आमच्या कंपनी कैँटिनमध्ये स्वीटडिश म्हणून नेहमीच्या खीर ,श्रीखंडाशिवाय ब्रेड पुडिंग (बिन अंड्याचे ) ,केळा चपाती ,अंजिर कस्टड ही केले जायचे . पुडिंग जमले नाही .बाकीचे दोन करून पाहिले होते .थंडीत केळा चपाती आणि उन्हाळ्यात जेवणानंतर अंजिर कस्टड फार छान लागते .त्याची सोपी कृती देत आहे .
अंजिर कस्टड:
साहित्य :
सुकी अंजिरे आणि जरदाळू ,
दूध ,साखर आणि कस्टड पाउडर .
कृती:
१)जरदाळूचा बदाम सुरीने चिर मारून काढून घ्या .अंजिरे माळेतून काढून गवताची काडी कचरा काढून टाका .दोन्ही थोड्या साखर घातलेल्या पाण्यात दोन तास भिजवा .नंतर याच पाण्यात पंधरा मिनीटे शिजवा .
२)कपभर पाण्यात चमचाभर कस्टड पावडर ढवळून मग शिजवा .अंजिरांचे उरलेले पाणी यात टाका .साखर चवीप्रमाणे टाकून नंतर थोडे दुध घातले की कस्टड तयार झाले .
३)पसरट डिश घेऊन प्रत्येकात दोन अंजिरे आणि एक जर्दाळू मांडून त्यावर अर्धे बुडेल एवढे कस्टड ओता .अर्धा तासाने सर्व डिश फ्रिजमध्ये (थोडे गार) करायला ठेवा .चारपाच दिवस टिकायला हरकत नाही .
४)बाजारातल्या जेली पाकिटातली जेली करूनही त्यावर कस्टड(अधिक थोडे वनिला आईसक्रीम) ही डिश आहेच पण जेली शाकाहारी नाही .
केळा चपाती :
साहित्य :
मैदा ,पिकलेली केळी ,दही ,सोडा,मध अथवा गुळाचा पाक .
कृती :
१)मैदा ,किंचिंत दही आणि केळ्यांचे तुकडे कुसकरून भिजवून आंबवण्यासाठी चार तास ठेवा .
२)पीठ पातळ करून सोडा घालून चार इंचाचे आणि थोडे जाडसर डोसे तव्यावर घाला .झाकण ठेवून शिजवा .खूप जाळी पडली तरच ही केळा चपाती चांगली लागते .नुसता पिठाचा रद्दा राहिला तर मजा येत नाही . सगळे कसब पीठ आंबण्यात आहे .फक्त एकाच बाजूने शिजवायची आणि वरची बाजू वरच असे डिशमध्ये काढायची .यावर मधाची धार अथवा गुळाच्या पाकाच्या उभ्या आडव्या रेषा काढून गोड करायचे .
या पदार्थाचे जाळी पाडण्याचे आम्हाला तितकेसे जमले नाही .दावणगेरेकर काहितरी शक्कल शोधून काढतील .
प्रतिक्रिया
28 Apr 2014 - 6:20 pm | शुचि
फोटोत कंजूषी कशाला हो कंजूस? ;)
28 Apr 2014 - 6:35 pm | सौंदाळा
केळा चपातीला माझा पास.
अंजीर कस्टर्ड मस्त लागत असेल.
28 Apr 2014 - 7:45 pm | प्रचेतस
फोटो हवेतच.
केळा चपाती पहिल्यांदाच ऐकली.
29 Apr 2014 - 2:54 pm | सूड
केळी जरा जास्त पिकल्यानंतर घरी एकदा त्याचे घारगे केल्याचं आठवतंय. चपाती नव्यानेच कळतेय. केळी न कुस्करता खाणे प्रेफर करत असल्याने चपातीला पास.
29 Apr 2014 - 5:32 pm | कंजूस
केळी जास्त पिकल्यावर त्याचा रवा ,मैदा ,दही ,दुध ,साखर आणि सोडा घालून आमच्याकडे नेहमी केक होतो .
पिकलेली केळयाचे काप मैदा अधिक दही भिजवून त्या पिठातली गोड भजी चांगली होतात .
29 Apr 2014 - 8:51 am | पोटे
याला मी बनपुरी असे नाव ऐकले आहे.
29 Apr 2014 - 3:00 pm | अत्रुप्त आत्मा
@बनपुरी >>> येस..आणि गोकर्णला जाताना बेळगावच्या पोढे बेल्लारी..का पुर नावाचं गाव आहे..तिथे याचाच पाव खाल्ला होता बन्चपाव म्हणत होते तिथं त्याला.
29 Apr 2014 - 5:39 pm | कंजूस
कारवार ,गोकर्ण ,कुंदापुरा उडुपि कडचे काहीजण या केळाचपातीची अगदी आतुरतेने वाट पाहायचे .
29 Apr 2014 - 3:40 pm | पोटे
पण बनपुरी डीप फ्राय करतात.हा डॉसा आहे. इतका फरक आहे.
http://www.maayboli.com/node/48065
29 Apr 2014 - 8:11 pm | सानिकास्वप्निल
मँग्लोअर बन्स देखील म्हणतात फक्त ते तळलेले असतात.
29 Apr 2014 - 3:17 pm | मुक्त विहारि
पण जरा फोटूचे तेवढे मनावर घ्याच.
29 Apr 2014 - 9:40 pm | शुचि
अंजीर कस्टर्ड मस्त वाटतय.