खुराकी खारीक

कंजूस's picture
कंजूस in पाककृती
27 Apr 2014 - 10:44 pm

आमच्या लहानपणी टिव्ही नव्हते त्यावेळी मुंबईतल्या राणीचा बाग ,हँगिग गार्डन ,फाईव गार्डन,गिरगाव दादर जुहू चौपाटीवर हिंडणे ,गेटवेला जाणे असा लोकांचा सुटीतला टाईमपास असायचा .आइसक्रीम ,कुल्फी ,पाणीपुरी आणि भेळ हे नेहमीचं खाणे .फोर्टात कामाच्या दिवशी फक्त नोकरीवाले जायचे .पण एक दोन वेळा बाबांबरोबर जाण्याचा योग आला आणि गजबजाट पाहाण्यास मिळाला होता .त्यावेळी फोर्टात एक विशेष वस्तु खायला मिळाली होती .पौष्टिक खुराकी खारीक .ती फार आवडली होती . ती दुपारच्या वेळी विकायला एकदोनजण बसायचे .गुजराती व्यापारी ते खायचे .आम्ही ती करूनही पाहिली होती .

करायला सोपी आहे .
साहित्य :
१)साखर खारीक (गोड असते .दुसरी एक लाकूड खारीक मिळते ती नको )
२)सारणासाठी
किसलेले सुके खोबरे आणि थोडी खसखस भाजून घ्यायचे .थोडे बेदाणे ,मनुका ,खडीसाखरेचे तुकडे ,अक्रोड आणि काजु चुरा एकत्र करायचे .

कृती :
१)खारका एक दिवस कमीतकमी पाण्यात भिजवून घ्यायच्या. सुरीने चिर मारून बिया काढायच्या ,कडेच्या देठाच्या कडक चकत्या उडवायच्या .
२)आत सारण घट्ट भरायचे .
(पूर्वी चांदीवर्ख लावत असत ).
चॉकलेटला चांगला पर्याय आहे .

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

27 Apr 2014 - 10:52 pm | अत्रुप्त आत्मा

मी पयला! =))

आता फोटू आना.. :-/ मंजी परत येइन. =))

शुचि's picture

27 Apr 2014 - 11:38 pm | शुचि

wow!!! Very royal!!!

सेम ह्याच प्रकारे खजुराच्या चंद्रकला पण करतात. पण तो प्रकार भलताच गोड असतो.

कंजूसकाका, एक प्रश्न आहे की हे देशी चॉकलेट किती दिवस टिकतात?

दिपक.कुवेत's picture

28 Apr 2014 - 12:26 pm | दिपक.कुवेत

अरे टिकण्यासाठि उरायला तर हवेत ना??? मी तर येता जाता गट्टम करीन....

दिपक.कुवेत's picture

28 Apr 2014 - 12:30 pm | दिपक.कुवेत

नुसती खारीक खाण्यापेक्षा हा प्रकार मस्त आहे. पण त्या पाण्यात भीजवुन ठेवल्या तर चीकट नाहि का होणार? चला ह्या निमित्ताने मी असेच स्टफ्ड खजुर रोल्स केलेले आठवले.

देसी चॉकलेट टिकत नाहित .रोज एक वा दोन खारका नवीन भिजवायच्या आणि दुसरे दिवशी खायच्या .याचे सारण मात्र आपण करून ठेवू शकतो .या सारणातच खारकेचे तुकडे टाकून ठेवता येतील .ते टिकेल .परंतु जसे ते गुजराती लोक करतात ते दिले आहे .

पौष्टिक आहार हा माफक परंतु नियमित घ्यायचा असतो .

राही's picture

28 Apr 2014 - 2:28 pm | राही

खारकेच्या आतमध्ये पानमसाला(मघई सुकवून,गुलकंद, गुंजेच्या पानांचे चूर्ण, भाजून कुटलेली बडीशोप, सुके खोबरे, थंडक वगैरे) भरून वर्ख लावून विकायला असतात. मुखशुद्धीसाठी फारच सुंदर.

वा!!! राजस प्रकार वाटतो आहे.

मुक्त विहारि's picture

28 Apr 2014 - 2:36 pm | मुक्त विहारि

पौष्टीक पा.क्रु.

पण जरा एक-दोन फोटो पण हवे होते.

राही बरोबर .आम्ही गुंजेचा पाला आणि बडीशोप टाकून पाहिले पण त्यांचा चोथा इतरांशी मिळत नाही .वेगळा राहिला .

दात येण्याच्या वयातल्या मुलांना द्यायलाही चांगला आहे हा खाऊ.

कवितानागेश's picture

28 Apr 2014 - 7:06 pm | कवितानागेश

अश्या पाकक्रूतींच्या प्रिंट्स तुझ्या क्लिनिकमध्ये लावून ठेव गं. :)

खरच अशा पा.कृ जमवुन क्लिनिकला प्रिंट लावुन ठेवली पाहिजे.

कंजूस's picture

28 Apr 2014 - 6:32 pm | कंजूस

होय .आणि याने (खारीक अधिक खोबरे)मोठ्यांचे पाय दुखायचे थांबतात असा कच्छी लोकांचा विश्वास आहे .कोणत्याही भरड आणि तुरट गोष्टी उपयुक्त आणि चिकन्या (मैद्यासारख्या ) ,गोड शरीरास अपायकारक समजतात .