झुंज मराठमोळी - मराठीची खांडोळी

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in काथ्याकूट
28 May 2014 - 2:09 pm
गाभा: 

कालपासून ईटीव्ही वर एक नवीन 'रियालिटी शो' सुरू झालाय. झुंज मराठमोळी नाव आहे त्याचं. श्रेयस तळपदे त्याचं सूत्र संचालन करणार आहे आणि अनेक मराठी 'सेलिब्रिटी'नी त्यात भाग घेतलाय. त्याचे पहिले दोन भाग काल आणि परवा प्रदर्शित झाले.

तशीही आजच्या घडीला मराठीची वाट लागलेलीच आहे. ती अजून कशी लागावी याची काळजी आपण मराठी मंडळी घेतच आहोत. वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, मनोरंजनाच्या वाहिन्या आहेतच, शिवाय असंख्य मराठी (म्हणवणारी) मंडळी हे काम चोखपणे पार पाडत असतात. असो. तर हा झुंज नावाचा कार्यक्रम बघत होतो. अक्षय कुमार किंवा आता रोहित शेट्टी जसा दिसतो, वावरतो अगदी तसाच, श्रेयस तळपदे वागायचा प्रयत्न करतो. ते तितकंसं जमत नाही हा भाग निराळा. हा नक्की मराठी रोडीज चा कार्यक्रम म्हणावा की मराठी फियर फॅक्टर म्हणावा ते कळलं नाही पण रोडीच म्हणायला हवा. त्याच्याच तो जास्त जवळ जातो.

तर त्या कार्यक्रमातील मराठी आणि इतरही संदर्भातली काही निरीक्षणं

१. सुरुवातीपासून `महाराष्ट्रीयन' शब्दाचा वारंवार होणारा प्रयोग. `महाराष्ट्रीयन' हे मुळात शब्दाचं इंग्रजी रूप आहे. म्हणायचं तर मराठी म्हणा की. `महाराष्ट्रीयन' कशाला?

२. पहिल्या दोन भागातील खेळ अगदीच सोपे आणि बाळबोध होते. आणि त्यात त्यांनी आणलेलं हास्यास्पद नाट्य अगदीच वाईट झालं. म्हणजे वराहाच्या मूर्तीखालून हातातले चणे न सांडवता जाण्याचा खेळ. ती वराहाची मूर्ती बघून लगेच ओह माय गॉड वगरे म्हणून डोळे मोठे करण्याचं काहीच कारण नव्हतं. (वराह वराह म्हणणा-या त्या स्पर्धकांना वराह म्हणजे काय हे ठाऊक होतं का हाच मला प्रश्न पडलाय)

३. स्पर्धकांचं आंग्लाळलेलं मराठी कानात टोचत होतं. `मला इमिजिएटली असं फीलींग आलं' 'मी म्हटलं त्याला, आय डोन्ट थिन्क आय्ल बी एबल टू पुल इट ऑफ' अरे काय !? मराठी म्हणवता ना?

४. बर, श्रेयसही तसंच बोलतो. ६०% इंग्रजी. ४०% मराठी, तेही अशुद्ध.

५. `तू असं का म्हणालास?' `तू कधी आलास?' अशा वाक्यातला शेवटचा तो `स' खाऊनच टाकतात आजकाल मंडळी. म्हणालास च्या ऐवजी बोललास, वगैरे च्या ऐवजी वैगरे.... हे वेगळे मुद्दे आहेत.

६. गमतीचा भाग आणखी असाही, की मधे मधे एखादा स्पर्धक इतर स्पर्धकांवर ताशेरे ओढत असतो. त्याला त्याचेही पैसे मिळतात का माहीत नाही. पण ते शेरे इतके मूर्खपणाचे व हास्यास्पद वाटतात ऐकायला, की कार्यक्रमाच्या मनोरंजकतेत कमालीची भर पडते. पराग कान्हेरे विशेष.

एकूणच हा कार्यक्रम बघताना क्षणोक्षण मराठी ची कत्तल होताना दिसते. वाईट वाटतं. हाच कार्यक्रम असं नाही, सगळेच मराठी कार्यक्रम, सगळ्या वाहिन्या, कुणीच शुद्ध मराठीबद्दल आस्था बाळगून नाही. अर्थात यात करु काहीच शकत नाही कुणी फारसं; हां, चार सूज्ञांना सांगून पटवून देऊ शकतो. बाकी सारा मनोरंजनाचा भाग आहे.

प्रतिक्रिया

तुमचा अभिषेक's picture

28 May 2014 - 2:54 pm | तुमचा अभिषेक

झाला का हा चालू, मला ते रोडीज आणि फिअर फॅक्टर नामक प्रकार कधीच आवडले नव्हते, आणि हा प्रोमोज बघून तसाच हे समजल्याने फारशी उत्सुकता नव्हती. तरी मराठी म्हणून बघायची इच्छा आहे, एखादा एपिसोड तरी, मग पुढे काय ते बघूनच ठरवेन.
बाकी श्रेयस तळपदे आवडीचा, इक्बाल सारख्या चित्रपटातून अभिनयातील ताकदही दाखवली आहे तरी जाहीरातीत या अक्षयकुमार टाईप डॅशिंग लूक मध्ये मला नाही आवडला फारसा. फारसे नैसर्गिक नाही वाटले. प्रत्यक्ष कार्यक्रमातही ओढून ताणून लाऊड अभिनय होणार असेल तर नाही बघवणार.
कार्यक्रम मराठी असल्याने अर्थातच असे काही होऊ नये आणि चालावा या शुभेच्छा आहेतच :)

तुम्ही ई टी व्ही मराठी बघता? फारच अपेक्षा ठेवल्यात म्हणायच्या तुम्ही. :)

तुम्ही ई टी व्ही मराठी बघता?

माझ्यापुरता म्हणायचं झालं तर फक्त आणि फक्त "सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस" करीता.

बाकी मराठी सिरीयल्सची मक्तेदारी आई व बायकोकडे. :)

मुक्त विहारि's picture

28 May 2014 - 3:03 pm | मुक्त विहारि

तुम्ही अद्याप टी.व्ही. बघता?

जावु दे,

आम्ही खूप प्रयत्न करून पण आम्हाला हे व्यसन लागलेच नाही.श्वेतांबरीचे २ भाग बघूनच, ह्या पुढे मालिका नावाचा प्रकार न बघायचे ठरवले आहे.

बन्डु's picture

28 May 2014 - 3:44 pm | बन्डु

असं कसं...! असं कसं...!!
असं कसं...! असं कसं...!!
असं म्हणणारी बाई जाम म्हणजे जाम डोक्यात जाते... ! २ थोबाडीत ठेवण्याची इच्छा होते तिच्या... *diablo*

संजय क्षीरसागर's picture

28 May 2014 - 3:56 pm | संजय क्षीरसागर

टिवी फुटेल ना!

>>असं म्हणणारी बाई जाम म्हणजे जाम डोक्यात जाते... ! २ थोबाडीत ठेवण्याची इच्छा होते तिच्या...

सेम हिअर!! ते असं कसं अति व्हायला लागल्यापासून ती मालिका बघणं बंद केलं मी.

हिंदी मधल्या मालिकेचि नक्कल अजुन किति दिवस करणार
स्वताचे काहितरी येवुद्या

llपुण्याचे पेशवेll's picture

28 May 2014 - 4:49 pm | llपुण्याचे पेशवेll

अहो अगदीच मागास विचारांचे दिसता तुम्ही. भाषा काय ती प्रवाही का काय म्हणतात तशी असते. बाकी मराठी मनोरंजन म्हणजे हिंदीची मारलेली कॉपी असा सरळ अर्थ अजून आपणास उमगला नाही? कीव करावीशी वाटते तुमच्या बुद्धीची.
(सदर प्रतिसाद उपरोधिक आहे. कृपया समजून घेणे)

यसवायजी's picture

28 May 2014 - 5:41 pm | यसवायजी

मराठी मनोरंजन म्हणजे हिंदीची मारलेली कॉपी
का भारतीय मनोरंजन म्हणजे पाश्चात्यांची मारलेली कॉपी ??

मृगनयनी's picture

28 May 2014 - 8:41 pm | मृगनयनी

बॉलिवुड'मध्ये गेल्यापासून श्रेयस'च्या डोक्यात (बायडीफॉल्ट) हवा गेलेली आहे. पण तो जो काही स्टारडम'चा आव आणतो.. तो काही त्याला शोभत नाही, हे खरे! .
काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर "दामिनी" मध्ये 'तेजस'च्या रोलमध्ये क्यूट दिसला होता. पण कालच्या एपिसोड'मध्ये श्रेयस अ‍ॅटीट्यूडवाईज खूप माजोरडा वाटला. 'रघू-राजीव' सारखं बनण्याची केविलवाणी धडपड दिसून येत होती.
बाकी जमवलेली स्टारकास्ट बर्‍यापैकी डाऊनमार्केट आहे. अर्थात मराठी'मध्ये "सध्या" हायमार्केट असणारी मंडळी खूप कमी आहेत.
_________________

एखादी बहिण आपल्या भावाला "राया" या टोपणनावाने कशी काय हाक मारत असेल.. या विचारानेच गरगरल्यासारखं होतं.. =)) =)) =)) -- रायादादा की रायाभाऊ ? ;) जाऊ कशी कशी मी नान्दायला ...रायादादा ..नेहमीच (भौ)-राया तुमची घाई!!!!? हाहा...हाहा. व्हेरी फनी..... :) .... 'राया'चा मख्ख चेहरा, मोठे रागीट डोळे, वाकडं तोन्ड करून बोलायची तर्‍हा. आणि अ‍ॅक्टिंगच्या नावाने बोम्ब!!!! ....बिन्डोक्क्कपणा सगळा....
बाकी सविता-ताई खरोखर डोक्यात जातात... त्यांचं ते 'असंकसं' चं टुमणं प्रचन्ड नाटकी वाटतं... 'पवित्र-रिश्ता' बन्द झालंय का? :)

बॅटमॅन's picture

30 May 2014 - 4:07 pm | बॅटमॅन

राया *ROFL*

भाते's picture

28 May 2014 - 5:36 pm | भाते

मराठी वाहिन्यांवरच्या मालिका याच कारणासाठी मी पहायचे टाळतो. अर्ध्या तासात २० मिनिटे मालिका आणि १० मिनिटे जाहिराती.
ठिक आहे, जाहिराती हाच त्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत आहे. पण किमान त्यातरी नीट दाखवा ना!
मुळ हिंदी जाहिराती भाषांतरीत करून मराठीत दाखवतात हे मान्य. पण किमान ते भाषांतर तरी नीट करा! जाहिरातीत गरजेपेक्षा जास्त इंग्रजी/हिंदी शब्द वापरलेले असतात. इंग्रजी/हिंदी शब्दांना मराठी प्रतिशब्द माहित नसतील किमान चुकीच्या जाहिराती तरी दाखवु नका ना. भाषांतर करताना मुळ जाहिरातीप्रमाणे यमक न जुळवताच कश्याही तयार केलेल्या जाहिराती डोक्यात जातात.

सगळा अचरटपणा दिसतोय. मराठी भाषेची कत्तल तर रोज असतेच (मी आली, गेली, जेवली) पण त्यात सुधारणा समजल्यास ती न करता तसेच रेटून नेणे ही आजकाल 'इन थींग' ;) आहे. प्रांताप्रमाणे भाषा बदलू द्या ना राव! पण जेंव्हा दूरदर्शन, वृत्तपत्र अशा माध्यमातून लोकांपुढे यायचे असते त्यावेळी जास्तीत जास्त चांगली भाषा असणे गरजेचे आहे. आता श्रेयस बोलतो तीच चांगली भाषा आहे असे म्हटल्यास मग काही बोलायला नको (मी हा कार्यक्रम बघितलेला नाही). यावेळी च्यानलवाल्यांचा व्यावसायिक दृष्टीकोन कुठे जातो? की त्यातील प्रयत्न बेताचे असल्याने प्रतिसाद बेताचा असल्यासही पैसे वसूल होत असले तर फिकर नॉट, न्या धकवून!

प्रभाकर पेठकर's picture

29 May 2014 - 10:40 am | प्रभाकर पेठकर

भावना पोहोचल्याशी कारण, अर्थ समजला म्हणजे झालं, शुद्ध भाषा, प्रमाणभाषा, बोली भाषा अशा अनेक कोलांट्या उड्या मारत मूळ मुद्दा डावलला जातो. शेवटी आपला स्वच्छ मराठीचा अट्टाहास एक 'अरण्यरुदन' ठरतं आणि आपल्यालाच नैराश्य येते. जे जे होईल ते ते पाहात राहावे (अन्यथा डोळे बंद करून घ्यावेत.)

llपुण्याचे पेशवेll's picture

29 May 2014 - 11:24 am | llपुण्याचे पेशवेll

सहमत. आणि बोलतो आहेस ते नीट बोल सांगितले तर पुन्हा जातवादी भाषाशैलीचा ठपका येतो तो वेगळाच.

लोक आजुनबी टिवी बगत्यात ????????

मुक्त विहारि's picture

28 May 2014 - 9:06 pm | मुक्त विहारि

कुणीतरी उगाच्च टी.व्ही.ला इडियट बॉक्स म्हणाले आहे.

भाऊ, आपल्यासारखी वेडी माणसेच टी.व्ही. न बघीतल्या मुळे , ह्या जगांत बावळट ठरतो.

ह्या मालिकांपेक्षा फॅशन टीवी चॅनेल बघितललेला परवडला अशी वेळ आली आहे..

ओ पिंगूदादा, फॅशन टीव्ही इतका वाईट कधीच नव्हता हां काय! सांगून ठेवतो हांऽऽऽ!!!

(केबलवाल्याने त्रेतायुगात कधी फ्याशन टीव्ही लावल्यापासूनच त्याचा फॅन) बॅटमॅन.

vikramaditya's picture

28 May 2014 - 9:45 pm | vikramaditya

वरील मालीका हा संपूर्ण प्रसारणाचा एक (निर्बुद्ध) भाग आहे. पण त्यासाठी टी.व्ही. ला जबाबदार ठरवता येणार नाही. नेशनल जिओग्राफीक सारखे कार्यक्रम देखील असतात. आपण काय बघावे हे आपण ठरवु शकतो.
सदर कार्यक्रम ही मराठी कलाकारांची "कूल" बनण्याची केविलवाणी धडपड आहे.
असो.

माझ्या नजरेत अजुन काहि हिंदी सिरियल आहेत ज्याचि मराठि वाहिनिवाल्यनि नक्कल करावि जे फक्त यंग जनरेशन करता आहेत, मजा येइल मराठित ये पहाताना
१.डेअर टू डेट
२.दिल दोस्ति डान्स
३.स्पिट्सव्हिला

म्हैस's picture

29 May 2014 - 12:37 pm | म्हैस

तद्दन फालतू आणि बंडल कार्यक्रम आहे हा

कलाकाराला काय फक्त सांगितलेली चार वाक्य फेकायची असतात आणि आठ पैसे खिशात घालण्याशी मतलब .एका कार्यक्रमानंतर आणखी विचारणा झाली तर तो समजून जातो आणखी पैसे मागायचे आणि नाटकं वाढवायची .तुमचं मराठी की काय गेलं तेल लावत .तुम्ही टिव्ही बघता का नाही याचा विचार तो निर्माता आणि चानलवाले बघतील .पूर्वीचे भट आणि शांताराम किती जणांना पुरे पडणार होते ?आताची सिरिअलची आइपिएल सर्कस आहे म्हणून तिनशे कलाकारांना वडाळयाच्या भक्तीपार्कसारख्या सोसायटीत कार पार्क करता येतेय .चला यांचेतरी ४०टक्के मराठी बोलून भले होतंय ना होऊ दे .आमचे चार रॉक क्लायमिंगवाले जीव धोक्यात घालून सह्याद्रीचे कडे चढतात नंतर इकडे फोटो पोसटात .पंधरा प्रतिसादात बोळवण होते त्यापेक्षा रोडीजमध्ये चार दोऱ्या खेचून पंगाछाप कॉमेंट करून व्यवहाराची दोरी बळकट होतेय .

तिमा's picture

30 May 2014 - 9:41 am | तिमा

हे एमटीएनएल वाले फोन लागला नाही तर आपल्याला मंजुळ आवाजात ऐकवतात," आम्ही क्षमस्व आहोत!"

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 May 2014 - 1:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपावरील चर्चेवरुन तुनळीवर कार्यक्रम पाहिला. बाकी मराठी नाही तर, इंग्रजी एकच भाषा वापरायला हवी होती. ;) बाकी, बैलगाडी ओढण्याचा महिलांचा टास्क आवडला.

चर्चा केल्याबद्दल आभार. वाहिन्यांवर कुठं काय चाललंय ते कळतं तरी.

-दिलीप बिरुटे

प्यारे१'s picture

31 May 2014 - 3:16 am | प्यारे१

'प्रश्ण' काय आहे नेमका?

हेच तर ऑथेंटिक मराठी आहे ना बट! मला असं कन्फ्युज का करताय ? प्लिज एव्हरीबडी एक्स्प्लेन प्रॉपरली यारों!