सेव्ह मिपा

सस्नेह's picture
सस्नेह in काथ्याकूट
5 Jul 2014 - 2:58 pm
गाभा: 

गेल्या काही काळापासून मिपाच्या डेटाबेस (विदा) ला काही अडचणी येत आहेत. आजपासून त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू करीत आहोत. मिपा विश्रांती अवस्थेत जाणार असल्यास काही वेळे आधी कळवण्यात येईल मात्र तरी सुध्दा सर्व लेखकांनी आपल्या लेखनाची एक प्रत साठवून ठेवावी ही विनंती.

वरील सूचना गेल्या काही दिवसांपासून मिपाच्या दर्शनी पानावर दिसते आहे. याबाबतीत मिपाच्या विदाबाबत काही निरिक्षणांवरुन काही गोष्टी सुचवाव्याशा वाटतात.
१. मिपा सुरु झाल्यापासून सर्व धागे विदा वर आहेत. यापैकी काही एकोळी तर काही निरर्थक, शून्य अथवा दोन-तीन प्रतिसाद असलेले आहेत. हे धागे विदावरून डिलीट केले तर पुष्कळ जागा उपलब्ध होईल. हे धागे ठेवणे आवश्यक आहे का ?
२. खरडवह्यांमध्ये बराचसा मजकूर असा आहे की काम झाल्यानंतर तो डिलीट केला तरी चालेल. याबाबत प्रत्येक सदस्याने आपली वही ‘स्वच्छ’ केली तर विदावर बरीच साफसफाई होईल.
३. हेच व्यनीबाबतही करता येईल.
४. सर्व सदस्यांनी स्वत:चे काही जुने लेखन स्वत:च डिलीट करण्याची शिफारस केली तर विदासाठी बरेच ओझे हलके होईल.
आपल्याकडे अशासारख्या आणखी काही सूचना असल्यास अवश्य सुचवाव्यात.

प्रतिक्रिया

कॉल्लिंग नीलकांत काका!

कवितानागेश's picture

5 Jul 2014 - 8:24 pm | कवितानागेश

नीलकांत काका??!!
सूनबाईचा गुण लागला. ;)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

5 Jul 2014 - 3:14 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मिपाचा विदा इतका मोठा नक्कीच नसावा की त्यामुळे अशी अडचण यावी.

आयुर्हित's picture

5 Jul 2014 - 4:17 pm | आयुर्हित

सहमत

तुमचा अभिषेक's picture

5 Jul 2014 - 5:38 pm | तुमचा अभिषेक

नक्की हाच प्रॉब्लेम आहे का?
आणि असल्यास क्षमता वाढवणे हा पहिला उपाय ठरावा, न की अतिरीक्त भार कमी करणे ..
तसेच Archive करणे हा देखील मार्ग असू शकेल ना..
मला फारसे यातले कळत नसल्याने या सार्‍या शंकाच समजा ..

खरडफळा साफ केल्यास,अनावश्यक धागे काढुन टाकल्यास,सर्व्हरव
रील ताण कमी होईल.

सुधीर's picture

5 Jul 2014 - 5:58 pm | सुधीर

विदाची अडचण त्याच्या आकारमानाशी संबधीत आहे की इतर दुसर्‍या कारणांशी याचा तांत्रिक खुलासा निलाकांतच करू शकतात. जर आकारमानाशी संबधीत असेल तर १, २, ३ शी सहमत.

लंबूटांग's picture

5 Jul 2014 - 5:59 pm | लंबूटांग

या सर्व उपायांनी हार्ड-डिस्क वरील जागा रिकामी होईल. सर्व्हरवरचा ताण कमी होणार नाही.

विदागाराला अडचणी येत आहेत ह्या केवळ जुन्या धाग्यांनी येत आहेत हा निष्कर्ष सर्वांनी कसा काढला हे मला समजत नाही.

मिपापेक्षा कितीतरी पटीने डेटा असलेल्या वेबसाईट्स अस्तित्वात आहेत आणि ड्रुपल वरच बेस्ड आहेत.

भाते's picture

5 Jul 2014 - 8:44 pm | भाते

स्नेहांकिता ताई, आपण सुचवलेले सगळे मुद्दे पटले.

काही शंका
नीलकांत/प्रशांत माझ्या शंका सोडवू शकतील. ह. घ्या. :)

सध्या मिपावर २८ हजारांपेक्षा जास्त धागे आहेत. समजा, त्यापैकी ३ हजार धागे सर्वानुमतीने / धागाकर्त्यांकडून उडवले गेले तर २५ हजार धागे उरतील.
पण त्यामुळे धाग्यांच्या क्रमवारीत काही रिकाम्या जागा राहतील. उडवलेले धागे वगळुन उर्वरीत धागे त्याच क्रमवारीत लावायचे तर सगळ्या धाग्यांचे क्रमांक बदलतील. मग एखाद्या विशिष्ट मिपाकरांचे सगळे धागे नविन क्रमवारीप्रमाणे लावणे किचकट जाणार नाही का?
उडवले गेलेल्या धाग्यांचे क्रमांक तसेच रिकामे ठेऊन नविन धाग्यांना ते क्रमांक देणे अवघड जाणार नाही का?

माहितगार's picture

6 Jul 2014 - 11:45 am | माहितगार

(चांगल्या) लेखांचा क्रमांक (वेबपत्ता) बदलणे, मराठी विकिपीडिया आणि इतरत्र दिल्या जाणार्‍या संदर्भ दुव्यांची दिशाभूल करणारे ठरते. असे करणे चांगले लेखन करणार्‍यांना, संदर्भ देऊन लेखन करणार्‍यांना अन्यायकारक आहेच पण अभिप्रेत वाचनीय लिंक चुकीच्या ठिकाणी उघडणे अथवा डेड निघणे संकेतस्थळाची विश्वासार्हता आणि वाचकवर्ग कमी करणारे ठरू शकते हे लक्षात घेतले जाईल अशी अपेक्षा आहे.

रिकाम्या उडवावयाच्या धाग्यांचे अल्फाबेटीकल अथवा इतर प्रकारे क्रमांकन करून वाचनीय धाग्यांचे क्रमांक तसेच राहू देण्यावर मिपा प्रशासन भर देईल अशी विनंती आणि आशा आहे.

लंबूटांग's picture

6 Jul 2014 - 4:42 pm | लंबूटांग

या ३ हजार धाग्यांच्या जागा रिकाम्या राहिल्या तर काहीही फरक पडत नाही. नवीन धाग्यांचे क्रमांक आजच्या २५००० पासून तसेच पुढे चालू राहतील. सर्व विदागारांमधे प्रायमरी की ही ऑटो इंक्रिमेंट करण्याची क्षमता असते. जी तुम्ही अगदी २५००० क्रमांकाचा धागा उडवला तरी पुढील धाग्याला २५००१ हा क्रमांक देण्यास सक्षम असते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Jul 2014 - 6:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व विदागारांमधे प्रायमरी की ही ऑटो इंक्रिमेंट करण्याची क्षमता असते. जी तुम्ही अगदी २५००० क्रमांकाचा धागा उडवला तरी पुढील धाग्याला २५००१ हा क्रमांक देण्यास सक्षम असते.

+१००

---

धाग्यांचे क्रमांक हा महत्वाचा मुद्दा नसावा. त्यांत बदल करायची गरज नाही. किंबहुना तसे करणे गोंधळ निर्माण करणारे आणि काम वाढवणारे ठरू शकते.

ऑटो इंक्रिमेंट प्रक्रिया साधी आणि सहज उपलब्ध असते. तरीसुद्धा:

१. "सर्व धागे तपासून त्यातले अनावश्यक धागे गाळण्यासाठी वेगळे करणे आणि हे करताना एकाही चांगल्या धाग्यावर (नजरचुकीने गाळण्याचा) अन्याय होणार नाही याची खबरदारी घेणे" हे केवळ किचकटच नव्हे तर खूप वेळखाऊ काम आहे. कारण हे काम मानवी हस्तक्षेपाशिवाय होऊ शकणार नाही.

२. या प्रकल्पात खरडवह्या पकडल्या तर तो वरील कारणाने अधिकच किचकट आणि वेळखाऊ बनेल !

---

गाळलेल्या धाग्यांमुळे "एरर मेसेज" न येता "तो तांत्रीक कारणामुळे गाळलेला आहे" अशी सुचना समोर येण्यासाठी छोटासा कोड लिहून संस्थळाच्या "ब्रँड व्हल्यु" ला होणारा धोका टाळता येईल.

---

(यातून पोस्ट करणार्‍याचे, आभाराचे प्रतिसाद वगळावे) आणि त्यापेक्षा कमी प्रतिसादांच्या सर्व पोस्टस डिलीट कराव्या, (कारण त्यांचा संकेतस्थळाला काहीही उपयोग नाही); असं सुचवतो.

नीलकांतच्या सदस्यांकडून अपेक्षा आणि प्रशांतनं सांगितलेल्या तांत्रिक अडचणी, सर्वांना मार्गदर्शक ठरतील.

चौकटराजा's picture

6 Jul 2014 - 8:36 am | चौकटराजा

मला अशीच काही काही कोडी पडली होती. प्रत्यक्ष भेटीत प्रशांत यांच्याशी यावर बोलणे होत असे. मिपावरील अनेक खरडी, धागे फारसे महत्वाचे ऐवज नाहीतच. खरे तर खूपसे मिपाकर फारशा ज्ञानाची अपेक्षा धरून धागा वा प्रतिसाद देत नाहीतच. तरीही नीलकांत यांचे ऋण काही फिटणारे नाही. कारण त्यानी व्यक्त व्हायला दिलेली संधी. मला वाटते जुने उल्लेख मालक
लोकाना महत्वाचे वाटत असावेत. तसेच त्याना इथे फक्त चित्रे लटकविण्यात अडचण असावी. म्हणून फक्त लिंक द्वारे इथे
चित्र पहाता येते. अर्थात याबाबत मालकच जास्त खुलासा करू शकतील म्हणा !

सुहास झेले's picture

6 Jul 2014 - 11:33 am | सुहास झेले

वाचतोय :)

कधीतरी घरात साठलेली अडगळ, अनावश्यक पसारा आपण कमी करतोच की. तसेच हे दालनसुद्धा स्वच्छ, नीटनेटके, आटोपशीर राहावे असे वाटते.
बाकी, 'आवरोमॅनिआ' चे इन्फेक्शन मला आहे थोडे, हे इथे कबूल करते ! *wink*

चौकटराजा's picture

7 Jul 2014 - 8:39 am | चौकटराजा

आवरोमॅनियाचे इन्फेक्शन तुम्हालाच काय मलाही आहे .एवढेच काय ईश्वरलाही आहे. डेथे सर्टीफिकेटचे कार्यालय.मोघे गुरूजींचा
वाधता बॅ़क बॅलन्स हे त्याचे पुरावे आहेत.

भिकापाटील's picture

6 Jul 2014 - 2:19 pm | भिकापाटील

मला वाटते धाग्याचे नाव बदलावे. सेव्ह मिपा ऐवजी शेव्ह मिपा असे करावे कारण सर्वे भादरण्याचेच सल्ले देत आहेत...

संजय क्षीरसागर's picture

6 Jul 2014 - 3:12 pm | संजय क्षीरसागर

प्रशांत आणि नीलकांतकडून प्रतिसादाची अपेक्षा.

नीलकांत's picture

9 Jul 2014 - 2:00 pm | नीलकांत

मिपावरून कुठलेही लेख किंवा व्यनि हटवायची गरज नाही. सध्या आहे त्यापेक्षा दहा पट अधीक लेख आणि माहिती साठवण्याची क्षमता सध्याच्या मिपाच्या सर्व्हरमध्ये आहे.

अडचण येतेय ती अन्य तांत्रीक बाबींची आहे. त्याची चर्चा येथे करता येणार नाही. त्यामुळे वर दिलेली सुचना केवळ कुणी सदस्य लेख लिहीतोय आणि अचानक मिपा माझ्या खटपटींमुळे विश्रांतीअवस्थेत गेले तर त्यांचा हिरमोड होऊ नये याची पुर्वदक्षता म्हणून दिलेली आहे. त्या सुचनेला त्यापेक्षा जास्त महत्व देऊ नये एवढी विनंती.

बाकी सर्वांना मिपाची काळजी आहे याची दखल घेतली आहे.

(आनंदीत नीलकांत)

संजय क्षीरसागर's picture

9 Jul 2014 - 2:17 pm | संजय क्षीरसागर

आणि या निस्पृह कार्याबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो, धन्यवाद!

+११११११...असेच म्हणतो.

सस्नेह's picture

9 Jul 2014 - 3:31 pm | सस्नेह

आता आवरोमॅनिया आवरायला हरकत नाही ! *smile*

:)

स्नेहांकिता नीलकांतने काळजी नसण्याचे कारण दिलेच आहे. पण जाताजाता तुझ्या दुस-या मुद्याबद्दल सांगायचे तर खरडी सध्या फक्त संपादकांनाच डिलीट करता येतात.
बाकी नीलकांत आणि सगळ्याच संपादकांचे आभार जितके मानावे तितके कमीच हे ही नमुद करावेसे वाटते.