जांभळांचा सॉस

कंजूस's picture
कंजूस in पाककृती
5 Jul 2014 - 8:56 pm

काल जांभळांचा सॉस केला होता .तो ब्रेड टोस्टवर लावून चांगला लागतो .

काही फोटो इथे आहेत .

http://s1278.photobucket.com/user/kanjusk/library/c1

पाहिजेत
जांभळे ,साखर ,टोस्ट .
(जांभळांचा हंगाम संपत आलाय माफ करा .त्याला पर्याय लवकरच बाजारात येईल .आलुबुखार .याचाही सॉस चांगला होतो .)

कृती
(१)जांभळे हातानेच कुस्करून बिया काढा .(त्या योग्यव्यक्तींकडे सोपवा .ट्रेकरलोकांकडे डोंगरात फेकण्यासाठी ) .

(२)गर मिक्सरमध्ये फिरवून घ्या .(झाकण नीट लावले नसल्यास भिंतीवर जांभळा निळा रंग येतो .एक डिझाईनर प्रयोग म्हटता येईल ).

(३)गराच्या पाउणपट साखर घालून शिजवा .थंड झाल्यावर सैलसर राहील इतका घट्ट होऊ द्या .(भांड्यातून बरणीत काढल्यावर उरलेल्यात पाणी आणि जिरेपूड टाकून एक ग्लासभर कालाखट्टा होईल ).

(४)फ्रिजमध्ये आठवडाभर टिकायला हरकत नाही .
(याअगोदरच संपतो ) .

या जांभळाच्या सॉसची चव अंगचीच आंबट तुरट येते त्यामुळे कमी गोड टोस्ट ( इथे ब्रिटानिआ रस्क ) बरोबर छान जमतो .

आलुबुखारचा आंबट गोड होतो .तो खारी बरोबर (बेकरीवाल्याकडे मिळतात ती ) चांगला लागतो .

प्रतिक्रिया

भारी आहे! लग्गेच करुन पाहते.
नेहमीच्या पद्धतीनुसार म्हणते की फोटो नाही टाकले?

दिपक.कुवेत's picture

5 Jul 2014 - 9:12 pm | दिपक.कुवेत

असो. एकदम वेगळिच पाकॄ दिसतेय. फोटो पाहिलेत. छान आलेत आणि जांभळा रंग फारच आकर्षक आलाय.

गणपा's picture

11 Jul 2014 - 1:28 pm | गणपा

अगदी असेच म्हणतो.

ज्यांना फोटो दिसत नाही त्यांच्यासाठी

कंजूस's picture

12 Jul 2014 - 3:22 pm | कंजूस

धन्यवाद गणपा .फोटो इकडे चिकटवलेत छान काम झाले .

मदनबाण's picture

5 Jul 2014 - 9:52 pm | मदनबाण

वेगळाच प्रकार... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- माउली माउली... :- लय भारी.

सस्नेह's picture

5 Jul 2014 - 10:36 pm | सस्नेह

फक्त ते तेवढं जांभळाच्या बिया काढणं सोडून !

रेवती's picture

5 Jul 2014 - 11:07 pm | रेवती

वेगळा प्रकार आवडला.

कंजूसकाका, बेश्ट पाककृती बरं का...

मुक्त विहारि's picture

7 Jul 2014 - 8:42 am | मुक्त विहारि

नक्की करून बघीन

सुहास झेले's picture

7 Jul 2014 - 2:24 pm | सुहास झेले

दिसतोय तरी भारी :)

केदार-मिसळपाव's picture

9 Jul 2014 - 5:39 pm | केदार-मिसळपाव

ह्याला जांभळाचे मार्मालाड म्हणु शकता.
आणी तुम्ही चक्क जांभळाचे जॅम करुन त्याला स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, बिलबेरी, ब्लॅकबेरी, क्रानबेरी ह्यांच्या रांगेत आणुन उभे केलेत.
ह्याला जर वर्षभर टिकऊ शकलात तर मात्र विक्रीसाठी विचार करु शकता.
आभिनंदन.

केदार-मिसळपाव's picture

9 Jul 2014 - 5:39 pm | केदार-मिसळपाव

ह्याला जांभळाचे मार्मालाड म्हणु शकता.
आणी तुम्ही चक्क जांभळाचे जॅम करुन त्याला स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, बिलबेरी, ब्लॅकबेरी, क्रानबेरी ह्यांच्या रांगेत आणुन उभे केलेत.
ह्याला जर वर्षभर टिकऊ शकलात तर मात्र विक्रीसाठी विचार करु शकता.
आभिनंदन.

केदार-मिसळपाव's picture

9 Jul 2014 - 5:39 pm | केदार-मिसळपाव

ह्याला जांभळाचे मार्मालाड म्हणु शकता.
आणी तुम्ही चक्क जांभळाचे जॅम करुन त्याला स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, बिलबेरी, ब्लॅकबेरी, क्रानबेरी ह्यांच्या रांगेत आणुन उभे केलेत.
ह्याला जर वर्षभर टिकऊ शकलात तर मात्र विक्रीसाठी विचार करु शकता.
आभिनंदन.

पैसा's picture

31 Jul 2014 - 11:30 pm | पैसा

मस्तच!

थोडा सॉस फ्रीजमध्ये वेगळा ठेवला होता तो काल वापरला .जसाच्या तसा होता .
सॉसऐवजी जाम असे म्हणायला पाहिजे होते .