ट-अॅण्ड-शूटसारखा आहे असा दृष्टिक्षेप टाकूनही त्याला कटवता येत नाही. मग 'कोणता क्यामेरा घेऊ', 'चानचान फोटू कसे काढू' इ. इ. ससेमिरा चालू झाला की समजायचे आपणच गिर्हाईक बनलोय.
(प्रतिसादविषय: विनोद). ;-)
15 Jul 2014 - 5:53 pm | विजुभाऊ
बरे आहे हो.
एखाद्याने " मी खरजेचा किंवा गुप्तरोगांचा डॉक्टर आहे " असे सांगितल्यावर लोक नक्की काय शम्का विचारतील हो?
20 Jul 2014 - 12:40 am | चलत मुसाफिर
घरी नारायणमूर्ती आले तर त्यांना तुम्ही पीसीमध्ये अँटीव्हायरस टाकून द्या असं सांगाल बहुतेक!
किंवा पॉवरपॉईंटचे कीबोर्ड शॉर्टकट्स शिकवा वगैरे!
20 Jul 2014 - 1:58 am | निनाद मुक्काम प...
लंडन मध्ये आम्हा हॉटेल व्यवस्थापनाच्या मुलांच्या कंपू कडे
पुष्कर , भारती ताई, श्रेयस ,क्रांती आले होते , आमची मस्त धमाल मैफील जमली होती.
ह्या सर्वांनी आपल्या क्षेत्रातील किस्से आम्हाला स्वतःहून सांगितले आम्हीसुद्धा पंचतारांकित किस्से सांगून परतफेड केली.
पुढे अजून दोन तीन वेळा आमची भेट झाली , विजू खोटे , किशोर प्रधान ह्यांच्याशी छान गट्टी जमली ,
इतर अनिवासी भारतीयांच्या अवघडून जाणारे हे सेलेब्रिटी आमच्याकडे मस्त खुलले होते कारण रात्रभर चालणाऱ्या मेजवान्या ह्या आम्हा दोन वेगवेगळ्या शेत्रातील लोकांचा जिव्हाळ्याचा विषय
तेव्हा एकदा मी भारती आचरेकर ह्यांना त्यांच्या आईचे गाणे म्हणण्यास सांगितले , त्यांनी घन निळा म्हटले
ते झाल्यावर माझ्या मित्रांनी विचारले , हे कोणाचे गाणे होते.
नशीब हे भारती ताईने ऐकले नाही.
पुढे भारतात आल्यावर ह्या लोकांशी भेटीगाठी होतच राहिल्या.
20 Jul 2014 - 2:04 am | यशोधरा
अरे वा! ह्यावर एक मस्त लेख लिहिता येईल की निनाद. होऊनच जाउंदे!
20 Jul 2014 - 11:49 am | टवाळ कार्टा
आयला क्रांती??? ;)
20 Jul 2014 - 2:08 am | निनाद मुक्काम प...
मागच्या दिवाळी पहाट च्या कार्यक्रमात सलिल कुलकर्णी ला काही चाहत्यांनी इतर कलाकारांची गाणी गाणी चक्क तुमचे हे गाणे मला आवडते एकदा म्हणून दाखवा असे सांगून वात आणला
ह्यावर सलिल ह्यांनी पुणेरी खाक्या दाखवत त्यांना आई शप्पथ हे गाणे माझे नाही आणि ते मी म्हणून शकत नाही कारण त्यांच्या ओळी माझ्या लक्षात नाही राहिल्या.
असे सांगितले ,
मैफल म्हणावी तशी रंगली नाही ,
एकदा कलाकार बरा, वाईट कसाही गात असला तरी
आता आलाच आहे समोर तर गा काहीबाही अशी फर्माईश करणारे श्रोते वात आणतात तसेच अनेक कलावंत हे आपण जागतिक कीर्तीचे असल्याचा आव आणत प्रत्येक माणसाने त्यांच्या कलेचा आस्वाद घेतलाच आहे असा एक दुराग्रह धरतात व अपेक्षाभंगाचे दुक्ख नाहक पदरी पाडून घेतात.