विमान ,रेल्वे ,बस ,टैक्सी
यासंबंधी बरे वाईट अनुभव आठवणी आणि बातम्यांसाठी वेगवेगळा अथवा एकत्रित धागा आहे का ?तो असावा असं मला वाटतं .
रेल्वे :-
या आठवड्यात रेल्वेने त्यांचे जे अधिकृत तिकीट एजंट (RTSA)होते त्यांचे लायसन्स अचानक रद्द केले .देशभरांत जवळपास असे पंधराशे जण होते .त्यांची नावे आणि पत्ते टाईमटेबलमध्ये छापलेले असतात . एकतर यांचा धंदा बुडालाच शिवाय जे लोक रेजर्वेशन सेंटर्सपासून दूर राहतात ,ज्याना येथे वेळेत येता येत नाही ,अथवा असमर्थ आहेत त्यांची पण एक सोय गेली . त्यांना कोणाची तरी मदत घेऊन इ तिकिट काढावे लागणार .
दुसरी एक गोष्ट करण्याच्या विचारात रेल्वे आहे ती म्हणजे इ रेजर्वेशनला जी काही ओळखपत्रे आणि त्याचा क्रमांक द्यावा लागतो त्यातून पैन कार्ड घेणार नाही .याबद्दल इँकमटैक्सवाल्यांकडून तशी सावधगिरीची सूचना आज रेल्वेला आली आहे .हा नंबर काही मोठी खरेदी करतांना द्यावा लागतो .रेल्वेच्या रे०स्लिपांतून नंबर मिळवून गैरवापर होईल .तसं झालं तर आधारकार्डाचे महत्त्व वाढेल कारण प्रत्येकाकडे पासपोर्ट /ड्रायविंग लायसन्स /वोटिंग कार्ड नसणार .
काही वेबसाइटस
मुंबई बेस्ट बसचे मार्ग आणि स्टॉप्स येथे मिळतील
http://www.go4mumbai.com/List_of_Bus_Stops.php
पुणे बस PMT चे मार्ग आणि स्टॉप्स येथे मिळतील
http://ptransit.googlecode.com/svn/trunk/rgen/html/en-index.html
सेंट्रल रेल्वे गाड्यांसाठी काही सूचना येथे करते
http://www.cr.indianrailways.gov.in/view_section.jsp?lang=0&id=0,4,268
प्रतिक्रिया
4 Jun 2014 - 6:42 pm | सौंदाळा
MSRTC चे संकेतस्थळ IRCTC इतके चांगले नाही.
एकाच थांब्याची ३-४ नावे आहेत. रिझल्ट एखाद्-दुसर्या नावालाच बरोबर येतात.
ज्येष्ठ नागरीकांचे तिकीट ऑनलाईन काढता येते पण एस्.टि स्टँड्वर मात्र त्यांचे आरक्षण करता येत नाही (असे ऐकले आहे)
5 Jun 2014 - 6:04 pm | एसमाळी
ST स्टँडवर जेष्ठांसाठी आरक्षण करता येत.फक्त फरक आहे.तुम्हाला 5/10 रु चे आरक्षण तिकीट मिळते.बाकीचे रक्कम, वाहकाला ओळखपत्र दाखवुन बस मध्ये बसल्यावर भरावी लागते( जी लागु असेल ती)
5 Jun 2014 - 7:21 am | चौकटराजा
असा धागा असावा. त्यात आपले असे अनुभव असावे की ज्याने थोडेफार रंजन व जास्त प्रबोधन होईल. अनुभवकथनांमधून अनेक खाचखळग्यानी भरलेला भावी प्रवास सुखाचा होईल.
एक उदा. म्हणून सांगतो. पुण्याचे श्री वामनराव कर्वे हे आयुष्यात प्रथमच विनानप्रवासास जात होते. मुंबई ते रोममार्गे लंडन असा प्रवास होता. रोमपर्यंत सर्व ठीक होते. पण रोम लंडन मार्गावर एक तासाने विमानात बिघाड झाल्याचे आढळले. वामरावांना वाटले, आता हे इथेच सारे संपते की काय? विमान्र रोमला कसेबसे परत आणण्यात आले. १८ तासांचा उशीर लंडनला पोचण्यास झाला. सबब अपरात्री पोहोचल्याने रात्री हिथ्रो वर बाकावर झोपावे लागले. अशी " रम्य" सुरूवात त्यांची झाली होती. धडा- विमानकंपनी म्हण्जे लय मस्त असे काही नसते.
5 Jun 2014 - 12:59 pm | कंजूस
रेल्वेचे पक्के रेजर्वेशन हातात असले तरी गाडी सुटण्याअगोदर (ज्या स्टेशनला गाडीत किती वाजता चढणार आहोत त्यावेळेच्या )चार तास अगोदर आपल्या तिकीटाचा PNR क्रमांक रेल्वेच्या वेबसाइटवर पाहावा .त्याचा फायदा असा होतो की आपला डबा एंजिनपासून कितवा आहे ते कळते .शिवाय नशिबवान असाल तर साध्या स्लिपरमधून वरच्या एसी ३ मध्ये 'अपग्रेड' झाल्यास तिकडे अगोदरच सामान घेऊन चढता येते .पूर्वीच्या जागेवर दुसरे बसलेले असतात व आपल्याला आतून तो डबा गाठावा लागतो .कोणत्याही मोबाइलवरून 139 ला PNR दहा आकडी नंबर मेसेज केला तरी लगेच माहिती पाठवतात .
5 Jun 2014 - 5:12 pm | असंका
महाराष्ट्रात ST ने प्रवास करणार असताल, तर २०० रुपयात एक सवलत कार्ड मिळते.
शिवनेरी / AC गाड्या सोडून MSRTC च्या कुठल्याही गाडीमध्ये ते वापरून प्रवासभाड्यामध्ये १०% सवलत मिळवता येते. एक वर्षासाठी सवलत पात्र. वर्ष संपलं की नवीन घ्यायचं.
कागदपत्रं काहीही लागत नाहित. एस टी स्टँडवरच अर्ज मिळतो, जो जागच्या जागी भरता येतो. फक्त २ फोटो लागतात.
कार्ड मिळायला पूर्वी वेळ लागायचा, आता लगेच मिळते.
मला वाटतं यात १.०० लाख रुपये अपघात संरक्षण पण आपोआप मिळतं.