मुंज-संस्कार की वैचारिक दिवाळखोरी?

उडन खटोला's picture
उडन खटोला in काथ्याकूट
27 Apr 2014 - 11:33 am
गाभा: 

मुलाच्या मुंजीचे निमंत्रण करायला एक जोडपे आले होते. ते पिकनिक ला निघालेयत कि काय असे वाटले. मुलाचा बाप ३/४ विजार - टी शर्ट तर आई फोर्मल शर्ट -ट्राउझर
मुंजीचे निमंत्रण मिळाले
निघता निघता बापाने अजून एक निमंत्रण दिले. मुंजीच्या दिवशीच संध्याकाळी कुठल्याश्या पब ला अमुक रंगाचे कपडे घालून ये, इ
थोडक्यात मुलाच्या आयुष्यातील पहिली संध्या, आचमने तो करणार आणि आम्ही इकडे पब मध्ये आचमने करणार!!
मान्य आहे. खरोखर देशी-विदेशी मित्र येणार आहेत … पण म्हणून हे असे??

..परवाच एका NRI जोडप्याने पुण्यात येऊन मुलांच्या मुंजीचा असाच घाट घातला होता .......मुंज ईतर सोहळे उत्तम पारंपारिक वेशात ......अन भिक्षावळीच्या वेळी मुंज मुलांच्या आईची आणि ईतर महिला नातेवाईकांची "खिट्टी" सटकली ब्यांड वाल्यांना खास फर्माईश ......मला जाऊ द्या ना घरी वाजले कि बारा ......मुंगळा .......या वर कहर.......चिकनी चमेली .......सगळा ब्रह्मवर्ग नऊवारी साड्या ....पारंपारिक वेशात रस्त्यावर धिंगाणा घालत होता .......पैसे ओवाळून टाकत होता .....दुसऱ्या दिवशी चक्क कॉकटेल पार्टी .......इथे त्या कुटुंबाची उपजात सांगायचा मोह टाळत आहे याची नम्र नोंद असावी

आई-बाबा, वडलांचे भाऊ, मित्र त्यांच्या बायाकांसाहित ३१ डिसे ला संध्याकाळी घरी येतात, सारेच यथेच्छ दारू पिउन तंगड्या तोडत पहाटे ३ -४ पर्यंत दंगा चालू असतो …. मग १० - ११ पर्यंत उठून पुन्हा बिअर प्यायला चालू करतात आणि बाहेरून पुन्हा खाणे मागवून १ च्या रात्रीपर्यंत हे चालू असते --- हे जो मुलगा बघत असेल त्याला कशाचे काय वाटणार आहे?
वरील दोनही अनुभव हे वेगवेगळ्या , मराठी ब्राह्मण घरातील आहेत

आई-बापावरच असले संस्कार तर काय पुढे काय होणार? असली लोकं "मुंज" नावाचा विधी करायच्या भानगडीत पडतातच कशाला ? साधे get - together आहे म्हणायचे , त्यात येणाऱ्या नी अमुक रंगाचे कशाला कपडे न घालता आले तरी चालेल म्हणून सांगायचे ! ज्यांच्या घरी देशी - विदेशी मद्याने भरलेले बार आहेत, ग्रिल करण्यासाठी अगदी लाखभर खर्चून संयंत्र आणले आहे. त्यावर चिकन तंदुरी किती छान होते, कुठूनसा कुठला मासा आम्ही कोल्ड स्टोरेज करून कसा आणला आणि भरून खाल्ला ह्याची वर्णने ऐकायला मिळतात तिथे "गायत्री मंत्र" हे शब्द तरी माहित असतील का??

संपादित /आधारित -स्रोत- अन्यत्र

प्रतिक्रिया

मंदार दिलीप जोशी's picture

2 May 2014 - 10:15 am | मंदार दिलीप जोशी

आदि, अगदी बरोबर. इतका उथळपणा ब्राह्मण करणारच नाहीत. अनुमोदन.
पुरावे ते देणार नाहीत. फक्त घाणेरडे आरोप करत आणि कपोलकल्पित घटना सांगत धुरळा उडवायचा एवढेच जमते.

कॉकटेल पार्टीचे माहीत नाही, पण रस्त्यावरचा धिंगाणा मी स्वतः पाहिलेला आहे. माझी पण तेव्हा उखंसारखीच सटकली होती.

टवाळ कार्टा's picture

28 Jul 2015 - 2:59 pm | टवाळ कार्टा

तो तर इथे पण चालतोच की

इथे म्हणजे कुठे? पुन्हा एकद सांगतो.. आक्षेप धिंगाण्याला नाही.. (म्हणजे आहे, पण तो वेगळ्या कारणासाठी). आक्षेप मुंजीच्या वरातीत कोंबडी पळालीवर नाचण्याला आहे.

टवाळ कार्टा's picture

28 Jul 2015 - 4:29 pm | टवाळ कार्टा

http://www.misalpav.com/comment/722684#comment-722684

याच प्रतिसादात लिहिलेले परत लिहायला आलेलो

nasatiuthathev's picture

30 Apr 2014 - 8:29 pm | nasatiuthathev

वरील सगळ्या संमिश्र प्रतिक्रिया वाचल्या …. काही पटल्या काही पटल्या नाहीत
बदलेल्या काळाबरोबर बदलले पाहिजे अगदी बरोबर … पण अस ???
१ . मला अस वाटते कि असले समारंभ हल्ली फक्त दिखाऊपणा साठी आणि एकदाचे झाली मुंज या साठी होतात ( घरात जर कोणी वडीलधारी मंडळी असतील तर त्यांना समाधान (झाले पण नंतर म्हणू नका हे करत नाही ते करत नाही ) म्हणून केले जातात .
२. ३१ डिसेंबर किंवा दारू पिणे हा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे पण वरील समारंभाचा पार्टी साठी कारण म्हणून जर उपयोग करणारे असतील तर त्यांची वैचारिक पातळी नक्कीच …… (टीप दारू पिण्यासाठी / पार्टी करण्यासाठी काही कारण असलच पाहिजे अस नाही अस म्हणणारे पाहण्यात आहेत )
३. ब्राम्हण जातीचा उल्लेख कदाचित अश्या साठी असावा कि ब्राम्हण वर्ग कुठलाही बदल असो (चांगला अथवा वाईट ) तो स्वीकारायची तयारी दर्शवतो आणि स्वीकारतो देखील . पण ह्या सगळ्यात त्या बदलाकडे वाहवत पण जातो .
४. राहिला प्रश्न आजच्या काळात ह्या सगळ्या गोष्टी पाळता येतील कि नाही ???? तर माहिती म्हणून सांगतो आमच्या ऑफिस मध्ये लघुशंकेला जाताना जानवे कानावर अडकवणारे बरेच जण आहेत त्यामुळे पाळणार कसे ??? आता ते शक्य आहे का?? इथे वेळ कोणाला आहे ??? असले फालतू कारण देण्या पेक्षा मला जमणार नाही हे कारण तरी निदान खर आहे ….
बाकी संविधानाने व्यक्ती स्वातंत्र दिले आहेच …।

आयुर्हित's picture

2 May 2014 - 10:03 pm | आयुर्हित

येत्या ४ तारखेच्या मुहूर्तावर एका पुणेकर मित्राच्या १० वर्षे वय असलेल्या मुलाची मुंज आहे.
त्याला कुठली भेट द्यावी?

साती's picture

3 May 2014 - 12:26 am | साती

आवडेल त्याला.
आयुष्यभर लक्षात रहाल तुम्ही त्याला.

(नाहीच मिळालं तर ध्रुवबाळ, श्रावणबाळ यांच्या गोष्टी पण देऊ शकता. :) )

ह्यासाऱ्या गोष्टी त्याने आईच्या गर्भात असतांनाच ऐकल्या असाव्यात.
कारण दरवर्षी वेद व पुराणांचे वाचन होत असते त्यांच्या घरी!

साती's picture

3 May 2014 - 1:14 pm | साती

श्रावण बाळाची गोष्टं रामायणात आहे की पुराणात?
असल्यास कुठल्या पुराणात?

तुम्हाला खरंच टँजंट जातंय की तसं भासवताय?? =))))

टवाळ कार्टा's picture

3 May 2014 - 1:29 pm | टवाळ कार्टा

"भक्त प्रल्हाद"...१० व्या वर्षीच??? =))

संपादकांसाठी,
हा अवांतर प्रतिसाद आहे...आवडला नाही तर पंख लावावेत

सूड's picture

5 May 2014 - 12:01 pm | सूड

__/\__

बॅटमॅन's picture

5 May 2014 - 12:35 pm | बॅटमॅन

=))

हेच आठवलं होतं, द्या टाळी =))

चिन्मय खंडागळे's picture

3 May 2014 - 1:11 am | चिन्मय खंडागळे

किंवा श्यामची आई. सर्व कुमारवयीन मुलगे आवडीने पाहतात.

साती's picture

3 May 2014 - 1:13 pm | साती

त्यांना टँजेंट जातंय.

उडन खटोला's picture

22 May 2014 - 11:23 pm | उडन खटोला

तर मंडळी ती बहुचर्चित मुंज पार पडली.
इथे पोस्ट टाकली त्या वेळी त्या मित्राशी वेळोवेळी चर्चाहि सुरुच होती. मला मुख्य भीती होती कि मुंजीच्या जेवणावळीत सामिष अन्न ठेवतोय का काय? अर्थात "तसे झाले तर मी न जेवता जाईन" अशी इमोशनल धमकी दिली होती.
मुंज उत्तम झाली. चक्क सा-या तरुणी, भूतपूर्व तरुणी नऊवारी नेसून होत्या. जेवणाचा बेत अगदी पारंपारिक होता.
:
:
संध्याकाळचे कुठल्याश्या मॉल मधील पब चे निमंत्रण होते.
ठरल्या प्रमाणे मी गेलोच
सकाळी नथ - नऊवारी ल्यालेल्या तरुणी मिनी आणि मायक्रोमध्ये कंबर हलवत नाचत होत्या … कहर म्हणजे मुंज मुलगा पार्टीस हजर होता. मोकटेल पीत चिकन लॉलीपॉप चे लचके तोडत होता.
ब्राह्मण्याचा कडेलोट बघून मी पाणी पिउन मित्रास केवळ ग्रीट करून, माझ्या छोट्या मित्रा बरोबर त्याच्या उत्सफूर्त आग्रहाखातर नृत्यहि केले आणि तिकडून काढता पाय घेतला.
ब्राह्मण्यावरील बलात्कार रोखण्यात मी कमी पडलो. माझा धिक्कार असो.

मूळ पोस्ट - अभिराम्न साठ्ये ,पुण्यनगरी

ब्राह्मण्यावरील बलात्कार रोखण्यात मी कमी पडलो. माझा धिक्कार असो.
अर्रर्र! बरं, जाऊ द्या, आता यापुढे तुम्ही मुंजींना जाऊच नका कसे! पबमधील आमंत्रणांना होकारही देऊ नका, म्हणजे बरे वाटेल. ;) (हलके घ्या, मी उगीच चिडवतीये)

चिन्मय खंडागळे's picture

23 May 2014 - 12:57 am | चिन्मय खंडागळे

ही ब्राह्मण्या कोण आणखी? आणि मिनि घालून नाचत होती तर बलात्कार होणार नाही तर काय? आपल्या पवित्र संस्कृतीला न शोभणारे कपडे घालून या बाया नाचतात म्हणून बिच्चारे पुरुष चाळवतात.

रेवती's picture

23 May 2014 - 6:46 am | रेवती

आँ? काय हो चिन्मयसाहेब? तुम्हाला काय झालं एकदम?

टवाळ कार्टा's picture

23 May 2014 - 12:11 pm | टवाळ कार्टा

तर काय
लहान मुलींवर बलात्कार करणारे आपल्या "उच्च" संस्क्रुतीतले नसतातच मुळी
आणि परदेशात कमी लेव्हलच्या संस्क्रुतीमधे "बिकिनी"तल्या मुली/बायकांवर पण बलात्कार होत नाहीत कारण त्यांची संस्क्रुती आपल्याइतकी "उच्च" नाही

शब्दबम्बाळ's picture

29 Jul 2015 - 2:13 pm | शब्दबम्बाळ

परदेशात कमी लेव्हलच्या संस्क्रुतीमधे "बिकिनी"तल्या मुली/बायकांवर पण बलात्कार होत नाहीत!!

बलात्काराचे समर्थन आजिबात करायचे नाही पण हे वरच वाक्य काहीच्या काही उगीच लिहिलंय!
तो प्रतिसाद जुना आहे त्यामुळे आता तरी facts तुम्ही वाचल्या असतील अशी आशा आहे...

आपल्या इथेही वाईट प्रवृत्ती आहेतच आणि त्यावर योग्य उपाय निघायला हवा पण त्या "केवळ" आपल्या इथेच आहेत हे म्हणणे म्हणजे इथे असलेल्या चांगल्या लोकांचाही अपमान करणे आहे असे वाटते.

नानासाहेब नेफळे's picture

23 May 2014 - 8:35 am | नानासाहेब नेफळे

मुंज या विधीमध्ये वर्णाश्रम पाळावा असे सांगतात, त्यामुळे या विधीवर कायदेशीर बंदी आणावी. पाच वर्षांची सक्तमजुरी आणि पच्चास पच्चास तोला दंड ठेवावा.
-हुकमावरुन

म्हैस's picture

30 May 2014 - 2:49 pm | म्हैस

मुंज हे celebrate करण्याचं कारण झालं आहे हल्ली. मुंज करणार्यांना ती कशासाठी आणि कशी केली जाते हे हि ठावून नसतं. उगीच परंपरा पाळायची म्हणून मुंज केली जाते. त्यापेक्षा न केलेली बरी कि

मालकाचे जाते आणि कोठावळ्याचे मात्र पोट दुखते तशी काहीशी गत आहे ही =))

आमच्याकडे याला भिकार्‍याला सुपारी नि सावकाराला ओकारी म्हणतात. ;)

बॅटमॅन's picture

30 May 2014 - 3:53 pm | बॅटमॅन

च्यायला *ROFL*

अत्रुप्त आत्मा's picture

30 May 2014 - 4:26 pm | अत्रुप्त आत्मा

अगागागागागागागागागागा......... http://www.sherv.net/cm/emo/happy/rolling-on-the-floor-laughing-smiley-emoticon.gif
मर्मभेदक सुडुक!!! http://www.sherv.net/cm/emo/laughing/laughing-hard-smiley-emoticon.gif

रेवती's picture

30 May 2014 - 6:39 pm | रेवती

टाळ्या.

बॅटमॅन's picture

4 Jun 2014 - 2:37 pm | बॅटमॅन

आयला, या धाग्यावरची प्रातिसादिक दिवाळखोरी अजूनही थांबलेली दिसत नाही अजून!

(प्रतिसाद चांगलेत ओ, पण बास की आता.)

दोनसं कराचं ना भो. अशी हिंमत हारून कसं चालेल..? ;)

बॅटमॅन's picture

4 Jun 2014 - 4:11 pm | बॅटमॅन

अरे हो की. दोनशे करा!!!!!

बॅटमॅन's picture

4 Jun 2014 - 4:11 pm | बॅटमॅन

करा ना, करा ना, करा ना, गडे!!!!

विटेकर's picture

4 Jun 2014 - 5:16 pm | विटेकर

मी माझा अनुभव सांगतो !

मी माझ्या मुलाची यथासांग शास्त्रोक्त पद्द्धतीने श्रद्धापूर्वक सर्व विधीयुक्त मुंज केली ! गुरुजीनी तत्पूर्वी मला सांगितलेला गायत्री मंत्र जप देखील मी पूर्ण केला. विधी बरोबरच त्याच्या आईने मुंजीत भरपूर मिरवून घेतले,( मातृभोजनानंतर आईला काहीही काम नसते , केवळ मिरवणे! भिक्षावळीची वेगळी साडी नेसणे हा ही एक प्रोग्राम असतो ! भिक्षा हा पण एक इवेंट !) कधीही न भेटणारे सारे पाहुणे भेटले,माझे आई - वडील खूष झाले.
मला झालेले फायदे -
१. हा सारा समारंभ मी पूर्णपणे एन्जोय केला. गायत्री जप देखील ! मी देखील किंचित अंतर्मुख झालो.
२. मुलाचा खोडकरपणा ( त्याच्या आईच्या भाषेत ताप देणे ) आश्चर्यकारक रित्या कमी झाले.आता तो रोज संध्या करत नाही पण तरीही !
३. आई- वडील खूष ,बायको खूष ! दोन्ही एक्दम खूष असे प्रसंग संसारी माणसाच्या आयुष्यात फार कमी येतात.
४. डिंगणकरांचे जेवण जेऊन समस्त मंडळी खूष झाली.

तेव्हा , स्वानुभवावरुन सांगतो , मुलाची / मुलीची , कोणत्याही जातीतल्या , मुंज जरुर करावी , आपली श्रद्दा असेल तर !
डॉ. सुबोध खरेंच्या सूरात सूर मिसळून म्हणेन - रायगडावर जाऊन दारु पिऊ नये , त्याच्यासाठी शेकोडो अन्य ठिकाणे आहेत!! त्यामुळे धागाकर्त्याच्या भावनेशी १००% सहमत !
मला ही जर कोणी रायगडावर दारु प्यायचा कार्यक्रम पूजेचे आंमंत्रण सांगून करेल, तर मी त्याच्या कानाखाली खेचीन !
शेण खाण्याच्या जागा आणि प्रसंग ठरलेले आहेत , मला व्यक्ति स्वातंत्र्य आहे म्हनून मी रस्त्याने नागडा चालेन म्हणणार्‍या इसमाला पोकळ आनि भरिव बाम्बूने आलटून- पालटून फटके देण्यात यावेत.

उडन खटोला's picture

27 Jul 2015 - 6:00 pm | उडन खटोला

या धाग्याशी तसा सम्बन्धित नसला तरी थोडासा अवान्तर आणि थोडसा धाग्यालाच चिकटलेला एक मुद्दा मान्डतो-

नुकतेच एक महामहिम कथित (?)धर्मशास्त्रकार ढुढ्ढाचार्य व्यक्तिशी भेट झाली . त्यान्च्याशी बोलताना ब्राह्मण आयटी किंवा सॉफ्टवेअर इन्जिनियर्स व इतर परदेशी जाणार्या मन्डळींच्या धर्मबाह्य वर्तनाचा विषय निघाला . म्हणजे असे की अशी बाहेर जाणारी मन्डळी ब्राह्मण्याचे नियम सर्रास पायदळी तुडवतात. उदा. मद्य-मांस भक्षण , परस्त्रीगमन ( वन-नाइट स्टॅन्ड इ.इ.इ.) तर अशा मन्डळीनी केलेल्या पापाचरणाबाबत धर्माचे काय मत आहे?

यावर त्या "महामहिम कथित (?)धर्मशास्त्रकार ढुढ्ढाचार्य "नी दिलेले उत्तर ऐल्कून मी उडालोच! ते म्हणाले की "आयटी इन्जिनियर्स परदेशात जावुन भारताचे भले (?) करत असलेने आम्ही त्याना नियमातून सूट दिली आहे. गळ्यातील जानवे काढून ठेवावे व मग सर्वकाही (मद्य-मांस भक्षण , परस्त्रीगमन इ.इ.इ.) जे करायचे ते करा . फक्त एकादशीला किंवा गणपती /सत्यनारायण पूजेच्या वेळेला गोमूत्र पिवून जानवे घाला , मग काही दोष नाही , ब्राह्मण्य अबाधित राहते "

च्यायला , हे मला इतकी वर्षे माहित नव्हते . धर्मात अशीदेखील सोय आहे तर ! आम्ही फुकट गेली ५० वर्षे ब्राह्मण्य धर्माचे पालन करीत राहिलो !

हिंदू धर्म इतका सुधारला ? मला माहितच नव्हते बुवा !

* कॄपया कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही , पण उपरोल्लेखित प्रसन्ग १००% खरा आहे !

प्रसाद गोडबोले's picture

27 Jul 2015 - 7:00 pm | प्रसाद गोडबोले

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ

षिळ्या कढीला उत आणलाय पण भारी उत आणलाय ... ५-५० प्रतिसाद तर कुठे गेले नाहीत !

१)बाकी ढुढ्ढाचार्य ह्याम्छ्या 'भारताचे हित' ह्या लॉजिकशी सहमत नाही , आधी धर्म महत्वाचा , मग देष ( हे आम्ही सौदीत जाऊन शिकुन आलो आहोत ) त्यामुळे भारताच्या हित अहिताशी संबंध नाही !

२) जानवे काढून ठेवावे >>> जानवे काढायचा संबंधच येत नाही ! जानवे हे केवळ पितृऋण , ऋषिऋण आणि देवऋण ह्यांचे सतत स्मरण करुन देणारे एक साधन अर्थात रिमाईंडर ह्या अर्थाने जानवकाघालत असणार्‍यांन्ना जानवे काढुन ठेवायचा संबंधच येत नाही ( आणि जर जानवे न घालताही ह्या तिन्हींचे स्मरण रहाणार असेल तर जानवे घालयाची संबंध येत नाही !!)
३) मद्य-मांस भक्षण , परस्त्रीगमन >>> महाभारतात वाचलेल्या कित्येक गोष्टींवरुन हे सिध्द होते की ब्राह्मण वैदिक काळात मांसभक्षण करत होते ( संदर्भ : महाभारत सभापर्व यज्ञानंतर युधिष्टिराने दिलेल्या पार्टीचे वर्णन : " ब्राह्मणांना वेगवेगळे प्रकारचा वराहांचे आणि हरणांचे मांस खायला घालुन संतुष्ट केले " :) त्यामुळे मद्य मांसभक्षण हे काही पाप नव्हे ! परस्त्री ह्या शब्दाचा अर्थ "दुसर्‍याची पत्नी" असा आहे आणि अ‍ॅडल्टरी हा हमेरिकेतही गुन्हा असल्याने शहाणी माणसे त्या भानगडीत पडत नाहीत . ( पडलीच तर त्यांन्ना पाप नाही , अमेरिकन बांबु लागेल !!)

धर्मात अशीदेखील सोय आहे तर ! >>> धर्मात सोय आहे असे नसुन मुळ धर्माचा अभ्यास न केल्याने पुरोहित वर्गाने त्यांच्या सोयी ने खपवलेल्या रुढींना धर्म मानण्याची चुक बहुसंख्य लोक करत आहेत ! मुळ धर्माकडे चला ! बरेच शॉक्स आणि सर्प्राईजेस मिळतील !!

आता ह्या श्रावणात सत्यनारायण घालयच्या ऐवजी महाभारत वाचा . उपनिषद वाचा किमान इशावास्योपनिषद तरी वाचाच ! एकदा 'न कर्मः लिप्यते नरे ' ही अवस्था प्राप्त झाल्यावर ब्राह्मण्य अबाधित राहते की नाही असले प्रश्ण पडणार नाहीत !!

:)

उडन खटोला's picture

27 Jul 2015 - 7:14 pm | उडन खटोला

सर्वकाही (मद्य-मांस भक्षण , / विवाहबाह्य- विवाहपूर्व शरीरसम्बन्ध ,परस्त्रीगमन इ.इ.इ.)पापाचरणाबाबत धर्माचे काय मत आहे? असे वाचावे!

प्रसाद गोडबोले's picture

27 Jul 2015 - 8:05 pm | प्रसाद गोडबोले

तेच सांगतोय

सनातन धर्माच्या मते मद्य-मांस भक्षण , / विवाहबाह्य- विवाहपूर्व शरीरसम्बन्ध ,परस्त्रीगमन ह्यातील परस्त्रीगमन सोडता बाकी काहीही पाप नाही !!

:)

सुबोध खरे's picture

27 Jul 2015 - 8:18 pm | सुबोध खरे

अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम
परोपकारः पुण्यः पापायः परपीडनं
अठरा पुराणे वाचली तरी त्यातून व्यासांची दोनच वाचणे खरा अन्वयार्थ सांगतात.
परोपकार करणे हे पुण्य आहे
आणी
दुसर्याला त्रास देणे हे पाप आहे.
बाकी चालू द्या.

काळा पहाड's picture

28 Jul 2015 - 12:13 am | काळा पहाड

पण जो त्रास सहन करतो हे त्याचं पुर्व संचित असेल तर? म्हणजे असं की अ नं मागील जन्मात ब ला त्रास दिला आणि ब हा या जन्मात त्याची परतफेड करतोय. ब हा पापी कसा? वैश्विक न्यायानुसार ब हा पापी नाही.

बॅटमॅन's picture

27 Jul 2015 - 8:19 pm | बॅटमॅन

यग्जाक्टली!

काळा पहाड's picture

27 Jul 2015 - 9:51 pm | काळा पहाड

तुमची थट्टा क्रत असतील ते

पगला गजोधर's picture

28 Jul 2015 - 11:01 am | पगला गजोधर

गाय गावठी हवी ? की जर्सी चालेल ??

होबासराव's picture

28 Jul 2015 - 12:57 pm | होबासराव

देशी गाय म्हणा हव तर :)

पगला गजोधर's picture

28 Jul 2015 - 2:37 pm | पगला गजोधर

सप्तसमुद्रापलीकडे भारतातून कुरिअरने मागवावी लागेल चापटी (गोमुत्राने भरलेली हो), आणि पुढे तिचा अपेयपान करण्यासाठीसुद्धा वापर करता येइलच कि, (अहो पहिल्यांदा गोमुत्राने भरल्यावर, पुढच्या अपेयपानाच्या फिलिंग्स/ टॉपअप्स आपोआपच पवित्र झाल्याच की )

नाखु's picture

28 Jul 2015 - 10:51 am | नाखु

त्या मुंज-मुलाचे लग्नापर्यंत चालू राहण्याचे कंत्राट ऊ़खंनी घेतले आहे तेव्हा बटूला+मिपापालकाला शुभेच्छा !!!

नेमका प्रॉब्लेम काय आहे ? आधी सोवळ ओवळ पाळतो म्हणून बोंब होती, आता कोस्मोपोलिटिअन झालो तर हे सोवळ्या ओवाळ्या च्या मागे लागलेत

तर्क : विरोध ब्राह्मणाना आहे, आकर्षण ब्राह्मण्याच आहे

शेरिंग मध्ये राहताना याचा अनुभव घेतला, मग अगदी ताटाला ताटाला ताट लावून सामिष पंगतील वरण भात खाल्ला ( सामिष आपल्या कुवती बाहेरचं ) मग तीर्थ प्राशन …… आता जाणव्याने तीर्थ महाग केला म्हणून बोंब

बाकी लेख म्हणजे कल्पना विलास आहे

या प्रकाराला माझाही विरोध आहे. अर्धवट संस्कृती पेक्षा संस्कृती नसलेली उत्तम. निदान विटंबना तरी होणार नाही. मुंज मुलाची, पण 'एन्जॉय' हे पालक करणार. पुढची वाट मुलासाठी घालून देणार. केवळ युसलेसपणा आहे हा.

आणि एकच म्हणतो; तुमच्या धाग्यात तुम्ही जो नम्र आक्षेप घेत पुढे तितक्याच नम्रपणे त्या जातीवर्/उपजातीवर बोट ठेवलं आहेत; तिथवरच गोष्टी थांबत नाहीत. हळद हा प्रकार मला आजवर कळला नाही. हळदीला ये हं ताईच्या! फुल दारू नॉनव्हेज डीजे बिजे आहे असं सांगणा-या मुलाकडे मी मख्ख चेह-याने बघत होतो. हे काय आहे? याचंही जरा उत्तर शोधावंत. अशी अनेक उदाहरणं आहेत. लग्न समारंभ, पहिला दुसरा वाढदिवस, सत्यनारायण अशा अनेक प्रसंगी 'अनकॉल्ड फॉर' गोष्टी केल्या जातात आणि या प्रसंगांचं विद्रुपीकरण होतं. हा कुण्या एका जातीचा प्रश्न नसून आपल्या समाजातील एकंदरित मानसिकतेचा आहे. जिकडे तिकडे चैन, मौज शोधताना सत्वाची विटंबना करताना आपल्याला काहीच गैर वाटत नाही हे दुर्दैवी वास्तव आहे.

राही's picture

29 Jul 2015 - 12:49 am | राही

गंमत आहे. आपल्याकडे कोणताही आनंदाचा प्रसंग साजरा करताना मद्यप्राशन आणि मांसभक्षण करण्याची प्रथा तीन हजार वर्षांपूर्वी होती. त्यानंतरही अनेक शतके ती प्रचलित होती. किंबहुना सर्वांनी एकत्र जमून मांसभक्षण आणि मद्यप्राशन करणे हाच आनंदाचा प्रसंग असे. आता गंमत अशी की बदलत्या संस्कृतीनुसार काही लोकांनी मद्यमांस सोडून दिले, पण अनागर आदिम, किंवा ज्यांच्यापर्यंत संस्कृतिबदलाचे वारे पोचले नाहीत, अशा बहुसंख्य लोकांमध्ये ती प्रथा अजूनही कायम राहिली आहे. या आदिम किंवा अनागर समाजात प्राचीन काळच्या अनेक प्रथा-परंपरा मूळ रूपात टिकून आहेत पण आज त्याच प्रथा निकृष्ट, टाकाऊ, विद्रूप मानल्या जातात.
ह्याला समांतर उदाहरण स्थलांतरितांच्या संस्कृतीचे देता येईल. ज्या काळात हे स्थलांतर झाले, त्या त्या काळच्या भाषा, प्रथा हे लोक आपल्याबरोबर घेऊन गेले. मूळ भूमीत अनेक बदल झाले ते त्यांच्यापर्यंत पोचले नाहीत आणि त्यांची भाषा तुलनेने जरी मूळ रूपात कायम राहिली तरी मूळ भूमीत ती अशुद्ध समजली जाऊ लागली.
संस्कृतीत होणारे बदल हे चांगल्यासाठीच होतात किंवा असतात असे मानता येईल. पण पुन्हा या प्रथा आपल्या माहितीनुसारच्या किंवा आपल्या समजानुसारच्या मूळ-शुद्ध रूपातच साजर्‍या करण्याचा अट्टाहास करताना काही लोक दिसतात तेव्हा या विरोधाभासाची गंमत वाटते.

यसवायजी's picture

29 Jul 2015 - 9:55 am | यसवायजी

+१

वेल्लाभट's picture

29 Jul 2015 - 10:13 am | वेल्लाभट

ओक्के

मला हा लेख म्हणजे निव्वळ कल्पनाविलास वाटतोय..... ह्यातल्या किती बाबी खऱ्या आहेत ह्या बाबतित शंका आहे. एका क्षणासाठी मान्य करु कि हे खरे आहे , तर माझा प्रश्न आहे कि त्यांनी तसे केले तर तुमचे काय गेले ? पाडगावकरांनी म्हटल्याप्रमाणे "त्यांनी प्रेम केले , तुमचे काय गेले ?" तुमच्या का एवढे पोटात दुखतय ? जर तुम्हाला PUB मध्ये जाणे पटत नवते तर कशाला गेलात? कोण कोण mini skirt मध्ये वावरतंय ते बघायला? की कोण काय खातंय ते बघायला? मला एकूण हा प्रकार कल्पनारांजीतच वाटतोय . उगाच कोणत्या तरी समजा विरुद्ध गरळ ओकायाची झालं आणि हे सगळे आपले खरे नाव लपवून.

सूड's picture

29 Jul 2015 - 2:32 pm | सूड

कोण कोण mini skirt मध्ये वावरतंय ते बघायला?

पुण्यनगरी वाचलंत नाही का? पुण्याच्या लोकांची सवयच आहे, बघताना/खाताना मारे मिटक्या मारतील. त्यानंतर आव मात्र संस्कृतीरक्षकाचा!!