सोड्याची खिचडी

पद्मश्री चित्रे's picture
पद्मश्री चित्रे in पाककृती
29 Jul 2008 - 3:22 pm

श्रावण येण्यापुर्वी एक खास सी के पी पाककृती.
साहित्य-
४ वाट्या तांदुळ, १ वाटी सोडे, २ चमचे हळद, ४ चमचे तिखट, मीठ, तेल, हींग, लिम्बु/ चिन्चेचा कोळ, २ बारीक चिरलेले कांदे,गरम मसाला, आले-लसुन पेस्ट ,लवंग्,दालचीनी, गरम पाणी, कोथिंबीर्,खवलेले खोबरे

कृती-
करण्यापुर्वी १/२ तास तान्दुळ धुवुन ठेवावेत व सोडे भिजत घालावेत.

सोड्यांचे जरा छोटे तुकडे करुन घ्यावेत. त्यांना हळद, तिखट, मीठ, आले-लसुण पेस्ट, गरम मसाला ,मीठ लावुन लिंबु पिळुन वा चिन्चेचा कोळ घालुन १० मिनीटे ठेवावे.
एका तव्यात तेल तापवुन त्यात हिन्ग व थोडा कांदा परतुन घ्यावा. त्यात मसाला लावुन ठेवलेले सोडे नीट परतुन घ्यावेत.
दुसर्‍या भांड्यात तेल तापवुन त्यात लवंग्,दालचीनी,हळद,तिखट,गरम मसाला ,मीठ टाकुन त्यात उरलेला कांदा गुलाबी रंगावर परतावा. त्यावर तांदुळ टाकुन ते ही परतुन घ्यावेत. २/३ मिनीटांनी त्यावर तव्यातील सोडे टाकावेत व मिश्रण ही नीट परतावे. मग त्यात ६ वाट्या पाणी घालुन भात नीट शिजु द्यावा.
भात मोकळा शिजुन वाफ आली की त्यावर कोथिंबीर्,खवलेले खोबरे टाकावे.
गरमागरम सोड्याची खिचडी तय्यार.

प्रतिक्रिया

मनस्वी's picture

29 Jul 2008 - 3:39 pm | मनस्वी

मस्त पाककृती फुलवा.. धन्यवाद!

श्रावण येण्यापुर्वी एक खास सी के पी पाककृती.

अजूनही येउदेत ना!

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

श्रीयुत संतोष जोशी's picture

29 Jul 2008 - 6:34 pm | श्रीयुत संतोष जोशी

नमस्कार,
छानंच आहे.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

संदीप चित्रे's picture

29 Jul 2008 - 8:45 pm | संदीप चित्रे

थंडीच्या दिवसांत सोड्याच्या खिचडीने सुरू झालेली रविवारची सकाळ .... अहाहाहा !!!
--------------------------
www.atakmatak.blogspot.com

यशोधरा's picture

29 Jul 2008 - 10:21 pm | यशोधरा

फुलवा, अख्खे सोडे घातले तर नाही का चालणार?

पिवळा डांबिस's picture

30 Jul 2008 - 4:09 am | पिवळा डांबिस

अख्खे सोडे घातले तर नाही का चालणार?

तुम्ही घाला, आम्ही खिचडी खायला जरूर येऊ!!
यशोधराबाई, मार्केटात जाऊन सोड्याचा भाव विचारलाय का हल्ली कधी?
अहो महाडचे पांढरे आणि सरळ (गोल नव्हेत!!) सोडे १००० रुपयांच्या खाली मिळत नाहीत....
लॉटरी लागलेली दिसतेय एका मुलीला!!!:))

पद्मश्री चित्रे's picture

30 Jul 2008 - 12:14 pm | पद्मश्री चित्रे

अख्खे सोडे घातले तर नाही का चालणार?

अग अक्खे सोडे लांब अस्तात ते मिळुन येत नाहीत भातात..आणि महाग पण कित्ती! शिवाय, १२ महिने नाही मिळत ते. डीसेंबर्-जानेवारीत येतात ते अस्सल्..मग येतात ते कोलम्बी यंत्रात वाळवुन ,सरळ केलेले.. त्याला ना चव ना वास..

चित्रा's picture

30 Jul 2008 - 5:32 am | चित्रा

मस्त!
अमेरिकेत कुठे मिळत असतील सोडे? कोणाला काही कल्पना आहे का?

प्रियाली's picture

30 Jul 2008 - 6:07 am | प्रियाली

चित्राने आधीच विचारला आहे. ;)

चीन्यांच्या दुकानात मिळतील का? (नाही अमेरिकेतलं सगळं चिन्यांकडूनच येतं, मिळालेच सोडे तर चीनी दुकानातच मिळतील अशी अटकळ आहे) ;)

धनंजय's picture

30 Jul 2008 - 9:02 am | धनंजय

सुकी सुंगटे/कोळंबी ना? ही चिनी दुकानांत बघितली आहेत.

त्यातही काही विशेष असेल तर कोणी फोटो चिकटवता का? म्हणजे चिनी/कोरियन/थाई दुकानांची चक्कर मारून शोधता येईल.

पिवळा डांबिस's picture

30 Jul 2008 - 4:43 pm | पिवळा डांबिस

सुकी सुंगटे/कोळंबी ना? ही चिनी दुकानांत बघितली आहेत.
सुंगटा खंयसरपण मिळतंत, अगदी रँन्च ९९ मध्ये सुद्धा!!
पण चांगले सोडे हंयसर अमेरिकेत मिळणंत नाय!!!

यशोधरा's picture

30 Jul 2008 - 7:33 am | यशोधरा

>>>तुम्ही घाला, आम्ही खिचडी खायला जरूर येऊ!!

कधी येताय, बोला काका! :) लॉटरी नाही लागली तरी पाहुणचारात काही कमी नाही ठेवणार!! :)

मंदार वाईकर's picture

30 Jul 2008 - 8:03 am | मंदार वाईकर

सोड्याच्या खिचडी बरोबर बोंबलाच कालवण्........वा!

विसोबा खेचर's picture

30 Jul 2008 - 8:56 am | विसोबा खेचर

वा वा!

ही खिचडी म्हण्जे आमचा वीक पाईंट! :)

या सुंदर पाकृबदल धन्यवाद फुलवा...!

(सोडेप्रेमी) तात्या.

नंदन's picture

30 Jul 2008 - 11:03 am | नंदन

ही खिचडी म्हण्जे आमचा वीक पाईंट! :)
या सुंदर पाकृबदल धन्यवाद फुलवा...!

- असेच म्हणतो. वा, काय आठवण करून दिलीत!

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

II राजे II's picture

30 Jul 2008 - 11:21 am | II राजे II (not verified)

सोड्याची खिचडी

:?
आम्हाला फक्त खायाचा सोडा व पिण्याचा सोडाच माहीत आहे,,,, हा कुठला सोडा आहे ???
जरा फोटू टाकता का ह्याचा ???

नाय तर आम्ही करत फणसबी तयार करण्याची तयारी करु :)

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

पद्मश्री चित्रे's picture

30 Jul 2008 - 12:01 pm | पद्मश्री चित्रे

येत नाहीए फोटो चढवता....