कल्पना / प्रस्ताव : मिपाकरांनी ट्रेक ला जाण्याबाबत

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in भटकंती
16 May 2014 - 11:51 pm

नमस्कार!

भाईयों और बहनो.....
(सॉरी सॉरी. ते मोदींचं भाषण ऐकलं ना नुकतंच टीव्हीवर... )

हां तर आता मोदी सरकार वगैरे सगळं आलंय. अशी बातमीही आली आहे की ५ जून ला मॉन्सून केरळात दाखल होणार आहे. तेंव्हा त्याच्या स्वागताला एखाद्या डोंगरावर नाही गेलं तर मजा काय नाही का! असा विचार मनात आला. गेल्या चार पाच ट्रेक चे वृत्तांत फोटो जेंव्हा मिपावर टाकले तेंव्हा `आम्हाला न नेल्याबद्दल निषेध' वगैरे अनेक शेरे वाचायला लागले. :) तेंव्हा, म्हटलं की या खेपेस त्याची भरपाई करावी.

एक सहज प्लॅन डोक्यात आलाय. खूप आधी होत असेल ही पोस्ट पण आधीच तारीख ठरली की बरं पडतं बाकी कार्यक्रम काही असेल नसेल तर त्या दृष्टीने म्हणून आत्ताच धागा टाकतोय. साधारण पणे सगळ्यांना जमेल असा, छोटासा, पण निसर्गरम्य असा `पेठ चा किल्ला किंवा कोथळीगड' हा कर्जत जवळ आहे. तिथे मिपाकरांसोबत जावं असा विचार मनात आला. तसा प्रस्ताव इथं मांडतोय. जून चा तृतीय किंवा चतुर्थ शनिवार. पेठ चा किल्ला एका दिवसात अगदीच्च आरामात बघून होतो, म्हणून शनिवार; म्हणजे रविवार मोकळा सगळ्यांना.

या कल्पनेबाबत, किल्ल्याबाबत, तारखेबाबत, किंवा इतरही कुठल्या बाबीसंदर्भात अनुभवी मिपाकरांचे विचार, सल्ले, कल्पना, त्यांनी द्याव्यात अशी विनंती. मी नवखा असल्याने अनुभवींच्या मताची, सहभागाची गरज आहे.

आता उकाडा झालाय फार.... आणि अब की बार... :)

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

16 May 2014 - 11:59 pm | मुक्त विहारि

किंबहूना ५ जुलैच चालेल.

(बायकोला नाराज करून यावे लागणार, पण इलाज नाही.)

टवाळ कार्टा's picture

17 May 2014 - 12:05 am | टवाळ कार्टा

३१ जुलै नंतर नाही चालणार का?

एक तर तुला भेटण्याची संधी हुकलीच आहे.

निदान ह्या वेल्लाभटां बरोबर तरी जावू दे.

मी यानबूतून जेमतेम १४ दिवसांसाठी येणार, त्यात बायकोच्या नकळत कट्ट्याला जाणार.(तिच्या नकळतच पळायला लागणार आहे."मिपा" ही तिची सवत आहे.त्यामुळे ती हा प्रतिसाद नक्कीच वाचणार नाही.)आणि ऐन वेळी तू काडी सारणार.

तू फक्त टवाळ नसून डामरट पण आहेस.डँबीस कुठला.

ओ वेल्लाभट, मी आधीच ५ जुलै सांगीतले आहे हां.वाटल्यास २८ जून करा.

टवाळ कार्टा's picture

17 May 2014 - 3:56 pm | टवाळ कार्टा

तू फक्त टवाळ नसून डामरट पण आहेस.डँबीस कुठला.

आवडेश :)

आत्मशून्य's picture

18 May 2014 - 10:28 am | आत्मशून्य

तू फक्त टवाळ नसून डामरट पण आहेस.डँबीस कुठला.

वाव्वा मूवी, बालपण जागे करणारा प्रतिसाद.

पिवळा डांबिस's picture

19 May 2014 - 10:31 am | पिवळा डांबिस

तू फक्त टवाळ नसून डामरट पण आहेस.डँबीस कुठला.

हे टवाळ -> डामरट -> डँबीस हे बघून ड्वाळे पानावले!!!
मिपावर आल्याचे सार्थक झाले!!!! *yahoo*
धन्यवाद मुविकाका!!

बाकी गडाच्या ट्रेकला हार्दिक शुभेच्छा!
(आमी फक्त भुईकोट किल्ले किंवा जलदुर्गच बघतो!!!)

मुक्त विहारि's picture

19 May 2014 - 3:19 pm | मुक्त विहारि

टवाळ कार्टा असल्याने, असे लिहीले.

एखादे भारद्स्त व्यक्तीमत्व असते, तर थोडी वाक्य रचना बदलली असती..
=================================

"प्रिय अबक,

आपण नेहमीच आमच्यावर प्रेम करता.तशी तुमची आणि माझी वैयक्तिक ओळख नाही.ह्यावेळी नेमके तुम्ही आमच्या गावांत आणि आम्ही पोटा-पाण्याच्या उद्योगाला बाहेर.त्यामुळे तो चान्स हुकला.

असो,

ह्यावेळी निदान वेल्लाभटांबरोबर जायचे ठरवत आहे आणि सुदैवाने आमची सूट्टी पण त्याच सुमारास आहे.बायकोच्या त्रासातून सुटण्यासाठी (निदान एक दिवस तरी) आम्ही बेत मांडावा आणि तुम्ही तो उधळावा, ह्यासारखे मानसीक दू:ख नाही.

आम्ही , तुम्हाला भेटलो नाही म्हणून तुम्हाला त्रास झाला असेल.तसाच त्रास वेल्लाभटांना होवू द्यावा, असे तुम्हाला मनांतून नक्कीच वाटत असेल.पण आंतरजालावर तसे मनांतले प्रत्येक विचार मांडता येत नाहीत्,ह्याची तुम्हाला कल्पना आहेच.

म्हणून तुम्ही वेगळी वाक्य रचना केलीत."ज्या गावच्या बोरी,त्याच गावच्या बाभळी" हे मात्र आपण विसरलांत.

जावू दे, तुमचे आमच्यावरचे प्रेम आम्हालाच काय पण समस्त मिपाकरांना माहीत आहे.त्यावर आज शिक्का मोर्तब झाले."

@ वेल्लाभट,

प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य, हे आपण आधीच लिहायला हवे होते.पण आपण ते न लिहील्याने हा असा गोंधळ झाला.आपण पुढच्या धाग्याच्या वेळीस योग्य ती काळजी घ्याल अशी आशा.

@ संपादक मंडळ,

क्रुपया अशा गोष्टींसाठी एखादा छापील फॉर्म ठेवावा आणि मग तो परत एकदा चेक करावा.म्हणजे मग असे सभासदांना एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करण्याचा चान्स मिळणार नाही, आणि मिपाची बँडविड का बँडविथ, जे काय असेल ते बॅडवाले ते वाचेल.
================================

मुक्त विहारि's picture

19 May 2014 - 3:23 pm | मुक्त विहारि

ते @ पिडां भावू,

राहिलेच की,

डिस्केमर,

वरील प्रतिसाद हा @पिडांकाका ह्यांनाच आहे....

टवाळ कार्टा's picture

19 May 2014 - 8:41 pm | टवाळ कार्टा

टवाळ -> डामरट -> डँबीस

हे सगळे माझ्यासाठी लिहिले आहे...उगाच हक्क सांगू नये... :P

तुमचा अभिषेक's picture

17 May 2014 - 12:10 am | तुमचा अभिषेक

मी येईन न येईन पण चांगली कल्पना आहे ..

व्हावेच लागते ;)

स्पार्टाकस's picture

17 May 2014 - 2:20 am | स्पार्टाकस

एक दिवसाचा ट्रेक करत आहात की दोन किंवा जास्त ?
सोपा ट्रेक करायचा आहे का थोडा मिडीयम ग्रेड ?
मुख्य म्हणजे ट्रेक करायचा आहे का पिकनिक ?

वेल्लाभट's picture

17 May 2014 - 7:55 am | वेल्लाभट

वरील (धाग्यातील) प्रस्तावाच्या अनुषंगाने उत्तरं
१. एका
२. सोपा. जेणेकरून जास्त जणांना येणं शक्य होईल
३. करायचा ट्रेकच; झालीच पिकनिक तर इलाज नाही.

वरील सोडून इतर कुठला पर्याय असेल तर वेगळी गोष्ट आहे.

कंजूस's picture

17 May 2014 - 9:34 am | कंजूस

तिथे जवळच एक {दिवसाच्या}कट्टयासाठी चांगली जागा आहे .कोणालाही येता येण्यासारखी .मुविँकडे सूत्रे सोपवा आणि तारीख ठरवा फक्त .जून महिना फार दूर नाही .

मुक्त विहारि's picture

17 May 2014 - 9:42 am | मुक्त विहारि

ट्रेकिंगचे आयोजकत्व स्वीकारायचा अनुभव नाही, आणि सध्या हे शिकायला अजिबात वेळ नाही.

"कंजूस" साहेब तुम्हीच का नाही ठरवत?

आपली मागची ट्रिप पण मस्त झाली होती.

कमीत कमी पैशांत आणि वेळ वाचवत, ट्रिप करण्यात मजा आहे.

प्रसाद गोडबोले's picture

17 May 2014 - 10:31 am | प्रसाद गोडबोले

मागल्या वर्षीचा अख्खा पावसाळा सौदीत गेलाय रखरखीत वाळवंटात... एकांतात :(

यंदाचा पावसाळा अख्खा पावसाळा मनसोक्त जगायचाय....

जंगलात रानावनात कोसळत्या पावसात हिरव्यागार गवतात धबाधबा धबधब्यांखाली दोंगरातल्या गुहेत डोंगराच्या कठड्यावर चिंब चिंब भिजत मग कुडकुडत थंडी वाजत मित्रांसोबत बीयर पीत मैत्रीणिंसोबत गंमत करीत .... छतावर पावसाचा आवाज ऐकीत , खिडकीत उभे राहुन चहा पीत शांत शात्रीय संगीत ऐकीत... अन पुन्हा नवीन ट्रेक्स्चे प्लॅन करीत ...

यंदाचा पावसाळा जगायचा :)

अवांतर : मी टेन्ट घेतलाय , आता स्लीपींग बॅग घेतो , एक ट्रेक कॅलेन्डर करुयात आणि मग धमाल !!

दिपक.कुवेत's picture

21 May 2014 - 11:45 am | दिपक.कुवेत

"मैत्रीणिंसोबत गंमत करीत ...." नेमकि कशी गंमत करता हो तुम्हि सार्वजनीक ठिकाणी जरा आम्हाला पण सांगाल का? (ह. घ्या). कोणतीहि तारीख ठरली तरी मला जमेल असे वाटत नाहि. तेव्हा ट्रेक करीता भरपुर शुभेच्छा.

सुहास झेले's picture

17 May 2014 - 10:54 am | सुहास झेले

नक्कीच :)

भाते's picture

17 May 2014 - 11:16 am | भाते

कॉलिंग 'भ ट क्या खे ड वा ला'
या ट्रेकिंग किंगच्या अनुभवाचा आणि सल्ल्याचा नक्कीच फायदा होईल.
अर्थात बाकीचे मिपाकरही आहेतच सल्ला द्यायला आणि मदतीला आपल्याबरोबर.

मुक्त विहारि's picture

17 May 2014 - 2:37 pm | मुक्त विहारि

आजच मनाली वरून आले आहेत.

फोन करा की रात्री....

हे कंजूस आणि भटक्या खेडवाला जिथे नेतील तिथे जा.

भटक्या खेडवालांबरोबर २ ट्रेक (एक तर फार जबरदस्त होता.) केले आहेत आणि कंजुस बरोबर एक सहल केली आहे.

कमीत कमी खर्च आणि वेळ वाचवत नेतात आणि आणतात.

भ ट क्या खे ड वा ला's picture

18 May 2014 - 5:55 pm | भ ट क्या खे ड वा ला

किंग वैगेरे काही नाही
मि पा वर एक सो एक आहेत.
फक्त ट्रेकर आहे.

स्पार्टाकस's picture

17 May 2014 - 2:11 pm | स्पार्टाकस

मी सध्या भारताबाहेर आहे. पण भारतात असताना अनेकदा ट्रेक अ‍ॅरेंज करत असे.
मुंबई / पुण्याजवळ एक दिवसाचे बरेच ऑप्शन्स आहेत.

मुंबईहून / पुण्याहून मधोमध :-
लोहगड
विसापूर
राजमाची ( २ दिवस )
उंबरखिंड

पुण्याहून १ दिवसाचे ट्रेक -
पुरंदर
हडसर
चावंड

मुंबईहून १ दिवसाचे ट्रेक :-
माहुली
अशेरी
सागरगड
कलावंतीण
प्रबळगड
हरिहर ( नाशीक हून जवळ )

२ दिवस सवडीने वेळ असेल तर पहिली पसंती अर्थातच हरिश्चंद्रगड, राजगड, तोरणा

agent vinod's picture

17 May 2014 - 2:20 pm | agent vinod

म्हंजे रविवारी आराम करू शकू

कंजूस's picture

18 May 2014 - 6:51 am | कंजूस

१)शनिवार ठीक आहे .
२)पुण्याकडून बरेचजण असतील तर लोहगड ठीक आहे .त्यात मुंबईचेही (इंद्रायणी गाडीने )येऊ शकतात .इकडे साडे आठ ते पाच इतका वेळ हाताशी मिळतो .
३)मुंबईकडून असतील तर पनवेल -माथेरान -नेरळ आहे .
४)रात्री मुकाम करण्याचे ट्रेकबद्दल पावसाळयातील शनि /रवि ची खात्री देता येत नाही .गर्दी होते .

वेलाभट,
ट्रेकिंग मधे काय समाविष्ट आहे?...
लोहगड ठरला असे मानून पायथ्या पर्यंत कसे पोहोचावे? काही बरोबर काय सामान असावे?, स्थूल आकारच्या मित्रांना एका दमात चढायला आले नाही तर वाटेत थांबायची काही सोय? मिपामैत्रिणींना काही विशेष सूचना?
वास्तूची ऐतिहासिक ओळख, काही शस्त्रे वा प्रदर्शनीय वस्तू, पोटापाण्याची सोय, मिनी मेडिकल सोय?...

संजय क्षीरसागर's picture

21 May 2014 - 11:30 am | संजय क्षीरसागर

ठरलेले नाही, तरीही प्राथमिक माहिती हवी...

हल्ली ठरवून करण्याचे दिवस राहिलेले नाहीत. प्रार्थमिक माहितीसाठी व्यनि करावा. चारचौघात विचारु नये.

लोहगड ठरला असे मानून पायथ्या पर्यंत कसे पोहोचावे?

पायथ्यापर्यंत कसे पोहोचावे हे पूर्वानुभवाने समजायला अडचण नसावी.

काही बरोबर काय सामान असावे?,

सामान शक्यतो स्वतःचे असावे. मंडळ सामानाची जवाबदारी घेत नाही.

स्थूल आकारच्या मित्रांना एका दमात चढायला आले नाही तर वाटेत थांबायची काही सोय?

स्थूल आकाराच्या लोकांनी एकादमात चढू नये. केंव्हा, कसे आणि कुठे थांबावे हे तुमचे तुम्ही ठरवायचे आहे.

मिपामैत्रिणींना काही विशेष सूचना?

उत्तेजक द्रव्ये, किंवा वस्त्रे, अथवा संभाषण यावर मंडळाचे निरिक्षण नसेल

वास्तूची ऐतिहासिक ओळख, काही शस्त्रे वा प्रदर्शनीय वस्तू,

वास्तू ऐतिहासिक वाटली आणि प्रदर्शनीय नसली तर... शस्त्रसंधी करावा.

पोटापाण्याची सोय

पाण्यात उतरल्यावर पोट जाणवणार नाही.

मिनी मेडिकल सोय

योग्य वेळी गोळ्या (किंवा सवयी प्रमाणे, रेनकोट) घेणे (शक्यतो घरुन निघतांना), म्हणजे ऐनवेळी मेडिकल शोध (किंवा नंतरचा त्रास) वाचेल.

भ ट क्या खे ड वा ला's picture

18 May 2014 - 5:42 pm | भ ट क्या खे ड वा ला

युथ होस्टेल अंबरनाथ दर वर्षी पेठ किल्ला ट्रेक जून च्या २/३ रविवारी आयोजित करते.
या वर्षी १५ जून ला हा ट्रेक आहे.
या ट्रेक ला येण्यासाठी YHAI चे सभासद असण्याची गरज नाही.
मात्र खालील नियम पाळणे आवश्यक आहे.
ड्रेस कोड : फूल प्यांट, फूल शर्ट, बूट.
दुपारच्या जेवणाचा डबा. / २ लिटर पाणी.
नो लिकर / नो तंबाखू /नो सिगारेट .

सकाळी ०७ वाजता नेरळ स्थानकात जमायचं.
टम टम रिक्षेने श्री. गोपाळ सावंत यांच्या हॉटेलात पोहोचायचं.
तेथे नाश्ता,चहा करून चालायला सुरवात करायची.
पेठ किल्ला येथे २/३ तासात फोचायचं.ज्यांना शक्य असेल त्यांनी वर बाले किल्ल्यात जायचं,
ज्यांना शक्य असेल त्यांनी किल्य्याला प्रदक्षिणा घालायची.
जेवण करून खाली यायचं.
ज्यांना भिजायचं असेल त्यांनी सूख्या कपड्यांचा एक सेट आणावा. हे कपडे बरोबर बाळगण्याची गरज नाही . सावंतांच्या घरी ठेऊ शकतो. कपडे बदलण्याची योग्य व्यवस्था आहे.
खर्च अंदाजे १०० ते १५०. (रिक्षा आणि नाश्ता चहा )
YHAI अंबरनाथ युनिट चे एक संस्थापक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दर वर्षी हा ट्रेक केला जातो.
गेली काही वर्षे या ट्रेक ला १०० च्या वर उपस्थिती असते.
जर मि पा कराना यायचे असेल तर
९९६००९६४३५ वर संपर्क साधावा. संख्या समजली कि त्या प्रमाणे रिक्ष्या/नाश्ता सांगता येतात.
साधारण ५/६ वाजे पर्यंत नेरळ ला परत येतो.

मुक्त विहारि's picture

18 May 2014 - 7:39 pm | मुक्त विहारि

आपण लेणी बघायला गेलो होतो, तेंव्हा वाटेत बघीतला,

तो हाच किल्ला काय?

प्रचेतस's picture

18 May 2014 - 7:51 pm | प्रचेतस

कुठली लेणी ओ?

कंजूस's picture

18 May 2014 - 8:22 pm | कंजूस

मुवि ,आपण हीच लेणी पाहून येताना हाच किल्ला {दुरून}पाहिला होता.
वल्ली ,लेणी म्हणजे चोवीस खोल्या असलेला पन्नास फुटी चौरस विहार नदीकाठी आहे .पहिल्या शतकातला आहे .आत्मुबुवांचा ओम ॐ इथे चांगला घुमतो .
इथेच ट्रेकला न जाऊ शकणाऱ्यांसाठी कट्टा करायला आदर्श जागा (वर्षभर)आहे याची नोंद घ्यावी .अधिक माहितीसाठी "ओवर टू मुवि "कारण माझी धाव ताकापुरतीच आहे .स्ट्रॉंग अथवा वीक फिल्डींग मधले काही कळत नाही .

प्रचेतस's picture

18 May 2014 - 8:32 pm | प्रचेतस

कुठला विहार आहे पण हा? आंबिवलीची लेणी?
खुद्द कोथळीगडाच्या पोटात एक भलंमोठं लेणं आहे.

मुक्त विहारि's picture

18 May 2014 - 10:30 pm | मुक्त विहारि

ते नेमके जागेचे नांव विसरलो बघा,तसे लिहून ठेवले आहे, पण आमची कागदपत्रे डोंबोलीतच राहीली.

लेणी बघीतली, तीर्थ प्राशन केले आणि आनंदात घरी आलो.

पक्षी-तीर्था सकट भटकंती करायला एकदम योग्य जागा.इथे ट्रेकिंग हा शब्द जाणीवपुर्वक टाळला आहे.

(आम्हाला वक्ती आणि वल्लीं बरोबर भटकण्यांतच जास्त इंटरेस्ट.सुखरूप गेलो आणि सुखरूप आलो.)

प्रचेतस's picture

18 May 2014 - 10:55 pm | प्रचेतस

:)

मुक्त विहारि's picture

18 May 2014 - 11:37 pm | मुक्त विहारि

सॉरी हां,

हे कट्टे किंवा मिपाकरांबरोबर भटकंती म्हटले ना? की आम्हाला फक्त गप्पा आणि खाणे, इतकेच आठवते.

मागच्या वेळी त्या रामदासांबरोबर भटक भटक भटकलो... पण लक्षांत काय राहीले तर, पारश्या कडचे बकरी आयटेम आणि एके ठिकाणी प्यायलेलो रस्सम (जेमतेम १० मिनीटे आधी बायकोच्या हातची इडली आणि मग राहवलेच नाही म्हणून मिसळ पाव खाल्ला होता.खरे तर त्यावेळी मला अजून रस्सम हवा होता, पण बायकोच्या डोळ्यातील भांव तिच्या कडे न बघताच ओळखले, आणि मनावर काबू ठेवला.)

जावू द्या हो,

आम्ही हे असेच बघा, घराबाहेर पडलो की आमचा पार शंकर्‍या होतो.

@ कंजूस,

दादा, ह्या वल्लींना जरा त्या गावाचे नाव सांगून टाका.

मुक्त विहारि's picture

18 May 2014 - 11:39 pm | मुक्त विहारि

ह्या बकरी आयटेमचे

बेकरी आयटेम, असे कुणी करेल काय?

तसे त्या पारश्याकडे "बकरी आयटेम" पण होते. पण आम्ही बेकरी आयटेमच खाल्ले.

वेल्लाभट's picture

18 May 2014 - 10:30 pm | वेल्लाभट

a

यशोधरा's picture

19 May 2014 - 8:39 am | यशोधरा

मस्त फोटो :)

भ ट क्या खे ड वा ला's picture

19 May 2014 - 4:20 am | भ ट क्या खे ड वा ला

पेठ च्या बाजूचे धबधबे
पेठ च्या बाजूचे धबधबे

भ ट क्या खे ड वा ला's picture

19 May 2014 - 4:25 am | भ ट क्या खे ड वा ला

धुक्यात हरवलेला पेठ

तिनही फोटो कित्ती सुंदर आहेत.

पेठचे फोटो टाकल्याने छान वातावरण निर्मिती केलीत भटक्याखेडवाला .

वल्ली ,बरोबर .किल्याच्या सुळक्यात एक मोठे लेणं आहे .परंतु हे गड चढून जाणाऱ्यांसाठी आहे .दुसरे आंबिवली गावापुढे एक दीड किमीवर रस्त्याकडे आहे .

थोडे अवांतर .
वल्ली ,तुम्ही बदामि ऐहोळेला (अधिक हम्पि)जायलाच पाहिजे .मी दोनदा गेलो होतो . त्यातले काही फोटो इथे आहेत

http://s1366.photobucket.com/user/Wdapav/library/

प्रचेतस's picture

19 May 2014 - 8:51 am | प्रचेतस

धन्यवाद कंजूसराव.
बदामी, हंपी, ऐहोळेला सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये जायचा विचार आहे. मिपाकरांबरोबर भ्रमंती आखण्यास नक्कीच आवडेल.

मुक्त विहारि's picture

19 May 2014 - 9:28 am | मुक्त विहारि

१८ ऑक्टोबर पासून २८ ऑक्टोबर पर्यंत भारतात आहे....

त्याच वेळेत असेल तर आपण नक्की येणार...

त्यातून ह्या ट्रिपला वल्ली साहेब, असतील तर हमखास.

सप्टेँबर २५ ते५ ऑक्टो नवरात्र दसरा आणि १८ ऑक्टो ते २८ दिवाळीमुळे कर्नाटकाची रेल्वेची तिकीटे मिळणे अंमळ कठीणच .

मुक्त विहारि's picture

19 May 2014 - 3:02 pm | मुक्त विहारि

मेलो...ठार मेलो...

बायको लुटणार आणि आम्ही मिपाकरांच्या बरोबर सहलीला पण मुकणार..

(ऐन दिवाळीत घराबाहेर ते पण डोंबोलीत असतांना, अशक्य..कुछ तो तोड़गा निकालनाच पडेंगा.)

इरसाल's picture

19 May 2014 - 10:01 am | इरसाल

तुम्हाला कोणत्या संस्थेबरोबर जायचे नसेल तर कर्जत रेल्वे स्थानका वर उतरा, दगड्याकडचे वडे चेपा नंतर कर्जत-आंबिवली एस्टी पकडुन थेट आंबिवली. तिथुन पेठचा किल्ला चढायचा पेठ गावात पुर्वी छान कलाकंद व पनीर सदृश्य पदार्थ मिळायचा सध्याचे माहित नाही. किल्ला परत उतरल्या नंतर जोर शिल्लक असेल तर मग आंबिवली गावाच्य जरासेच पुढे असणार्‍या बौद्ध कालीन लेण्या बघुन यायचे.पुन्हा आंबिवली-कर्जत मग कर्जत वरुन इकडे-तिकडे जायला लोकल हैतच.

स्वच्छंदी_मनोज's picture

19 May 2014 - 9:44 pm | स्वच्छंदी_मनोज

पेठच्या किल्ल्यावर गेलात तर वरच्या पेठवाडी मध्ये (किल्ल्याच्या पायथ्याच्या) उत्कृष्ट खवा मिळतो.. जरूर आणावा.. ही पेठवाडी भेसळविरहीत आणी टिकाऊ खव्यासाठी प्रसिद्ध आहे आणी इथला खवा पुर्वी कल्याण/मुंबईला विकावयास यायचा...अगदी न चुकवण्यासारखी गोष्ट..

मुक्त विहारि's picture

20 May 2014 - 10:15 pm | मुक्त विहारि

मनोज भाऊ,

तुमचे-आमचे जमणार बघा.हा अस्सा इतकुसा डोंगर चढायचा आणि खवा आणायचा.आम्ही पण असेच कुठेतरी जातो आणि काय बघीतले, ह्या पेक्षा काय खाल्ले, तेच लक्षांत राहते.

बादवे, हा खवा, गुलाबजाम साठी की पेढ्यांसाठी?

वरील प्रश्र्नाचा आणि "वडगांव, म्हणजे पुणे जिल्ह्यातील की नगर?" ह्याचा काही संबंध नाही.

स्वच्छंदी_मनोज's picture

21 May 2014 - 1:55 pm | स्वच्छंदी_मनोज

मुवि..खवाच तो कसाही खावा..तिथला खवा नुस्ता खाल्ला तरी मस्तच असतो बरं ... :)

मुक्त विहारि's picture

28 May 2014 - 7:41 pm | मुक्त विहारि

मग खव्याच्या पोळ्याच करून खावे म्हणतो.

दिपक.कुवेत's picture

21 May 2014 - 11:55 am | दिपक.कुवेत

पावसाळा होईस्त हे असले धागे काढु तर नयेच शीवाय जाउन आल्यावर त्याचे रसभरीत वर्णन पण ईथे प्रकाशीत करु नये. ईथे उन्हाने जीव कासावीस होतोय!!! च्या मारी तुम्हि पावसात येथेच्छ भीजणार आणि आम्हि ईथे उन्हात.....ये नॉ चॉलबे! आणि ट्रेक केलेच तर त्या मुविंना अजीबात नेउ नका. ईतकं रसभरीत वर्णन करतात कि जीवाचं पाणी पाणी होतं.

भाते's picture

29 May 2014 - 12:05 pm | भाते

आता समजलं ना कसा त्रास होतो ते.
सोमवारी सकाळी ऑफिसमध्ये बसुन तुमच्यासारख्या बल्लव आणि सुगरिणींच्या सचित्र पाकृ वाचताना आम्हाला सुध्दा असाच त्रास होतो.
म्हणुनच तर मी सारखा पाकृचे धागे विकांताला टाकत जा म्हणुन बोंबलत असतो.

तुम बसो बोंबलत...

हमरा ट्रेक नक्की हो गयेला हय.

हम जायेंगा और खायेंगा-पियेंगा.

तुम वो सुकट घाल के वांगी की भाजी बनावता हय, तो हमको भी ऐसाच होता हय.

तुम्हारे इस जलजल पर, मोगँबो खूष हुवा.

वृतांत येवूद्या म्हणजे झाले !!

सुहास झेले's picture

29 May 2014 - 12:42 am | सुहास झेले

हरिश्चंद्र, राजमाची, लोहगड, माहुली, सुधागड विकांतात नकोसे असतात... प्रचंड प्रमाणात गर्दी असते. काही वेगळे पर्याय बघा. वसई/नाशिक रेंजसुद्धा मस्त आहे.

काही पर्याय सुचवतो..

१. सरसगड (पाली)

.

२. कामण दुर्ग (वसई) - प्रचंड पायपीट, हमखास चकवा लागणारी... टेहळणी किल्ला असल्याने फक्त पाण्याच्या टाक्याच आहेत गडावर, पण फुलांची रास पसरलेले तीन डोंगर चढून मग उतरून पोचावे लागते ;-)

.
====
.
====
.

३. सागरगड (पेण - अलिबाग रस्त्यावर अलिबागपासून ७ किमी. अलीकडे खंडाळे गावातून गडावर जायला सोपी वाट आहे... फारसा इतिहास ज्ञात नसला तरी पुरंदरच्या तहात दिलेल्या २३ किल्ल्यांच्या यादीत सागरगड होता. गडाच्या माथ्यावरून समुद्रातील हालचाली स्पष्ट दिसत असल्याने गडाला नक्कीच बरेच महत्व)

.

४. अवचितगड (रोहा) - साक्षात रायगड परिसरातील सुरक्षाभिंत म्हणून ओळखला जाणारा किल्ला. किल्ल्यावर जाण्यासाठी पिंगळसई, मेढा किंवा पेंडसे गावातून मार्ग आहेत. किल्ल्यावर जाण्यासाठी रोह्याला उतरून पिंगळसई किंवा मेढासाठी एसटी किंवा रिक्षा मिळते. चढाई एकदम सोप्पी.

५. रतनगड (रतनवाडी) - इथेही गर्दी असतेच विकांतात, पण प्रचंड घनदाट जंगल आणि भरपावसात कितीही वेळा करायला आवडेल असा ट्रेक (रोप आवश्यक)

.

६. किल्ले असावा… - बोईसर पूर्वेला, टाटा आणि ऑसवाल बिल्डर्सचे हाउसिंग प्रोजेक्ट ओलांडून पुढे काही किलोमीटरवर वरांगडे हे गाव आहे. एसटीने उतरल्यावर, उजव्या बाजूला एक कच्चा रस्ता आहे. जिथे डाव्या बाजूला विराज इंडस्ट्रीचं एक प्रोजेक्टसुद्धा आहे. तिथून पुढे किल्ल्याला जाणारी वाट आहे.

.

७. किल्ले कोहोज - पालघरपासून एसटीने ३० मिनिटांचा प्रवास. हया गडावर जाण्याचे तीन मार्ग आहे, एक नाणे गावातुन दुसरा अंबीत गावातुन तर तिसरा वाघोटे फाट्याजवळून

.

८. किल्ले तांदुळवाडी - सफाळेहून तांदूळवाडी बेस व्हिलेज

.

९. अशेरीगड - पालघरहून महामार्गाने १० किमी अंतरावर खोडकोना गाव (बेस व्हिलेज)

.

१०. किल्ले सिंदोळा - कल्याणहून अहमदनगरला जाणारी बस पकडून खुबी फाट्याला उतरावे. तिथे मारुती मंदिराच्या बाजूने ट्रेक रूट सुरु. इथून हरिश्चंद्रगडावरपण जाता येते..

.

तूर्तास इतकेच ;-)

वसई परिसरात श्रीदत्त राऊत यांच्या सोबत काही ट्रेक्स ठरवणार आहोत, ज्यामुळे आपल्याला अनेक लहान-मोठे अपरिचित किल्ले दोन अडीच दिवसात बघता येतील. सांगेनच ठरल्यावर :)

सूड's picture

29 May 2014 - 1:05 am | सूड

जे ब्बात !!

मुक्त विहारि's picture

29 May 2014 - 9:44 am | मुक्त विहारि

धन्यवाद..

शिद's picture

30 May 2014 - 5:59 pm | शिद

बोईसर-पालघर हा माझ्या गावचा परीसर पण तुम्ही वरील दिलेल्या बर्‍यांच ठीकाणी कधी जाणं झालं नाही.

धन्यवाद, तुमच्यामुळे नविन ठीकाणांची माहीती कळली.

सुहास झेले's picture

30 May 2014 - 11:18 pm | सुहास झेले

वसई ते बोईसर परिसरात जवळजवळ १४०-१४५ लहान मोठे किल्ले आहेत, ज्यातल्या ४८-४९ची नोंद पुरातत्व खात्याकडे आहे आणि त्यातील फक्त दोन किल्ले ते सांभाळतात. :-|

तुमचा ईमेल आयडी व्यनि करून ठेवा. अडीच दिवसांची मोहीम ठरतेय, सांगेन ठरल्यावर...

कंजूस's picture

29 May 2014 - 8:20 am | कंजूस

सुहास झेले ,दहा ट्रेकची माहिती आवडली .

माझा प्लान असा आहे :-
१)दरवर्षी एकदा /दोनदा नियमित पावसाळयात /हिवाळ्यात भिमाशंकर करणे .
२)मुबईकडचे कर्जत-खांडस मार्गे वर येतील .पुण्याकडचे राजगुरूनगर कडून गुप्त भिमाशंकर मार्गे येतील .
३)पुण्याकडचे फारसे चालू न शकणारे बसने अकरा वाजता येतील आणि वरती सोपा गुप्त भिमाशंकर अथवा हनुमानतळे करतील .परत बसने जातील .
बसप्रवासामुळे सर्व साधनसामग्री आणणे सोपे जाते .कोणीही येऊ शकतो .न आवडल्यास परत त्याच दिवशी तीन आणि पाच वाजताची बस आहे .
४)एक दिवस मुकाम डबेवाले धर्मशाळा ,हॉल ,खोल्या आणि टॉइलट आहे .माझा अनुभव चांगला आहे .
५)पुण्याकडून बस तिकिट ,राहाणे ,नाश्ता २दा,चहा ,जेवण १दा धरून रुपये साडेचारशे पर्यँत खर्च होतो .
६)कर्जतकडून रुपये तिनशे .
कसे वाटते अभिप्राय द्या

मुक्त विहारि's picture

29 May 2014 - 9:40 am | मुक्त विहारि

भीमाशंकर एका दिवसांत करता येईल का?

सुहास झेले's picture

29 May 2014 - 9:46 am | सुहास झेले

भीमाशंकर जबरीच आहे, पण गर्दी असली की तिथे जायचा कंटाळा येतो. पण एकदा तरी शिडीच्या वाटेने करायचा आहे... तीच एक वाट राहिली आहे. तिथून गर्दी कमी असते, पण रोपची गरज लागते काही ठिकाणी.... :)

सुधीर जी's picture

29 May 2014 - 10:58 am | सुधीर जी

<<पण रोपची गरज लागते काही ठिका>>

नाहि
आता भिमाशंकर शिडि घाटाने जाताना रोप चि गरज लागत नाहि. अवगड जागि लोखंडि शिडि लावलेलि आहे.
मि गेलि ५ वष भिमाशंकर करतो आहे
जुले महिना एकदम बेस्ट आहे भिमाशंकर ट्रकिंग साठि

कंजूस's picture

29 May 2014 - 11:17 am | कंजूस

मुवि एक दिवसात होते की भिमाशंकर पण कर्जत टरेकिंग नाही .पुण्याहून बसने गेल्यास आणि पुण्याला परत असे केल्यास अकरा ते पाच इतका वेळ वरती हाताशी मिळतो .कार केल्यास आणखी दोन तास मिळतात .

सुहास ,मी कधी शनी रवी जात नाही त्यामुळे त्रास होत नाही .आठ दहावेळा भि० ला गेलो आहे पण एकदाही शिडीच्या वाटेने मला गाववाल्यांनी जाऊ दिले नाही .तसा एक तासाचाच फरक पडतो आणि तिकडे पक्षी दिसत नाहीत .
यावर्षी १२जुलै ते २५ ऑगस्ट गर्दी असेल .
मी बहुतेक बुध ४ जूनला जाणार आह .

सुहास झेले's picture

29 May 2014 - 4:25 pm | सुहास झेले

ओह्ह्ह.. ओके !!

जून २२ तारखेपर्यंत मला काही शक्य नाही, पण मग सुरु करेन भटकंती :)

स्पार्टाकस's picture

31 May 2014 - 12:06 pm | स्पार्टाकस

बाराही महीने करण्याजोगा एक भन्नाट ट्रेक म्हणजे त्र्यंबकेश्वर जवळचा हरिहर.

याला असलेली उभीच्या उभी दगडी शिडी खाचेत हात घालून चढून जाणं, विशेषतः पावसाळ्यात हा एक थरारक अनुभव असतो. मुंबई / नाशीकहून एक दिवसात होणारा ट्रेक आहे हा.

H01

प्रसाद गोडबोले's picture

9 Jun 2014 - 12:06 pm | प्रसाद गोडबोले

ह्या वीकेन्डला (८ जुन २०१४) मस्त टेल्को लेक पी-एम-आआयाणि पी-सी-एम-सी ग्रूपसोबतभ्रमंती आणि पक्षी निरिक्षण झाले ... संध्याकाळी मिपाकरांसोबत मस्त खादाडी ( काय पराठे होते राव ! लय भारी !!)

आता पुढच्या वीकेन्डचा १४-१५ जुन चा काय प्लॅन ?

पाऊसपडायच्या आधी एकदा हरिश्चंद्रगड करुन येवुयात का ? की वेरुळला जाऊन यायचे ?

>>पाऊसपडायच्या आधी एकदा हरिश्चंद्रगड करुन येवुयात का ?

हरिश्चंद्रगड पाऊस उलटून गेल्यानंतर मस्त ऑप्शन वाटला मला. पण बघा कसं काय ते!!

प्रसाद गोडबोले's picture

12 Jun 2014 - 12:00 pm | प्रसाद गोडबोले

मग ह्या वीकेन्डचा प्लॅन आहे ? कुठे जायचय ट्रेक ला ?

प्रसाद गोडबोले's picture

13 Jun 2014 - 12:06 pm | प्रसाद गोडबोले

?

प्रचेतस's picture

13 Jun 2014 - 12:14 pm | प्रचेतस

उद्या हापिस आहे बे.
रविवारी जाता येईल कुठेशीक.

प्रसाद गोडबोले's picture

13 Jun 2014 - 12:27 pm | प्रसाद गोडबोले

मग एका दिवसात भाजे कार्ला केव्ह्ज करु ... जरा पाऊस वगैरे पडला तर मग राजमाची किंव्वा लोहगड करता येइल का?

आणि बाकी कोणीच इन्टरेस्टेड नाहीये का ?

भाजे लेणीला मागच्याच आठवड्यात जाऊन आलो.
राजमाचीला एक मुक्काम लागतो. लोहगड कधीही करता येईल पण पावसात केल्यास अधिक सुंदर.

भाजेला जायचे तर जाऊ परत. ६.४५ च्या लोकलने निघायचे. १२.३० पर्यंत घरी परत.

मुक्त विहारि's picture

13 Jun 2014 - 1:28 pm | मुक्त विहारि

मग ते फोटो आणि व्रुत्तांत कधी?

हुकुमीएक्का's picture

11 Jun 2014 - 10:27 pm | हुकुमीएक्का

ट्रेकसाठी एखादे असे ठिकाण ठरवा जिथे सर्वाना सोईस्कर होईल. मावळात 'तिकोणा',; लोणावळ्यात 'राजमाची पॉईंट', लोहगड, कोरीगड, तुंग, असे पर्याय आहेत. 'सूड' यांनी सुचवल्याप्रमाणे हरिश्चंद्रगड देखील मस्त पर्याय आहे पण पावसाळ्यानंतरच.
'मुक्त विहारि' यांच्या म्हणण्याशी सहमत. एखादा 'फॉर्म' तयार केला पाहिजे ज्यावर ट्रेक बद्दल सर्व माहिती असेल. ट्रेकसाठी लागणारे साहित्य, आणि ट्रेक कितीपत अवघड आहे याची माहीती आधीच समजली तर अजुन छान. जेणेकरून ट्रेकला गेल्यावर काही अडचण भासणार नाही.

चौकटराजा's picture

15 Jun 2014 - 7:31 am | चौकटराजा

ट्रेकसाठी " एखादा" फॉर्म ठेवा .
असहमत.
त्यापेक्षा स्वता:चा फॉर्म चांगला ठेवा .
( आम्ही फॉर्मात असताना ट्रेक केले नाहीत. आता बुवा म्हणतात आम्ही म्हातारे झालो ) .

हुकुमीएक्का's picture

19 Jun 2014 - 1:58 am | हुकुमीएक्का

*lol* नो कॉमेंट्स.

खटपट्या's picture

12 Jun 2014 - 12:24 am | खटपट्या

४ नंबर चा विडिओ जबरा आहे राव

प्रसाद गोडबोले's picture

16 Jun 2014 - 3:12 pm | प्रसाद गोडबोले

हा अख्खा विकेन्ड निव्वळ झोपा काढण्यात गेला ... पुढच्या वेकेन्डचा काहीतरी प्लॅन करु राव ...

जवळच्या जवळ तिकोना / लोहगड / विसापुर / राजमाची / सिंहगड / पुरंधर .... काहीतरी ट्रेक करुया राव ...

नाहीतर मी आपला अजिंक्यतारा सज्जनगडचा ट्रेक करुन येईन म्हणतो *biggrin*

हुकुमीएक्का's picture

19 Jun 2014 - 1:57 am | हुकुमीएक्का

नवीन कॅमेरा घेतल्यापासून सज्जनगड ला जायचा प्लॅन चालू आहे. पण अजून वेळच जुळून येत नाहीये. कोणी ठरवला सज्जनगड चा ट्रेक तर नक्की सांगा. जरूर येईन

कोंडेश्वर पाहा ।असे सुचवतो .
कामशेत ते जांभिवली बस आहे .जांभिवली गावापासून एक किमीवर चालत कोंडेश्वर आहे .मागचा ओढा खतरनाक आहे .[हा ओलांडला तर खाली कोकणात ढाक -खांडपे-कर्जत वाट आहे] .

विअर्ड विक्स's picture

19 Jun 2014 - 11:33 am | विअर्ड विक्स

१५ तारखेला तोरणा आणि बेडसे लेणीला जाऊन आलो. तोरणाला पोट भरून जांभळे , करवंदे नि रायवळ आंबे खाल्ले. असे उदर भरणाचेट्रेक सुचवा जरा …;)

विअर्ड विक्स's picture

19 Jun 2014 - 11:34 am | विअर्ड विक्स

माफ करा तिकोना ला गेलेलो… चुकून तोरणा टंकले गेले…. गडाखाली पोटभर फळे फुकटात उपलब्ध आहेत…

सुहास झेले's picture

9 Mar 2015 - 10:03 am | सुहास झेले

येणार का?

:) :)

.

दोन दिवसात सगळे किल्ले व्यवस्थित बघून, फिरुन होतात?

सुहास झेले's picture

9 Mar 2015 - 3:35 pm | सुहास झेले

ह्या भागातील बहुतेक किल्ले टेहळणीसाठी वापरले जायचे... त्यामुळे बहुतेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या आणि एखाद दुसरे बांधकाम असावे असा अंदाज. मीही ह्याभागात जास्त फिरलेलो नाही. श्रीदत्त राऊत सोबत आहेत म्हणून इथे माहिती दिली :)