मराठी शुद्धलेखन : दशा आणि दिशा.

कलंत्री's picture
कलंत्री in काथ्याकूट
29 Jul 2008 - 7:40 pm
गाभा: 

समर्थ मराठी संस्था, पुणे तर्फे शनिवार, दिनांक ०२. ०८. ०७ या दिवशी दुपारी ०४ ते ०७ या दरम्यान 'महाराष्ट्र साहित्य परिषद'च्या, माधवराव पटवर्धन, पुणे येथील सभागृहात 'मराठी शुद्धलेखन : दशा आणि दिशा' या विषयावर श्रीमती सत्त्वशीला सामंत यांचे व्याख्यान आणि प्रश्नोत्तरे - चर्चा असा कार्यक्रम आयोजित केला आहे.

कृपया या विषयात रुची आणि आवड असणाऱ्यांनी या कार्यक्रमात जरुर भाग घ्यावा.

संपर्क : प्रा. अनिल गोरे, ९४२२००१६७१.

काही शंका,

मराठीचे व्याकरण आणि शुद्धलेखनावरच आता का बरे चर्चा होत आहे?

मराठीचे व्याकरण आणि शुद्धलेखनावर संस्कृतचा प्रभाव असावा का?

(इतर भाषेमध्येही असेच प्रवाह चालू आहेत का?फ़्रेन्चमध्ये ७०० वर्षांत काहीही सुधारणा झाल्या नाहीत. बंगाली लिपीत लिहिली जाणारी मैते भाषा तिच्या जुन्या कालबाह्य झालेल्या लिपीत लिहावी अशी चळवळ चालू आहे. उडिया लिपीतून ऋ, ॡ काढून टाकावे अशी मागणी आहे. तशीच जरूर असेल तर ऋषिकुमार हा शब्द मुनिकुमार असा लिहावा असे या लोकांचे म्हणणे आहे(?). मलयाळम्‌ने लिपी सुधारणेचा प्रयत्‍न करून पाहिला. आता नवीन विद्यार्थ्यांना जुनी लिपीही येत नाही आणि नवी देखील. हिंदीत नुक्ता आणि चन्द्रबिन्दू नकोत असे काही जणांचे म्हणणे आहे, पण या सुधारणांना तेथील विद्वानांची संमती नाही. तसेच गुजराथीच्या अशुद्धलेखनाचा पुरस्कार करणारी ऊंझा-सुधारणा अजून रूळलेली नाही. तमिळमध्ये कुठलीही सुधारणा करण्याचा विचार चालू आहे असे ऐकिवात नाही. आधार आणि सौजन्य: उपक्रमवरील चर्चा)

भाषा हे प्रवाही माध्यम असल्यामुळे काही बदल व्हावेत का?

सर्वसामान्यांचे याबाबतीत काय मत आणि अनुभव आहे.

विद्वानांचे एकमत शक्य आहे काय? (१९६२च्या शुद्धलेखन सुधारणा राजकारण्यांच्या सोयीसाठी होत्या, हे कुणीही विसरू नये. आधार आणि सौजन्य: उपक्रमवरील चर्चा).

या सर्व चर्चा आणि विवादातून मराठीचे पाऊल पूढे पडेल का?

पुण्यातील मिपाच्या सर्व सभासदानी कृपया उपस्थित रहावे ही विनंती.

मिपाचे सर्वच सभासद जे प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाही त्यांनी आपापल्या शंका , आपले विचार आणि मते येथे अवश्य मांडावीत. ती सत्त्वशीला बाईकडे नक्कीच मांडली जातील.

मिपा सरंपच : उपक्रमवरील चर्चा येथे कापा आणि डकवा अश्या पद्धतीने लिहिली आहे. कृपया यास स्थान द्यावे.

प्रतिक्रिया

संदीप चित्रे's picture

29 Jul 2008 - 8:55 pm | संदीप चित्रे

त्यामुळे बदलत्या काळानुसारा नवीन शब्दांचे स्वागत केले पाहिजे. उदा. इंग्रजी भाषेत 'गुगल' हा शब्द जणू 'शोधणे' ह्याच्या समानार्थी म्हणून वापरला जाऊ लागला आणि रूळलाही (निदान आय. टी. वाल्यांच्या इंग्रजीत) !

भाषा हे विचारांचे माध्यम मानले तरी शुद्धलेखनाकडे लक्ष देणे आवश्यक असते.
माझं असं मत आहे की जर शूधलेखणाच्ये मुळ्भूट नीयम पालले नाहीट तर वाचणार्याचा गोधल होवू शकटो :)
--------------------------
www.atakmatak.blogspot.com

सखाराम_गटणे™'s picture

29 Jul 2008 - 10:58 pm | सखाराम_गटणे™

शूधलेखणाच्ये मुळ्भूट नीयम पालले नाहीट तर वाचणार्याचा गोधल होवू शकटो
=)) =))

सखाराम गटणे

विसोबा खेचर's picture

30 Jul 2008 - 9:37 am | विसोबा खेचर

क्षमा असावी कलंत्रीसाहेब, पण शुद्धलेखन या विषयावर चर्चा करण्यास मिपावर बंदी आहे! :)

मिपावर ह्या विषयांना एन्करेज, एन्टरटेन केले जात नाही याची नोंद घ्यावी!

महेश वेलणकर नावाचे आमचे एक स्नेही आहेत. त्यांचं मनोगत म्हणून एक संस्थळ आहे तिथे या विषयांवर बरीच ट्यांव ट्यांव अन् भसाभसा, जीव जाईसस्तोवर आणि मुख्य म्हणजे निरर्थक चर्चा केली जाते हे मी येथे आपल्या माहितीकरता सांगू इच्छितो! :)

'मराठी शुद्धलेखन : दशा आणि दिशा' या विषयावर श्रीमती सत्त्वशीला सामंत यांचे व्याख्यान आणि प्रश्नोत्तरे - चर्चा असा कार्यक्रम आयोजित केला आहे.

हा हा हा! बरं बरं! :)

बर्र का कलंत्रीशेठ, आमच्याकडे धुणीभांडी करणारी शिताबाई दोन बुकं शिकली आहे. तिला लिहायची खूप हौस आहे. ती कधी कधी आपल्या लेकीसोबत,

"ताई, आज मि येनारा नाय. मला बरं वाटत नाय. आख्खी रात झोपच नाय आलि"

अश्या काहीश्या आशयाची चिठ्ठी आमच्या मातोश्रींना पाठवते.

कलंत्रीसाहेब, "तिच्या चिठ्ठीतील मजकूर हा शुद्ध की अशुद्ध, आणि हे ठरवण्याचा अधिकार कुणाला आहे?" एवढंच तुमच्या त्या सत्त्वशीलाबाईला आमच्यातर्फे विचारा आणि बाई काय म्हणाल्या ते आम्हाला येऊन सांगा एवढीच तुम्हाला विनंती!

आपला,
(शुधलेखनाची नस्ती ट्यांव ट्यांव करणार्‍यांना फाट्यावर मारणारा) तात्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Jul 2008 - 3:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

... तुमास्नी ह्ये मान्य करावाच लागंल का, सुद लिवावं आन सुद वाचावं. त्येचामुळंच मानुस मोटा व्हतो!

विसोबा खेचर's picture

30 Jul 2008 - 4:10 pm | विसोबा खेचर

तुमास्नी ह्ये मान्य करावाच लागंल का, सुद लिवावं आन सुद वाचावं. त्येचामुळंच मानुस मोटा व्हतो!

ते मोठं होणं की छोटं होणं राहू द्या, त्या आधी,

"ताई, आज मि येनारा नाय. मला बरं वाटत नाय. आख्खी रात झोपच नाय आलि"
अश्या काहीश्या आशयाची चिठ्ठी आमच्या मातोश्रींना पाठवते.
कलंत्रीसाहेब, "तिच्या चिठ्ठीतील मजकूर हा शुद्ध की अशुद्ध, आणि हे ठरवण्याचा अधिकार कुणाला आहे?"

यातल्या,

"तिच्या चिठ्ठीतील मजकूर हा शुद्ध की अशुद्ध, आणि हे ठरवण्याचा अधिकार कुणाला आहे?"

या प्रश्नाचं उत्तर द्या, मग पुढे बोलू...

तात्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Jul 2008 - 5:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

माफ करा तात्या, हा प्रश्न खूप सेंसिटिव असेल असं मला वाटलं नव्हता ... म्हणून सवयीनी त्यावर पण विनोद करायचा (केविलवाणा) प्रयत्न केला.

या प्रश्नाचं उत्तर द्या, मग पुढे बोलू...
मला तरी नक्कीच नाही ... पण मला तिच्या बोलण्याचा अर्थ समजला माझ्यासाठी खूप झालं.

अदिती

विसोबा खेचर's picture

30 Jul 2008 - 10:56 pm | विसोबा खेचर

पण मला तिच्या बोलण्याचा अर्थ समजला माझ्यासाठी खूप झालं.

That's it..! :)

शुद्धलेखनाला किती महत्व द्यायचं आणि मारे चार बुकं शिकलेल्या लोकांनी त्यावर किती ट्यांव ट्यांव करायची हे यावरून ज्याने त्याने ठरवावं! :)

पण यमे, मला आश्चर्य याचं वाटतं की एक तुझा अपवाद वगळता, 'शिताबाईने लिहिलेलं वाक्य हे शुद्ध आहे की अशुद्ध आहे आणि ते ठरवण्याचा अधिकार कुणाला आहे?' या माझ्या प्रश्नाचं उत्तर कुणाकडेही नाही! सगळ्यां भाषातज्ञांची आणि भाषाप्रभूंची तोंडं गप्प आहेत! ;)

तात्या.

विसोबा खेचर's picture

30 Jul 2008 - 11:04 pm | विसोबा खेचर

आणि जर का एखाद्याने शिताबाईने लिहिलेल्या वाक्यात शुद्धलेखनाच्या चुका आहेत असं म्हटलं तर आमचं काहीच म्हणणं नाही. त्याला त्याचे शुद्धलेखनाचे नियम लखलाभ! परंतु आम्ही ते मानत नाही, मानणार नाही! आम्ही ते केवळ फाट्यावर मारू. त्याने ते नियम स्वत:कडेच ठेवावेत आणि खुशाल दिवे ओवाळत बसावे त्यांच्याभोवती! आम्हाला शिकवायला जाऊ नये!

शुद्धलेखन.. माय फूट...........!

आपला,
(विद्रोही!) तात्या.

प्रियाली's picture

31 Jul 2008 - 12:23 am | प्रियाली

या इथले का?

मिसळापावावर कोणी भाषातज्ज्ञ आणि भाषाप्रभू (उरले) आहेत असे वाटत नाही बॉ मला! ;)

आणखी कोणाचा नाही.

मी या विषयावर मिपावर बोलत नाही. :-) पण मागतच आहात तर मत असे :-

बोलण्याबाबत : शिताबाईंचे बोलणे शुद्ध आहे. भाषावैज्ञानिक दृष्ट्या फक्त प्रौढ वयात मराठी अर्धवट शिकलेले परभाषीय (आणि ज्यांना अजून बोलता येत नाही ती बालके) तेवढेच काय मराठी अशुद्ध बोलू शकतात. मराठीभाषक जे जे मराठी म्हणून बोलतात ते शुद्धच.

चिठ्ठीतल्या लिखाणाबाबत : लेखनाच्या शुद्धाशुद्धतेबाबत भाषाविज्ञानाचे काहीएक मत नाही. कारण लेखन ही एक अनैसर्गिक क्रिया आहे.

भाषावैज्ञानिक मत सोडा - कामचलाऊ मत काय आहे? शुद्धाशुद्ध सांगण्याचा अधिकार कोणाचा आहे?

गाजवता येईल त्यालाच अधिकार सांगता येतो. ज्याला काही अंमल बजावता येईल, अशाच व्यक्तीला अधिकार आहे. म्हणून शिताबाईंच्या चिठ्ठीच्या बाबतीत कसलाही अधिकार कोणालाही नाही. (असलाच तर तुमच्या आईला मालकीण म्हणून आहे - चिठ्ठीतील मजकूर मुळीच समजला नाही, तर रजा द्यावी की नाही हे तुमच्या आईंना कळणार नाही.)
येथेही बघावे. http://www.misalpav.com/node/2800#comment-38626

साधारणपणे अंमलबजावणी करायचा अधिकार विद्यार्थ्यांवर फक्त शाळाशिक्षकाचा असतो, आणि लेखकावर फक्त प्रकाशक-संपादकाचा. त्यात्या लोकांना शिताबाईंनी तो अधिकार दिला तरच प्राप्त होतो. शिताबाईंना चिठ्ठीतला मजकूर शाळेतल्या परीक्षेत उत्तर म्हणून वापरायचा असेल, तर त्या मजकुराला किती गुण द्यावे त्याचा अधिकार फक्त शिक्षकालाच आहे. आणखी कोणाला कसलाही अधिकार पोचत नाही. शिताबाईंना ती चिठ्ठी वर्तमानपत्रात प्रकाशित करायची असेल तर लेखनात बदल करणे न करणे ती जाणो आणि तिचा प्रकाशक जाणो. आणखी कोणाला कसलाही अधिकार पोचत नाही.

चतुरंग's picture

31 Jul 2008 - 12:17 am | चतुरंग

त्यात्या लोकांना शिताबाईंनी तो अधिकार दिला तरच प्राप्त होतो.

हे वाक्य मी

'तात्या लोकांना शिताबाईंनी तो अधिकार दिला तरच प्राप्त होतो' असं वाचलं! ;)

चतुरंग

श्रीकृष्ण सामंत's picture

31 Jul 2008 - 7:28 am | श्रीकृष्ण सामंत

तात्याराव,
मी आपल्याशी पूर्ण सहमत आहे.माझ्या वाचनात आलेला
एक उतारा इथे माहिती साठी देत आहे.
एका व्यक्तिने ह्या शुद्धलेकनावरच्या चर्चेला कंटाळून आपण म्हणता तसं,
" या विषयांवर बरीच ट्यांव ट्यांव अन् भसाभसा, जीव जाईसस्तोवर आणि मुख्य म्हणजे निरर्थक चर्चा केली जाते"
खालिल उतार्‍यात लिहून आपली प्रतिक्रिया दिली आहे.

"आम्ही जे लिहू, जे बोलू तेच शुद्ध आहे/असते असा आमचा दावा आहे. ज्यांना आमचं बोलणं कळणार नाही त्यांनी ते ऐकावं, आणि ज्यांना आमचं लिहिणं कळणार नाही त्यांनी ते वाचावं असा आमचा बिलकूल आग्रह नाही. इतरांनी त्यांच्या व्याकरणविषयक पुस्तकात लिहिलेले कुठलेही नियम आम्ही मानत नाही/मानणार नाही. व्याकरण विषयक आणि शुद्धलेखन विषयक नियम बनवण्याचे अधिकार कुणा एका व्यक्तिला आहेत, किंवा ती कुणा एका पांढरपेशा समाजाची मक्तेदारी आहे असे आम्ही मानत नाही, आणि सदर मक्तेदारी असलीच तर ती उधळून लावण्यास आम्ही सदैव समर्थ आहोत!"

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

अवलिया's picture

31 Jul 2008 - 10:37 am | अवलिया

Dier Sar
dat is wat i m seying
ven i rite in inglish iph dere is ne speling mistek then vay piple se that nhanha u r rong. ur inglidh is veri poar.
same ejucated piple whu se that we du not kare for mrati gramer tich me inglish speling
i m konfujed

* अशुद्ध वाचणा-यांसाठी

Dear Sir
That is what i am saying. When I write in English , if there is spelling mistake then why people say that Nana you are wrong. You English is very poor. Same educated people who say that we do not care for marathi grammer teach me english spelling. I am Confused

नाना

वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील

कलंत्री's picture

1 Aug 2008 - 8:20 pm | कलंत्री

सर्व मिपाकर,

आपले मत काहीही असो, आपण जर पुण्यात असाल आणि आपणास वेळ मिळत असेल तर अवश्य हजेरी लावावी. शेवटी दुसर्‍याची बाजू ऐकुन घेणे हेही महत्वाचे असतेच.

तात्या,

शुद्धलेखनासाठी प्रमाणित साहित्याचा विचार करायला हवा. उदा. वर्तमानपत्रातले लेखन, कविता, काव्य, लेख इत्यादी. या लेखनातही अनेक चुका होत असतात. त्या टाळण्याचा प्रयत्न करावयास हवा.

आपल्या सिताबाईने चिठ्ठी पाठविणे हाच कौतुकाचा विषय आहे. आमच्या कडे बाया दुसर्‍या दिवशी का आले नाही त्याची कारणे सांगत असतात.

या कार्यक्रमानंतर शुद्धलेखन आणि प्रचलित काव्यवाचन इत्यादी करण्याचा विचार आहे. तसे काव्यासाठी शुद्धलेखनाचा विचार काटेकोरपणे केला जात नाही.

शेवटी मराठीचे पाऊल पुढे पडावे हीच आपणासर्वांची इच्छा आहे, हे खरे आहे ना?

द्वारकानाथ कलंत्री