माझ्याकडे एक CDMA रिलाअन्सचे सिम कार्ड सात आठ वर्षे आहे .त्यावेळी घेतलेला एक एलजीचा मोबाईल हैंडसेट आता जुनाट झाला आणि बदलायच्या विचारात होतो .परंतु आता MTS आणि रिलाअन्स शिवाय CDMA चा प्रसार नसल्यामुळे आणि टाटा डोकोमो नेही यातून हात झटकल्यामुळे हैंडसेटचे चांगले नमुनेच बंद झाले .मग मी विचार केला की याचा जिएसेम नंबर करून घेऊ म्हणजे बरीच मॉडेल्स वापरता येतील .
आता महागडा स्माटफोन नको होता आणि चांगला कैमरावाला तसेच नेट साठीचा नोकिआ X2-00 आहेच .एफ एम रेडिओ रेकॉर्डिँगवाला असेल तर उपयोग होईल या विचाराने त्याचा शोध सुरू केला .
सैमसंगचे E2232 आणि नोकिआचे X2 -02 कोणाकडे पाहिले होते त्यात ही FM रेकॉर्डिँगची सोय आहे . परंतु दोन चार दुकानात गेल्यावर कळले की ही मॉडेल्स बंद झाली .नवीन नोकिआ आशा २०६ मध्ये मिळेल .सैमसंग स्टारमध्येही आहे ।विचार केला या सोडून दुसरी कंपनी पाहू .
एकाने कार्बनचा K20+ शिल्लक होता तो दाखवला .१७००रुपये .घेतला .घरी येऊन रेकॉर्डिँग करून पाहिले .WAV फॉर्मैट मध्ये सेव झाले (MP3 नाही) .आवाजही छान .फोटोही काढले 1.3 MP कैमरा तीन इंचावरही फोकस करत होता JPG फाइल . व्हिडिओ काढले .एक मिनिटाची क्लिप तेरा चौदा एमबिची !! AVI फाइल आली .झूमपण झाले .प्लेबैकही सुरेख येतोय शिवाय स्क्रिन २.४ इंची ३२०X२४०ची चमकदार आहे .बैटरी १८००एमेएच !! ड्यूल सिम (मोठी) आहेच .फक्त नेट आणि फोन मेमरी नाही .गाणी वाजवायला स्पिकर अगदी ठणाणा वाजतोय ,हेडफोनचा आवाजही छान परंतु पिन ३.५ नाही .चार्जीँग आणि हेडफोनचे एकच सॉकेट आहे .ब्लूटुथ चांगलाच फास्ट आहे .फोनच्या किपैडची बटणे छान आहेत आणि कठीण अजिबात नाही .आताच याचे उदघाटन राजमाचीला केले त्यात काही फोटो याने काढलेले आहेत .नोकिआने लांबचे चांगले येतात पण वीस इंचांपेक्षा जवळ फोकस होत नाही .ते काम याने होते .सामान्य माणसास आणखी काय पाहिजे ?