काय: गणितज्ञ श्री. भास्कराचार्य (II) ९०० वा जन्मदिन परिसंवाद, ठाणे
कुठे: ज्ञानद्वीप विद्या प्रसारक मंडळीचे कॉलेज, ठाणे
केव्हा: १९ ते २१ सप्टेंबर २०१४
संयोजक Oriental Institute,Thane Director: Dr विजय बेडेकर
संपर्क आणि अधिक माहिती: http://www.vpmthane.org/bhaskara900/
आनंदाची गोष्ट म्हणजे वरील दुव्यावर जावून books वर टिचकी मारल्यावर श्री. भास्कराचार्य (II) यांची खालील पुस्तके (मूळ संस्कृत किंवा इंग्रजी भाषांतर रुपात) online उपलब्ध होतात:
लीलावती, ग्रहगणित, गोलाध्याय, बीजगणित, सिद्धांत शिरोमणी, इ.
प्रतिक्रिया
25 May 2014 - 9:46 pm | मुक्त विहारि
एक विनंती आहे,
दुर्दैवाने, त्याच सुमारास मी भारता बाहेर आहे.
ह्या परीसंवादाची सी.डी. / डी.व्ही.डी. करता येईल का?
कारण, बर्याच वेळी असे उत्तम कार्यक्रम केवळ सी.डी. / डी.व्ही.डी. नसल्याने, रसिक माणसांपाशी पोहोचू शकत नाहीत.
25 May 2014 - 11:40 pm | डॉ सुहास म्हात्रे
प्रशंसनिय उपक्रम !
डिव्हीडी ची कल्पना उत्तम आहे. जर बनवली तर मला एक मिळू शकेल काय ?
26 May 2014 - 11:30 am | एस
डीवीडी वा यूट्यूब ची संकल्पना मस्त आहे. कार्यक्रम तीन दिवस आहे मग त्याची किमान ढोबळ रूपरेषा मिळू शकेल का?
26 May 2014 - 3:10 am | अक्शु
ह्या परीसंम्वादाची चित्रफित युट्युब वर उपलब्ध करावी ही विनंती.
26 May 2014 - 9:07 am | आत्मशून्य
धन्यवाद.
- लिखाण आवडले.
27 May 2014 - 5:36 pm | श्रीनिवास टिळक
प्रतिक्रिया वाचून डॉक्टर विजय बेडेकर लिहितात (१) cd/dvd परिसंवाद झाल्यावर उपलब्ध होतील (२) you tube वर सारांश परिसंवादाच्या आधी आणि नंतर देण्यात येईल (३) webinar भरविता येईल का याचा विचार चालू आहे (४) या आंतरराष्ट्रीय परिसंवादाला सर्व जगातून तज्ञ येणार आहेत आणि त्यात खालील पैकी काही विषयांवर चर्चा होईल:
(१) श्री भास्कराचार्य यांचे जीवन, काळ, आणि विचार; भास्कराचार्यांची ललित दृष्टी आणि प्रेरणा;
(२) लीलावती ग्रंथाचे महत्व, विचार, आणि प्रसार; गणेश दैवज्ञ यांचे लीलावतीवरील भाष्य: बुद्धीविलासिनी;
(३)बीजगणित: विचार आणि त्याचा प्रसार; कृष्ण दैवज्ञ यांचे बीजगणितावरील भाष्य: नवांकुर;
(४) लीलावती आणि बीजगणिताची पर्शिअन भाषांतरे;
(५)नृसिंह दैवज्ञ यांचे सिध्दांतशिरोमणी वरील भाष्य: वासनावार्त्तिक; सिध्दांतशिरोमणी मध्ये आलेली शास्त्रीय उपकरणे इत्यादी
27 May 2014 - 6:55 pm | डॉ सुहास म्हात्रे
cd/dvd परिसंवाद झाल्यावर उपलब्ध होतील
अनेक धन्यवाद ! cd/dvd प्रसिद्ध केल्यावर तसे मिपावर कळविल्यास बरे पडेल. जर पुण्यात त्या उपलब्ध केल्यास घेणे सोपे जईल. त्यांचे मुल्य देण्याची अर्थातच तयारी आहे.